करोनाची लस : एक थोतांड

गामा पैलवान's picture
गामा पैलवान in जनातलं, मनातलं
1 Mar 2021 - 3:43 am

नमस्कार लोकहो!

करोना नामे मायावी थोतांड चालूच आहे. मायावी अशासाठी म्हंटलंय की पूर्वी एका मायावी राक्षसाच्या रूपातनं दुसरा राक्षस जन्म घ्यायचा, त्याचा धर्तीवर करोना या पहिल्या थोतांडातनं लस नावाचं दुसरं थोतांड उत्पन्न होतंय. आजवर कोणत्याही लशीने कुठल्याही रोगांची साथ आटोक्यात आलेली नाहीये. हां, लशीमुळे रोग नाहीसा होतो असा सार्वत्रिक भ्रम प्रचलित आहे. कारण की भरपूर प्रमाणावर तसा प्रचार केला गेलाय.

या बाबतीत आपल्याला दोन नेते जाम आवडले. मोदींनी मुखपट्टी उघडपणे नाकारली तर राज ठाकऱ्यांनी तिच्यासंबंधी भीडमुर्वत बाळगली नाही.

डॉक्टर सुझन हम्फ्रीज या अमेरिकेतल्या खऱ्याखुऱ्या म्हणजे मेडिकल डॉक्टर असून पेशाने मूत्रपिंडतत्ज्ञा आहेत. त्यांनी लशींकरणाविषयी प्रचंड शोधाशोध करून माहिती मिळवून २०१३ साली एक पुस्तक लिहिलं आहे. पुस्तकाचं नाव : Dissolving Illusions - Disease, Vaccines, and The Forgotten History (2013) by Suzanne Humphries MD. हे पुस्तक येथे उपलब्ध आहे :
१. https://www.amazon.in/Dissolving-Illusions-Disease-Vaccines-Forgotten/dp...
२. https://www.amazon.co.uk/Dissolving-Illusions-Disease-Vaccines-Forgotten...

हे पुस्तक लिहितांना डॉक्टरबाईंनी रोमन बिस्त्रियांक या विदातत्ज्ञाची मदत घेतली आहे. सदर लेख या पुस्तकाची तोंडओळख करवून देण्यासाठी लिहिणार होतो. पण थोडं लिहिल्यावर कळलं की पुस्तकपरिचय हा आपला प्रांत नव्हे. मग म्हंटलं की सरळ सारांशच लिहून टाकूया. माझ्यासारख्या आळश्याला तेव्हढंच जमण्यासारखं आहे.

तर आता मुद्द्याकडे वळूया.

प्रकरण १ : गेले ते दिन गेले ( एकदाचे ) ....

हे प्रकरण १९ व्या शतकातल्या ( म्हणजे इ.स. १८०० चं शतक ) जुन्या जमान्यातील सामान्य माणसाच्या आरोग्य अवस्थेचं किंवा अनावस्थेचं वर्णन करतं. गरीब माणसाचं सरासरी आयुर्मान १५ ते १६ वर्षं होतं. ते इतकं कमी असण्याचं कारण साथीचे रोग हे होतं. इंग्लंडमध्ये रोगांच्या साथी नेमेची येत असंत. भरीस भर म्हणून दाटलेली वस्ती व अंधारी घरं अशा रोगट वातावरणात रोग फोफावायला उत्तेजन देत. शिवाय अन्नपाण्याची ददात होतीच. पोषक अन्न केवळ उच्चभ्रू लोकांच्या मुलांनाच मिळे. पाणीही अशुद्धच प्यावं लागंत असे. संडास व पिण्याचं पाणी एकत्र होणं सर्वसामान्य बाब असे. घोड्याची लीद, डुकराचं प्रेत व खाण्याची टपरी लंडनच्या रस्त्यावर सुखेनैव एकत्र नांदत. वा न्यूयॉर्कमध्ये रोगट डुकरांचं मांस गरीब लोकांना बिनधास्तपणे विकलं जाई.

प्रकरण २ : बालकांची हलाखी ....

या प्रकरणांत १९ व्या शतकातल्या ( म्हणजे इ.स. १८०० चं शतक ) गरीब कुटुंबातल्या बालकांची हलाखीची स्थिती वर्णिलेली आहे. त्यांना दिवसाचे बाराबारा तास मजुरी करावी लागे व पगार जेमतेम खाण्यापूरता मिळे. अगदी मुलीसुद्धा खाणीसारख्या प्राणघातक जागेत बिनदिक्कीतपणे कामाला जुंपल्या जात. तिसाव्या वर्षापर्यंत कोणी जगली तर ती अपवादात्मक घटना असे. पारा, शिसे, आर्सेनिक वगैरे विषारी पदार्थांशी बालकांचा संपर्क येणे ही एक किरकोळ बाब असे. जखमा व दुखापती नित्याच्याच असंत.

जगातल्या सर्वात श्रीमंत राष्ट्र असलेल्या अमेरिकेत दरवर्षी २,५०,००० बालकांचा कुपोषणाने मृत्यू होई. बालकामगार ठिकठिकाणी असले तरी बालकामगार हा शब्द मात्र आजून अस्तित्वात यायचा होता. अतीव व जीवघेण्या श्रमांतनं सुटायचा मार्ग नव्हता. मग कष्टांचा विसर पाडण्यासाठी व्यसनांचा आधार घेतला जाई. त्यामुळे तब्ब्येत अधिकंच खराब होई. ऐन वाढीच्या वयांत व्यसनं केली की प्रजनन व आयुर्मान यांवर विपरीत परिणाम होई.

प्रकरण ३ : रोग हा नियम तर निरामय जीवन हा अपवाद

रोग हा आयुष्याचा अविभाज्य घटक कसा होता, ते या प्रकरणांत सांगितलं आहे. औद्योगिक क्रांतीमुळे गावं ओस पडून शहरांत अनियोजित व प्रचंड गर्दी झाली होती. शहरी जागामालकांनी नफ्यावर डोळा ठेवून श्रमिकांसाठी अतिशय दाटीवाटीने निवासालये बांधली. तिथे राहायची व्यवस्था अत्यंत अस्वच्छ असे. हे रोगांना आमंत्रण असे. रोगांच्या साथीत माणसं आषाढी माश्यांसारखी टपाटप ( की पटापट ? ) मरून पडायची. मलनि:सारण यंत्रणा नामक प्रकार अस्तित्वात नसल्याने विषमज्वर ( = टायफस ), पटकी ( = कॉलरा ), हगवण वगैरेंची सतत मांदियाळी असे.

रोग्यांना हाताळण्याच्या आधी डॉक्टर व परिचारिका यांनी स्वत: निर्जंतुक होणं १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात सुरु झालं. वैद्यकीय क्षेत्राची काय अवस्था होती ते कळलं ना ? पुढे अनेक रोगांनी उडवलेल्या हाहाकाराच्या कहाण्या दिल्या आहेत. किमान स्वच्छता पाळल्याने लागणीचं प्रमाण कसं झपाट्याने घसरू लागलं ते ही दिलं आहे.

लशीमुळे कुठलाही जीवघेणी साथ आटोक्यात आली नाही. या साथी मंदावल्या त्या किमान स्वच्छता पाळल्याने.

प्रकरण ४ : देवीचा रोग व पहिली लस

देवीच्या लशीने माणसं कशी मेली, ते या प्रकरणात सांगितलं आहे. रोगापेक्षा औषध भयंकर. कारण की लस तयार करतांना लागण झलेला विषाणूत फेरफार ( = म्युटेशन ) होत असे. हा फेरफार हाताळायचा निश्चित मार्ग कोणाकडेही नव्हता. सब घोडे बारा टक्के या हिशोबाने एकंच लस सरसकट सर्वांना दिली जाई. परिणामी एकाच आजाराचे वेगवेगळे विषाणू निर्माण झाले. वेल डन. इ.स. १७५० च्या सुमारास ज्या लशी विकसित झाल्या त्या गोऱ्यांपेक्षा काळू लोकांना जास्त हानीकारक होत्या. हा मुद्दाही चर्चेत घेतला पाहिजे. १९०८ च्या सुमारास लशींमुळे मिळणारं संरक्षण तात्पुरतं असतं हे लक्षांत आलं.

लान्सेट जर्नलने डॉक्टर जेन्नरच्या देवीच्या लशीवर रोचक टिपणी केली आहे. त्यानुसार ही लस गाईच्या सडांपासून विकसित केलेली नसून घोड्याच्या पुळीपासनं मिळवलेली होती. ही लस नंतर गाय, माणूस व इतर पशूंतून फिरवण्यात आली. आजच्या घडीला देवीची लस म्हणून जे काही आहे ते नैसर्गिक नसून कृत्रिम एजंट आहे. तरीही जेन्नरला देविच्या लशीचा संशोधक म्हणून जगभर मान्यता मिळाली आहे. तत्कालीन डॉक्टरांनी लगेच दाखवून दिलं की गाईच्या सडांपासून लस मिळालेल्या अनेकांना नंतर देवी आल्या होत्या.

