✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

ताज्या घडामोडी - जून २०२२ (भाग २)

च
चंद्रसूर्यकुमार यांनी
Sat, 06/18/2022 - 17:26  ·  लेख
लेख
आधीच्या भागात २५० प्रतिसाद झाल्याने नवा भाग काढत आहे. आधीच्या भागातील चर्चेसंदर्भात प्रतिसाद द्यायचा असल्यास त्या भागात आणि नवीन काही लिहायचे असल्यास या भागात लिहावे ही विनंती. लोकप्रिय व्यक्तीमत्व अभिजीत बिचुकले यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उडी घ्यायचे ठरविले आहे. विविध राज्यातील १०० आमदारांचा पाठिंबा मिळविण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. आपल्याला राज्यघटना आणि कायदा याची चांगली जाण असून आपण राष्ट्रपती व्हायला योग्य आहोत असा त्यांचा दावा आहे. आपली राष्ट्रपती व्हायची इच्छा आहे हे त्यांनी मागच्या वेळेस मोदींना सांगितले होते पण आयत्या वेळेस मोदींनी रामनाथ कोविंदांचे नाव पुढे आणल्याने त्यांच्या हातातोंडाशी आलेला घास गेला असे दिसते. असो. अभिजीत बिचुकलेंना हार्दिक शुभेच्छा. २५ जुलै रोजी नवे राष्ट्रपती म्हणून ते शपथ घेताना दिसतील का? आणखी एक मराठी व्यक्ती राष्ट्रपती झाल्यास त्याचा आपल्या सगळ्यांनाच आनंद व्हायला हवा :) Bichukale
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
45473 वाचन

💬 प्रतिसाद (216)

प्रतिक्रिया

तो धरतीपकड नावाचा कोणीतरी एक

श्रीगुरुजी
Sat, 06/18/2022 - 17:33 नवीन
तो धरतीपकड नावाचा कोणीतरी एक इसम प्रत्येक वेळी राष्ट्रपती/उपराष्ट्रपती निवडणुकीला उभा रहायचा. प्रत्येक वेळी त्याच्या अर्जावर स्वाक्षरी करणारे समर्थक आमदार/खासदार त्याला कसे मिळत होते?
  • Log in or register to post comments

धरतीपकड

चंद्रसूर्यकुमार
Sat, 06/18/2022 - 17:41 नवीन
प्रत्येक वेळी त्याच्या अर्जावर स्वाक्षरी करणारे समर्थक आमदार/खासदार त्याला कसे मिळत होते?
तेच समजत नाही. काका जोगिंदरसिंग हे त्याचे मूळ नाव होते. त्याने नगरसेवकापासून राष्ट्रपतीपदापर्यंत जवळपास २०० वेळा निवडणुक लढवली होती. तो प्रत्येक वेळेस हरला नव्हे त्याची अनामत रक्कमही जप्त झाली हे वेगळे सांगायलाच नको. त्यामुळे त्याने 'धरतीपकड' हे टोपणनाव घेतले होते. त्याला अगदी राष्ट्रपती/उपराष्ट्रपतीपदाची निवडणुक लढवताना प्रस्तावर म्हणून आमदार/खासदारांच्या सह्या मिळायच्याच. पण थोडीफार मतेही मिळायची. १९९२ च्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत त्याने के.आर.नारायणनविरोधात निवडणुक लढवली होती आणि एका खासदाराचे मत त्याला मिळाले होते. १९९२ मध्येच राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शंकरदयाळ शर्मा आणि जी.जी.स्वेल यांच्याबरोबरीने धरतीपकडनेही निवडणुक लढवली होती आणि त्याला हजारेक मूल्य असलेली मते मिळाली होती. याचा अर्थ त्याला पूर्ण देशातून २-३ मते मिळाली असली पाहिजेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

रोचक माहिती.

