करोनाची लस : एक थोतांड

गामा पैलवान's picture
गामा पैलवान in जनातलं, मनातलं
1 Mar 2021 - 3:43 am

नमस्कार लोकहो!

करोना नामे मायावी थोतांड चालूच आहे. मायावी अशासाठी म्हंटलंय की पूर्वी एका मायावी राक्षसाच्या रूपातनं दुसरा राक्षस जन्म घ्यायचा, त्याचा धर्तीवर करोना या पहिल्या थोतांडातनं लस नावाचं दुसरं थोतांड उत्पन्न होतंय. आजवर कोणत्याही लशीने कुठल्याही रोगांची साथ आटोक्यात आलेली नाहीये. हां, लशीमुळे रोग नाहीसा होतो असा सार्वत्रिक भ्रम प्रचलित आहे. कारण की भरपूर प्रमाणावर तसा प्रचार केला गेलाय.

या बाबतीत आपल्याला दोन नेते जाम आवडले. मोदींनी मुखपट्टी उघडपणे नाकारली तर राज ठाकऱ्यांनी तिच्यासंबंधी भीडमुर्वत बाळगली नाही.

डॉक्टर सुझन हम्फ्रीज या अमेरिकेतल्या खऱ्याखुऱ्या म्हणजे मेडिकल डॉक्टर असून पेशाने मूत्रपिंडतत्ज्ञा आहेत. त्यांनी लशींकरणाविषयी प्रचंड शोधाशोध करून माहिती मिळवून २०१३ साली एक पुस्तक लिहिलं आहे. पुस्तकाचं नाव : Dissolving Illusions - Disease, Vaccines, and The Forgotten History (2013) by Suzanne Humphries MD. हे पुस्तक येथे उपलब्ध आहे :
१. https://www.amazon.in/Dissolving-Illusions-Disease-Vaccines-Forgotten/dp...
२. https://www.amazon.co.uk/Dissolving-Illusions-Disease-Vaccines-Forgotten...

हे पुस्तक लिहितांना डॉक्टरबाईंनी रोमन बिस्त्रियांक या विदातत्ज्ञाची मदत घेतली आहे. सदर लेख या पुस्तकाची तोंडओळख करवून देण्यासाठी लिहिणार होतो. पण थोडं लिहिल्यावर कळलं की पुस्तकपरिचय हा आपला प्रांत नव्हे. मग म्हंटलं की सरळ सारांशच लिहून टाकूया. माझ्यासारख्या आळश्याला तेव्हढंच जमण्यासारखं आहे.

तर आता मुद्द्याकडे वळूया.

प्रकरण १ : गेले ते दिन गेले ( एकदाचे ) ....

हे प्रकरण १९ व्या शतकातल्या ( म्हणजे इ.स. १८०० चं शतक ) जुन्या जमान्यातील सामान्य माणसाच्या आरोग्य अवस्थेचं किंवा अनावस्थेचं वर्णन करतं. गरीब माणसाचं सरासरी आयुर्मान १५ ते १६ वर्षं होतं. ते इतकं कमी असण्याचं कारण साथीचे रोग हे होतं. इंग्लंडमध्ये रोगांच्या साथी नेमेची येत असंत. भरीस भर म्हणून दाटलेली वस्ती व अंधारी घरं अशा रोगट वातावरणात रोग फोफावायला उत्तेजन देत. शिवाय अन्नपाण्याची ददात होतीच. पोषक अन्न केवळ उच्चभ्रू लोकांच्या मुलांनाच मिळे. पाणीही अशुद्धच प्यावं लागंत असे. संडास व पिण्याचं पाणी एकत्र होणं सर्वसामान्य बाब असे. घोड्याची लीद, डुकराचं प्रेत व खाण्याची टपरी लंडनच्या रस्त्यावर सुखेनैव एकत्र नांदत. वा न्यूयॉर्कमध्ये रोगट डुकरांचं मांस गरीब लोकांना बिनधास्तपणे विकलं जाई.

प्रकरण २ : बालकांची हलाखी ....

या प्रकरणांत १९ व्या शतकातल्या ( म्हणजे इ.स. १८०० चं शतक ) गरीब कुटुंबातल्या बालकांची हलाखीची स्थिती वर्णिलेली आहे. त्यांना दिवसाचे बाराबारा तास मजुरी करावी लागे व पगार जेमतेम खाण्यापूरता मिळे. अगदी मुलीसुद्धा खाणीसारख्या प्राणघातक जागेत बिनदिक्कीतपणे कामाला जुंपल्या जात. तिसाव्या वर्षापर्यंत कोणी जगली तर ती अपवादात्मक घटना असे. पारा, शिसे, आर्सेनिक वगैरे विषारी पदार्थांशी बालकांचा संपर्क येणे ही एक किरकोळ बाब असे. जखमा व दुखापती नित्याच्याच असंत.

जगातल्या सर्वात श्रीमंत राष्ट्र असलेल्या अमेरिकेत दरवर्षी २,५०,००० बालकांचा कुपोषणाने मृत्यू होई. बालकामगार ठिकठिकाणी असले तरी बालकामगार हा शब्द मात्र आजून अस्तित्वात यायचा होता. अतीव व जीवघेण्या श्रमांतनं सुटायचा मार्ग नव्हता. मग कष्टांचा विसर पाडण्यासाठी व्यसनांचा आधार घेतला जाई. त्यामुळे तब्ब्येत अधिकंच खराब होई. ऐन वाढीच्या वयांत व्यसनं केली की प्रजनन व आयुर्मान यांवर विपरीत परिणाम होई.

प्रकरण ३ : रोग हा नियम तर निरामय जीवन हा अपवाद

रोग हा आयुष्याचा अविभाज्य घटक कसा होता, ते या प्रकरणांत सांगितलं आहे. औद्योगिक क्रांतीमुळे गावं ओस पडून शहरांत अनियोजित व प्रचंड गर्दी झाली होती. शहरी जागामालकांनी नफ्यावर डोळा ठेवून श्रमिकांसाठी अतिशय दाटीवाटीने निवासालये बांधली. तिथे राहायची व्यवस्था अत्यंत अस्वच्छ असे. हे रोगांना आमंत्रण असे. रोगांच्या साथीत माणसं आषाढी माश्यांसारखी टपाटप ( की पटापट ? ) मरून पडायची. मलनि:सारण यंत्रणा नामक प्रकार अस्तित्वात नसल्याने विषमज्वर ( = टायफस ), पटकी ( = कॉलरा ), हगवण वगैरेंची सतत मांदियाळी असे.

रोग्यांना हाताळण्याच्या आधी डॉक्टर व परिचारिका यांनी स्वत: निर्जंतुक होणं १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात सुरु झालं. वैद्यकीय क्षेत्राची काय अवस्था होती ते कळलं ना ? पुढे अनेक रोगांनी उडवलेल्या हाहाकाराच्या कहाण्या दिल्या आहेत. किमान स्वच्छता पाळल्याने लागणीचं प्रमाण कसं झपाट्याने घसरू लागलं ते ही दिलं आहे.

लशीमुळे कुठलाही जीवघेणी साथ आटोक्यात आली नाही. या साथी मंदावल्या त्या किमान स्वच्छता पाळल्याने.

प्रकरण ४ : देवीचा रोग व पहिली लस

देवीच्या लशीने माणसं कशी मेली, ते या प्रकरणात सांगितलं आहे. रोगापेक्षा औषध भयंकर. कारण की लस तयार करतांना लागण झलेला विषाणूत फेरफार ( = म्युटेशन ) होत असे. हा फेरफार हाताळायचा निश्चित मार्ग कोणाकडेही नव्हता. सब घोडे बारा टक्के या हिशोबाने एकंच लस सरसकट सर्वांना दिली जाई. परिणामी एकाच आजाराचे वेगवेगळे विषाणू निर्माण झाले. वेल डन. इ.स. १७५० च्या सुमारास ज्या लशी विकसित झाल्या त्या गोऱ्यांपेक्षा काळू लोकांना जास्त हानीकारक होत्या. हा मुद्दाही चर्चेत घेतला पाहिजे. १९०८ च्या सुमारास लशींमुळे मिळणारं संरक्षण तात्पुरतं असतं हे लक्षांत आलं.

लान्सेट जर्नलने डॉक्टर जेन्नरच्या देवीच्या लशीवर रोचक टिपणी केली आहे. त्यानुसार ही लस गाईच्या सडांपासून विकसित केलेली नसून घोड्याच्या पुळीपासनं मिळवलेली होती. ही लस नंतर गाय, माणूस व इतर पशूंतून फिरवण्यात आली. आजच्या घडीला देवीची लस म्हणून जे काही आहे ते नैसर्गिक नसून कृत्रिम एजंट आहे. तरीही जेन्नरला देविच्या लशीचा संशोधक म्हणून जगभर मान्यता मिळाली आहे. तत्कालीन डॉक्टरांनी लगेच दाखवून दिलं की गाईच्या सडांपासून लस मिळालेल्या अनेकांना नंतर देवी आल्या होत्या.

या परिस्थितीत दयाळू इंग्रज सरकारने इंग्लंडात जबरदस्तीने लशी टोचवल्या. परिणामी लशींच्या या कृत्रिम हस्तक्षेपामुळे देवी रोगाची साथ अधिक तीव्र झाली. १८४४ ला लंडन च्या देवीच्या रुग्णालयात १७८१ पेक्षा जास्त रोगी दाखल झाले. रोगापेक्षा लस भयंकर ठरली. बोस्टन (इंग्लंड) मध्ये सुमारे ४० वर्षं नाहीसा झालेला देवीचा रोग लशी टोचल्यावर परत उफाळून आला. पुढे लशीकरणामुळे निर्माण झालेल्या नवीन रोगांची व मृत्यूंची महिती दिलेली आहे.

प्रकरण ५ : दूषित लशी

रोगजंतूंमुले रोग होतात हे मत स्वीकारलं जाण्यापूर्वी दूषितत्वाचं मोजमाप केलं गेलं नव्हतं. त्यामुळे जंतुसिद्धांतावर ( = Germ Theory वर ) प्रश्नचिन्ह उपस्थित होतं. नंतर खूर असलेल्या जनावरांना होणारा मुखपादरोग दूषित लशींमुळे माणसांना कसा होऊ लागला याची सुरस व चमत्कारिक कहाणी वर्णिलेली आहे.

प्रकरण ६ : भली थोरली निदर्शने

एका बापाचं पहिलं मूल लशीमुळे मेलं होतं. साहजिकंच त्याने दुसऱ्या मुलाच्या लशीकरणाला विरोध केला. त्याबद्दल बापाला तुरुंगात पाठवलं गेलं. कित्ती सुंदर न्याय !

या प्रकरणात इंग्लंडमधल्या लेस्टर ( = Leicester ) नगरात लोकांनी लशीकरणाच्या थोतांडाविरुद्ध कसा लढा दिला ते सांगितलंय. लोकांना लशीकरण नको होतं कारण लहान बालकांचे भयानक हाल व्हायचे. कोण आई आपल्या तान्ह्या मुलाला सरकारी कसायांच्या तावडीत सोपवेल ?

आर्थर वॉर्ड गरीब मजूर होता. त्याची पहिली दोन मुलं लशीमुले जखमी झाली होती. त्याने तिसऱ्यास लस टोचायला नकार दिला. त्यामुळे सरकारी कसाई त्याच्या घरी पोहोचले. तो घरी नव्हता तर त्याच्या पोटुशा बायकोला धमक्या देऊन दंड भरायला लावला. तिच्याकडे पैसे नव्हते व घरातली चीजवस्तू दंडमूल्याची भरपाई इतकी नव्हती. तिला कसाई खेचडत तुरुंगात घेऊन गेले. त्यामुळे तिच्या मुदतपूर्व प्रसूतीतून मृत बालक जन्मलं. आवडली तुम्हाला कथा ?

लेस्टरचे लोकं देवीच्या लशीचा जनक डॉक्टर एडवर्ड जेन्नर यांस बालहत्यारी म्हणायचे.

प्रकरण ७ : चाकोरीबाह्य प्रयोग

देवीच्या रोगाविरुद्ध लेस्टर नगरात उदयाला आलेली अलगीकरणाची पद्धत ( = quarantine ) कशी होती ते या प्रकरणात वर्णिलेलं आहे. देवीची लस टोचण्याऐवजी अलगीकरण हा उपाय बराच प्रभावशाली होता. डॉक्टर मिलर्ड यांनी १९१० साली निष्कर्ष काढला की अर्भकांना दिलेल्या देवीच्या लशीमुळे रोगफैलाव कमी झाला नाही. सक्तीची लसटोचणी आजिबात समर्थनीय नाही.

पण सरकारी कसायांनी घबराट माजवली की कधीतरी मोठ्ठी साथ येणार. तशी साथ कधीच आली नाही. उलट लेस्टर मधली देवीच्या रोग्यांची संख्या लशीकृत झालेल्या उर्वरित इंग्लंडच्या मानाने काबूत राहिली होती.

लस म्हणजे जणू अमृत आहे असा अपप्रचार धूमधडाक्याने केला जातो. प्रत्यक्षात लस हे एक थोतांड आहे. लेस्टर पद्धत नंतर युगोस्लाव्हियात १९७२ साली वापरण्यात आली.

प्रकरण ८ : सरकारी दडपशाही

एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस व विसाव्या शतकाच्या सुरुवातीस इंग्रज सरकारने इंग्लंडमध्ये लसटोचणीच्या सक्तीच्या मोहिमा राबवल्या. भले बालकं मरोत अथवा जायबंदी होवोत. पर्यायी वैद्यकीय दृष्टीकोनास अर्थातंच केराची टोपली दाखवण्यात आली. या मोहिमांना न्यायालयाचाही पाठींबा मिळे. जो नागरिक या सक्तीस विरोध करेल त्यास दंड, जप्ती, इत्यादिस सामोरे जावे लागे. अमेरिकेतही अशी प्रकरणे घडली.

त्या वेळेस युजेनिक्स नामक दुर्बलोच्छेदक शास्त्र जाम प्रचलित होतं. लस घेतलेल्यावर त्रास होणारे लोकं जगण्यास नालायक आहेत असा युजेनिक्सचा सिद्धांत असल्याचं लोकांनी मनावर घेतलं. मानसिक दृष्ट्या अस्थिर लोकांचं निर्बीजीकरण करण्यात येत असे. त्याच धर्तीवर लस न घेतलेल्यांचे निर्बीजीकरण करण्यात येईल अशी भीती व्यक्त होत असे. युजेनिक्स ( = दुर्बलोच्छेदन ) आणि सक्तीची लसटोचणी यांचा घनिष्ट संबंध आहे. नाझी राजवटीत युजेनिक्स ला राजमान्यत्व लाभलं होतं.

प्रकरण ९ : आर्थर स्मिथ या बालकाची यातनामय कहाणी

या यातना आर्थर स्मिथ नामे ११ वर्षीय बालकाला झालेल्या आहेत. ही लशीच्या दुष्परिणामांची कहाणी आहे. तो कसाबसा वाचला खरा, पण अंगावर डाग पडले ते कायमचे. काही बालकं इतकी सुदैवी नव्हती. त्यांच्याही कहाण्या या प्रकरणांत आहेत.

प्रकरण १० : आरोग्यक्रांती

गटाराचं पातळलेलं पाणी हे प्रमुख पेय नसेल तर आरोग्य सुधारणार नाही काय ? या प्रकरणात वैयक्तिक व खासकरून सार्वजनिक स्वच्छतेमुळे आरोग्य कसं सुधारलं ते वर्णिलेलं आहे. गलिच्छपणामुळे रोग होतात हे १९ व्या शतकाच्या मध्यात युरोप-अमेरिकेच्या जणू गावीच नव्हतं. धारणा बदलल्याने हळूहळू आरोग्यात वाढ होत गेली. अर्थात, झोपडपट्टीदादांनी स्वच्छतेच्या सुधारणांना विरोध केलाच. कारण झोपडपट्ट्यांपासनं त्यांचा फायदा होत होता. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात लंडनमध्ये हळूहळू मलनि:सारण सुविधा उभारण्यात आल्या. जलकक्ष म्हणजे water closet म्हणजे WC ही संज्ञा उदयास आली. त्याआधी मानवी विष्ठा कुठेही टाकली जायची. २० व्या शतकाच्या पहिल्या दशकांत ( म्हणजे १९०० सालच्या आसपास ) हे जलकक्ष लंडन पालिकेच्या गटारांना जोडले जाऊ लागले. आज आपण युरोप-अमेरिका-भारत इत्यादी देशांच्या शहरांत जी गटारव्यवस्था पाहतो ती केवळ शंभर सव्वाशे वर्षंच जुनी आहे.

दुधाचं पाश्चरीकरण सुरु झालं. त्यमुळे बालमृत्यू प्रचंड प्रमाणावर उणावले. याखेरीज इतर सामाजिक सुधारणाही राबवल्या जाऊ लगल्या. उदा. : किमान वेतन, नोकरीच्या जागी सुरक्षितता नियम, बालकांची पिळवणुकीविरुद्ध कायदा, इत्यादि. त्यामुळे जीवनमान ( life standard) उंचावलं.

या सर्व सुधारणांत लशीचं योगदान नगण्य होतं. पण हवा अशी केली गेली की लशीमुळे म्हणे रोग नाहीसे होतात.

प्रकरण ११ : साथीच्या रोगांत आश्चर्यजनक घट

अमेरिकेत देवी ५ पैकी १ ठार मारीत. हे प्रमाण घटून ५० पैकी १ वर आलं व नंतर ३८० पैकी १ वर घसरलं. १८९७ च्या अखेरीस अमेरिकेत तीव्र देवी जवळजवळ नामशेष झाला. १९५० पर्यंत इंग्लंड व अमेरिकेतनं देवीच्या साथी नामशेष झाल्या होत्या. पूर्ण लशीकरण न करताही हे साध्य झालं. स्कार्लेट ताप ( स्कार्लेट फीव्हर ) तर कुठल्याही लशीशिवाय नाहीसा झाला.

