कामगार....

राजेंद्र देवी's picture
राजेंद्र देवी in जे न देखे रवी...
12 Sep 2016 - 3:04 pm

कामगार....

सायंकाळी रोजगार सारा
गुत्त्यावर झोकुनी गेले
घंटानाद करीती पुजारी परी
देव अन दैव त्यांचे झोपुनी गेले

मिटले डोळे सरणावरी
घेणेकरी हात शेकून गेले
वाहत्या नदीत राखेबरोबर
कुंकू कुणाचे वाहून गेले

वसूल करावयाचे म्हणुनी उरले सुरले
तेराव्याचे जेवून गेले
माय उपाशी, पदराआड पोर,
ओठ त्याचे सुकून गेले

राजेंद्र देवी

मुक्त कविताकवितामुक्तक

‘धागे अरब जगाचे’: गुंतागुंतीच्या जगाची ओळख (पुस्तक परिचय)

आतिवास's picture
आतिवास in जनातलं, मनातलं
12 Sep 2016 - 1:19 pm

मी अफगाणिस्तानमध्ये असताना शिया-सुन्नी, वहाबी-सलाफी, इराण-सौदी अरेबिया ही द्वन्दवं जगात आहेत याचा जाणीव ठळक झाली होती. त्यानंतर इस्लाम आणि अरब जगाबद्दल कुतूहल वाढलं होतं. बरेच प्रश्नही पडत होते. अरब जगाबद्दल मला दोनच गोष्टी माहिती होत्या – इथलं तेल आणि इथला कडवा इस्लाम.

वाङ्मयआस्वादशिफारस

आंतरजालावरचा भेंडीपणा !!

इरसाल's picture
इरसाल in जनातलं, मनातलं
12 Sep 2016 - 12:19 pm

सर्वसाधारण कोणा एका मित्राने, ओळखीच्याने तो आधीच कार्यरत असलेल्या एखाद्या मराठी संस्थळाची माहिती दिली आणी आपणही त्यात सामील व्हावे अशी गळ घातली की "त्या" लाही वाटते की बघुया तरी की ही आभासी दुनिया आहे तरी कशी ?
हो नाही करता करता "तो" सगळे सोपस्कार पार पाडुन या लोंढ्यात एकदाचा सामील होतो. रंगीबेरंगी असणारी ही दुनिया त्याच्या मनाला, मनात येणार्‍या लेख्/कविता/विचारांना कधी एकदा जालावर ओसंडुन वाहु ह्याच्या कळा द्यायला सुरुवात करते.

संस्कृतीशुभेच्छा

मनात असावा सतत श्रावण....

राजेंद्र देवी's picture
राजेंद्र देवी in जे न देखे रवी...
12 Sep 2016 - 11:38 am

मनात असावा सतत श्रावण....

तुझे येणे जणू असते वादळ, ऐनभरातले
तुझे बोलणे जणू असते गीत, सुरातले
तुझी ओढ असते जणू पाणी, पुरातले
तुझे रुसणे असते जणू लटके, प्रेमज्वरातले

तुझे लाजणे उधळत असते रंग, गुलाबातले
तुझी आठवण येणे असते जणू ऊन, श्रावणातले
एवढेच असावे मनात असावा सतत श्रावण
जरी दीस असले ग्रीष्मातले.....

राजेंद्र देवी

कविता माझीभावकवितामुक्त कविताकवितामुक्तक

रहाटगाडगं.

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जे न देखे रवी...
12 Sep 2016 - 9:59 am

आज जरा निवांत वाटतय..
सीझन संपला म्हणूनंही, आणी पुढचा येणार.. म्हणूनंही.!

रहाटगाडगं म्हणतात ना हो या चक्राला?
बराच वेळ करकचूsssन फिरल्यावर मग ते शां...त होतं , पुन्हा फिरण्यासाठी...!?

