Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by चंद्रसूर्यकुमार on Sat, 06/18/2022 - 17:26
आधीच्या भागात २५० प्रतिसाद झाल्याने नवा भाग काढत आहे. आधीच्या भागातील चर्चेसंदर्भात प्रतिसाद द्यायचा असल्यास त्या भागात आणि नवीन काही लिहायचे असल्यास या भागात लिहावे ही विनंती. लोकप्रिय व्यक्तीमत्व अभिजीत बिचुकले यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उडी घ्यायचे ठरविले आहे. विविध राज्यातील १०० आमदारांचा पाठिंबा मिळविण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. आपल्याला राज्यघटना आणि कायदा याची चांगली जाण असून आपण राष्ट्रपती व्हायला योग्य आहोत असा त्यांचा दावा आहे. आपली राष्ट्रपती व्हायची इच्छा आहे हे त्यांनी मागच्या वेळेस मोदींना सांगितले होते पण आयत्या वेळेस मोदींनी रामनाथ कोविंदांचे नाव पुढे आणल्याने त्यांच्या हातातोंडाशी आलेला घास गेला असे दिसते. असो. अभिजीत बिचुकलेंना हार्दिक शुभेच्छा. २५ जुलै रोजी नवे राष्ट्रपती म्हणून ते शपथ घेताना दिसतील का? आणखी एक मराठी व्यक्ती राष्ट्रपती झाल्यास त्याचा आपल्या सगळ्यांनाच आनंद व्हायला हवा :) Bichukale
  • Log in or register to post comments
  • 45475 views

प्रतिक्रिया

Submitted by श्रीगुरुजी on Wed, 06/22/2022 - 14:27

In reply to बघुया काय होते आहे ते. by शाम भागवत

Permalink

माझ्या मते विन-विन परिस्थितीत

माझ्या मते विन-विन परिस्थितीत राष्ट्रवादी आहे. सरकार टिकले तर त्यांची मंत्रीपदे शाबूत राहून पवार सरकार चालवित राहतात. सरकार पडले तर राष्ट्रवादी व कॉंग्रेसवर अजिबात दोषारोप होणार नाही. मध्यावधी निवडणूक झाली तर राष्ट्रवादी + कॉंग्रेस वि. भाजप वि. सेना लढतीत राष्ट्रवादी हा सर्वात मोठा पक्ष होईल. फडणवीसांनी एकनाथ शिंदेंच्या मदतीने सरकार स्थापन केले तरी ते अस्थिर असेल व बच्चू कडू, प्रताप सरनाईक, अब्दुल सत्तार वगैरेंचा पाठिंबा घ्यावा लागेल, ज्यातून काही भाजप समर्थक अजून नाराज होतील. हे कडबोळे सरकार ऑक्टोबर २०१९ पर्यंत चालले तरी पुढील विधानसभा निवडणूक पुन्हा एकदा शिंदे गटाशी युती करून लढावी लागेल ज्यात भाजपला खूप तोटा होईल.
  • Log in or register to post comments

Submitted by शाम भागवत on Wed, 06/22/2022 - 15:02

In reply to माझ्या मते विन-विन परिस्थितीत by श्रीगुरुजी

Permalink

आपली हार होते आहे असे वाटले

आपली हार होते आहे असे वाटले तर उठा टोकाची भूमिका घेऊन राज्यपालांना विधानसभा बरखास्तीच सल्ला देतील. मला नाही तर कुणालाच नाही. :)
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Wed, 06/22/2022 - 15:06

In reply to आपली हार होते आहे असे वाटले by शाम भागवत

Permalink

हा सल्ला बहुमतातील सरकारने

हा सल्ला बहुमतातील सरकारने दिला तरच तो बंधनकारक असतो. अल्पमतात गेलेल्या सरकारचा सल्ला राज्यपालांवर बंधनकारक नसतो.
  • Log in or register to post comments

Submitted by चंद्रसूर्यकुमार on Wed, 06/22/2022 - 13:15

In reply to "शिंदेसाहेबांनी एवढी मोठी by चौकस२१२

Permalink

?

