ताज्या घडामोडी - जून २०२२ (भाग २)

चंद्रसूर्यकुमार's picture
चंद्रसूर्यकुमार in काथ्याकूट
18 Jun 2022 - 5:26 pm
गाभा: 

आधीच्या भागात २५० प्रतिसाद झाल्याने नवा भाग काढत आहे. आधीच्या भागातील चर्चेसंदर्भात प्रतिसाद द्यायचा असल्यास त्या भागात आणि नवीन काही लिहायचे असल्यास या भागात लिहावे ही विनंती.

लोकप्रिय व्यक्तीमत्व अभिजीत बिचुकले यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उडी घ्यायचे ठरविले आहे. विविध राज्यातील १०० आमदारांचा पाठिंबा मिळविण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. आपल्याला राज्यघटना आणि कायदा याची चांगली जाण असून आपण राष्ट्रपती व्हायला योग्य आहोत असा त्यांचा दावा आहे. आपली राष्ट्रपती व्हायची इच्छा आहे हे त्यांनी मागच्या वेळेस मोदींना सांगितले होते पण आयत्या वेळेस मोदींनी रामनाथ कोविंदांचे नाव पुढे आणल्याने त्यांच्या हातातोंडाशी आलेला घास गेला असे दिसते. असो. अभिजीत बिचुकलेंना हार्दिक शुभेच्छा. २५ जुलै रोजी नवे राष्ट्रपती म्हणून ते शपथ घेताना दिसतील का? आणखी एक मराठी व्यक्ती राष्ट्रपती झाल्यास त्याचा आपल्या सगळ्यांनाच आनंद व्हायला हवा :)

Bichukale

प्रतिक्रिया

श्रीगुरुजी's picture

22 Jun 2022 - 2:27 pm | श्रीगुरुजी

माझ्या मते विन-विन परिस्थितीत राष्ट्रवादी आहे. सरकार टिकले तर त्यांची मंत्रीपदे शाबूत राहून पवार सरकार चालवित राहतात. सरकार पडले तर राष्ट्रवादी व कॉंग्रेसवर अजिबात दोषारोप होणार नाही. मध्यावधी निवडणूक झाली तर राष्ट्रवादी + कॉंग्रेस वि. भाजप वि. सेना लढतीत राष्ट्रवादी हा सर्वात मोठा पक्ष होईल. फडणवीसांनी एकनाथ शिंदेंच्या मदतीने सरकार स्थापन केले तरी ते अस्थिर असेल व बच्चू कडू, प्रताप सरनाईक, अब्दुल सत्तार वगैरेंचा पाठिंबा घ्यावा लागेल, ज्यातून काही भाजप समर्थक अजून नाराज होतील. हे कडबोळे सरकार ऑक्टोबर २०१९ पर्यंत चालले तरी पुढील विधानसभा निवडणूक पुन्हा एकदा शिंदे गटाशी युती करून लढावी लागेल ज्यात भाजपला खूप तोटा होईल.

शाम भागवत's picture

22 Jun 2022 - 3:02 pm | शाम भागवत

आपली हार होते आहे असे वाटले तर उठा टोकाची भूमिका घेऊन राज्यपालांना विधानसभा बरखास्तीच सल्ला देतील.
मला नाही तर कुणालाच नाही.
:)

श्रीगुरुजी's picture

22 Jun 2022 - 3:06 pm | श्रीगुरुजी

हा सल्ला बहुमतातील सरकारने दिला तरच तो बंधनकारक असतो. अल्पमतात गेलेल्या सरकारचा सल्ला राज्यपालांवर बंधनकारक नसतो.

चंद्रसूर्यकुमार's picture

22 Jun 2022 - 1:15 pm | चंद्रसूर्यकुमार

म्हणजे फडणवीस (आणि मोदी-शहा सुध्दा) एकदा अडीच दिवसाच्या गणपती प्रकरणी तोंडावर आपटल्यावर परत परत तसेच तोंडावर आपटतील हे गृहितक आहे. एकदा दुधाने तोंड पोळल्यावर कशावरून ताकही फुंकून पिणार नाहीत?

शाम भागवत's picture

22 Jun 2022 - 1:57 pm | शाम भागवत

मुख्य म्हणजे “अरेला कारे करायला गेलो ती आमची चूक होती.” हे फडणवीसांनी कबूलपण केलंय. चूकीचं समर्थन करत बसले नाहीत. त्यामुळे ते चांगलेच सावध असणार हे नक्की.
मात्र फडणवीस हुषार वगैरे अजिबात नाहीत. पवार हेच फक्त हुषार. यावेळी नक्कीच उठा बाजी पलटवणार असं ज्यांना वाटतं त्यांचे बाबतीत मात्र वेट ॲन्ड वॅाच. ;)

श्री राऊत यांचे काय होईल?

