दवंडी
ऐका हो ऐका SSSS...... ढुम ढुम ढुमाक ढुम ढुम ढुमाक होSSS…. असा हालगीचा आवाज काढीत दवंड्या बोळात शिरून दवंडी द्यायचा. त्याच्या आवाजाची चाहूल लागताच घराघरातली डोकी कान देऊन आणि श्वासाला थांबवून दवंडीचा अंदाज घ्यायची. अरुंद बोळातल्या अंधारातून वाट काढत दवंड्या दुसऱ्या बोळात पुढे निघून जायचा. सोबत मागे फिरणाऱ्या चिलीपिलीना घेवूनच. दवंड्या एखांद्या खिंडाराजळ पाचट पेटवून हलगीला गरम करायचा. मग हलगी पुन्हा घुमू लागायची. सोबत ऐका हो ऐका SSSS.. ही त्याची आरोळी घेऊनच. जाहीर माहिती देण्यासाठी दवंडीची आरोळी सोडली जाई.