या परिस्थितीत दयाळू इंग्रज सरकारने इंग्लंडात जबरदस्तीने लशी टोचवल्या. परिणामी लशींच्या या कृत्रिम हस्तक्षेपामुळे देवी रोगाची साथ अधिक तीव्र झाली. १८४४ ला लंडन च्या देवीच्या रुग्णालयात १७८१ पेक्षा जास्त रोगी दाखल झाले. रोगापेक्षा लस भयंकर ठरली. बोस्टन (इंग्लंड) मध्ये सुमारे ४० वर्षं नाहीसा झालेला देवीचा रोग लशी टोचल्यावर परत उफाळून आला. पुढे लशीकरणामुळे निर्माण झालेल्या नवीन रोगांची व मृत्यूंची महिती दिलेली आहे.

प्रकरण ५ : दूषित लशी

रोगजंतूंमुले रोग होतात हे मत स्वीकारलं जाण्यापूर्वी दूषितत्वाचं मोजमाप केलं गेलं नव्हतं. त्यामुळे जंतुसिद्धांतावर ( = Germ Theory वर ) प्रश्नचिन्ह उपस्थित होतं. नंतर खूर असलेल्या जनावरांना होणारा मुखपादरोग दूषित लशींमुळे माणसांना कसा होऊ लागला याची सुरस व चमत्कारिक कहाणी वर्णिलेली आहे.

प्रकरण ६ : भली थोरली निदर्शने

एका बापाचं पहिलं मूल लशीमुळे मेलं होतं. साहजिकंच त्याने दुसऱ्या मुलाच्या लशीकरणाला विरोध केला. त्याबद्दल बापाला तुरुंगात पाठवलं गेलं. कित्ती सुंदर न्याय !

या प्रकरणात इंग्लंडमधल्या लेस्टर ( = Leicester ) नगरात लोकांनी लशीकरणाच्या थोतांडाविरुद्ध कसा लढा दिला ते सांगितलंय. लोकांना लशीकरण नको होतं कारण लहान बालकांचे भयानक हाल व्हायचे. कोण आई आपल्या तान्ह्या मुलाला सरकारी कसायांच्या तावडीत सोपवेल ?

आर्थर वॉर्ड गरीब मजूर होता. त्याची पहिली दोन मुलं लशीमुले जखमी झाली होती. त्याने तिसऱ्यास लस टोचायला नकार दिला. त्यामुळे सरकारी कसाई त्याच्या घरी पोहोचले. तो घरी नव्हता तर त्याच्या पोटुशा बायकोला धमक्या देऊन दंड भरायला लावला. तिच्याकडे पैसे नव्हते व घरातली चीजवस्तू दंडमूल्याची भरपाई इतकी नव्हती. तिला कसाई खेचडत तुरुंगात घेऊन गेले. त्यामुळे तिच्या मुदतपूर्व प्रसूतीतून मृत बालक जन्मलं. आवडली तुम्हाला कथा ?

लेस्टरचे लोकं देवीच्या लशीचा जनक डॉक्टर एडवर्ड जेन्नर यांस बालहत्यारी म्हणायचे.

प्रकरण ७ : चाकोरीबाह्य प्रयोग

देवीच्या रोगाविरुद्ध लेस्टर नगरात उदयाला आलेली अलगीकरणाची पद्धत ( = quarantine ) कशी होती ते या प्रकरणात वर्णिलेलं आहे. देवीची लस टोचण्याऐवजी अलगीकरण हा उपाय बराच प्रभावशाली होता. डॉक्टर मिलर्ड यांनी १९१० साली निष्कर्ष काढला की अर्भकांना दिलेल्या देवीच्या लशीमुळे रोगफैलाव कमी झाला नाही. सक्तीची लसटोचणी आजिबात समर्थनीय नाही.

पण सरकारी कसायांनी घबराट माजवली की कधीतरी मोठ्ठी साथ येणार. तशी साथ कधीच आली नाही. उलट लेस्टर मधली देवीच्या रोग्यांची संख्या लशीकृत झालेल्या उर्वरित इंग्लंडच्या मानाने काबूत राहिली होती.

लस म्हणजे जणू अमृत आहे असा अपप्रचार धूमधडाक्याने केला जातो. प्रत्यक्षात लस हे एक थोतांड आहे. लेस्टर पद्धत नंतर युगोस्लाव्हियात १९७२ साली वापरण्यात आली.

प्रकरण ८ : सरकारी दडपशाही

एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस व विसाव्या शतकाच्या सुरुवातीस इंग्रज सरकारने इंग्लंडमध्ये लसटोचणीच्या सक्तीच्या मोहिमा राबवल्या. भले बालकं मरोत अथवा जायबंदी होवोत. पर्यायी वैद्यकीय दृष्टीकोनास अर्थातंच केराची टोपली दाखवण्यात आली. या मोहिमांना न्यायालयाचाही पाठींबा मिळे. जो नागरिक या सक्तीस विरोध करेल त्यास दंड, जप्ती, इत्यादिस सामोरे जावे लागे. अमेरिकेतही अशी प्रकरणे घडली.

त्या वेळेस युजेनिक्स नामक दुर्बलोच्छेदक शास्त्र जाम प्रचलित होतं. लस घेतलेल्यावर त्रास होणारे लोकं जगण्यास नालायक आहेत असा युजेनिक्सचा सिद्धांत असल्याचं लोकांनी मनावर घेतलं. मानसिक दृष्ट्या अस्थिर लोकांचं निर्बीजीकरण करण्यात येत असे. त्याच धर्तीवर लस न घेतलेल्यांचे निर्बीजीकरण करण्यात येईल अशी भीती व्यक्त होत असे. युजेनिक्स ( = दुर्बलोच्छेदन ) आणि सक्तीची लसटोचणी यांचा घनिष्ट संबंध आहे. नाझी राजवटीत युजेनिक्स ला राजमान्यत्व लाभलं होतं.

प्रकरण ९ : आर्थर स्मिथ या बालकाची यातनामय कहाणी

या यातना आर्थर स्मिथ नामे ११ वर्षीय बालकाला झालेल्या आहेत. ही लशीच्या दुष्परिणामांची कहाणी आहे. तो कसाबसा वाचला खरा, पण अंगावर डाग पडले ते कायमचे. काही बालकं इतकी सुदैवी नव्हती. त्यांच्याही कहाण्या या प्रकरणांत आहेत.

प्रकरण १० : आरोग्यक्रांती

गटाराचं पातळलेलं पाणी हे प्रमुख पेय नसेल तर आरोग्य सुधारणार नाही काय ? या प्रकरणात वैयक्तिक व खासकरून सार्वजनिक स्वच्छतेमुळे आरोग्य कसं सुधारलं ते वर्णिलेलं आहे. गलिच्छपणामुळे रोग होतात हे १९ व्या शतकाच्या मध्यात युरोप-अमेरिकेच्या जणू गावीच नव्हतं. धारणा बदलल्याने हळूहळू आरोग्यात वाढ होत गेली. अर्थात, झोपडपट्टीदादांनी स्वच्छतेच्या सुधारणांना विरोध केलाच. कारण झोपडपट्ट्यांपासनं त्यांचा फायदा होत होता. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात लंडनमध्ये हळूहळू मलनि:सारण सुविधा उभारण्यात आल्या. जलकक्ष म्हणजे water closet म्हणजे WC ही संज्ञा उदयास आली. त्याआधी मानवी विष्ठा कुठेही टाकली जायची. २० व्या शतकाच्या पहिल्या दशकांत ( म्हणजे १९०० सालच्या आसपास ) हे जलकक्ष लंडन पालिकेच्या गटारांना जोडले जाऊ लागले. आज आपण युरोप-अमेरिका-भारत इत्यादी देशांच्या शहरांत जी गटारव्यवस्था पाहतो ती केवळ शंभर सव्वाशे वर्षंच जुनी आहे.

दुधाचं पाश्चरीकरण सुरु झालं. त्यमुळे बालमृत्यू प्रचंड प्रमाणावर उणावले. याखेरीज इतर सामाजिक सुधारणाही राबवल्या जाऊ लगल्या. उदा. : किमान वेतन, नोकरीच्या जागी सुरक्षितता नियम, बालकांची पिळवणुकीविरुद्ध कायदा, इत्यादि. त्यामुळे जीवनमान ( life standard) उंचावलं.

या सर्व सुधारणांत लशीचं योगदान नगण्य होतं. पण हवा अशी केली गेली की लशीमुळे म्हणे रोग नाहीसे होतात.