अशाच अनेक रोगांची घट ( विषमज्वर, डांग्या खोकला, डिप्थेरिया, क्षय, हगवण ) आलेखांसह दर्शवली आहे.

रुग्णालये ही अस्वच्छ व दाटीग्रस्त असल्याने लागणकेंद्रे होती. ती हळूहळू सुधारू लागली होती. एकंदरीत आहार, पोषण, स्वच्छता, इत्यादि आरोग्यविषयक जाणिवांत सुधारणा होत गेल्या. यांत लशीचा सहभाग जराही नव्हता.

प्रकरण १२ : पोलियो परतून आलाय

पोलियोची लस पहिल्यांदा शोधणाऱ्या जोनास साल्कने ( डॅरल साल्क सह ) म्हंटलंय की ही दुर्बळ विषाणूयुक्त लस कधीकधी पोलियोस रोखण्याऐवजी रोगाचा प्रादुर्भाव घडवून आणू शकते. दुसरी लस डॉक्टर साबिनने शोधलेली मौखिक लस आहे. तिच्यानेही आज पोलियो होऊ शकतो. पोलियोचे अनेक प्रकार आहेत. त्यापैकी बुल्बर पोलियो हा सर्वात गंभीर प्रकार आहे. तो मेंदूच्या लंबमज्जेस ( = ब्रेनस्टेम ) हानी पोहोचवतो. त्यातून पुढे पक्षाघात होतो. पण हा पक्षाघाती पोलियो फार कमी प्रमाणावर आढळतो. नैसर्गिक पोलियोचा विषाणू अनेक शतकांपासून मानवी आतड्यांत सुखेनैव नांदंत आला आहे. मग विसाव्या शतकात नेमकं काय घडलं की, ज्यामुळे त्याच्यापायी पक्षाघात होऊ लागले ?

मौखिक लशीचे जनक डॉक्टर अल्बर्ट साबिन यांनी नेमका प्रश्न विचारलाय. अमेरिकी नेटिव्हांत पोलियोरुद्ध आपसूक प्रतिकारशक्ती उत्पन्न झाली होती. मात्र प्रगत व स्वच्छतेबाबत दक्ष असलेल्या अमेरिकी वसाहतींत पोलियोची लागण का होतेय ? हा पोलियो विसाव्या शतकांतच का उदयाला आला ? विषाणू तर हजारो वर्षांपासून माणसाच्या आतड्यांत रहात आलाय. तर पोलियोचं कारण आहे कृत्रिम आहार. साखर, मैदा, दारू, तंबाखू, इत्यादी सवयी तसेच डीडीटी, अर्सेनिक, विविध लशी, प्रतिजैविके यांच्यामुळे माणसाची नैसर्गिक प्रतिकारशक्ती कमी झाली. म्हणून पोलियोसारख्या रोगांमुळे पक्षाघात होऊ लागले.

पोलियोच्या छत्राखाली अनेक रोग समाविष्ट केले गेले. तसेच इतर कारणामुळे पक्षाघात झाला तरी त्यावर पोलियो म्हणून छाप मारण्यात यायचे. आज जसं काही झालं की लगेच करोनाचा छाप मारला जातो, अगदी तसंच पूर्वीही झालंय. पुढे लेखिकेने पोलियोच्या व्याख्येविषयी प्रश्न उपस्थित केलेत.

वाव्या शतकाच्या पूर्वार्धात पोलियोच्या उपचारांत बाधित स्नायूस जखडून टाकीत असंत. जखडल्यामुळे स्नायूची अधिकंच हानी होई. उलट स्नायू मोकळे केले व ठराविक व्यायाम केले तर तो बरा ( = रीकव्हर ) व्हायचं प्रमाण वाढे. याबाबत सिस्टर केनी हिचे व्यायामोपचार प्रसिद्ध झाले. पण ऐकणार कोण. लशीचे मार्केटिंग करायला जखडलेली बालकं अधिक उपयुक्त ठरतात, मोकळेपणे बागडणारी नव्हे.

पोलियो पूर्णपणे गेलेला नाहीये. त्याला ट्रान्सव्हर्स मायलिटीस असं नवीन नाव मिळालंय. माझ्या अंदाजाप्रमाणे मस्क्युलर डिस्ट्रॉफी हा देखील पोलियोचाच एक प्रकार असावा. ट्रान्सव्हर्स मायलिटीस होण्याच्या संभाव्य कारणांमध्ये लस हे ही एक कारण आहे.

पुढे लेखिकेने डीडीटी मुळे पोलियोसारखं एक लक्षण बळावतं, त्याचा सांगोपांग उहापोह केला आहे. भारतातल्या डीडीटी चा सुळसुळाट असल्याने त्यावरही भाष्य केलं आहे. नंतर लेखिकेने अर्सेनिक विषबाधेवर चर्चा केली आहे. या विशाबाधेतून पोलियो सदृश लक्षणं उत्पन्न होतात. अर्सेनिक हे औषध म्हणून सुरक्षित मानलं जाई. साहजिकंच अर्सेनिकच्या विषबाधेचे रोगी पोलियोचे म्हणून गणले जात. यानंतर लेखिकेने सिफिलीसच्या पोलियोसदृश काही लक्षणांचा विचार केला आहे.

पुढे लेखिकेने पोलियोच्या व्याधीमूल्याचा ( = मॉर्बिडिटी चा ) विचार केला आहे. कालानुक्रमे व्याधीमूल्य कसकसं बदलंत गेलं हे मांडलं आहे. बालकांच्या टॉन्सिल ग्रंथी उचकटून काढल्याने पोलीयोत कशी वाढ झाली ते चर्चिलेलं आहे. क जीवनसत्वामुळे पोलियो कशा बरा झाला याच्या अभ्यासकथा ( = केस स्टडीज ) वर्णिलेल्या आहेत.

यापुढे प्रयोगशाळेतल्या लशीमुळे रोगाची साथ कशी आली व बळावली ते लिहिलं आहे.

यापुढे पोलियोचा विषाणू कृत्रिम पद्धतीने निर्माण करता येतो, हे लिहिलेलं आहे. ही पद्धत रासायनिक असून अजैविक आहे.

यापुढे साल्कच्या लशीमुळे उत्पन्न झालेली कटर नामे कुप्रसिद्ध रोगाची साथ वर्णिलेली आहे. यांत लशीतल्या जिवंत विषाणूमुळे अनेक बालकं व नजीकचे लोकं विनाकारण मेले, तर काहीजण जन्मभरासाठी लुळेपांगळे झाले. सक्तीच्या लस टोचणीचा समर्थक पॉल ऑफिट याने मान्य केलंय की कटर रोग हा कृत्रिम असून नैसर्गिक पोलियोपेक्षा कैक पटीने जास्त हानिकारक आहे. कटर व वायथ या दोन आस्थापनांच्या लशी वैज्ञानिक चाचणीप्रक्रिया पार न पडताच बाजारात येऊ दिल्या गेल्या.... यासाठी सुरक्षा निकष धाब्यावर बसवण्यात आले.... बाकी सगळं मी सांगंत बसंत नाही.

यानंतर माकडाच्या उतींतून निर्मिलेल्या लशीत कर्करोगजन्य पदार्थ सापडल्याचं लिहिलंय. या दूषित लशीमुळे कर्करोग होण्याचं प्रमाण वाढलं.

आता या प्रकरणाचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे भारतातील पल्स पोलियोच्या लशीचा गोंधळ वर्णिलेला आहे. प्रयोगशील लस असल्याने रोगाचं उच्चाटन तर झालं नाहीच, वर अतिरिक्त रोग बळावले. नैसर्गिक पोलियोपेक्षा कृत्रिम पोलियो जास्त प्राणघातक ठरला. भारतात नैसर्गिक पोलियोची जागा कृत्रिम पोलियोने घेतली आहे. वेल डन ! ५ वर्षाच्या बालकाला ३२ डोस दिले गेलेत. फार छान !!

निष्कर्ष : मानवी हस्तक्षेपामुळे नैसर्गिक पोलियो नाहीसा होत चाललाय. आता फक्त कृत्रिम पोलियो उरेल आणि नवजात बालकाला जन्मत:च मिळणारी पोलियोची रोगप्रतिकारक शक्ती निरुपयोगी ठरेल. आता बसा बोंबलंत.

प्रकरण १३ : डांग्या खोकला (Pertusis)

या रोगाने अमेरिकेत १९११ साली सुमारे १ लाख लोकांचा बळी घेतला. तर १९६० साली याने त्यामानाने नगण्य बळी घेतले. १९४० च्या दशकांत डांग्या खोकल्याची लस वापरांत पसरली, पण त्यापूर्वीच रोगाचा मृत्यूदर ९२ % ने खालावला होता. इंग्लंड व वेल्स मधले निकाल याहून ठाशीव आहेत. त्यांनुसार लशीकरणापूर्वी मृत्यूदर ९९ % ने खालावला होता. तसेच १९८४ साली उघडकीस आलं की डांग्या खोकल्याची लसटोचणी बंद केल्यावर त्याचे रोगी कमी झाले.

शिवाय लस टोचल्याने रोग बळावण्याची नेहमीची रड आहेच. क्यालीफोर्नियातल्या सान रफायेल येथल्या रुग्णालयात २०१२ सालच्या अभ्यासानुसार डांग्या खोकला झालेल्या बालकांपैकी बहुसंख्य बालकांना लस टोचली होती. याचा अर्थ ही लस आजीव सुरक्षा देण्यास पूर्णपणे असमर्थ ( की अपयशी ? ) ठरली होती. मग द्यायचीच कशाला ? झक मारायला ?

यापुढे लेखिकेने प्रतिपिंड आद्यपराध अर्थात Original Antigenic Sin ही संकल्पना स्पष्ट केलेली आहे. थोडक्यात सांगायचं तर लस टोचल्याने प्रतिकार यंत्रणा पंगू होते किंवा वेडीवाकडी वागू लागते. त्यामुळे नैसर्गिक प्रतिकारशक्ती क्षीण होते. परिणामी ज्या रोगाची लस टोचली आहे, नेमक्या त्याच रोगाला माणूस बळी पडतो. लशीद्वारे दुर्बळ विषाणू सोडल्याने प्रतिकारयंत्रणेची फसवणूक होते. ही फसवणूक सुधारता येत नाही. मग टोचून घेत बसा आयुष्यभर लशी एकापाठोपाठ एक. यापायी डांग्या खोकला आता बालकांना न होता प्रौढांना होतोय.

कोणीही लशीकरण तत्ज्ञ प्रतिपिंड आद्यपराधाविषयी काहीही बोलंत नाही. लशीसंबंधी मूलभूत प्रश्न उपस्थित होतात ना ! बोलायला तोंड आहे कुठे !

प्रकरण १४ : गोवर

१९ व्या शतकात ( १८०० चं शतक ) इंग्लंड व अमेरिकेत दर दोनेक वर्षांनी गोवराची साथ यायची. दाखल मुलांपैकी २० % परलोकवासी व्हायची. पण हे प्रमाण १९६० पर्यंत प्रचंड घसरलं. ही घसरण लशीकरणाच्या अगोदर झालेली आहे. स्वच्छता, आहार व पोषण यांत सुधारणा झाल्याने हा फरक पडला आहे.

गोवराच्या मृत विषाणूंच्या लशीमुळे अधिक तीव्र रोगाची लागण होई. हा नेमका उलट परिणाम आहे. रोगप्रतिकारक यंत्रणेत लशीने अनावश्यक हस्तक्षेप केल्याने झालेला प्रतिपिंड आद्यपराध हे मूळ कारण आहे. तसंच जिवंत लशीमुळेही गोवर होई. या गोवरामुळे ताप येऊन पुरळ उठे. हा परिणाम टाळण्यासाठी गोवराची प्रतिपिंडे टोचली जात. त्यांच्यामुळे रोगप्रकरण अधिक गुंतागुंतीचं होई.

यानंतर अमेरिकेतल्या गोवर लशीकरण प्रकल्पाचं अपयश वर्णिलेलं आहे. अनावश्यक लशीकरणामुळे गोवर मोठ्या माणसांनाही होऊ लागला. परत डांग्या खोकल्यासारखीच परिस्थिती उद्भवली. गोवराच्या लागणी व्हायच्या. मात्र अमेरिकेत सगळं खापर लस न घेतलेल्यांवर फोडण्यात आलं. खरा प्रकार असा होता की लशीमुले नैसर्गिक प्रतिकारक्षमतेवर प्रतिकूल परिणाम झाला होता. २००० साली अमरिकेतनं गोवर संपल्याचं जाहीर करण्यात आलं, परंतु हे जाहीर विधान २०१२ साली मागे घेतलं गेलं. एकदा का लस घेतली की आयुष्यभर परत परत घ्यावी लागते. करोनाचं असंच होणारे. याविषयी शंका नको.

यानंतर प्रतिपिंडांविषयी प्रश्न उपस्थित केला आहे. प्रतिपिंडे ही खरोखरंच रोगजंतूंना ठार मारतात की ती केवळ अंगुलीनिर्देशक लेबल असतात ? प्रतिपिंडांची कमतरता ( agamma-globulinemia ) असतांनाही गोवर बरा झाल्याची काही प्रकरणं घडलीत. यावरून लस व तिची उपयुक्तता यावर भलं थोरलं प्रश्नचिन्ह चिकटतं.

यानंतर प्रतिपिंड प्रोत्साहन प्रक्रिया वर्णिली आहे. कधीकधी प्रतिपिंडांमुळे विषाणूस यजमान पेशीस ओळखणं सोपं पडतं. यांस antibody dependent enhancement म्हणतात. याचा अर्थ लस टोचल्याने तिच्या परिणामामुळे लागण व्हायची शक्यता वाढते. हा नेमका विपरीत परिणाम आहे.

काही लशींमुळे पुरळ न उठता गोवर होतो. गोवराच्या विषाणूमुळे पुरळ येत नसून शरीराने विषाणूंवर हल्ला केल्याने उठतं. जर लस टोचली तर प्रतिकारक्षमता बिघडल्याने पुरळ उठंत नाही, तरीपण रोग होतोच. असा बिनलक्षणी गोवरही झाल्याची प्रकरणं उजेडांत आलेलीआहेत. मग लस घेतलेल्यांना कळणार कसं की लस अपयशी ठरली आहे ते ? बसा बोंबलंत.

यानंतर गोवराची लागण कमी होण्याविषयी संभाव्य कारणांचा विचार केला आहे.

यानंतर लशीमुळे अर्भकाच्या मातृदत्त प्रतिकारशक्तीचा कसा ऱ्हास होतो ते वर्णिलेलं आहे. गोवरावर आईचं दूध व लस यापैकी आईचं दूध अधिक परिणामकारक आहे.

यानंतर जीवनसत्वांचा योग्य पुरवठा प्रतिकारशक्ती कशी वाढवतो ते सांगितलं आहे.

प्रकरण १५ : उपासमार, स्कर्व्ही व क जीवनसत्व

शीर्षकावरनं कळतं या प्रकरणात काय असणारे ते.

स्कर्व्ही म्हणजे धातुविदरण या व्याधीचं लक्षण हिरड्यांवर सर्वप्रथम दिसून येतं. मात्र ही पूर्ण शरीराची व्याधी आहे. हिच्यात शरीरास धरून ठेवणारी कोलाजेन ( collagen ) नामे ऊती विदीर्ण पावते. त्यामुळे शरीर अक्षरश: खिळखिळे होते. आहारातनं क जीवनसत्व न मिळाल्याने ही व्याधी होते. हिचा परिणाम हिरड्यांवर सर्वप्रथम दिसून येतो. त्या हुळहुळ्या होऊन जराशा धक्क्याने रक्त पाझरू लागतं. ही व्याधी बळावल्यावर रोगी थकव्याने वारंवार झोपू लागतो व एके दिवशी कायमचा झोपतो.

अमेरिकेत इ.स. १८५० च्या दशकात क्यालिफोर्नियात सोन्यासाठी धडपड अर्थात गोल्ड रश ऐन भरात होती. तेव्हा धातुविदरण व्याधीने पटकी ( = कॉलरा ) पेक्षा जास्त बळी घेतले. अमेरिकी नागरी युद्धात ( इ.स. १८६१ ते १८६५ ) प्रत्यक्ष लढाईत कामी आलेल्या सैनिकांची संख्या अवघी १ % होती. बाकीचे ९९ % रोगराई व इतर कारणांनी मृत्युमुखी पडले होते. यांत धातुविदरण व हगवण आघाडीवर होते.

क जीवनसत्वात अस्कॉर्बिक आम्ल असतं. त्यामुळे पेशींचं चयापचय सुधारतं. मुडदूस ही व्याधी ड जीवनसत्वाच्या कमतरतेने होते. मात्र हिच्यातनं बरं होण्यासाठी ड संगे क जीवनसत्वही आवश्यक असतं. क जीवनसत्व एखाद्या प्रतिजैविकासारखं काम करतांनाही आढळून आलंय.

कालांतराने आहारात सुधारणा झाल्याने धातुविदरण व्याधी उतरणीस लागली. उदा. : इंग्लंडध्ये धातुविदरण व्याधीची लागण इतर सांसर्गिक आजारांसारखी झपाट्याने खाली आली. क जीवनसत्व केवळ व्याधींवर उपयुक्त नसून सर्वसाधारण रोगप्रतिकारशक्ती देखील बळकट करतं. कुठल्याश्या निरर्थक लशी टोचून घेण्यापेक्षा आहारात सुधारणा केलेली काय वाईट ?

