" तू "

अरूण गंगाधर कोर्डे's picture
अरूण गंगाधर कोर्डे in जे न देखे रवी...
23 May 2017 - 4:12 pm

येताच तू, किनारा
शब्दात व्यक्त होतो
बेभान लाट होते
वारा अनर्थ करतो

पदरावरी तुझ्या ग
फुलती फुले अनेक
संध्येस धुंदी येते
गंधात स्पर्श फिरतो

डोळ्यातले तुझे ते
निः शब्द भाव भोळे
उर्मीत भावनांच्या
ओठात शब्द घसरे

चढतो असाच कैफ
जाणीव भ्रष्ट होते
लहरीत भावनांच्या
मजसी भुरळ पडते

तो काळही थबकतो
अंधार पेट घेतो
लाजूनी सागरही
ओहोटीत मंद हसतो.

कविता माझीकविता

प्रदूषण... (लघुकथा)

चिनार's picture
चिनार in जनातलं, मनातलं
23 May 2017 - 2:58 pm

शहराच्या मधोमध बांधलेला तो फ्लायओव्हर रखडून रखडून शेवटी पूर्ण झाला. उदघाटन,कौतुकसोहळे पार पडले. मुख्यमंत्री स्वतः आले होते उदघाटनाला. काही विरोधकांनी पर्यावरणाच्या वगैरे घोषणा दिल्या मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरु असताना. विरोधकांच्या मते, या फ्लायओव्हरसाठी झाडं तोडण्यात आली, सिमेंटच्या अजस्त्र बांधकामामुळे शहराचं तापमान वाढू शकते, वाहतूक वाढल्यामुळे प्रदूषण होईल वगैरे वगैरे. ते काय नेहमीचंच असतं. मुख्यमंत्री स्वतः विरोधक असताना त्यांचंही मत काही वेगळं नव्हतं! पण एकदा सत्तेच्या सागवानी खुर्चीत बसल्यावर जंगलातील सागवानाविषयी आस्था तुटते ती कायमचीच! असो.

कथाअनुभव

अनफन & अनफेर

अद्द्या's picture
अद्द्या in जनातलं, मनातलं
23 May 2017 - 2:15 am

काही काही दिवस असे अति चांगले जात असतात . म्हणजे त्या दिवशी कोणाशी वाद होत नाहीत, पेट्रोल पंप वर हि गर्दी नसते, ३-४ तास गारपिटीसकट पाऊस पडून हि BSNL ची लाईन अगदी व्यवस्थित चालू असते . मागवलेला पिझा ३० मिनिटे उशिरा येतो . आणि त्यामुळे फुकट मिळतो . कॅंटीन वाल्याने अगदी जीव ओवाळून टाकावा असा चहा केलेला असतो, आणि सोबत कांदा भाजी पण दिलेली असते नाश्त्याला . पण तरीहि ऑफिस मध्ये काही तरी चुकल्या सारखं होत होतं. मागचा सोमवार असाच गेला . नेहमी काही ना काही गोंधळ असलेलं ऑफिस . काहीच घडलं नाही सकाळ पासून . जास्ती काम हि नव्हतं , त्यामुळे मी हि गप आपल्या सिस्टम वर सिनेमा बघत बसलो होतो .

कथा

दस का बीस

किसन शिंदे's picture
किसन शिंदे in जनातलं, मनातलं
22 May 2017 - 5:19 pm

तारीख : अशीच कुठलीतरी
वेळ : सकाळी पावणे नऊ/नऊ वा.
ठिकाण : गडकरी रंगायतनचे अ‍ॅडव्हान बूकिंग काऊंटर

'साखर खाल्लेला माणूस' या नाटकाची अ‍ॅडव्हान बूकिंग सुरू व्हायची होती. सुरूवातीच्या चार-पाच ओळीत जागा मिळावी म्हणून थोडा धावत पळतच गेलो काऊंटरवर. रंगायतनच्या नियमाप्रमाणे सकाळी साडे आठला बूकिंग सुरू होते. मी तिथे पोचलो साधारण पावणे नऊ/ नऊ वाजता. काऊंटर ठेवलेला बूकिंग चार्ट पाहून आश्चर्याचा धक्का बसला, कारण 'A' पासून ते 'R' पर्यंतच्या सगळ्या सीट्स भरल्या होत्या. म्हटलं हे कसं शक्य आहे म्हणून बूकिंग घेणार्‍या माणसाबरोबर संवाद सुरू केला.

नाट्यप्रकटनविचारमाध्यमवेध

सद्गुणाचा पुतळा बनतो विनाशाचा सापळा!

निमिष सोनार's picture
निमिष सोनार in जनातलं, मनातलं
22 May 2017 - 5:17 pm

तुम्ही संवेदनशील आणि भिडस्त आहात?
तुम्हीं शांत स्वभावाचे आणि मितभाषी आहात?
सालस आणि आज्ञाधारक आहात?
आणि त्यासाठी तुमचे कौतुक होत आहे?
तर मग आजच सावध व्हा!

ते कौतुक यासाठी आहे की तुम्ही तसेच सद्गुणाचे पुतळे राहावे म्हणजे जग तुमचे शोषण करू शकेल!

जीवनमानअनुभवमत

सुखाची सावली ( लघुकथा ) ( काल्पनीक )

सिरुसेरि's picture
सिरुसेरि in जनातलं, मनातलं
22 May 2017 - 4:38 pm

सुखाची सावली ( लघुकथा ) ( काल्पनीक )

संध्याकाळचे सहा वाजत आले होते . राधाबाई आपल्या घराच्या दारापाशी उभ्या राहुन मोठ्या आतुरतेने शामरावांची वाट पाहात होत्या . थोड्याच वेळात समोरुन संथपणे चालत येणारी कोट , धोतर आणी डोक्यावर टोपी घातलेली शामरावांची मुर्ती त्यांना दिसली तेव्हा कुठे त्यांचा जीव भांड्यात पडला .
त्या लगबगीने आत जाउन पाण्याचा तांब्या आणी भांडे घेउन आल्या . आता त्यांच्या मनातल्या उत्सुकतेची जागा एका काळजीने घेतली .

कथालेख

युएस कॅपिटॉल पूर्वार्ध

श्रीरंग_जोशी's picture
श्रीरंग_जोशी in भटकंती
22 May 2017 - 12:33 am

आम्ही राहतो त्या राज्याचे (मिनेसोटा) अन शेजारच्या विस्कॉन्सीन राज्याचे स्टेट कॅपिटॉल पाहिल्यावर युएस कॅपिटॉल पाहण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली होती. या वर्षी युएस कॅपिटॉल पाहायचा योग जुळून आला. मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात चेरी ब्लॉसम फेस्टिवलच्या निमित्ताने वॉशिंग्टन डिसीकडे कूच केले. वॉशिंग्टन डिसी व भोवतालचा परिसर मेट्रो ट्रेनच्या जाळ्याने अतिशय उत्तमरीत्या जोडलेला आहे व तिथली सिटीबस सेवा देखील या मेट्रो ट्रेनला पूरक आहे.