प्रकरण ११ : साथीच्या रोगांत आश्चर्यजनक घट

अमेरिकेत देवी ५ पैकी १ ठार मारीत. हे प्रमाण घटून ५० पैकी १ वर आलं व नंतर ३८० पैकी १ वर घसरलं. १८९७ च्या अखेरीस अमेरिकेत तीव्र देवी जवळजवळ नामशेष झाला. १९५० पर्यंत इंग्लंड व अमेरिकेतनं देवीच्या साथी नामशेष झाल्या होत्या. पूर्ण लशीकरण न करताही हे साध्य झालं. स्कार्लेट ताप ( स्कार्लेट फीव्हर ) तर कुठल्याही लशीशिवाय नाहीसा झाला.

अशाच अनेक रोगांची घट ( विषमज्वर, डांग्या खोकला, डिप्थेरिया, क्षय, हगवण ) आलेखांसह दर्शवली आहे.

रुग्णालये ही अस्वच्छ व दाटीग्रस्त असल्याने लागणकेंद्रे होती. ती हळूहळू सुधारू लागली होती. एकंदरीत आहार, पोषण, स्वच्छता, इत्यादि आरोग्यविषयक जाणिवांत सुधारणा होत गेल्या. यांत लशीचा सहभाग जराही नव्हता.

प्रकरण १२ : पोलियो परतून आलाय

पोलियोची लस पहिल्यांदा शोधणाऱ्या जोनास साल्कने ( डॅरल साल्क सह ) म्हंटलंय की ही दुर्बळ विषाणूयुक्त लस कधीकधी पोलियोस रोखण्याऐवजी रोगाचा प्रादुर्भाव घडवून आणू शकते. दुसरी लस डॉक्टर साबिनने शोधलेली मौखिक लस आहे. तिच्यानेही आज पोलियो होऊ शकतो. पोलियोचे अनेक प्रकार आहेत. त्यापैकी बुल्बर पोलियो हा सर्वात गंभीर प्रकार आहे. तो मेंदूच्या लंबमज्जेस ( = ब्रेनस्टेम ) हानी पोहोचवतो. त्यातून पुढे पक्षाघात होतो. पण हा पक्षाघाती पोलियो फार कमी प्रमाणावर आढळतो. नैसर्गिक पोलियोचा विषाणू अनेक शतकांपासून मानवी आतड्यांत सुखेनैव नांदंत आला आहे. मग विसाव्या शतकात नेमकं काय घडलं की, ज्यामुळे त्याच्यापायी पक्षाघात होऊ लागले ?

मौखिक लशीचे जनक डॉक्टर अल्बर्ट साबिन यांनी नेमका प्रश्न विचारलाय. अमेरिकी नेटिव्हांत पोलियोरुद्ध आपसूक प्रतिकारशक्ती उत्पन्न झाली होती. मात्र प्रगत व स्वच्छतेबाबत दक्ष असलेल्या अमेरिकी वसाहतींत पोलियोची लागण का होतेय ? हा पोलियो विसाव्या शतकांतच का उदयाला आला ? विषाणू तर हजारो वर्षांपासून माणसाच्या आतड्यांत रहात आलाय. तर पोलियोचं कारण आहे कृत्रिम आहार. साखर, मैदा, दारू, तंबाखू, इत्यादी सवयी तसेच डीडीटी, अर्सेनिक, विविध लशी, प्रतिजैविके यांच्यामुळे माणसाची नैसर्गिक प्रतिकारशक्ती कमी झाली. म्हणून पोलियोसारख्या रोगांमुळे पक्षाघात होऊ लागले.

पोलियोच्या छत्राखाली अनेक रोग समाविष्ट केले गेले. तसेच इतर कारणामुळे पक्षाघात झाला तरी त्यावर पोलियो म्हणून छाप मारण्यात यायचे. आज जसं काही झालं की लगेच करोनाचा छाप मारला जातो, अगदी तसंच पूर्वीही झालंय. पुढे लेखिकेने पोलियोच्या व्याख्येविषयी प्रश्न उपस्थित केलेत.

वाव्या शतकाच्या पूर्वार्धात पोलियोच्या उपचारांत बाधित स्नायूस जखडून टाकीत असंत. जखडल्यामुळे स्नायूची अधिकंच हानी होई. उलट स्नायू मोकळे केले व ठराविक व्यायाम केले तर तो बरा ( = रीकव्हर ) व्हायचं प्रमाण वाढे. याबाबत सिस्टर केनी हिचे व्यायामोपचार प्रसिद्ध झाले. पण ऐकणार कोण. लशीचे मार्केटिंग करायला जखडलेली बालकं अधिक उपयुक्त ठरतात, मोकळेपणे बागडणारी नव्हे.

पोलियो पूर्णपणे गेलेला नाहीये. त्याला ट्रान्सव्हर्स मायलिटीस असं नवीन नाव मिळालंय. माझ्या अंदाजाप्रमाणे मस्क्युलर डिस्ट्रॉफी हा देखील पोलियोचाच एक प्रकार असावा. ट्रान्सव्हर्स मायलिटीस होण्याच्या संभाव्य कारणांमध्ये लस हे ही एक कारण आहे.

पुढे लेखिकेने डीडीटी मुळे पोलियोसारखं एक लक्षण बळावतं, त्याचा सांगोपांग उहापोह केला आहे. भारतातल्या डीडीटी चा सुळसुळाट असल्याने त्यावरही भाष्य केलं आहे. नंतर लेखिकेने अर्सेनिक विषबाधेवर चर्चा केली आहे. या विशाबाधेतून पोलियो सदृश लक्षणं उत्पन्न होतात. अर्सेनिक हे औषध म्हणून सुरक्षित मानलं जाई. साहजिकंच अर्सेनिकच्या विषबाधेचे रोगी पोलियोचे म्हणून गणले जात. यानंतर लेखिकेने सिफिलीसच्या पोलियोसदृश काही लक्षणांचा विचार केला आहे.

पुढे लेखिकेने पोलियोच्या व्याधीमूल्याचा ( = मॉर्बिडिटी चा ) विचार केला आहे. कालानुक्रमे व्याधीमूल्य कसकसं बदलंत गेलं हे मांडलं आहे. बालकांच्या टॉन्सिल ग्रंथी उचकटून काढल्याने पोलीयोत कशी वाढ झाली ते चर्चिलेलं आहे. क जीवनसत्वामुळे पोलियो कशा बरा झाला याच्या अभ्यासकथा ( = केस स्टडीज ) वर्णिलेल्या आहेत.

यापुढे प्रयोगशाळेतल्या लशीमुळे रोगाची साथ कशी आली व बळावली ते लिहिलं आहे.

यापुढे पोलियोचा विषाणू कृत्रिम पद्धतीने निर्माण करता येतो, हे लिहिलेलं आहे. ही पद्धत रासायनिक असून अजैविक आहे.

यापुढे साल्कच्या लशीमुळे उत्पन्न झालेली कटर नामे कुप्रसिद्ध रोगाची साथ वर्णिलेली आहे. यांत लशीतल्या जिवंत विषाणूमुळे अनेक बालकं व नजीकचे लोकं विनाकारण मेले, तर काहीजण जन्मभरासाठी लुळेपांगळे झाले. सक्तीच्या लस टोचणीचा समर्थक पॉल ऑफिट याने मान्य केलंय की कटर रोग हा कृत्रिम असून नैसर्गिक पोलियोपेक्षा कैक पटीने जास्त हानिकारक आहे. कटर व वायथ या दोन आस्थापनांच्या लशी वैज्ञानिक चाचणीप्रक्रिया पार न पडताच बाजारात येऊ दिल्या गेल्या.... यासाठी सुरक्षा निकष धाब्यावर बसवण्यात आले.... बाकी सगळं मी सांगंत बसंत नाही.

यानंतर माकडाच्या उतींतून निर्मिलेल्या लशीत कर्करोगजन्य पदार्थ सापडल्याचं लिहिलंय. या दूषित लशीमुळे कर्करोग होण्याचं प्रमाण वाढलं.

आता या प्रकरणाचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे भारतातील पल्स पोलियोच्या लशीचा गोंधळ वर्णिलेला आहे. प्रयोगशील लस असल्याने रोगाचं उच्चाटन तर झालं नाहीच, वर अतिरिक्त रोग बळावले. नैसर्गिक पोलियोपेक्षा कृत्रिम पोलियो जास्त प्राणघातक ठरला. भारतात नैसर्गिक पोलियोची जागा कृत्रिम पोलियोने घेतली आहे. वेल डन ! ५ वर्षाच्या बालकाला ३२ डोस दिले गेलेत. फार छान !!

निष्कर्ष : मानवी हस्तक्षेपामुळे नैसर्गिक पोलियो नाहीसा होत चाललाय. आता फक्त कृत्रिम पोलियो उरेल आणि नवजात बालकाला जन्मत:च मिळणारी पोलियोची रोगप्रतिकारक शक्ती निरुपयोगी ठरेल. आता बसा बोंबलंत.