प्रसाद_१९८२
Sat, 06/18/2022 - 18:52 नवीन
हे 'धरती पकड' नाव पहिल्यांदाच ऐकले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

प्रत्येक वेळी त्याच्या

अमरेंद्र बाहुबली
Sat, 06/18/2022 - 22:51 नवीन
प्रत्येक वेळी त्याच्या अर्जावर स्वाक्षरी करणारे समर्थक आमदार/खासदार त्याला कसे मिळत होते? श्रिगुरूजी, तेव्हा आमदार खसदार ह्यांची सही असण्याचे बंधन नव्हते. कुणीही ऊभा राहू शकत होतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

त्या बिचुकले नामक इसमाला

विजुभाऊ
Sat, 06/18/2022 - 19:02 नवीन
त्या बिचुकले नामक इसमाला सातार्‍यात मी एकदा भेटलो आहे. प्रचंड उर्मट अणि स्वतःला सर्वज्ञ समजणारा इसम आहे. तो जर राष्ट्रपती झाला तर या देशाचे काय होईल कोण जाणे. त्याला समर्थन देणारे खासदार कसे मिळतात कोण जाणे.
  • Log in or register to post comments

बिचुकलेचे पुण्यातील मंडईत

श्रीगुरुजी
Sat, 06/18/2022 - 19:19 नवीन
बिचुकलेचे पुण्यातील मंडईत पेढ्यांचे दुकान आहे. तो बऱ्याचदा दुकानात असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

अरे...

प्रदीप
Sat, 06/18/2022 - 20:01 नवीन
प्रचंड उर्मट अणि स्वतःला सर्वज्ञ समजणारा इसम आहे.
म्हणजे आपला मराठी सुब्रमण्यम स्वामीच, म्हणा की !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

सुब्रह्मण्यम स्वामी अत्यंत

श्रीगुरुजी
Sat, 06/18/2022 - 20:03 नवीन
सुब्रह्मण्यम स्वामी अत्यंत बुद्धिमान आहेत. बिचकुले आचरट चम्या आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप

सुब्रह्मण्यम स्वामी अत्यंत

अमरेंद्र बाहुबली
Sun, 06/19/2022 - 13:25 नवीन
सुब्रह्मण्यम स्वामी अत्यंत बुद्धिमान आहेत. ते बरोबर आहे हो. पण अध्येमध्ये ते भाजपला घरचा आहेर देत असतात. मग त्यांच्यावर टिका करायला नको?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

ज्ञान प्राप्ती

sunil kachure
Sun, 06/19/2022 - 13:48 नवीन
भगवान बुध्द ना पिपळाच्या झाडाखाली दिव्य ज्ञान प्राप्ती झाली होती.. आईनस्टाईन लं तर सफरचंद च्या झाडं खाली ज्ञान प्राप्ती झाली होती. तशा आपल्या तेजस्वी , दैदिप्मान ,विश्व गुरू ह्यांना अयोध्या मध्ये गेल्यावर दिव्यज्ञान मिळते असे तर नाही ना? मध्ये मध्ये ज्ञान रिफिल करण्यासाठी पण तिथे जावे लागते. तेजस्वी बुद्धी चे हेच गुपित असावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

तो न्यूटन होता.

Bhakti
Sun, 06/19/2022 - 13:54 नवीन
आईनस्टाईन लं तर सफरचंद च्या झाडं खाली ज्ञान प्राप्ती झाली होती. अवघड आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sunil kachure

चुकलेच

sunil kachure
Sun, 06/19/2022 - 13:59 नवीन
,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Bhakti

एकदम गलत..

कानडाऊ योगेशु
Sun, 06/19/2022 - 14:06 नवीन
एकदम गलत.. चुकलेच नाही तर बिचुकलेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sunil kachure

कोणत्या ठिकाणी / कोणत्या झाडाखाली ज्ञानप्राप्ती

Trump
Sun, 06/19/2022 - 14:06 नवीन
श्री कचुरे, तुम्हाला कोणत्या ठिकाणी / कोणत्या झाडाखाली ज्ञानप्राप्ती झाली आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sunil kachure

त्यांना,

प्रसाद_१९८२
Sun, 06/19/2022 - 16:57 नवीन
मोहाच्या झाडाखाली ज्ञानप्राप्ती झाली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Trump

:D

सुखी
Sun, 06/19/2022 - 22:22 नवीन
:D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद_१९८२

तुम्ही पण बिचुकलेच!! :-)

सुक्या
Mon, 06/20/2022 - 02:18 नवीन
तुम्ही पण बिचुकलेच!! :-) आमच्या खबरीं ने दिलेल्या पक्क्या टीप नुसार त्यांना "ताडा च्या ज्ञानप्राप्ती झाली आहे"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद_१९८२

"ताडा च्या ज्ञानप्राप्ती झाली

सुक्या
Mon, 06/20/2022 - 02:20 नवीन
"ताडा च्या ज्ञानप्राप्ती झाली आहे" ऐवजी . . "ताडा च्या झाडाखाली ज्ञानप्राप्ती झाली आहे" असे वाचावे ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुक्या

