shabdchitre

मरण...

Jayagandha Bhatkhande's picture
Jayagandha Bhat... in जे न देखे रवी...
8 Feb 2021 - 5:45 pm

मरण...

रिपोर्ट वाचून झाल्यावर,
यमधर्म दिसे दारावर,
मग आली भानावर,
केलीच पाहिजे आवराआवर...

तशी होती ती गोलमटोल,
हळूहळू होत गेली अबोल,
चेहऱ्यावर दिसे हसरा भाव,
मनात सलत असे घाव...

कोणी म्हणत नव्हते सरक,
पण वागण्यात सर्वांच्या जाणवे फरक,
मावळली गालीची हसरी खळी,
आता आळीमिळी गुपचिळी...

आयुष्यभराच्या आठवणींचा,
कसा सोडवायचा गुंता,
सतावत सारखे हेच विचार,
अन् मनात दाटे चिंता...

कळलं नाही तिला शेवटी,
काय झाली चूक,
बदल दिसे शरीरावर,
मन झालं मूक...

shabdchitreकविता

चंद्रायण..!

सत्यजित...'s picture
सत्यजित... in जे न देखे रवी...
2 Dec 2020 - 4:50 pm

ही रात निळीशार,
ओतीत चंद्र-धार...
स्वप्नातल्या कळ्यांना
देते नवा आकार!

पाण्यात चंद्र-पक्षी,
मांडून सौख्य-नक्षी...
किरणावरी शशीच्या
होतात मंद स्वार!

पाहून चंद्र-मेळा,
क्षितिजास ये उमाळा...
नक्षत्र बांधतात
तारांस एक-तार!

स्वप्नील चंद्र-गाणे
मधु-मीलनी उखाणे...
गातात फूल, वारे
छेडीत गंध-तार!

एकांत चंद्र-वेडा,
वितळून जात थोडा...
देतो अनामिकेला
अलगूजशी पुकार!

उचलून चंद्र-मेणा,
र्‍हदयात चंद्र-वेणा...
कित्येक चंद्र-वेळा,
करतात येरझार!

— सत्यजित

shabdchitreगाणेभावकवितामाझी कविताशृंगारकविताप्रेमकाव्यरेखाटनस्थिरचित्र

सह्याद्रीतील शब्दचित्रे - भाग ६

स्वच्छंदी_मनोज's picture
स्वच्छंदी_मनोज in भटकंती
17 Oct 2019 - 8:42 pm

आज खुप दिवसांनी पुढचा भाग टाकतोय. मध्यंतरी न लिहीण्याचे कारण की कामाच्या रगाड्यामुळे लिहायला वेळ झाला नाही हे दुसरे पण खुप दिवसात मनाजोगा ट्रेक झाला नाही हे पहीले आणी मुख्य कारण :)
------------------------------------------------------------------------
पहील्या पाच भागांच्या लिंक्स.

bhatakantishabdchitre