एक ओपन व्यथा ८

वटवट's picture
वटवट in जनातलं, मनातलं
6 Aug 2016 - 1:53 pm

एक ओपन व्यथा १ - http://www.misalpav.com/node/36054

एक ओपन व्यथा २ - http://www.misalpav.com/node/36086

एक ओपन व्यथा ३ - http://www.misalpav.com/node/36148

एक ओपन व्यथा ४ - http://www.misalpav.com/node/36475

एक ओपन व्यथा ५ - http://www.misalpav.com/node/36610

कथा

एक आगळीवेगळी मुलाकात - डास राणी सोबत

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जनातलं, मनातलं
6 Aug 2016 - 11:52 am

दिनांक ५.८.२०१६ रात्रीचे दहा वाजले होते. रियो ऑलम्पिकचा उद्घाटन समारोह उद्या सकाळी चार वाजता आहे, म्हंटले जरा लवकर झोपावे. पण माझ्या मनात एक तर नियतीच्या मनात काही वेगळेच असते. अचानक वीज गेली. आमचे इमानदार सत्यवादी मुख्यमंत्री म्हणतात दिल्लीत विजेची कमतरता नाही. पण जो पर्यंत नमो प्रधानमंत्री आहे, दिल्लीची जनता चैनीत झोपू हि शकणार नाही. नमोच्या इशार्यावर BSESवाले अशी बदमाशी करतात. आपल्या इमानदार माणसाच्या म्हणण्यावर विश्वास ठेवलाच पाहिचे.

कथाआस्वाद

जिगसॉ पझल्स

avyakta's picture
avyakta in जनातलं, मनातलं
6 Aug 2016 - 5:00 am

नमस्कार,

मिपावर लेखनाचा हा माझा पहिलाच प्रयत्न!!
जरा वेगळा विषय असावा असं वाटलं म्हणून हा जिगसॉ पझल्सचा विषय निवडला आहे, तो कसा वाटला ते नक्की सांगा.

मी माझ्या मुलीला ती ७-८ वर्षांची असल्यापासून जिगसॉ पझल्स पूर्ण करायची सवय लावली आहे. आता ती १४ वर्षांची आहे, आत्तापर्यंत आम्ही ५०० पिसेस ची ४, ७५० पिसेस ची २ व १००० पिसेसचे एक पझल पूर्ण केली आहेत.

जिगसॉ पझल्सपासून काय शिकता येईल हे दर्शविणारे स्फुट..अर्थात मूळ इंग्रजीतून..

Here is what I found written by Jacquie Sewell that sums up our thinking about jigsaw puzzles,

कलाविरंगुळा

माझ्या आंतर जालीय इ-नामकरण विधीचे इमंत्रण

लीना कनाटा's picture
लीना कनाटा in जनातलं, मनातलं
6 Aug 2016 - 3:25 am

नमस्कार,

आमच्या येथे श्री मिपा क्रुपेने..........

बरेच वर्ष मिपावर वाचन मात्र राहिल्यानंतर हळूहळू अंगात लेखकूचा संचार व्हायला लागला आणि मिपाचे सदस्यत्व घेण्याचा निर्णय घेतला. हे म्हणजे काठावर बसून पाण्यात मौजमजा व दंगामस्ती करणाऱ्यांकडे बघून शेवटी भोपळा बांधून पाण्यात उडी घेण्यासारखेच होते. विचार केला, थोडे हात पाय मारून ...... आपलं. ...... कळफलक बडवून तर बघू जमतंय का. आणि काही मदत लागलीच तर तुमच्या सारखे सुहृद मिपाकर आहेतच मदतीला, तरंगायला नक्कीच मदत करतील, किमान बुडू तर देणार नाहीत.

मग निर्णय पक्का झाला.