बदल केला तरी पीजे तो पीजेच

अमरेंद्र बाहुबली
Mon, 06/20/2022 - 08:11 नवीन
बदल केला तरी पीजे तो पीजेच राहनार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुक्या

ज्यांना समजायचंय ते समजणारच

सुबोध खरे
Mon, 06/20/2022 - 09:38 नवीन
ज्यांना समजायचंय ते समजणारच तुम्ही टेन्शन नका घेऊ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

निशा सिंग बद्दल तुम्हाला काही माहित आहे का....?

Nitin Palkar
Sat, 06/18/2022 - 20:26 नवीन
https://theprint.in/politics/who-is-nisha-singh-ex-gurugram-councillor-convicted-for-inciting-mob-at-demolition-site-in-2015/938539/
  • Log in or register to post comments

ट्रम्प ह्यांचे "सल्लागार"

साहना
Sun, 06/19/2022 - 04:49 नवीन
ट्रम्प ह्यांचे "सल्लागार" श्रीयुत पीटर नावारो ह्यांची आठवण आली. नावरो प्रत्येक निवडणूक लढले आणि हरले. बहुतेक इलेक्शन ते डेमोक्रॅट म्हणून लढले. एकदा तर हिलरी क्लिंटन ह्यांनी त्यांचा प्रचार केला होता आणि अगदी सेफ सीटवरून लढले तेंव्हा सुद्धा डेपोसिट जप्त. शेवटी अगदी आपल्या HOA चे इलेक्शन सुद्धा हरले. मग ते सोडून त्यांनी आपले नाव बदलले आणि "रॉन वीरा" नावानी पुस्तके वगैरे लिहायचे आणि मग नावरो नावाने दुसरी पुस्तके लिहून त्यांत रॉन वीरा ला "एक्स्पर्ट" म्हणून कोट करायचे. अभिजीत बिचुकले सारखे विद्वत्ताप्रचुर व्यक्तिमत्व राष्ट्रपती भवनात अत्यंत शोभून दिसले असते आणि त्यांच्या प्रभावी अस्तित्वाने त्या भवनाची गरिमा वाढली असती ह्यांत शंका नाही. बिचुकले म्हणजे उधोजींचे तडफदार व्यक्तिमत्व, गडकरी ह्यांची पिळदार शरीरयष्टी, पवार ह्यांची खणखणींत वाणी आणि साक्षात मोदी ह्यांचे कौटुंबिक व्यक्तिमत्व ह्यांचे सुयोग्य मिश्रण होय. पण बिचुकले ह्यांचा योग्य तो सन्मान करण्याची क्षमता भारतीय व्यवस्थेत नाही. वेलेन्टाइन डे दिवशी ज्यांना गर्लफ्रेंड आहे अश्या लोकांना धमकावत फिरणाऱ्या संस्कृतीरक्षण शिळ्या सैनिकाला त्याच बागेंत कुणा ललनेने अचानक गुलाबाचे फुल द्यावे आणि तो शिळा सैनिक गोंधळून जावा अशीच अवस्था आम्हा जनतेची बिचुकले ह्यांच्या अस्तित्वापुढे होईल.
  • Log in or register to post comments

ल गो थत्ते

दिगोचि
Sun, 06/19/2022 - 08:48 नवीन
सुमारे ६०-६५ वर्शापूर्वी मुम्बईच्या गिरगाव भागातले हे ग्रहस्थ नेहरून्च्या विरुद्ध निवडणुकीत उभे राहायचे व डिपॉझिट जप्त न होता हरायचे. नन्तर त्यानी आपले नाव आणि धर्म बदलून ग्यानी कर्तारसिन्ग असे नाव घेतले होते. ते पगडी घालून आणि तलवार घेऊन फिरत असत.
  • Log in or register to post comments

बिचुकले म्हणजे उधोजींचे

चिक्कु
Sun, 06/19/2022 - 11:58 नवीन
बिचुकले म्हणजे उधोजींचे तडफदार व्यक्तिमत्व, गडकरी ह्यांची पिळदार शरीरयष्टी, पवार ह्यांची खणखणींत वाणी आणि साक्षात मोदी ह्यांचे कौटुंबिक व्यक्तिमत्व ह्यांचे सुयोग्य मिश्रण होय.
आम्हाला दात ईचकायला लावायला हातभार लावला आहे आपण.
  • Log in or register to post comments