क जीवनसत्व जर इतकं गुणी आहे तर मग आपले डॉक्टर हे आपल्याला समजावून का सांगंत नाहीत, असा प्रश्न पडतो. क जीवनसत्वाच्या परिणामाविषयी नियोजित स्वैरचाचण्या ( = randomised controlled trials ) आजवर कोणीही घेतल्या नाहीयेत. इतक्या महत्त्वाच्या विषयाकडे दुर्लक्ष करून नेमकं काय साध्य होतं ? उत्तर सोप्पंय, औषध आस्थापनांचा फायदा !

प्रकरण १६ : हरवलेले उपचार

शीर्षकावरनं कळतं या प्रकरणात काय असणारे ते.

आधुनिक वैद्यकातल्या अनेक घातक संकल्पना केवळ अंधविश्वासाच्या आधारे प्रचलित करण्यात आल्या. उदा.: दुर्बलोच्छेद ( = Eugenics ), थालीडोमाईड, डाय-ईथाईल-स्टिल-बेस्ट्रॉल. यांत एक भर म्हणजे केवळ लस टोचल्याने रोग बरा होतो. प्रत्यक्षात लस ही रोगापासून संरक्षण करीत नाही. या प्रकरणात इतर सुलभ, स्वस्त व अधिक परिणामकारक उपायांचा विचार केला आहे.

विषय बराच मोठा आहे. या छोट्याशा प्रकरणांत दालचिनी, कांदा, लसूण, एन्चिनेशिया, जिकामा, ताज्या फळांचा रस, सफरचंदाचे सायडर व्हिनेगर, कॉड माशाच्या यकृताचे तेल, रजतभस्म द्राव ( चांदीचे कोलॉयडल सोल्युशन ), इत्यादि पदार्थांच्या जंतुघ्न गुणांचा परामर्श घेतला आहे.

काही उदाहरणे : प्रतिजैविकांना दाद न देणारे नफ्फड ब्याक्टेरिया दालचिनीमुळे आटोक्यात येतात. कांदा भरपूर खाणाऱ्या जवळजवळ सर्व ( इटालियन, पोलिश, हंगेरियन, इत्यादि ) लोकांना देवी येत नाहीत. लसणाने क्षय व डांग्या खोकला यांवर उतार पडतो.

प्रकरण १७ : भीती व धारणा

लोकांची समजूत करवून दिलीये की जग धोकादायक आहे. म्हणून तुम्ही तुमची सुरक्षा सरकार व मोठ्या आस्थापनांच्या हाती सोपवा. ती तशी खरोखरंच सोपवावी का ? उत्तर नकारार्थी आहे. लोकांनी आपला शहाणपणा व सुरक्षा का म्हणून गहाण ठेवायची ? या विषयाचा सदर प्रकरणांत उहापोह केला आहे. या भीतीच्या कचाट्यातनं डॉक्टरांचीही सुटका नाही. खूपदा ते ही स्वतंत्र विचार त्यागून प्रचारतंत्रास बळी पडतात.

आज अलोपथीच्या मते मानवी शरीर म्हणजे रसायनांचा समूह असून त्यास शल्यकर्म, रसायने, प्रतिजैविके वगैरेंच्या सहाय्याने कसंबसं नियंत्रणात ठेवायचं असतं. हे नियंत्रण कुठवर, तर जीव जाणार नाही या बेताने. असो.

डॉक्टर चार्ल्स क्रेटन ( Dr. Charles Creighton ) याने १९०३ साली देवीच्या लशीचे धोके, परिणामकारकता, पुनर्लशीकरण व कायदेशीर बाबी यांविषयी बरंच लेखन केलं. त्याचा एक अहवाल बनवला व तो एनसायक्लोपीडिया ब्रिटानिका मध्ये प्रसिद्धही झाला. पण १९२२ साली हा मजकूर गाळून त्या जागी लसोपचार नामे मजकूर घुसडण्यात आला. त्यात कसलाही पुरावा नसतांना लशीमुळे रोगप्रतिकारक शक्ती मिळते असा धादांत असत्य दावा केला गेला. कोणी केलं हे ? ओळखा पाहू ! ही विलक्षण लस म्हणे एडवर्ड जेन्नरने शोधली. घंटा तिच्यायला संशोधन.

यापुढे जेन्नरचा हवाला देऊन 'घातक रोगजंतू व जीवनरक्षक लस' ही बिनबुडाधी धारणा ठासून वारंवार मांडली जाऊ लागली. १९२० च्या दशकांत व नंतर अमेरिकेत अनेक चित्रविचित्र ( bizzare ) लशींचा सुळसुळाट झाला आणि त्यांच्या पोकळ व भरमसाट दाव्यांना ऊत चढला. तो आजवर टिकून आहे. साहजिकंच आजचं अलोपथी वैद्यक हा एक रिलीजन होऊन बसला आहे. दुसरं काय !

लागणप्रवर्तक हे लागणकारक नव्हेत. Infection agents are not cause of infections. या सत्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. उदा. : पेलाग्रा या विकारापायी हगवण, त्वचादाह, निद्रानाश होतो असं मानण्यात येई. आज खरंतर ही व्याधी बी-३ या जीवनसत्वाच्या अभावी होते हे स्पष्ट झालंय. पण एके काळी पेलाग्राचा विषाणू असल्याचा समज प्रचलित होता. आज 'करोनाचा विषाणू' ही अशीच एक थोतांडी संकल्पना प्रचलित आहे.

लस अयशस्वी ठरली की मग लस न घेतलेल्या जागरूक लोकांवर साथीच्या रोगांचं दोषारोपण करणं हा वैद्यकीय प्रस्थापितांचा एक आवडता खेळ आहे. हल्ली हे खापर विषाणूचं जनुकीय उत्परिवर्तनावर ( = जेनेटिक म्युटेशन वर ) फोडलं जातं. हे एक उपथोतांड आहे. मग 'नवीन व अधिक प्रभावी' लशी शोधण्यावर लक्ष केंद्रित केलं जातं. जुन्या लशीचे दोष व अपयश यांवर आपसूक पांघरूण टाकता येतं. मुळांत लस ही रोगनिवारण करणारी नसतेच. पण लक्षांत कोण घेतो. लोकंही भीतीपायी नवीन लशीवर विश्वास ठेवतात. असा एकंदरीत मामला आहे.

यानंतर इंग्लंडात लशी टोचण्यापूर्वीच साथींचे रोग कसे आटोक्यात आले होते त्याची आकडेवारी व आलेख दिलेले आहेत.

अमेरिकेत स्कार्लेट ताप हा पूर्वी एक जीवघेणा रोग होता जो आता नामशेष झाला आहे. तो लशीशिवाय नाहीसा झाला. अर्थात, लसनिर्मितीचे प्रयोग करण्यांत आलेच. अशीच एक प्रयोगशील लस निरोगी असलेल्या शिकाऊ परिचारिकांना टोचल्यावर सगळ्या एका वर्षभरांत मृत्युमुखी पडल्या. आता कळलं स्कार्लेट तापावर लस का काढली नाही ते ?

असो.

संपलं एकदाचं पुस्तक.

विचार, मनन व चिंतनाचं उपकंत्राट देता येत नाही. या गोष्टी स्वत:च्या स्वत:च कराव्या लागतात. एव्हढं जरी ध्यानी आलं तरी पुस्तक सार्थकी लागलं, म्हणेन मी.

---------------x---------------x---------------

लांबलचक सारांश वाचून कंटाळलात ? आता थोडा इतरत्र फेरफटका मारूया. सांगायचा मुद्दा असा की केवळ प्रपकांडाद्वारे ( = प्रोपोगंडा द्वारे ) लस हे जणू अमृत आहे असा आभास उत्पन्न केला आहे. तर असा गोबेल्सी अपप्रचार पूर्वी कधी झाला होता याचा धांडोळा घेतला. तेव्हा महाभारतात एक उदाहरण सापडलं.

पुष्ट, बलवान, नम्र व सतेज पांडव पाहून हस्तिनापुराची लोकं त्यांनाच भावी राजे मानू लागली. त्यामुळे दुर्योधनाचा जळफळाट झाला. पांडवांचा काटा काढण्यासाठी त्यांना दूरदेशी पाठवावं असं त्यानं ठरवलं. तो बापाला म्हणजे धृतराष्ट्राला म्हणाला की एकदा का पांडव दूर गेले की मी राज्यावर बसेन. मग कुंती व ते परत जरी आले तरी काही हरकत नाही. मी त्यांना बघून घेईन. प्रत्यक्षात त्याला पांडवांची हत्या करायची होती. मात्र हा गुप्त हेतू कोणालाही कळू न द्यायची काळजी घेतली.

आता, पांडवांना निघून जा असं थेट सांगणं शक्य नव्हतं. तेव्हा दुर्योधन बापाला आपली योजना समजावतांना म्हणाला की भीष्म मी व पांडवांप्रति समानदृष्टी बाळगून आहे. द्रोण व अश्वत्थामा माझे आहेत. कृप या दोघांना सोडणार नाही कारण हे त्याचे मेहुणा व भाचा आहेत. राहता राहिला विदुर, पण तो आपल्या अन्नाचा ओशाळा आहे. यावर धृतराष्ट्र या योजनेस राजी झाला. मग दुर्योधनाने धनमानादि पारितोषिकांद्वारे प्रधानवृंदास आपल्याकडे वळवून घेतलं. या वश झालेल्या मंत्र्यांनी धृतराष्ट्राच्या आज्ञेवरून वारणावत नगरीची प्रशंसा आरंभली. तसंच धृतराष्ट्राच्या भाट व चरणांनी त्या नगरीची वारेमाप स्तुती केली. तिथे शिवपुजेची पर्वणी आल्याची खरीखुरी बातमीही विशेषकरून पसरवली. पांडवांच्या मनात वारणावताविषयी उत्सुकता निर्माण झाल्याचं कळताच धृतराष्ट्र त्यांना म्हणाला की जत्रेला जाऊन विपुल दानधर्म करून या. धृतराष्ट्राची इच्छा युधिष्ठिरास कळून आली. पण विदुराचे सहाय्य आहे म्हणून त्यानं ही योजना स्वीकारली.

गमनदिनी जेव्हा पांडव हस्तिनापुरातल्या प्रतिष्ठित ब्राह्मणांचा निरोप घ्यायला गेले तेव्हा त्या विप्रांनी धृतराष्ट्रास बराच दोष दिला. पंडू सर्वांना पित्याप्रमाणे वाटंत असे, याउलट धृतराष्ट्रास पांडव डोळ्यासमोर नको झालेत. भीष्माने पांडवांना जाण्याची परवानगी दिलीच कशी, असा प्रश्न उपस्थित केला. भीष्माची बुद्धी चळली आहे, सबब आपण हस्तिनापुर त्यागून धर्माच्या मागे गेले पाहिजे असं म्हणू लागले. ब्राह्मणांनी आपणहून निर्वासित होणे हा त्याकाळी राज्याचा फार मोठा अपमान मानला जाई. परिस्थिती इथवर फिसकटली होती. तरीपण युधिष्ठिराने धृतराष्ट्राच्या चांगुलपणाचा भरवसा देऊन ब्राह्मणांना तिथेच थांबायची विनंती केली. ती त्यांनी मानली.

पुढे मग पांडव वारणावतात गेले, नंतर सुमारे वर्षभराने लाक्षागृह प्रकरण घडलं. त्यातनं ते सुखरूप निसटले खरे, पण त्यांना रानोमाळ भटकावं लागलं. भटकतांना हिडींब व बकासुर वगैरे प्रकरणेही घडली. एकदा युधिष्ठिराच्या मनांत विचार आला की आपण असेच फिरंत राहिलो तर दुर्योधन आपल्यास कुठेतरी गाठून ठार मारेल. काहीतरी उपाय शोधायला हवा. फिरताफिरता पांडव व कुंती काम्पिल्य नगरीपाशी आले. तेव्हा पांडवांना कृष्ण यादव नामे एक अत्यंत लबाड इसम भेटला. शिवाय तो नेमका पांडवांचा आतेभाऊही निघाला. त्याच्यापाशी युधिष्ठिराने आपली व्यथा बोलून दाखवली. कृष्णाला कळलं की पांडव आपल्या बरेच उपयोगाचे आहेत. आज दुर्योधानामुळे ते रानोमाळ हिंडताहेत. उद्या जरासंधापायी मथुरेकर यादवांवर हीच वेळ येऊ शकते.

तेव्हा त्या लबाड माणसाने द्रौपदीस वरण्याचा आपला हेतू बाजूला सारला व आपल्या जागी पांडवांपैकी एकाची मनोमन नियुक्ती केली. वरकरणी मात्र त्याने युधिष्ठिरास एखाद्या प्रबळ राजाचं सहाय्य घ्यायला सुचवलं. पुढे असंही म्हणाला की जरा घाई करा. कारण की काम्पिल्य नगरीचा राजा द्रुपद याची मुलगी उपवर आहे, तेव्हा तुम्ही त्याचीच सोयरिक करून घ्या. आजंच तिचं स्वयंवर आहे. पुढे अर्जुनानं द्रौपदी जिंकली व कुंतीच्या अहैतुक आशीर्वचनामुळे ती इतर चार पांडवांचीही पत्नी झाली. आता पांडवांची ओळख पटली होती. मग हस्तिनापुरास परत कसं जायचं याविषयी विचारविनिमय चालू होता. इतक्यात तिथनंच विदुराकरवी पांडवांना सपत्नीक आगमनाचं आमंत्रण आलं.

लोकहो, पहा, आत्ताप्रमाणेच सुमारे दहा पंधरा वर्षांपूर्वी पंडू व माद्रीच्या मृत्यूनंतर कुंती पांडवांना घेऊन हस्तिनापुरास आली होती. तेव्हा तिला लोकांची सहानुभूती तरी होती. भीष्माने तिला बाहेरच्या बाहेर न फुटवता मोठ्या मनाने आश्रय दिला. यावेळेस मात्र भीष्मानेच तिला व पांडवांना हाकून लावलं होतं. मात्र असं असलं तरीही आता द्रौपदीच्या केवळ अस्तित्वाने पांडवांना अपरिमित बळ प्राप्त झालं. इतकं जबर बळ मिळालं की तुरुंग फोडून इतस्तत: भटकणारा युधिष्ठीर कालांतराने चक्क राजसूय यज्ञ करता झाला. द्रौपदी ही काय चीज आहे ते यातनं कळतं.

असो. आता आपण परत वर्तमानकाळात येऊया किंवा जाऊया.

---------------x---------------x---------------

आलांत वर्तमानांत ? उत्तम. आता आपल्यासाठी म्हणजे सामान्य माणसासाठी काही प्रश्न हजर आहेत.

१. हस्तिनापुरातल्या ब्राह्मणांनी भीष्माची उलटीसुलटी घेतली. त्यांच्याकडे तितकी नैतिक शक्ती होती. करोनाच्या लशीच्या थोतांडाविरुद्ध कोण नैतिक शक्तिशाली ब्राह्मण आपल्यासाठी उभा राहणार आहे ?

उत्तर : कोणीच नाही. आपली लढाई आपल्यालाच लढावी लागणार आहे. त्यासाठी नैतिक शक्ती म्हणून कर्मसाधना करायला पाहिजेच.

२. कोणती द्रौपदी आपल्यासाठी वरमाला घेऊन सज्ज आहे ?

उत्तर : कोणीच नाही. आपणंच आपल्याला लशीच्या शोधार्थ रानोमाळ हिंडण्यापासून वाचवायचं आहे. त्यासाठी मजबूत भक्तीसाधना हवीच.

३. कोण विदुर आपल्याला मार्गदर्शन करणार आहे ?

उत्तर : मी आहे ना गामा पैलवान, विदुरासारखा मार्गदर्शन करणारा. मी नीतिमत्तेचा महामेरू असून स्वयंघोषित धर्ममार्तंडही आहे. मी सांगतो की आपण सारे मिळून युधिष्ठिरासारखी धर्मसाधना करूया.

सांगायचा मुद्दा काये की कर्म, भक्ती, धर्म यांमध्ये साधना हा सामायिक घटक आहे. ती साधना म्हणजे नामजप. तो करायला हवाच. चांगला सणकून करूया आणि या करोना नामे थोतांडास पार पळवून लावूया.

॥ जयजय रघुवीर समर्थ ॥

आपला नम्र,
-गामा पैलवान

धर्मसमाजजीवनमानतंत्रविज्ञानराजकारणप्रकटनविचारलेखमतशिफारसमाहितीसंदर्भभाषांतरआरोग्य

प्रतिक्रिया

करोना हा खरंच इतका घातक आहे का? की तसं चित्रं उभं केलं गेलंय? यामागे कारण आहे. ते म्हणजे गलेलठ्ठ औषधास्थापनांची लस पुढे रेटणे.
भारतातातील जरा बाजूल ठेउयात,,,
आपण राहता ते युनाइटेड किंग्डम, कानडा , जर्मनी , ऑस्ट्रेलिया इत्यादी देशाची सरकारे पण भ्रष्टावली आहेत? हा दावा पटत नाही काय गरज होती त्यांना सगळे सुरळीत चालू असताना हे करण्याची?
"रोग नामे एका थोतांडातनं :.... असे म्हणता म्हणजे मग झालेलं मृत्यू पण थोतांड ? कि मुळात हा रोगच नाही? परत गोल पोस्ट बदललेला दिसतोय
असो ..
आपले लस ना घेणे वैगरे आपल्याला लखलाभ ... आपली थेअरी लॅन्सेट मध्ये छापून येवो अशी अशा... अरे हो पण ते कशाला छापतीळ नाही का ?
बहुतेकांचा आपापल्या आरोग्य अधिकाऱ्यांवर अन्य त्यामार्गे सरकार वॉर बऱयापैकी विश्वास आहे आणि बहुतेक आपली या दाव्याला भूल पडून आपले नुकसान करून घेणार नाहीत ...
इति

चौकस२१२,

१.

