संपादकीय

पैसा's picture
पैसा in दिवाळी अंक
20 Oct 2014 - 1:00 am

नमस्कार मंडळी!

मिपाचा तिसरा दिवाळी अंक तुमच्या हातात देताना अर्थातच प्रचंड आनंद होतो आहे. गेल्या २ वर्षात चालू राहिलेली परंपरा अशीच पुढे चलू राहिली पाहिजे म्हणून या वर्षीही दिवाळी अंकाच्या कामाला सुरुवात केली, नेहमीपेक्षा जरा लौकरच! त्यातच छायाचित्रणकलेच्या १७५ वर्षाच्या वाढदिवसानिमित्त छायाचित्रांची स्पर्धा सुरू केली तिलाही उदंड प्रतिसाद मिळाला! आतापर्यंत ३ स्पर्धा यशस्वीरीत्या आयोजित केल्या त्यातल्या दुसर्‍या स्पर्धेतील विजेत्या चित्रांचा समावेश या दिवाळी अंकात केला आहे. तुम्हा सर्वांच्या सहभागातून या स्पर्धा यशस्वी होत आहेत, त्याबद्दल तुम्हा सर्वांना मनापासून धन्यवाद!

श्रीगणेश लेखमालेचेही यंदा तिसरे वर्ष. नेमके गणपतीच्या आधी स्पॅम हल्ल्यांमुळे मिपा बंद पडत होते, आणि मनात धाकधूक होती, पण तरीही अगदी थोड्या पूर्वसूचनेवरून सुरेख लेख देणार्‍या सर्वच लेखकांचे आभार!

या वर्षात आम्ही केलेला तिसरा उपक्रम म्हणजे अनाहिता या महिला विभागात सर्वांच्या सहभागाने कथालेखन. एक कथा गेल्या वर्षी अनाहिता विभाग सुरू केला तेव्हा सुरू केली होती. यशोधराने "कथा" या कथेला सुरुवात केली आणि मग इतरांनी त्यात भर घातली. अपर्णा अक्षय, जुइ, कोमल, आनन्दिता, इनिगोय, सानिकास्वप्नील, इशा१२३, मधुरा देशपांडे, मी आणि आणखीही काहीजणी. कथा जशी पुढे जाईल तशी जाऊ दिली. मात्र काही दिवसांनी ती कथा मागे पडली होती. दिवाळी अंक काढायचा म्हटल्यावर ती कथा पूर्ण केली तशीच आणखी एक कथाही अशाच प्रकारे लिहिली. ती म्हणजे "ऐलमा पैलमा". यावेळी मधुरा देशपांडेने पुढाकार घेऊन कथेची रूपरेषा तयार केली आणि मग इशा१२३, जुइ, आनंन्दिता, मी आणि लीमाउजेट यांनी प्रत्यक्ष लेखन केलं तर इतर सगळ्याचजणींनी बहुमोल सूचना केल्या.

या दोन्ही कथांना सगळ्याच अनाहितांचा या ना त्या स्वरूपात हातभार लागला आहे. आशा आहे की हा प्रयोग तुम्हाला आवडेल. पुढच्या वर्षात अनाहिताचा दिवाळी अंक निघेल इतकं साहित्य तयार झालं पाहिजे अशी महत्त्वाकांक्षा तर आहे, बघू!

गेल्या वर्षातल्या मराठी साहित्य विश्वाचा आणि आंतरजालाचा थोडक्यात आढावा घ्यायचा तर मराठी साहित्य संमेलन सासवडला झाले आणि त्याचे अध्यक्षपद फ.मु.शिंदे यांनी भूषवले. मराठी आंतरजालावर नव्याने सदस्य येत आहेत आणि लिहिण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचवेळी मराठी ब्लॉग्ज विश्व जरा मरगळल्याचेही ऐकू येत आहे. मात्र स्मार्टफोन्समुळे मराठी संस्थळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचत आहेत. मराठी चित्रपट क्षेत्रात काही चांगले चित्रपट गेल्या वर्षात आले आणि त्यापैकी बहुतेकांचे परीक्षण आणि त्या अनुषंगाने चर्चा मिपावर घडल्या. नवीन उत्तम दर्जाची नाटके मात्र त्या प्रमाणात येताना दिसत नाहीत.