विरोधी पक्षांनी

sunil kachure
Sun, 06/19/2022 - 20:11 नवीन
विरोधी पक्षांनी आता एकजूट दाखवणे खूप खूप गरजेचे आहे.५२,,% मत विरोधी पक्षांकडे आहेत. फक्त एकजूट असणे महत्वाचे आहे. हुशार,स्वाबुद्धी असणारा ,राजकीय व्यक्ती नसला तरी चालेल. पण सर्व विरोधी पक्षांनी एक होवून राष्ट्रपती विरोधी पक्षाने उभा केलेला उमेदवार च झाला पाहिजे. काळ नाजूक आहे.
  • Log in or register to post comments

काय लपवण्याचा अजेंडा असावा?

निनाद
Mon, 06/20/2022 - 03:27 नवीन
एखाद्या योजने विषयी विरोध करून थेट अचानक जाळ्पोळ दंगल वगैरे निर्माण केली जाते. त्यावेळी संशय येतो नक्की कशावरून लक्ष हटवण्याचा प्रयत्न आहे? अशी काय ताजी घडामोड आहे जी माध्यमातून नाहीशी करणे आवश्यक झाले?
  • Log in or register to post comments

चीनचे राजदूत द हिंदूच्या भेटीला!

निनाद
Mon, 06/20/2022 - 03:36 नवीन
भारतातील चीनचे राजदूत सन वेइडोंग यांनी भारतातील प्रमुख इंग्रजी वृत्तपत्र द हिंदूच्या मुख्यालयाला भेट दिली. चीनच्या राजदूतांना द हिंदू वृत्तपत्राबरोबर परस्पर समज आणि विश्वास निर्माण करायचा आहे! याच वृत्तपत्राने चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या शताब्दी वर्षात भल्यामोठ्या चीनी जाहिराती प्रसिद्ध केल्या होत्या. चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या शताब्दी वर्षात भारतातील सीताराम येचिरी, डी राजा, एस. सेंथिलकुमार आणि जी. देवराजनिन यांसारख्या अनेक कम्युनिस्ट नेत्यांनीही भाग घेतला होता. मुख्य माध्यमांत याची कुठेही बातमी आलेली नाही हे नोंद घेण्याजोगे आहे!
  • Log in or register to post comments

https://www.lokmat.com

श्रीगुरुजी
Mon, 06/20/2022 - 07:08 नवीन
https://www.lokmat.com/national/agneepath-protest-agneepath-scheme-big-protest-may-happen-in-delhi-several-lakh-tractors-can-travel-to-delhi-says-rakesh-tikait-a653/ दलालांना भडकवून आंदोलन करून शेतकऱ्यांचं वाटोळं केल्यानंतर हा आता तरूणांचं विटोळं करणार. जंग जंग पछाडून सुद्धा याला आणि याच्या समर्थकांना उत्तर प्रदेश व इतर तीन राज्यात भाजपला हरविता आलै नाही। मोदींनी कृषी कायदे मागे घेतल्यापासून हा अडगळीत पडला होता. आता परत हा फुरफुर करायला लागलाय. पुढील हिंसाचार टाळण्यासाठी व तरूणांना भडकवून भविष्यातील हिंसाचार टाळण्यासाठी याला तातडीने राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली दीर्घ मुदतीसाठी तुरूंगात टाकले पाहिजे.
  • Log in or register to post comments

केंद्र सरकार

डँबिस००७
Mon, 06/20/2022 - 10:38 नवीन
केंद्र सरकार राकेश टिकैत, महम्मद झुबैर ( अल्ट न्युज) , द प्रिंट, सारख्या फेक न्युज पसरवणार्या विरुद्द ठोस कारवाई का करत नाहीय ? अग्निवीर योजने विरुद्ध बराच बवाल बिहार मधला काँ ग्रेसचा मुसलमान नेता बरळला आहे. अग्निवीर् योजना मागे घ्या अन्यथा पुर्ण देश जाळु अस तो म्हणाला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

आजुन चॅनेल ची लिस्ट वाढवा

sunil kachure
Mon, 06/20/2022 - 11:35 नवीन
रिपब्लिक भारत,आज तक,आणि बाकी किंचाळून , आरडा ओरड करणारे गोदी मीडिया चॅनेल. ह्यांच्या विषयी तर रशिया पासून अनेक देशांनी आक्षेप नोंदवला आहे.
  • Log in or register to post comments