प्रकरण १३ : डांग्या खोकला (Pertusis)

या रोगाने अमेरिकेत १९११ साली सुमारे १ लाख लोकांचा बळी घेतला. तर १९६० साली याने त्यामानाने नगण्य बळी घेतले. १९४० च्या दशकांत डांग्या खोकल्याची लस वापरांत पसरली, पण त्यापूर्वीच रोगाचा मृत्यूदर ९२ % ने खालावला होता. इंग्लंड व वेल्स मधले निकाल याहून ठाशीव आहेत. त्यांनुसार लशीकरणापूर्वी मृत्यूदर ९९ % ने खालावला होता. तसेच १९८४ साली उघडकीस आलं की डांग्या खोकल्याची लसटोचणी बंद केल्यावर त्याचे रोगी कमी झाले.

शिवाय लस टोचल्याने रोग बळावण्याची नेहमीची रड आहेच. क्यालीफोर्नियातल्या सान रफायेल येथल्या रुग्णालयात २०१२ सालच्या अभ्यासानुसार डांग्या खोकला झालेल्या बालकांपैकी बहुसंख्य बालकांना लस टोचली होती. याचा अर्थ ही लस आजीव सुरक्षा देण्यास पूर्णपणे असमर्थ ( की अपयशी ? ) ठरली होती. मग द्यायचीच कशाला ? झक मारायला ?

यापुढे लेखिकेने प्रतिपिंड आद्यपराध अर्थात Original Antigenic Sin ही संकल्पना स्पष्ट केलेली आहे. थोडक्यात सांगायचं तर लस टोचल्याने प्रतिकार यंत्रणा पंगू होते किंवा वेडीवाकडी वागू लागते. त्यामुळे नैसर्गिक प्रतिकारशक्ती क्षीण होते. परिणामी ज्या रोगाची लस टोचली आहे, नेमक्या त्याच रोगाला माणूस बळी पडतो. लशीद्वारे दुर्बळ विषाणू सोडल्याने प्रतिकारयंत्रणेची फसवणूक होते. ही फसवणूक सुधारता येत नाही. मग टोचून घेत बसा आयुष्यभर लशी एकापाठोपाठ एक. यापायी डांग्या खोकला आता बालकांना न होता प्रौढांना होतोय.

कोणीही लशीकरण तत्ज्ञ प्रतिपिंड आद्यपराधाविषयी काहीही बोलंत नाही. लशीसंबंधी मूलभूत प्रश्न उपस्थित होतात ना ! बोलायला तोंड आहे कुठे !

प्रकरण १४ : गोवर

१९ व्या शतकात ( १८०० चं शतक ) इंग्लंड व अमेरिकेत दर दोनेक वर्षांनी गोवराची साथ यायची. दाखल मुलांपैकी २० % परलोकवासी व्हायची. पण हे प्रमाण १९६० पर्यंत प्रचंड घसरलं. ही घसरण लशीकरणाच्या अगोदर झालेली आहे. स्वच्छता, आहार व पोषण यांत सुधारणा झाल्याने हा फरक पडला आहे.

गोवराच्या मृत विषाणूंच्या लशीमुळे अधिक तीव्र रोगाची लागण होई. हा नेमका उलट परिणाम आहे. रोगप्रतिकारक यंत्रणेत लशीने अनावश्यक हस्तक्षेप केल्याने झालेला प्रतिपिंड आद्यपराध हे मूळ कारण आहे. तसंच जिवंत लशीमुळेही गोवर होई. या गोवरामुळे ताप येऊन पुरळ उठे. हा परिणाम टाळण्यासाठी गोवराची प्रतिपिंडे टोचली जात. त्यांच्यामुळे रोगप्रकरण अधिक गुंतागुंतीचं होई.

यानंतर अमेरिकेतल्या गोवर लशीकरण प्रकल्पाचं अपयश वर्णिलेलं आहे. अनावश्यक लशीकरणामुळे गोवर मोठ्या माणसांनाही होऊ लागला. परत डांग्या खोकल्यासारखीच परिस्थिती उद्भवली. गोवराच्या लागणी व्हायच्या. मात्र अमेरिकेत सगळं खापर लस न घेतलेल्यांवर फोडण्यात आलं. खरा प्रकार असा होता की लशीमुले नैसर्गिक प्रतिकारक्षमतेवर प्रतिकूल परिणाम झाला होता. २००० साली अमरिकेतनं गोवर संपल्याचं जाहीर करण्यात आलं, परंतु हे जाहीर विधान २०१२ साली मागे घेतलं गेलं. एकदा का लस घेतली की आयुष्यभर परत परत घ्यावी लागते. करोनाचं असंच होणारे. याविषयी शंका नको.

यानंतर प्रतिपिंडांविषयी प्रश्न उपस्थित केला आहे. प्रतिपिंडे ही खरोखरंच रोगजंतूंना ठार मारतात की ती केवळ अंगुलीनिर्देशक लेबल असतात ? प्रतिपिंडांची कमतरता ( agamma-globulinemia ) असतांनाही गोवर बरा झाल्याची काही प्रकरणं घडलीत. यावरून लस व तिची उपयुक्तता यावर भलं थोरलं प्रश्नचिन्ह चिकटतं.

यानंतर प्रतिपिंड प्रोत्साहन प्रक्रिया वर्णिली आहे. कधीकधी प्रतिपिंडांमुळे विषाणूस यजमान पेशीस ओळखणं सोपं पडतं. यांस antibody dependent enhancement म्हणतात. याचा अर्थ लस टोचल्याने तिच्या परिणामामुळे लागण व्हायची शक्यता वाढते. हा नेमका विपरीत परिणाम आहे.

काही लशींमुळे पुरळ न उठता गोवर होतो. गोवराच्या विषाणूमुळे पुरळ येत नसून शरीराने विषाणूंवर हल्ला केल्याने उठतं. जर लस टोचली तर प्रतिकारक्षमता बिघडल्याने पुरळ उठंत नाही, तरीपण रोग होतोच. असा बिनलक्षणी गोवरही झाल्याची प्रकरणं उजेडांत आलेलीआहेत. मग लस घेतलेल्यांना कळणार कसं की लस अपयशी ठरली आहे ते ? बसा बोंबलंत.

यानंतर गोवराची लागण कमी होण्याविषयी संभाव्य कारणांचा विचार केला आहे.

यानंतर लशीमुळे अर्भकाच्या मातृदत्त प्रतिकारशक्तीचा कसा ऱ्हास होतो ते वर्णिलेलं आहे. गोवरावर आईचं दूध व लस यापैकी आईचं दूध अधिक परिणामकारक आहे.

यानंतर जीवनसत्वांचा योग्य पुरवठा प्रतिकारशक्ती कशी वाढवतो ते सांगितलं आहे.

प्रकरण १५ : उपासमार, स्कर्व्ही व क जीवनसत्व

शीर्षकावरनं कळतं या प्रकरणात काय असणारे ते.

स्कर्व्ही म्हणजे धातुविदरण या व्याधीचं लक्षण हिरड्यांवर सर्वप्रथम दिसून येतं. मात्र ही पूर्ण शरीराची व्याधी आहे. हिच्यात शरीरास धरून ठेवणारी कोलाजेन ( collagen ) नामे ऊती विदीर्ण पावते. त्यामुळे शरीर अक्षरश: खिळखिळे होते. आहारातनं क जीवनसत्व न मिळाल्याने ही व्याधी होते. हिचा परिणाम हिरड्यांवर सर्वप्रथम दिसून येतो. त्या हुळहुळ्या होऊन जराशा धक्क्याने रक्त पाझरू लागतं. ही व्याधी बळावल्यावर रोगी थकव्याने वारंवार झोपू लागतो व एके दिवशी कायमचा झोपतो.

अमेरिकेत इ.स. १८५० च्या दशकात क्यालिफोर्नियात सोन्यासाठी धडपड अर्थात गोल्ड रश ऐन भरात होती. तेव्हा धातुविदरण व्याधीने पटकी ( = कॉलरा ) पेक्षा जास्त बळी घेतले. अमेरिकी नागरी युद्धात ( इ.स. १८६१ ते १८६५ ) प्रत्यक्ष लढाईत कामी आलेल्या सैनिकांची संख्या अवघी १ % होती. बाकीचे ९९ % रोगराई व इतर कारणांनी मृत्युमुखी पडले होते. यांत धातुविदरण व हगवण आघाडीवर होते.

क जीवनसत्वात अस्कॉर्बिक आम्ल असतं. त्यामुळे पेशींचं चयापचय सुधारतं. मुडदूस ही व्याधी ड जीवनसत्वाच्या कमतरतेने होते. मात्र हिच्यातनं बरं होण्यासाठी ड संगे क जीवनसत्वही आवश्यक असतं. क जीवनसत्व एखाद्या प्रतिजैविकासारखं काम करतांनाही आढळून आलंय.