म्हणजे फडणवीस (आणि मोदी-शहा सुध्दा) एकदा अडीच दिवसाच्या गणपती प्रकरणी तोंडावर आपटल्यावर परत परत तसेच तोंडावर आपटतील हे गृहितक आहे. एकदा दुधाने तोंड पोळल्यावर कशावरून ताकही फुंकून पिणार नाहीत?
  • Log in or register to post comments

Submitted by शाम भागवत on Wed, 06/22/2022 - 13:57

In reply to ? by चंद्रसूर्यकुमार

Permalink

मुख्य म्हणजे “अरेला कारे

मुख्य म्हणजे “अरेला कारे करायला गेलो ती आमची चूक होती.” हे फडणवीसांनी कबूलपण केलंय. चूकीचं समर्थन करत बसले नाहीत. त्यामुळे ते चांगलेच सावध असणार हे नक्की. मात्र फडणवीस हुषार वगैरे अजिबात नाहीत. पवार हेच फक्त हुषार. यावेळी नक्कीच उठा बाजी पलटवणार असं ज्यांना वाटतं त्यांचे बाबतीत मात्र वेट ॲन्ड वॅाच. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by Trump on Wed, 06/22/2022 - 12:39

In reply to कायप्पा University by सुखी

Permalink

श्री राऊत यांचे काय होईल?

श्री राऊत यांचे काय होईल?
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Wed, 06/22/2022 - 13:06

In reply to कायप्पा University by सुखी

Permalink

तिकडचे इकडे आणण्यापेक्षा

इकडे मते मांडावीत. घरी दारी बाहेर पार्कात ओफीसात प्रत्येक जण मत मांडत आहे. न घाबरता मत माडा.
  • Log in or register to post comments

Submitted by चौकस२१२ on Wed, 06/22/2022 - 12:15

Permalink

जरी अँटी डेफेक्शन लागू नाही

जरी अँटी डेफेक्शन लागू नाही झाले तरी या ३५-४० "बंडखोर" परत पुढे निवडून येतील का ? भाजपने विचार करावा .. त्यापेक्षा नवीन निवडणूक लढवावी लोकांना ते जास्त पटेल असेही असेही उद्धव ठाकरे काही एका रात्रीत महाकास आघाडी सोडून एकदम भाजप बरोअबर जाणार नाहीत .. मग काय उपयोग !
  • Log in or register to post comments

Submitted by sunil kachure on Wed, 06/22/2022 - 12:33

Permalink

लगेच काही होणार नाही

पाहिले सरकार अल्प मतात आहे असा दावा विरोधी पक्षाला म्हणजे bjp ल करावा लागेल. मग राज्यपाल बहुमत सिद्ध करण्यास सांगतील. राज्यपाल ना पत्र देवून पण विधानसभेत त्या विरुद्ध मतदान होवू शकते. सरकार बहुमत सिद्ध करू शकले नाही तर . विरोधी पक्ष सत्ता स्थापन करण्याचा दावा करेल. परत मतदान. पण विरोधी पक्षाने सत्ता स्थापन करण्याचा दावा केला नाही तर विधानसभा भंग होईल. बंडखोर आमदार विधानसभा भंग झाली की लाचार होतील. Bjp आपल्या तालावर त्यांना नाचावेल सेना परत त्यांना घेणार नाही. मला नाही वाटत bjp satta स्थापन करण्याचा दावा करेल.
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Wed, 06/22/2022 - 15:00

Permalink

मुंबई पालिका सेनेला महत्वाची

मुंबई पालिका सेनेला महत्वाची आहे. काॅंग्रेस राष्ट्रवादी बरोबर गेल्यास सेनेला पालिका जिंकणे शक्य नसेल असा अंदाज आला असावा. अश्या वेळा भाजपशी युती करायची तर सरकार पाडावे लागेल. सरकार काय सांगून पाडनार? म्हणून ठाकरेंनीच शिंदेंना आमदार देऊन रवाना केले असावे. कारण ठाण्याबाहेर प्रभाव नसलेल्या शिंदेंबरोबर पाचोरा / जळगाव / औरंगाबाद चे आमदार का जातील?? मग आता सरकार पाडून मुंबई पालिकेच्या बदल्यात भाजपला मुख्यमंत्रीपद सेना दान करेल. सत्तेसाठी आसूसलेले भाजपेयी ह्या साठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेत. बदल्यात सेना बरेच मंत्रीपदंही पदरात पाडुन घेईल नी बरोबर महापालिकाही. :)
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Wed, 06/22/2022 - 15:04

