आता वाटली ना काळजी ?

श्वेताली कुलकर्णी's picture
श्वेताली कुलकर्णी in जनातलं, मनातलं
5 May 2016 - 9:12 pm

आज ऑफिसला जाण्यासाठी दोघांना गडबड होती म्हणून तो तिला म्हणाला कि आज डबा राहू दे बाहेरच खाऊ काहीतरी ! तसेही ती पण त्याच्या सोबत बाहेर पडत असल्यामुळे त्याला तिला त्रास द्यायला आवडायचे नाही पण त्याच्या साठी डबा बनवायला तिला खूप आवडायचे , पण आज गडबडीमुळे दोघेही लवकर बाहेर पडले , त्याचे ऑफिस एकीकडे आणि तिचे एकीकडे त्यामुळे सोबत हि फक्त स्टेशन पर्यंत असे तिथून वेगळे रस्ते ..

मांडणीजीवनमान

सायकलीशी जडले नाते ३१: श्रीवर्धनमध्ये काय झाले . . .

मार्गी's picture
मार्गी in जनातलं, मनातलं
5 May 2016 - 6:17 pm

सर्व मान्यवरांना नमस्कार. सायकल नव्याने शिकताना आणि सायकलीशी मैत्री करताना आलेले सोलो सायकलिंगचे गमतीदार अनुभव शेअर करत आहे. सायकलिंगचे वेगवेगळे टप्पे, सायकल चालवताना केलेला वेडेपणा आणि चित्रविचित्र अनुभव इथे लिहित आहे. त्यातून मिळालेला आनंद सर्वांसोबत वाटून घ्यावा, ही इच्छा. धन्यवाद.

सायकलीशी जडले नाते १: पहिलं अर्धशतक

सायकलीशी जडले नाते २: पहिलं शतक

प्रवासक्रीडाविचारअनुभव

[शतशब्द कथा स्पर्धा कथा : त्याग] भाग दोन (सीक्वल)

कैलासवासी सोन्याबापु's picture
कैलासवासी सोन्याबापु in जनातलं, मनातलं
5 May 2016 - 3:46 pm

आधीचा भाग (स्पर्धेत लिहिलेली कथा)

*******************
अन केला सर्वस्वाचा

त्याग...
*******************

कोळस्याच्या राखेने, जागरणाने, इंग्रजांच्या रागाने डोळे रेलवेच्याच लाल बावट्याप्रमाणे तांबारलेले.

बनारस, पॅरिस ऑफ़ द ईस्ट, इथे क्रन्तिकारी-ब्रिटिश लपछपी खेळत रोज. बनारस,पोटात धर्मदाय शिधा ,झोपायला घाट, आस एकच क्रांतिगुरु भेटावा.

कथालेख

सैराट आन सैराटच

अभ्या..'s picture
अभ्या.. in जनातलं, मनातलं
5 May 2016 - 3:37 pm

रात्रीचा १२ चा शो आणि भागवतटॉकीज ची फरशीबी दिसणार नाही एवढी गर्दी, पार्कींगचे पाचही थेटरचे लॉट फुल्ल भरलेले. हाउसफुल्लच्या काउंटरवरची हुज्जत. सगळी गर्दी १८ ते ३० मधलीच. जणगणमनला उभारलेल्या पब्लिकने काळ्या स्क्रीनवर रंगीबेरंगी सैराट अक्षरांनाच दिलेल्या शिट्ट्या. त्या काळ्या स्क्रीनवरच्या पाट्यातल्या नागराज पोपटराव मंजुळे नावाला झालेला डब्बल जल्लोष. लका आपला माणूस. पाट्या पडतानाच मागे टेनिसबॉलची क्रिकेटमॅचची गावठी कॉमेन्ट्री सुरु झालेली. कॉमेन्ट्रीला सोता नागराज बसलेला गच्चीवरच्या पॅवेलिनला.