आपण राहता ते युनाइटेड किंग्डम, कानडा , जर्मनी , ऑस्ट्रेलिया इत्यादी देशाची सरकारे पण भ्रष्टावली आहेत?

हो. चुकीच्या अनावश्यक लशी टोचल्याने रोग वा साथ बळावल्याचे प्रकार यापूर्वीही झालेले आहेत.

२.

काय गरज होती त्यांना सगळे सुरळीत चालू असताना हे करण्याची?

माहीत नाही. नेमका हाच प्रश्न जनतेने नेत्यांना विचारायचा आहे.

३.

"रोग नामे एका थोतांडातनं :.... असे म्हणता म्हणजे मग झालेलं मृत्यू पण थोतांड ?

छे छे. मृत्यू थोतांड नाहीत. ते आणि केवळ तेच सत्यांड आहेत.

४.

कि मुळात हा रोगच नाही?

करोना हा सर्दीपडसे यासारखा आजार आहे. फारतर फ्ल्यू सारखा म्हणता येईल.

५.

परत गोल पोस्ट बदललेला दिसतोय

करेक्ट. रोगाची भीती उगीच फुगवून सांगितल्याने जे थोतांड उत्पन्न झालंय त्यातनं लस नावाचं दुसरं थोतांड निर्माण झालंय. एकेक थोतांडाचा समाचार घ्याचा झाला तर गोलपोस्ट इथेतिथे हलणारच ना !

६.

आपले लस ना घेणे वैगरे आपल्याला लखलाभ ...

धन्यवाद. करोनाच्या लशीचा नेमका फायदा काय हे कोणीही आजवर सांगितलेलं नाही.

७.

आपली थेअरी लॅन्सेट मध्ये छापून येवो अशी अशा

प्रशंसेबद्दल धन्यवाद. मात्र मी माझ्या थियरीची फारशी चिंता करीत नाही. कारण की माझ्यापेक्षा सरस असे अनेक अलोपाथ डॉक्टर पर्यायी दृष्टीकोन बाळगून आहेत. फक्त त्यांचं म्हणणं चर्चेस येत नाही. ते यावं इतकीच माझी इच्छा आहे.

८.

बहुतेकांचा आपापल्या आरोग्य अधिकाऱ्यांवर अन्य त्यामार्गे सरकार वॉर बऱयापैकी विश्वास आहे

असू शकतो. ते लोकांचं लोकांना ठरवू द्यावं. लशीकरणाविषयी मी फक्त तथ्ये मांडली. नेमके प्रश्न काय विचारायचे ते वाचक ठरवतील. माझा लोकांच्या अकलेवर पूर्ण विश्वास आहे.

९.

बहुतेक आपली या दाव्याला भूल पडून आपले नुकसान करून घेणार नाहीत ...

मी कुठलाही दावा करीत नाही. फार काय उपरोक्त पुस्तकाच्या लेखिका डॉक्टर एलिझाबेथ हम्फ्रीज या सुद्धा सदर पुस्तकांत कसलाही दावा करीत नाहीत.

आ.न.,
-गा.पै.

मराठी_माणूस's picture

7 May 2021 - 11:36 am | मराठी_माणूस

अनेक अलोपाथ डॉक्टर पर्यायी दृष्टीकोन बाळगून आहेत.

ह्यावर अधिक माहीती द्याल का ?

गामा पैलवान's picture

9 May 2021 - 6:24 pm | गामा पैलवान

मराठी_माणूस,

पहिल्याप्रथम माझ्याकडनं उशीर झाल्याबद्दल क्षमस्व. तीनचार नावं चटकन सापडली.

१. डॉक्टर अँड्र्यू काऊफमन ( andrew kaufman ) : यांच्या मते विषाणू अशी काही चीज अस्तित्वात नाही. मला मात्र या दाव्याविषयी शंका आहे.

संदर्भ : https://thebigvirushoax.com/dr-andrew-kaufman

मात्र करोनाची जागतिक लाट वगैरे काही नाही, हे मत मात्र पटलं.

२. शिवा आय्यादुराई ( shiva ayyadurau ) : हे गृहस्थ मेडिकल डॉक्टर नसले तरी यांचा जीवशास्त्राचा दांडगा अभ्यास आहे. यांनी करोनाच्या रुग्णांना अलग करून सुदृढ लोकांना परत कामावर हजर होण्याच्या दृष्टीने भाष्य केलं होतं.

संदर्भ : https://www.citizensjournal.us/how-to-fight-coronavirus-without-causing-...

३. डॉक्टर ज्युडी मिकोवित्स ( judy mikovits ): अमेरिकेचे संसर्गजन्य रोगांचे विभागप्रमुख डॉक्टर फावची यांच्या चमूत सदर बाई कामाला होत्या. डॉक्टर फावची भोंदू ( = फ्रॉड ) असल्याचा दावा या बाईंनी केला आहे.

४. डॉक्टर रशीद बुट्टार ( rashid buttar ) : यांनी करोनालशीच्या विरोधात अमेरिकेत टीव्ही वरून धोक्याचा इशारा दिला आहे. तसंच ते मुखपट्टी वापरण्याच्या विरोधात आहेत. मुखपट्टी विषाणूंना थांबवायला निरुपयोगी असते. कारण की ते पट्टीतल्या भोकांतून सहज आतबाहेर करू शकतात. क्रोनासाठी तोंडावर मुख्पट्टी बंधने हे निर्बुद्धतेचं लक्षण आहे.

संदर्भ : https://ambassadorlove.wordpress.com/2020/12/24/evidence-of-genocide-the...

जमेल तितके डॉक्टर लोकं शोधले आहेत.

आ.न.,
-गा.पै.

मराठी_माणूस's picture

10 May 2021 - 2:25 pm | मराठी_माणूस

धन्यवाद

चौथा कोनाडा's picture

11 May 2021 - 12:18 pm | चौथा कोनाडा

सौजन्यः गॉडजिला यांचा प्रतिसाद (http://misalpav.com/comment/1107290#comment-1107290)

रुग्णांची संमती घेऊन सुमारे पन्नास जणांवर असा उपचार केला. त्यातील दहा रुग्ण गंभीर स्वरूपाचे होते. या रुग्णांवर सरकारी नियमांप्रमाणे उपचार सुरू ठेवलेच त्यासोबत दररोज सकाळी सायंकाळी ३० मिलीलीटर देशी दारू दिली. याचे चांगले परिणाम दिसून आले असून जवळपास सर्व रुग्ण बरे झाले. यासंबंधी तज्ज्ञांना समोर योग्य त्या पुराव्यांनिशी बाजू मांडण्याची आपली तयारी आहे. सतत दारू पिणे आरोग्यासाठी घातक आहे. मात्र, औषध म्हणून ते सात ते दहा दिवस द्यायचे आहे, यातून आपल्याला दारूच्या व्यसानाचे समर्थन करायचे नाही, असेही डॉ. भिसे यांनी म्हटले आहे.

https://maharashtratimes.com/maharashtra/ahmednagar-news/dr-sanjay-bhise...

ही अतिशय दिलासादायक बातमी !
हे चाचणी यशस्वी असेल तर भारत संपुर्ण जगात देशी दारू निर्यात करू शकतो. यातुन इतका पैसा मिळेल की २०३० पर्यंत भारत जगातील महासत्ता बनू शकतो !

लोकहो,

नोव्हेंबर २०२० मध्ये सरकारी मान्यता मिळण्याआधी एप्रिल २०२० मध्ये तब्बल ५ कोटी कोव्हिशील्ड लशी तयार होत्या. मार्च/एप्रिल २०२० मध्ये करोनाचा इतका फैलाव झाला नव्हता. तरीपण लस कशी काय बनवली? हा प्रश्न आहे. मान्यता देण्यात सरकारकडून ढिसाळपणा किंवा धोक्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष झालेलं असू शकतं. या लशी घेतलेले आज मृत्युपंथास तर लागलेले नाहीयेत ?

यासंबंधी नुकतंच एक चलचित्र बघितलं : https://www.facebook.com/watch/live/?v=107710248047824&ref=watch_permalink

इथे इंग्लंडात एका सरकारी संस्थेने अंदाज व्यक्त केलाय की तिसऱ्या लाटेत मृतांमध्ये व रुग्णालयात दाखल झालेल्यांत ६० % ते ७० % लोकं दोन मात्रा लस घेतलेले असतील. तिसरी लाट ऑगस्ट सप्टेंबर २०२१ मध्ये येईल तोपर्यंत इंग्लंडमध्ये येईल लस न घेतलेल्यांपेक्षा लस घेतलेले जास्त प्रमाणावर बळी पडणार. हे युकेचं अधिकृत शासकीय कथन आहे. हाच प्रकार भारतात कशावरून घडणार नाही ? पान क्रमांक २३ वर आलेख आहे : https://assets.publishing.service.gov.uk/government/uploads/system/uploa...

सांगायचा मुद्दा असा की लशीमुळे करोना बाधितांची संख्या वाढतेय. हे युके सरकार उघडपणे म्हणू शकंत नाही. म्हणून अंदाजाच्या पदराआड दडून सांगितलं जातंय.

आ.न.,
-गा.पै.

सुक्या's picture

12 May 2021 - 2:35 am | सुक्या

ते सारे जौ दे.
भारतात सध्याच्या घडीला इतके लोक अचानक कुठल्या आजारने ग्रस्त झाले की आरोग्य व्यवस्थेवर इतका ताण आला आहे. जर करोना हे थोतांड आहे तर जे लोक दगावले ते कुठल्या आजाराने ग्रस्त होते? अगदी ३० - ३२ वर्षे वयाची लोक गेले.

भारतात इतके कमी लसिकरण झाले आहे तर करोनाचा फैलाव झालाच कसा? करोना नाही तर मग सद्या कुठला रोग चालु आहे ?

गामा पैलवान's picture

13 May 2021 - 2:13 am | गामा पैलवान

सुक्या,

सर्दीपडशामुळे कोणी कधी दगावल्याचं ऐकिवात नाही. हां, पण सर्दीतनं पुढे न्यूमोनिया होऊन माणूस मरू शकतो.

करोनाचंही असंच आहे. फक्त करोना जरा सर्दीपेक्षा जास्त प्रभावशाली आहे. मृताचं कारण करोना म्हणून लिहिणं हा फ्रॉड आहे. माझ्या माहितीप्रमाणे खास करोनावर असा कुठलाही उपचार नाही.

आ.न.,
-गा.पै.

साप साप म्हणुन भुई धोपटु नका.

जर कोरोना नाही तर एवढी लोक अचानक कोणत्या आजाराने मरत आहेत ते सांगा. न्यूमोनिया झालेले सगळेच लोक (किंवा ५०%) लोक मरतातच असे काही नाही. करोना जरा सर्दीपेक्षा जास्त प्रभावशाली आहे तर सर्दीचे लक्क्षणे का नाहीत लोकांमधे?
खास करोनावर असा कुठलाही उपचार नसेल तर काहीच उपचार करु नये काय?

बबन ताम्बे's picture

13 May 2021 - 7:44 am | बबन ताम्बे

कोरोना थोतांड आहे तर लोक एव्हढ्या मोठ्या संख्येने कुठल्या आजाराने बाधित होताहेत? कालच आमचा ऑफिसातला एक सहकारी गेला. चाळिशीतला आणि धडधाकट होता. पॉझिटिव्ह निघाला आणि नन्तर क्रीटीकल अवस्थेत गेला. मला नाही वाटत कोरोना हे थोतांड आहे.
पण कोरोना विषाणूवर व उपचारांवर अजून खूप संशोधन व्हायला हवे हे नक्की.

गामा पैलवान's picture

13 May 2021 - 6:17 pm | गामा पैलवान

सुक्या,

मलाही हाच प्रश्न पडलाय. धडधाकट माणूस अचानक गंभीर होतो आणि कशाने मरतो? करोना जर इतका खतरनाक आहे तर अशा केसेस सर्वत्र दिसायला हव्यात. प्लेगच्या साथीत दिसल्या होत्या तशा. त्या आज का दिसंत नाहीत?

करोनाचे उपचार हा आग रामेश्वरी व बंब सोमेश्वरी असं तर नाही? असे प्रकार पूर्वी झाले आहेत. उदा. : पेलाग्रा व्याधीचा विषाणू वर लस शोधायचा प्रयत्न झाला होता. पण नंतर लक्षात आलं की ही व्याधी जीवनसत्वांच्या कमतरतेमुळे होते. करोनाचंही असंच असू शकतं ना? या प्रश्नाचं उत्तर वैद्यकीय तत्ज्ञांनी दिलं पाहिजे.

बाकी, तुम्ही म्हणता की :

१.

न्यूमोनिया झालेले सगळेच लोक (किंवा ५०%) लोक मरतातच असे काही नाही.

करोनाची मोचनमात्रा ( रिकव्हरी रेट ) ५० % हून बराच जास्त आहे.

२.

करोना जरा सर्दीपेक्षा जास्त प्रभावशाली आहे तर सर्दीचे लक्क्षणे का नाहीत लोकांमधे?

एकंच विषाणू भिन्न व्यक्तींत भिन्न लक्षणं उत्पन्न करू शकतो. याउलट एकाच व्यक्तीत भिन्न विषाणूंची समान लक्षणं आढळू शकतात.

आ.न.,
-गा.पै.

सुक्या's picture

14 May 2021 - 2:15 am | सुक्या

पेलाग्रा व्याधीचा विषाणू वर लस शोधायचा प्रयत्न झाला होता. पण नंतर लक्षात आलं की ही व्याधी जीवनसत्वांच्या कमतरतेमुळे होते.
हे कसे काय झाले हो? म्हणजे वैद्यकीय तत्ज्ञांनी हे शोधले की कुठले बाबा स्वप्नात येउन सांगुन गेले ?

वैद्यकीय तज्ञ आपले काम करत आहेत. त्यांना त्यांचे काम करु द्या. त्यांच्या सुचनेचे पालन करा. आपल्यापेक्षा त्यांना जास्त कळते हे ध्यानात ठेवा. जर तुम्हाला जास्त कळत असेल तर जे प्रश्न पडले आहेत तुम्हाला त्यांची उत्तरे शोधा.
कोन्स्पिरीसी थेरी वाल्यांचा नादाला लागु नका. त्यांना काय काम नसते काडया करण्याशिवाय. अजुनही काही लोक प्रुथवी सपाट आहे म्हणुन बोंबलत फिरत असतात.

इरसाल's picture

14 May 2021 - 10:10 am | इरसाल

हाच तर खरा प्रॉब्लेम आहे.
चुकीचे असणार्‍यांना "ते चुकीचे आहेत" हे खरे असणार्‍यांना पुराव्यानिशी साबित करायची जबाबदारी असते. त्यांना काय जातय बोंबलायला.

सुक्या,

१.

हे कसे काय झाले हो? म्हणजे वैद्यकीय तत्ज्ञांनी हे शोधले की कुठले बाबा स्वप्नात येउन सांगुन गेले ?

वैद्यकीय तत्ज्ञांनी शोधलं.

२.

वैद्यकीय तज्ञ आपले काम करत आहेत. त्यांना त्यांचे काम करु द्या. त्यांच्या सुचनेचे पालन करा. आपल्यापेक्षा त्यांना जास्त कळते हे ध्यानात ठेवा.

नेमकी इथेच तर समस्या आहे. ज्यांना माझ्यापेक्षा जास्त कळतं ते लशीकरणाची दुसरी बाजू उलगडून दाखवायला तयार नाहीत. म्हणूनंच तर मला माझ्या मर्यादित माहितीच्या आधारे भाष्य करावं लागतं.

३.

जर तुम्हाला जास्त कळत असेल तर जे प्रश्न पडले आहेत तुम्हाला त्यांची उत्तरे शोधा.

मला फार काही समजंत नाही. म्हणूनंच तर प्रश्न पडलेत. तुमच्याकडे उत्तरं आहेत का? असल्यास कृपया द्यावी. लशीकरणास इतिहास आहे, आणि तो काळाकुट्ट आहे. हे कोणी विस्कटून सांगायचं ? या क्षेत्रातल्या तत्ज्ञांनी की माझ्यासारख्या अर्ध्या हळकुंडाने पिवळं होणाऱ्यानी ?

४.

कोन्स्पिरीसी थेरी वाल्यांचा नादाला लागु नका.

कॉन्स्पिरीसीची थियरी आहे तेच बरंय. कॉन्स्पिरीसी जर का प्रत्यक्षांत उतरू लागली तर पळता भुई थोडी होते. करोनापायी झालीये तश्शीच.

कालपरवा नगरचे डॉक्टर भिसे यांनी ३० मिली देशी दारूचे ( = अल्कोहोल चे ) डोस पाजले तर रुग्णांना आराम पडला. हा अनुभव विदित केला तर सरकारने त्यांच्याकडे स्पष्टीकरण मागितलं. करोनाची साथ जर खरीच असती तर सरकारने या उपायाकडे गांभीर्याने बघितलं असतं. ते सोडून उगीच डॉक्टरच्या मागे लचांड लावलंय ( संदर्भ : https://maharashtratimes.com/maharashtra/ahmednagar-news/dr-sanjay-bhise... ).

एकंदरीत सरकारला पेशंट चटकन व कमी पैशांत बरे होण्यात रस नसून त्यांचे आजार लांबवण्यात अधिक रस आहे. मग याला कॉन्स्पिरीसीची का म्हणू नये?

