घाटवाटांची सायकल राईड - v2.0 - कुंभार्ली घाट (भाग १)

मोदक's picture
मोदक in भटकंती
21 Aug 2016 - 10:02 pm

घाटवाटांची पहिली सायकल राईड मी वरंध्यात अर्धी सोडली असली तरी तशी बर्‍याच प्रमाणात यशस्वी झाली होती. त्यावेळी अनेकांनी सुचवल्या प्रमाणे आणि आमच्या एक एक घाट सर करत जाण्याच्या नियोजना प्रमाणे पुढील घाटवाटांची ट्रीप काढण्याचे ठरले. १५ ऑगस्टची जोडून सुट्टी आणि पावसाळा यांमुळे फारसा वेळ न जाता प्लॅन ठरला.

दूधसागर - एक अविस्मरणीय अनुभव!

समीरसूर's picture
समीरसूर in भटकंती
21 Aug 2016 - 9:33 pm

जून 2016 च्या एका दुपारची चारच्या आसपासची कंटाळवाणी वेळ. रणरणतं ऊन. डोळे घड्याळावर. कधी एकदाचे संध्याकाळचे सहा वाजतात आणि कधी एकदाची "ऑफीस सुटले, मन मोहरले, चकाट्या पिटाया, मोकळे जाहले" अशी परमानंदाची अवस्था येते असे झालेले. मी आणि माझा उत्साही मित्र नितीन चहा प्यायला गेलो. हे ही एक कर्मकांड! एरवी बाहेरच्या टपरीवर निवांत चहा प्यायला काय मजा येते! पण ऑफीसात चहा पिणेदेखील काम करण्याइतकेच शुद्ध कर्तव्यभावनेतून जन्मलेले एक कर्म असते. आम्ही चहाचे प्याले घेऊन कुठेतरी बूड टेकवतो. आमच्या अजून एका उत्साही मित्राचा, सारंगचा, फोन येतो. त्याचे बोलणे ऐकून आमचे डोळे चमकतात.

बादलीयुद्ध १०

जव्हेरगंज's picture
जव्हेरगंज in जनातलं, मनातलं
21 Aug 2016 - 3:09 pm

काळवंडून गेलेल्या आभाळात नुसत्याच विजा चमकत असतील तर ते एक मनोहरी दृष्य असते. आता पाऊस येणार. लगेच पडणार. मात्र तसं काही होत नाही. आभाळात पाऊस दबून बसतो. भक्ष्याच्या प्रतिक्षेत. विजा कडाडतात. भर संध्याकाळी अंधारुन येतं. वारासुद्धा पिसाळलेल्या डुकरासारखा सैरभैर.
टेकडीपासून डाव्या बाजूला, उतारावर वाळलेल्या वाहत्या गवतात वसलाय एक वाडा. जीर्ण. युगे लोटली. पण वाडा चिरेबंदी. त्याला वाडा म्हणावं किल्ला हा ही एक प्रश्न आहे. उसवलेल्या छतातला एक पत्रा वाऱ्यावर डुलतो आहे. त्याचा भयानक चिरका आवाज आसमंतात घुमतो आहे. मी झपाझप पाऊले टाकत वाड्यावर जातो आहे.

कथा

जेवण

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जे न देखे रवी...
21 Aug 2016 - 7:18 am

संध्याकाळी घरी आल्यानंतर हातपाय धुतल्यावर नेहमीप्रमाणे विचारू नकोस
की जेवण तयार आहे का..
आज मी जेवण तयार केलं नाही..
आज मूड नाही रे...
महाबळेश्वर हून आपण आणलेल्या सा~या स्ट्रा बेरी मी टेबलवरच्या ग्लास बाऊल मध्ये ठेवल्या आहेत..
त्या मूठभर मी तोंडात घेणार आहे..
अन तू तुझ्या ओठांनी त्याचा सारा रस चोखून घ्यायचा आहे..
होय मला माहीत आहे ओठातून सारा रस वक्षावर
अन ओटी पोटावर ओघळतोय,
पण तो तू ओठांनी हळुवार पणें टिपून घ्यायचा आहेस..
ह्या बेधुंद संध्याकाळी. आज, थोडं वेड्या सारखं वागायचं आहे..

