मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

दिवाळी अंक २०२५ - AI चा घो(र) - कविता

अनन्त्_यात्री ·
/* Global */ body {background-image:url(https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczN5NO1x4rYgEluNX6QoXCS9H9WuBMmAdbFWN-0rfAEzpH4HZVoL7l-Hdq33x6a25xV_8U_p-aGMbmPSyMoLSTthZ8QxWCL0LLAoRUVg8rZz2ABbtDptMipSZs_L5wPEbx46hOAkXBv2ZEJEINFv4NhbLQ=w1024-h1024-s-no?authuser=0);color:#000;background-attachment: fixed; background-position: center; background-repeat: no-repeat; background-size: cover;} .row {margin-top: 40px;} .col-sm-9{border-radius: 10px;padding:16px;margin:8px;background-color: #FEFEFA;box-shadow:0 2px 4px 0 rgba(0,0,0,.2) , 0 2px 5px 0 rgba(0,0,0,.19)} /*Nav Bar*/ .navbar-fixed-to

दिवाळी अंक २०२५ -रानभूल रातभूल - कविता

In reply to by सुक्या

अनन्त्_यात्री Tue, 10/21/2025 - 11:57
(= Indian Nightjar) एक निशाचर पक्षी आहे. रात्री सक्रिय असतो आणि दिवसा झाडाझुडपांमध्ये लपून राहतो. हे पक्षी सहसा एकटे राहणे पसंत करतात आणि त्यांच्या आवाजामुळे रात्री ते सहज ओळखता येतात.

दिवाळी अंक २०२५ - कापूसकोंड्याची गोष्ट - लेख

माहितगार ·
/* Global */ body {background-image:url(https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczN5NO1x4rYgEluNX6QoXCS9H9WuBMmAdbFWN-0rfAEzpH4HZVoL7l-Hdq33x6a25xV_8U_p-aGMbmPSyMoLSTthZ8QxWCL0LLAoRUVg8rZz2ABbtDptMipSZs_L5wPEbx46hOAkXBv2ZEJEINFv4NhbLQ=w1024-h1024-s-no?authuser=0);color:#000;background-attachment: fixed; background-position: center; background-repeat: no-repeat; background-size: cover;} .row {margin-top: 40px;} .col-sm-9{border-radius: 10px;padding:16px;margin:8px;background-color: #FEFEFA;box-shadow:0 2px 4px 0 rgba(0,0,0,.2) , 0 2px 5px 0 rgba(0,0,0,.19)} /*Nav Bar*/ .navbar-fixed-to

दिवाळी अंक २०२५ - उद्धृतनग मध्वरिंदमानघ सत्यपांडपटकुविंद - लेख

नूतन ·
/* Global */ body {background-image:url(https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczN5NO1x4rYgEluNX6QoXCS9H9WuBMmAdbFWN-0rfAEzpH4HZVoL7l-Hdq33x6a25xV_8U_p-aGMbmPSyMoLSTthZ8QxWCL0LLAoRUVg8rZz2ABbtDptMipSZs_L5wPEbx46hOAkXBv2ZEJEINFv4NhbLQ=w1024-h1024-s-no?authuser=0);color:#000;background-attachment: fixed; background-position: center; background-repeat: no-repeat; background-size: cover;} .row {margin-top: 40px;} .col-sm-9{border-radius: 10px;padding:16px;margin:8px;background-color: #FEFEFA;box-shadow:0 2px 4px 0 rgba(0,0,0,.2) , 0 2px 5px 0 rgba(0,0,0,.19)} /*Nav Bar*/ .navbar-fixed-to

केदार भिडे Mon, 10/20/2025 - 15:35
नाट्य संगीतातील शब्द म्हणजे निश्चितच विलक्षण प्रकार आहे आणि तो अतिशय सुंदर प्रकारे समजावून सांगितला आहे . यावर एखादी सुंदर लेखमाला जरूर होईल. शुभेच्छा.

नूतन Mon, 10/20/2025 - 18:23
प्रतिसादाबद्दल धन्यवाद यावर एखादी सुंदर लेखमाला जरूर होईल. सहमत

रामचंद्र Tue, 10/21/2025 - 00:49
नाट्यपदं कितीही श्रवणीय वाटली तरी बहुतेकदा अर्थ समजत नसल्याने कोड्यात टाकणारी वाटत. आता तुमच्या लेखामुळे त्यातली गंमत समजली. त्या काळातही ती पदे गाणाऱ्या किती कलाकारांना त्याचा अर्थ समजत असेल, कोणास ठाऊक?

श्वेता२४ Wed, 10/22/2025 - 17:16
हे माझे अतीशय आवडते नाट्यगीत...लहानपणी मला देखील या शब्दांचा अजिबात अर्थ कळायचा नाही. नंतर जसे मोठे होत गेलो तशी ही संगीत नाटके पाहिली, वाचली. त्यामुळे त्यांचे अर्थही त्या- त्यावेळी कळत गेले. परंतु मी बऱ्याचदा पाहिले आहे की ही नाट्यगीते कोणत्याही अर्थ समजून घेतल्या विनाच ऐकली किंवा म्हणली जातात. त्याहीपेक्षा संस्कृतप्रचुर भाषेमुळे ती समजण्यास तितकी सोपी देखील नाहीत. आपल्या लेखामुळे या नाट्यपदांचा अर्थ आपण अतिशय सोप्या पद्धतीने उलगडून सांगितला आहे त्यामुळे लोकांना अर्थासहित समजणे नक्की शक्य होईल. माहितीपूर्ण लेखन. धन्यवाद.

सुधीर कांदळकर Mon, 10/27/2025 - 17:05
नाटके कधी आवडली नाहींत. संगीत मात्र आवडले होते. गाण्यांचा अर्थ ठाऊक नव्हता. तो आकर्षक पद्धतीने करून दिल्याबद्दल धन्यवाद.

शेखर काळे Sat, 11/01/2025 - 07:33
नाट्यगीत गाताना गायक ओळीच्या शब्दांची मोडतोड करतात किंवा संगीतकार चालीप्रमाणे शब्द हलवतात. युवतीमना...झाले ऐवजी झाले युवतीमना ... हे एक उदाहरण. लेख आवडला.

असंका Sat, 11/01/2025 - 13:35
अप्रतिम!!! प्रिंट काढून कायम साठी ठेवावा इतका सुंदर लेख!! 'राधाधर...' हे अतिशय आवडीचं गीत, ऐकताना शब्द कळेनात तेव्हा गुगल सर्च वैग्रे केलेला. पण अर्थ असा आत्ताच कळला!! अनेक धन्यवाद!!

आनन्दा Tue, 11/04/2025 - 20:51
लेख छान आहे आवडला अर्थात.. फक्त पुलीन या शब्दाबद्दल शंका आहे.. पुलिन म्हणजे पुलण, किंवा नदीच्या काठावर असलेला माती/वाळू चा पट्टा बाकी लेख मस्तच

नूतन Wed, 11/05/2025 - 00:46
प्रतिसादाबद्दल आभार. योग्य शब्द पुलिंद असा आहे. पुलीन टंकनाची चूक आहे.