इकडे मते मांडावीत.
घरी दारी बाहेर पार्कात ओफीसात प्रत्येक जण मत मांडत आहे. न घाबरता मत माडा.

चौकस२१२'s picture

22 Jun 2022 - 12:15 pm | चौकस२१२

जरी अँटी डेफेक्शन लागू नाही झाले तरी या ३५-४० "बंडखोर" परत पुढे निवडून येतील का ? भाजपने विचार करावा .. त्यापेक्षा नवीन निवडणूक लढवावी
लोकांना ते जास्त पटेल
असेही असेही उद्धव ठाकरे काही एका रात्रीत महाकास आघाडी सोडून एकदम भाजप बरोअबर जाणार नाहीत .. मग काय उपयोग !

sunil kachure's picture

22 Jun 2022 - 12:33 pm | sunil kachure

पाहिले सरकार अल्प मतात आहे असा दावा विरोधी पक्षाला म्हणजे bjp ल करावा लागेल.
मग राज्यपाल बहुमत सिद्ध करण्यास सांगतील.
राज्यपाल ना पत्र देवून पण विधानसभेत त्या विरुद्ध मतदान होवू शकते.
सरकार बहुमत सिद्ध करू शकले नाही तर .
विरोधी पक्ष सत्ता स्थापन करण्याचा दावा करेल.
परत मतदान.
पण विरोधी पक्षाने सत्ता स्थापन करण्याचा दावा केला नाही तर विधानसभा भंग होईल.
बंडखोर आमदार विधानसभा भंग झाली की लाचार होतील.
Bjp आपल्या तालावर त्यांना नाचावेल सेना परत त्यांना घेणार नाही.
मला नाही वाटत bjp satta स्थापन करण्याचा दावा करेल.

अमरेंद्र बाहुबली's picture

22 Jun 2022 - 3:00 pm | अमरेंद्र बाहुबली

मुंबई पालिका सेनेला महत्वाची आहे. काॅंग्रेस राष्ट्रवादी बरोबर गेल्यास सेनेला पालिका जिंकणे शक्य नसेल असा अंदाज आला असावा. अश्या वेळा भाजपशी युती करायची तर सरकार पाडावे लागेल. सरकार काय सांगून पाडनार? म्हणून ठाकरेंनीच शिंदेंना आमदार देऊन रवाना केले असावे. कारण ठाण्याबाहेर प्रभाव नसलेल्या शिंदेंबरोबर पाचोरा / जळगाव / औरंगाबाद चे आमदार का जातील?? मग आता सरकार पाडून मुंबई पालिकेच्या बदल्यात भाजपला मुख्यमंत्रीपद सेना दान करेल. सत्तेसाठी आसूसलेले भाजपेयी ह्या साठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेत. बदल्यात सेना बरेच मंत्रीपदंही पदरात पाडुन घेईल नी बरोबर महापालिकाही. :)

अमरेंद्र बाहुबली's picture

22 Jun 2022 - 3:04 pm | अमरेंद्र बाहुबली

मुंबई पालिका सेनेला महत्वाची आहे. काॅंग्रेस राष्ट्रवादी बरोबर गेल्यास सेनेला पालिका जिंकणे शक्य नसेल असा अंदाज आला असावा. अश्या वेळा भाजपशी युती करायची तर सरकार पाडावे लागेल. सरकार काय सांगून पाडनार? म्हणून ठाकरेंनीच शिंदेंना आमदार देऊन रवाना केले असावे. कारण ठाण्याबाहेर प्रभाव नसलेल्या शिंदेंबरोबर पाचोरा / जळगाव / औरंगाबाद चे आमदार का जातील?? मग आता सरकार पाडून मुंबई पालिकेच्या बदल्यात भाजपला मुख्यमंत्रीपद सेना दान करेल. सत्तेसाठी आसूसलेले भाजपेयी ह्या साठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेत. बदल्यात सेना बरेच मंत्रीपदंही पदरात पाडुन घेईल नी बरोबर महापालिकाही. :)

श्रीगुरुजी's picture

22 Jun 2022 - 3:13 pm | श्रीगुरुजी

आता भाजपने सेनेशी परत युती केली तर भाजप समर्थक अत्यंत चिडतील. तसेच भाजप आता कोणत्याही परिस्थितीत मुंबई महापालिका सेनेच्या हाती लागून देणार नाही किंवा त्यासाठी सेनेला अजिबात मदत करणार नाही. २०१७ मध्ये जवळपास सेनेएवढ्याच जागा जिंकूनही मुंबई महापालिका सेनेला मोकळी सोडणे हा अत्यंत चुकीचा निर्णय होता. यावेळी हीच घोडचूक भाजप परत करणार नाही. महापालिका निवडणूक संबंधात प्राथमिक सर्वेक्षणाचे अंदाज सुद्धा भाजपला स्पष्ट बहुमत दाखवित आहेत.

