दिवाळी अंक २०१४

सुख आहे तरी कुठे - शशिकांत पानट

पैसा's picture
पैसा in दिवाळी अंक
20 Oct 2014 - 7:54 am

(श्री शशिकांत पानट हे एक हॉलिवुड कलाकार आहेत. सध्या मिपाचे सदस्य नसले तरी दिवाळी अंकासाठी म्हणून आकाश गायकी यांच्याद्वारा ही कविता आपल्याला उपलब्ध झाली आहे. त्याआठी श्री पानट आणि गायकी दोघांनाही धन्यवाद!)

*****************

एकदा सुख माझ्या स्वप्नांत आलं
त्यानं मला हलवुन जागं केलं
घसा खाकरुन मोठ्या रुबाबांत म्हणालं
"सुख हवय, सुख हवय"
अशी प्रार्थना करीत होतास ना?
आता आलो आहे, तर माझ्याशी बोल ना!

तलकाडू : एक प्रवास

चौथा कोनाडा's picture
चौथा कोनाडा in दिवाळी अंक
20 Oct 2014 - 7:49 am

मला जर कुणी सांगितलं असतं की तुला अनपेक्षितपणे अचानक, वाळूत बुडून गेलेल्या मंदिर संस्कृतीला भेट द्यायचा योग येणार आहे, तर मी अजिबात विश्वास ठेवला नसता. “वेळेशी शर्यत” करत हा योग साधला गेला त्याचीच ही कहाणी!

खुमासदार मिरासदार

मित्रहो's picture
मित्रहो in दिवाळी अंक
20 Oct 2014 - 7:34 am

शाळेत असताना मिरासदारांची साक्षीदार ही कथा आम्हाला धडा म्हणून होती. तेंव्हापासून तो सक्षीदार मनात घर करुन होता पण मिरासदारांची पुस्तके वाचण्याचा योग बरीच वर्षे काही आला नाही. साक्षीदार मात्र मनात पक्का भरला होता. मराठी आणि इंग्रजी मधे बराच वाचन प्रवास करुन झाल्यानंतर त्या साक्षीदाराने परत आपल्या अस्तित्वाची साक्ष दिली. यावेळेला मी क्षणाचाही विलंब न करता बुकगंगावर ‘मिरासदारी’ची ऑर्डर दिली. त्यानंतर मग ‘चकाट्या’, ‘भोकरवाडीच्या गोष्टी’, ‘माझ्या बापाची पेंड’ सारे घरी घर करुन गेले. मराठीत ग्रामीण कथा म्हटली की जी काही मोजकी नावे डोळ्यासमोर येतात त्यात द. मा. मिरासदार हे नाव फार मोठे आहे.

रविवार हा सुखाचा.

प्रभाकर पेठकर's picture
प्रभाकर पेठकर in दिवाळी अंक
20 Oct 2014 - 7:33 am

'अगं ए! जरा मस्त पैकी चहा टाक की एक'
'आधीच सकाळपासून दोन वेळा झाला आहे.' - स्वयंपाकघरातून नको त्या वेळी सत्यकथन.
'पण मला अजून एक हवा आहे.' मी चिवट.
'आंघोळ करा आधी. नाहीतर जेवणही मिळणार नाही.' - स्वयंपाकघर निर्वाणीवर.

वेगळ्या वाटेवर - संजीत (उर्फ बंकर) रॉय - बेअरफूट कॉलेज

मोदक's picture
मोदक in दिवाळी अंक
20 Oct 2014 - 1:09 am

.

संजीत रॉय.

डेहराडूनच्या प्रख्यात डून स्कूल मधून शालेय शिक्षण.
दिल्लीच्या सेंट स्टिफन्स कॉलेजमधून ग्रॅज्युएशन डिग्री.
कॉलेज दरम्यान व नंतर काही वर्षे स्क्वॅश या खेळामध्ये प्राविण्य.
३ वर्षे नॅशनल स्क्वॅश चँपीयन - १९६५, १९६७ व १९७१.

एक यशस्वी, स्वप्नवत करीयर..

बाकरवडी

इशा१२३'s picture
इशा१२३ in दिवाळी अंक
20 Oct 2014 - 1:07 am

नमस्कार मंडळी! सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा! सगळ्यांकडे दिवाळीची तयारी झाली असेलच. दिवाळीचा फराळ काय काय बनवलात? लाडू, करंजी, चकली, शंकरपाळे, चिरोटे, अनारसे असतातच, पण एखादा नवीन पदार्थ केला जातोच.

या वेळेस मी केलीये बाकरवडी! तशा पुण्यात चितळे मामा, हलवाई काका, जोशी अशा अनेक चवीच्या बाकरवड्या मिळतात. पण सणानिमित्त घरी केलेल्या खमंग बाकरवड्या छान वाटतात.

एक पणती

एस's picture
एस in दिवाळी अंक
20 Oct 2014 - 1:05 am

     "इथे येताना अजिबात माज करायचा नाही. कोण कधी घोडा काढून डोक्याला लावेल हे सांगता येत नाही. इथे सगळे असेच येडझवे येतात. कुणाचा धक्का लागला, काहीही झालं तरी आपलीच चूक असल्यासारखं गुपचाप पुढे निघून जायचं. कुणाशी काही बोलायला जाऊ नकोस. काही अडचण आली तर सरळ मला फोन लावायचा. मी येतोच."