Permalink

मुंबई पालिका सेनेला महत्वाची

मुंबई पालिका सेनेला महत्वाची आहे. काॅंग्रेस राष्ट्रवादी बरोबर गेल्यास सेनेला पालिका जिंकणे शक्य नसेल असा अंदाज आला असावा. अश्या वेळा भाजपशी युती करायची तर सरकार पाडावे लागेल. सरकार काय सांगून पाडनार? म्हणून ठाकरेंनीच शिंदेंना आमदार देऊन रवाना केले असावे. कारण ठाण्याबाहेर प्रभाव नसलेल्या शिंदेंबरोबर पाचोरा / जळगाव / औरंगाबाद चे आमदार का जातील?? मग आता सरकार पाडून मुंबई पालिकेच्या बदल्यात भाजपला मुख्यमंत्रीपद सेना दान करेल. सत्तेसाठी आसूसलेले भाजपेयी ह्या साठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेत. बदल्यात सेना बरेच मंत्रीपदंही पदरात पाडुन घेईल नी बरोबर महापालिकाही. :)
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Wed, 06/22/2022 - 15:13

In reply to मुंबई पालिका सेनेला महत्वाची by अमरेंद्र बाहुबली

Permalink

आता भाजपने सेनेशी परत युती

आता भाजपने सेनेशी परत युती केली तर भाजप समर्थक अत्यंत चिडतील. तसेच भाजप आता कोणत्याही परिस्थितीत मुंबई महापालिका सेनेच्या हाती लागून देणार नाही किंवा त्यासाठी सेनेला अजिबात मदत करणार नाही. २०१७ मध्ये जवळपास सेनेएवढ्याच जागा जिंकूनही मुंबई महापालिका सेनेला मोकळी सोडणे हा अत्यंत चुकीचा निर्णय होता. यावेळी हीच घोडचूक भाजप परत करणार नाही. महापालिका निवडणूक संबंधात प्राथमिक सर्वेक्षणाचे अंदाज सुद्धा भाजपला स्पष्ट बहुमत दाखवित आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by शाम भागवत on Wed, 06/22/2022 - 15:27

In reply to आता भाजपने सेनेशी परत युती by श्रीगुरुजी

Permalink

तसेच भाजप आता कोणत्याही

तसेच भाजप आता कोणत्याही परिस्थितीत मुंबई महापालिका सेनेच्या हाती लागून देणार नाही किंवा त्यासाठी सेनेला अजिबात मदत करणार नाही.
एकदम बरोबर शिवसेनेवरचे अवलंबित्व पूर्णपणे नाहिसे करण्यासाठी हेच करायचे आहे. शिवसेनेचा प्राण विधानसभेत नाही आहे. तो मुंबईतल्या पालिकांमधे आहे. पण पालिकेतील भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढायला पोलीस यंत्रणा हाताशी पाहिजे किंवा सीबीआयला महाराष्ट्र बंदी नसली पाहिजे.
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Wed, 06/22/2022 - 15:45