शाम भागवत's picture

22 Jun 2022 - 3:27 pm | शाम भागवत

तसेच भाजप आता कोणत्याही परिस्थितीत मुंबई महापालिका सेनेच्या हाती लागून देणार नाही किंवा त्यासाठी सेनेला अजिबात मदत करणार नाही.

एकदम बरोबर
शिवसेनेवरचे अवलंबित्व पूर्णपणे नाहिसे करण्यासाठी हेच करायचे आहे. शिवसेनेचा प्राण विधानसभेत नाही आहे. तो मुंबईतल्या पालिकांमधे आहे.
पण पालिकेतील भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढायला पोलीस यंत्रणा हाताशी पाहिजे किंवा सीबीआयला महाराष्ट्र बंदी नसली पाहिजे.

अमरेंद्र बाहुबली's picture

22 Jun 2022 - 3:45 pm | अमरेंद्र बाहुबली

पण पालिकेतील भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढायला पोलीस यंत्रणा हाताशी पाहिजे किंवा सीबीआयला महाराष्ट्र बंदी नसली पाहिजे. ज्यांचे घरं काचेचे असतात ते दुसर्यांच्या घरावर दगडफेक करत नाहीत भागवत काका! :) भाजपने म्हणून कधा अशी हिंमत केली नाही. नाहीतर नागपूर, नाशिक, पुणे पालिकेवर दणादण धाडी पडतील. रच्याकने तुकाराम मुंडे ह्या प्रामाणीक अधिकार्याने नालेसफाईत मागील वर्षाच्या तूलनेत कमी खर्चात सारखंच काम केलं तर संतापून भाजप वाल्यानी त्यांची बदली केला होती. :)
मागे राष्ट्रहीतवादी मुवी काकांनी पुणे पालिकेतील भ्रष्टाचारासाठी राज्यसरकारला जबाबादार धरले होते. कुणीतरी त्यांना पुणे पालिकेत भाजपची सत्ता आहे हे नजरेस आणले. त्यांनंतर मुविकाकांनी त्या भ्रष्टाचाराविरूध्द चकार शब्द काढला नाही. :)

शाम भागवत's picture

22 Jun 2022 - 4:38 pm | शाम भागवत

तेच म्हणतोय मी.
मविआ ने ईडीविरूध्द बोंब मारण्याऐवजी पुणे मनपाचे घोटाळे बाहेर काढायला पाहिजे होते. संजय राऊतांनी कंगनाच्या मागे लागायच्या ऐवजी ते करायला पाहिजे होते.

अमरेंद्र बाहुबली's picture

22 Jun 2022 - 9:06 pm | अमरेंद्र बाहुबली

आता भाजपने सेनेशी परत युती केली तर भाजप समर्थक अत्यंत चिडतील.
कार्यकर्त्यांना कोण कुत्रं विचारतं?? एकदा निवडणूका झाल्या की. कार्यकरत्यांचा ऊपयोग निवडणूकीपुरता असतो.

शिवसेनेवर भाजपवाले चिडले आहेत. प्रत्यक्षात त्याचे कारण उठा व संरा होते. तेच जर नसतील तर शिवसेनेशी भांडण असायचं कारणच नाही. अर्थात हे भाजपप्रेमींनी कळायला थोडा वेळ लागेल. उठांमुळे नारायण राणे, नाईक, राठा व आता एशिं शिवसेनेतून बाहेर पडले हे लक्षात ठेवले तर राग शिवसेनेवर नाही तर उठावर असला पाहिजे हे लक्षात येईल.
असो.

अमरेंद्र बाहुबली's picture

22 Jun 2022 - 9:30 pm | अमरेंद्र बाहुबली

भाजपवर शिवसेनेवाले चिडले आहेत. प्रत्यक्षात त्याचे कारण देफा व चंपा होते. तेच जर नसतील तर भाजपशी भांडण असायचं कारणच नाही. अर्थात हे सेनाप्रेमींना कळायला थोडा वेळ लागेल. देफमूळे एकनाथ खडसे, व अनेक चांगले लोक भाजपातून बाहेर पडले हे लक्षात ठेवले तर राग भाजपवर नाही तर देफवर असला पाहिजे हे लक्षात येईल.
असो.