५.

अजुनही काही लोक प्रुथवी सपाट आहे म्हणुन बोंबलत फिरत असतात.

विषयांतर.

आ.न.,
-गा.पै.

अमर विश्वास's picture

13 May 2021 - 8:53 am | अमर विश्वास

भारताच्या आधी कोविशील्ड ला UK ने मान्यता दिली होती.

आणि भारताची मान्यता ही कोविशील्ड च्या वापरासाठी आहे. कोविशील्ड बनवायला / परदेशात वापरायला मान्यतेची गरज नाही ...

उलट हे डोस तयार होते त्यामुळे लसीकरणाला वेग आला

तेंव्हा उगाच चुकीच्या अर्धवट माहितीवर आधारीत प्रतिसाद टाकून दिशाभूल करू नका

अमर विश्वास's picture

13 May 2021 - 8:59 am | अमर विश्वास

पण मी हे का लिहितोय ?

मुळात लस म्हणजे थोतांड अशी विचारसरणी असणाऱ्यांकडून काय अपेक्षा ठेवणार ?

मुळात हा लेख आणि यावरचे लेखकाचे प्रतिसाद हे बौद्धिक दिवाळखोरीचे उत्तम उदाहरण म्ह्णून दाखवायला हरकत नाही

पुन्हा एकदा सांगतो ... ही विचारसरणी आणि प्रतिसाद हे एक थोतांड आहे

गामा पैलवान's picture

14 May 2021 - 12:56 am | गामा पैलवान

लोकहो,

अँथनी फावची पचकला. म्हणतो कसा की करोना आटोक्यात आणण्यासाठी चीनने केलं तेच भारताने करावं. बातमी : https://www.loksatta.com/desh-videsh-news/india-needs-to-immediately-bui...

आ.न.,
-गा.पै.

---x---x---

ए फावच्या,

जरा चड्डीत राहायला शिकशील का? जिथनं करोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला त्या वू-हान प्रयोगशाळेला तूच देणगी दिलेलीस ना? एकीकडे चीनला पैसे द्यायचे व तिथूनच विषाणू बनवून घ्यायचा आणि दुसरीकडे भारतासमोर अक्कल पाजळायची. आम्हांस कळंत नाही का तुझी थेरं ?

तू १९८६ सालापासनं अमेरिकेच्या सांसर्गिक रोगांच्या विभागाचा प्रमुख आहेस. नेमकं कसलं संशोधन केलंस रे गेले ३५ वर्षं ? तू एड्सवर औषध शोधणार होतास ना? काय झालं त्याचं ? किती पैसे खाल्लेस इतक्या वर्षांत ? तुझ्यावर विश्वास ठेवायला आम्ही काय आमची अक्कल गहाण ठेवलेलीये होय ? तुझी लायकी कुठे सुरू होते आणि कुठे संपते ते आम्हांस चांगलं ठाऊक आहे.

पीसीआर चाचणी ( PCR test ) शोधल्याबद्दल ज्याला १९९३ साली नोबेल मिळालं त्या केरी म्युलीस ने तुझी कशी ## घेतलीये ते आम्हाला माहितीये : https://www.youtube.com/watch?v=W8FYWzkR1ek

सांगायचा मुद्दा काये की, तुझा सल्ला आम्ही मानावा इतकी काही आमची परिस्थिती केविलवाणी नाही.

तु.न.,
-गा.पै.

मराठी कथालेखक's picture

16 May 2021 - 7:07 pm | मराठी कथालेखक

तु.न.,
-गा.पै.

इतक्या शिव्या घातल्या नंतर पुन्हा "तु. न." म्हणणे थोडं विसंगत वाटतंय का ?

चेतन सुभाष गुगळे's picture

19 May 2021 - 7:36 pm | चेतन सुभाष गुगळे

नम्रता दाखवायची म्हणून तर त्यांनी ही भाषा वापरली आहे. अन्यथा नम्रता सोडून वागायचे असेल तर ते पैलवान आहेत एखाद्याचे हातपाय मोडणे त्यांना कठीण आहे का?

बाकी स्वतः मास्क न वापरणार्‍या व इतरांचे मास्क देखील उतरवणार्‍या संभाजी भिडेंना कोरोनाचा संसर्ग होत नाही आणि दोन लशी घेतलेल्या सर्व नियम पाळणार्‍या आयएमच्या डॉक्टरांचा मात्र कोरोनाने मृत्यू होतो याचे रहस्य काय असावे?

चेतन सुभाष गुगळे,

प्रशंसेबद्दल धन्यवाद ! मी नकली गामा पैलवान आहे. खरा गामा पैलवान नम्र होता असं ऐकिवात आहे. म्हणून मी ही स्वत:स नम्र म्हणवून घेतो. ;-)

करोनाच्या संसर्गाचं म्हणाल तर एक रोचक इंग्रजी लेख सापडला : https://www.conservativewoman.co.uk/why-covid-19-treatment-has-been-igno...

हा लेख म्हणजे अमेरिकेतील टेक्सास राज्यातल्या बेयलर विद्यापीठातील मेडिकल डॉक्टर पीटर मककलफ ( Dr Peter McCullough of Baylor University ) यांची मुलाखत आहे. यांत करोनावर प्रत्यक्ष उपचार काय असावेत याचा विचार केलेला आहे. मुखपट्टी, श्वासोत्तेजक वगैरे प्रकार हे करोनाच्या आजारावरील उपचार नव्हेत. ते संसर्ग टाळायचे व सहव्याधी निवारण करायचे प्रयत्न आहेत.

लेखातला महत्त्वाचा भाग सांगतो. डॉक्टरसाहेबांनी त्यांच्या इटलीतल्या मित्रास विचारलं करोनानाध्ये नेमकं काय होतंय म्हणून. तर इटालियन मित्र म्हणाला की हा साधा सर्दीखोकला आहे, क्वचित थोडा तापही येतो. पण मध्येच आरोग्ययंत्रणा ( = इम्युन सिस्टीम ) कोलमडते आणि रोगी बेशुद्ध पडतो. त्यातंच त्याचं रक्त दाटतं. मग त्यास श्वासोत्तेजक ( = व्हेन्टिलेटर ) लावावा लागतो. आणि त्यातनं रोगी न उठता तसाच मरतो.

सांगायचा मुद्दा असा की, उपरोक्त दुष्टचक्र खंडित करायचे मार्ग आहेत. मककलफ डॉक्टरांनी त्यासंबंधी एक तांत्रिक लेख लिहिला : https://www.prnewswire.com/news-releases/early-treatment-can-stem-the-ti...

सदर लेख तांत्रिक असल्याने क्लिष्ट आहे. म्हणून डॉक्टरसाहेबांनी साध्या भाषेत एक तूनळीवर चलचित्र प्रकाशित केलं ( म्हणजे युट्यूब वर व्हिडियो काढला ). यामुळे सामान्य माणसाला अचूक माहिती मिळून धीर येईल अशी अपेक्षा होती. मात्र सदर चलचित्र तूनळीच्या प्रशासकांनी लंगडी सबब देऊन बंद केलं. एकंदरीत सामान्य माणसाने घाबरून मरावं हा उद्देश दिसतो आहे.

नगरच्या डॉक्टर भिसे यांनी करोनावर देशी दारूचा उपाय सुचवल्यावर त्यांच्याकडून अधिक माहिती मिळवून घेण्याऐवजी उलट त्यांनाच जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण द्यायला भेटीस बोलावलं. सरकारला रोग बरा व्हायला नकोय. वैद्यकीय प्रस्थापितांना सगळं लक्ष लशीकरणाकडे वळवायचं आहे.

आ.न.,
-गा.पै.

आम्ही उभयतानी लशीचे दोन्ही हप्ते घेतले. प्रत्येक वेळी प्रत्येकी पाच डॉलर दक्षिणाही (कूपनच्या स्वरूपात) मिळाली. धागा लशीबद्दलचा आहे म्हणून ही एक नोंद कारून ठेवतो आहे.
इथे लसीकरण हे Walgreen नामक औषधांच्या मॉलसदृश्य दुकानात होते आहे. सदर दुकानाचे कूपन दिले जाते. या प्रचंड दुकानात खेळणी, स्टेशनरी, खाद्य पदार्थ कपडे वगैरे गोष्टीही असतात. सहाजीकच पाच डॉलरांचे कूपन वापरण्यासाठी लोक खरेतर गरज नसताही काही ना काही खरेदी करतात.
अर्थात ही काही फसवणूक नाही. तुम्हाला काहीही न घेण्याचे स्वातंत्र्य आहेच.

चौथा कोनाडा's picture

22 May 2021 - 5:58 pm | चौथा कोनाडा

चित्रगुप्त साहेब,


प्रत्येक वेळी प्रत्येकी पाच डॉलर दक्षिणाही (कूपनच्या स्वरूपात) मिळाली.


इन्ट्रोडक्टरी कॅशबॅक / डिस्काऊंट कुपन्स !!!

चेतन सुभाष गुगळे's picture

21 May 2021 - 7:00 pm | चेतन सुभाष गुगळे

हा अजून एक संदेश व्हॉट्सॅप फॉरवर्डमधून पोचला -

हे कसे योगायोग?

चीनमधील वुहान येथील जीवशास्त्रिय प्रयोगशाळा ही अमेरिकन कंपनी GSK (Glaxosmithkline) (योगायोगाने) घ्या मालकीची आहे.

GSK ने Pfizer कंपनी विकत घेतलेली आहे.

( योगायोगानेच ) फायझर त्याच विषाणू साठी लस तयार करते जो वुहान मध्ये ( योगायोगाने ) लिक झाला.

( योगायोगानेच ) त्यासाठीचे अर्थसहाय्य डॉ. फॉसी (Fauci) याने केले आहे.

लशीच्या वापराबद्दल प्रचार करणारा डॉ. फॉसी ( योगायोगानेच ).

GSK चे अर्थव्यवस्थापन Black Rock Finances करते.

( योगायोगानेच ) Black Rock Finances कंपनी Open Foundation Company (Soros Foundation) चे व्यवस्थापन करते.

जी ( योगायोगाने ) फ्रेंच कंपनी AXA ला सेवा देते.

सोरोस फाऊंडेशनची जर्मन कंपनी आहे Winterthur.

जीने ( योगायोगाने ) वुहान मधील प्रयोगशाळा बांधली.

आणि ती जर्मन कंपनी Allianz ने विकत घेतली.

त्यात Vanguard भागधारक (shareholder) आहे, जी ( योगायोगाने ) Black Rock ची भागधारक आहे.

Black Rock चे central banks वर नियंत्रण आहे आणि जगातील एक तृतीयांश गुंतवणूक capital व्यवस्थापन करते.

तसेच Black Rock ही MICROSOFT ची ( योगायोगाने ) महत्त्वाची भागधारक आहे, जी Bill Gates ची कंपनी आहे.

आणि MICROSOFT फायझरची भागधारक आहे .( योगायोगाने ).

तसेच WHO चे प्रथम sponsor आहे ( योगायोगाने ).

या सर्व योगायोगातून लक्षात येईल की, वुहान मधला वटवाघूळातला विषाणूने जगभरात कसा धुमाकूळ घातला.

फायझर लस फार कमी तापमानावर ठेवावी लागते. त्यासाठी लागणारी व्यवस्था करण्याचं काम फायझरचीच सबसिडरी करते. विशेष व्यवस्था करून वाहतूक करण्याची जबाबदारी फायझरच्याच सबसिडरीकडे आहे. इंशूरंस कंपनी ही वरच्यांपैकीच आहे. म्हणजे मुळासकट ऊस खाण्याचा प्रकार आहे, खोऱ्याने पैसा ओढण्याचा प्रकार आहे.

ही फायझर कंपनी तीची लस अमेरिकेत ११०० रूपयांना विकते तर युरोपात १८०० रूपयांना.

भारतासाठी तीची किंमत ठरवली २७०० रूपये. १३० कोटी जनता आणि प्रत्येकी दोन डोज असे सात लाख कोटींचे मार्केट समोर ठेऊन.

आणि अट घातली की लसीमुळे कोण्याही भारतीय नागरिकाला अपाय झाला तर फायझरवर तो दावा टाकू शकणार नाही. भारत सरकारने हे अमान्य केले. फायझरला मान्यता दिली नाही. फायझरला मान्यता द्या असं ट्विट राहूल गांधीने टाकलं तेही योगायोगानेच .

फायझरला मान्यता दिली नाही तर ( योगायोगानेच) अमेरिकेने भारतीय लसीसाठी लागणारा कच्चा मालंच थांबवला. त्याला वाटलं भारताचं नाक दाबलं, पण झालं उलटंच, अमेरिकेचीच लुंगी सुटली, मग बायडनला सारवासारव करावी लागली.

तिसऱ्या लाटेत लहान मुलं बाधीत होतील, असा प्रचार सुरू झाला, आणि ( योगायोगानेच ) एकाच आठवड्यात फायझरने आमच्याजवळ लहान मूलांसाठीची लस आहे, हे घोषित केले. एका आठवड्यात तूमच्या ट्रायल्स वगैरे सर्व झाल्यात?

आधी अबोध विषाणू तयार करायचा तो लोकांत पसरवायचा, WHO ची मान पिरगळवून आपल्याला हवे तसे बोलायला लावायचं, लसीचं मार्केटिंग करायचं, अमाप पैसा कमवायचा आणि त्याच जनतेवर राज्य करायचं, पृथ्वीवरील लोकसंख्या कमी करायची, असं हे या कंपन्यांचं षडयंत्र आहे.

त्यादिवशी जो बायडन मास्क घालून लोकांसमोर आला आणि ज्यांनी दोन लसी घेतल्या त्यांना मास्क घालायची गरज नाही म्हणत त्याने मास्क काढून टाकला. हा मार्केटिंगचाच प्रकार आहे.फायझरची लस किती प्रभावी आहे, हे बिंबवण्याचा.

इतके योगायोग तर मनमोहन देसाईच्या चित्रपटात नव्हते.

याला उपाय एकच, अशा कंपन्यांना आपला हात पिरगळायची ताकद देऊ नये, त्यांची उत्पादने वापरू नयेत. आपल्या परंपरागत ज्ञानाचा पुन्हा आविष्कार करावा आणि स्वत:ला, आपल्या समाजाला, आपल्या देशाला सुरक्षित करावे. या पोस्टचे लेखक माहीत नाही,पण त्यात तथ्य आहे हे जाणवले म्हणून आपल्या पर्यंत पाठवली.

मराठी_माणूस's picture

23 May 2021 - 11:38 am | मराठी_माणूस

ह्या "योगायोगा"च्या गोष्टी इथे दिल्याबद्दल धन्यवाद

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

23 May 2021 - 12:53 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

योगायोगाच्या गोष्टी आवडल्या. लिहीते राहा आणि मिपावर येत राहा.

-दिलीप बिरुटे

चौथा कोनाडा's picture

23 May 2021 - 5:29 pm | चौथा कोनाडा

त्या योगायोगाच्या गोष्टींमध्ये काही तथ्य नाही असे कालच मटाला वाचले.

वाचायला आनंद, आणी ज्ञान दोन्ही मिळत आहे. योगायोगाच्या गोष्टी आवडल्या. लिहीते राहा.

कपिलमुनी's picture

20 May 2021 - 11:11 pm | कपिलमुनी

या चेसुगु !
खूप दिवसांनी दिसलात , तुमचे लेखन आम्ही मिपाकर मिस करतो.
लेखन संन्यास सोडा

सुबोध खरे's picture

22 May 2021 - 7:28 pm | सुबोध खरे

GSK ने Pfizer कंपनी विकत घेतलेली आहे.

चे सु गु

आपण ढकललेला प्रतिसाद फसवाफसवीचा आहे.

gsk ने फायझर कंपनी विकत घेतलेली नाही

https://www.indiatoday.in/fact-check/story/fact-check-conspiracy-theory-...

फेसबूक किंवा व्हॉट्स ऍप वरील संदेश येथे ढकलण्यापूर्वी त्याची खातर जमा करून घेत चला.

बापूसाहेब's picture

21 May 2021 - 7:30 pm | बापूसाहेब

या लेखावर प्रतक्रिया देऊ की नको हेच समजत नाही.. पण एखाद्या गोष्टीची असलेली ( कदाचीत खरी असलेली ) दुसरी बाजू लिहिल्याबद्दल गामा पैलवान यांचे आभार.

सत्य काय हे भविष्यात कदाचीत समजून येईलच.. साथ सुरू झाल्यानंतर कधीच मास्क न वापरलेले माझे काही मित्र अजूनही धडधाकट आहेत. त्यांच्या मते त्यांना कोविड होऊन सुध्दा गेला आहे.. पण कधी ते त्याचे त्यांना पण कळले नाही.. ना कोणता त्रास झाला.
याउलट पूर्ण मास्क आणि सनिटायझर इ वापरून पण माझे काही नातेवाईक आजारी पडले.
नेमका काय प्रकार आहे ते समजत नाही...

लस घेतल्याने फायदा होतो हे मात्र मान्य करायला हवे. गेल्या कित्येक दिवसात लस घेतलेल्या पैकी अगदी नगण्य लोक covid मुळे आजारी पडलेत आणि त्यापैकी काही अतीनगण्य लोकांचा मृत्यू झाला. आकडेवारी तरी असेच सांगते.

सुबोध खरे's picture

22 May 2021 - 7:30 pm | सुबोध खरे

साथ सुरू झाल्यानंतर कधीच मास्क न वापरलेले माझे काही मित्र अजूनही धडधाकट आहेत.

बापूसाहेब

रेल्वे लाईन इतकी वर्षे क्रॉस करून माझे अनेक मित्र अजूनही जिवंत आहेत.