In reply to तसेच भाजप आता कोणत्याही by शाम भागवत

Permalink

पण पालिकेतील भ्रष्टाचाराची

पण पालिकेतील भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढायला पोलीस यंत्रणा हाताशी पाहिजे किंवा सीबीआयला महाराष्ट्र बंदी नसली पाहिजे. ज्यांचे घरं काचेचे असतात ते दुसर्यांच्या घरावर दगडफेक करत नाहीत भागवत काका! :) भाजपने म्हणून कधा अशी हिंमत केली नाही. नाहीतर नागपूर, नाशिक, पुणे पालिकेवर दणादण धाडी पडतील. रच्याकने तुकाराम मुंडे ह्या प्रामाणीक अधिकार्याने नालेसफाईत मागील वर्षाच्या तूलनेत कमी खर्चात सारखंच काम केलं तर संतापून भाजप वाल्यानी त्यांची बदली केला होती. :) मागे राष्ट्रहीतवादी मुवी काकांनी पुणे पालिकेतील भ्रष्टाचारासाठी राज्यसरकारला जबाबादार धरले होते. कुणीतरी त्यांना पुणे पालिकेत भाजपची सत्ता आहे हे नजरेस आणले. त्यांनंतर मुविकाकांनी त्या भ्रष्टाचाराविरूध्द चकार शब्द काढला नाही. :)
  • Log in or register to post comments

Submitted by शाम भागवत on Wed, 06/22/2022 - 16:38

In reply to पण पालिकेतील भ्रष्टाचाराची by अमरेंद्र बाहुबली

Permalink

तेच म्हणतोय मी.

तेच म्हणतोय मी. मविआ ने ईडीविरूध्द बोंब मारण्याऐवजी पुणे मनपाचे घोटाळे बाहेर काढायला पाहिजे होते. संजय राऊतांनी कंगनाच्या मागे लागायच्या ऐवजी ते करायला पाहिजे होते.
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Wed, 06/22/2022 - 21:06

In reply to आता भाजपने सेनेशी परत युती by श्रीगुरुजी

Permalink

आता भाजपने सेनेशी परत युती

आता भाजपने सेनेशी परत युती केली तर भाजप समर्थक अत्यंत चिडतील. कार्यकर्त्यांना कोण कुत्रं विचारतं?? एकदा निवडणूका झाल्या की. कार्यकरत्यांचा ऊपयोग निवडणूकीपुरता असतो.
  • Log in or register to post comments

Submitted by शाम भागवत on Wed, 06/22/2022 - 21:17

In reply to आता भाजपने सेनेशी परत युती by अमरेंद्र बाहुबली

Permalink

शिवसेनेवर भाजपवाले चिडले आहेत

शिवसेनेवर भाजपवाले चिडले आहेत. प्रत्यक्षात त्याचे कारण उठा व संरा होते. तेच जर नसतील तर शिवसेनेशी भांडण असायचं कारणच नाही. अर्थात हे भाजपप्रेमींनी कळायला थोडा वेळ लागेल. उठांमुळे नारायण राणे, नाईक, राठा व आता एशिं शिवसेनेतून बाहेर पडले हे लक्षात ठेवले तर राग शिवसेनेवर नाही तर उठावर असला पाहिजे हे लक्षात येईल. असो.
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Wed, 06/22/2022 - 21:30

In reply to शिवसेनेवर भाजपवाले चिडले आहेत by शाम भागवत

Permalink

भाजपवर शिवसेनेवाले चिडले आहेत

भाजपवर शिवसेनेवाले चिडले आहेत. प्रत्यक्षात त्याचे कारण देफा व चंपा होते. तेच जर नसतील तर भाजपशी भांडण असायचं कारणच नाही. अर्थात हे सेनाप्रेमींना कळायला थोडा वेळ लागेल. देफमूळे एकनाथ खडसे, व अनेक चांगले लोक भाजपातून बाहेर पडले हे लक्षात ठेवले तर राग भाजपवर नाही तर देफवर असला पाहिजे हे लक्षात येईल. असो.
  • Log in or register to post comments

Submitted by शाम भागवत on Wed, 06/22/2022 - 21:49

In reply to भाजपवर शिवसेनेवाले चिडले आहेत by अमरेंद्र बाहुबली

Permalink

पण हे मोदी शहांना पटले पाहिजे

पण हे मोदी शहांना पटले पाहिजे ना. तर कार्यवाही होणार. मग तुमच्या मनासारखे होणार. :) शिवसेनेच्या बाबतीत कोणाला बाजूला करायचे ते शिंदे साहेबांना कळले. कार्यवाही झाली. भाजपावाले खूष. एवढाच फरक आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Wed, 06/22/2022 - 22:00