शाम भागवत's picture

22 Jun 2022 - 9:49 pm | शाम भागवत

पण हे मोदी शहांना पटले पाहिजे ना. तर कार्यवाही होणार. मग तुमच्या मनासारखे होणार.
:)

शिवसेनेच्या बाबतीत कोणाला बाजूला करायचे ते शिंदे साहेबांना कळले. कार्यवाही झाली. भाजपावाले खूष.

एवढाच फरक आहे.

अमरेंद्र बाहुबली's picture

22 Jun 2022 - 10:00 pm | अमरेंद्र बाहुबली

पण हे मोदी शहांना पटले पाहिजे ना. तर कार्यवाही होणार. मग तुमच्या मनासारखे होणार.
:)

मोदींना कारवाई करायची तर कधीच केली असती. मूळात फडणवाीसांचा गेम अमीत शहांनी केलाय. मोदींनंतर त्याना स्पर्धा नकोय. त्यामूळे १०५ आमदार असूनही त्यांनी कधी सत्ता मिळवायचा प्रयत्न केला ना करतील. फडणवीसांना केंद्रातही घेणार नाहीत.
शिवसेनेच्या बाबतीत कोणाला बाजूला करायचे ते शिंदे साहेबांना कळले. कार्यवाही झाली. पहाटेच्या शपथविधीवेळीही मोटाबाईने गेम केला म्हणून भाजपेयी हुरळून गेले होते प्रत्यक्षात स्वतचाच गेम झालाय हे लक्षात आल्यावर त्यांना तोंड दाखवायला जागा नव्हती.

शाम भागवत's picture

22 Jun 2022 - 10:14 pm | शाम भागवत

होका. बर.

sunil kachure's picture

22 Jun 2022 - 10:14 pm | sunil kachure

शिंदे च बंड नक्की कोणी घडवले?
३५, आमदार शिंदे सोबत जाणे हेच मुळात अशक्य आहे त्यांचा इतका करिश्मा नाही.

पण उतावीळ पना मुळे परत bjp चे हसे होणार हे मात्र नक्की..
देश भारतील मीडिया नी ही घटना कव्हर केली आहे.
परत एकदा तोंडावर पडणार हे नक्की.

प्रसाद_१९८२'s picture

22 Jun 2022 - 3:17 pm | प्रसाद_१९८२

कारण ठाण्याबाहेर प्रभाव नसलेल्या
--
अज्ञानात सुख असते, हेच खरे.
आणि नॉटी संजय राऊतचे तोंड पाहून असे वाटत नाही की हा प्लॅन उदोजींचा असेल.

श्रीगुरुजी's picture

22 Jun 2022 - 3:26 pm | श्रीगुरुजी

असल्या कुटील योजना बनवून त्या अंमलात आणण्यासाठी अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्तेची आवश्यकता असते. अशांना Realpolitik म्हणतात. सेनेत एकही Realpolitik नाही व नव्हता. त्यामुळेच इतर अनेकांनी सेनेला वापरून घेतले. सेनेचे बहुतांशी यश हे इतरांच्या मदतीने आहे. महाराष्ट्रात Realpolitik सध्या तरी फक्त शरद पवार आहेत. देशात पूर्वी इंदिरा गांधी आणि आता अमित शहा हे Realpolitik म्हणता येतील.

प्रसाद_१९८२'s picture

22 Jun 2022 - 3:58 pm | प्रसाद_१९८२

संजय राऊतला तुम्ही 'Realpolitik' मानत नाही ?

श्रीगुरुजी's picture

22 Jun 2022 - 4:00 pm | श्रीगुरुजी

त्याने काय केलंय? बेताल बरळण्याफलिकडे तो काही करतो का?

अमरेंद्र बाहुबली's picture

22 Jun 2022 - 4:14 pm | अमरेंद्र बाहुबली

१०५ घरी बसवण्यात नी तीन पक्ष एकत्र आणण्यात संजय राऊतांचा सिंहाचा वाटा होता. बाकी भाजपेयींना काहीही वाटो त्याच्याने जास्त फरक पडत नाही.

यश राज's picture

22 Jun 2022 - 4:45 pm | यश राज

अहो अबा.

कधीपर्यंत १०५/१०६ घरी बसवल्याची खुशी मनवणार, महाराष्ट्र खड्ड्यात गेला किंवा कामे झाली नाही तरी चालतील पण १०५ घरी बसवल्याचा आनंद महत्वाचा.

तरी पण त्यात अजून १ वाढवा.. ते म्हणजे मामु .. पूर्ण अडीच वर्षे घरीच तर बसले होते.

त्याच गोष्टीचा परिपाक म्हणजे हे चालू असलेले बंड. आता सगळा योग व्यवस्थित जुळून आला तर त्यांना आता आयुष्यभर घरीच बसायचे आहे.