नूतन Wed, 11/05/2025 - 12:15
वर लिहिल्याप्रमाणे याचा अर्थ सजलेला. साधारणपणे आपण लांच्छित याचा अर्थ कलंकित असा घेतो. परंतु याचा दुसरा अर्थ चिन्हित,अंकित असा आहे. त्याकाळच्या भाषेमुळे किंवा वृत्तात बसण्यासाठी किंवा गीताच्या नादासाठी कदाचित तो वापरला असेल. पण शब्दशः अर्थ न घेता , तिथे राहणारी पुलिंद प्रजा असा घेतला पाहिजे

अगम्य Wed, 11/05/2025 - 14:04
अतिशय देखणा लेख झाला आहे. वाचून खूप आनंद झाला. अनेकानेक धन्यवाद. "कालिंदी-तट-पुलिन-लांच्छित सुरनुतपादारविंद, जयजय" ह्याचा मला लागलेला अर्थ पुढीलप्रमाणे: "कालिंदीतटाच्या चिखलाने माखलेले आणि देवांनी पूजिलेले चरणकमल (ज्याचे आहेत त्याचा) जयजयकार" कालिंदी-तट: कालिंदी नदीचा तट (ह्याच नदीच्या डोहात कालियामर्दन केले होते) पुलिन-लांच्छित: चिखलाने माखलेले सुरनुत: देवांनी पूजिलेले पादारविंद: चरणकमल कमळ हे चिखलात उमलते म्हणून कालिंदीतटाचा चिखल लागलेल्या पायांना कमळाची उपमा सयुक्तिक वाटते. एक आरती आहे: "आरती भुवनसुंदराची" त्यातसुद्धा विष्णू /कृष्णाच्या पायांना कमळाची उपमा दिली आहे. "पद्मसम पादयुग्मरंगा ओवाळणी होत भृंगा" म्हणजे विष्णूच्या पायांच्या जोडीचा रंग कमळाप्रमाणे आहे म्हणून कमळ समजून त्या चरणकमळांभोवती भुंगा गोलगोल फिरतो आणि नकळत त्याच्याकडून विष्णूला ओवाळणी होते.

दिवाळी अंक २०२५ - मुंबई राजधानी - एक राजेशाही अनुभव - भटकंती

एक_वात्रट ·
/* Global */ body {background-image:url(https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczN5NO1x4rYgEluNX6QoXCS9H9WuBMmAdbFWN-0rfAEzpH4HZVoL7l-Hdq33x6a25xV_8U_p-aGMbmPSyMoLSTthZ8QxWCL0LLAoRUVg8rZz2ABbtDptMipSZs_L5wPEbx46hOAkXBv2ZEJEINFv4NhbLQ=w1024-h1024-s-no?authuser=0);color:#000;background-attachment: fixed; background-position: center; background-repeat: no-repeat; background-size: cover;} .row {margin-top: 40px;} .col-sm-9{border-radius: 10px;padding:16px;margin:8px;background-color: #FEFEFA;box-shadow:0 2px 4px 0 rgba(0,0,0,.2) , 0 2px 5px 0 rgba(0,0,0,.19)} /*Nav Bar*/ .navbar-fixed-to

गोरगावलेकर Tue, 10/21/2025 - 11:31
भटकंतीत लांबचा प्रवास असेल आणि तो आरामदायी झाला तर कंटाळा, थकवा अजिबात येत नाही. साहजिकच प्रवसानंतरचा दिवस वाया न जाता पर्यटन लगेच सुरू करता येते. आपला लेख वाचून मला आमच्या गेल्या वर्षीच्या गोवा सहलीतील विस्टाडोम रेल्वे डब्यातून केलेला प्रवास आठवला

कंजूस Tue, 10/21/2025 - 18:46
आम्ही प्रवासात खिडकीतून फोटो खूप काढतो त्यामुळे एसी डब्यातून जाणे टाळतो. विस्टाडोमपेक्षाही वन्दे भारतचा कल्याण - नाशिक प्रवास आवडला( नाश्ता सोडून). इतर बरेच प्रवासी त्या गाडीने शिर्डीला नेहमी जात असावेत. त्यांना प्रवासाचे अप्रुप वाटलेले दिसले नाही आणि त्यांनी घरून डबे आणले होते.

फारएन्ड Mon, 11/10/2025 - 03:10
मस्त लेख! मी पण या गाडीने गेलो आहे. मस्त अनुभव असतो. साडेतीन वाजताचे ते स्टेशन कोटाच असावे. बाय द वे, आता मध्य रेल्वेचीही एक राजधानी एक्सप्रेस सुरू झाली आहे काही वर्षांपूर्वी. ती कल्याण-भुसावळ वगैरे मार्गाने जाते.

दिवाळी अंक २०२५ - शेअर बाजार आणि एआय - लेख

एक_वात्रट ·
/* Global */ body {background-image:url(https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczN5NO1x4rYgEluNX6QoXCS9H9WuBMmAdbFWN-0rfAEzpH4HZVoL7l-Hdq33x6a25xV_8U_p-aGMbmPSyMoLSTthZ8QxWCL0LLAoRUVg8rZz2ABbtDptMipSZs_L5wPEbx46hOAkXBv2ZEJEINFv4NhbLQ=w1024-h1024-s-no?authuser=0);color:#000;background-attachment: fixed; background-position: center; background-repeat: no-repeat; background-size: cover;} .row {margin-top: 40px;} .col-sm-9{border-radius: 10px;padding:16px;margin:8px;background-color: #FEFEFA;box-shadow:0 2px 4px 0 rgba(0,0,0,.2) , 0 2px 5px 0 rgba(0,0,0,.19)} /*Nav Bar*/ .navbar-fixed-to