कालांतराने आहारात सुधारणा झाल्याने धातुविदरण व्याधी उतरणीस लागली. उदा. : इंग्लंडध्ये धातुविदरण व्याधीची लागण इतर सांसर्गिक आजारांसारखी झपाट्याने खाली आली. क जीवनसत्व केवळ व्याधींवर उपयुक्त नसून सर्वसाधारण रोगप्रतिकारशक्ती देखील बळकट करतं. कुठल्याश्या निरर्थक लशी टोचून घेण्यापेक्षा आहारात सुधारणा केलेली काय वाईट ?

क जीवनसत्व जर इतकं गुणी आहे तर मग आपले डॉक्टर हे आपल्याला समजावून का सांगंत नाहीत, असा प्रश्न पडतो. क जीवनसत्वाच्या परिणामाविषयी नियोजित स्वैरचाचण्या ( = randomised controlled trials ) आजवर कोणीही घेतल्या नाहीयेत. इतक्या महत्त्वाच्या विषयाकडे दुर्लक्ष करून नेमकं काय साध्य होतं ? उत्तर सोप्पंय, औषध आस्थापनांचा फायदा !

प्रकरण १६ : हरवलेले उपचार

शीर्षकावरनं कळतं या प्रकरणात काय असणारे ते.

आधुनिक वैद्यकातल्या अनेक घातक संकल्पना केवळ अंधविश्वासाच्या आधारे प्रचलित करण्यात आल्या. उदा.: दुर्बलोच्छेद ( = Eugenics ), थालीडोमाईड, डाय-ईथाईल-स्टिल-बेस्ट्रॉल. यांत एक भर म्हणजे केवळ लस टोचल्याने रोग बरा होतो. प्रत्यक्षात लस ही रोगापासून संरक्षण करीत नाही. या प्रकरणात इतर सुलभ, स्वस्त व अधिक परिणामकारक उपायांचा विचार केला आहे.

विषय बराच मोठा आहे. या छोट्याशा प्रकरणांत दालचिनी, कांदा, लसूण, एन्चिनेशिया, जिकामा, ताज्या फळांचा रस, सफरचंदाचे सायडर व्हिनेगर, कॉड माशाच्या यकृताचे तेल, रजतभस्म द्राव ( चांदीचे कोलॉयडल सोल्युशन ), इत्यादि पदार्थांच्या जंतुघ्न गुणांचा परामर्श घेतला आहे.

काही उदाहरणे : प्रतिजैविकांना दाद न देणारे नफ्फड ब्याक्टेरिया दालचिनीमुळे आटोक्यात येतात. कांदा भरपूर खाणाऱ्या जवळजवळ सर्व ( इटालियन, पोलिश, हंगेरियन, इत्यादि ) लोकांना देवी येत नाहीत. लसणाने क्षय व डांग्या खोकला यांवर उतार पडतो.

प्रकरण १७ : भीती व धारणा

लोकांची समजूत करवून दिलीये की जग धोकादायक आहे. म्हणून तुम्ही तुमची सुरक्षा सरकार व मोठ्या आस्थापनांच्या हाती सोपवा. ती तशी खरोखरंच सोपवावी का ? उत्तर नकारार्थी आहे. लोकांनी आपला शहाणपणा व सुरक्षा का म्हणून गहाण ठेवायची ? या विषयाचा सदर प्रकरणांत उहापोह केला आहे. या भीतीच्या कचाट्यातनं डॉक्टरांचीही सुटका नाही. खूपदा ते ही स्वतंत्र विचार त्यागून प्रचारतंत्रास बळी पडतात.

आज अलोपथीच्या मते मानवी शरीर म्हणजे रसायनांचा समूह असून त्यास शल्यकर्म, रसायने, प्रतिजैविके वगैरेंच्या सहाय्याने कसंबसं नियंत्रणात ठेवायचं असतं. हे नियंत्रण कुठवर, तर जीव जाणार नाही या बेताने. असो.

डॉक्टर चार्ल्स क्रेटन ( Dr. Charles Creighton ) याने १९०३ साली देवीच्या लशीचे धोके, परिणामकारकता, पुनर्लशीकरण व कायदेशीर बाबी यांविषयी बरंच लेखन केलं. त्याचा एक अहवाल बनवला व तो एनसायक्लोपीडिया ब्रिटानिका मध्ये प्रसिद्धही झाला. पण १९२२ साली हा मजकूर गाळून त्या जागी लसोपचार नामे मजकूर घुसडण्यात आला. त्यात कसलाही पुरावा नसतांना लशीमुळे रोगप्रतिकारक शक्ती मिळते असा धादांत असत्य दावा केला गेला. कोणी केलं हे ? ओळखा पाहू ! ही विलक्षण लस म्हणे एडवर्ड जेन्नरने शोधली. घंटा तिच्यायला संशोधन.

यापुढे जेन्नरचा हवाला देऊन 'घातक रोगजंतू व जीवनरक्षक लस' ही बिनबुडाधी धारणा ठासून वारंवार मांडली जाऊ लागली. १९२० च्या दशकांत व नंतर अमेरिकेत अनेक चित्रविचित्र ( bizzare ) लशींचा सुळसुळाट झाला आणि त्यांच्या पोकळ व भरमसाट दाव्यांना ऊत चढला. तो आजवर टिकून आहे. साहजिकंच आजचं अलोपथी वैद्यक हा एक रिलीजन होऊन बसला आहे. दुसरं काय !

लागणप्रवर्तक हे लागणकारक नव्हेत. Infection agents are not cause of infections. या सत्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. उदा. : पेलाग्रा या विकारापायी हगवण, त्वचादाह, निद्रानाश होतो असं मानण्यात येई. आज खरंतर ही व्याधी बी-३ या जीवनसत्वाच्या अभावी होते हे स्पष्ट झालंय. पण एके काळी पेलाग्राचा विषाणू असल्याचा समज प्रचलित होता. आज 'करोनाचा विषाणू' ही अशीच एक थोतांडी संकल्पना प्रचलित आहे.

लस अयशस्वी ठरली की मग लस न घेतलेल्या जागरूक लोकांवर साथीच्या रोगांचं दोषारोपण करणं हा वैद्यकीय प्रस्थापितांचा एक आवडता खेळ आहे. हल्ली हे खापर विषाणूचं जनुकीय उत्परिवर्तनावर ( = जेनेटिक म्युटेशन वर ) फोडलं जातं. हे एक उपथोतांड आहे. मग 'नवीन व अधिक प्रभावी' लशी शोधण्यावर लक्ष केंद्रित केलं जातं. जुन्या लशीचे दोष व अपयश यांवर आपसूक पांघरूण टाकता येतं. मुळांत लस ही रोगनिवारण करणारी नसतेच. पण लक्षांत कोण घेतो. लोकंही भीतीपायी नवीन लशीवर विश्वास ठेवतात. असा एकंदरीत मामला आहे.

यानंतर इंग्लंडात लशी टोचण्यापूर्वीच साथींचे रोग कसे आटोक्यात आले होते त्याची आकडेवारी व आलेख दिलेले आहेत.

अमेरिकेत स्कार्लेट ताप हा पूर्वी एक जीवघेणा रोग होता जो आता नामशेष झाला आहे. तो लशीशिवाय नाहीसा झाला. अर्थात, लसनिर्मितीचे प्रयोग करण्यांत आलेच. अशीच एक प्रयोगशील लस निरोगी असलेल्या शिकाऊ परिचारिकांना टोचल्यावर सगळ्या एका वर्षभरांत मृत्युमुखी पडल्या. आता कळलं स्कार्लेट तापावर लस का काढली नाही ते ?

असो.

संपलं एकदाचं पुस्तक.

विचार, मनन व चिंतनाचं उपकंत्राट देता येत नाही. या गोष्टी स्वत:च्या स्वत:च कराव्या लागतात. एव्हढं जरी ध्यानी आलं तरी पुस्तक सार्थकी लागलं, म्हणेन मी.

---------------x---------------x---------------

लांबलचक सारांश वाचून कंटाळलात ? आता थोडा इतरत्र फेरफटका मारूया. सांगायचा मुद्दा असा की केवळ प्रपकांडाद्वारे ( = प्रोपोगंडा द्वारे ) लस हे जणू अमृत आहे असा आभास उत्पन्न केला आहे. तर असा गोबेल्सी अपप्रचार पूर्वी कधी झाला होता याचा धांडोळा घेतला. तेव्हा महाभारतात एक उदाहरण सापडलं.

