Skip to main content

हुकुमी शतकी धाग्यांचे घटक पदार्थ....

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी बुधवार, 15/10/2014 14:49 या दिवशी प्रकाशित केले.
आजपर्यंत मिपावर हजारो धागे येऊन गेलेत... त्यातले काही मोजकेच ध्रुवासारखे अढ्ळ झाले....बाकी यथेच्छ पेटवले, उसवले आणि तुडवले गेले. तर त्यामुळे असा प्रश्न निर्माण झाला की नेमकं काय लागतं धागा शतकी करायला? असे शतकोत्सुक प्रचंड प्रमाणात हल्ली ठिकठिकाणी दिसत असल्यामुळे हा धागा त्यांना समर्पित आहे. दुसरा फायदा असा की निदान ह्या निमित्ताने अशा घटकांची एक यादी तयार करून ते विषय थोडे बाजूला ठेवून नवीन विषयांवरही साधक बाधक चर्चा करता येईल कारण बरेच विषय परत येत आहेत आणि त्यामुळे चर्चेला मर्यादा येऊ लागली आहे असे कुठेतरी वाटतयं. आपल्या प्रतिसादांच्या प्रतिक्षेत......

मला न आवडलेली पुस्तके: आत्मचरित्रे/चरित्रे

लेखक पुस्तकमित्र यांनी बुधवार, 15/10/2014 13:46 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/28198 http://www.misalpav.com/node/28241 http://www.misalpav.com/node/29133 ------------------------------------------------------------------------------- या आधीच्या ३ धाग्यांप्रमाणेच या धाग्यात लिहूया मला न आवडलेल्या आत्मचरित्रे/चरित्रे याबद्दल. चरित्रे/आत्मचरित्रे न आवडण्याची कारणे काही अशी सांगता येतील की त्या पुस्तकात सत्याचा विपर्यास झालेला कधी कधी दिसतो. तर कधी आत्मप्रौढीचा वास येतो.

मला आवडलेली पुस्तके: आत्मचरित्र/चरित्र

लेखक पुस्तकमित्र यांनी बुधवार, 15/10/2014 13:12 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/28198 http://www.misalpav.com/node/28241 ________________________________________________________ नमस्कार मंडळी. काही अपरिहार्य अडचणींमुळे हा पुढचा भाग टाकायला उशीर झाला आहे, त्यासाठी क्षमस्व. याआधीच्या भागात आपण आपल्याला आवडलेल्या कादंबर्‍यांबद्दल लिहिले होते. या वेळी आपल्या आवडत्या आत्मचरित्रे/चरित्रे याबद्दल थोडक्यात लिहूया! आधीच्या यशस्वी भागांप्रमाणेच तुमच्या उत्स्फूर्त सहभागाची अपेक्षा आहे! चला तर लिहूया आपल्या आवडत्या आत्मचरित्र किंवा चरित्रांबद्दल!

अमेरिकन चिकन

लेखक रवीराज यांनी बुधवार, 15/10/2014 12:46 या दिवशी प्रकाशित केले.
आंतरराष्ट्रीय राजकारणात रशिया - युक्रेन वादामधे अमेरिका आणि यूरोपने रशियावर आर्थिक निर्बंध लादले त्याला प्रत्युत्तर म्हणुन रशियानेही अमेरिका आणि यूरोपमधुन आयात होणाऱ्या पोल्ट्री आणि डेअरी उत्पादनावर निर्बंध लादले.

आप्पा परब यांच्यासोबत राजगड फिरण्याच्या संधी

लेखक वेल्लाभट यांनी बुधवार, 15/10/2014 10:42 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, मागे एकदा एका संस्थेने आयोजिलेल्या ट्रेकबद्दल माहिती देण्यासाठी धागा उघडला होता. तसेच दोन आकर्षक ट्रेक आयोजिल्याचे समजले आहे. अनेक मिपाकरांकडून ट्रेकबद्दल विचारणा आल्या, 'आम्हाला घेऊन न गेल्याने निषेध' :) असे प्रतिसाद आले. म्हणून म्हटलं की मला कळलेली ही माहिती इथे शेअर करावी म्हणजे इच्चुकांना लाभ घेता येईल. आयोजक संस्थांशी/ग्रूप्सशी माझा काहीही संबंध नसून ही केवळ माहिती म्हणून इथे टाकत आहे; जाहिरात करायचा हेतू नाही.

