दीपशिखा!
आजपासून शारदीय नवरात्राला सुरूवात होत आहे. घरोघरी घट बसले असतील. आदिशक्तीची आराधना वेगवेगळ्या पध्दतीने केली जाते. कोणी उपास करतात तर कोणी स्त्रीसूक्ताचे पठण करतात. नवरात्रीचा उत्सव हा आदिशक्तीचा, स्त्रीशक्तीचा उत्सव आहे. कोमल आणि कणखर अशा स्त्रीत्वाच्या दोन टोकांचा उत्सव आहे. नवरात्रात देवीच्या नऊ रुपांची पूजा करतात. असंही म्हणता येईल की ही नऊ रुपे म्हणजे नऊ वेगवेगळी क्षेत्रे, वेगवेगळी क्षितीजे! आज साहित्य, कला, शास्त्र, खेळ, राजकारण, समाजकारण आदि सर्वच क्षेत्रातला स्त्रियांचा सहभाग नुसताच उल्लेखनीय नाही तर त्या त्या क्षेत्रातले एव्हरेस्ट गाठण्याचा पराक्रमही अनेक सौदामिनी करत आहेत.