अधांतर

समीर१२३४५६'s picture
समीर१२३४५६ in जनातलं, मनातलं
5 May 2016 - 2:56 pm

सकाळची बाजारातील लगबग चालली होती.सर्वजण आपापल्‍या कामात मग्‍न होते. कृष्‍णाही इतर बायकांसोबत आपल्‍या कामाला लागला. आज सर्वजण दुस-या एका वाडीत जाणार होती, भिक्षा मागायला. कृष्‍णा आपला पदर सांभाळून उठतो,आणि लगबगीने आपल्‍या टोळक्‍याकडे पोहोचतो. सर्वजण मिळून नंतर दुस-या वाडीत भिक्षा मागायला जातात.
कृष्‍णा आपल्‍या गोड बोलण्‍याने त्‍या समाजात खूपच प्रिय होता, मात्र आपल्‍याला त्‍या समाजात यावे लागल्‍याचे दु:खही त्‍याच्‍या मनात सलत असायचे.कृष्‍णा सर्व लोकांच्‍या टिका सहन करुनही हे काम करत होता. संपूर्ण आयुष्‍य जणू त्‍याने या कामासाठी घालवायचे ठरविले होते. नियतीने त्‍याच्‍याशी एक गंभीर खेळ चालवला होता.
काही लोकांना कृष्‍णाचे खरे आयुष्‍य माहित होते,ब-याच मित्रांंनी त्‍याला त्‍या समाजात जाण्‍यापासून रोकण्‍याचा प्रयत्‍नही केला होता, परंतू अखेर नशिबात जे व्‍हायचे ते होईल असे समजून तो त्‍या समाजात फक्‍त पोट भरण्‍यासाठी व परिवारासाठी सामिल झालेला होता.
कृष्‍णा पवार नावातच एक प्रकारचे वादळ तयार व्‍हायचे. भरदार छाती, मजबूत दंड यामूळे तो गावात खूप प्रसिध्‍द होता. आपल्‍या मल्‍लकौशल्‍याने त्‍याने त्‍या गावात खूप नाव कमावले होते. वादळासारखे व्‍यक्तिमत्‍व आणि भरदार शरीरयष्‍टी यांवर गावातल्‍या बायका भाळत असत.
कृष्‍णाची बहिण अलका, नावाप्रमाणेच साधी,सरळ व सालस. कृष्‍णा तर तिच्‍यावर आपला जीव ओवाळून टाकायचा. परंतू नियतीच्‍या मनात मात्र एक वेगळाच डाव ठरलेला होता.
क्रमश:

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

मराठी कथालेखक's picture

5 May 2016 - 7:17 pm | मराठी कथालेखक

चांगलं दिसतयं...

चांदणे संदीप's picture

5 May 2016 - 7:37 pm | चांदणे संदीप

चांगल दिसतंय खरच...पण तुम्हाला पाहिलं की खंड्याची आठवण येते. बरेच गमतीशीर प्रतिसाद माझ्यासहित अनेकांनी दिलेत त्या त्या धाग्यांवर! त्या संकलीत केल्या तर जाम मजा येईल. करतोच!

अवांतराबद्दल एक डाव माफी... ह्या प्रतीसांदाबद्दल तुमच काय म्हणन आहे हे जाणुन घ्यायला आवडेल, कारण तुमचे उत्तर कधीच पाहण्यात आले नाही कसल्याच प्रतिसादांवर...

लोल प्रतिसाद नंबर
लोल प्रतिसाद नंबर
लोल प्रतिसाद नंबर
लोल प्रतिसाद नंबर
लोल प्रतिसाद नंबर
लोल प्रतिसाद नंबर
जस्ट किडिंग!! ;)

रच्याकने या लेखाचा पुढचा भाग येऊद्या...वाचतोय!

Sandy

वैभव जाधव's picture

5 May 2016 - 7:43 pm | वैभव जाधव

हा हलकटपणा आहे सांदणे!

चांदणे संदीप's picture

5 May 2016 - 7:47 pm | चांदणे संदीप

खंड्याचा किलर लूक पाहिला असता म्हणजे थंड झाला असता...मी काय म्हण्तो....पाहूनच या एकदा!
=))

Sandy

वैभव जाधव's picture

5 May 2016 - 7:53 pm | वैभव जाधव

नोकरी घालवता का भा'वा'नो...

त्यालाच हलकट पणा म्हणालो ना
-विश्वास सरपोतदार, पाषाण रोड

शित्रेउमेश's picture

17 May 2016 - 12:40 pm | शित्रेउमेश

मस्त सुरुवात.......