कथाप्रकटन

अधांतर

समीर१२३४५६'s picture
समीर१२३४५६ in जनातलं, मनातलं
5 May 2016 - 2:56 pm

सकाळची बाजारातील लगबग चालली होती.सर्वजण आपापल्‍या कामात मग्‍न होते. कृष्‍णाही इतर बायकांसोबत आपल्‍या कामाला लागला. आज सर्वजण दुस-या एका वाडीत जाणार होती, भिक्षा मागायला. कृष्‍णा आपला पदर सांभाळून उठतो,आणि लगबगीने आपल्‍या टोळक्‍याकडे पोहोचतो. सर्वजण मिळून नंतर दुस-या वाडीत भिक्षा मागायला जातात.

कथाविरंगुळा

सैराट : एक दाहक वास्तव.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे in जनातलं, मनातलं
5 May 2016 - 2:41 pm

सैराट चित्रपटाबद्दल खुप लिहिल्या गेलं, बोलल्या गेलं, वाट्सपवर हमरीतुमरीवर येईपर्यंत चर्चा झाल्या. मिपावरही चर्चा रंगली आहेच, ही माझी अजून एक भर.

कलाविचार

म्हैसुर - बंदिपुर व्याघ्र प्रकल्प - कुन्नुर

विनअता पुजारि's picture
विनअता पुजारि in भटकंती
5 May 2016 - 2:35 pm

मे महिन्यात म्हैसुर कुन्नुर आनि बन्दिपुर ला जान्याच थारवत आहे...क्रुपया महिति द्यवि.....

चला बनवुया मट्ण खिमा

गौतमी's picture
गौतमी in पाककृती
5 May 2016 - 2:29 pm

साहित्य :
१. मटण खिमा १/२ किलो
२. ४ मोठे कांदे बारीक चिरुन
३. २ मध्यम टॉमाटो बारीक चिरुन
४. आल-लसुण-मिरची-कोथिंबिर पेस्ट (आवडीप्रमाणे)
५. २ तमालपत्र
६. ५-६ मिरी दाणे
७. तेल
८. हळद
९. लाल तिखट
१०. गरम मसाला
११. मिट मसाला (मी सुहानाचा वापरला)
१२. मीठ
१३. बारीक चिरलेली कोथिंबिर

चला तर मग करुया सुरुवात.

एक संघ मैदानातला - भाग ५

शि बि आय's picture
शि बि आय in जनातलं, मनातलं
5 May 2016 - 1:08 pm

धाप्प....
योग्याच्या पाठीत अप्पांचा दणकट हात पडला.. " काय गो बायं ... सकाळ सकाळ कशाला बेंबाटतसं..." आप्पांचा दणकट हात पाठीत पडल्यावर योग्याची चोच बंद झाली.. एकदम स्पिचलेस.. "काही नाही.. काही नाही सहजच आपलं ... " म्हणत मान सोडवून घेतली. आप्पांना काय समजायचे ते समजले होतं बहुतेक.. पण त्यांनी ते दाखवले नाही. सगळ्यांना वाँर्मअपला पिटाळले.

समाजविरंगुळा

सैराट .... माझ्या नजरेतून...

अपरिचित मी's picture
अपरिचित मी in जनातलं, मनातलं
5 May 2016 - 12:06 pm

आयुष्यात पहिल्यांदा कुठल्या चित्रपटाची गाणी मी तो पहायच्या आधी एवढी ऐकली असतील.. असो.. याचे श्रेय प्रमोशनकारांना देण्यात येते...
खरं तर ती अती वापरलेली गावाकडची भाषा trailor मध्ये समजली.... आणि मी picture न बघण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केलं...
सोमवारी अचानक box office चे विक्रम मोडलेले idiot box ने दाखवले आणि मराठी बाणा जागवत म्हटलं वीकेंड ची वाट न पाहता बघूनच यावा.. मंगळवार शोधला...

चित्रपटप्रकटन