रांजण खळगी

अभिजीत अवलिया's picture
अभिजीत अवलिया in भटकंती
17 Jul 2016 - 7:22 am

पुण्यापासून अंदाजे 80 किमी वर आहे अहमदनगर जिल्हयातील टाकळी हाजी व निघोज हे गाव. आणी ह्या दोन गावांच्या दरम्यान आहेत आशिया खंडातील सर्वात मोठी नैसर्गिक रित्या तयार झालेली खळगी (रांजण खळगी) ज्याची नोंद ग्रिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झालेली आहेत. बरीच वर्ष जाऊ जाऊ करत होतो पण इथे जाणे काही होत न्हवते. शेवटी मे महिन्यात अचानक एके दिवशी गेलो बघायला.

॥सांगा तुकारामा : अभंग-२॥

गंगाधर मुटे's picture
गंगाधर मुटे in जे न देखे रवी...
16 Jul 2016 - 7:57 pm

॥सांगा तुकारामा : अभंग-२॥

तुझ्या विठ्ठलाचा । कैसा दुजाभाव ।
चारीमुंड्या गाव । चीत केले ॥१॥

रानातलं पाणी । उद्योगानं नेलं ।
उभं पीक मेलं । पाण्याविना ॥२॥

धरणाचा साठा । शॉवरात गेला ।
तिथं श्वान न्हाला । शैम्पुसवे ॥३॥

इथं पाण्यासाठी । शोधती टँकरं ।
धावुनी लेकरं । दुडुदुडू ॥४॥

तिथे शौचासाठी । फिल्टरले जळ ।
माळ्यावरी नळ । चुलीपाशी ॥५॥

इथे पिण्यासाठी । क्षारयुक्त पाणी ।
गढुळाचे धनी । गावकरी ॥६॥

लक्ष अब्जावधी । करोडोचा निधी ।
वाढवी उपाधी । शहरांची ॥७॥

अभंगअभय-काव्यवाङ्मयशेतीकविता

काही क्षणिका - स्त्री

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जे न देखे रवी...
16 Jul 2016 - 4:47 pm

(१)

वस्त्रांत देह स्त्रीचा
पुरुषांनी गुंडाळला.
भोगदासी झाली स्त्री
त्या क्षणापासूनच.

(२)

पद्मिनीने म्हणे
चितेत उडी घेतली.
आगीत वासनेच्या
नाही ती जाळली.

(३)

देह वासनेचा
अग्नीत हा जाळला
उरले फक्त आता
अमर प्रेम तराणे.

मुक्त कविताचारोळ्या

लिंब, धोम, भोगावमधील काही क्षण

प्रचेतस's picture
प्रचेतस in भटकंती
16 Jul 2016 - 12:43 pm

मध्यंतरी भुईंजनजीकच्या किकलीगावात तिथले अप्रतिम कोरीवकाम असलेले भैरवनाथाचे मंदिर आणि शेदीडशे वीरगळ पाहिलेले होते. त्याच दिवशी नंतर शेरी लिंब येथील बारा मोटेची विहिर आणि धोम-भोगावची पण सफर झाली होती त्याची ही चित्रमय झलक.

वाटेवरच्या लिंब गोवे गावातील दुर्लक्षित वीरगळ
a

लिंबची विहिर पहिल्या शाहूमहाराजांच्या पत्नी वीरूबाई ह्यांनी बांधवून काढली. ह्या विहिरीचे पाणी आजही वापरात आहे.

जन का म्हणतिल, 'हाय हाय !'????

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जे न देखे रवी...
16 Jul 2016 - 9:29 am

जन का म्हणतिल, 'हाय हाय !'????
केलेच नाही तर राहिल कार्य काय ?
.
पोस्टा तळपतिल, फोटु झळकतिल;
फेसबुके अपुला क्रम आचरतिल,
असेच वाद संवाद पुढे चालतिल,
नसशी तु फरक पडेल का?
.
वाद वर्षतिल, डोके पिकतिल,
गेट टुगेदर हे जोरात चालतिल
कुणा काळजी की न तळतिल,
पुन्हा जिलब्यांचे हे घाणे?
.
सखेसोयरे डोळे पुसतिल,
पुन्हा लेख कविता लिहितिल
उठतिल, बसतिल, हसुनि खिदळतिल
तु सोडले फेसबुक त्यांचे काय जाय ?
.
अभासी जगास्तव काय कुढावे !
मोहिं लाईक्स च्या का गुंतावे ?

मुक्तक

अक्का महादेवी, कर्नाटकाची संत मीरा ?

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
16 Jul 2016 - 1:06 am

ज्यांची मने अध्यात्म अथवा स्त्रीमुक्ती पैकी कशानेही दुखावतात अशांनी पुढे वाचले नाही तरीही चालेल.

*** (मर्त्य मानवी नवरे तुझ्या चुलीत घाल !) ***
Like treasure hid in the ground,
like flavour in the fruit,
like gold in the rock and oil in the seed,
the Absolute is hidden in the heart.

I love the Handsome One:
he has no death
decay or form
no place or side
no end nor birthmarks.
I love him O mother. Listen.

संस्कृतीधर्मइतिहासकविता

॥सांगा तुकारामा : अभंग-१॥

गंगाधर मुटे's picture
गंगाधर मुटे in जे न देखे रवी...
15 Jul 2016 - 10:50 pm

॥सांगा तुकारामा : अभंग-१॥

ठेविले अनंते । तैसे कैसे राहू ।
तूच सांग पाहू । तुकोराया ॥१॥

इथे मंबाजीचे । सत्तांध वारस ।
माझे गळी फास । टाकताहे ॥२॥

आयातुनी माल । शत्रू देशातला ।
माझ्या सृजनाला । बुडविती  ॥३॥

माझ्या निर्यातीची । वाट अडविती ।
जागोजागी भिंती । उभारुनी ॥४॥

गोऱ्यांची जनुके? । गोऱ्यांचेच रक्त? ।
त्वचा काळी फक्त? । इंडियाची? ॥५॥

लबाडीला चांदी । ऐद्यांना अभय ।
आणि हयगय । श्रमिकांची ॥६॥

                        - गंगाधर मुटे "अभय"
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
१५/०७/२०१६

अभंगअभय-काव्यवाङ्मयशेतीकविता

रमन राघव २.०

अनिरुद्ध प्रभू's picture
अनिरुद्ध प्रभू in जनातलं, मनातलं
15 Jul 2016 - 4:35 pm

सामान्यतः समाजात चांगली आणि वाईट अशा दोन प्रव्रुत्तीची माणसं असतात असं मानतात. दोन्ही प्रव्रुत्तींचे रंग ही ठरलेले.....चांगल्यासाठी सफेद तर वाईटासाठी काळा. एवढ साध सरळ सोप असुनही आपण वर्गिकरण करण्यात चुकतो... बर्‍याच वेळा समोर असणारी व्रुत्ती ही फक्त चांगली वा वाईट एवढ्याच फरकात बसवता येत नाही किंबहुना ते ओळखणही खूप कठीण असतं. चांगला आणि वाईट, सफेद आणि काळा हे दोन्ही रंग जिथे एकमेकांना भिडतात तिथे अजुन एक छटा निर्माण होते....करडी(ग्रे शेड). कदाचित समोर दिसणारं करड्या छटेतलंही असु शकेल. काही प्रव्रुत्त्या, काही माणसं या ही छटेतली असतात...असु शकतात.

चित्रपटसमीक्षा