कविता

कावळे

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जनातलं, मनातलं
21 Aug 2016 - 7:08 am

स्वताचा मुलगा अमेरिकेत वेल सेटल्ड असताना...शेजाराच्याना "राहुल ला लागली का नोकरी? नाहि बरेच दिवस घरीच दिसतो म्हणुन विचारले.....
.
स्वताची मुलगी सुस्थळी पडल्यावर.." यमी च जमतय की नाहि? बघा हो..वय उलटुन गेले कि अवघड होते...
.
स्वताच्या मांडीवर नातवंड खेळवत बाजुच्या जोशी काका च्या सुनेला काहि कोम्पिकेशन्स आहेत हे माहित असताना..."काय रामभाऊ? पेेढे कधी देणार..३ वर्ष झालीत तुमच्या राहुल च्या लग्नाला...........
.

समाज

YZ (परिक्षण दुरुस्ती)

तर्राट जोकर's picture
तर्राट जोकर in जनातलं, मनातलं
21 Aug 2016 - 1:09 am

(समीर_happy go lucky हे मिपावर नेहमी चित्रपट परिक्षण लिहित असतात. दर्जाच्या बाबतीत थोडंफार हुकत असले तरी त्यांची चिकाटी व आवड पाहून मला फार छान वाटले. त्यांच्या नुकत्याच आलेल्या http://misalpav.com/node/37050 ह्या वायझेड मराठी चित्रपटाच्या परिक्षणामधे बरेच काही खटकले. एक उत्तम चित्रपट परिक्षक होण्याची योग्यता असलेल्या लेखकास केवळ हुर्यो उडवून पळवुन लावावे हे मला योग्य वाटले नाही. त्यापेक्षा त्यांच्या परिक्षणातल्या खटकलेल्या बाजू वगळून, शब्दरचना सुधारून तेच परिक्षण संपादित केले तर कसे वाटेल अशी कल्पना मनात आली.

चित्रपटप्रतिसादसमीक्षा

YZ (मराठी चित्रपट)

समीर_happy go lucky's picture
समीर_happy go lucky in जनातलं, मनातलं
20 Aug 2016 - 10:30 pm

YZ असे विचित्र टायटल का असा प्रश्न टायटल बघून रसिकांना पडू शकतो आणि ते योग्यही आहे कारण YZ हे दोन लेटर्स एका मराठी शिवीचा अपभ्रंश आहेत ज्याचा एक अर्थ साध्या शब्दांत होतो "बावळट". कल्पक लेखक क्षितिज पटवर्धन आणि दिग्दर्शक समीर विद्वांस यांचे हि जगावेगळी हिंमत दाखवल्याबद्दल अभिनंदन आणि नंतर या टायटलचे समर्पक एक्सप्लेनेशन कथेत दिल्याबद्दल कौतुक. कधी कधी जाणवणारी एक मानसिक सणक जेंव्हा "किक" या नावाने हिंदीत येते आणि आमचेच मराठी लोक उचलून धरतात तेंव्हा आम्ही मराठी जनांनी असा प्रयत्न करायला काय हरकत आहे? असाच काहीसा विचार या जोडीने केला असेल आणि जन्माला आला YZ.

चित्रपटसमीक्षा

एका चिमण्याची गोष्ट

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जनातलं, मनातलं
20 Aug 2016 - 10:25 pm

(काही दिवसांपूर्वी वादळी वार्यासह झालेल्या पाऊसात एक झाड जमिनीवर उन्मळून पडलेले दिसले. सहज निरखून पहिले, एक चिमणा हि जमिनीवर पडलेला दिसला. मनात विचार आला, कसे गेले असेल त्याचे आयुष्य ....

कथाआस्वाद