"इंटरेस्ट"

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जनातलं, मनातलं
6 Jun 2016 - 8:23 am

उद्योजक असताना ब्यांके कडूनं कर्ज घेतले..नियमाप्रमाणी क्वारट्रली "ईंटरेस्ट" चा हप्ता खात्यात डेबिट पडला.
यावर गमतीने समोरच्या ऑफिसरला म्हणालो.."इंटरेस्ट" कमी करा राव परवडत नाही..
यावर तो हसून म्हणाला ब्यांक म्हणजे सावकार व सावकार व्याज कधीच सोडत नाही भले एक दिवसाचे का असेना..
या वर त्याने एक गोष्ट सांगितली..
नाईक म्हणून पुण्यात प्रख्यात सावकार होते..सोन्याचे जानवे घालायचे ते ....गडगंज आसामी व पेंढी होती..
पेशव्यांना पण वेळ प्रसंगी ते कर्जाऊ रकमा देत असत..
एकदा अचानक पेशव्यांना पैशाची गरज लागली... खंडणी वसुलीसाठी स्वार शत्रू पक्षाकडे गेले होते.

इतिहास

पुरुषी अहंकार.

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जनातलं, मनातलं
5 Jun 2016 - 9:01 pm

जास्त तोंड वाजवू नकोस अन अक्कल शिकवू नकोस ...गृहिणी आहेस घर व पोर सांभाळ नीटं अन भाक-या भाज...बिनडोक ..मला शिकवतेय......
श्रीमंत यशस्वी बिझनेस मन नवरा चिडून बोलला..
.
मिळालेली "मास्टर डिग्री..ति बक्षिसे कॉलेज मधली..अन त्याच्या प्रेम व हट्टापायी सोडलेली नोकरी तिच्या डोळ्या समोरून तरळून गेली..
व डोळ्यात पाणी तरारले...

जीवनमान

सुबह का भूला शाम को घर लौट आए तो...-कैथरीन हेपबर्न

महामाया's picture
महामाया in जनातलं, मनातलं
5 Jun 2016 - 8:28 pm

गेल्या शतकांत बॉलीवुड प्रमाणेच हॉलीवुड मधे देखील अविस्मरणीय चित्रपट आले. पैकी काही चित्रपट बघतांना वाटलं की आपण हिंदी चित्रपट इंग्रजीत बघतेय की काय...अंतर होता तो सादरीकरणाचा. इथे अशाच काही इंग्रजी चित्रपटांमधील तो अविस्मरणीय प्रसंग, जो त्या इंग्रजी चित्रपटाला आपल्या बाॅलीवुडच्या चित्रपटाहून वेगळा ठरवतो...

अविस्मरणीय हाॅलीवुड/ चार

‘वूमन ऑफ दि इयर...’

चित्रपटआस्वाद

मामाडे लेनेस वलुरकेस

प्रचेतस's picture
प्रचेतस in जनातलं, मनातलं
5 Jun 2016 - 7:18 pm

भूतकाळ - (सुमारे २१०० वर्षांपूर्वी. शकसंवताच्याही आधी सुमारे दिडशे ते दोनशे वर्षे )

मुक्तकविरंगुळा

एक संघ मैदानातला - भाग १३

शि बि आय's picture
शि बि आय in जनातलं, मनातलं
5 Jun 2016 - 5:41 pm

आम्ही सगळ्याजणी दादा कधी परत येतायत आणि काय सांगतायत ह्याची वाट बघत होतो. आमचं आवरून झालं होत.मेस मध्ये जाऊन जेवण आणि मग रूमवर धतिंग हा अघोषित कार्यक्रम होता. ह्यावेळी 'चद्दर प्रोग्राम'चा बकरा कोण ह्याचा मी आणि योग्या विचार करत होतो. आमच्या डोळ्यांनी चाललेल्या खाणाखुणा दीदीने पहिल्या आणि डोळे वटारले. आम्हीही निर्लज्जासारखं स्माईल दिलं आणि बकरा शोध मोहिमेवर लक्ष केंद्रित केलं. तेवढ्यात डुलत-डुलत दादा आले. "दादा... कशाला आले होते ते ? काय म्हणाले ?" आम्ही दादांवर आँलमोस्ट झडप घातली.

समाजविरंगुळा

आयड्याबाज

आनंद कांबीकर's picture
आनंद कांबीकर in जनातलं, मनातलं
5 Jun 2016 - 4:37 pm

गांव जन्मल्यापासून म्हणा किंवा मग देशात आमदार-खासदार निवाडायची प्रथा चालु झाल्यापासून म्हणा, पहिल्यांदाच या गावाला कुणी आमदार भेट द्यायला येणार होता. मागचे इलेक्शन झाल्यापासुन जवळपास पाच वर्षात या गावाची लोकसंख्या दोनावरून चारावर गेली. बहुदा त्याचेच गणित बांधुन ही भेट योजिलेली असावी.

कथाविनोदराजकारण

गाढवा समोर वाचली गीता - गोंधळ घालणारा गाढव ?

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जनातलं, मनातलं
5 Jun 2016 - 4:25 pm

गाढवा समोर वाचली गीता,
कालचा गोंधळ बरा होता.

समाजआस्वाद

भुजणं/भुजणे

उल्का's picture
उल्का in पाककृती
5 Jun 2016 - 3:53 pm

ही रेसिपी एका मिपा मैत्रिणीला हवी होती. मग इथेच दिली म्हणजे इतरांना पण उपयोग होईल.

भुजणं अनेक प्रकारे बनवतात. ते जाडसर असतं. मुख्य घटक कांदा, आलं, लसूण, ओले खोबरे, कोथिंबीर आणि ओल्या हिरव्या मिरच्या हे हवेतच. मी ज्या प्रकारे बनवते ती कृती इथे देते आहे. मी फक्त बोंबलाचे भुजणे बनवते. परंतु बटाटा, वांगे, पापलेट, कोलंबी ह्याचे पण बनवता येते.

तर बोंबलाचं भुजणं अशा प्रकारे...

मार्कर

ए ए वाघमारे's picture
ए ए वाघमारे in जे न देखे रवी...
4 Jun 2016 - 10:48 pm

(कविता करण्याची सुरसुरी प्रत्येकालाच कधी ना कधी कधी येते.मग आम्हीही त्याला अपवाद कसे? अशीच एक तुरळक कविता)

मार्कर
एकूण एक केस
उपटलाय बघ
छातीवरचा
घे, हे नाव
कोर आता
पण
जरा थांब
वापरू नकोस
तो परमनंट मार्कर
नाहीतर,
याच नावाची दुसरी
शोधावी लागेल मला
हिनेही
नाही म्हटलं तर

(पूर्वप्रकाशन:http://aawaghmare.blogspot.com)

कविता