पुष्ट, बलवान, नम्र व सतेज पांडव पाहून हस्तिनापुराची लोकं त्यांनाच भावी राजे मानू लागली. त्यामुळे दुर्योधनाचा जळफळाट झाला. पांडवांचा काटा काढण्यासाठी त्यांना दूरदेशी पाठवावं असं त्यानं ठरवलं. तो बापाला म्हणजे धृतराष्ट्राला म्हणाला की एकदा का पांडव दूर गेले की मी राज्यावर बसेन. मग कुंती व ते परत जरी आले तरी काही हरकत नाही. मी त्यांना बघून घेईन. प्रत्यक्षात त्याला पांडवांची हत्या करायची होती. मात्र हा गुप्त हेतू कोणालाही कळू न द्यायची काळजी घेतली.

आता, पांडवांना निघून जा असं थेट सांगणं शक्य नव्हतं. तेव्हा दुर्योधन बापाला आपली योजना समजावतांना म्हणाला की भीष्म मी व पांडवांप्रति समानदृष्टी बाळगून आहे. द्रोण व अश्वत्थामा माझे आहेत. कृप या दोघांना सोडणार नाही कारण हे त्याचे मेहुणा व भाचा आहेत. राहता राहिला विदुर, पण तो आपल्या अन्नाचा ओशाळा आहे. यावर धृतराष्ट्र या योजनेस राजी झाला. मग दुर्योधनाने धनमानादि पारितोषिकांद्वारे प्रधानवृंदास आपल्याकडे वळवून घेतलं. या वश झालेल्या मंत्र्यांनी धृतराष्ट्राच्या आज्ञेवरून वारणावत नगरीची प्रशंसा आरंभली. तसंच धृतराष्ट्राच्या भाट व चरणांनी त्या नगरीची वारेमाप स्तुती केली. तिथे शिवपुजेची पर्वणी आल्याची खरीखुरी बातमीही विशेषकरून पसरवली. पांडवांच्या मनात वारणावताविषयी उत्सुकता निर्माण झाल्याचं कळताच धृतराष्ट्र त्यांना म्हणाला की जत्रेला जाऊन विपुल दानधर्म करून या. धृतराष्ट्राची इच्छा युधिष्ठिरास कळून आली. पण विदुराचे सहाय्य आहे म्हणून त्यानं ही योजना स्वीकारली.

गमनदिनी जेव्हा पांडव हस्तिनापुरातल्या प्रतिष्ठित ब्राह्मणांचा निरोप घ्यायला गेले तेव्हा त्या विप्रांनी धृतराष्ट्रास बराच दोष दिला. पंडू सर्वांना पित्याप्रमाणे वाटंत असे, याउलट धृतराष्ट्रास पांडव डोळ्यासमोर नको झालेत. भीष्माने पांडवांना जाण्याची परवानगी दिलीच कशी, असा प्रश्न उपस्थित केला. भीष्माची बुद्धी चळली आहे, सबब आपण हस्तिनापुर त्यागून धर्माच्या मागे गेले पाहिजे असं म्हणू लागले. ब्राह्मणांनी आपणहून निर्वासित होणे हा त्याकाळी राज्याचा फार मोठा अपमान मानला जाई. परिस्थिती इथवर फिसकटली होती. तरीपण युधिष्ठिराने धृतराष्ट्राच्या चांगुलपणाचा भरवसा देऊन ब्राह्मणांना तिथेच थांबायची विनंती केली. ती त्यांनी मानली.

पुढे मग पांडव वारणावतात गेले, नंतर सुमारे वर्षभराने लाक्षागृह प्रकरण घडलं. त्यातनं ते सुखरूप निसटले खरे, पण त्यांना रानोमाळ भटकावं लागलं. भटकतांना हिडींब व बकासुर वगैरे प्रकरणेही घडली. एकदा युधिष्ठिराच्या मनांत विचार आला की आपण असेच फिरंत राहिलो तर दुर्योधन आपल्यास कुठेतरी गाठून ठार मारेल. काहीतरी उपाय शोधायला हवा. फिरताफिरता पांडव व कुंती काम्पिल्य नगरीपाशी आले. तेव्हा पांडवांना कृष्ण यादव नामे एक अत्यंत लबाड इसम भेटला. शिवाय तो नेमका पांडवांचा आतेभाऊही निघाला. त्याच्यापाशी युधिष्ठिराने आपली व्यथा बोलून दाखवली. कृष्णाला कळलं की पांडव आपल्या बरेच उपयोगाचे आहेत. आज दुर्योधानामुळे ते रानोमाळ हिंडताहेत. उद्या जरासंधापायी मथुरेकर यादवांवर हीच वेळ येऊ शकते.

तेव्हा त्या लबाड माणसाने द्रौपदीस वरण्याचा आपला हेतू बाजूला सारला व आपल्या जागी पांडवांपैकी एकाची मनोमन नियुक्ती केली. वरकरणी मात्र त्याने युधिष्ठिरास एखाद्या प्रबळ राजाचं सहाय्य घ्यायला सुचवलं. पुढे असंही म्हणाला की जरा घाई करा. कारण की काम्पिल्य नगरीचा राजा द्रुपद याची मुलगी उपवर आहे, तेव्हा तुम्ही त्याचीच सोयरिक करून घ्या. आजंच तिचं स्वयंवर आहे. पुढे अर्जुनानं द्रौपदी जिंकली व कुंतीच्या अहैतुक आशीर्वचनामुळे ती इतर चार पांडवांचीही पत्नी झाली. आता पांडवांची ओळख पटली होती. मग हस्तिनापुरास परत कसं जायचं याविषयी विचारविनिमय चालू होता. इतक्यात तिथनंच विदुराकरवी पांडवांना सपत्नीक आगमनाचं आमंत्रण आलं.

लोकहो, पहा, आत्ताप्रमाणेच सुमारे दहा पंधरा वर्षांपूर्वी पंडू व माद्रीच्या मृत्यूनंतर कुंती पांडवांना घेऊन हस्तिनापुरास आली होती. तेव्हा तिला लोकांची सहानुभूती तरी होती. भीष्माने तिला बाहेरच्या बाहेर न फुटवता मोठ्या मनाने आश्रय दिला. यावेळेस मात्र भीष्मानेच तिला व पांडवांना हाकून लावलं होतं. मात्र असं असलं तरीही आता द्रौपदीच्या केवळ अस्तित्वाने पांडवांना अपरिमित बळ प्राप्त झालं. इतकं जबर बळ मिळालं की तुरुंग फोडून इतस्तत: भटकणारा युधिष्ठीर कालांतराने चक्क राजसूय यज्ञ करता झाला. द्रौपदी ही काय चीज आहे ते यातनं कळतं.

असो. आता आपण परत वर्तमानकाळात येऊया किंवा जाऊया.

---------------x---------------x---------------

आलांत वर्तमानांत ? उत्तम. आता आपल्यासाठी म्हणजे सामान्य माणसासाठी काही प्रश्न हजर आहेत.

१. हस्तिनापुरातल्या ब्राह्मणांनी भीष्माची उलटीसुलटी घेतली. त्यांच्याकडे तितकी नैतिक शक्ती होती. करोनाच्या लशीच्या थोतांडाविरुद्ध कोण नैतिक शक्तिशाली ब्राह्मण आपल्यासाठी उभा राहणार आहे ?

उत्तर : कोणीच नाही. आपली लढाई आपल्यालाच लढावी लागणार आहे. त्यासाठी नैतिक शक्ती म्हणून कर्मसाधना करायला पाहिजेच.

२. कोणती द्रौपदी आपल्यासाठी वरमाला घेऊन सज्ज आहे ?

उत्तर : कोणीच नाही. आपणंच आपल्याला लशीच्या शोधार्थ रानोमाळ हिंडण्यापासून वाचवायचं आहे. त्यासाठी मजबूत भक्तीसाधना हवीच.

३. कोण विदुर आपल्याला मार्गदर्शन करणार आहे ?

उत्तर : मी आहे ना गामा पैलवान, विदुरासारखा मार्गदर्शन करणारा. मी नीतिमत्तेचा महामेरू असून स्वयंघोषित धर्ममार्तंडही आहे. मी सांगतो की आपण सारे मिळून युधिष्ठिरासारखी धर्मसाधना करूया.

सांगायचा मुद्दा काये की कर्म, भक्ती, धर्म यांमध्ये साधना हा सामायिक घटक आहे. ती साधना म्हणजे नामजप. तो करायला हवाच. चांगला सणकून करूया आणि या करोना नामे थोतांडास पार पळवून लावूया.