एक_वात्रट Mon, 10/20/2025 - 15:17
चॅट जीपीटी हा कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) मदतनीस २२ नोव्हेंबर २०२२ रोजी वापरकर्त्यांसाठी खुला करण्यात आला आणि संगणक क्षेत्रातील एका नव्या अध्यायाला सुरुवात झाली. विश्वास बसत नाही, पण येत्या काही दिवसांत या मदतनीसाला तीन वर्षे पूर्ण होतील. आज तीन वर्षांनंतर थोडे मागे वळून पाहिले तर असे दिसते की कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाने सगळ्या जगाला दिलेला धक्का आता बराचसा ओसरला आहे आणि चॅट जीपीटी आणि इतर कृत्रिम बुद्धिमत्ता मदतनिसांनी उडवलेला धुरळा आता बराचसा खाली बसला आहे. मी म्हणेन, आज तीन वर्षांनंतर, हे तंत्रज्ञान नेमके काय आहे, ते काय करू शकते, काय करू शकत नाही आणि त्यातले धोके कोणते याबाबत पुरेशी स्पष्टता आता आली आहे. एक गंमत म्हणून, नवीन आलेले तंत्रज्ञान वापरून पाहायचे म्हणून या साधनाचा वापर करणारे बरेचसे लोक आता त्यापासून दूर गेले आहेत आणि ज्यांना खरोखरच या मदतनिसाकडून काही काम करून घ्यायचे आहे, तेच लोक आता त्याचा वापर करताना दिसतात. मात्र म्हणून नव्याची नवलाई आता संपली आहे असे जर कोणी म्हटले तर ते पूर्णपणे चुकीचे ठरेल, कारण आज चॅट जीपीटी हे संकेतस्थळ जगातील पहिल्या पाच प्रमुख संकेतस्थळांपैकी एक बनले आहे, जी एक अतिशय अवघड आणि त्यामुळेच कौतुकास्पद गोष्ट आहे. कोणतेही नवीन तंत्रज्ञान आले की त्याचा ते बनवणाऱ्यांना अपेक्षित, ते बनवणाऱ्यांना पूर्णपणे अनपेक्षित, चांगला, वाईट अशा अनेक प्रकारे वापर केला जातो. कृत्रिम बुद्धिमत्ता हे तंत्रज्ञान तरी याला अपवाद कसे असेल? या तंत्रज्ञानाचा वापर कर्करोग अर्थात कॅन्सर शोधण्यासाठी, गुन्ह्यांची उकल करण्यासाठी, फसवणुकीचे प्रकार शोधण्यासाठी, नवीन औषधे शोधण्यासाठी आणि हवामानाचे अचूक अंदाज बांधण्यासाठी होत आहे, त्याचबरोबर, लष्करी उपकरणांची मारकक्षमता वाढवण्यासाठी, अतिधोकादायक ड्रोन बनवण्यासाठी, सायबर हल्ले करण्यासाठी, दिशाभूल करणारी, खोटी, माहिती पसरवण्यासाठी, बनावट छायाचित्रे, चित्रफिती बनवून लोकांना फसवण्यासाठीही होत आहे. अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेविषयी चर्चा करणे हा या लेखाचा उद्देश नाही. मी स्वतः एक संगणक अभियंता आहे, तसेच मला प्रवासाचीही प्रचंड आवड आहे. या दोन्ही ठिकाणी मी कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआयचा वापर करतो. मात्र या दोन क्षेत्रांविषयीही मी बोलणार नाही. मी बोलणार आहे ते एका तिसऱ्याच क्षेत्राविषयी, शेअर बाजाराविषयी. मी शेअर बाजारात माहिती मिळवण्यासाठी आणि त्या माहितीतून निष्कर्ष काढण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर कसा करतो, हा या लेखाचा विषय आहे. शेअर बाजारात मी प्रवेश केला तो साधारण वर्षभरापूर्वी. नोकरीला लागल्यापासून मी कर वाचवण्यासाठी किंवा गुंतवणूक म्हणून काही म्युच्युअल फंड विकत घेत होतो, एखाद्या कंपनीचे शेअर मात्र मी कधीही विकत घेतले नव्हते. पण सुमारे चार वर्षांपूर्वी मी ते सगळे म्युच्युअल फंड तडकाफडकी विकून टाकण्याचा आणि आलेले पैसे जमिनींमध्ये गुंतवण्याचा निर्णय घेतला. वर्षभरापूर्वी मात्र शेअर बाजारात गुंतवणूक करावी या विचाराने पुन्हा एकदा उचल खाल्ली आणि मी शेअर बाजारात पुनर्प्रवेश करण्याचे ठरवले. मी शेअर बाजाराविषयी माहिती मिळवत असताना कृत्रिम बुद्धिमत्तेचा उदय होत होता, तेव्हा साहजिकच या नवीन तंत्रज्ञानाचा आपल्याला शेअर बाजारातील गुंतवणुकीसाठी कसा वापर करता येईल याचा विचार मी सुरू केला आणि त्यातून चुकतमाकत, काही प्रयोग करत शेवटी एका निश्चित अशा योजनेपर्यंत मी पोहोचलो. शेअर बाजारात, या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यात मी साधारणतः १४% परतावा मिळवला आहे आणि या यशाचा मोठा वाटा मी एआयला देतो. आज ढोबळमानाने मी कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआयचा वापर शेअर बाजारात खालील प्रकारे करतो:
  • शेअर बाजाराचे ज्ञान वाढवण्यासाठी
  • बाजाराचा लघुकालीन, दीर्घकालीन कल जाणून घेण्यासाठी
  • एका विशिष्ट कंपनीत गुंतवणूक करावी की नाही हे जाणून घेण्यासाठी
पुढे जाण्याआधी या एआय मदतनीसांचा वापर नेमका कसा करावा याबाबत चार गोष्टी सांगणे मला गरजेचे वाटते. माझा अनुभव आहे की कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून एखादा निष्कर्ष काढत असताना, ती माहिती एआयला स्वतः शोधायला सांगण्यापेक्षा ती माहिती एआयला पुरवणे अधिक परिणामकारक, अधिक चांगला निकाल देणारे असते. तसेच एआयकडून माहितीचे पृथक्करण करून घेत असताना त्या माहितीचा दर्जा तपासणे हेदेखील अत्यंत महत्त्वाचे असते. तुम्ही एआयला जेवढी अचूक, नेमकी माहिती द्याल तेवढी चांगली उत्तरे तुम्हाला मिळतील! आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा: बाजारात एवढे सारे एआय मदतनीस उपलब्ध असताना त्यातला नेमका मदतनीस निवडायचा कसा? ओपन एआयचा चॅट जी पी टी, डीपसीक कंपनीचा आर वन, क्लॉडचा सॉनेट आणि गुगलचा जेमिनी हे सारे एआय मदतनीस वापरल्यानंतर, गुगलचा जेमिनी हा सर्वात अचूक, सविस्तर आणि तपशीलवार उत्तरे देतो, या निष्कर्षाप्रत मी आलो आहे. आता मी वर उल्लेख केलेल्या प्रत्येक मुद्याकडे जरा विस्ताराने पाहू. शेअर बाजाराचे ज्ञान वाढवण्यासाठी मी म्हणेन की शेअर बाजारात कोणताही व्यवहार करण्याआधी शेअर बाजार कसा काम करतो, त्यातील गुंतवणुकीचे प्रकार कोणते, त्यात नियमितपणे वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक संज्ञेचा अर्थ काय हे माहित असणे अत्यंत आवश्यक आहे. जर स्विंग ट्रेडिंग आणि लॉन्ग टर्म ट्रेडिंग यातील फरक तुम्हाला माहीत नसेल, Price per earning ratio, Current ratio किंवा Earnings per share या संज्ञांचा अर्थ तुम्ही जाणत नसाल, किंवा फ्युचर्स आणि ऑप्शन्स या गुंतवणूक प्रकारांमधल्या धोक्यांचे ज्ञान तुम्हाला नसेल, तर शेअर बाजारात गुंतवणूक करणे हा शुद्ध वेडेपणा होय. शेअर बाजारातील मूलभूत संकल्पना समजून घेण्यासाठी आपण एआयचा अतिशय चांगल्या प्रकारे वापर करून घेऊ शकतो. अवघड संकल्पना सोदाहरण सोप्या करून सांगणे ही एआयची खासियत आहे; मी काम करत असलेल्या संगणक क्षेत्रातील गुंतागुंतीच्या संकल्पना समजून घ्यायलाही मी एआयचा वापर करतो. एक अतिशय चांगली गोष्ट म्हणजे या संकल्पना तुमच्या मातृभाषेत अर्थात मराठीत समजून देण्याची विनंती तुम्ही एआयला करू शकता. एआय वापरत असलेली मराठी अगदी मराठी पुस्तकांइतकी नैसर्गिक, प्रवाही नसली तरी ती निर्दोष आणि अचूक आहे, असा माझा अनुभव आहे. 