भेट पावसाची..

दिपक लोखंडे's picture
दिपक लोखंडे in जे न देखे रवी...
8 Sep 2017 - 4:54 pm

भेट तुझी माझी पावसाची
आठवण आहे बावऱ्या मनाची..

तु सजली आहेस लावून गजरा
सह मोहक सुगंध देई मोगरा
भुलून गेलो आहे सजनी
प्रीत रंग पसरला गगणी
ऐकुनी हे बोल तुझे
वाटे मज वाजे बासुरी..

बघुनिया रूप तुझे
घाव झाला हृदयावरी
चंद्र ही निरखून पाही
भेट तुझी माझी पावसाची..

– दिपक.

कविता माझीमांडणीकविताभाषा

मिळून मिसळून!

उपयोजक's picture
उपयोजक in तंत्रजगत
8 Sep 2017 - 1:12 pm

अनेक मिपाकरांनी विचारणा केल्यामुळे या धाग्यावर माहिती देत आहे.

मिळून मिसळून हा फक्त मिपाकरांचा WhatsApp समुह बनवला आहे.(आधी हा समुह टेलिग्रामवर होता.पण सर्वांच्या सोयीसाठी टेलिग्रामवरुन बंद करुन तो WhatsApp वर सुरु केला आहे.

समुहाचे उद्देश:

१] सर्व नव्या-जुन्या मिपाकरांना एकत्र येता यावं,चांगल्या चर्चा व्हाव्यात,विषय मिपावर चर्चा करण्यायोग्य असेल तर धागा काढला जावा,धाग्याच्या लेखनासंबंधी मार्गदर्शन मिळून तो वाचनीय व्हावा.नवीन लेखकांना लेखनासाठी मार्गदर्शन मिळावं हा समुहाचा उद्देश आहे.

अनवट किल्ले १८: संभाजीराजांच्या जीवनपटाचा साक्षीदार, प्रचितगड( Prachitgad )

दुर्गविहारी's picture
दुर्गविहारी in भटकंती
8 Sep 2017 - 11:25 am

महाराष्ट्रातील गड कोट म्हणले कि आपल्याला शिवराय आठवितात. एका किल्ल्यावर जन्मलेला, किल्ल्यांच्या आधाराने आयुष्यभर राजकारण केलेला आणि एका किल्ल्यावर चिरविश्रांती घेणार्‍या या योध्द्याची प्रत्येक मराठी व्यक्तिला कोणत्याही गड कोटावर आठवण यावी हे स्वाभाविकच आहे. पण एका किल्ल्याने संभाजी राजांचा आयुष्यातले आनंदाचे आणि दुखाचे असे दोन्ही क्षण अनुभवले आहेत. हा बुलंद किल्ला आहे, श्रुंगारपुरचा पहारेकरी "प्रचितगड".

अजून एक हत्या , अजून एक संधी !!

जीएस's picture
जीएस in जनातलं, मनातलं
7 Sep 2017 - 7:01 pm

पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या झाली. आज स्वातंत्र्यानंतर सत्तर वर्षांनीही भारतात माणसाच्या जीवाला काहीच किंमत नाही, बळी तो कान पिळी हाच कायदा आहे, कुणाच्या शेपटावर कधी पाय पडेल व आपण जीव गमावून बसू अशा समाजात व व्यवस्थेत आपण राहतो याची पुन्हा एकदा भयप्रद जाणीव करून देणारी ही अतिशय निषेधार्ह हत्या आहे.

समाजप्रकटन