रशिया किस झाड की पत्ती है,

प्रसाद_१९८२
Mon, 06/20/2022 - 12:26 नवीन
रशिया किस झाड की पत्ती है, एकदा तुम्ही आक्षेप नोंदवा. दुसर्‍याच क्षणी सर्व चॅनेल बद होतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sunil kachure

विधानपरीषद निवडणुकीत भाजपचे

श्रीगुरुजी
Mon, 06/20/2022 - 22:42 नवीन
विधानपरीषद निवडणुकीत भाजपचे सर्व ५ उमेदवार विजयी. कॉंग्रेसचे चंद्रकांत हंडोरे पराभूत. भाजपने मविआची किमान २० मते फोडली. राज्यसभेपाठोपाठ विधानपरीषदेत मविआला जोरदार दणका.
  • Log in or register to post comments

फोडाफोडी करणे जमते. पण जनतेचे

अमरेंद्र बाहुबली
Mon, 06/20/2022 - 22:45 नवीन
फोडाफोडी करणे जमते. पण जनतेचे प्रश्न सोडवणे जमत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

खिक

चंद्रसूर्यकुमार
Tue, 06/21/2022 - 01:17 नवीन
खिक :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

माझ्या माहीतीनुसार

सुक्या
Tue, 06/21/2022 - 02:36 नवीन
माझ्या माहीतीनुसार महाराष्ट्रात "महा विकास आघाडी" चे सरकार आहे. त्यांनी जनतेचे प्रश्न सोडवणे अपेक्षित आहे. हे पण भाजपा ने करावे का? का करावे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

देशपातळीवरचे?

अमरेंद्र बाहुबली
Tue, 06/21/2022 - 08:50 नवीन
देशपातळीवरचे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुक्या

खिक्क

श्रीगुरुजी
Tue, 06/21/2022 - 09:29 नवीन
खिक्क
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

महाविकास आघाडीचे सरकार

विजुभाऊ
Tue, 06/21/2022 - 14:52 नवीन
महाविकास आघाडीचे सरकार महाराष्ट्रात आहे. त्याबद्दल बोलतोय. राज्यातले सरकार जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी नसते का? की त्यासाठी पण विरोधी पक्षच जबाबदार आहेत. काही लोकांचे प्रश्न सोडवले हे मान्य. उदा: दारूवरचे कर कमी केले. हे एक उदाहरणादाखल. तेदेखील कोणीही मागणी केली नसताना
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

डबल खिक्क

श्रीगुरुजी
Tue, 06/21/2022 - 07:37 नवीन
डबल खिक्क
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

मानले पाहिजे!

निनाद
Tue, 06/21/2022 - 04:29 नवीन
फडणवीस साडेतीन जिल्ले हिलाली ला नक्की झोपवणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

साडे तिन जिल्ह्याच्या

अमरेंद्र बाहुबली
Tue, 06/21/2022 - 08:50 नवीन
साडे तिन जिल्ह्याच्या नेत्याला बंगालच्या ननता नी दिल्लीचे केजरीवाल राष्ट्रपती बना म्हणून विनंती करतात. :) देशाचे पंतप्रधान त्यांना गुरू मानतात. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद

खिक्क

श्रीगुरुजी
Tue, 06/21/2022 - 09:29 नवीन
खिक्क
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

भाजपला २८३ पैकी पहिल्या

श्रीगुरुजी
Tue, 06/21/2022 - 07:40 नवीन
भाजपला २८३ पैकी पहिल्या पसंतीची १३४ मते मिळाली आहेत. कालच्या अनुभवावरून महा विनाश आघाडी विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक घ्यायचे धाडस करणार नाही कारण त्या निवडणुकीत सुद्धा गुप्त मतदान असते.
  • Log in or register to post comments

विधानसभेच्या अध्यक्षपदाची

अमरेंद्र बाहुबली
Tue, 06/21/2022 - 08:48 नवीन
विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक घ्यायचे धाडस करणार नाही कारण त्या निवडणुकीत सुद्धा गुप्त मतदान असते. २०१९ ला पहाटे च्या शपथेनंतर कोर्चाने आदेश दिला की हात वर करून मतदान घ्या. नी लगेच दुसर्या दिवशी राजिनामा! खिक्क. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