गेल्या वर्षात काश्मीरमधल्या पुरांसारख्या काही दु:खद घटना घडल्या, तर काही मंगलयानाच्या यशस्वी उड्डाणासारख्या अभिमानास्पद घटनाही घडल्या. भारतीय राजकारणाचा चेहरा बदलला. महाराष्ट्रात निवडणुकी पार पडल्या. सगळीकडे बदलांची नांदी आहे. मिपावरही संपादकीय सदस्यांत काही बदल या वर्षात झाले. यशोधरा, या आता मिपा संपादक नाहीत आणि रेवती आता फक्त अनाहिता संपादिका आहेत, तर इस्पीकचा एक्का, अजया आणि स्नेहांकिता हे संपादक मंडळाचे नवे सदस्य आहेत. मितान अनाहिताच्या नव्या संपादिका आहेत. इथे यशोधरा, रेवती यांच्या संपादक म्हणून केलेल्या कामाबद्दल कृतज्ञता नोंदवते, आणि अनाहिता सुरू करताना तसेच नंतरही त्यांनी घेतलेल्या कष्टांचीही इथे नोंद करते. आताही त्या मिपाच्या सक्रीय सदस्या आहेतच! तरी धन्यवाद म्हणण्यापेक्षा मिपा नेहमीच त्यांच्या ऋणात राहील!

गेल्या वर्षात मिपावर अनेक चांगल्या दर्जेदार लेखमालिका वाचायला मिळाल्या. काही उत्तम दर्जाचे साहित्य वाचायला मिळाले, तर काही निखळ मनोरंजन करणारे. नेहमीप्रमाणेच दंगा धमाल चालू आहेच! मधे मधे काही ना काही अडचणींमुळे मिपा बंद पडत होते, पण मिपा दीर्घकाळ बंद राहिले असले तरी परत परत चिकाटीने रिफ्रेश मारणारे तुम्ही सदस्य मिपाची जान आहात. कितीही वेळ बंद असलेले मिपा पुन्हा सुरू होताच १० ते १५ मिनिटात ३०- ४० सदस्य लॉग इन केलेले दिसतात. हे तुमचं मिपावरचं प्रेम सदैव असंच राहू दे.

असंख्य अडचणी आणि कमी पडणारा वेळ यावर मात करून मिपा चालते ठेवल्याबद्दल नीलकांत आणि प्रशांत या दोघांना खास धन्यवाद! दिवाळी अंक इतक्या सुरेख रूपात तुमच्यासमोर आणण्यात सर्व संपादक आणि सल्लागार यांची खूप मदत झाली. त्यांच्या बहुमोल सूचनांचे दृश्य स्वरूप म्हणजे हा दिवाळी अंक! मुद्रितशोधन म्हणजे सुधांशु नूलकर असे समीकरणच गेल्या २ वर्षांत झाले आहे. या वर्षी आणखी काही मिपा सदस्यांनी नूलकरांना मुद्रितशोधनाला खूप मदत केली आहे. ते म्हणजे आदूबाळ, स्वॅप्स, अन्या दातार आणि लीमाउजेट. या सर्वाँनाच खूप खूप धन्यवाद! एकाहून एक सरस लेख, कथा, कविता, पाककृती देणार्‍या लेखकांनाही मनापासून धन्यवाद! आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या रंगीत, चटपटीत प्रतिक्रियांनी दिवाळी अंक आणखीनच वाचनीय करणार आहात त्या तुम्हा वाचकांचे खूप आभार!

चला तर, दिवाळीच्या फराळासोबत मिपा दिवाळी अंकातील उत्तमोत्तम साहित्याचा आस्वाद घेऊया!

ही दिवाळी आणि येणारे नवीन विक्रम संवत् २०७०-७१ तुम्हा सर्व लेखक वाचकांना सहकुटुंब, सहपरिवार आनंद, यश, सुखसमृद्धी, धनधान्यसंपत्ती आणि आरोग्याने परिपूर्ण तसेच उत्तमोत्तम लेखन-वाचनानंदाचे जावो, हीच हार्दिक शुभेच्छा!

