मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शिलाहारांचा कोप्पेश्वर-भाग ३

जयंत कुलकर्णी · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
Simple, Free Image and File Hosting at MediaFire अनेक वर्षे म्हणजे जवळजवळ ९०० वर्षे झाली हे देऊळ निसर्गाशी संघर्ष करत उभे आहे. उन, पाऊस, वारा, तापमानाचे चढउतार या सगळ्याशी टक्कर देत या देवळाचा गाभा (स्ट्रक्चर) अजुनही सुस्थितीत आहे. त्याचे आरेखन ज्या वास्तुविशारदाने केले आहे आहे त्याला मानावेच लागेल. ९०० वर्षात हे देऊळ गळत नाही ना कृष्णेच्या पाण्याने याला काही झाले. त्याकाळी वास्तुविशारदांनी देऊळ उभारले आणि मग ते नशिबावर हवाला ठेऊन बघत बसले असे नव्हते. त्यांचे नशीब ते देऊळ टिकले असे नसून त्यांनी प्रत्येक गोष्टींचा पूर्ण विचार केला असणार हे निश्चित. या देवळाचे आरेखन करताना एक एक तुकड्याचा विचार करताना या वास्तूविशारदांनी त्यांचा व्यापक दृष्टीकोन सोडला नव्हता हे लक्षात येते. सगळे बांधकाम वजनदार दगडाचे आहे हे लक्षात घेता सगळ्या वास्तूचा समतोल राखण्यासाठी त्यांना काय काय करावे लागले असेल याची आपण कल्पना करु शकतो. हे काम किती अवघड असेल हे कळण्यासाठी फक्त तुम्हाला हे देऊळ बांधायचे आहे तर सुरवात कुठून कराल असा विचार करायला घेतलात की बस्स ! मागच्या भागात म्हटल्याप्रमाणे आज आपण देवळातील मूर्तींकडे वळू. येथे जी स्त्रियांची शिल्पे आहेत त्यांना सुरसुंदरी अशी उपाधी आहे. या स्त्रिया वाद्ये वाजवताना दिसतात, नटताना दिसतात, नृत्य करताना दिसतात तर काही पत्र लिहितानाही दिसतात. काही स्त्रियांची शिल्प बघू. पत्र लेखिका. पत्र लेखिकांची एकूण पाच शिल्पे आहेत. कदाचित पत्र लिहायला सुरवात आणि त्याचा शेवट असा क्रम असावा. त्यातील काही शिल्पांची छायाचित्रे खाली देतो. Simple, Free Image and File Hosting at MediaFire या स्त्रिया कागदाच्या भेंडोळ्यांवर लिहित असताना दाखविलेल्या आहेत. म्हणजे आपण जुन्या सिनेमात जे खलिते पहातो त्या प्रकारच्या कागदावर. मला वाटते त्या काळात कागदाचे ताव भेंडोळ्यांच्या स्वरुपातच उपलब्ध होत असावेत. त्यांनी अत्यंत नाजुकपणे हातात लेखणी धरलेली आहे. पहिल्या दोन बोटात लेखणी धरल्यावर उरलेली बोटे अत्यंत मोहकरित्या विलग झालेली दाखविलेली आहेत. मानवी आकृत्या काढताना किंवा घडवितांना गुडघ्याची ठेवण (वरून दिसणारी) किंवा कोपराचा बाक व ठेवण काढणे किंवा कोरणे अत्यंत अवघड. विशेषत: कोपराचे टोक ज्याप्रमाणे दिसते तसे आले नाही तर साऱ्या प्रतिमेची रयाच जाते. चित्र किंवा शिल्प मग बेढब दिसू लागते. किंवा ‘फ्लॅट’ होते. असे येथे ही अनेक शिल्पाच्या बाबतीत झाले आहे पण शिल्पकारांनी सुरसुंदरींच्या बाबतीत असे होणार नाही याची पुरेपुर काळजी घेतली आहे. हे आपल्याला वरील छायाचित्रात दिसुन येते. तिन्ही शिल्पात त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची वस्त्रे परिधान केलेली दिसतात. फॅशन डिझायनरला हे देऊळ म्हणजे कल्पनांचा एक उत्तम स्त्रोत आहे. शेवटच्या शिल्पातील शॉर्ट स्कर्टसारखे दिसणारे वस्त्र आजही लोकप्रिय हो़ऊ शकते ( तो शॉर्टस्कर्ट नाही हे मला माहीत आहे). किंवा ती वस्त्रे व त्याला शोभतील असे दागिने असा एक उत्तम पोषाख हो़ऊ शकतो. असो. वाद्ये वाजविणाऱ्या स्त्रिपुरुषांची शिल्पे. Simple, Free Image and File Hosting at MediaFire वरील स्त्रीने तिचे केस अंबाडा घालून खाली सोडले आहेत. तसेच तिने केसातही दागिने घातलेले दिसतात. तिच्या हातात एक छोटे मृदूंग