भरारी

अनिकेत कवठेकर's picture
अनिकेत कवठेकर in जे न देखे रवी...
2 Jul 2017 - 7:23 pm

..आणि त्याचं विमान त्या सवयीच्या झालेल्या रन-वे वरून
पुन्हा भरारी घेत उंचच उंच आकाशी झेपावलं
विमानाच्या वेगानं मन मात्र पुढं सरकायला तयारंच नव्हतं
त्याच्या उमलत्या काळाच्या आठवणी,
त्याच्या पावलांना चालतं करणारे आश्वासक हात
त्याच्या वेगाला मूकपणे वाखाणणारे डोळे
त्याच्या वेड्या साहसांनंतरही मायेने त्याचे अपराध पोटात घेणारी मनं..
त्याच्या इंद्रधनुष्याकडे जाणार्या रस्त्यावर ढगासारखी आड येत होती
तेवढ्यात सर्रदिशी वीज लखलखून त्याला भविष्यकाळ दाखवून गेली
मग त्यानंतर समुद्रात पाऊस पडला
सोडलेला देश अंधुकसा दिसू लागला

मुक्त कविताकविता

अविनाशीत्व

अनिकेत कवठेकर's picture
अनिकेत कवठेकर in जे न देखे रवी...
2 Jul 2017 - 7:19 pm

ग्रीष्माच तप्त ऊन ,
पुरातन काळ्याशार मंदिराचा रणरणता प्रदक्षिणा मार्ग
गावोगावच्या आबाल वृद्धांनी
श्रद्धा , भक्ती , उपचार , सोपस्कार आणि दृढ विश्वासावर जागृत ठेवलेलं देवस्थान
पूजा , आरत्या , फेर्या , लोटांगणे
यांनी तापलेल्या वास्तवाला शमवण्यासाठी देवाला दिलेली हाक
देवाने ऐकली बहुतेक.
कारण ..
यानंतर जवळच्या संगमावरून गार वारे वाहू लागले
नंदादीप उजळले ,
दीप माळांनी तळावलेल्या डोळ्यांचे पारणे फिटले
आरत्या - कीर्तनांच्या आवाजाने कान
तर प्रसादाच्या माधुर्याने जठराग्नी निवळले

फ्री स्टाइलकविता

विक्रम आणि वेताळ पदार्थविज्ञानाच्या जंगलात

अनिकेत कवठेकर's picture
अनिकेत कवठेकर in जनातलं, मनातलं
2 Jul 2017 - 2:29 pm

जगातल्या जवळजवळ सर्वच संस्कृतींमध्ये कपोल कल्पित कथांची रेलचेल आहे. त्यांच्यात भुताखेताच्या, झाडावरील भुता-खेताच्या, हडळींच्या, हैवानांच्या गोष्टी तर असतातच. अशीच काही भुते आपल्या आजुबाजूला कायम वावरत असतात.

तंत्र

कोथरूड (पुणे) इथे कुणी मिपाकर आहेत का? मी उद्या ३ जुलै २०१७ ला कोथरूडला आहे.

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in जनातलं, मनातलं
2 Jul 2017 - 9:44 am

नमस्कार मिपाकरांनो,

काही कारणानिमित्त (पुण्याला कारणाशिवाय जाणे, शक्यतो टाळतो) मी उद्या संध्याकाळी, सोमवार दिनांक ३-०७-२०१७ कोथरूड (पुणे) इथे येत आहे.

मंगळवारी संध्याकाळी डोंबिवलीला परत येणार.

एखादा मिनी कट्टा पण करता येईल आणि त्या निमित्ताने पुण्यातील मिपाकर मित्रांना पण भेटता येईल, हा हेतू आहेच.

आपलाच

(कट्टाप्पा) मुवि

समाजविरंगुळा

टाळण्या कवटाळण्या वा पाळण्यायोग्य...

दमामि's picture
दमामि in जे न देखे रवी...
1 Jul 2017 - 6:26 pm

टाळण्या कवटाळण्या वा पाळण्यायोग्य
काही म्हणा पण ऐट तिची भाळण्यायोग्य..

चाटते ती ज्या अदेने मान वेळावून
शेपटी चवरीच भासे ढाळण्यायोग्य.

बिल्ली असे भारी बिलंदर, अर्धोन्मिलित नयनी
टाकते तिरपे कटाक्ष जाळण्यायोग्य.

रे किती पिल्ले निघाली एकापुढे एक
या विणीला अंत नाही, भंजाळण्यायोग्य.

विषय 'मनी'चा म्हणून विणली माळ शेरांची
जाणतो मी, मुळीच नाही माळण्यायोग्य.

प्रेरणा- अर्थात श्री गुरुजी आणि नवीन सदस्य.

vidambanरतीबाच्या कविताबालगीत

रानभाजी महोत्सव २०१७

त्रिवेणी's picture
त्रिवेणी in भटकंती
1 Jul 2017 - 5:50 pm

रानभाजी - ऑगस्ट २०१७

चिंब पाऊस अल्लड वारा, धुंद हवा मृदगंध नवा l

रानातुनी बहरे रानमेवा, तयाचा मज आस्वाद हवा ll

या वर्णनासारखे अगदी नितांत सुंदर, श्यामल आणि पावसाळी व सर्वात महत्वाचे म्हणजे प्रदूषण मुक्त अस्सल नैसर्गिक वातावरण भीमाशंकर डोंगराईत असलेल्या आहुपे या गावात दर पावसाळ्यात असते.

या गावात गेली २ वर्षे वनवासी कल्याण आश्रमातर्फे, आदिवासी समाजातील आपल्या बंधू/भगिनींसाठी ""रानभाजी महोत्सव"" अशी एक नाविन्यपूर्ण स्पर्धा घेतली जाते.

#मिपाफिटनेस दिल की धडकन का मॉनीटर - भाग २

विंजिनेर's picture
विंजिनेर in जनातलं, मनातलं
1 Jul 2017 - 3:45 am

भाग-१ : ....आता इथपर्यंत आपण मोजमाप केली, बरीच आकडे मोड केली, भाग-२ मध्ये ही सगळी आकडे मोड प्रत्यक्ष वापरायची कशी हे बघणार आहोत!...
----------------------------------------
आपण काही परिभाषा बघूयात.

जीवनमान