In reply to पण हे मोदी शहांना पटले पाहिजे by शाम भागवत

Permalink

पण हे मोदी शहांना पटले पाहिजे

पण हे मोदी शहांना पटले पाहिजे ना. तर कार्यवाही होणार. मग तुमच्या मनासारखे होणार. :) मोदींना कारवाई करायची तर कधीच केली असती. मूळात फडणवाीसांचा गेम अमीत शहांनी केलाय. मोदींनंतर त्याना स्पर्धा नकोय. त्यामूळे १०५ आमदार असूनही त्यांनी कधी सत्ता मिळवायचा प्रयत्न केला ना करतील. फडणवीसांना केंद्रातही घेणार नाहीत. शिवसेनेच्या बाबतीत कोणाला बाजूला करायचे ते शिंदे साहेबांना कळले. कार्यवाही झाली. पहाटेच्या शपथविधीवेळीही मोटाबाईने गेम केला म्हणून भाजपेयी हुरळून गेले होते प्रत्यक्षात स्वतचाच गेम झालाय हे लक्षात आल्यावर त्यांना तोंड दाखवायला जागा नव्हती.
  • Log in or register to post comments

Submitted by शाम भागवत on Wed, 06/22/2022 - 22:14

In reply to पण हे मोदी शहांना पटले पाहिजे by अमरेंद्र बाहुबली

Permalink

होका. बर.

होका. बर.
  • Log in or register to post comments

Submitted by sunil kachure on Wed, 06/22/2022 - 22:14

In reply to पण हे मोदी शहांना पटले पाहिजे by अमरेंद्र बाहुबली

Permalink

आता पण

शिंदे च बंड नक्की कोणी घडवले? ३५, आमदार शिंदे सोबत जाणे हेच मुळात अशक्य आहे त्यांचा इतका करिश्मा नाही. पण उतावीळ पना मुळे परत bjp चे हसे होणार हे मात्र नक्की.. देश भारतील मीडिया नी ही घटना कव्हर केली आहे. परत एकदा तोंडावर पडणार हे नक्की.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद_१९८२ on Wed, 06/22/2022 - 15:17

Permalink

कारण ठाण्याबाहेर प्रभाव

कारण ठाण्याबाहेर प्रभाव नसलेल्या -- अज्ञानात सुख असते, हेच खरे. आणि नॉटी संजय राऊतचे तोंड पाहून असे वाटत नाही की हा प्लॅन उदोजींचा असेल.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Wed, 06/22/2022 - 15:26

In reply to कारण ठाण्याबाहेर प्रभाव by प्रसाद_१९८२

Permalink

असल्या कुटील योजना बनवून त्या

असल्या कुटील योजना बनवून त्या अंमलात आणण्यासाठी अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्तेची आवश्यकता असते. अशांना Realpolitik म्हणतात. सेनेत एकही Realpolitik नाही व नव्हता. त्यामुळेच इतर अनेकांनी सेनेला वापरून घेतले. सेनेचे बहुतांशी यश हे इतरांच्या मदतीने आहे. महाराष्ट्रात Realpolitik सध्या तरी फक्त शरद पवार आहेत. देशात पूर्वी इंदिरा गांधी आणि आता अमित शहा हे Realpolitik म्हणता येतील.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद_१९८२ on Wed, 06/22/2022 - 15:58

In reply to असल्या कुटील योजना बनवून त्या by श्रीगुरुजी

Permalink

संजय राऊतला तुम्ही

संजय राऊतला तुम्ही 'Realpolitik' मानत नाही ?
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Wed, 06/22/2022 - 16:00

In reply to संजय राऊतला तुम्ही by प्रसाद_१९८२

Permalink

त्याने काय केलंय? बेताल

त्याने काय केलंय? बेताल बरळण्याफलिकडे तो काही करतो का?
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Wed, 06/22/2022 - 16:14

In reply to संजय राऊतला तुम्ही by प्रसाद_१९८२

Permalink

१०५ घरी बसवण्यात नी तीन पक्ष

१०५ घरी बसवण्यात नी तीन पक्ष एकत्र आणण्यात संजय राऊतांचा सिंहाचा वाटा होता. बाकी भाजपेयींना काहीही वाटो त्याच्याने जास्त फरक पडत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by यश राज on Wed, 06/22/2022 - 16:45

In reply to १०५ घरी बसवण्यात नी तीन पक्ष by अमरेंद्र बाहुबली

Permalink

अहो अबा.