दिसत आहे. कोपराजवळ एक दागिना आहे किंवा ती वाकी असावी पण ती दंडावर न घालता बरीच खाली घातलेली दिसते. व खांद्यावरही एक दागिना आहे. असे दागिने मी तरी बघितले नाहीत. शेजारील शिल्पात एक पुरुष मृदूंग वाजवताना दिसत आहे तर त्याच्या शेजारील माणसाची टोपी वेगळीच दिसते. Simple, Free Image and File Hosting at MediaFire खालील शिल्पात ही स्त्री जे वाजवते आहे ते साधे मृदूंग नाही. याच्या वर चामड्याला ताण देण्याच्या दोऱ्यांखाली सरकत्या खुट्या असतात. एका हाताने हे वाद्य वाजवायचे व त्याचवेळेस त्या खुट्ट्या सरकवून वेगळा ध्वनी निर्माण करायचा असा हा अवघड प्रकार असतो. या प्रकारचे वाद्य दक्षिणेत वाजवत असत पण बहुदा आता कोणी वाजवत नाहीत. Simple, Free Image and File Hosting at MediaFire खालील चित्रात एक स्त्री विणेसारखे एक वाद्य वाजवताना दाखविले आहे. ती वीणा निश्चितच नाही पण दोन भोपळ्याच्या वाद्यासारखे काहीतरी दिसत आहे. शेजारीच काटकोनातील भिंतीवर एक सुंदर स्त्री नृत्य करताना दिसते. मी मागे म्हटले ते येथे स्पष्ट व्हावे.समजा ती नृत्य स्त्री समोरुन बघितली तर वाद्य वाजविणारी स्त्री बाजूने दिसते. जर ती समोरुन बघितली तर नृत्य करणारी बाजूने दिसते. Simple, Free Image and File Hosting at MediaFire खालील शिल्पात शेवटी एक नागकन्या दाखविलेली आहे. ती संपूर्ण नग्न असून तिच्या मांडीला सर्पांनी विळखा घातलेला दिसतो व तिने तिचे हातही नागाच्या फण्यासारखे वर पसरलेले दिसत आहेत. Simple, Free Image and File Hosting at MediaFire हे शिल्प चक्क एका धनुर्धारी स्त्रीचे आहे. एका हाताने तिने तिचे धनुष्य तोलले आहे तर दुसरा हात भात्याकडे वळलेला दिसतोय. या मूर्तीचे परस्पेक्टीव्ह जरा चुकलेले दिसते.... Simple, Free Image and File Hosting at MediaFire माझी अत्यंत आवडती दोन शिल्पे.. या दोन शिल्पांवर पडणारा प्रकाश हा केवळ अद्वितीय आहे. याचीही मोडतोड झाली आहे नाहीतर या सुंदरींच्या लावण्याची किर्ती दुरवर पसरली असती. Simple, Free Image and File Hosting at MediaFire Simple, Free Image and File Hosting at MediaFire Simple, Free Image and File Hosting at MediaFire वरील अर्धे छायाचित्र हे पहिल्या शिल्पाचेच आहे. आता ही दोन शिल्पे बघण्याची मजा समोरुन नाही हे लक्षात घेणे अत्यंत आवश्यक आहे. समोरुन ही शिल्पे साधी मान वळवलेल्या स्त्रियांची वाटतात पण मी हे छायचित्र ज्या कोनातून काढले आहे त्या कोनातून बघा मग तुम्हाला त्याचे खरे सौंदर्य समजून ये़ईल. दुसऱ्या चित्रात ती स्त्री अचानक मागे वळून बघते आहे व तेही इतक्या मोहकपणे, तिच्या चेहऱ्यावरचे भावही बघण्यासारखे आहेत. ही अजून एक सुंदर स्त्री. यात तिचा कमनीय बांधा आपल्याला मोहवून टाकतो. दुसरे शिल्प एका नग्न स्त्रीचे दिसते. Simple, Free Image and File Hosting at MediaFire अजून काही छायाचित्रे....... Simple, Free Image and File Hosting at MediaFire Simple, Free Image and File Hosting at MediaFire Simple, Free Image and File Hosting at MediaFire Simple, Free Image and File Hosting at MediaFire Simple, Free Image and File Hosting at MediaFire Simple, Free Image and File Hosting at MediaFire श्रीकृष्णाला वंदन करुन या छायाचित्रांबरोबर ही लेखमाला संपली असे..............(कारण इतकी छायाचित्रे आहेत की तुम्हाला आता कंटाळा येईल.) जयंत कुलकर्णी. परत केव्हातरी आता हंपी संपवतो........:-) .

वाचन 22305 प्रतिक्रिया 0