'शेअर बाजारातील सगळ्यात महत्त्वाच्या संकल्पना मला मराठीत समजावून दे' असा आदेश एआयला दिल्यावर त्याने दिलेले उत्तर पहा: https://ibb.co/yBnvdtpB बाजाराचा लघुकालीन, दीर्घकालीन कल जाणून घेण्यासाठी शेअर बाजारात उद्या, पुढच्या आठवड्यात, पुढच्या सहा महिन्यांत काय घडेल हे आपण एआयला विचारू शकतो. उदा., आज दिवसभरात घडलेल्या घटना पाहता, उद्या बाजाराचा कल काय असेल हे जाणून घेण्यासाठी आपण एआयचा वापर करू शकतो. मी हा लेख लिहीत असलेल्या तारखेचे, म्हणजे २१ सप्टेंबरचे उदाहरण घेऊ. आज रविवार आहे आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी H1B व्हिसाचे शुल्क १००० अमेरिकी डॉलर्सवरून थेट एक लाख अमेरिकी डॉलर्सवर नेण्याची घोषणा केली आहे. तेव्हा, या बातमीची प्रतिक्रिया उद्या बाजार कशी देईल असा प्रश्न आपण चॅटजीपीटीला विचारल्यास, त्याचे उत्तर काहीसे असे मिळते. https://ibb.co/NnbXkqPK एकूण जागतिक परिस्थिती पाहता किंवा एखाद्या विशिष्ट क्षेत्रात घडत असलेल्या घडामोडी पाहता, पुढचे काही महिने या क्षेत्रातील कंपन्यांची कामगिरी कशी असेल, समभागांच्या किमती खाली जातील की वाढतील, वाढ किंवा घट झाली तर ती किती टक्के होईल, असे प्रश्नही आपण एआयला विचारू शकतो. पुढील ६ महिन्यांत औषधनिर्मिती करणा-या भारतीय कंपन्यांची कामगिरी शेअर बाजारात कशी असेल असे विचारल्यास त्याचे उत्तर काहीसे असे मिळते: https://ibb.co/3mX5wXrm एका विशिष्ट कंपनीत गुंतवणूक करावी की नाही हे जाणून घेण्यासाठी प्रत्येक गुंतवणूकदार शेअर बाजारातील चांगल्या कंपन्या निवडण्यासाठी काही विशिष्ट निकष लावतो, काही चाळण्या लावतो. मात्र आपण निवडलेली कंपनी गुंतवणूक करण्यासाठी योग्य आहे की नाही याची खात्री आपण एखाद्या एआय मदतनीसाकडून करून घेऊ शकतो. काही वेळा असेही घडते की आपण निवडलेल्या कंपनीची एकूण कामगिरी चांगली असली, तरी तिच्यात गुंतवणूक करण्यासाठी सध्याची वेळ योग्य नसते. तर काही वेळा, कंपनी दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी योग्य असते, थोड्या वेळात झटपट नफा मिळवून देण्यासाठी तिचा फारसा उपयोग नसतो. त्यामुळे आपण कष्टाने कमावलेला पैसा एखाद्या कंपनीत गुंतवण्याआधी, एखाद्या एआय मदतनीसाकडून त्या कंपनीची शहानिशा करून घेणे महत्त्वाचे आहे. एखाद्या कंपनीत गुंतवणूक करावी की नाही हा प्रश्न विचारण्याआधी मी त्या कंपनीची सगळी माहिती गोळा करतो. ही माहिती मी Screener (https://www.screener.in/) व Google Finance (https://www.google.com/finance/) या संकेतस्थळांवरून (Websites) मिळवतो. त्यानंतर ही माहिती मी स्वतः बनवलेल्या एका टेम्प्लेटमध्ये भरतो. या टेम्प्लेटमध्ये मी कंपनीचा आर्थिक ताळेबंद (उत्पन्न व नफा), कंपनीची एकूण मालमत्ता व तिच्यावरील कर्जे, कंपनीकडे असलेल्या रोख रकमेची माहिती (कॅश फ्लो) इत्यादी भरतो. त्याबरोबरच कंपनीची माहिती संक्षिप्तपणे दिल्यास (ती कोणत्या क्षेत्रात आहे, तिचा विस्तार केवढा आहे, ती किती वर्षे व्यवसायात आहे), एआय त्या कंपनीचे मूल्यमापन अधिक चांगल्या प्रकारे करू शकतो, असा माझा अनुभव आहे. मी वापरत असलेले टेम्प्लेट असे आहे: OK, now let's analyse the financial data of a company that is **Company info copied from screener.in** All statements are annual and all numbers are in Indian rupees. Here is some basic information about company’s stock: **Stock information copied from screener.in** Here are the financial details: Income statement **Income statement copied from Google finance website** Balance sheet **Balance sheet copied from Google finance website** Cash flow **Cash flow copied from Google finance website** Based on this info, would you recommend buying this stock? या टेम्प्लेटमधील **अबक** अशा पद्धतीने दर्शवलेली माहिती आपण screener.in व google.com/finance या संकेतस्थळांवरून (Websites) कशी भरायची ते आता पाहू. सगळ्यात प्रथम आपण screener.in ही वेबसाईट ऊघडू आणि तिथे आपल्याला हवी ती कंपनी शोधू, उदा. TCS. https://ibb.co/0kf2VTz इथे 1 या आकड्याने दर्शवलेली माहिती म्हणजे कंपनीची थोडक्यात करून दिलेली ओळख आहे. ही माहिती कॉपी करून आपण **Company info copied from screener.in** इथे चिकटवू. नंतर 2 ह्या आकड्याने दर्शवलेली माहिती म्हणजे कंपनीच्या स्टॉकची सद्यस्थिती दर्शवणारी माहिती आहे. ती आपण कॉपी करून **Stock information copied from screener.in** इथे चिकटवू. नंतर आपण जाऊ google.com/finance/ ह्या वेबसाईटवर आणि हीच कंपनी तिथे शोधू. https://ibb.co/tPnFfL43 इथे सगळ्यात पहिल्यांदा आपण (1 या आकड्याने दर्शवलेल्या) Annual ह्या टॅबवर क्लिक करू. याचे कारण असे की आपल्याला मागच्या पाच वर्षांची आर्थिक कामगिरी पहायची आहे, मागच्या पाच तिमाहींची नव्हे. नंतर 2 या आकड्याने दर्शवलेली माहिती (कंपनीचा मागील आर्थिक वर्षातील ताळेबंद) कॉपी करून आपण **Income statement copied from Google finance website** इथे चिकटवू. 3 ह्या आकड्याने दर्शवलेली माहिती म्हणजे कंपनीची एकूण मालमत्ता व तिच्यावरील कर्जे यांची माहिती आहे. ती आपण कॉपी करून **Balance sheet copied from Google finance website** इथे चिकटवू. 4 ह्या आकड्याने दर्शवलेली माहिती म्हणजे मागील आर्थिक वर्षात कंपनीने कमवलेल्या व तिने खर्च केलेल्या रोख रकमेची माहिती देणारा तक्ता आहे. तो आपण कॉपी करून **Cash flow copied from Google finance website** इथे चिकटवू. हे टेम्प्लेट वापरून "सिपला" कंपनीत गुंतवणूक करावी की नाही हे एआयला विचारायचे झाले, तर तो प्रश्न काहीसा असा बनेल: https://ibb.co/Lzc9206x या प्रश्नाला ०९ ऑक्टोबर २०२५ रोजी गुगलच्या जेमिनीने दिलेले उत्तर पहा: https://ibb.co/RW7kN3q हे फक्त एक उदाहरण झाले. मला असे वाटते की तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करत असला तरी, तुमचे काम अधिक वेगवान, अधिक परिणामकारक, अधिक अचूक होण्यासाठी तुम्ही एआयचा वापर करू शकता. अर्थात हे करताना फक्त खात्रीशीर एआय साधनांचाच वापर करणे, एआय मदतनीसाने दिलेली उत्तरे इतर भरवशाच्या माहितीस्त्रोतांशी ताडून पाहणे आणि एआय मदतनीस चुका करू शकतात हे नेहमी ध्यानात ठेवणे ही काळजी तुम्ही नक्कीच घेतली पाहिजे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरासाठी आणि ती वापरून आपले आयुष्य अधिक सोपे, अधिक संपन्न, अधिक अर्थपूर्ण बनवण्यासाठी तुम्हाला शुभेच्छा!