अहो अबा. कधीपर्यंत १०५/१०६ घरी बसवल्याची खुशी मनवणार, महाराष्ट्र खड्ड्यात गेला किंवा कामे झाली नाही तरी चालतील पण १०५ घरी बसवल्याचा आनंद महत्वाचा. तरी पण त्यात अजून १ वाढवा.. ते म्हणजे मामु .. पूर्ण अडीच वर्षे घरीच तर बसले होते. त्याच गोष्टीचा परिपाक म्हणजे हे चालू असलेले बंड. आता सगळा योग व्यवस्थित जुळून आला तर त्यांना आता आयुष्यभर घरीच बसायचे आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by रात्रीचे चांदणे on Wed, 06/22/2022 - 16:53

In reply to अहो अबा. by यश राज

Permalink

लोकसत्ता तर म्हणतंय आमदार,

लोकसत्ता तर म्हणतंय आमदार, मंत्री सोडा पण खुद्द शरद पवारांनाही भेटायला उद्धव ठाकरे वेळ देत नव्हते.
  • Log in or register to post comments

Submitted by sunil kachure on Wed, 06/22/2022 - 20:33

In reply to अहो अबा. by यश राज

Permalink

Mr यश राज केंद्र सरकार नी

Mr यश राज केंद्र सरकार नी केलेली काम आणि महाराष्ट्र सरकार नी केलेली काम तुलना करायची का? नोट बंदी. पूर्ण अयशस्वी. भारतात covid पसरविण्यास केंद्र जबाबदार. चीन मधील स्थिती माहीत असून पण जागतिक विमान सेवा चालू. प्रवासी लोकांना देश भर पसरण्यास मदत. अग्निपथ . सैन्यात कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम चालू शेतकरी कायदे भारतीय शेतकऱ्यांना देशोधडीला लावायचा प्रयत्न धर्माच्या नावावर समजत फूट. मीडिया,सरकार + ह्यांची देश विघातक युती. केंद्रीय एजन्सी चा गैर वापर ही केंद्र सरकार ची काम आहेत. Maharashtra sarkar ची काम अशी नाहीत. लोक खुश आहेत महाराष्ट्र सरकार च्या कामगिरी वर
  • Log in or register to post comments

Submitted by sunil kachure on Wed, 06/22/2022 - 22:19

In reply to कारण ठाण्याबाहेर प्रभाव by प्रसाद_१९८२

Permalink

अजित पवार

शरद पवार ह्यांची परवानगी नसेल तर अजित पवार पक्ष विरोधी वागतील हे अशक्य होते तरी फडणवीस फसले..... ठाकरे च विरुद्ध पत्करून ३५, आमदार फुटतील ह्या वर विश्वास ठेवून परत .. फडणवीस ह्यांचा च गेम होण्याची शक्यता जास्त आहे...
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Wed, 06/22/2022 - 17:00

Permalink

४५ आमदार घेऊन

आमचा पक्ष हाच खरा शिवसेना पक्ष असा दावा शिंदे गट करू शकतो का?
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Wed, 06/22/2022 - 17:10

In reply to ४५ आमदार घेऊन by कंजूस

Permalink

हो. धनुष्यबाण हे पक्षचिन्ह

हो. धनुष्यबाण हे पक्षचिन्ह सुद्धा शिंदे गटाला मिळू शकेल. त्यांच्या गटाला शिवसेना हे नाव मिळू शकेल व ठाकरे गटाला शिवसेना (U) किंवा शिवसेना (T) असे नाव मिळू शकेल.
  • Log in or register to post comments

Submitted by इरसाल on गुरुवार, 06/23/2022 - 12:21

In reply to हो. धनुष्यबाण हे पक्षचिन्ह by श्रीगुरुजी

Permalink

ऑ!!!!