रात्रीचे चांदणे's picture

22 Jun 2022 - 4:53 pm | रात्रीचे चांदणे

लोकसत्ता तर म्हणतंय आमदार, मंत्री सोडा पण खुद्द शरद पवारांनाही भेटायला उद्धव ठाकरे वेळ देत नव्हते.

Mr यश राज केंद्र सरकार नी केलेली काम आणि महाराष्ट्र सरकार नी केलेली काम तुलना करायची का?
नोट बंदी.
पूर्ण अयशस्वी.
भारतात covid पसरविण्यास केंद्र जबाबदार.
चीन मधील स्थिती माहीत असून पण जागतिक विमान सेवा चालू.
प्रवासी लोकांना देश भर पसरण्यास मदत.
अग्निपथ .
सैन्यात कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम चालू
शेतकरी कायदे भारतीय शेतकऱ्यांना देशोधडीला लावायचा प्रयत्न
धर्माच्या नावावर समजत फूट.
मीडिया,सरकार + ह्यांची देश विघातक युती.
केंद्रीय एजन्सी चा गैर वापर
ही केंद्र सरकार ची काम आहेत.
Maharashtra sarkar ची काम अशी नाहीत.
लोक खुश आहेत महाराष्ट्र सरकार च्या कामगिरी वर

sunil kachure's picture

22 Jun 2022 - 10:19 pm | sunil kachure

शरद पवार ह्यांची परवानगी नसेल तर अजित पवार पक्ष विरोधी वागतील हे अशक्य होते तरी फडणवीस फसले.....
ठाकरे च विरुद्ध पत्करून ३५, आमदार फुटतील ह्या वर विश्वास ठेवून परत ..
फडणवीस ह्यांचा च गेम होण्याची शक्यता जास्त आहे...

कंजूस's picture

22 Jun 2022 - 5:00 pm | कंजूस

आमचा पक्ष हाच खरा शिवसेना पक्ष असा दावा शिंदे गट करू शकतो का?

श्रीगुरुजी's picture

22 Jun 2022 - 5:10 pm | श्रीगुरुजी

हो. धनुष्यबाण हे पक्षचिन्ह सुद्धा शिंदे गटाला मिळू शकेल. त्यांच्या गटाला शिवसेना हे नाव मिळू शकेल व ठाकरे गटाला शिवसेना (U) किंवा शिवसेना (T) असे नाव मिळू शकेल.

इरसाल's picture

23 Jun 2022 - 12:21 pm | इरसाल

मग यु आणी टी मिळुन काय " युटी युटी सॉरी उठी उठी गोपाळा " कां?

अमरेंद्र बाहुबली's picture

23 Jun 2022 - 1:11 pm | अमरेंद्र बाहुबली

ख्या ख्या ख्या! काय विनोद होता :)

शाम भागवत's picture

22 Jun 2022 - 5:45 pm | शाम भागवत

हो.
पक्षचिन्ह सुध्दा मिळवू शकतो.
आमदार ३७+ असले पाहिजेत.

शाम भागवत's picture

22 Jun 2022 - 7:07 pm | शाम भागवत

कंकाका,
माझं उत्तर अर्धवट आहे. निवडणूक आयोग हे सगळं ठरवतो व त्यासाठी बऱ्याच गोष्टींची पूर्तता करावी लागते असं दिसतंय.

येथे २ मिनिटे ५ सेकंदावर पूर्ण उत्तर मिळेल. <\a>

sunil kachure's picture

22 Jun 2022 - 7:21 pm | sunil kachure

आज
मोदी नसतील तर बाकी bjp लोकांना कवडीची किंमत नाही.
राहुल किंवा सोनिया पाठी नसतील तर ..
काँग्रेस मधील कोणालाच काडी ची किंमत नाही..
शरद पवार चा आशीर्वाद नसेल तर राष्ट्रवादी मधील कोणालाच काडी ची किंमत नाही.
ठाकरे पाठी मागे नसतील तर एकनाथ शिंदे ची किंमत झीरो आहे.

sunil kachure's picture

22 Jun 2022 - 7:42 pm | sunil kachure

बंडखोर लोकांना,दगाबाज लोकांना जनतेने स्वीकारले नाही.
राणे,राज ठाकरे महत्व ची उदाहरणे.
देशात पण आहेत .
पवार साहेब फक्त अपवाद आहेत.
कारण त्यांचा पूर्ण महाराष्ट्र मधील लोकांशी वैयतिक संबंध आहेत.
एकनाथ शिंदे आता तात्पुरते bjp साठी उपयोगी आहे..
पुढे ते काही कामाचे नाहीत..लोकांनी ठाकरे न मुळे त्यांना निवडून दिले आहे..