- पैसा -

दिवाळी अंक २०१४

प्रतिक्रिया

आयुर्हित's picture

20 Oct 2014 - 10:22 pm | आयुर्हित

ही दिवाळी आणि येणारे नवीन विक्रम संवत् २०७०-७१ सर्व लेखक वाचकांना सहकुटुंब, सहपरिवार आनंद, यश, सुखसमृद्धी, धनधान्यसंपत्ती आणि आरोग्याने परिपूर्ण तसेच उत्तमोत्तम लेखन-वाचनानंदाचे जावो, हीच हार्दिक शुभेच्छा!

एस's picture

21 Oct 2014 - 12:43 pm | एस

बाकी दिवाळी अंक छान झाला आहे. सवडीने एकेका लेखाचा फडशा पाडण्यात येईल.. ;-)

सरळ-साधं, भीडणारं संपादकीय आवडलं.

संपादकीयापासून सुरूवात केली आहे, आता सवडीने एकेका लेखाचा फडशा पाडणार.

बाकी पैसाताई: ते "सर्वाँनाच" कसं काय टंकलं म्हणे? :-)

पैसा's picture

21 Oct 2014 - 4:31 pm | पैसा

कसं काय झालं माहित नाही! माझ्या कीबोर्डावर जीवनभौंनी कब्जा मिळवला होता बहुतेक!

सस्नेह's picture

20 Oct 2014 - 10:40 pm | सस्नेह

अंकामुळे दिवाळीच्या मधुर आणि खमंग फराळात भर पडली आहे.

स्पा's picture

21 Oct 2014 - 11:44 am | स्पा

__/\__

सविता००१'s picture

21 Oct 2014 - 12:09 pm | सविता००१

मस्त.
यानिमित्ताने सर्व मिपाकरांना ही दीपावली व येणारे नवीन वर्ष सौख्याचे, भरभराटीचे जावो ही शुभेच्छा!

दिवाळी अंक आणी संपादकीय दोन्ही आवडले.
यासाठी मेहनत घेणार्या सर्वांचे अभिनंदन आणी आभार.
HAPPY DIWALI.

माम्लेदारचा पन्खा's picture

21 Oct 2014 - 12:42 pm | माम्लेदारचा पन्खा

अंकाने खूप वाट पहायला लावली पण साहित्य फराळ पाहून मेंदू प्रफुल्लित झालाय...

मित्रहो's picture

21 Oct 2014 - 1:46 pm | मित्रहो

आता दिवाळी हे वाचत आनंदात जाणार.

ऋषिकेश's picture

21 Oct 2014 - 2:12 pm | ऋषिकेश

अरे वा! अंकाचे स्वागत आणि सर्व टीमचे मनःपूर्वक अभिनंदन!

सर्व मिपाकरांना दिवाळीच्या शुभेच्छा!

समीरसूर's picture

21 Oct 2014 - 3:11 pm | समीरसूर

अंक उठावदार झाला आहे. सगळ्यांचे मनापासून अभिनंदन!

सर्व मिपाकरांना दिवाळीच्या असंख्य शुभेच्छा! ही दिवाळी सगळ्यांनाच आनंदाची आणि समाधानाची जावो ही सदिच्छा!

--समीर

सौंदाळा's picture

21 Oct 2014 - 3:40 pm | सौंदाळा

संपादकीय वाचले आता बाकी दिवाळी अंकाचा फडशा पाडतो २ दिवसात.
सर्व मिपा सदस्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

प्रभाकर पेठकर's picture

21 Oct 2014 - 3:57 pm | प्रभाकर पेठकर

संपादकिय उत्तम जमून आले आहे.
दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठाने मात्र जरा अपेक्षाभंग केला. मुखपृष्ठ अजून आकर्षक (सचित्र) हवे होते असे वाटते.
दिवाळी अंकाच्या टिमने, वैयक्तिक कामांचा रेटा असतानाही, अतिशय मेहनत घेतली आहे हे जाणवते आहेच. त्या सर्व अदृष्य मेहनती सदस्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि खूप खूप कौतुक.
पुढच्या वर्षीच्या 'अनाहिता' दिवाळी अंकाला अनेक शुभेच्छा..!

आता वाचतो.

मृत्युन्जय's picture

21 Oct 2014 - 5:53 pm | मृत्युन्जय

दिवाळी अंक सुंदरच झाला आहे. पीडीएफ स्वरुपात डाउनलोडता आला तर बरे होइल.

