"इंटरेस्ट"

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जनातलं, मनातलं
6 Jun 2016 - 8:23 am

उद्योजक असताना ब्यांके कडूनं कर्ज घेतले..नियमाप्रमाणी क्वारट्रली "ईंटरेस्ट" चा हप्ता खात्यात डेबिट पडला.
यावर गमतीने समोरच्या ऑफिसरला म्हणालो.."इंटरेस्ट" कमी करा राव परवडत नाही..
यावर तो हसून म्हणाला ब्यांक म्हणजे सावकार व सावकार व्याज कधीच सोडत नाही भले एक दिवसाचे का असेना..
या वर त्याने एक गोष्ट सांगितली..
नाईक म्हणून पुण्यात प्रख्यात सावकार होते..सोन्याचे जानवे घालायचे ते ....गडगंज आसामी व पेंढी होती..
पेशव्यांना पण वेळ प्रसंगी ते कर्जाऊ रकमा देत असत..
एकदा अचानक पेशव्यांना पैशाची गरज लागली... खंडणी वसुलीसाठी स्वार शत्रू पक्षाकडे गेले होते.
पण त्यांच्या कडूनं काही खबर आली नव्हती..
सैन्याच्या पगाराचा दिवस जवळ येत चालला होता.व अधिकारी वर्ग चिंतेत होता...
पगाराचा दिवस आला व सकाळी कारभारी वर्ग पेशव्या कडे गेले व नाईका कडूनं पगाराची रक्कम कर्जाऊ घेण्याचे ठरले...नाईकांना निरोप गेला
व त्या प्रमाणे नाईक रक्कम कागद पत्रे घेऊन दरबारात आले..
पेशवे दस्त ऐवजावर सह्या करणार इतक्यात दूत दरबारात आला व स्वार स्वारगेट जवळ खंडणीची रक्कम घेऊन पोहोचले आहेत व कोणत्याही क्षणी शनवार वाड्यावर येतील अशी खबर पेशव्यांना दिली...
पेशव्यांचा जीव भांड्यात पडला व सोय झाली त्या मुळे त्यांनी नाईकांचे आभार मानले व कर्जाऊ रक्कम नको म्हणून सांगितले..
यावर नाईक म्हणाले "हरकत नाही श्रीमंत पण तिजोरीच्या बाहेर काढलेली रक्कम व्याजा सकटच तिजोरीत जाते असा आमचा नियम आहे त्या मुळे किमान १ दिवसाचे तरी व्याज द्यावेच लागेल...
यावर घासाघीस व तंटा झाला पण शेवटी नाईकांनी एका दिवसाचे व्याज वसूल केले अन मगच शनिवार वाडा सोडला.

इतिहास

प्रतिक्रिया

अभ्या..'s picture

6 Jun 2016 - 8:26 am | अभ्या..

या आधी झालेय हे अकुकाका.
परत परत तेच झाड?

चांदणे संदीप's picture

6 Jun 2016 - 7:45 pm | चांदणे संदीप

परत परत तेच झाड?

=)) =)) =)) =))
=)) =)) =)) =))

अविनाशकुलकर्णी's picture

6 Jun 2016 - 8:50 am | अविनाशकुलकर्णी

माफ करा..ध्यानात राहिले नाहि...क्षमा असावी

अविनाशकुलकर्णी's picture

6 Jun 2016 - 8:51 am | अविनाशकुलकर्णी

डिलिट कसे करायचे माहित नाहि...अन्यथा केले असते............अडमीन ने करावे

हेमंत लाटकर's picture

6 Jun 2016 - 7:17 pm | हेमंत लाटकर

पेशवे होते म्हणून चालले, मोगल, इंग्रज असते तर सावकराला १०० फटके मारले असते.

रमेश आठवले's picture

6 Jun 2016 - 8:09 pm | रमेश आठवले

पेशव्याना या बारामतीकर सावकारा कडून नेहमीच कर्ज घ्यावे लागायचे. त्याना फटके मारून कसे चालले असते ?

गॅरी ट्रुमन's picture

7 Jun 2016 - 1:38 pm | गॅरी ट्रुमन

पेशव्याना या बारामतीकर सावकारा कडून नेहमीच कर्ज घ्यावे लागायचे.

अच्छा म्हणजे बारामतीकर त्यावेळेपासून इतके पैसेवाले आहेत तर!!

रमेश आठवले's picture

7 Jun 2016 - 9:14 pm | रमेश आठवले

बारामतीकरांनी सध्याच्या पेशव्याना सुरवातीला शिवसेनेला बाटलीत उतरवण्यासाठी मदत केली होती आणि ते त्यांची बूज आजही राखतात.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

7 Jun 2016 - 1:35 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

छान किस्सा रे अवी.
पेशव्यांच्या जागी दुसरा कुणी असता तर नाईकांचे सोन्याचे जानवे घेऊन त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला असता!

सिरुसेरि's picture

7 Jun 2016 - 2:13 pm | सिरुसेरि

हे नाईक सावकार म्हणजे "खुन्या मुरलीधर"वाले असावेत .

इरसाल's picture

7 Jun 2016 - 2:25 pm | इरसाल

हेला काका आणी माईसाहेब आत्या म्हणजेच जामोप्या का?