शेयर मार्केट (बेसिक) भाग -१

दशानन's picture
दशानन in जनातलं, मनातलं
6 Aug 2009 - 7:01 pm

प्रस्तावना : - मराठी भाषे मध्ये शेयर मार्केट विषयी जास्त माहीती उपलब्ध नाही आहे ती माहीती सरळ साध्या भाषेत देण्याचा प्रयत्न ह्या लेख मालिकेतून मी करणार आहे, ज्यांना जास्त माहीती आहे त्यांनी प्रतिसादामध्येच ती माहीती द्यावी जेणे करुन नवीन व्यक्तीला माहीतीचा उपयोग करुन घेता येईल. मी काही सर्व काही माहीती आहे व माझीच माहीती आहे ह्या आवेशामध्ये लिहीत नाही आहे जर कुठे चुकत असेल तर जाणकारांनी योग्य तो प्रकाश टाकावा ही विनंती. ह्या लेख माले साठी मी दैनिक भास्कर / टिव्ही -१८ व माझा काही वर्षाचा अनुभव ह्यांची मदत घेत आहे.

धन्यवाद.

*********************

आपण रोजच्या जिवनामध्ये शेयर मार्केट, सेबी, सेन्सेक्स, बॉण्ड्स व डिबेंचर्स बद्दल वाचत, पाहत असतो त्याची माहीती येथे देण्याचा मी प्रयत्न करत आहे.

सर्वात प्रथम स्टॉक म्हणजे काय ?
स्टॉक म्हणजे एखाद्या कंपनी मध्ये तुमची हिस्सेदारी, समजा तुमच्या कडे रिलायन्सचे १०० शेयर्स आहेत तर तेवढ्या टक्क्याचे तुम्ही कंपनी मध्ये हिस्सेदार आहात, जर कंपनीला फायदा झाला तर कंपनीला तो फायदा तुम्हाला द्यावा लागेल जो तुमच्या हिस्सेदारी टक्के नुसार बनतो ( समजा रिलायन्स चे १०० शेयर तुमची कंपनीमध्ये १% हिस्सेदारी तय करतो तर तुम्हाला कंपनीच्या फ्रॉफिट मधील १% मिळेल) ह्याच स्टॉक ला शेयर्स अथवा इक्किटी नावाने देखील ओळखले जाते.

आता शेअर कसे खरेदी केले जाऊ शकतात ह्या विषयी
कैपिटल मार्केट दोन भागामध्ये विभागलेला आहे एक प्राईमरी मार्केट म्हणजेच इनीशियल पब्लिक ऑफ़र (आईपीओ) कंपनी त्यांना हवा असलेला फंड उभा करण्यासाठी सरळ सरळ पब्लिक मध्ये जाते व आपले शेयर्स विकतात आईपीओ द्वारा. सेकंडरी मार्केट म्हणजे ती जागा जेथे आयपीओ मध्ये मिळालेले शेयर एकजण विकतो व दुसरा विकत घेतो... सरळ साध्या शब्दामध्ये आपली एनईसी व बीएसई मार्केट आपली ट्रेडींग मार्केट.

ऑर्डिनरी शेयर्स
हे कुठल्या पण कंपनीमध्ये तुमची आंशिक हिस्सेदारी नक्की करतात व दरवर्षी तुम्हाला कंपनीच्या फायद्यातून डिविडेंड मिळत राहतो, समजा एखाद्या कंपनीचे शेयर्स तुमच्याकडे आहेत व काही कारणाने ती कंपनी बंद पडली तर जे जे हिस्सेदार आहेत त्यांना कंपनी ची असेट विकून समान रेशो मध्ये पैसे परत दिले जातात (प्रिफरेंशियल शेयर धारकांना आधी मिळतो)
प्रिफरेंशियल शेयर धारक चा अर्थच त्याच्या नावामध्ये लपला आहे मोठे गुम्तवणूकदार (कंपनीद्वारे / युनिटद्वारे खरेदी करणारे)

शेयर्स इश्यूड एट पार और शेयर्ड इश्यूड एट प्रीमियम मध्ये फरक काय ?
फेस / पार वैल्यु कुठल्याही शेयरची अनुमान करुन काढलेली वैल्यु असते, म्हणजे एखाद्या कंपनी ने आपले शेयर्स काढले तर ती आपल्या बैलेंस शीट मध्ये जी वैल्यु लिहते ती वैल्यु (सामान्यता कंपन्या १० रुं पासून १०० रु. पर्यंत पार वैल्यु दाखवतात) पण हा आकडा १० च्या गुणांक मध्ये पाहीजे (उदा. २५.५) कंपनी एकदा शेयर इनीशियल इश्यु च्या नंतर फेस / पार वैल्यु मध्ये बदल करु शकते.

