गहन हे मर्म दु:खाचे

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
22 Sep 2017 - 2:59 pm

गहन हे मर्म दु:खाचे
उमजणे कठिण किती असते
साचले युगांचे अवघे
निमिषात अश्रुरूप घेते

उफराटे गणित विषाचे
समजणे कठिण किती असते
मरण्यास पुरे इवलेसे
जगण्यास कितीही कमी पडते

शब्दांच्या निबिड अरण्यी
बहरणे कठिण किती असते
अमरत्व उमलण्या आधी
का मरण विकटसे हसते

कविता माझीमुक्तक

अनवट किल्ले १९:वारणेचे वाघ, बहादुरवाडी( Bahadurwadi ) , विलासगड, मल्लिकार्जुन( Vilasgad, Mallikarjun )

दुर्गविहारी's picture
दुर्गविहारी in भटकंती
22 Sep 2017 - 11:31 am

कोल्हापुर व सांगली या दोन्ही जिल्ह्यांच्या सीमेवरून वाहणारी वारणा नदी, हिच सीमा मानुन मराठा साम्राज्याचे दोन भाग झाले. याच वारणेच्या खोर्‍यात क्रांतिसिंह नाना पाटील यांच्यासारख्या वाघाच्या काळजाचा माणुस जन्मला. याच परिसरात एक प्राचीन गड विलासगड किंवा मल्लिकार्जुन व मराठाकालीन भुईकोट बहादुरवाडी वसलेले आहेत. या धाग्यात त्यांचीच माहिती घ्यायची आहे.
बहादुरवाडी या भुईकोटासंदर्भात दोन कथा वाचायला मिळतात. आधी त्या पाहु आणि मग भुईकोटाची सैर करु

Cheesy Hashbrown अर्थात बटाट्याचे थालीपीठ

गम्मत-जम्मत's picture
गम्मत-जम्मत in पाककृती
21 Sep 2017 - 7:41 pm

माझ्या बाबतीत नेहमी घडणारी गोष्ट म्हणजे नाले साठी घोडा खरेदी... कुणी तरी घरी येणार म्हणून कोणत्या तरी सँडविच साठी घरी cheese इटालियन हर्ब्स, चिली फ्लेक्स अशा आणलेलं होत, अर्थात सँडविच न बनवता बुर्जी पाव खाल्ल्याने हे सर्व फ्रिज मध्ये शोभिवंत होऊन पडलं. त्याचा सदुपयोग करण्या साठी हि पाकृ केली.
(मी ऋजुता दिवेकर ची पंखी असल्याने ब्रेड, बिस्कीट घरी दुर्मिळ!! त्यामुळे ब्रेड का नाही आणला हा प्रश्न बाद!! )
पाकृ येणेप्रमाणे -
साहित्य -

जगण्यासाठी पुरेसे

RDK's picture
RDK in जे न देखे रवी...
21 Sep 2017 - 6:56 pm

भूतकाळाला निरोप देवून ,भविष्याकडे वाटचाल कर
सारे कटू अनुभव सोडून, प्रकाशाची वाट धार
विषारी अशा भूतकाळाला, पाण्यामध्ये बुडवून टाक
दंश करण्या भविष्याला, संधी त्याला देवू नको
भूतकाळ चांगल असो वा वाईट, त्याला परत आणता येत नाही
भविष्य असते आपल्या हातात, ही संधी गमवू नको

कविता

कर्करोगाचा विळखा

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
21 Sep 2017 - 1:15 pm

कर्करोगाचे प्रमाण जगभर झपाट्याने वाढत आहे. यासंबंधी ‘यु.के.’ मधील एक मजेदार अहवाल वाचनात आला.

२०१५ मध्ये त्या देशात ७०,०००हून अधिक नवीन निदान झालेले कर्करोगी आढळले होते. हा आकडा नक्कीच धक्कादायक आहे. त्या संशोधकांनी सहज या आकड्याची तुलना तेथील समाजातील काही वेगळ्या घटनांशी केली.तेव्हा हा आकडा त्या वर्षातील खालील तीन घटनांपेक्षा अधिक होता:

१. नवीन लग्नांची संख्या
२. पहिल्या अपत्यास जन्म देणाऱ्या स्त्रियांची संख्या आणि
३. देशातील सर्व विद्यापीठांतून पहिली ( bachelor) पदवी मिळवणारे एकूण स्नातक !

समाजआरोग्य

खिडकी

जागु's picture
जागु in जनातलं, मनातलं
21 Sep 2017 - 10:37 am

चार कोनांची, सुरक्षेसाठी बाहेरून लोखंडी ग्रिल लावलेली आणि पारदर्शकतेसाठी काचेची स्लायडींग असलेली, हवा आत बाहेर खेळवणारी अशी खिडकी आपल्या घराचा एका अर्थाने श्वासच असतो. अर्थात प्रत्येक घराच्या खिडक्या वेगवेगळ्या आकाराच्या, काचेच्या, लाकडाच्या, ग्रिलच्या असतात. हॉल बेडरूम च्या खिडक्यांवर आकर्षक पडद्यांची सजावट करून खिडकीला आकर्षक पोषाख दिला जातो त्याने खिडकीच्या सौंदर्य अधिक खुलून दिसते. हल्ली ग्रिलमध्ये झाडे लावूनही खिडकीला बगिच्याच रूप दिल जात. मग हळू हळू ही खिडकी बाहेरील निसर्गातील जीवांनाही आपल्या कवेत घेऊन त्यांना आसरा देते.

राहती जागालेख