साहित्यिकप्रकटन

बेधुंद (भाग - १४ )

अविनाश लोंढे.'s picture
अविनाश लोंढे. in जनातलं, मनातलं
6 Aug 2016 - 3:19 am

(बऱ्याच दिवसानंतर ... ! मलाच माहित नाही की हा भाग टाकायला एवढा उशीर का लागला ? )
धन्यवाद - एखादे पुस्तक वाचतोय/ वाचतेय असे वाटतेय अशा संदेशाबद्दल !
तरीही ' मिपा ' वर असल्याने ह्या भागाच्या आधुनिक शॉर्ट 'हिंग्लिश' ने होणाऱ्या शेवटामुळे ( अती ) शहाण्यांच्या प्रतिकियासाठी शुभेच्छा ! )
.............

कथाविरंगुळा

क्षण...

राघव's picture
राघव in जे न देखे रवी...
5 Aug 2016 - 11:09 pm

क्षण कोवळ्या उन्हाचा लेवून नीळकंठी..
अवकाश व्यापणारी दृष्टी कुठून येते?

जन्मांत गांठ जुळण्या क्षणमात्रही पुरेसा..
मग रुक्ष भावनांची गर्दी कुठून येते?

स्वप्नांस जागवी जो.. क्षण तोच अंतरंगी
निमिषात सर्वव्यापी ऊर्मी कुठून येते?

अवशेष संस्कृतीचे दिसतात जागजागी..
क्षणात शेवटाची प्रगती कुठून येते?

--
एका क्षणात सारे लाघव्य संपलेले..
शब्दांस धार माझ्या इतकी कुठून येते?

राघव

कविता

माझ्या मनाचे कपाट....

फुंटी's picture
फुंटी in जे न देखे रवी...
5 Aug 2016 - 10:35 pm

माझ्या मनाच्या कपाटात टांगवले आहेत अनेक ह्यांगर्स...
भावना टांगवून ठेवल्यात मी त्यावर..
ते बघ गुलाबी रंगाच बायकोवरच प्रेम,
हल्ली सणासुदीलाच काढतो मी बाहेर..
तो पहा माझा रागाचा ब्लेझर ..
त्याच्या आतमध्ये लटकलेला अहंकाराचा शर्ट नि नेकटाय ..
सहज कळू देत नाही मी कुणाला मी सुद्धा वापरतो ब्लेझर...
समोरची माणस बघून ...
तो द्वेषाचा घामट ,कुबट सदरा..
सभ्यपणाच सेंट मारून वापरावा लागतो .
ते वेगवेगळ्या रंगाचे २ ह्यांगर्स दिसताहेत आहेत ना? .
खरे तर त्यावर आहेत कामभावनेची अंतर्वस्त्रे ...

मुक्तक

खादाडरावांची झाली फजिती

विप्लव's picture
विप्लव in जे न देखे रवी...
5 Aug 2016 - 7:12 pm

एक होता छबु
भलताच ढबू

बुद्धिचा जड
पण करी बडबड

एकदा झाली गम्मत
बसली होती पंगत

जेवायला होते लाडू
छबु किती वाढू

लाडू खाल्ले अठ्ठावीस
जीव झाला कासाविस

पोट आले फुगून
मग गेला भिऊन

पोट लागले दुखायला
तसा लागला लोळायला

रडला ओरडला तरी किती
खादाडरावांची झाली फजिती
-- संग्रहित

बालसाहित्यबालगीत

शेंगोळ्याचे लाडू

विप्लव's picture
विप्लव in पाककृती
5 Aug 2016 - 4:48 pm

नमस्कार
मी मिपावर नवखि आहे. कृपया काही चुक झाली तर सांभाळून घ्यावे.
शेंगोळ्याचे लाडू हा माझा जिव की प्राण आहे. मी कोल्हापूरची आहे.हा प्रकार फक्त कोल्हापूर, सांगली जिल्हातील फक्त जैन लोकच बनवतात. मी हॉस्टेलला असताना माझी आई हे लाडू करुन द्याची. पोरी अक्षरशः तुटून पडायच्या डब्ब्यावर आणि फडशा पाडायच्या माझ्या हाती एकादा लाडू लागायचा. दिवाळीला फक्त हाच लाडु बनतो आमच्या घरी. आता बाप्पांचे आगमन होणार आहे. नवनविन खाद्य पदार्थ आणि प्रसादांची रेलचेल असेल. म्हणुन आपणही एक नविन पदार्थ सर्वाना सांगावा असे मला वाटले.