बयो !! - भाग २

लेखक खटपट्या यांनी बुधवार, 15/10/2014 09:10 या दिवशी प्रकाशित केले.
बयो !! - भाग 1 एकदा नेहमीप्रमाणे कोमल ऑफिस मध्ये नसताना तिचे बाबा आले. मी म्हणालो, "काय काका?" "काही नाही सहजच. मी काय म्हणत होतो…" "काय?" "आमची बयो ग्रजुएट झालेली आहे" (बहुतेक कोमलला घरी बयो म्हणत असावेत) "हो माहित आहे मला" "दिसायला हि सुंदर आहे" "…………" (आता हे नवीन काहीतरी सान्गीतल्यासारखे काय सान्गताय? काय ते विचारा) "तर मी म्हणत होतो कि…… " "काय?" (मला आता धडकी भरली. एखाद्या गोष्ट बऱ्याच दिवसापासून मनात असेल आणि आता ती मिळण्याची वेळ जवळ आल्यावर जसा माणूस नर्वस होतो तसे झाले.

विधानसभा मतदान: १५ ऑक्टोबर २०१४ - आपले अनुभव

लेखक प्रचेतस यांनी बुधवार, 15/10/2014 08:27 या दिवशी प्रकाशित केले.
आज १५ ऑक्टोबर २०१४, विधानसभा निवडणूकीच्या मतदानाचा दिवस. आज ऑफिसला मतदानाची सुट्टी असली तरीही मला आज ऑफिसमध्ये दिवसभर काम असल्यामुळे जावे लागणारच होते. तेव्हा सकाळी लवकर उठून ६.५०लाच मतदान केंद्रावर गेलो. चिंचवडच्या माटे शाळेत माझे मतदान केंद्र होते. वोटर्स स्लिप मिळाली नव्हतीच मात्र निवडणूक आयोगाच्या संस्थळावरुन अगोदरच माहिती घेतल्यामुळे मतदान केंद्र, विभाग क्रमांक, अनुक्रमांक इत्यादी तपशील घेऊन ठेवला होताच. इतक्या लवकर जाऊनही केंद्रावर माझ्याहीआधी २/३ लोक उभे होते. लगेचच माझ्यामागे १५/२० जणांची रांग उभी राहिली. एकंदरीत मतदान सुरु व्हायच्या आधीपासूनच उत्साह दिसत होता.

<पतंग>

लेखक राजेश घासकडवी यांनी बुधवार, 15/10/2014 07:03 या दिवशी प्रकाशित केले.
प्राथमिक प्रेरणा - तवंग दुय्यम प्रेरणा - लवंग> माझा पतंग सतत हरवतो तुझ्या अभाळी . . पेच लावती ढगाढगात ढाले ढालगजांचे . . ढील देत मी फिरकी झपझप मांजा वाहतो . . मांजा कातर पडतो सैलसर केएलपीडी . . झाडा तारांत पतंग ढिगभर लटकलेले . . नवा पतंग उडेल लवकर नव्या अभाळी

आल्प्सच्या वळणांवर - भाग ४ - शिल्थोर्न, बिर्ग आणि परिसर

लेखक मधुरा देशपांडे यांनी बुधवार, 15/10/2014 01:39 या दिवशी प्रकाशित केले.
आल्प्सच्या वळणांवर - भाग १, भाग २, भाग ३ सततच्या प्रवासानंतर आता पुढचे सहा दिवस एकाच ठिकाणी मुक्काम होता त्यामुळे रोजची सामान आवराआवरी हा प्रकार नव्हता. हवामानाचा अंदाज बघायचा आणि त्याप्रमाणे त्या दिवसाचा बेत करायचा असे ठरले होते. पर्वतशिखरे बघण्यासाठी सूर्यप्रकाश नसेल आणि नुसतेच ढग असतील तर काहीच मजा नाही.