मग यु आणी टी मिळुन काय " युटी युटी सॉरी उठी उठी गोपाळा " कां?
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on गुरुवार, 06/23/2022 - 13:11

In reply to ऑ!!!! by इरसाल

Permalink

ख्या ख्या ख्या! काय विनोद

ख्या ख्या ख्या! काय विनोद होता :)
  • Log in or register to post comments

Submitted by शाम भागवत on Wed, 06/22/2022 - 17:45

In reply to ४५ आमदार घेऊन by कंजूस

Permalink

हो.

हो. पक्षचिन्ह सुध्दा मिळवू शकतो. आमदार ३७+ असले पाहिजेत.
  • Log in or register to post comments

Submitted by शाम भागवत on Wed, 06/22/2022 - 19:07

In reply to हो. by शाम भागवत

Permalink

कंकाका,

कंकाका, माझं उत्तर अर्धवट आहे. निवडणूक आयोग हे सगळं ठरवतो व त्यासाठी बऱ्याच गोष्टींची पूर्तता करावी लागते असं दिसतंय. येथे २ मिनिटे ५ सेकंदावर पूर्ण उत्तर मिळेल. <\a>
  • Log in or register to post comments

Submitted by sunil kachure on Wed, 06/22/2022 - 19:21

Permalink

डोकं असेल तर वापरा

आज मोदी नसतील तर बाकी bjp लोकांना कवडीची किंमत नाही. राहुल किंवा सोनिया पाठी नसतील तर .. काँग्रेस मधील कोणालाच काडी ची किंमत नाही.. शरद पवार चा आशीर्वाद नसेल तर राष्ट्रवादी मधील कोणालाच काडी ची किंमत नाही. ठाकरे पाठी मागे नसतील तर एकनाथ शिंदे ची किंमत झीरो आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by sunil kachure on Wed, 06/22/2022 - 19:42

Permalink

इतिहास साक्षी आहे

बंडखोर लोकांना,दगाबाज लोकांना जनतेने स्वीकारले नाही. राणे,राज ठाकरे महत्व ची उदाहरणे. देशात पण आहेत . पवार साहेब फक्त अपवाद आहेत. कारण त्यांचा पूर्ण महाराष्ट्र मधील लोकांशी वैयतिक संबंध आहेत. एकनाथ शिंदे आता तात्पुरते bjp साठी उपयोगी आहे.. पुढे ते काही कामाचे नाहीत..लोकांनी ठाकरे न मुळे त्यांना निवडून दिले आहे..
  • Log in or register to post comments

Submitted by सुखी on Wed, 06/22/2022 - 20:43

In reply to इतिहास साक्षी आहे by sunil kachure

Permalink

तुमच्या लेखनाला अस्विकार

तुमच्या लेखनाला अस्विकार करायचा ऑप्शन आहे का?
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Wed, 06/22/2022 - 23:36

In reply to तुमच्या लेखनाला अस्विकार by सुखी

Permalink

तूम्हालाही लोक झेलतातच ना??