अजुन एक म्हणजे दिवाळी अंकातले लेख नविन लेखन खाली पण दिसले तर बरे होइल. तिथुन जास्त लोक वाचतात.

रेवती's picture

21 Oct 2014 - 6:17 pm | रेवती

उत्तम संपादकीय.
अंक पाहून आनंद झाला.
आता वेळ मिळताच वाचनाचा धडाका उडवण्यात येईल.
फराळाचे पदार्थ खात दिवाळी अंक वाचणे हे परमसूख असते.

नेहमीप्रमाणेच उत्तम लेख ह्या दिवाळी अंकात असतील ह्या खात्रीत आहे.

निदान ह्या वर्षी तरी मिपा जास्त काळ बंद पडायला नको.

मधुरा देशपांडे's picture

21 Oct 2014 - 7:38 pm | मधुरा देशपांडे

दिवाळी अंक मस्त दिसतोय. संपादकीय खासच.
सर्व संपादक आणि दिवाळी अंकास हातभार लावणार्‍यांचे विशेष आभार आणि मिपाकरांना दिवाळीच्या अनेक शुभेच्छा!!

डॉ सुहास म्हात्रे's picture

21 Oct 2014 - 8:29 pm | डॉ सुहास म्हात्रे

ही दिवाळी आणि येणारे नवीन विक्रम संवत् २०७०-७१ तुम्हा सर्व लेखक वाचकांना सहकुटुंब, सहपरिवार आनंद, यश, सुखसमृद्धी, धनधान्यसंपत्ती आणि आरोग्याने परिपूर्ण तसेच उत्तमोत्तम लेखन-वाचनानंदाचे जावो, हीच हार्दिक शुभेच्छा!

हेच म्हणतो...

सुहास झेले's picture

22 Oct 2014 - 1:08 am | सुहास झेले

सुंदर... आता साहित्य फराळाला सुरुवात करतो. सर्व लेखकांचे आणि मिपासंस्थापक मंडळाचे आभार :)

|| शुभ दिपावली ||

दिपावलीच्या शुभेच्छा!
संपादकीयपासुन अंक वाचायला सुरुवात करते,हळूहळू वाचणारे नाहीतर दिवाळीच्या फराळासारखा फडशा पाडला एका दिवसात तर परत दुसरा अंक काढावा लागेल!
या अंकात अनाहितांनी मिळुन कथा लिहिलीये,पुढच्या वर्षी अनाहिताचा स्वतंत्र दिवाळीअंक, मिपाच्या अंकाबरोबर येऊ दे हा या नव्या संवत्सराचा संकल्प सोडुया!

एस's picture

22 Oct 2014 - 12:09 pm | एस

अनाहिताचा स्वतंत्र दिवाळीअंक हा फक्त अनाहितांसाठीच ठेवणार की सर्वांना वाचायला खुला करणार? :-) काही असो, आगावू शुभेच्छा देऊन ठेवतो!

सुधीर's picture

22 Oct 2014 - 8:10 am | सुधीर

अरे वा, उत्तम सुरुवात! दीपावलीच्या सर्व मिपाकरांना अनेकोत्तम शुभेच्छा!!

श्रीरंग_जोशी's picture

22 Oct 2014 - 8:28 am | श्रीरंग_जोशी

सहजसोपे संपादकीय खूप आवडले.

प्रत्यक्ष अंक निवांतपणे वाचतो.

अनन्न्या's picture

22 Oct 2014 - 10:43 am | अनन्न्या

या वर्षी प्रत्यक्ष सहभागी होता आले नाही. आता वाचायला सुरूवात!
सर्व मिपाकरांना दिवाळीच्या खूप साय्रा शुभेच्छा!

सार्थबोध's picture

22 Oct 2014 - 11:00 am | सार्थबोध

सुरेख, आनंद झाला. मस्त झालाय अंक. दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा !!!

नंदन's picture

22 Oct 2014 - 12:34 pm | नंदन

नेटके संपादकीय आवडले. अंकातला पेठकरकाकांचा नर्मविनोदी शैलीतला लेख वाचला. मस्त जमून आला आहे. बाकीचेही निवांत वाचतो. सार्‍या मिपाकरांना दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

स्वाती दिनेश's picture

22 Oct 2014 - 3:28 pm | स्वाती दिनेश

अंक छानच दिसतोय, संपादकीय आवडले, आता एकेक लेख वाचते..
स्वाती

सर्व मिपाकरांना दीपावलीच्या अनेक अनेक शुभेच्छा !