एखादी कंपनी फेस / पार वैल्यु पेक्षा दराने शेयर मार्केट मध्ये काढते तेव्हा त्याला प्रीमियम म्हटले जाते, जर ती कंपनी सेबी च्य प्रॉफिटेबिलिटी क्राइटेरिया च्या रुल मध्ये बसते तेव्हा ती कंपनी फेस / पार वैल्यु पेक्षा जास्त दराने शेयर मार्केट मध्ये काढू शकते. (उदा. एक्सवाय कंपनीच्या पार वैल्यु १० रु. आहे पण कंपनी सेबीच्या प्रॉफिटैबिलिटी क्राइटेरिया रुल्स मध्ये बसते म्हणून ते आपले शेयर २५ रु. दराने काढू शकतात.. म्हणजे १५ रु. प्रिमियम. एक लक्ष्यात ठेवण्याची गोष्ट म्हणजे कंपनी आपला डिविडेंड फेस / पार वैल्यु वर देते शेअरच्या प्रीमियमला जमा धरुन नाही.

आता नवीन शेयरची (आईपी) किमंत कशी ठरवली आते ?

इनीशियल पब्लिक ऑफर मध्ये कंपनी फिक्स्ड प्राइस मध्ये शेयर मार्केट मध्ये काढू शकते हे काम इश्यु ओपन होण्याआधीच केले जाते, कंपनीच्या शेअरची मागणी बाझार मध्ये कीती आहे हे कंपनीला इनीशियल पब्लिक ऑफर बंद झाल्यावरच कळते. ( अश्या पध्दती मध्ये शेयर मिळाले तर ते शेअर्स प्रीमियम शेयर्स मध्ये लिस्ट होतात व त्याचा फायदा तुम्हाला जेव्हा कंपनी बंद पडते तेव्हा होतो.)

दुसरी पध्दत आहे बुक बिल्डिंग - ह्यामध्ये आपल्याला माहीत नसते की ऑफर असलेल्या शेयरची मुळ किंमत काय असेल, कंपनी एक सांकेतिक प्राइज रेंज फिक्स करते, मग गुंतवणूकदार आपल्या आपल्या ऐपती प्रमाणे शेयर्स ना बोली लावतो ही बोली कंपनीने ठरवलेल्या प्राईज रेंज च्या आत काही ही असू शकते, फुल्ल सब्स्क्रिप्शन नंतर शेअरची किमत फिक्स केली जाते व ज्यांनी ज्यांनी गुंणतवणूक केली आहे त्यांना त्याच फिक्स किमतीनूसार शेयर आवंटीत केले जातात ( अनुभव सागतो की जेव्हा जेव्हा बुक बिल्डिंग मध्ये शेयर मिळतात त्यांना चांगली किंमत भेटते.) जर ओव्हर सब्स्क्रिप्शन झाले तर कंपनी ग्रीनहाउस ऑप्शनचा देखील उपयोग करु शकते.

ग्रीनहाउस ऑप्शन म्हणजे काय ?

जेव्हा जेव्हा चांगल्या कंपनीचे आइपीओ फिक्स केलेल्या आकड्यापेक्षा जास्त विकले जातात त्यांना ओवरसब्सक्राइब होणे म्हणतात, अश्यावेळी कंपनी ग्रीनहाउस ऑप्शन वापरते ह्या ऑप्शनद्वारे कंपनी अतिरिक्त शेयर मार्केट मध्ये काढते व गुंतवणूकदारांची मागणी पुर्ण करते. (पण ओवरसब्सक्रिप्शन च्या रेशोची माहीती कंपनीला आपल्या ऑफर डॉक्यूमेंट मध्ये आधीच द्यावी लागते.)

वरील कुठल्या हि पध्दतीने जर तुम्ही शेयर्स विकत घेता ते शेयर तुमच्या डिमैट अकाउंट मध्ये जमा होतात.