मारवा Tue, 10/21/2025 - 09:00
तुम्ही एखादा शेअर घेतला आणि सर्व अभ्यास करूनही दुर्दैवाने तुम्हाला लॉस झाला तर तुम्ही काय करता ? तुमची रिस्क मॅनेजमेंट कशी आहे ? 1. Stop loss किती percent चा लावता? की लावत नाही ? 2.एकूण समजा 100 रुपये भांडवल आहे तर ते किती शेअर मध्ये विभागणी करता . 3 यशस्वी आहोत की नाही हे FD च्या परताव्याचा criteria लावून तुलना करून ठरवता की अजून काही ? 4 non financial resources म्हणजे अमूल्य वेळ, आरोग्य, वीज, computer इत्यादि मुख्य म्हणजे मानसिक योगदान ते खर्च म्हणून गृहीत धरतात का ? म्हणजे oportunity cost मध्ये की इतका वेळ इतकी मानसिक ऊर्जा समजा दुसरीकडे दिली बाजारा ऐवजी तर परतावा काय मिळेल ? असा काही विचार आहे का ? जाणून घ्यायला आवडेल.

श्वेता२४ Tue, 10/21/2025 - 10:01
एआय चा वापर शेअर बाजारात करत आहे. काही नवीन मुद्दे कळले. त्याचाही वापर करून बघेन. अर्थातच ए आय वर पूर्णपणे विसंबून राहत नाही. सध्या दुरूनच निरीक्षण करणे चालू आहे. माहितीपूर्ण लेखाबद्दल धन्यवाद.

स्वधर्म Mon, 11/03/2025 - 18:35
आपण दिलेले संदर्भ व दुवे सवडीने पाहीन, पण लेख आवडला. तुंम्ही अगदी मूलभूत पातळीला ए आय चा वापर शेअर बाजारासाठी कसा करावा, हे उत्तम समजाऊन दिले आहे. आपण जमिनीमध्ये गुंतवलेले पैसे काढून परत शेअर बाजारात गुंतवत आहात का? तो निर्णय खूप रोचक असणार. मी खूप खूप उशीराने शेअर बाजारात पैसे गुंतवले व अजिबात सक्रीय नसल्याने सध्या कॉफी बीन प्रकारचे इन्व्हेस्टिंग करत आहे. शेअर घेतले आणि ठेऊन दिले असे.

शेअर मार्केट मध्ये ट्रेडिंग करण्यासाठी कृ बु चा उपयोग ह्यावर अजुन विचरच करतो आहे, पण वापर केला नाही. या लेखात दिलेल्या काही टिप्स वापरुन बघतो. १५% पेक्षा जास्त परतावा मिळाला तर अजुन काय पाहीजे.

सुबोध खरे Wed, 11/05/2025 - 10:11
चढत्या बाजारात सर्वच बुद्धिमत्ता नैसर्गिक किंवा कृत्रिम उत्तम परतावा देतात. पडत्या बाजारात यापैकी किती टिकून राहतात हे पाहणे रोचक ठरेल. बाजार हा बऱ्यापैकी मानवी भावभावनांवर अवलंबून आहे आणि अजून तरी कृत्रिम बुद्धिमत्तेला मानवी भावभावनांचा तळ गाठता आलेला नाही त्यामुळे पडत्या बाजारात कृत्रिम बुद्धिमत्तेवर अवलंबून असणारे किती टिकून राहतात आणि त्यापैकी किती प्रामाणिकपणे आपल्या जखमा उघड्या करून दाखवतात हे पाहणे रोचक ठरेल.

दिवाळी अंक २०२५ - माझिया घरा - कविता

सीमा कुलकर्णी ·
/* Global */ body {background-image:url(https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczN5NO1x4rYgEluNX6QoXCS9H9WuBMmAdbFWN-0rfAEzpH4HZVoL7l-Hdq33x6a25xV_8U_p-aGMbmPSyMoLSTthZ8QxWCL0LLAoRUVg8rZz2ABbtDptMipSZs_L5wPEbx46hOAkXBv2ZEJEINFv4NhbLQ=w1024-h1024-s-no?authuser=0);color:#000;background-attachment: fixed; background-position: center; background-repeat: no-repeat; background-size: cover;} .row {margin-top: 40px;} .col-sm-9{border-radius: 10px;padding:16px;margin:8px;background-color: #FEFEFA;box-shadow:0 2px 4px 0 rgba(0,0,0,.2) , 0 2px 5px 0 rgba(0,0,0,.19)} /*Nav Bar*/ .navbar-fixed-to

दिवाळी अंक २०२५ - हा नाद - कथा

बिपीन सुरेश सांगळे ·

कर्नलतपस्वी Wed, 10/22/2025 - 16:33
कथा एखाद्या अतर्क्य पण सरळ गोष्टी सारखी वाटली. काय गुढ कळाले नाही. महाराज कोण,चौकीदारास मांजर माहीत होते मग ते मनुष्य रूपात कधी दिसले नाही का? खुन कुणी केला? मांजर बोक्याला महाराजांकडे कशी घेऊन गेली? केस सी बी आय कडे सोपवावी लागेल. बुराडी सारखी आहे. लेखन आवडले.

