चारठाण्याचे शिल्प वैभव- बरेचसे अप्रसिद्ध
चारठाण्याचे शिल्प वैभव- बरेचसे अप्रसिद्ध
चारठाण्याचे शिल्प वैभव- बरेचसे अप्रसिद्ध
राणी एलिझाबेथ, साधी एलिझाबेथ.
[ही एक रूपककथा. लावू तितके अर्थ. करू तसा विचार.]
नियमीतपणे छानशा बोलीभाषेतून बाल कविता करणार्या एका (#) कवि महोदयांच्या सहज म्हणून लिहिलेल्या एका कवितेकडे माझ्या छिद्रन्वेषी स्वभावाने लक्ष वेधले. कवितेतील वेगवेगळ्या पशुपक्षांना आपल्या स्वभाव वैशिष्ट्याचाच कंटाळा आलेला असतो. जसे की मांजर म्हणते की मी म्याऊ म्याऊच कधी पर्यंत म्हणू? कोंबडी म्हणते कुकूचकू करून कंटाळ्चा आलाय, तर कावळा म्हणतो मी काळाच रहाणार का ?
श्वेतांबरा ही मराठीतली पहिली सिरियल आठवते. ती बघताना त्यांत अनेक त्रुटी असूनही ती उत्सुकतेने शेवटपर्यंत बघितली. फक्त, त्याचा शेवट झाल्यावर, शेवटच्या भागात जो,'अहो रुपम अहो ध्वनिम' चा कार्यक्रम झाला तो हास्यास्पद होता. पुढे फक्त दूरदर्शनची सद्दी होती तोपर्यंत अनेक चांगल्या-बर्या मालिका बघितल्या. नंतर प्रायव्हेट चॅनेल आले आणि काही बर्यापैकी सिरियल बघायला मिळाल्या. शेवटची सिरियल बघितल्याची आठवते ती 'या गोजिरवाण्या घरांत'! पण ती फारच पाणी घालून वाढवायला लागल्यावर बघणे बंद केले. त्यानंतर कुठलीही मराठी किंवा हिंदी सिरियल बघायची नाही हे ठरवून टाकले. तो नियम अगदी यावर्षीपर्यंत कटाक्षाने पाळला.
हेही बरेच आहे,
तेही बरेच होते,
आपापल्या परीने,
सारे खरेच होते
मोजून पाप माझे
जपमाळ ओवलेली,
मोक्षास गाठण्याला,
तितके पुरेचं होते,
आयुष्य तारकांचे
मोजीत रात्र होती
मोहक असे मनाला
भूलवीत बरेच होते
खाणीत नांदण्याचा
कोळश्यास शाप आहे
नसते ठिसूळ तुकडे
तर तेही हिरेच होते
सरणास भेटताना
गेली नजर मागे
चेहरे ओळखीचे
हसरे सारेच होते
-शैलेंद्र
आजचा सुविचारः न पिणार्याला जबरदस्तीने पाजता येईलही, पण त्याला बेवडा बनवता येणार नाही. दारूची ओढ रक्तातच असावी लागते.
अंडी घालण्यासाठी सगळ्यात उत्तम वेळ म्हणजे सकाळ. सूर्य काही तासांपूर्वीच उगवलेला असतो, मेंदू मस्त रिकामा असतो, मन मात्र भावनांनी ओथंबलेले हवे.
रात्री नंतर रोज येणारी सकाळ हँगओवर सोबत इतरही अनेक गोष्टी घेऊन येते.
प्रिय मित्रहो,
आपण विज्ञानशासित जगात राहतो. खालच्या पानावर scientific revolution शास्त्रीय समजुती कशा बदलतात हे कुन या लेखकाने मांडले आहे. वैज्ञानिक ज्ञानाच्या स्वरुपाबद्दल त्यांचं वरच्या लिंकमधे दिलेलं पुस्तक महत्त्वाचं मानलं जातं.
त्यात खालचा उतारा महत्त्वाचा वाटला -
अनवट किल्ल्यांच्या या मालिकेतील सांगली जिल्ह्यातील उर्वरीत किल्ल्यांचा घेतलेला हा एकत्रित आढावा. अपवादात्मक प्रसंग सोडले तर फार मोठ्या एतिहासिक घटना या परिसरात झालेल्या नाहीत. तसे हे छोटे भुईकोट आहेत. यांचा आढावा आपण या एकाच भागात घेउ आणि दक्षिण महाराष्ट्राची दुर्गयात्रा संपवू.
काल संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा संजीवन समाधी दिवस होता . त्याचे निमित्त साधून मी खालील कविता केली होती
ज्ञानियांचे राजे तुम्ही
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर
आळंदीचा स्वर्ग करूनी
दाविला आम्हां ईश्वर ||धृ||
पिता विठ्ठलपंत कुलकर्णी
संन्यास धर्म आचरती
ज्ञानदेव सोपान मुक्ताई
आणि थोरले पुत्र निवृत्ती ||१ ||
बाळपणी माता पिता हरपले
होती चार भावंडे अनाथ
जगी तारण्या तूंचि विठ्ठला
तूंचि असे श्री गुरुनाथ ||३ ||