स्वॉप्सचे जलरंगातले चित्र मुखपृष्ट म्हणून आता डकवता येईल का ?फेबुवर नाही का प्रफाइल पिक्चर बदली करतो आपण.

विकास's picture

22 Oct 2014 - 8:01 pm | विकास

दिवाळीच्या सर्व मिपाकर आणि त्यांच्या कुटूंबियांना शुभेच्छा! संपादकीय आवडले आणि त्यात घेतलेला आढावा देखील! :)

धर्मराजमुटके's picture

22 Oct 2014 - 8:42 pm | धर्मराजमुटके

पलीकडच्या संस्थळावर केली तीच मागणी इथेही करतो. पीडीएफ आवृत्ती कधी देणार ? स्वतंत्र धाग्याप्रमाणे दिसणार्‍या दिवाळी अंकाच्या वाचनाची मजा येत नाही. जोपर्यंत पीडीएफ आवृत्ती येणार नाही तोपर्यंत वाचणार नाही.

इशा१२३'s picture

23 Oct 2014 - 1:45 pm | इशा१२३

संपादकीय आवडले सुरेख आहे.

प्रतिसाद द्यायला उशीरच झाला. अंक उत्तम जमला आहे. भरपूर साहित्य आलं यावर्षी. पैसाताईने भरपूर कष्ट घेतले आणि नीलकांत, प्रशांत यांनी सतत या कामात भाग घेऊन सर्व तांत्रिक वायरी नटबोल्ट उत्तम हाताळले.

सर्व संपादक आणि या कामात सहभागी सदस्यांचे अभिनंदन. हा उपक्रम असाच अखंड चालू राहील..

सानिकास्वप्निल's picture

27 Oct 2014 - 1:11 pm | सानिकास्वप्निल

संपादकीय आवडले , दिवाळी अंक अगदी चवी-चवीने वाचत आहे :)

विशाखा पाटील's picture

27 Oct 2014 - 1:44 pm | विशाखा पाटील

'संपादकीय' कायम सुरुवातीलाच दिसेल असं करता येईल का? ते लेखांखाली जायला नको, असे वाटते.

संपादकीय आवडले. संपादक मंडळाचे आभार!

संपादकीय आवडले, अंकही वाचतेय - छान दिसतोय.
वरची सूचना "'संपादकीय' कायम सुरुवातीलाच दिसेल असं करता येईल का?" योग्य वाटतेय.

अतिशय सुंदर लेख आहेत दिवाळी अंकात.
कलाकुसर, एखादी पाककृती, चित्रकला.....फर्मास.
वैविध्यपूर्ण अंक. सुरेख.

प्रचेतस's picture

4 Nov 2014 - 9:11 am | प्रचेतस

सुरेख संपादकीय.

खुशि's picture

4 Nov 2014 - 1:19 pm | खुशि

संपादकीय सुरेखच आहे दिवाळीत मी घरी नव्हते,महाराजपुर ते ऊकारेश्वर नर्मदातटाकीची पदयात्रा केली.७५० कि.मि.घराबाहेरील दिवाळी हा वेगळाच अनुभव होता.दिवाळीअंकातील लेख आता वाचेन.

मुखपृष्ठाची जिओ मिपा रचना आधी लक्षातच आली नव्हती आज पीडीएफ लिंक उघडल्यावर पूर्ण रचना दिसली/कळली, अतिशय समर्पक आणि सुरेख झालयं मुखपृष्ठ.

तसेच 'एकला चलो रे' ह्या शिषर्काखाली 'एक नाते – अनोखे' हा लेख परत दुस-यांदा आलाय वाटतं.

चौथा कोनाडा's picture

9 Nov 2014 - 5:33 pm | चौथा कोनाडा

आटोपशीर, नेटके व सुरेख संपादकीय ! अंकासाठी झटणार्‍या 'कला'वंताची ओळख झाली ! या कलाकारांचे आम्हा दिवाळी अंक सहभागींतर्फे मनापसून आभार !