खिक्क

श्रीगुरुजी
Tue, 06/21/2022 - 09:28 नवीन
खिक्क
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

गाढवाच्या शेपटीला फटाक्यांचा

श्रीगुरुजी
Tue, 06/21/2022 - 09:39 नवीन
गाढवाच्या शेपटीला फटाक्यांचा सर लावून पेटविल्यानंतर ते गाढव जसे दुगाण्या झाडत सैरावैरा धावत सुटतं, तसं काल रात्रीपासून सेनेचं झालंय.
  • Log in or register to post comments

:))

प्रसाद_१९८२
Tue, 06/21/2022 - 10:24 नवीन
:))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

महाभकास आघाडी

चंद्रसूर्यकुमार
Tue, 06/21/2022 - 10:14 नवीन
महाभकास आघाडीच्या सरकारने अगदी उबग आणला आहे- नव्हे कमालीची शिसारी आणि किळस वाटायला लागावी असला प्रकार सध्या महाराष्ट्रात चालू आहेत. एक तर या सरकारची स्थापनाच मुळात लोकांनी दिलेल्या जनादेशाला पायदळी तुडवून झाली आहे. सरकारच्या पाच वर्षांच्या कार्यकाळापैकी अर्ध्यापेक्षा जास्त काळ उलटला तरी '१०५ ना घरी बसवले, १०६ ना घरी बसवले' यापुढे त्यांची गाडी जात नाही. खरं सांगायचं तर या महाभकास आघाडी सरकारने १०५/१०६ ना घरी बसविण्याव्यतिरिक्त आणखी दोनच गोष्टी साध्य केल्या आहेत. पहिली म्हणजे सत्तेला घोरपडीसारखे चिकटून राहिले आणि दुसरी म्हणजे (माझ्यासाठी) सर्वात नावडत्या मुख्यमंत्र्यांच्या यादीत केजरीवालांना दुसर्‍या नंबरला ढकलले. आपल्या मर्जीतल्या गुलाम आणि लाचार मिडियाला हाताशी धरून मधूनमधून हे आखिल ब्रह्मांडातील सर्वोत्तम मुख्यमंत्री असले कसलाही आधार आणि आगापिछा नसलेले सर्व्हे मधूनमधून प्रसिध्द करणे हा डोक्यात जाणारा आणखी एक प्रकार होता. तसेच 'उध्दव ठाकरे कित्ती कित्ती संयत भाषेत बोलतात' ची सगळ्या मोठ्यामोठ्या विचारवंतांनी केलेली हाकाटी हा डोक्यात जाणारा दुसरा प्रकार होता. अशा लोकांनी मागच्या वर्षी राज्यपालांच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर मुख्यमंत्री म्हणून ठाकरेंनी केलेले भाषण ऐकले असले तरी त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करायचे ठरवले असते. राज्यपालांच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर भाषण करताना मुख्यमंत्र्यांनी राज्याची परिस्थिती, सरकारची ध्येयधोरणे, यापुढे काय करायचा सरकारचा मानस आहे वगैरे गोष्टींवर बोलणे अपेक्षित असते. यापैकी एकाही गोष्टीचा लवलेश त्यात नव्हता. आणि 'शेतकर्‍यांना खिळे आणि चीनपुढे पळे' असले तद्दन गुडघ्यातले विधान ठाकरेंनी त्यावेळेस केले होते. ते कसले डोंबलाचे संयत भाषेतले बोलणे? सामनामधून दररोजची जी गटारगंगा व्हायची ते काय संयत भाषेत केलेली असायची का? दररोज सकाळी संजय राऊत विकाऊ मिडियासमोर जे कुंथत असतात ते अगदी संयत असते की नाही? एकवेळ ठाकरे परवडले पण हे सगळे विचारवंत अजून जास्त डोक्यात जातात. आदित्य ठाकरे पर्यावरणमंत्री म्हणून जी पोपटपंची करत असतो त्याला 'वा वा कित्ती कित्ती प्रगल्भ विचार' म्हणून माना डोलावणारी हीच ती घाणेरडी विचारवंतांची जात. त्याचे ते कौतुक बघून जणू काही आदित्य ठाकरे म्हणजे कोणी देवदूत म्हणूनच भूतलावर आला आहे असे वाटायचे कोणाला. एकीकडे हे सगळे विचारवंत मोठे फेमिनिस्ट असतात. पण