निसर्गचक्र

कवि मनाचा's picture
कवि मनाचा in जे न देखे रवी...
2 Mar 2016 - 11:16 pm

न मागताही तो सर्वांना भरभरुन देतो,
मिळवल्याचे श्रेय मात्र मी स्वतःकडे घेतो!
तहानलेल्या धरतीला पहिला पाऊस सुखावतो,
पण त्याआधी नभांना गारवा कोण देतो,
अथांग त्याची कृपा, प्रत्येकाला आपला वाटा ठरवून देतो,
जसे समुद्र स्वतःतले बाष्प, नभांसाठी आधीच राखून ठेवतो.

कविता

वाढदिवस

कवि मनाचा's picture
कवि मनाचा in जे न देखे रवी...
2 Mar 2016 - 11:10 pm

आणि तो दिवस पुन्हा खूप दिवसांनी येतो,
उगाचच खूप मोठे झाल्याचे भासवतो,
मित्रांच्या शुभेच्छा संदेश पहात भूतकाळात रमवतो,
शाळेच्या वर्गात, क्रिकेटच्या ग्राउंडवर, मंदिराच्या पायऱ्यांवर, रेल्वेच्या क्रॉसींगवर, गावच्या नदीवर,
कधी धरणावर तर कधी विष्णूच्या तळ्यावर फक्त मनानेच हुंदडत असतो,
पाणावलेल्या डोळ्यांत एकच प्रश्न अनुत्तरीत असतो,
आपण उगाचच एवढे मोठे का होत असतो,
आणि तो दिवस पुन्हा खूप दिवसांनी पुन्हा येतो.

मुक्त कविताकविता

जीवनसंगीत

कवि मनाचा's picture
कवि मनाचा in जे न देखे रवी...
2 Mar 2016 - 10:44 pm

देवा तुझ्या नामानं, मीपण गळलं
बासुरीगत झाले मनं, रितं न् पोकळं
तुझ्या फुंकरेने केले, स्वर हे मधाळं
संगीतमय झाले सारे, जीवन सकळं

अभंगकविताचारोळ्या

विश्वाचे आर्त - भाग २० - उत्क्रांतीचे पुरावे - भूस्तरीय अवशेष

राजेश घासकडवी's picture
राजेश घासकडवी in जनातलं, मनातलं
2 Mar 2016 - 10:35 pm

1
.

हे ठिकाणविचार

मिपा रंगभूषा मंडळ

सरपंच's picture
सरपंच in घोषणा
2 Mar 2016 - 9:14 pm

.

नमस्कार,

मिसळपाव.कॉम वर येणार्‍या साहित्यासोबतच मिपाला सजवण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या रेखांकनांची, चित्रांची तसेच वेगवेगळ्या प्रसंगी विशेष फलकांची गरज पडते. अश्यावेळी मिपाकरांपैकी ज्यांना शक्य असेल ते लोक असे काम करतात. आता मिपाला या प्रकारच्या कामाची वारंवार गरज पडत असल्यामुळे अश्या मिपाकरांचे एक मंडळ असावे जे या ग्राफिक्सच्या क्षेत्रात काम करतात किंवा हौशी आहेत. अश्या लोकांचे मिळूण एक मिपा रंगभूषा मंडळ आजपासून कार्यरत होतेय.

"मान झुकव, परम ईश्वर आहे मी.."

नीलमोहर's picture
नीलमोहर in काथ्याकूट
2 Mar 2016 - 5:08 pm

एक दिवस, फक्त एकच दिवस, सगळ्या तुझ्या जखमांचा हिशेब कर
एक रात्र, फक्त एकच रात्र, कर विचार जरा, तुझ्यासोबत झाले काय
स्वत:पासून लांब कुठवर धावशील, ती पहाटही आता निसटून चालली, कधी उठशील
दुनियेने तुकडे केले तुझे, तुटत गेलास, स्वत:ला कुठवर तोडत राहशील..

घे श्वास भरून मोट्ठा, सांग ओरडून या जगाला,
मान झुकव, परम ईश्वर आहे मी,
सारा आसमंत व्यापून राहिलोय तो एक मी..
देव आहे माझ्यात, देव आहे मीच.

स्लोवाकिया आणि वेलिक्झा साल्ट माइन क्राको पोलंड

शान्तिप्रिय's picture
शान्तिप्रिय in भटकंती
2 Mar 2016 - 4:29 pm

मागील वर्षी मे जून महिन्यात कामानिमित्त स्लोवाकिया येथे जाण्याचा योग आला. तेव्हा पोलंड मधील वेलिक्झा साल्ट माईन ला भेट दिली या स्लोवाकिया आणि पोलंड भेटीचा संक्षिप्त वृत्तांत काही छायाचीत्रासहित येथे देत आहे.

सुरुवातीला स्लोवाकियाविषयी :

स्लोवाकिया हा मध्य युरोपातील एक प्रगत देश.

वास्तविक झेक आणि स्लोवाकिया मिळून झेकोस्लोवाकिया हे गणराज्य अस्तित्वात होते परंतु १९९३ मध्ये हे गणराज्य शांतीपूर्ण रितीने भंग पावले व झेक आणि स्लोवाक असे दोन देश झाले. यातील स्लोवाक म्हणजेच स्लोवाकिया.

विषय

कवि मनाचा's picture
कवि मनाचा in जे न देखे रवी...
2 Mar 2016 - 3:07 pm

इतिहासाच्या तासाने आम्हाला फारच छळले,
पानिपतच्या लढाईत कोण जिंकले,कोण हरले,
हे शिकून तरी काय कळले,
आयुष्याच्या इतिहासात खरे तेच यशस्वी ठरले,
ज्यांनी आपल्या शत्रूचेही मन जिंकले.

भूगोलाच्या तासाला नाही कळले चंद्र व सूर्यग्रहण,
विधात्याने निर्मिले 'मानव' हे क्षुद्र उपकरण,
ऊन-सावलीच्या खेळाने करतो तो स्वतःचे मनोरंजन,
त्याच्या अचाट क्षमतेने झालो थक्क नि गेलो भांबाबून.

फ्री स्टाइलमुक्त कविताकविताविडंबन