क्रमशः

अर्थकारणप्रकटनविचारलेख

प्रतिक्रिया

पर्नल नेने मराठे's picture

6 Aug 2009 - 7:04 pm | पर्नल नेने मराठे

ऊपयोगी माहिती !!!!!!!!
चुचु

मदनबाण's picture

6 Aug 2009 - 7:08 pm | मदनबाण

राजे फार उपयुक्त माहिती आपण देत आहात...
पुढील भागांची वाट पाहत आहे. :)

(सध्या थोडेसे ३आय इन्फोटेकचे शेयर खात्यात असलेला)
मदनबाण.....

Try And Fail, But Don't Fail To Try
Stephen Kaggwa

विनायक प्रभू's picture

6 Aug 2009 - 7:09 pm | विनायक प्रभू

द बुल

अवलिया's picture

6 Aug 2009 - 7:18 pm | अवलिया

वाचतो आहे ...... :)

--अवलिया

यशोधरा's picture

6 Aug 2009 - 7:38 pm | यशोधरा

मस्त माहिती, धन्यवाद.

सूर्य's picture

6 Aug 2009 - 7:43 pm | सूर्य

माहीती मस्त आहे. पुढील भागाची वाट बघत आहोत.
(क्रमश: वाचुन पहिल्यांदा बरे वाटले ;) )

- सूर्य.

प्रमोद देव's picture

6 Aug 2009 - 8:17 pm | प्रमोद देव

माहिती कुणीही द्यावी. ह्यावर कुणाचाही अधिकार नाहीये.
राजे बिनधास्त लिहा तुम्ही.
मीही एकदा असेच ह्या विषयावर थोडे लिहिले आहे. ते इथे वाचता येईल.

हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!

संदीप चित्रे's picture

6 Aug 2009 - 8:26 pm | संदीप चित्रे

वाचतोय...
पुढच्या प्रत्येक लेखाच्या सुरूवातीला आधीच्या सगळ्या लेखांचे दुवे क्रमाने टाकलेस तर बरं होईल रे.,,, म्हणजे शेवटचा लेख लिहिशील तेव्हा अनायसे सगळे लेख एका ठिकाणी संकलि होतील.
पुलेशु ..

विकास's picture

6 Aug 2009 - 8:28 pm | विकास

लेख आवडला. लेख मालीका होउंदेत (आधीचा विसरायच्या आत पुढचा)

पुढच्या प्रत्येक लेखाच्या सुरूवातीला आधीच्या सगळ्या लेखांचे दुवे क्रमाने टाकलेस तर बरं होईल रे.,,

असेच म्हणतो.

विसोबा खेचर's picture

6 Aug 2009 - 11:41 pm | विसोबा खेचर

गुड! कीप इट अप...

तात्या.

पाषाणभेद's picture

7 Aug 2009 - 4:58 am | पाषाणभेद

लेख उत्तम झालाय. बरीच माहीती मिळतेय. आपण बोलल्याप्रमाणे म्युच्यूअल फंडाच्या बाबतपण लिहा. (एफ &ओ पण!)

वा वा. छान छान. असेच लिहीत रहा.

- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या

सहज's picture

7 Aug 2009 - 7:05 am | सहज

वाचतोय.

जुन्या लेखमाला संपवल्यास का?

विजुभाऊ's picture

7 Aug 2009 - 9:25 am | विजुभाऊ

मूळ माहिती कडे दुर्लक्ष्य होते आहे. राजेनी ते भाषांतरीत केले आहे की नाही हा गौण मुद्दा आहे. पण माहिती उपयुक्त आहे.
एखादी कंपनी फेस / पार वैल्यु पेक्षा दराने शेयर मार्केट मध्ये काढते तेव्हा त्याला प्रीमियम म्हटले जाते

समजा अशा एखादा प्रीमियम घेऊन खरेदी केलेला शेअर मी मूळ काही कारणाने कम्पनीला परत केला तर मला प्रीमियमची रक्कम सुद्धा परत मिळेल?
याचे उत्तर नाही असे येते
कम्पनी बंद असताना मला मिळणारी रक्कम ही शेअरच्या फेस व्हॅल्युच्या प्रमाणातच असेल. कम्पनी नफ्यात असेल तर मिळणारी रक्कम ही फेस वॅल्युच्या प्रमाणातच मिळेल. याचा अर्थ प्रीमियम हा गैर कायदेशीर आहे. असा होतो.
रीलायन्स च्या एका कम्पनीने आयपीओ काढला होता तेंव्हा फेस वॅल्यु + प्रीमियम पेक्षा त्याची मार्केट वॅल्यु कमी होती.
अशा स्थितीत प्रीयम देऊन आय पीओ घेतलेला ग्राहक मूर्ख असाच नाही का?
कम्पनी त्या प्रीमियम चे काय करते?
जाणकारानी खुलासा करावा

पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे

दशानन's picture

7 Aug 2009 - 9:37 am | दशानन

>>समजा अशा एखादा प्रीमियम घेऊन खरेदी केलेला शेअर मी मूळ काही कारणाने कम्पनीला परत केला तर मला प्रीमियमची रक्कम सुद्धा परत मिळेल?