योगी९०० Sun, 10/26/2025 - 12:13
कथा खूपच वेगळी आणि रोचक आहे! मांजराचं मानवी रूप घेणं आणि प्रेमासाठी केलेले प्रयत्न खूपच कल्पक वाटले. शेवटचा ट्विस्ट तर धक्कादायक—राजाला मारून पुन्हा मांजरांच्या जगात परत जाणं हे अप्रतिम लिहिलं आहे. अशा कल्पनाशील कथा वाचायला मजा येते

टर्मीनेटर Sun, 10/26/2025 - 15:11
रामसे बंधूनी त्यांचा हातखंडा असलेल्या 'भूत-प्रेत, पिशाच्च, चुडैल' अशा संकल्पना बाजूला ठेऊन काढलेल्या एखाद्या गूढ/चमत्कारीक संकल्पनेवर आधारित कथानक असलेल्या 'हवस की कहानी', 'खुनी बिल्ला', 'हवस की प्यासी बिल्ली' किंवा 'राजा की हवस' असे शिर्षक असणाऱ्या चित्रपटाची कथा व्हिज्यूलाईज करत वाचतो आहे असे वाटले 😀 फँटसी असली तरी ही 'अचाट', 'अतर्क्य' अशी कथा 'आवडली' असे मला म्हणता येणार नाही... परंतु वाचताना औट घटकेची करमणूक झाल्याने सदर कथा 'आवडली नाही' असेही म्हणता येणार नाही... पुढील लेखनास शुभेच्छा! (तुमच्या कथांचा 'फॅन') टर्मीनेटर

कर्नलजी श्वेता योगी टर्मिनेटर स्वधर्म चौको व इतर वाचक आभार कर्नलजी - कथेवरची तुमची प्रतिक्रिया मजेशीर वाटली . केस सीबीआयकडे नक्कीच जाणार ... हाहाहा आभार टर्मिनेटर - तुमची प्रतिक्रिया विलक्षण वाटली , एखाद्या फॅंटसीसारखी आभार

वाचक मंडळी, नमस्कार महत्त्वाची सूचना - कृपया ही प्रतिक्रिया व वरील प्रतिक्रिया , या कथा वाचल्यावर वाचाव्यात. नाहीतर होईल काय की कथेतली वळणं , रहस्य , शेवट या गोष्टी आधीच कळतात . मग कथा वाचनामध्ये काय रस राहणार ? कथा सरळ असावी . ती सहजपणे स्पष्ट व्हावी . लेखकाला उलगडून सांगण्याची गरज पडू नये खरं तर . पण सांगतो- ही कथा दिवाळीसाठी पाठवताना साशंक होतोच मी स्वतः . की ही कथा वाचक कशी स्वीकारतील ? मला लिहितानाच माहिती होतं की ही नेहमीची गोड गोड कथा नाही , त्यात तिचा शेवट निगेटिव्ह, त्यात ती दिवाळी अंकासाठी पाठवायची . जरा ऑडच . पण फराळाच्या ताटात सगळंच गोड असून चालत नाही . माझ्यासाठी हा एक प्रयोग होता आणि वाचकांनाही ही कथा माझ्या नेहमीच्या वाचनशैलीच्या बाहेरची वाटली असेल , असं वाटतं . त्यात लेखकाने त्याचे प्रयोग वाचकांवर का करावेत ? असं एखादा सुज्ञ वाचक म्हणेलसुद्धा . त्यामुळे कदाचित कथेला प्रतिसादही कमी व प्रतिक्रियाही ... ऑगस्टमध्ये उत्तर प्रदेशात एक केस झाली . एका बायकोने मित्राच्या मदतीने स्वतःच्या नवऱ्याचा खून केला आणि त्याचे अक्षरशः तुकडे तुकडे केले . ते तिने घरातील पाणी साठवण्याच्या निळ्या ड्रममध्ये भरले . नंतर निळ्या ड्रमची अशी अजून एक केस झाली आणि नंतर बायकोने नवऱ्याला मारल्याच्या कितीतरी केसेस झाल्या . त्यानंतर आणखी एक केस म्हणजे हनिमूनला गेल्यावर नव्या नवरीने तिच्या आधीच्या मित्राच्या मदतीने आपल्याच नवऱ्याचा खून केला . आजच अजून एका केसचा उलगडा झाला - लिव इन पार्टनरने दोन नंबरच्या बॉयफ्रेंडच्या मदतीने पहिल्या बॉयफ्रेंडचा खून केला व आग वगैरे लागल्याचा देखावा निर्माण केला वगैरे वगैरे वगैरे नेटवर शोधल्यास लगेच सापडेल . खून करणं मुळात वाईटच; पण नवऱ्याने बायकोचा खून केलाय अशा केसेस जास्त प्रमाणात असतात . तेही चुकीचंच . पण एखादी स्त्री पार्टनर किंवा बायको आपल्याच नवऱ्याचा किंवा प्रियकराचा नवऱ्याचा खून करते म्हणजे ? स्त्रिया या नैसर्गिकरित्या मृदू ,प्रेमळ , काळजी घेणाऱ्या अशा असतात . त्या पार्श्वभूमीवर हे फार फार धक्कादायक वाटतं . स्त्रियांनी कणखर भूमिका घेणं, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणं , एखादा गुन्हेगाराला मारणं वगैरे - हे ठीक . पण हे असे आपल्याच माणसांचे कोल्ड ब्लडेड मर्डर म्हणजे ? ... एकूणच माणसं हिंसक झाली आहेत . हिंसा कॉमन व्हायला लागली आहे , प्रतिष्ठाही पावू लागली आहे . जरा आपल्या आजूबाजूला कुठेही पहा . पण स्त्रिया का अशा हिंसक होऊ लागल्या ? अर्थात हा एक सामाजिक, वैद्यकीय , मनोविकारशास्त्र यांचा विषय असू शकेल . पण एक सर्वसामान्य माणूस म्हणून नकोसं वाटतं . आणखी एक - खून करणं वाईटच ; पण हे असे तुकडे तुकडे करणं ? ... हा क्रूरपणा येतो कुठून ? ही पाशवी वृत्ती येते कुठून ? असो - तर तो निळा ड्रम प्रसिद्ध झाला . त्यावरही लोकांनी अनेक रिल्स वगैरे बनवले . याला काय म्हणायचं ? ... उत्तर भारतात मित्राच्या लग्नात चेष्टा म्हणून मित्रमंडळ नवऱ्याला असा निळा ड्रम भेट म्हणून देऊ लागले . वगैरे - कथा त्या कोनातून पाहावी . मला सरळ सरळ तेच म्हणायचं आहे . काहीसं रूपक अंगाने मी हे लेखन केले . त्यासाठी मांजर हा प्राणी निवडला आहे. कारण मांजराचा संबंध गूढाशी असतो . आणि मला हेही म्हणायचंय - मनी आणि बोका त्यांच्या मूळ प्रवृत्तीवरच जातात . ते माणसाच्या रूपात राहू शकत नाहीत, ते माणसाच्या रूपात हत्या करतात . म्हणजे ही त्यांची मूळ प्रवृत्ती . गुन्हेगारी मानसिकता . आणि अशी मानसिकता असलेल्याचं दुसऱ्या गुन्हेगाराशी सहज जमतं, एखाद्या तंबाखू खाणाऱ्या माणसाचं दुसऱ्या तंबाखू पंटरशी जमतं तसं . मग हे गुन्हेगारी मानसिकतेचे लोक एकत्र येतात , गुन्हा करतात . आणि खूप धक्कादायक आणि वाईट गोष्ट अशी की त्यांना या कृत्याचं दुःख नसतो की पश्चाताप ! आपण कुठे चाललोय ? बाय द वे कथेचे नाव खरं तर मला - निळ्या ड्रमचे रहस्य - असंच ठेवायचं होतं. सहमत असाल / नसाल , एवढं वाचलंत यासाठीं खूप आभार .