॥ जयजय रघुवीर समर्थ ॥

आपला नम्र,
-गामा पैलवान

धर्मसमाजजीवनमानतंत्रविज्ञानराजकारणप्रकटनविचारलेखमतशिफारसमाहितीसंदर्भभाषांतरआरोग्य

प्रतिक्रिया

चित्रगुप्त's picture

1 May 2021 - 6:05 pm | चित्रगुप्त

आम्हा उभयतांना गेल्या जुलाई मधे कोविड बाधा झाली होती. कोणतेही औषध वगैरे न घेता हळू हळू आपोआप घरीच बरे झालो. यावर मिपावर लेखही लिहीला होता. पुढे यथावकाश लसीचे दोन्ही डोसही घेतले. गेल्या आठवड्यात आम्ही सगळे दीड तासाचा विमान प्रवास करून फिलाडेल्फियाला गेलो. तिथे बाहेरचे खाणे, गर्दीच्या जागी फिरणे झाले. परत आल्यावर सर्वांना खोकला, घसा बसणे वगैरे सुरू झालेले आहे. मला बराच अशक्तपणा आलेला आहे. कोविड टेस्ट केलेली नाही. तरी लक्षणे तीच आहेत.
बरा झाल्यावर पुन्हा लिहीन.

९ ऑगस्ट २०२० पासून म्हणजे गेल्या सात महिन्यापासून दिल्लीच्या विविध बॉर्डरींवर तथाकथित 'किसान आंदोलना'त लाखो लोक सहभागी झाले आणि होत आहेत. हे लाखो लोक रांत्रंदिवस तंबूंमधे जवळ जवळ झोपत आहेत. एकत्र खाणे-'पिणे' वगैरे सर्व काही करत आहेत. तथाकथित 'सोशल डिस्टंसिंग - मास्क - सॅनिटायझर वगैरे सव्यापसव्य न करता. यापैकी किती करोना बाधित झाले ? याचा काही विदा आहे का ? कोणीच झाले नसल्यास वा नगण्य झालेले असल्यास करोना हे थोतांड असण्याचा हा एक सबळ पुरावा मानता येईल. माझ्या परिचयातील एक साठीतले गृहस्थ पंधराएक वर्षांपासून विविध व्याधींनी ग्रस्त होते. शेवटी किडनी वगैरेंच्या अनेक गुंतगुंती निर्माण होऊन अलिकडेच वारले. मात्र त्यांचा करोना मुळे मृत्यू झाला असे घोषित केले गेले हे मला प्रत्यक्ष ठाऊक आहे. आणखीही अशी उदाहरणे जगभर आहेत. बेल्जियममधील एका परिचिताने तिथे हॉस्पिटलात मृत्यू पावणार्‍या जवळ जवळ सर्वच लोकांना करोना मुळे मृत्यू असेच घोषित केले जात असल्याचे सांगितले होते. दाल मे कुछ काला जरूर है भिडू.

किसान आंदोलन केंव्हापासून चालू आहे याबद्दल मी वरील प्रतिसादात दिलेली माहिती बहुतेक चुकीची आहे असे दिसते. कृपया जाणकारांनी खुलासा करावा.
अर्थात इथे मुख्य मुद्दा एवढ्या लाखो लोकांपैकी कितीजण करोना बाधित झाले हा आहे.

मराठी_माणूस's picture

7 Mar 2021 - 9:44 am | मराठी_माणूस

बरोबर. हा एक महत्वाचा मुद्दा आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Mar 2021 - 10:01 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कायदे मंजूर झाला तो दिवस २० सप्टेंबर आणि आंदोलन सुरु झाले तो दिवस २१ सप्टेंबर २०२० पासून आंदोलन सुरु झाले. तर दिल्लीच्या पाच सीमांवर आंदोलकांना १०१ दिवस झाले आहेत.

>>>>>इथे मुख्य मुद्दा एवढ्या लाखो लोकांपैकी कितीजण करोना बाधित झाले हा आहे.

खरंय....संसर्ग होऊन किती लोकांना बाधा झाले ते आंकड़े आले नाही तसे असते तर सरकारने भयंकर संसर्ग होत असल्यामुळे त्यांना हटविण्याचे कायदेशीर फॉर्म्युले आणले असते.

-दिलीप बिरुटे

श्रीगुरुजी's picture

7 Mar 2021 - 10:04 am | श्रीगुरुजी

डॉक्टरसाहेब,

तुमच्यासाठी आनंदाची बातमी.

https://www.loksatta.com/maharashtra-news/82-point-2-per-cent-farmers-op...

मुक्त विहारि's picture

7 Mar 2021 - 11:10 am | मुक्त विहारि

८२.६ टक्के शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतमालाला हमी भावापेक्षा कमी भाव मिळतो असे सांगितले आहे, तर ७.५ टक्के शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतमालाला सरकारने घोषित केलेला हमी भाव मिळतो, असे सांगितले.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Mar 2021 - 12:20 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लस घेतल्यानंतर शरीरात तयार झालेली रोगप्रतिकारशक्ती किती दिवस टिकेल ? त्याबाबत सरकारकडून काही अधिकृत माहिती दिलेली आहे का ? की लस घेतल्यानंतरही मास्क घालणं, हात धूणं, सॅनिटाइजरचा वापर करणे. फिझिकल डिस्टंसिंगचं पालन करावेच लागणार आहे ?

-दिलीप बिरुटे

मुक्त विहारि's picture

8 Mar 2021 - 5:13 pm | मुक्त विहारि

काळजी घेणे, हा निरोगी राहण्याचा, पहिला नियम आहे...

त्यामुळे, मी अजूनही खालील गोष्टी करतो

1, जनसंपर्क टाळणे

2, जनसंपर्क टाळणे

3, जनसंपर्क टाळणे

जनसंपर्क टाळणे, हाच सर्वोत्तम उपाय आहे.

मी आत्ताच दिलेल्या प्रतिसादात लिहीले त्याप्रमाणे लस घेऊनही बाधा होऊ शकते. त्यामुळे जनसंपर्क टाळणे हे महत्वाचे.

Rajesh188's picture

8 Mar 2021 - 1:00 pm | Rajesh188

Reinfection झालेल्या लोकांची संख्या कन्फर्म किती आहे ह्याची आकडेवारी कोणीच देत नाही.
खरे तर reinfection होतच नसावे.
संशोधक,सरकार,पत्रकार , डॉक्टर कोणीच ह्या प्रश्नाचे ठाम उत्तर देणार नाही.
किती ही गूगल वर शोध घ्या कन्फर्म उत्तर मिळणार नाही.
अशा केस च नसाव्यात.

मराठी_माणूस's picture

9 Mar 2021 - 10:06 am | मराठी_माणूस

https://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/mumbai-65-yr-old-goregao...

आतापर्यंतच्या अशा केसेस मधे , व्हॅक्सीन हे त्याचे कारण नाही असे म्हटले आहे

गामा पैलवान's picture

9 Mar 2021 - 7:41 pm | गामा पैलवान

कस्टमर टेस्टिंगकी जय हो. मेला तर मेला तो कस्टमर. मेलेला कस्टमर विक्रेत्याचा गळा थोडाच पकडणारे ?

म्हणे टोचलेली लस हे मृत्यूचं कारण नाही. मग करोनाचा विषाणू हे तरी कारण आहे का मृत्यूचं?

-गा.पै.

लसी चे खरे दुष्परिणाम दिसून येतील.चागले परिणाम झाले तर प्रश्न च नाही पण दुष्परिणाम झाले तर कोणाला जबाबदार धरणार.

काही लोकं अर्थातच, मोदींनाच जबाबदार धरण्याची शक्यता आहे...

परमपूज्य, राहुल गांधी, यांचे घराणेशाही मानणारे चेले, अशी संधी कशाला वाया घालवतील?

कोरोना विषाणू आणि त्यावर आलेली लस , हे पैसे जमानवण्याचे माध्यम असू शकते . कारण या लसीचे प्रमाण हे सुरुवातीच्या लक्षणावर झालेले आहे . सध्या कोरोना संक्रमित होतोय आणि त्याचे संक्रमण हे भिन्न प्रकारचे आहे . मला तरी वाटतेय कि आपल्या इथे ( समशीतोष्ण कटिबंधात ) तो जर संक्रमित झाला आणि चुकून बाहेर गेला तर काही खरे नाही .
सध्या लस ना घेणे हे कधीही चांगले . कारण या लसीचे अनुभव नमूद व्हायला थोडा अवधी लागेल . इतक्या जलद गतीने एकतर कधीही लस तयार होत नसते . त्यासाठी कैक वर्षे अभिप्रेत असतात . पण इथे याच्या आगमनानंतर तर प्रगत देशांमध्ये स्पर्धा चालू झालीय . त्यामुळे काहीतरी काळेबेरे असल्याचा दाट संशय येतो .
तूर्तास
मेगाडोस ऑफ व्हिटॅमिन सी आणि डी , हे दोन पर्याय खुले आहेत आणि लोकडउनपासून सुरूही आहेत . आतापर्यंत कित्येक लोकांच्या संपर्कात आलो , जे मिळेल ते खाल्लं पण सध्यातरी सर्व सुरळीत आहे .

