शब्दांची कर्णफुले

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
24 Sep 2021 - 9:18 am

शब्दांची कर्णफुले

प्रसन्न सुंदर सुगंधी सकाळी
प्रेम बरसले अवचीत अवकाळी
नाहत्या ओलेत्या भोर केशांतून
थेंब तयाचे अवतरले भाळी

ओठी शब्द फुलून आले
शब्दांचे मग मोती झाले
तु ते हळूवार उचलूनी घेत
कर्णफुलांसम कानी ल्याले

(मिपाच्या यंदाच्या दिवाळीअंकासाठी काही उत्पादन करावे म्हणून या शब्दफुलांचे उत्पादन घेतले होते. पण आम्हा शब्दशेतकर्यांच्या मनाच्या गोदामात अनेक प्रकारचा लगोलग नष्ट पावणारा पण भरघोस उत्पन्न मिळणारा माल तयार होत असल्याने आहे ते उत्पादीत शब्दपीक मिपाच्या साहित्य मंडईइत विकायला ठेवले आहे. वाचक ग्राहकाकडून आहे त्या मालाला उठाव मिळेल ही शब्दशेतकर्याची आशा आहे.)

- शब्दमाल उत्पादक शेतकरी - पाषाणभेद
२४/०९/२०२१

इशाराकविता माझीजिलबीप्रेम कवितामाझी कवितामुक्त कवितारतीबाच्या कवितालावणीवाङ्मयशेतीवाङ्मयकविताप्रेमकाव्य

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

24 Sep 2021 - 10:29 am | प्रचेतस

लै भारी पाभे.

क्या बात!!दिल गार्डन गार्डन आय मीन शेत शेत हो गया!

ज्ञानोबाचे पैजार's picture

24 Sep 2021 - 4:19 pm | ज्ञानोबाचे पैजार

ताजी आहेत तो पर्यंत दिलीत.
दिवाळी पर्यंत शिळी झाली असती
पैजारबुवा,

कर्नलतपस्वी's picture

28 Sep 2021 - 10:57 am | कर्नलतपस्वी

सुदंर विचार सुदंर प्रकटीकरण

चौथा कोनाडा's picture

30 Sep 2021 - 1:17 pm | चौथा कोनाडा

खुप छान पाभे !

💖

कर्नलतपस्वी's picture

1 Oct 2021 - 11:45 am | कर्नलतपस्वी

सुदंर प्रकटन
नमस्कार पाभे

श्रीगणेशा's picture

7 Oct 2021 - 12:50 am | श्रीगणेशा

कविता लिहून झाल्यानंतर प्रकाशित व्हायची वाट पाहणं म्हणजे एक प्रकारची शिक्षाच :-)

बाकी, शब्दांची कर्णफुले सुंदर उमलली आहेत!