तुमच्या लेखनाला अस्विकार करायचा ऑप्शन आहे का?

अमरेंद्र बाहुबली's picture

22 Jun 2022 - 11:36 pm | अमरेंद्र बाहुबली

तूम्हालाही लोक झेलतातच ना??

मिर्ची इकडे कशी लागली असेल बरं

sunil kachure's picture

22 Jun 2022 - 11:18 pm | sunil kachure
sunil kachure's picture

22 Jun 2022 - 11:19 pm | sunil kachure
डाम्बिस बोका's picture

23 Jun 2022 - 3:47 am | डाम्बिस बोका

१. शिंदे बाबा आणी ४० आमदाराचा पंचतारांकित खर्च कोणी केला असेल?
२. सध्या घोडेबाजारात आमदाराच्या rate काही कोटी गृहीत धरला, तर जवळपास ५०० ते १००० कोटीची गुंतवणूक अमित शाह नी केली आहे. त्यावर परतावा मिळेल का?
३. या पुढे महाराष्ट्राचे राजकारण गुजरात मधून चालणार का? मंत्रीपद, मलाई पद ह्यासाठी मुंबई, नागपूर ऐवजी सुरत/अहमदाबाद चे खेटे घालावे लागणार का?
४. भाजप ला पाठींबा देणारं शुद्ध होणार का?
५. पैसे, दादागिरी , कंपूशाही वापरून कशीही सत्ता मिळवायची हे अनेक राज्यात वापरलेलं धोरण पाहता भाजप चा काँग्रेस होण्याचं प्रवास पूर्ण झाला का? कि अजून काही बाकी आहे?
६. सत्तेसाठी लाज, धर्म, नीतिमत्ता, जनमत सगळे सोडून देणाऱ्या सर्वपक्षीय लोकांना आपण असाच आंधळा पाठींबा देणार का?
७. ह्या निर्लज्ज राजकारणाऱ्यांची ही थेरं आपण अशीच पाहत बसणार का ?

गेली दोन वर्ष पेपर वाचताना, फक्त चिखलफेक, घाणेरड राजकारण, नेत्याचा स्वार्थ, दुराभिमान, लाचारी पाहून खरंच वीट आला आहे. समाजकारण, जनतेचे प्रश्न, विधेयक, नवीन योजना, ह्यावर चर्चा न करणारे किंवा ती लायकी पण नसणारे हे अशिक्षित, अल्पशिक्षित नालायक लोक आपण का निवडून देतो?

चौकस२१२'s picture

23 Jun 2022 - 8:10 am | चौकस२१२

सत्तेसाठी लाज, धर्म, नीतिमत्ता, जनमत सगळे सोडून देणाऱ्या सर्वपक्षीय लोकांना आपण असाच आंधळा पाठींबा देणार का?
सेने बद्दल बोलताय का? कारण युतीला लोकांनी भरपूर मते देऊन सुद्धा त्यांनी विश्वास घात केला जनतेचा त्याच काय ?

डाम्बिस बोका's picture

23 Jun 2022 - 6:51 pm | डाम्बिस बोका

मी सर्व पक्षांबद्दल बोलतो आहे. सत्ता प्राप्तीसाठी चाललेला हा खेळखंडोबा हताशपणे पाहत आहे.

भारतीय राजकारणी लोकांचे जे काही वाईट गुण आहेत ते सर्व bjp मध्ये पण आहेत.उलट थोडे जास्त च आहेत

ज्याची केंद्रात सत्ता आहे त्यांनी विरोधी पक्षाची राज्य सरकार गैर प्रकार करून कमजोर करायची.
लालच ,भीती दाखवून त्यांचे आमदार फोडायचे आणि आपल्याच पक्षाचे जिथे राज्य सरकार आहे तिथे त्यांना डांबून ठेवायचे.
देश कायद्याने चालतो ना?
मग ही गुंड टोळ्या सारखी वर्तणूक सरकार का करत असतात..
ये मेरा इलका ये तेरा इलाका.

डाम्बिस बोका's picture

23 Jun 2022 - 6:54 pm | डाम्बिस बोका

काँग्रेस च्या काळापासून चालू असलेली हि सरकारी कारस्थाने, BJP आल्यावर कमी किंवा बंद होतील अशी भाबडी अशा होती.
सरकारी यंत्रणेचा गैरवापर करण्यात BJP कुठेही काँग्रेस च्या मागे नाही.

कानडाऊ योगेशु's picture

23 Jun 2022 - 12:37 pm | कानडाऊ योगेशु

ह्या सगळ्या प्रकारात काका पूर्णपणे विजयी झाले आहेत. शिवसेनेची पूर्णपणे वाताह्त करुन ठेवली व त्यासाठी बदनाम भाजप होणार व आयते लोणी काकांच्या पारड्यात पडणार. दोन बोक्यांने आणला हो आणला चोरुन लोण्याचा गोळा ह्या कवितेची प्रकर्षाने आठवण झाली.

क्लिंटन's picture

23 Jun 2022 - 12:50 pm | क्लिंटन

शिवसेनेची पूर्णपणे वाताह्त करुन ठेवली व त्यासाठी बदनाम भाजप होणार

शिवसेनेची वाताहत झाली तर त्यासाठी भाजप कसा काय बदनाम होणार बुवा?

कानडाऊ योगेशु's picture

23 Jun 2022 - 12:57 pm | कानडाऊ योगेशु

शिवसेने कडुन काकांनीच भाजपची बदनामी करुन घेतलीये.अमुक झाले तमुक झाले म्हणुन युती तोडावी लागली हेच पालुपद गेल्या दोन अडीच वर्षात शिवसेनेच्या नेतृत्वाकडुन ऐकले आहे. काकांनी प्रसंगानुसार त्यात तेल ओतले. काकांना मत देण्याबद्दल संदिग्धता असली तर राजकारण कसे करावे ह्याचे एक क्लासिक उदाहरण काकांनी डोळ्यासमोर ठेवले आहे.

क्लिंटन's picture

23 Jun 2022 - 1:04 pm | क्लिंटन

तशी भाजपची बदनामी काँग्रेससमर्थक आणि मोठे मोठे विचारवंत अगदी जनसंघाच्या दिवसांपासून करत आले आहेत. त्यात नवीन काय? :)

शाम भागवत's picture

23 Jun 2022 - 12:56 pm | शाम भागवत

खर आहे.
राष्ट्रवादीची सतत घटत असलेली मतदान टक्केवारी यावेळेस कदाचित थांबेल. पण ती वाढणार नाही. ही टक्केवारी न वाढण्याचे कारण एकच. या अडीच वर्षांच्या कालावधीत जनतेचा खूप फायदा झाला आहे, त्यांचे जीवन अधिक सुखकाराक झाले आहे असे जनतेला वाटत नसावे. या सरकारमुळे खूप काही वेगळे झाले आहे असे काहीही जाणवत नाही आहे.
मात्र
जर आता जे नवीन सरकार येईल त्याने तुलनात्मक दृष्ट्या पुढील अडीच वर्षात धडाक्यात काम केले आणि ते काम जनतेपर्यंत पोहोचवले तर मात्र राष्ट्रवादीला सध्या मिळालेला फायदा शून्यवत होईल. उठा यांच्या करिषम्याला आणखीनच उतरती कळा लागेल. पण हे सर्व नवीन सरकारच्या कारभारावर अवलंबून असेल.

sunil kachure's picture

23 Jun 2022 - 1:10 pm | sunil kachure

सरकार चे काम हा मुद्धा असेल तर ह्या सरकार नी उत्तम काम केले आहे.
किती ही द्वेष केला तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी ह्यांची मुळ ग्रामीण महारष्ट्र मुरलेली आहेत
.त्यांच्या कडे अनेक संस्था आहेत आणि ग्रामीण भागातील प्रश्न माहीत आहेत....
हे सत्य कृपया डोळ्यावर पट्टी बांधून नाकारू नका.
सेना पण ठीक आहे पण bjp हा शहरी पक्ष आहे .आर्थिक आणि सामाजिक उच्च गटातील लोकांचा पक्ष आहे..
हिंदुत्व हे हत्यार आहे हिंदुत्व आणि हिंदू हीत ह्याचा काडी चा संबंध नाही.
सेना महाराष्ट्र प्रेमी आहे राज्य विरोधी कोणतीच भूमिका ते घेणार नाहीत.
Bjp आनी काँग्रेस लं महाराष्ट्र शी काही देणे घेणे नाही.
काही ही झाले तरी सेना आणि राष्ट्रवादी हे पक्ष महाराष्ट्र मध्ये चांगल्या स्थिती मध्ये हवेत च.
राज्य हीत हेच सर्वोच्च हीत..
बहुतेक लोकांना त्याची जाणीव आहे..
म्हणून bjp लाचार होवून सेने ला जवळ करते.

Bjp हा काही हिंदू हीत वादी नाही आणि ह्या राज्याची अस्मिता जपणारा तर बिलकुल नाही.
उच्च वर्णीय आणि उद्योगपती हेच लाभार्थी असणार यांच्या राज्यात.

उच्च वर्णीय आणि उद्योगपती हेच लाभार्थी असणार यांच्या राज्यात.
आली गाडी परत जातीयत्यावर तरी बर ना मोदी ना शहा ना योगी हे जाणेउधारी या उलट समस्त नेहरू परिवार अगदी ममता पण जाणेउधारी

श्रीगुरुजी's picture

23 Jun 2022 - 2:20 pm | श्रीगुरुजी

शिंदे गटाला मान्यता देण्याचे उपसभापती नरहरी झिरवळ नाकारू शकतात. शिंदे गटातील सेनेच्या आमदारांवर पक्षांतरबंदी कायद्यांतर्गत कारवाई करून झिरवळ त्यांची आमदारकी रद्द करून त्यांना विश्वासदर्शक ठरावावर मत देण्यास प्रतिबंध करू शकतात. अशा परिस्थितीत ही लढाई न्यायालयात जाईल.

शाम भागवत's picture

23 Jun 2022 - 2:54 pm | शाम भागवत

२/३ पेक्षा जास्त आमदार असले तरी?
अवघड वाटतंय.
कोर्टात असला प्रकार टिकणार नाही. आठवडाभरात कोर्ट निर्णय येईल.

श्रीगुरुजी's picture

23 Jun 2022 - 3:10 pm | श्रीगुरुजी

२/३ पेक्षा जास्त आमदार असले तरी उपसभापती मान्यता न देता अडवणूक करून वेळ काढण्याचा प्रयत्न करतील.

शाम भागवत's picture

23 Jun 2022 - 3:17 pm | शाम भागवत

तेच म्हणतोय. फार वेळ काढता येणार नाही. कायद्याच्या तरतूदी स्पष्ट असल्याने फार झटकन कोर्टाचा निर्णय येईल. कारण प्रश्न विश्वासदर्शक ठरावाचा असेल.

म्हणजे त्यांचेही करिअर डागाळून घेतील?

देश अनेक संकटाला तोंड देत आहे.
प्रचंड गरिबी
प्रचंड बेरोजगारी.
प्रचंड महागाई.
भ्रष्ट प्रशासन.

हे मुद्दे कोणाला महत्वाचे वाटत नाहीत.
आज २३ जून तरी पावूस नाही
धरणातील पाण्याच्या साठ्याची लेव्हल कमी होत आहे.
असाच पावूस लांबला तर देशाचे power स्टेशन असणारी शहर प्रचंड पाणी टंचाई मध्ये सापडतील..भारत इतका पण प्रगत नाही की काही उपाय करू शकेल.
आणि .अपरिपक्व भारतीय सरकार,मीडिया,जनता शिंदे सारख्या अतिशय फालतू मुद्द्याला महत्व देत आहेत...
संकट दारावर उभ आहे ह्याची जाणीव कोणाला नाहीं

म्हणजे पाणी आयात करणार किंवा दुसऱ्या देशांचा पाऊस भारताकडे वळवणार?

सुबोध खरे's picture

23 Jun 2022 - 8:11 pm | सुबोध खरे

संकट दारावर उभ आहे

मग दार बंद करून खिडकितुन ये जा करा

राहू द्या संकटाला दारातच उभं

हा का ना का

प्रमोद देर्देकर's picture

23 Jun 2022 - 8:53 pm | प्रमोद देर्देकर

आत्ता जे कचुरे साहेब बोलत आहेत त्यात तथ्य आहे. मिडीया कुठल्याही बातम्यांचे रतीब लावुन जीवनावश्यक गोष्टींविषयी बातम्याच देत नाही. मी या आधीही लिहलं होतं की आता अमीर खान चा कार्यक्रम बंद झाला म्हणजे सगळ्या गावांना पाणी मिळालं का? त्या च्या कार्यक्रमात निदान परिस्थिती काय आहे हे समजत तरी होतं.

राज्यात पक्षीय भुकंप झालाय हे मिडीयावाले वारंवार नको त्या चर्चा करुन आपल्या माथी मारतेय. काही झाले तरी महगाई कमी होणार नाहीये, पाऊस नाही पडला तर ३ ते ४ कि.मी. वरुन पाणी आणणार्या जनतेचे हाल अधिक गहन होणार आहेत हे कोणी पाहत नाहीये. ज्याने आपल्या सारख्या सामान्य माणसांना काडीचा फायदा नाही तरी लोक टीव्ही वर २४ तास नजर लावुन बसलेत.

अफगाणीस्तानात खरोखर चा ७ रिश्टर स्केलचा भुकंप होवुन एक हजार लोक मरण पावले त्या विषयी परिस्तीथीची काहीच बातमी येत नाहीये. निदान भारताकडून काय मदत केली गेली किंवा आपले भारतीय तिथे अडकेलेले आहेत का नाही याची काही खबरबात नाहीच आहे.