तूम्हालाही लोक झेलतातच ना??
  • Log in or register to post comments

Submitted by सुखी on गुरुवार, 06/23/2022 - 05:40

In reply to तूम्हालाही लोक झेलतातच ना?? by अमरेंद्र बाहुबली

Permalink

मिर्ची इकडे कशी लागली असेल

मिर्ची इकडे कशी लागली असेल बरं
  • Log in or register to post comments

Submitted by sunil kachure on Wed, 06/22/2022 - 23:18

Permalink

WhatsApp वरील msg

  • Log in or register to post comments

Submitted by sunil kachure on Wed, 06/22/2022 - 23:19

Permalink

WhatsApp वरील msg

  • Log in or register to post comments

Submitted by डाम्बिस बोका on गुरुवार, 06/23/2022 - 03:47

Permalink

काही शंका

१. शिंदे बाबा आणी ४० आमदाराचा पंचतारांकित खर्च कोणी केला असेल? २. सध्या घोडेबाजारात आमदाराच्या rate काही कोटी गृहीत धरला, तर जवळपास ५०० ते १००० कोटीची गुंतवणूक अमित शाह नी केली आहे. त्यावर परतावा मिळेल का? ३. या पुढे महाराष्ट्राचे राजकारण गुजरात मधून चालणार का? मंत्रीपद, मलाई पद ह्यासाठी मुंबई, नागपूर ऐवजी सुरत/अहमदाबाद चे खेटे घालावे लागणार का? ४. भाजप ला पाठींबा देणारं शुद्ध होणार का? ५. पैसे, दादागिरी , कंपूशाही वापरून कशीही सत्ता मिळवायची हे अनेक राज्यात वापरलेलं धोरण पाहता भाजप चा काँग्रेस होण्याचं प्रवास पूर्ण झाला का? कि अजून काही बाकी आहे? ६. सत्तेसाठी लाज, धर्म, नीतिमत्ता, जनमत सगळे सोडून देणाऱ्या सर्वपक्षीय लोकांना आपण असाच आंधळा पाठींबा देणार का? ७. ह्या निर्लज्ज राजकारणाऱ्यांची ही थेरं आपण अशीच पाहत बसणार का ? गेली दोन वर्ष पेपर वाचताना, फक्त चिखलफेक, घाणेरड राजकारण, नेत्याचा स्वार्थ, दुराभिमान, लाचारी पाहून खरंच वीट आला आहे. समाजकारण, जनतेचे प्रश्न, विधेयक, नवीन योजना, ह्यावर चर्चा न करणारे किंवा ती लायकी पण नसणारे हे अशिक्षित, अल्पशिक्षित नालायक लोक आपण का निवडून देतो?
  • Log in or register to post comments

Submitted by चौकस२१२ on गुरुवार, 06/23/2022 - 08:10

In reply to काही शंका by डाम्बिस बोका

Permalink

सत्तेसाठी लाज, धर्म,

सत्तेसाठी लाज, धर्म, नीतिमत्ता, जनमत सगळे सोडून देणाऱ्या सर्वपक्षीय लोकांना आपण असाच आंधळा पाठींबा देणार का? सेने बद्दल बोलताय का? कारण युतीला लोकांनी भरपूर मते देऊन सुद्धा त्यांनी विश्वास घात केला जनतेचा त्याच काय ?
  • Log in or register to post comments

Submitted by डाम्बिस बोका on गुरुवार, 06/23/2022 - 18:51

In reply to सत्तेसाठी लाज, धर्म, by चौकस२१२

Permalink

सत्तेसाठी लाज, धर्म,

मी सर्व पक्षांबद्दल बोलतो आहे. सत्ता प्राप्तीसाठी चाललेला हा खेळखंडोबा हताशपणे पाहत आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by sunil kachure on गुरुवार, 06/23/2022 - 08:39

Permalink

BJP हा पण राजकीय पक्ष च आहे

भारतीय राजकारणी लोकांचे जे काही वाईट गुण आहेत ते सर्व bjp मध्ये पण आहेत.उलट थोडे जास्त च आहेत
  • Log in or register to post comments

Submitted by sunil kachure on गुरुवार, 06/23/2022 - 08:44

Permalink

ह्याचे पण लोकांना कौतुक वाटते

ज्याची केंद्रात सत्ता आहे त्यांनी विरोधी पक्षाची राज्य सरकार गैर प्रकार करून कमजोर करायची. लालच ,भीती दाखवून त्यांचे आमदार फोडायचे आणि आपल्याच पक्षाचे जिथे राज्य सरकार आहे तिथे त्यांना डांबून ठेवायचे. देश कायद्याने चालतो ना? मग ही गुंड टोळ्या सारखी वर्तणूक सरकार का करत असतात.. ये मेरा इलका ये तेरा इलाका.
  • Log in or register to post comments

Submitted by डाम्बिस बोका on गुरुवार, 06/23/2022 - 18:54

In reply to ह्याचे पण लोकांना कौतुक वाटते by sunil kachure

Permalink

पूर्वीपासून

काँग्रेस च्या काळापासून चालू असलेली हि सरकारी कारस्थाने, BJP आल्यावर कमी किंवा बंद होतील अशी भाबडी अशा होती. सरकारी यंत्रणेचा गैरवापर करण्यात BJP कुठेही काँग्रेस च्या मागे नाही.
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • पान 5
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com