Skip to main content

पणती

लेखक क्रान्ति यांनी सोमवार, 20/10/2014 16:24 या दिवशी प्रकाशित केले.
एक चिमुरडी पणती दिसली रस्त्यावर पणत्या विकणारी पाटी-पुस्तक-शाळेवाचुन व्यवहारी गणिते शिकणारी नऊ-दहा वर्षांची इवली चंद्रकोरशी नाजुक, सुंदर चतुर, कुशल संभाषण हसरे व्यवहाराला परखड, कणखर 'ताई, काकू घ्या ना पणत्या हलक्या, सुंदर, सुबक, टिकाऊ शोभिवंत रांगोळीसाठी दीपमाळ ही नवीन देऊ? या पानांच्या आणि फुलांच्या शंख-शिंपल्यांच्या, मोरांच्या सोनेरी, रंगीत मण्यांच्या वेगवेगळ्या आकारांच्या खासच निवडुन देते सगळ्या भाव नका पण पाडू खाली आम्हां गरिबांच्या कष्टाचा तुमच्यावाचुन कुठला वाली? मोल असे माती-पाण्याचे कलाकुसर अन् कौशल्याचे स्नेह-वात घालाल तुम्ही तर जीवन होइल साफल्याचे' बोलुन गोष्टी चतुर, लाघवी त्या पणतीने मने जिंकली बघता बघता लहान-मोठ्या पणत्यांची ती चळत संपली पणतीच्या डोळ्यांत ज्योत अन् मनात दीपावली उजळली धन्य माउली आणि पिता ते ज्यांनी पणती अशी घडवली! क्रांति
दिवाळी अंक वर्ष

वाचने 11236
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

कविता आवडली. सकारात्मक!

पोर डोळ्यासमोर उभी राह्यली ना ताय!! नऊ-दहा वर्षांची इवली चंद्रकोरशी नाजुक, सुंदर चतुर, कुशल संभाषण हसरे व्यवहाराला परखड, कणखर मान गये!!

व्वाह!!

व्वा! आवडली आणि मनाला थेट भिडली कविता!

सहज, सुंदर अन लयदार कविता ! खरंच, साध्या साध्या गोष्टीतून कवि/कवयत्रीला किती संवेदना जाणवतात नै ? (नाहीतर, आमी आपले घेतल्या पणत्या की दिवाळीचा फराळ हादडायला मोकळे ) पणतीच्या डोळ्यांत ज्योत अन् मनात दीपावली उजळली धन्य माउली आणि पिता ते ज्यांनी पणती अशी घडवली! शेवटचे कडवे तर खासच !

थेट सरळ साधी सुरेख अन लयबद्ध कविता!