हे टळणारं नाही, हे नीट माहित असूनंही स्विकारत नाही मनाला. हे ठिकच. पण हे असलच पाहिजे जीवनात.. प्रगती साधायला.
असं का वाटत नाही? ? ?

पॉझिटिव्ह एप्रोचवाले २०० मार्क देतील माझ्या या दुसय्रा भावनेला. ! पण पहिलीचं निराकरण त्यांनाही झटकन सुचायचं नाही, हे माहिती आहे मला!

कविता माझीमुक्त कविताकवितामुक्तकसमाजजीवनमान

गौराई...

राजेंद्र देवी's picture
राजेंद्र देवी in जे न देखे रवी...
12 Sep 2016 - 9:11 am

गौराई...

झाली तीच्या आगमनाची घाई
आता जोडीने येईल गौराई

दारी उमटतील पाउले कुंकवाची
सुख शांती अन समृद्धींची

सजतील लेऊन शालू भरजरी
असेल मध्ये गणराया मखरी

दोन दिसांची असेल माहेरवाशीण
पंचपक्वान्नाचे असेल जेवण

देता निरोप येईल डोळा पाणी
गौराई माझी लाडाची गं राणी

राजेंद्र देवी

कविता माझीभावकवितामुक्त कविताधर्मकवितामुक्तक

सफर ग्रीसची: भाग ४ - नाफ्प्लिओचे पुराणवस्तूसंग्रहालय आणि एपिडाउरोस

निशाचर's picture
निशाचर in भटकंती
12 Sep 2016 - 4:55 am

पुणेकरांचा मिपा च्या वर्धापन निमित्त शुभेच्छांचा वर्षाव

वाल्मिक's picture
वाल्मिक in जे न देखे रवी...
11 Sep 2016 - 6:10 pm

आत्ताच हाती आलेल्या माहित नुसार मिपाच्या 10 वर्षे झाल्यामुळे अनेक पुणेकरांनी आर्जवून अभिमानदं केले
ठराविक मासले खाली प्रमाणे

1)
आमचे दुकान 2-4 बंद असते तसेच मिपा पण दुपारी बंद असते ,ह्यामुळे बंधुभाव वाढतो ,वर्धापन दीना निमित्त पेढे आमचंच दुकानांतून घ्या - चितळे

2)
फक्त 10 ? आज माझे शब्द चालू असते तर 20 वर्धापन दिन केले असते ( माझे शब्द चे 10 आणि मी मराठी चे 10) - राजे

3) मिपावर 18+ विभाग सुरु करायचे तेवढे बघा - *&* बापट

4) आम्ही संपादक नाही बनु शकलो म्हणून 10 वर्षे झाली असून धागे मात्र कमी येत आहे - कोणत्या पण कॅम्पच्या सदस्याचे नाव

मौजमजा

विदर्भ- शेतकर्यांचे अच्छे दिन आले

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जनातलं, मनातलं
11 Sep 2016 - 11:04 am

सुखी आणि समृद्ध प्रदेश अशी विदर्भाची ओळख होती. पण गेल्या काही दशकांपासून, विदर्भ म्हणजे आत्महत्या करणार्या शेतकऱ्यांचा प्रदेश. रोजगार साठी वणवण हिंडणारी वैदर्भीय जनता. वारंवार पडणारे दुष्काळ आणि पाऊस पडला तरी शेतमालाला मिळणार कमी भाव. शेतीवर आधारित अन्य उद्योगांचा अभाव. बळीराजा आणि ग्रामीण जनते समोर एकच पर्याय उरला होता. शहरात जाऊन रोजगार शोधणे किंवा कर्जबाजारी होऊन आत्महत्या करणे. विदर्भातल्या गावांत दलित आणि आदिवासी लोकांची संख्या जास्त. तरीही शेतकर्यांची राजनीती करणारे किंवा दलितांचे कैवारी कुणाचे हि लक्ष्य यावर गेले नाही.

जीवनमानप्रतिक्रिया