तेंव्हा रेल्वे लाईन क्रॉस करण्यात काही धोका नाही असे म्हणण्यासारखे आहे.

गामा पैलवान's picture

23 May 2021 - 2:03 am | गामा पैलवान

बापूसाहेब,

पहिल्याप्रथम स्वत:चे विचार व्यक्त केल्याबद्दल अभिनंदन. या लेखाचा हेतू सध्या होण्यास तुमचा निश्चितपणे हातभार लागलाय असं म्हणेन.

लशीकरणाचा इतिहास आहे आणि तो काळाकुट्ट आहे. लस हे अमृत नव्हे. लशीकरणात घोडचुका राहून गेल्याने बालकांसाहित कित्येक लोकं विनाकारण पंगु वा मृत झालेली आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर करोनाची प्रायोगिक लस कितपत गुणकारी वा खतरनाक आहे यावर खुली चर्चा झालेली दिसून येत नाही. ती व्हावी हा या लेखामागे हेतू आहे.

आ.न.,
-गा.पै.

https://www.loksatta.com/desh-videsh-news/nobel-prize-winner-luc-montagn...

एका प्रश्नाला उत्तर देताना मॉन्टैग्नियर यांनी, “लसींमुळे विषाणूंचा प्रसार थांबत नाही तर त्याचा उलट परिणाम होऊन विषाणू अधिक शक्तीशाली होतात. लसीकरणामुळेच करोनाचे नवीन विषाणू हे आधीच्या विषाणूंच्या तुलनेत अधिक नुकसान करत असल्याचं दिसत आहे,” असा दावा केलाय.

लसीकरणासंदर्भात मॉन्टैग्नियर यांना जानेवारी महिन्यामध्ये देशात (फ्रान्समध्ये) लसीकरण सुरु झाल्यानंतर नव्याने करोना रुग्णांची संख्या वाढल्याचं दिसून आलं, यासंदर्भात तुमचं मत काय आहे?, असा प्रश्न विचारण्यात आला. मॉन्टैग्नियर यांनी, “ही अशी एक वैज्ञानिक आणि वैदयकीय क्षेत्रातील चूक आहे जिच्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. याचा नोंद इतिहासात केली जाईल. कारण लसीकरणामुळे नवीन विषाणू तयार होत आहेत,” असं उत्तर दिलं. आपलं म्हणणं पटवून देताना मॉन्टैग्नियर यांनी लस दिल्यानंतर शरीरामध्ये अ‍ॅण्टीबॉडीज कशा बनतात हे सांगतानाच अ‍ॅण्टीबॉडीज निर्माण झाल्याने विषाणू शरीरामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी स्वत:मध्ये बदल घडवून आणतो, असं म्हटलं आहे.

प्रत्येक देशामध्ये करोनाचा नवा व्हेरिएंट आढळून येत आहे असं तुम्हाला दिसून येईल. लसीकरणाचा आलेख आणि मृतांचा आलेख जवळजवळ समान असल्याचं अनेक देशांमध्ये दिसून येत असल्याचं निरिक्षणही मॉन्टैग्नियर यांनी नोंदवलं आहे. मी या साऱ्यावर बारीक लक्ष ठेऊन आहे. लस घेतल्यानंतरही करोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांवर काही प्रयोग करत आहे. यामधून मला एक गोष्ट दिसून आलीय की असे काही विषाणू तयार होत आहेत ज्यांच्यावर ही लस प्रभावी ठरणार नाहीय. या अशापद्धतीला वैद्यकीय भाषेत अ‍ॅण्टीबॉडी-डिपेंडंट एनहान्समेंट म्हणजेच एडीई असं म्हटलं जात असल्याचंही मॉन्टैग्नियर म्हणाले.

अमर विश्वास's picture

22 May 2021 - 11:02 pm | अमर विश्वास

इथे अकलेचे तारे तोडणाऱ्या सर्वांनी आपल्या डाव्या दंडावर पाहावे ... अजूनही BCG लशीच्या खुणा असतील

गॉडजिला's picture

23 May 2021 - 8:30 am | गॉडजिला

BCG लशीचा कोरोना लशीसी काय संबंध ?

चेतन सुभाष गुगळे,

तुमचा योगायोगाविषयी लिहिलेला प्रतिसाद वाचला. कायाप्पाजन्य माहिती इथे चिपकावल्याबद्दल आभार.

करोना विषाणूची वूहान मधल्या प्रयोगशाळेतनं गळती झाल्याची शक्यता अमेरिकी संसदेच्या गुप्तचर समितीचे प्रमुख डेव्हिन न्यून्स यांनी वर्तवली आहे. ही कॉन्स्पिरसी थियरी नसून शासकीय अहवाल आहे.

संबंधित बातमी ( इंग्रजी दुवा ) : https://trendingpolitics.com/house-intel-republicans-drop-bombshell-repo...

उपरोक्त समितीने गठित केलेले २१ पानी पीडीएफ कागदपत्र येथे वाचायला मिळेल : https://republicans-intelligence.house.gov/uploadedfiles/covid-19_and_th...

याच वूहान प्रयोगशाळेस अँथनी फौचीने दशलक्षावधी डॉलर्सची मदत केली होती. त्यासंबंधी रँड पॉल यांनी फौचीची घेतलेली उलटतपासणी ( इंग्रजी चलचित्र ) येथे आहे : https://www.youtube.com/watch?v=rLJ1JpnkVc8

जर करोनाच्या नव्या आवृत्तीस भारतीय विषाणू म्हणण्यात येतं तर त्याच्या मूळ आवृतीस फौची करोना का म्हणू नये?

आ.न.,
-गा.पै.

चेतन सुभाष गुगळे's picture

23 May 2021 - 11:02 pm | चेतन सुभाष गुगळे

धन्यवाद.

सुबोध खरे's picture

24 May 2021 - 10:03 am | सुबोध खरे

At AMU, 16 of the 18 professors who died of Covid had not taken even first dose of vaccine

AMU administration blames the deaths on vaccine hesitancy, besides comorbidities and self-medication. Many non-teaching faculty members and retired professors have died too.

https://theprint.in/health/at-amu-16-of-the-18-professors-who-died-of-co...

मी सुद्धा याच वृत्ताबद्दल लिहिण्यासाठी आलो होतो. हिंदूस्तन टाईमस संदर्भ

कोरोना वीषाणूपासून दूर रहाण्याची काळजी घेतली नाही, लसिकरण आणि वैद्यकीय सुविधा कँपस मध्येच उपलब्ध असूनही नाकारल्या, धर्म तब्येत ढासळलेली असताना उपवास करू नका म्हणतो तरी केले आणि ४० गेले.

कोविड अ‍ॅप्रोप्रीएट बिहेवीअर पाळा म्हणून प्रत्येक दूरध्वनी अजूनही कोकलतो, ए.एम.युच्या उपकुलगुरूंनी पुन्हा पुन्हा लसिकरणाचे आवाहन केले तरी दाद दिली नाही. तरीपण काँग्रेसचे नॅशनल हेराल्ड ए.एम.यु.चे जानेवारीतील एक्झिबीशन कायदा लावून बंद का नाही पाडले म्हणून योगींच्याच नावाने रडतो. बंदपाडले असते तर कुंभमेळाचालू देता आणि आमचे एक्झिबीशन चालू देता म्हणून रडले असते. एनीवे नॅशनल हेराल्डने खापरफोडीचा नेहमीच्या सवयीने प्रयत्न केला. उपरोक्त धागा लेखावर चांगले कॉन्स्पिरसी थेअरी बहाद्दर आहेत त्यांनी ए.एम.युतील वाढलेल्या मृत्यूदरा बद्दल एकापेक्षा एक कॉन्स्पिरसी थेअरी लिहून दाखवाव्यात.

माहितगार's picture

24 May 2021 - 7:34 pm | माहितगार

कोविड १९ व्हायरस SARS-Cov-2 च्या जन्माबद्दल दोन परस्पर विरोधी कॉन्स्पिरसी थेअरी फिरताना दिसताहेत. वरील काही प्रतिसादात येऊन गेल्या प्रमाणे आमेरीकन आरोग्य वस्तु आणि सेवा कंपन्यांचे औषधे आणि लसींचा व्यवसाय वाढवण्यासाठीचे कारस्थान आहे आणि यात आमेरीकन सरकार सहभागी आहे. हि थेअरी मांडताना आमेरीका चीन आणि भारताखालोखाल लोकंस्ख्येने मोठा असलेला देश आहे याचा विसर पडतो. आमेरीकन कंपन्यांना उत्पन्न अबाधित ठेवण्यासाठी पेटंट संरक्षण अपेक्षेपेक्षाही अधिक उपलब्ध असताना गैरमार्गाचा त्यांना अवलंब करावा लागेल अशी शक्यता कमी, दुसरे आरोग्य कंपन्यांच्या फायद्यासाठी आमेरीका स्वतःचे इतर उद्योग ठप्प करून गप्प बसेल आणि इतर आमेरीकी उद्योजक गप्प बसतील हे अवघड आहे, आणि शिवाय तसे काही असते तर चीनने वुहानमधील जीवशास्त्रीय प्रयोगशाळेचे इन्स्पेक्शन करण्यापासून चिनी सरकारने जागतिक आरोग्य संघटनेस परावृत्त केले अथवा अडवले नसते. शिवाय आमेरीकन कंपन्यांनी आधीच काही औषध शोधून ठेवले होते अथवा जागतिक औषधी आणि लसिकरण बाजारपेठेत त्यांची मोनोपॉली आहे असेही नाही. लसि उत्पादनात आणि ऑर्डर्स देण्यात भारतीय स्ररकारचे गणित चुकले अन्यथा लसी आणि औषधांच्या व्यापारातून भारताचा अधिक फायदा होणे अभिप्रेत होते आणि आजही आहे. कॉन्स्पिरसी थेअरी लिहिणारी मंडळी आमेरीका एका क्षणी मलेरीयाच्या गोळ्या भारतातून मागवत होती याचा विसर पडून बसली. भारतीय लस कंपन्यांना भारत सरकारने आधीच ऑर्डर्स दिल्या असत्या आणि पैसा पुरवला असता तर कोणताच गदारोळ न होता भारताने बिनबोभाट लस निर्यातीत कमावले असते. आता डिआरडिओचेही औषध आले आहे त्याचे पुरेसे उत्पादन केले तर भारतास पुरुन निर्यातीतूनही उत्पन्न मिळवता येऊ शकते.

आता चीनने आपली आर्थिक वर्चस्व निर्माण करण्यासाठी जाणीवपुर्वक व्हायरस प्रसारीत केला म्हणावे तर चीन निर्यातीत चीन एनीवे वर्चस्व ठेऊन आहे. कोणताही व्यापारी ग्राहकाचे टोकाचे अपंगवत खच्चीकरण करून ग्राहकासोबत अधिक व्यवसाय कसा करू शकेल? जागतिक अर्थव्यवस्थेत हुकुमी वर्चस्व असेच मिळत असलेले चीनी स्ट्रॅटेजिस्ट स्वतःच्या देशाच्या हितावर दगड घालून घेण्या दुधखुळे असते तर त्यांनी आतापर्यंतची प्रगती साधलीच नसती.

अर्थात वुहानच्या लॅब मधून अपघाताने वीषाणू बाहेर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही यात चीनच्या लॅब ऑडीट टाळण्यातून दुजोरा मिळतो. दुसरे चीन स्वतः पँडेमीकने कमी अफेक्ट झालेले दिसते याचे एक कारण सरासरी वयोमान कमी असण्याचे असू शकेल किंवा प्रत्येक ठिकाणी गेल्यावर गरम पाणी पिण्याची संस्कृती ते नौकरी धंद्यासाठी अंतर्गत प्रवासावर नियंत्रण असणे यामुळे एकाशहरातून दुसर्‍या चीनी शहरात पसरण्याची वीषाणूंना कमि संधी मिळणे तसेच श्वसनजन्य साथीचा आधिचा अनुभव पाठीशी असण्यामुळे तसेच डेथरेट काही प्रमाणात वाढलाही असेल तरी माध्यमांची गळचेपीकरून वस्तुस्थिती लपवणे असे होऊ शकते. त्यामुळे चीनच्या लॅबमधून वीषाणू जाणीवपुर्वक नव्हे पण अपघाताने बाहेरपडला असण्याची आणि चीनने नंतर लपवा लपवी आरंभल्याची शक्यता अधिक वाटते.

आता आमेरीका आणि चीनने जाणीवपुर्वक केल्याची शक्यता नाकारल्यानंतर आपलीच भारतीय अधिक शहाणी विरोधक मंडळी मोदी आणि भाजपाचाच हात वीषाणू पसरवण्यात होता म्हणण्यासही कमी करणार नाहीत पण तसे काही कटकारस्थान करुन फायदा उचलण्यासाठी प्रचंड बुद्धीमत्ता आणि तयारी लागते संबंधीत वस्तुंचे निर्यातीसाठी उत्पादन भारतीयांनी वाढवून ठेवणे दूरच आवश्यक गोष्टींचे प्लानिंग सातत्याने ढासळणारे भारतीय असे करू शकत नाहीत> कडक लॉकडाऊन लावणे या पलिकडे कोणतेही प्लानिंग यश भाजपाच्या रेकॉर्डला या विषयात तरी जात नाही.

या सगळ्या कॉन्स्पिरसी थेअरीच्या रगाड्यात चीनचा एक अप्रत्यक्ष फायदा मात्र झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही चीनसोडून जगातील उर्वरीत अनेक कंपन्यांच्या किमती स्वाभाविकपणे गडगडल्यावर चीनी लोकांना इतर जगातील खासकरून आशियन युरोपीय आमेरीकी कंपन्या कमी दरात खरेदी करता आल्या असू शकतील हा चिनी अप्रत्यक्ष चिनी फायदा मात्र नाकारता येत नाही.

संदर्भ

मराठी_माणूस's picture

28 May 2021 - 3:38 pm | मराठी_माणूस

https://epaperdivyamarathi.bhaskar.com/nashik/247/28052021/0/-2/
ह्या पानावर , लसीकरणाची आवश्यकता आणि सक्ती बद्दलचे स्पष्टीकरण ह्या संबधी एक बातमी

हा चर्चा धागा म्हणजे विवेकाच्या गळ्यात धोंडा अविचाराला मणिहार आहे. ज्यांना हात धुण्यास नको तेच लोक मास्क बांधण्यास टाळतील किमान अंतराचे पालन करणार नाहीत, लस घ्या म्हटले तर घेणार नाहीत ज्या ज्या गोष्टीत विवेक आहे त्याला फाटे फोडतील. लसिंमुळे वीषाणूविरुद्ध शरीराची लढण्याची पुर्वतयारी होत असते. त्यांची अचूकता सुधारण्यास वाव शिल्लक असणे सहाजिक आहे. जेव्हा दुसरे औषध नसते तेव्हा उपलब्ध उपचाराशी तडजोड करून घेणे भाग असते हा कॉमन सेन्स नव्हे काय?

सरकार स्मोकींग न करण्याची सक्ती करत नाही म्हणजे सगळीकडे स्मोकींग करत फिरणार का? एक वेळ स्मोकींंग वाले परवडले त्यांच्या तोंडातून येणारा धूर दिसतो तरी वीषाणूने बाधीताच्या उश्वासातून बाहेर पडणार्‍या हवेतील वीषाणू दिसत सुद्धा नाही. स्मोकींगची सक्ती न करणे आणि सगळी कडे स्मोकींगकरत फिरु देणे ह्या भिन्न गोष्टी आहेत. लसिकरणाची सक्ती न करणे आणि लसिकरण न केलेल्यांना सगळीकडे फिरु देणे ह्या भिन्न गोष्टी आहेत.

गामा पैलवान's picture

29 May 2021 - 2:08 am | गामा पैलवान

माहितगार,

लस हे अमृत नव्हे. जगात आजवर कुठलीही साथ लशीमुळे आटोक्यात आलेली नाहीये.

बाकी, करोनामुळे मृत्यू होत नाहीत असा निष्कर्ष बल्गेरियाचे पॅथॉलॉजी प्रमुख व नामवंत डॉक्टर स्तोयान अलेक्सोव्ह यांनी काढला आहे. तत्संबंधी इंग्रजी दुवा : https://newlevellers.blogspot.com/2020/07/no-one-has-died-from-coronavir...

डॉक्टर स्तोयको कात्झारोव्ह यांनी घेतलेली डॉक्टर स्तोयान अलेक्सोव्ह यांची मुलाखत ( इंग्रजी भाषांतर ) : https://off-guardian.org/wp-content/medialibrary/Alexov-webinar-transcri...

मुलाखतीचं चलचित्र ( बहुतेक बल्गेरियन भाषेत ) : https://vimeo.com/430519792

मुलाखतीच्या इंग्रजी भाषांतरात डॉक्टर अलेक्सोव्ह एक धक्कादायक विधान नोंदवलेलं आहे. ते म्हणतात की जागतिक आरोग्य संस्थेने ( = WHO ) दिलेल्या निर्देशानुसार करोना बाधित मृताची मृतचिकित्सा ( = autopsy ) करायची नसते. हा निर्देश वैद्यकीय शास्त्राची अक्षम्य हेळसांड करणारा आहे. त्यांच्या मते हे वैद्यक नाही. WHO ही एक गुन्हेगार संस्था आहे.

आ.न.,
-गा.पै.