नाही, कारण तुम्ही एकदा लिस्टिंग झालेले शेयर्स कंपनीला परत देऊ शकत नाही (कारण, आयपिओ बंद झाल्या नंतर काही दिवसामध्येच शेयर्स मार्केट मध्ये लिस्ट होतात) तुम्ही ओपन मार्केट मध्ये जेव्हा शेयर लिस्ट होईल तेव्हा विकू शकता.

>>कम्पनी बंद असताना मला मिळणारी रक्कम ही शेअरच्या फेस व्हॅल्युच्या प्रमाणातच असेल. कम्पनी नफ्यात असेल तर मिळणारी रक्कम ही फेस वॅल्युच्या प्रमाणातच मिळेल. याचा अर्थ प्रीमियम हा गैर कायदेशीर आहे. असा होतो.

नाही, प्रीमियम का कायदेशीरच आहे, कारण कंपनीची त्यावेळची गुडवीलवर तुम्ही प्रीमीयम देऊन शेयर्स खरेदी केले आहेत, उदा. रिलायन्स पॉवर चा आयपीओ.

>>अशा स्थितीत प्रीयम देऊन आय पीओ घेतलेला ग्राहक मूर्ख असाच नाही का?

नाही, सेम उत्तर कारण तुम्ही कंपनीची गुडवील पाहून गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतलेला असतो तो पण जास्त भाव देऊन (प्रीमीयम).

>>कम्पनी त्या प्रीमियम चे काय करते?

कंपनीच्या गुडवीलची किमत आहे ती ;) त्यांच्या खिश्यात.

***
मी फिनिक्स आहे.काही काळासाठी मातीमोल होतो.. नाही असे नाही पण पुन्हा भरारी घेण्याची माझ्यात ताकत आहे...वेट फॉर मी , आय विल बी बॅक सुन ;)

शितल's picture

7 Aug 2009 - 4:07 pm | शितल

राजे,
लवकर पुढचा भाग लिहा वाचत आहे. :)

अवलिया's picture

8 Aug 2009 - 10:36 pm | अवलिया

लवकर पुढचा भाग लिहा

ऋषिकेश's picture

9 Aug 2009 - 6:33 pm | ऋषिकेश

मराठी भाषे मध्ये शेयर मार्केट विषयी जास्त माहीती उपलब्ध नाही आहे ती माहीती सरळ साध्या भाषेत देण्याचा प्रयत्न ह्या लेख मालिकेतून मी करणार आहे, ज्यांना जास्त माहीती आहे त्यांनी प्रतिसादामध्येच ती माहीती द्यावी जेणे करुन नवीन व्यक्तीला माहीतीचा उपयोग करुन घेता येईल.

अरे वा स्त्युत्य उपक्रम. अभिनंदन!
मालिका पुर्णत्त्वास जावो ही सदिच्छा!

वर अनेक जण म्हणाले त्याप्रमाणे हिंदी शब्द खटकले (मला विषेशतः वैल्यू खटकला). पण त्याचे कारण तुम्ही दिले आहेच. (सुचनेमागे निरुत्साह करण्याचा हेतू नाही.. असेच लिहिलेत तरीही ते मुळ हेतू ध्यानात घेता तितकेच मोलाचे आहे, तेव्हा लिहित रहा आणि तुम्ही दैनिक भास्करला त्याचे योग्य ते श्रेय देत आहातच)

ऋषिकेश
------------------
संध्याकाळचे ६ वाजून ५१ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक सुमधूर गीत "दाम करी काम येड्या...."

मराठमोळा's picture

9 Aug 2009 - 6:36 pm | मराठमोळा

अरे वा!!
परवाचं डीमॅट अकाउंट काढलं.
चांगलं आहे, हे लेख आणखीन मदत करतील.
राजे, येऊ द्या पुढचा भाग लवकर.

आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!