In reply to by बिपीन सुरेश सांगळे

चौथा कोनाडा Sat, 11/15/2025 - 14:49
अतिशय समर्पक मनोगत ..... इतक्या अशा घटना घडताहेत की अस्वस्थ व्हायला होतं ... काहीतरी व्यक्त करावंसं वाटतं , प्रतिक्रिया द्यावीशी वाटते. तुमच्या लेखकमनाने वेगळ्या पद्धतीनं या कडे पहिले आणि ही कथा निर्मित झाली ... ग्रेट!
माझ्यासाठी हा एक प्रयोग होता
प्रयोग एकदम भन्नाट जमलाय, सांगळे साहेब ... यात मला पुढील भागाची बीजे दिसायला लागलीत .. कदाचित मालिका सुद्धा होऊ शकेल. पुभाप्र

चौको खूप आभार तुम्ही दखल घेतली कथेची काहीएक प्रेरणा आहे आणि ती ज्वलंत आणि दुःखद आहे माझ्यासाठी ती एक अतर्क्य अशी फॅन्टसी नाही अशा घटनांनी मन अस्वस्थ होतं इस शहरमे हर शख्स परेशानसा क्यूँ है ?

दिवाळी अंक २०२५ - मेघालय - 'Half way to heaven' - भटकंती

गोरगावलेकर ·
/* Global */ body {background-image:url(https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczN5NO1x4rYgEluNX6QoXCS9H9WuBMmAdbFWN-0rfAEzpH4HZVoL7l-Hdq33x6a25xV_8U_p-aGMbmPSyMoLSTthZ8QxWCL0LLAoRUVg8rZz2ABbtDptMipSZs_L5wPEbx46hOAkXBv2ZEJEINFv4NhbLQ=w1024-h1024-s-no?authuser=0);color:#000;background-attachment: fixed; background-position: center; background-repeat: no-repeat; background-size: cover;} .row {margin-top: 40px;} .col-sm-9{border-radius: 10px;padding:16px;margin:8px;background-color: #FEFEFA;box-shadow:0 2px 4px 0 rgba(0,0,0,.2) , 0 2px 5px 0 rgba(0,0,0,.19)} /*Nav Bar*/ .navbar-fixed-to

कंजूस Mon, 10/20/2025 - 20:19
फारच आवडलं मेघालय. सूर्यास्ताचा फोटो भारीच. इतरही फोटो झकासच. थोडे वर्णन आणि फोटो या नेहमीच्या पद्धतीने लेख वाचायला मजा आली.

श्वेता२४ Mon, 10/20/2025 - 23:00
मला तुमचे प्रवास वर्णन व भटकंती विषयक लेख वाचायला खूप आवडतात. आताही या लेखामध्ये बरीच नवीन ठिकाणे कळली. तुमच्या भटकंतीच्या लेखामध्ये विस्तृत वर्णन असल्यामुळे प्रवास नियोजन करणे खूप सोयीचे होते. दिवाळी अंकात एकाच लेखामध्ये सर्व काही लिहायचे असल्याने वर्णन आटोपते घेतले आहे असे वाटले. छोटी स्मिरा अगदीच गोड आहे... भविष्यात मी मेघालय भटकंती करणार आहे त्यामुळे हा लेख माझ्यासाठी प्रवास नियोजनाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे शक्य झाल्यास तुम्ही ज्या ज्या हॉटेलमध्ये राहिलात त्यांची नावे व संपर्क क्रमांक देण्याचे विनंती करीत आहे अगदी प्रतिसादात लिहिणे योग्य वाटत नसेल तर कृपया व्य.नि. करावा ही विनंती.

किल्लेदार Wed, 10/22/2025 - 11:03
वाह. सुंदर. मावफ्लँग आणि द्वाकी नदी कधीपासून विशलिस्ट मधे आहे.

चोपदार गुरुवार, 10/23/2025 - 11:46
सर्व फोटोज अतिशय उत्तम आलेले आहेत. वर्णनही छानच. सर्व टूरिस्ट कंपन्या डावखि सोहरा जोवाई इत्यादी भागच दाखवतात. तुम्ही त्याही पलीकडे काही पाहिले आहेत. मेघालयचा गारो भागही पाहण्यासारखा आहे.

गोरगावलेकर Fri, 10/24/2025 - 14:22
@कंजूस:आपल्याला मेघालय आवडले हे वाचून आनंद झाला. प्रतिसादाबद्दल धन्यवाद @श्वेता२४:सविस्तर प्रतिसादाबद्दल आभार. हॉटेल्सची नांवे दिलेली आहेतच. @किल्लेदार:सुंदरच आहेत ही ठिकाणे. ती बघायची आपली इच्छा लवकरच पूर्ण होवो. @चोपदार:प्रतिसादाबद्दल धन्यवाद. मेघालयमध्ये निसर्ग सौंदर्य भरभरून आहे. थोडी विविधता हवी म्हणून गारो हिल्स रद्द करून शेवटचे तीन दिवस आसाममधील अभयारण्य, ब्रम्हपुत्रेत बोटीतून फेरफटका, मंदिरे इ. सहलीत सामील केले

सुधीर कांदळकर Mon, 10/27/2025 - 16:52
काही वर्षांपूर्वी उत्तर पूर्व सात राज्यांचा दौरा आखला आणि करोनाचे संकट आले आणि दौरा बारगळला. तेव्हा महाजालावरून माहिती जमवतांना मोहरून गेलो होतो. या लेखामुळे त्य पर्यटनाची तहान थोडीफार भागली. धन्यवाद.

कर्नलतपस्वी Wed, 10/29/2025 - 15:09
भटकंतीवरचा लेख अप्रतिमच असतो या बद्दल माझे ठाम मत झाले आहे. तुम्ही सर्व लेख व प्रची संकलीत करून एक पुस्तक प्रकाशित करा. प्रकाशकांच्या व वाचकांच्या उड्या पडतील. नेहमीप्रमाणेच सुंदर वर्णन आणी प्रचि.

गोरगावलेकर गुरुवार, 10/30/2025 - 15:12
@सुधीर कांदळकर: प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद @कर्नलतपस्वी: जे दिसले, जसे दिसले ते हौसेखातर सांगण्यावर भर असतो . "सर्व लेख व प्रची संकलीत करून एक पुस्तक प्रकाशित करा." अशी सूचना खूप आवडली असली तरी हे काम मला जमणारे नाही . आपल्या प्रोत्साहनपूर्ण अभिप्रायाबद्दल धन्यवाद . @मारवा: लेख आवडला हे आवर्जून सांगितल्याबद्दल आपले आभार .

Bhakti Fri, 10/31/2025 - 11:24
खुपचं सुंदर! मेघालय इतक्या अनोख्या भौगोलिक आश्चर्यांनी नटलेला आहे,हे ह्या लेखातून‌ पूर्णपणे पटले.ती सुंदर स्वच्छ नितळ निर्मळ नदी खरंच पाहायलाच पाहिजे.तुमची नातं खूप गोड आहे :)

गुल्लू दादा Sun, 11/09/2025 - 19:09
अतिशय सुंदर झालायं हा लेख. फोटो किती सुंदर आलेत. आता मेघालय जाणे आलेच. खूप धन्यवाद तुम्हाला.

