मानगड, कुंभे घाट आणि बोचेघोळ घाट भटकंती

स्वच्छंदी_मनोज's picture
स्वच्छंदी_मनोज in भटकंती
14 May 2017 - 4:55 pm

२०१४ च्या जानेवारीचे दिवस. नुकताच मेगा ट्रेक करून झाला होता तरी अस्सल ट्रेकभटक्या प्रमाणेच दोन-तिन आठवडे जाताच ट्रेकचा ज्वर चढायला लागला होता. ह्यावेळी असाच एक क्रॉसकंट्री घाटवाटा ट्रेक करण्याच योजत होतं. सोबतीला नेहेमीचे, हक्काचे आणि समानधर्मी सोबती होतेच. तसे तर आता इतक्या वर्षांच्या सहसह्यभटकंतीमुळे एखाद्याने ट्रेक ठरवला (हा एखादा होण्याचे काम आमच्या ग्रुपमध्ये मला आणि अजून दोघाना करावे लागते :) ) की बाकीचे पटापट बॅगा भरायला घेतात आणि आमच्या आधी तयार असतात :).

दहीवडा

सविता००१'s picture
सविता००१ in पाककृती
14 May 2017 - 2:13 pm

सगळ्यांना आवडणारा एक पदार्थ म्हणजे दहीवडा. मस्तच लागतो तो. तर काल आमच्याकडे हाच बेत. किती किती कारणं त्याची - एक तर शनिवार म्हणून मारुतरायाला उडदाने मस्का मारायचा. दुसर्‍या दिवशी चतुर्थी म्हणून रात्री काही उरायला नको, सगळे मजेत काय बरं खातील? असला डोस्क्याला व्याप नको.... हुश्श. तर कसा केला ते देतेय.

उकडांबा

अनन्न्या's picture
अनन्न्या in पाककृती
14 May 2017 - 10:33 am

ही पारंपरिक रेसिपी आहे, माझी आजी, आजेसासूबाई करायच्या. पूर्वी कोकणात पावसात फार भाज्या मिळत नसत. तेव्हा या बेगमीच्या पदार्थांचा उपयोग व्हायचा. हे करायला ठराविक झाडाचे रायवळ आंबे वापरले जायचे. फक्त आंबे उतरून काढायचे, पडलेले नको.
aambe
साहित्यः

माणूस आणि कालगणना ( घोळ आणि त्याची शास्त्रीय करणे)

आदित्य कोरडे's picture
आदित्य कोरडे in जनातलं, मनातलं
13 May 2017 - 7:03 pm

माणूस आणि कालगणना ( घोळ आणि त्याची शास्त्रीय करणे)

मांडणीलेख

साहित्य संपादन आणि अन्य कामे.

नीलकांत's picture
नीलकांत in गटसाहित्य
13 May 2017 - 4:34 pm

नमस्कार,
खरं तर हा संवाद खुप आधी व्हायला हवा होता. पण ते शक्य झालं नाही. तरी आज या विषयावर बोलतोय.

कथुकल्या ७

अॅस्ट्रोनाट विनय's picture
अॅस्ट्रोनाट विनय in जनातलं, मनातलं
13 May 2017 - 1:57 pm

१ . मायावी

माझ्या स्वागताला ना पाचूंनी मढलेला दरवाजा होता, ना हिरेमाणकांसारख्या लखलखणाऱ्या अप्सरा. ज्या दगडी दरवाजातून मी आत आलो होतो त्यावरून स्पष्ट होत होतं की ही गुहा आहे. चारीबाजूंनी काळ्याशार, उंचच उंच दगडी भिंती होत्या. गुहा निर्जीव नसून जिवंत आहे अशी अनुभूती होत होती. कुबट, कोंदट वासाने जेरीस आणलं होतं. मला माहीत होतं की मी कुठे आलोय. तेच ठिकाण ज्याला जगातले सगळ्या धर्माचे लोक घाबरतात. ज्याच्या भितीमुळे बऱ्याच श्रद्धा आणि अंधश्रद्धांचा जन्म झालाय. नक्कीच मी नरकात आलो होतो.

कथाशब्दक्रीडाप्रतिभाविरंगुळा

सदाभाऊ

Vinayak sable's picture
Vinayak sable in राजकारण
12 May 2017 - 8:41 pm

एकेकाळी शेतकऱ्यांसाठी जीवाचं रान करणारे सदाभाऊ आज स्वतः सत्ताधारी विशेष म्हणजे कृषिमंत्री झाल्यावर त्यांच्या भूमिकेत झालेला बदल कवी व वक्ते जगदिश ओहोळ यांनी त्यांच्या *सदाभाऊंचा ऊर* या कवितेतून नेमकेपणाने मांडला आहे.

शेतकऱ्याचा जीव घेतेय
त्यानेच पिकवलेली तूर
आता भरून कसा येत नाही
शेतकऱ्यांसाठी सदाभाऊ चा ऊर

गोडी लागली सत्तेची
वारं लागलं AC चं
अन चळवळ झाली दूर
आता भरून कसा येत नाही
शेतकऱ्यांसाठी सदाभाऊ चा ऊर