Vaccine hesitancy हा लेख हजारदा त्यातील संदर्भांसहीत वाचा; नंतर नारदमुनींनी वाल्याकोळ्याला प्रश्न विचारला होता आधीच हिंदूधर्मीय फँमिली प्लानिंग करतात, त्यात पंचेचाळीस वर्षावरील माणसे तुमचे संशयवादी भांती निर्माणकरणारे लेखन वाचून लस न घेता हळू हळू गचकत राहीली आणि हिंदू धर्मीयांची लोक्संख्या कमी झाली तर कुठे फेडाल ह्या पापांची फळे? ह्या प्रश्नाचे उत्तर वाल्याकोळ्याच्या वतीने स्वतःलाच आरश्यात पहात देत रहा. इथे उत्तर देऊन उगाच धागा वर आणू नका. इतर लोकांना शंका असतील तर मिपावर डॉक्टर लोकांचे धागे आहेत तिथे शंका निरसन करून घेतील. माणसांना संशयांमृत पाजवणार्‍या विषयाज्ञान नसलेल्या अतार्कीक धाग्यांची त्यासाठी गरज नाही.

गॉडजिला's picture

29 May 2021 - 1:51 pm | गॉडजिला

जेब्बात

गामा पैलवान's picture

29 May 2021 - 2:18 pm | गामा पैलवान

माहितगार,

तुम्ही दिलेल्या लेखातलं दुसरं वाक्य आहे : Vaccine hesitancy is complex and context specific, ...

तर ही गुंतागुंत कोणी उलगडून का दाखवीत नाही? लशीकरणास इतिहास आहे आणि तो काळाकुट्ट आहे. अनावश्यक लशिंमुळे बालाकांसाहित निरोगी माणसंही यापूर्वी मृत्युमुखी पडली आहेत आणि त्यापासून औषध कंपन्या काहीही शिकल्या नाहीत. ही बाब का दडवून ठेवली जाते? खुली चर्चा होऊ द्या.

'पंचेचाळीस वर्षावरील माणसे ( ... ) लस न घेता हळू हळू गचकत राहीली तर ...' हा तुमचा दावा पोकळ आहे. या दाव्यास कसलाही शास्त्रीय ( = सायंटिफिक ) वा प्रयोगजन्य ( = एम्पिरीकल ) आधार नाही.

बाकी, ते अँटी-व्हॅक्सर वगरे शब्दच्छलात मला जराही रस नाही. करोनाच्या लशीचा नेमका फायदा काय, असा माझा सरळधोप प्रश्न आहे.

आ.न.,
-गा.पै.

गा. पै. आणि तत्सम नेमके कोणत्या जगात रहातात आणि त्यांच्या शालेय काळातील जीवशास्त्र आणि विज्ञानाच्या शिक्षकांच्या शिक्षकांना कोणि पास केले हे त्यांचे त्यांनाच ठाऊक.

जगातले सगळे व्हायरॉलॉजीस्ट आणि सगळे डॉक्टर औषध कंपन्याना विकले गेले समजतात की जगभरची सगळी लसी घेतलेली मंडळी यमसदनास पोहोचल्याचा यांच्या कडे काही पुरावा आहे? इथे जगभरची लोक्संख्या केवळ स्वच्छतेमुळे वाढली आणि लसिकरणामुळे नाही तर भारतातल्या लोकसंख्येने डबबडबलेल्या किती अस्वच्छ वस्त्यांमध्ये फिरुन आला आहात जिथे अस्वच्छतेचे साम्राज्य असूनही लसिकरण आणि औषधोपचाराने लोकसंख्येचा स्फोट होताना दिसतो. पोलीओचे जवळपास नामशेश होणे केवळ स्व्च्छता नव्हे पोलीओडोसमुळे झाले कारण एकीकडे पोलीओडोस दिले जाताना दुसरीकडे सार्वजनिक हागणदार्‍या नांदत होत्या तरी पोलीओवर नियंत्रण मिळवले गेले. देवीसारखे आजार नामशेष झाले. प्लेगसारख्या आजाराच्या लसिचा प्रयोग एका वैज्ञानिकाने भारतीय लोक वाचवण्यासाठी आधी स्वतःच्या शरीरावर केला. त्या सगळ्या वैज्ञानिकांच्या योगदानाची आपल्याला काडीचीही किंमत नाही. मागच्या वैज्ञानिकांच्या पिढ्यांचे उपकार विसरणे खाल्ल्याथाळीला छिद्र पाडण्यापेक्षा कमी नाही.

इथे प्रत्यक्षात आज वैज्ञानिक कोविड १९ वीषाणूचा प्रत्येक म्युटेशनचा आख्खा जिनोम उघडून ओपन सोर्स मध्ये टाकताहेत. शरीरात वीषाणू प्रभाव आहे की नाही हे सांगणारी प्रत्येक आरटी पिसीआर टेस्ट अ‍ॅक्युरेटली होऊ शकते. कोविड साथीच्या आधीचे वर्ष आणि कोविड साथ चालू असतानाचे वर्ष मृत्यूदर दुप्पट झाल्याची आकडेवारी जगभरच्या म्युनिसीपल कार्पोरेशन्सकडून येते आहे. इथे लोकांना इस्पितळात आणि स्मशानातही जाण्याकरता अ‍ॅम्ब्युलन्स वेळेवर न मिळाल्याच्या घटना झाल्या आहेत. इस्पितळात ऑक्सिजन उपलब्ध न झाल्याने शेकडो माणसे मेली त्या सगळ्या घटना सगळ्या बातम्या खोट्या आहेत ?

वीषाणूने माणूस मेल्याचा डायरेक्ट पुरावा दाखवा म्हणजे काय? जिवशास्त्रातले काही कळत नाही तर लोकांची दिशाभूल करणारे घागे काढण्यापुर्वी दोन व्हायरॉलॉजीस्ट आणि दोन लंग्सस्पेशालीस्टकडे जाऊन विचारायचे. शालेय शिक्षण मराठीत झाले असेल तर चयापचय हा शब्द तरी आपल्या स्मरणात आहे का? सजीवाच्या एका वयापर्यंत पेशी क्षमता वाढत जातात आणि एका वया नंतर भंजक प्रक्रीयांचा जोर वाढत असतो. ज्या वयात पेशीक्षमता वाढत आहेत त्यावेळी सुदृढ शरीर वीषाणूंना व्यवस्थीत तोंड देऊ शकते पण तेच व्यक्तीस इतर व्याधी असतील किंवा उतार वयाकडे वाटचाल असेल तर वीषाणू पेशींच्या विकृतीस / नाशास कारणीभूत होऊ शकतात तर कधी माणसांची प्रतिकारशक्ती ओव्हररिअ‍ॅक्ट केल्यामुळेही समस्या उद्भवतात. वीषाणूंनी समस्या वाढवल्या तरी पुरेसे असते माणसास असलेले अन्य आजार बळवण्यास वीषाणूमुळे खालावलेली स्थिती अजून वाईट स्थिती अथवा मरणाकडे घेऊन जाऊ शकते.

लस सजीवांच्या शरीरातील प्रतिकारशक्तीची वीषाणूंचा मुकाबला करून घेण्याची खोटे किंवा मेलेले वीषाणू सोडून पुर्वतयारी करून घेते एवढे बाळबोध विज्ञान आहे.

अगदी अलिकडच्या लसी सोडल्यातर, बहुसंख्य लसी वीषाणूंना अर्धमेले करुन त्यांचे प्रयोग आधी इतर प्राण्यांवर करुन मग धड धाकट माणसांवर प्रयोग करून सहसा तीन तरी स्तरातील प्रयोग तटस्थ वैज्ञानिकांकडून अनामिक परिक्षण अहवाल अशा अनेक स्टेप्स लसीत गफलत होऊ नये या काळजीसाठी मध्ये ठेवलेल्या असतात. लस उत्पादक कंपन्यांची परिक्षणे वगैरे होत असतात प्रत्येक देश सहसा आपापल्या देशात वेगळी परीक्षणांची साखळी राबवून घेतो.

एवढे होऊनही जगात माणूस आहे चुकाही करतो त्रुटी राहू शकतात पण चुका आणि त्रुटी दूरकरण्याएवजी नाहूचे पाणी फेकण्यापर्यंत आपले तारे तोडणे मर्यादीत ठेवण्याएवजी आपण न्हाऊ घालायचे बाळ म्हणजे सगळी वैज्ञानीक प्रगती नाकारायची तर स्वतः जंगलात जाऊन रहावे

शंकेचे मीठ ताटात चवीपुरते हवे त्याएवजी संशय स्वतःच्याही ताटात भसाभस ओतणार आणि प्रत्येकाच्या ताटात चकटफू प्रसाद म्हणून आपल्या अज्ञान आणि हेकेखोरीने दुसर्‍यांचेही आयुष्य कष्टप्रद करणार. कोविड नैसर्गिकपणे बरा होऊन गेल्यावरही किती आयुष्यभराचे किती साईड इफेक्ट आहेत काही कल्पना नाही आणि उचलले बोट आणि लावले किबोर्डला.

मिपावरचे डॉक्टर सांगताहेत त्यांच्यावरही विश्वास नाही तर स्वतः व्हायरॉलॉजी आणि मेडिसिन पूर्ण शिकावे अर्धवट माहितीवर दिशाभूल करणे थांबवावे.

आणि गा.पैंपेक्षाही ह्या धागा लेखावर सावधानतेची सुस्पष्ट सूचना न लावल्या बद्दल जेव्हा केव्हा हा धागा वर येतो तेव्हा मन मिपा संपादक मंडळ आणि मालकांबद्दल नाराज होते.

गॉडजिला's picture

29 May 2021 - 9:17 pm | गॉडजिला

विशेषतः आपल्या प्रतिसादाचा जो शेवट आहे तो अत्यंत समर्पक आहे. मिपाने या धाग्याला सावधानतेची सुस्पष्ट सूचना न लावल्या बद्दल शहानिशा करायलाच हवी.

Rajesh188's picture

29 May 2021 - 7:02 pm | Rajesh188

Who नी सूचना केल्यात म्हणून त्या पाळल्याच पाहिजेत असा फतवा आहे का.राष्ट्र हिताच्या नसतील ,चुकीच्या असतील तर सरळ who च्या सूचना ना केराची टोपली दाखवून आपला बाणेदार पना देशांना दाखवता येतो.
खडी फौज त्या साठीच असते कोणी दबावात घेवू नये म्हणून.
जगातील किती देशांनी अशी हिम्मत दाखवली आहे.

सुबोध खरे's picture

29 May 2021 - 6:51 pm | सुबोध खरे

तुम्ही जर मुळात ते एक थोतांड आहे हे गृहीतक धरून बसला आहात तर लसीचा फायदा विचारून काय मिळणार आहे?

आपण आपली विचार सरणी बदलणार नाहीच तर उगाच बँड विड्थ कशाला फुकट घालवा.

पण तरीही

https://www.cdc.gov/coronavirus/2019-ncov/vaccines/vaccine-benefits.html

https://www.thehindu.com/news/national/vaccines-aimed-at-curbing-severe-...

हे वाचून पहा

चेतन सुभाष गुगळे's picture

29 May 2021 - 8:57 pm | चेतन सुभाष गुगळे

लसीकरण योग्य आहे तेच गरजेचे आहे. ते अचूक व रामबाण ईलाज आहे. हे तर सर्वच ठिकाणी वाचतोय ऐकतोय. यापेक्षा वेगळे विचार मांडणे हा गुन्हा आहे का?

लस ही करोनावर एक वेगळा विचार म्हणुन दिली जाते का ? नाही तिच्यामागे अभ्यास, शास्त्र परिपुर्णतेसाठी घेतलेले श्रमही आहेत. तेंव्हा त्याचा विरोध म्हणुन एक पिटुकला धागा रचला जाउन त्यामागे कसलाही अभ्यास, शास्त्र व विधानाच्या परिपुर्णतेसाठी घेतलेले श्रमही दिसत नसतात तेंव्हा तो डोळे झाकुन न स्विकारणे गुन्हा आहे का ?

वेगळा विचार म्हणून न्हाऊच्या पाण्यासोबत बाळपण फेकुन देण्याचा विचार आला तरी स्वतःपुरता मर्यादीत ठेवावा जेव्हा अनेक माणचांच्या जिवीताशी खेळ होण्याची शक्यता असते तेव्हा आधी त्या त्या क्षेत्रातील तज्ञांशी चर्चा करून मग दुसर्‍या बाजू सहीत मांडावे. इथे एखाद दोन तज्ञ डॉक्टर महोदयांनी दिलेले प्रतिसाद इतर प्रतिसादांच्या संखेत हरवून जातात. बेजबाबदार धागा लेख आणि त्याचे बेजबाबदार समर्थन करणारे फाटेफोड प्रतिसाद आणि संपादक मंडळाचे साधी सावधानतेची सूचना न लावणे जनतेच्या जिवीताशी खेळ करणारे ठरू शकते.

संपादक मंडळ काय एखाद्या कोविड बळीच्या नातेवाईकाने मिपावरील धागा वाचून शंका आली म्हणून लस नाही घेत्ली म्हणून रक्ताचा माणूस गमावला अथवा डोळे गमावून बसला असे कुणि येऊन म्हणे पर्यंत वाट पहाणार किंवा कसे?

कॉमी's picture

29 May 2021 - 10:08 pm | कॉमी

पुरेपूर सहमत.

अनेक माणचांच्या जिवीताशी खेळ होण्याची शक्यता असते तेव्हा आधी त्या त्या क्षेत्रातील तज्ञांशी चर्चा करून मग दुसर्‍या बाजू सहीत मांडावे.

सर्वविषयतज्ज्ञ श्री. गिरीश कुबेर यांच्या बहूमोल लेखांचे दाखले लिंकासहीत दिले आहेत.

चेतन सुभाष गुगळे's picture

29 May 2021 - 10:02 pm | चेतन सुभाष गुगळे
चेतन सुभाष गुगळे's picture

29 May 2021 - 10:35 pm | चेतन सुभाष गुगळे

नुकताच माझ्या मिस्टरांना लोकमान्य हॉस्पिटल मधून डिस्चार्ज मिळाला. तिथे ऍडमिट केल्यापासून डिस्चार्ज मिळेपर्यंत आलेला कटू अनुभव, ज्याने मला खूप मनस्ताप झाला तो मी इथे नमूद करते आहे.

22 मे 2021 रोजी माझ्या मिस्टरांना अचानक घरी बीपी low झाल्याचा त्रास झाला. खूप घाम आला आणि चक्कर येत होती म्हणून मी क्षणाचाही विलंब न करता त्यांना लोकमान्य हॉस्पिटल निगडी या ठिकाणी घेऊन गेले. तेथील डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर माझे मिस्टर बऱ्यापैकी स्थिर झाले. परंतु तरीही ॲडमिट करावे लागेल असे तिथल्या डॉक्टरांचे म्हणणे होते आणि म्हणून Corona टेस्ट करणे आवश्यक झाले. लगेच रिपोर्ट मिळावा म्हणून रॅपिड antigen ही टेस्ट केली ज्यांचे ३६००/- रु घेतले. आणि ती आमच्या दुर्दैवाने positive आली आणि म्हणून चिंचवड लोकमान्य हॉस्पिटल मधे नेले आणि covid वॉर्ड ला ऍडमिट केले. आणि त्यांच्यावर उपचार सुरू केले परंतु मला त्यांची कोरोना साठी असलेली RT-PCR टेस्ट करून घ्यायची होती आणि त्यासाठी मी आग्रह धरला. परंतु सोमवार संध्याकाळ पर्यंत ती टेस्ट केली गेली नाही. आणि सोमवारी संध्याकाळी मला लोकमान्य हॉस्पिटल च्या फार्मसी मधून फोन आला की तुमच्या मिस्टरांना remdesivir चा एक रोज द्यायचा आहे तर एका डोसमध्ये दोन इंजेक्शन असतात ती खरेदी करायला या. मला प्रश्न पडला की अजून माझ्या मते कोरोना कन्फर्म झालेला नाहीये मग हे इंजेक्शन कशासाठी ? म्हणून मी संध्याकाळी हॉस्पिटलमध्ये गेले आणि तिथे casualty मध्ये असलेल्या डॉक्टर्सना या विषयी विचारले तेव्हा त्यांनी अतिशय मजेदार उत्तर दिले. त्यांचे म्हणणे पडले की हा trend आहे. आम्ही पेशंट ला पाचव्या दिवशी remdesivir चा एक dose देतो ज्यामुळे पेशंट serious hot नाही.
मग मी पुन्हा एकदा RT-PCR चा आग्रह धरला आणि त्याप्रमाणे मंगळवारी सकाळी डॉक्टर जे माझ्या मिस्टर यांना ट्रीट करत होते त्यांना भेटले आणि ही टेस्ट करायला सांगितले. खरे तर त्यांची ही इच्छा दिसली नाही या टेस्ट ची, का ते त्यांनाच माहिती. पण माझ्या आग्रहासाठी चौथ्या दिवशी ही टेस्ट केली आणि ती Negative आली.
आनंद आणि संताप याचे मिश्रण झाले माझ्या डोक्यात आणि त्यांना डिस्चार्ज देण्याविषयी सांगितले. तसा तो मिळाला पण डिस्चार्ज summery वर अतिशय चुकीच्या गोष्टी लिहिल्या होत्या. Cold, cough, fever, breathing trouble and so on. मी ताबडतोब डॉक्टर ना WhatsApp वर त्याचा फोटो पाठवून explanation मागितले. मग मला हॉस्पिटल मधून एका जबाबदार व्यक्तीचा फोन आला आणि कारण सांगितले गेले की डिस्चार्ज summery type करणारी मुलगी नवीन आहे तिने सगळ्या Corona patient प्रमाणे ही लक्षणे copy paste केली, आपण या मी डिस्चार्ज summery बदलून देतो. त्यानुसार मी गेले, ती बदलून दिली आणि बराच वेळ मला पटवून देण्याचा प्रयत्न केला की admit करताना त्यांना Corona होताच आणि लगेच त्यांना treatment मिळाली म्हणून ते चार दिवसात negative झाले.