दिवाळी अंक २०२५ - फ्रेडरिक बास्तिया - लेख

केदार भिडे ·
/* Global */ body {background-image:url(https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczN5NO1x4rYgEluNX6QoXCS9H9WuBMmAdbFWN-0rfAEzpH4HZVoL7l-Hdq33x6a25xV_8U_p-aGMbmPSyMoLSTthZ8QxWCL0LLAoRUVg8rZz2ABbtDptMipSZs_L5wPEbx46hOAkXBv2ZEJEINFv4NhbLQ=w1024-h1024-s-no?authuser=0);color:#000;background-attachment: fixed; background-position: center; background-repeat: no-repeat; background-size: cover;} .row {margin-top: 40px;} .col-sm-9{border-radius: 10px;padding:16px;margin:8px;background-color: #FEFEFA;box-shadow:0 2px 4px 0 rgba(0,0,0,.2) , 0 2px 5px 0 rgba(0,0,0,.19)} /*Nav Bar*/ .navbar-fixed-to

गामा पैलवान Mon, 10/20/2025 - 23:22
केदार भिडे, लेख चांगला आहे. मुक्त अर्थव्यवस्थेतच गुणवत्ताप्राधान्यास ( मेरिटोक्रसी इन ओपन इकॉनॉमी ) वाव मिळतो, असा एकंदरीत समज आहे. मात्र यासाठी शासनाने यथोचित नियामक ( गव्हर्नन्स ) धोरण आखणं अत्यावश्यक आहे. अन्यथा मुक्तव्यापाराच्या नावाखाली नाविन्याचा गळा घोटला जातो. अशीही विपरीत उदाहरणे आहेत. भारतातल्या शासकीय परिसंस्थेची तशी तयारी झालेली आहे का, हा ही एक प्रश्नंच आहे. आ.न., -गा.पै.

नूतन Tue, 10/21/2025 - 22:32
लेख आवडला. लेखाचा विषय अगदीच निराळा. म्हटलं तर माझ्या परिघा बाहेरचा. पण वाचताना जराही थाबावंसं वाटलं नाही. शिवाय संदर्भ दुवे दिले आहेत त्यामुळे पुढेमागे अधिक जाणून घेणं शक्य होईल

श्वेता२४ Wed, 10/22/2025 - 18:04
मुक्त अर्थव्यवस्था याबाबत बास्तीया यांचे विवेचन विचार करायला लावणारे आहे. आपण भारतात याबाबतचा दृष्टिकोन किंवा अनुभव नमूद केला आहे. हे अनुभव ही आता बरेच जुने झाले. सध्याच्या काळाबाबत बसतिया यांचे विचार कसे लागू होतात? याबाबत तुमचे म्हणणे काय आहे? हे वाचायला आवडेल.अतिशय छान माहिती पूर्ण लेख आहे. तुम्ही याबाबत एखादी लेखमाला लिहावी असे सुचवेन.

सुधीर कांदळकर Mon, 10/27/2025 - 17:31
एक वेगळा, अनोखा दृष्टीकोन या लेखातून मिळाला. विषय अर्थशास्त्र जरी असला तरी कोणत्याही क्षेत्रात वेगळ्या प्रकारे विचार करण्याची प्रेरणा मिळाली. धन्यवाद. लेखकास आणि फ्रेडरिक बास्तिया यांना देखील.

चित्रगुप्त Tue, 10/28/2025 - 05:08
अर्थशास्त्रातले काही कळत नसले, तरी लेख उत्तम लिहीलेला आहे हे जाणवले. बास्तियाच्या आधीच्या काळात Bourbon घराण्याच्या शेकडो वर्षांच्या कारकिर्दीत फ्रान्समधे कश्या प्रकारची अर्थव्यवस्था होती, हे जाणून घ्यायला आवडेल.

Bhakti Tue, 10/28/2025 - 10:38
खुप माहितीपूर्ण,विविध उदाहरणे देऊन अर्थशास्त्र सांगणारा लेख आवडला.मंदीमध्ये संधी शोधणारे आणि काळाच्या पुढे पाहणारे खरच कमाल वाटतात.जसं AI विषयी आता सामन्यात जागरूकता आहे पण मोठ्या माशांनी १०-१५ वर्षांपूर्वीच यात उडी घेतली आहे. हिडन फिगर सिनेमा मी पाहिला आहे.जेव्हा एक अधिकारी जिद्दीने मेहनतीने एकलव्याप्रमाणे पुस्तकांतून कम्प्युटर भाषा सर्वांआधी शिकते.स्वत:चे स्थान तर अबाधित ठेवतेच इतकच नाही तर ती इतरांचीही नोकरी वाचवते. Change is only constant thing!

प्रथम औद्योगिक क्रांती(ईंडस्ट्री १.०) , मग संगणक क्रांती, मग यंत्रमानव आणि आता ए आय क्रांती. पाणी वाहातच राहणार, कोंबडे झाकले म्हणुन सूर्य उगवायचा रहात नाही. तस्मात काळाशी/तंत्राशी जुळवुन पुढे चालत रहाणे नाहीतर बाजुला होणे आणि आपला वेगळा मार्ग शोधणे हाच काय तो पर्याय. लेख आवडला.

केदार भिडे Mon, 11/17/2025 - 10:59
सर्व वाचकांचे आणि प्रतिसाद देणार्यांचे आभार. माझे तसेच अन्य लेखकांचे लिखाण वाचकांपर्यंत पोहोचवल्याबद्दल मिपा दिवाळी अंक समूहाचे सुद्धा आभार. १२-१४ वर्षांपूर्वी मिपाची ओळख झाली. त्यावेळी वाटले नव्हते की मी पण कधीतरी एखादा लेख लिहेन. परत एकदा धन्यवाद आणि शुभेच्छा

केदार भिडे Tue, 12/23/2025 - 21:41
या लेखात संगणकाला अंध विरोध केल्याचा उल्लेख केलेला आहे. वाचन करत असताना अगदी याच घटनेचा उल्लेख वाचनात आला. सर्वोत्तम ठाकूर (सुनिताबाई देशपांडे यांचे बंधू) यांनी अंतर्नाद मासिकाच्या मार्च २००९ अंकात "हे लढे कशासाठी?" या लेखात याचा उल्लेख केला आहे. अर्थात सुनिताबाई देशपांडे यांचे बंधू हि त्याची मुख्य ओळख नव्हे. अमेरिकेत PhD, IBM मध्ये नोकरी, आणि परत भारतात सुद्दा औद्योगिक क्षेत्रातील अनुभव. या औद्योगिक क्षेत्राकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन काय आहे त्याबद्दल ठाकूर यांनी लिहिले आहे. त्यांचा हा लेख https://antarnad.in/ या संकेतस्थळावर मुक्तपणे वाचू शकता. तसेच अंतर्नाद मासिकाचे सर्व अंक इथे उपलब्ध आहेत त्याचा मिपाकर आस्वाद घेतील याची खात्री आहे.