संजय राठोड या शिवसेनेच्या मंत्र्यामुळे एका तरूणीने नक्की कोणत्या परिस्थितीत आत्महत्या केली असा आरोप होता त्यावर हे लोक कधी चकार शब्द बोलले आहेत? लाचार मिडिया आणि तितकेच गुलाम विचारवंत लोक हाताशी धरून महाभकास आघाडीने महाराष्ट्रात कसा स्वर्ग आणला आहे असे चित्र उभे करण्यात हे लोक यशस्वी झाले. दुसर्‍या महायुध्दात नॉर्वेमध्ये ब्रिटिश नौदलाचा पराभव झाल्यावर पंतप्रधान नेव्हिल चेंबरलेन यांना सत्ताधारी पक्षातील एक खासदार अ‍ॅमेरी यांनी ब्रिटिश इतिहासातील एक वाक्य सुनावले होते- "You have sat too long here for any good you have been doing. Depart, I say, and let us have done with you. In the name of God, go". सध्या महाराष्ट्रात घातलेल्या धुमाकुळाबद्दल ठाकरे सरकारला आणि त्याच सरकारची तळी उचलणार्‍या विचारवंतांनाही तेच म्हणावेसे वाटते-- In the name of God, go. असल्या घाणेरड्या सरकारमध्ये अजून राहिल्यास पुढच्या निवडणुकीत लोक जोड्याने बडवतील याची कुणकुण एकनाथ शिंदे आणि समर्थकांना लागली असेलच. काहीही झाले तरी एकनाथ शिंदे हे चारवेळा विधानसभेवर निवडून गेलेले जमिनीवरील कार्यकर्ते आहेत. विकाऊ मिडिया काहीही चित्र उभे करत असला तरी सामान्य जनतेत या सरकारविरोधात प्रचंड असंतोष आहे हे त्यांना समजले नसेल असे अजिबात नाही. त्यामुळे ते बंडाच्या पवित्र्यात उभे राहिले आहेत त्यामागचे कारण अगदी सहज समजू शकेल. अर्थातच डोळे उघडे ठेवणार्‍याला. इथे अगदी मिसळपाववर बघितले आहे की काही सदस्य अगदी थेट संजय राऊतांची भाषा बोलत आहेत. काही झाले तरी १०५/१०६ ना घरी बसविलेच्या पुढे त्यांचीही गाडी जात नाही. शिवसेनेच्या सत्तेमुळे संबंधित सदस्यांना चार आण्याचाही फायदा झाला असायची शक्यता शून्य. तरीही सततची संज्या राऊतची भाषा तोंडात. यांच्या सत्तेमुळे व्यक्तिशः काडीमात्र फायदा न झालेले समर्थकही असा 'अ‍ॅटिट्यूड' दाखवत असतील तर मग त्या सत्तेचा फायदा होत असलेले आणि त्याहूनही स्वतः सत्तेत बसलेले लोक कितीतरी जास्त माज करत असतील याची कल्पना येऊ शकते. सध्या जो प्रकार महाराष्ट्रात चालू आहे त्यामुळे लोकांमध्ये सरकारविरोधात मोठ्या प्रमाणावर असंतोष आहे हे डोळे उघडे ठेवणार्‍या प्रत्येकाला समजू शकेल. पण या अ‍ॅटिट्यूडमुळे डोळ्यावर झापडे आली असतील तर मग जे काही चालू आहे ते दिसणे अशक्य आहे.
  • Log in or register to post comments

पूर्ण सहमत. इतके वाईट सरकार

श्रीगुरुजी
Tue, 06/21/2022 - 10:31 नवीन
पूर्ण सहमत. इतके वाईट सरकार महाराष्ट्राला कधीही मिळाले नव्हते. अत्यंत उर्मटपुणे फुशारक्या मारणे आणि सर्व पोलिसयंत्रणा हाताशी धरून अत्यंत वाईट पद्धतीने दडपशाही करणे यापलिकडे या नालायकांनी अडीच वर्षात काहीही केलेले नाही. कुरमुसे, मदन शर्मा, केतकी चितळे, निखिल भामरे, राणा दांपत्य ही उदाहरणे समोर आहेतच. हे सरकार लवकरात लवकर जायलाच पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

हे सरकार लवकरात लवकर जायलाच

अमरेंद्र बाहुबली
Tue, 06/21/2022 - 12:18 नवीन
हे सरकार लवकरात लवकर जायलाच पाहिजे. वाट बघा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा