Skip to main content

ताज्या घडामोडी - जून २०२२ (भाग २)

लेखक चंद्रसूर्यकुमार यांनी शनिवार, 18/06/2022 17:26 या दिवशी प्रकाशित केले.
आधीच्या भागात २५० प्रतिसाद झाल्याने नवा भाग काढत आहे. आधीच्या भागातील चर्चेसंदर्भात प्रतिसाद द्यायचा असल्यास त्या भागात आणि नवीन काही लिहायचे असल्यास या भागात लिहावे ही विनंती. लोकप्रिय व्यक्तीमत्व अभिजीत बिचुकले यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उडी घ्यायचे ठरविले आहे. विविध राज्यातील १०० आमदारांचा पाठिंबा मिळविण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. आपल्याला राज्यघटना आणि कायदा याची चांगली जाण असून आपण राष्ट्रपती व्हायला योग्य आहोत असा त्यांचा दावा आहे. आपली राष्ट्रपती व्हायची इच्छा आहे हे त्यांनी मागच्या वेळेस मोदींना सांगितले होते पण आयत्या वेळेस मोदींनी रामनाथ कोविंदांचे नाव पुढे आणल्याने त्यांच्या हातातोंडाशी आलेला घास गेला असे दिसते. असो. अभिजीत बिचुकलेंना हार्दिक शुभेच्छा. २५ जुलै रोजी नवे राष्ट्रपती म्हणून ते शपथ घेताना दिसतील का? आणखी एक मराठी व्यक्ती राष्ट्रपती झाल्यास त्याचा आपल्या सगळ्यांनाच आनंद व्हायला हवा :) Bichukale

वाचने 46247
प्रतिक्रिया 216

प्रतिक्रिया

In reply to by श्रीगुरुजी

तेच म्हणतोय. फार वेळ काढता येणार नाही. कायद्याच्या तरतूदी स्पष्ट असल्याने फार झटकन कोर्टाचा निर्णय येईल. कारण प्रश्न विश्वासदर्शक ठरावाचा असेल.

देश अनेक संकटाला तोंड देत आहे. प्रचंड गरिबी प्रचंड बेरोजगारी. प्रचंड महागाई. भ्रष्ट प्रशासन. हे मुद्दे कोणाला महत्वाचे वाटत नाहीत. आज २३ जून तरी पावूस नाही धरणातील पाण्याच्या साठ्याची लेव्हल कमी होत आहे. असाच पावूस लांबला तर देशाचे power स्टेशन असणारी शहर प्रचंड पाणी टंचाई मध्ये सापडतील..भारत इतका पण प्रगत नाही की काही उपाय करू शकेल. आणि .अपरिपक्व भारतीय सरकार,मीडिया,जनता शिंदे सारख्या अतिशय फालतू मुद्द्याला महत्व देत आहेत... संकट दारावर उभ आहे ह्याची जाणीव कोणाला नाहीं

In reply to by sunil kachure

म्हणजे पाणी आयात करणार किंवा दुसऱ्या देशांचा पाऊस भारताकडे वळवणार?

In reply to by sunil kachure

संकट दारावर उभ आहे मग दार बंद करून खिडकितुन ये जा करा राहू द्या संकटाला दारातच उभं हा का ना का

आत्ता जे कचुरे साहेब बोलत आहेत त्यात तथ्य आहे. मिडीया कुठल्याही बातम्यांचे रतीब लावुन जीवनावश्यक गोष्टींविषयी बातम्याच देत नाही. मी या आधीही लिहलं होतं की आता अमीर खान चा कार्यक्रम बंद झाला म्हणजे सगळ्या गावांना पाणी मिळालं का? त्या च्या कार्यक्रमात निदान परिस्थिती काय आहे हे समजत तरी होतं. राज्यात पक्षीय भुकंप झालाय हे मिडीयावाले वारंवार नको त्या चर्चा करुन आपल्या माथी मारतेय. काही झाले तरी महगाई कमी होणार नाहीये, पाऊस नाही पडला तर ३ ते ४ कि.मी. वरुन पाणी आणणार्या जनतेचे हाल अधिक गहन होणार आहेत हे कोणी पाहत नाहीये. ज्याने आपल्या सारख्या सामान्य माणसांना काडीचा फायदा नाही तरी लोक टीव्ही वर २४ तास नजर लावुन बसलेत. अफगाणीस्तानात खरोखर चा ७ रिश्टर स्केलचा भुकंप होवुन एक हजार लोक मरण पावले त्या विषयी परिस्तीथीची काहीच बातमी येत नाहीये. निदान भारताकडून काय मदत केली गेली किंवा आपले भारतीय तिथे अडकेलेले आहेत का नाही याची काही खबरबात नाहीच आहे.