स्वताचा मुलगा अमेरिकेत वेल सेटल्ड असताना...शेजाराच्याना "राहुल ला लागली का नोकरी? नाहि बरेच दिवस घरीच दिसतो म्हणुन विचारले.....
.
स्वताची मुलगी सुस्थळी पडल्यावर.." यमी च जमतय की नाहि? बघा हो..वय उलटुन गेले कि अवघड होते...
.
स्वताच्या मांडीवर नातवंड खेळवत बाजुच्या जोशी काका च्या सुनेला काहि कोम्पिकेशन्स आहेत हे माहित असताना..."काय रामभाऊ? पेेढे कधी देणार..३ वर्ष झालीत तुमच्या राहुल च्या लग्नाला...........
.
अश्या चोचा मारणारे कावळे आपल्याला समाजात..नात्यात नेहमी पहायला मिळतात...चोचा मारण्या साठी हे कावळे जखमा शोधत असतात..दिसली जखम मार चोच..कर घायाळ....
संवेदना हीन लोक्स
प्रतिक्रिया
21 Aug 2016 - 11:07 am | विवेकपटाईत
प्रत्येकाचा मनात एक कावळा दडलेला असतोच. म्हणूनच श्राद्धात कावळ्याला प्रसन्न करावे लागते. शरीराच्या आत दडलेल्या कावळ्याच्या मुक्ती साठी.
21 Aug 2016 - 12:47 pm | अमितदादा
+१
21 Aug 2016 - 12:50 pm | अभ्या..
अलिकडचे काही टोचे पाहुन पटले.
.
मै भी कावळा ची टोपी घेतो बनवून आता.
21 Aug 2016 - 11:40 am | क्षमस्व
चांगलं लिहिलंय।।
21 Aug 2016 - 11:43 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
चांगलं लिहिलंय ! असे सर्व कावळे मोकल्या मैदानावर नेऊन ओल्या फोकाने फोड़ून काढले पाहिजेत.
-दिलीप बिरुटे
21 Aug 2016 - 12:47 pm | अमितदादा
नेमकं बोलताय...
21 Aug 2016 - 1:07 pm | पक चिक पक राजा बाबू
स्रियांमध्ये ही प्रवृत्ति खुप जास्त प्रमाणात असते
21 Aug 2016 - 1:40 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हो हो ! खूपच प्रमाण आहे त्यांचं, असं वाटतं.
-दिलीप बिरुटे
21 Aug 2016 - 9:07 pm | जयन्त बा शिम्पि
मला वाटतं कोणतीही विसंगती दिसली कि त्याबाबतीत चौकस रहाणे वा चौकशी करुन , आपले ज्ञान अद्ययावत ठेवणे हा मानवी स्वभाव असावा. रस्त्यात चालता चालता , समजा कुणी पाय घसरुन पडला, तर सहजपणे आपल्याला उत्सुकुता असते की जो कुणी पडला, त्याचा पाय घसरला कां ? कशावर ? केळ्याच्या सालीवर की तेलाच्या तवंगावर, की आणखी कशामुळे? कुणाचा धक्का लागला कां ? पडणारी व्यक्ती स्त्री कि पुरुष ? तरुण की व्रुध्द् ? मग पुढचा विचार , की त्या पडलेल्या व्यक्तीस मदत करावी की नको ? आपण करावी की आपणच कां करावी की इतरांवर सोपवुन आपण आपल्या मार्गाला लागावे ? तर असे चौकस रहाणे वेगळे आणि लेखात म्हटल्याप्रमाणे , मनात कुटील भाव ठेवुन चौकस रहाणे वेगळे. त्यात स्वभाव दोष हाच कळीचा मुद्दा आहे. आणि स्वभावाला औषध नाही असे म्हटले जाते, त्यानुसार , अशा प्रव्रुत्तीस , टीट फॉर टेट , नियमानुसार , सरळ झोडपुन काढावे.वाईट्पणा आला तरी चालेल.
22 Aug 2016 - 11:34 am | महासंग्राम
नेमका कशाबद्दल जिलबी पाडलीये ते समजत नाहीये, चेपुवर टाकायचे स्टेट्स इथे टाकल्यासारखे वाटते !!!
22 Aug 2016 - 11:56 am | नाखु
थेट मिपावरच !
इअकडे तिकडे नाही उगा का वळा! म्हणून कावळा !!!
काकयनी नाखु