किती छान ना? असेच कुशल डॉक्टर सगळ्या Corona patients ना मिळावे हीच त्या ईश्वरा कडे प्रार्थना.
खरे तर सगळ्यांच्या नावासकट लिहिणार होते परंतु त्या सगळ्यांनी माझी क्षमा मागितली, चुकलो म्हणाले, आणि डिस्चार्ज summery बदलूनही दिली म्हणून नावे लिहिली नाहीत, परंतु सगळ्यांनी या काळात सावध राहणे आवश्यक आहे. आणि प्रत्येक गोष्ट पडताळून घ्यायला हवी.

मागे शर्मिला महाजन यांनीही एक असाच अनुभव star hospital मधला लिहिला होता, त्यातूनच मलाही प्रेरणा मिळाली आणि अशा प्रकारची सत्य परिस्थिती लोकांच्या समोर आणावी म्हटले. आणि हो जो त्रास झाला, ज्याच्यासाठी मे घेऊन गेले त्याच्यावर काहीच भाष्य नाही. तो त्रास का झाला असे विचारले असता त्याचे उत्तर नाही देऊ शकले कोणी याचे वाईट वाटले.

सावध रहा, काळ वैऱ्यांचा आहे.

आणि असा अनुभव कोणालाही आला तर तो असा शेअर करायला विसरू नका. आपणच आपल्या त्रासाला जबाबदार असतो म्हणून त्रास करून न घेता अयोग्य गोष्टींना वाचा फोडलीच पाहिजे. अर्थात त्यातून झालेला त्रास, मनस्ताप भरून येत नाही पण किमान पुढच्यास ठेच, मागचा शहाणा होऊ शकतो .

ही पोस्ट शेअर करू शकता.

वृंदा गोसावी, प्राधिकरण, निगडी. ९९२१७७५१९८

https://www.msn.com/mr-in/news/national/%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A...

हाँगकाँग : भारतासह बर्‍याच देशांमध्ये कोरोना लसीची प्रचंड कमतरता

आतापर्यंत फक्त 19 टक्के लोकांना लस

आतापर्यंत, हाँगकाँगमधील केवळ 19 टक्के लोकांना लसीचा पहिला डोस मिळाला आहे, तर 14 टक्के लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत. इथले आरोग्य कर्मचारी लस घेण्यासही टाळाटाळ करत आहेत. फायझरची लस अत्यंत कमी तापमानात ठेवावी लागते आणि ती सहा महिन्यांत खराब होते.

चेतन सुभाष गुगळे's picture

29 May 2021 - 11:50 pm | चेतन सुभाष गुगळे

https://www.loksatta.com/agralekh-news/editorial-on-pfizer-serum-institu...

फायझरची लस देण्यास इंग्लंडमध्ये सुरुवात झाली असली तरी त्या देशाच्या आरोग्य नियंत्रकांनी त्यानंतर लशीबाबत सावधानतेचा इशारा दिला आहे. ही लस घेणाऱ्या दोघांच्या अंगावर मोठय़ा प्रमाणावर पुरळ आले. ते जीवघेणे नाही. पण तरीही त्या देशाच्या वैद्यकीय नियंत्रकांनी याबाबत इशारा दिला. हे एका अर्थी घोडा तबेल्यातून गेल्यावर खिट्टी लावण्यासारखे.

विशेषत: इंग्लंडमध्ये जे घडले ते हेच अधोरेखित करते. लस टोचून घेण्यास सुरुवात झाल्यानंतर त्या देशाच्या आरोग्य नियंत्रकास नागरिकांसाठी धोक्याचा इशारा द्यावा लागला. ज्यांना अ‍ॅलर्जी आहे, त्यांनी लस घेण्याची घाई करू नये असे हा इशारा सांगतो. पण तोपर्यंत अशा अनेकांनी लस टोचून घेतली असेल त्याचे काय? करोनाचा अखंड धुमाकूळ लक्षात घेता त्यास रोखणाऱ्या लशीचे महत्त्व कोणीही नाकारणार नाही. तसेच, वर उल्लेखलेल्या लशी उपयुक्त नाहीत असेही कोणी म्हणणार नाही. पण मुद्दा इतकाच आहे की त्यांची सुरक्षितता, उपयुक्तता आणि परिणामकारकता शास्त्राच्या कसोटीवर आधी सिद्ध तर होऊ द्या. तशी ती व्हायच्या आधीच सरकारांनी आपापल्या गळक्या खजिन्यातील कोटय़वधींची रक्कम या लशी खरेदी करण्यासाठी या कंपन्यांना देण्याची तयारी दर्शवली आहे वा देऊ केली आहे. हे धोकादायक नव्हे काय? बाजारात येणारे उत्पादन काय आहे, कसे आहे, त्याचे चांगलेवाईट काय हे काहीच माहीत न करता ते उत्पादन खरेदी करण्यासारखेच हे. पण अधिक गंभीर. कारण येथे प्रश्न लाखो जीवांचा आहे. सरकारांनी या लशींच्या संशोधनाच्या खर्चाचा भार उचलणे वेगळे आणि अन्य कोणी केलेल्या संशोधनाची उपयुक्तता सिद्ध व्हायच्या आत लस खरेदी करण्याचा उत्साह दाखवणे वेगळे. त्याची काही गरज नाही. सर्वच काही इतरांच्या आधी करून दाखवण्याची घाई कशाला?

चेतन सुभाष गुगळे's picture

29 May 2021 - 11:51 pm | चेतन सुभाष गुगळे

सरकारांनी या लशींच्या संशोधनाच्या खर्चाचा भार उचलणे वेगळे आणि अन्य कोणी केलेल्या संशोधनाची उपयुक्तता सिद्ध व्हायच्या आत लस खरेदी करण्याचा उत्साह दाखवणे वेगळे. त्याची काही गरज नाही. सर्वच काही इतरांच्या आधी करून दाखवण्याची घाई कशाला? टाळेबंदी आपण अशी इतरांच्या आधी ‘करून दाखवली’. लसीकरणातही पहिल्या क्रमांकाची आस बाळगण्याची गरज नाही. आणि दुसरे असे की या घाईमुळे अन्यत्र कोणी लशीवर प्रामाणिकपणे संशोधन करीत असेल आणि त्याची लस ही बाजारात आधीच आलेल्या लशींपेक्षा अधिक परिणामकारक असेल तर त्याकडे दुर्लक्षच होण्याची शक्यता अधिक. कारण आधीच ‘नावारूपा’ला आलेल्या लशींची नोंदणी झाली असेल तर या मागून येणाऱ्यांकडे पाहणार कोण? सबब लशीसाठी घाई न करण्यात आणि मागे राहण्यातच शहाणपण आहे.

चेतन सुभाष गुगळे's picture

29 May 2021 - 11:57 pm | चेतन सुभाष गुगळे

https://www.loksatta.com/agralekh-news/covaxin-indias-first-indigenous-c...

करोनावरील लस भारतात विकसित होणे अभिमानाचेच. परंतु या लशीची परिणामकारकता व सुरक्षितता सिद्ध होण्याआधीच तिला मान्यता का?

बग्गी ही ज्याप्रमाणे घोडय़ाच्या मागे असावी लागते, पुढे असून चालत नाही, त्याप्रमाणे लशीची उपयुक्तता सिद्ध व्हायच्या आधीच सरकारने तीस प्रमाणपत्र देऊन चालत नाही. आपल्याकडील विविध तज्ज्ञांनी आपल्याच मायबाप सरकारला या किमान सत्याची जाणीव करून दिली. मुद्दा आहे ‘कोव्हॅक्सिन’ नामक लशीचा. हैदराबाद येथील भारत बायोटेक कंपनीच्या या निर्मितीस आपल्या सरकारच्या विविध यंत्रणांनी लस म्हणून मान्यता दिली म्हणून आपल्या विविध लसशास्त्रतज्ज्ञ, वैद्यकीय अभ्यासक यांनी सखेद आश्चर्य, संताप, काळजी आदी भावना व्यक्त केल्या.

करोनावरील लस भारतात विकसित होणे या तज्ज्ञांसाठीही अभिमानाचेच. फक्त त्यांचे म्हणणे इतकेच की, या लशीची परिणामकारकता व सुरक्षितता आधी सिद्ध होऊ द्या आणि मग तिच्या वापराची घोषणा करा. ही सिद्धता व्हायच्या आधीच तिच्या उपयोगाची घोषणा करणे म्हणजे टांगा घोडय़ापुढे जोडण्यासारखे. इतके ‘धाडस’ (?) फक्त दोन देशांनी केले आहे. चीन आणि रशिया. या दोन देशांच्या करोना लस उपयुक्ततेचे कोणतेही पुरावे आढळलेले नाहीत. तरीही त्या देशांच्या दांडगट राजवटींनी लशीकरण मोहिमा हाती घेतल्या आहेत. या पाश्र्वभूमीवर भारतीय लशींची परिणामकारकता शास्त्राधारे सिद्ध व्हायला हवी. अन्यथा आपण या दोन देशांच्या पंगतीतील ठरू. इतकी सुस्पष्ट, नि:संदिग्ध भावना व्यक्त करण्याचे धाडस आपले तज्ज्ञ दाखवत असतील, तर सर्वसामान्यांसाठीही हे प्रकरण गंभीर ठरते. त्यामागील काही प्रमुख कारणांची चर्चा व्हायला हवी.

यातील पहिला मुद्दा या लस-विकसनाच्या तंत्राचा. ही लस संपूर्णपणे ‘इनअ‍ॅक्टिव्हेटेड व्हायरस’ पद्धतीने विकसित केली गेली. या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते ही पद्धतच मुळात अत्यंत जुनी असून प्रचलित काळात फक्त अर्भकांना दिल्या जाणाऱ्या लशींच्या विकासासाठी ती वापरली जाते. करोनाची लस तशी नाही. ती लहानमोठय़ा सर्वानाच टोचली जाणार आहे. दुसरा मुद्दा या लस चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यातील निष्कर्षांचा. ते अद्याप आलेले नाहीत. यांतील काही चाचण्या तर नोव्हेंबर महिन्यातच सुरू झाल्या. या चाचण्यांचे निष्कर्ष तपासणे दूरच, पण ते हातीही आलेले नाहीत. त्याआधीच या लशीस मंजुरी कशी? तिसरा मुद्दा या लशीच्या उपयुक्ततेच्या दाव्यांच्या तपासणीचा. शास्त्रीय पद्धत अशी की, ती विविध पातळ्यांवर होते. औषधक्षेत्रातील मातबर शोधपत्रिकांत नव्या औषध/लसीचे प्रबंध सादर केले जातात आणि त्या क्षेत्रातील तज्ज्ञांकडूनच त्यांची छाननी होते. आपल्या भारतीय लशीबाबत ही प्रक्रिया पूर्णत्वास गेलेली नाही. आपत्कालीन परिस्थितीत या प्रचलित पद्धतीस फाटा देऊन लशीस थेट मान्यता दिल्याचे सरकार सांगते. त्यावर अविश्वास नाही. पण आपत्कालीन परिस्थितीतही सुरक्षा आणि परिणामकारकता चाचण्या वगळल्या जात नाहीत. पण कोव्हॅक्सिनचा मात्र याबाबत अपवाद झाल्याचे तज्ज्ञ दाखवून देतात. हा चौथा मुद्दा.

पाचवा मुद्दा या लशीस परवानगी देताना आपल्या सरकारी यंत्रणेने वापरलेल्या भाषेचा. ही लस ‘राखीव’ (बॅक अप) म्हणून वापरली जाईल असे या संदर्भात भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद म्हणते. म्हणजे काय? क्रिकेटमधील ‘राखीव खेळाडू’ ही संकल्पना वैद्यकीयक्षेत्रातही आणण्याचा विचार स्तुत्य. क्रिकेटमध्ये त्याचा अर्थ ‘कामचलाऊ’ वा ‘वेळ मारून नेणारा’ असा होतो. लस कशी तशी असू शकते? ‘‘अन्य लस नाही का, मग ती मिळेपर्यंत राखीव ‘कोव्हॅक्सिन घ्या,’’ असे करोनाग्रस्तास सांगणे कसे वाटेल याचा विचार सरकारी यंत्रणांनी करून पाहावा. सहावा मुद्दा, ही लस ‘वैद्यकीय चाचणी’ गटात (क्लिनिकल ट्रायल मोड) दिली जाईल. या शब्दप्रयोगास काय म्हणावे? चाचण्या आधी होतात. मग त्या निष्कर्षांवर संबंधित औषधास लशीचा दर्जा दिला जाऊन ती बाजारात येते. बाजारात आलेले उत्पादन मग ‘चाचणी गटात’ कसे काय ठेवणार? तसे ते ठेवायची सरकारची इच्छा असली तरी मग या चाचण्यांचे नियंत्रण करणार कोण? या प्रश्नाचे कारण म्हणजे, सरकारी मंजुरीनंतर ही लस खुल्या बाजारात विक्रीस येऊ शकते. तशी ती आल्यावर तिच्या वापराचा पाठपुरावा करणार कसा? चाचण्या करावयाच्या तर त्यासाठी वैद्यकीय समित्या स्थापन करणे, वापरानंतरच्या परिणाम-मापनाची व्यवस्था करणे आदी उपाययोजनाही कराव्या लागतात. त्यांचे काय? या लशीस ‘जनतेचे हित’ (पब्लिक इंटरेस्ट) लक्षात घेऊन तिच्या ‘अत्यंत काळजीपूर्वक’ (अ‍ॅबंडंट कॉशन) वापरासाठी मंजुरी दिल्याचे सरकार म्हणते. जनतेच्या हिताची इतकी काळजी आहे, तर मुदलात ती दूर करूनच या लशीच्या वापराची परवानगी हवी. लस वापरायला परवानगी द्यायची आणि ‘अत्यंत काळजीपूर्वक’ ती वापरा असा इशाराही द्यायचा. याचा परिणाम त्यामुळे ती न वापरण्यावरच होण्याची शक्यता अधिक. सरकारला ते अपेक्षित आहे काय, हा सातवा मुद्दा. ही सर्व माहिती आणि हे सर्व शब्दप्रयोग लशीची घोषणा करणाऱ्या पत्रकार परिषदेतील. पण ती एकतर्फी झाली. माहिती दिल्यावर तिच्यावर आधारित पत्रकारांच्या प्रश्नांना संबंधित सरकारी अधिकारी सामोरे गेलेच नाहीत. आता सरकारी यंत्रणेचे अधिकारीही पत्रकार परिषदा टाळणार असतील आणि तेही करोनाकालीन आरोग्यासारख्या महत्त्वाच्या मुद्दय़ांवर- तर कठीणच म्हणायचे. आणि आठवा मुद्दा असा की, सरकारी अधिकाऱ्यांच्या या अशा वर्तनामुळे या लशीस मान्यता देण्यासाठी दबाव होता किंवा काय असा संशय घेण्यास जागा राहाते, त्याचे काय? सरकारला असे होणे निश्चितच अभिप्रेत नसणार. मग या इतक्या सव्यापसव्याचा अर्थ आणि त्यामागील कारण कोणते?

‘‘वैद्यकीय विश्वात असे कधी झालेले नाही. मी हे पहिल्यांदाच पाहाते आहे,’’ अशी यावर आपल्याकडील आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या साथआजारतज्ज्ञ डॉ. कांग यांची प्रतिक्रिया म्हणूनच महत्त्वाची ठरते. तिसऱ्या चाचणीफेरीसाठी स्वयंसेवकांची नोंदणी सुरू होत असताना या लशीस थेट मान्यताच मिळाली यामुळे डॉ. कांग आश्चर्यचकित झाल्या. वैद्यकीय नीतिमत्तेविषयी सजग संघटनेशी संबंधित डॉ. भान यांनी तर यावर ‘हे असे चीन वा रशियात होते’ अशी प्रतिक्रिया दिली, यातच काय ते आले. सरकार वा त्यांच्या भक्तांस चीन वा पाकिस्तानशी आपली तुलना होणे अभिमानास्पद वाटते किंवा काय हे कळावयास मार्ग नाही. पण ही काही आनंदून जावे अशी बाब नाही.

म्हणून सरकारने तरी असे प्रकार टाळायला हवेत. ही लस कमअस्सल आहे असे खचितच नाही. ही लस जगात सर्वोत्तम ठरावी, अशीच पंतप्रधानांप्रमाणे नागरिक तसेच या तज्ज्ञांचीही इच्छा. त्यांचे म्हणणे फक्त इतकेच की, ते तसे सिद्ध होऊ द्या आणि त्याचा तपशील जाहीर करा. स्वत:च स्वत:ला सर्वोत्तमतेचे प्रमाणपत्र राजकारणात देता येते. विज्ञानास पुरावा लागतो. तो येथे नाही, हे सत्य. पण अशा काही सिद्धतेशिवाय अलीकडे अनेक उत्पादने ९९.९९ टक्के जिवाणू/ विषाणूमुक्तीचा दावा करतात. वास्तविक प्रश्न असतो तो ०.१ टक्क्याचा. त्याविषयी मात्र मौन. यामुळे ही अशी उत्पादने आणि त्यांचे दावे हास्यास्पद ठरू लागले आहेत. स्वदेशी लशीबाबत असे होता नये इतकेच काय ते.

चेतन सुभाष गुगळे's picture

30 May 2021 - 12:02 am | चेतन सुभाष गुगळे

वर दिलेला अग्रलेख हा ५ जानेवारी २०२१ रोजी प्रसिद्ध झाला आहे. पाच महिन्यात असे काय घडले आहे की लस जीवन वाचविण्याचा एकमेवाद्वितीय पर्याय बनली आहे?