कोणत्या ना कोणत्या मार्गे लोकांना लस घेण्या साठी जबरदस्ती करणार.
कंपन्यांना कामगार वर दबाव आणायला सांगणार,सरकारी कर्मचाऱ्यांना दबावात आणणार,बाकी लोकांना जबरदस्ती करणार..
गोदी मीडिया आहेच खोट्या बातम्या प्रस्तुत करण्यासाठी.
ह्यांना मत देवून किती मोठी चूक केली ह्याची जाणीव नक्कीच लोकांना होणार आहे.
आता पर्यंत लोकांनी ह्यांना satte पासून का दूर ठेवले होते ते पण लोकांना ह्या कार्यकाळात समजेल.

पण आपल्या लोकशाहीचा गैरफायदा घेऊन सरकार बनवले यांनी. आत जर लस घेतली नाही तर मंत्री तुम्हाला घरातुन उचलून आणतील.
तसाही आणिबाणि दरम्यानचा जोरजबरदस्ती कुटुंब नियोजन करण्याचा अनुभव असलेला पक्ष आहेच कि सत्तेत भागीदार. बाकी मिडिया तर काय म्हणता. जिकडे चहा बिस्किट तिकडे चांगभलं.

मराठी_माणूस's picture

10 Mar 2021 - 10:34 am | मराठी_माणूस

तुम्हाला घरातुन उचलून आणतील.

आता पर्यंत हा विचार आला नव्हता. एकदम भितीच वाटली वाचुन:(

गामा पैलवान's picture

10 Mar 2021 - 1:47 pm | गामा पैलवान

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केलेलं एक विधान आठवलं :

लक्षणविरहित कोरोना रुग्णांनासुद्धा (Asymptomatic covid patients) कोविड सेंटरमध्येच भरती व्हावं लागेल

हे नाझी विधान आहे. या बाई स्वत:स गेस्टापो समजतात काय? यांचा बोलविता धनी कोण आहे?

करोनाचा विषाणू अस्तित्वात नसतांना व्यवस्थित निरोगी माणसावर ही असली जबरदस्ती का? उपचारांच्या नावाखाली त्याला ठार मारण्यासाठीच ना?

नाझी युजेनिक्स छानपैकी चालू होतंय.

-गा.पै.

Rajesh188's picture

10 Mar 2021 - 9:31 pm | Rajesh188

मुंबई च्या महापौर असलेल्या पेडणेकर ह्यांचे ते स्टेटमेंट अतिशय चुकीचे होते.
ज्यांना काहीच त्रास नाही कोणतेच लक्षण नाहीत त्या covid positive रुग्णांना सुद्धा covid सेंटर मध्ये दाखल केले जाईल हे सुद्ध हुकूम शाही वृत्ती झाली.
लोकांनी मत देवून सत्तेवर बसवले म्हणजे तुम्ही मालक नाही ह्या देशाचे.
Covid center मध्ये दाखल होणे म्हणजे निरोगी व्यक्ती सुद्धा रोगी होण्याची शक्यताच जास्त आहे ..
सरकार नी जास्त डोक्याला ताप घेवू नये फक्त सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही,मास्क सर्वांनी वापरला आहे की नाही हीच काळजी घ्यावी .
आणि आरोग्य सुविधा उत्तम दर्जा च्या पुरवाव्यात.
लोकांवर जोर जबरदस्ती नको.
लॉक डाऊन तर नकोच नको.
बाकी गर्दी नियोजन करण्याचा हक्क सरकार ला आहेच.

आग्या१९९०'s picture

10 Mar 2021 - 9:37 pm | आग्या१९९०

अहो ते गंमत करत आहेत. कोविडला थोतांड म्हणणाऱ्यांना ते डिवचत आहे. जे नाहीच आहे त्याला का घाबरायचे?

मराठी_माणूस's picture

11 Mar 2021 - 10:19 am | मराठी_माणूस

लोकांनी मत देवून सत्तेवर बसवले म्हणजे तुम्ही मालक नाही ह्या देशाचे.

काय सांगता. सत्तेत असले म्हणजे , ते "more equal" होतात ना ? असाच आमचा समज आहे

गामा पैलवान's picture

28 Apr 2021 - 7:16 pm | गामा पैलवान

Rajesh188,

तुमची व माझी अनेक मतं जुळंत नाहीत. तरीही हे मतभेद बाजूस सारून तुम्ही मला करोनासंबंधी पाठिंबा देताहात याबद्दल आभार. __/\__

आ.न.,
-गा.पै.

रंगीला रतन's picture

28 Apr 2021 - 7:28 pm | रंगीला रतन

उशीर झाला आभार मानायला!
मिपावरचा त्यांचा १८८ वा अवतार संपलाय. आता त्यांनी अमरेंद्र बाहुबली नावाने नवा अवतार घेतलाय.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 Mar 2021 - 4:05 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आत जर लस घेतली नाही तर मंत्री तुम्हाला घरातुन उचलून आणतील.

आमच्या औरंगाबाद जिल्हाधिका-यांनी ''सर्व शासकीय कर्मचा-यांना लसीकरणासाठी प्रवृत्त करावे व जे शासकीय कर्मचारी लस घेणार नाहीत त्यांचे पगार बंद करावे'' असे म्हटले आहे. घरातून उचलून आणन्याबाबत पुढे धोरण अंमलात येईल किंवा मुंबै महानगरपालिकेने घरोघर जावून डोस ठोकायची परवानगी मागितली आहे, अशी एक बातमी आज होती.

-दिलीप बिरुटे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 Mar 2021 - 9:54 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

करोना प्रतिबंधक लशीमुळे ८ ते १० महिने सरंक्षण मिळते असे अखिल भारतीय आयुर्विज्ञान केंद्राचे (एम्स) संचालक रणदीप गुलेरिया यांनी सांगितले. लशीमुळे कितीकाळ संरक्षण मिळेल, या ज्या काही शंका होत्या त्या आता दुर होतील. (बातमी संदर्भ आजचा लोकसत्ता)

चला, लागा कामाला. मास्क, सॅनिटाइजर, येता-जाता साबणपाण्याने हात धुणे हे पुढेही सुरु राहील. धन्यवाद.

-दिलीप बिरुटे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 Mar 2021 - 10:03 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लशीचं आयुष्य

च्यायला, याच्यापेक्षा दिवा-बत्ती, थाळीनादाचा आणि तत्सम इव्हेंट भारी होते. देशातील वेगवेगळ्या प्रांतातील नमुने तरी बघायला मिळायचे. गेले ते दिवस आता फक्त आठवणी.

-दिलीप बिरुटे

चौकस२१२'s picture

25 Mar 2021 - 6:22 pm | चौकस२१२

तुमच्या या "थाळी घंटा नाद" वरून सतत चेष्टा करण्याचा प्रवृत्तीच आता वाचून हसू येऊ लागलाय.. ते प्रतीकात्मक होतं हे अजूनही कळलं नाही वाटतं !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 Mar 2021 - 7:34 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>>तुमच्या या "थाळी घंटा नाद" वरून सतत चेष्टा करण्याचा प्रवृत्तीच आता वाचून हसू येऊ लागलाय.

इंजॉय करा. हास्य हे जीवनासाठी आवश्यक आहे. थाळीनाद, दिवाबत्ती माझ्यासाठी आदरनीय पंतप्रधानांनी दिलेला जबरदस्त कॉमेडी इव्हेंट आहे, मी इंजॉय करतो. माझ्या चेह-यावर हसु फूलते, आपणास होत असलेल्या त्रासाबद्दल दिलगीरी व्यक्त करतो.

-दिलीप बिरुटे

Rajesh188's picture

25 Mar 2021 - 5:07 pm | Rajesh188

प्लेग पिसवा पसरवत होत्या त्या वर माणूस नियंत्रण ठेवू शकत नव्हता.
Tb माणसा कडून संक्रमित होतो पण त्या रोगाने जगात कधीच लॉक डाऊन करण्याची वेळ आणली नाही.
आणि टीबी इतका खतरनाक आहे की CORONA त्या समोर अतिशय शुल्लक आहे.
WUHAN मध्ये जेव्हा CORONA व्हायरस धुमाकूळ घालत होता तेव्हा जग चीन ची मज्जा बघत होते.
त्या शहरातील व्हिडिओ चवी नी बघत होते.
तेव्हा मॉडर्न सायन्स चौदाव्या शतकात होते का?
लगेच चीन मधून येणारी सर्व विमान,बोटी,ह्यांना प्रतिबंध का केला नाही .
आणि आश्चर्य ह्या गोष्टी च आहे आज चीन COVID मुक्त आहे आणि जग बाधित.
म्हणजे ठरवून व्हायरस पसरून दिला.
आणि आता मगरीचे आसू .
अमेरिका,ब्रिटन,ब्राझील,भारत फक्त ह्याच देशांच्या डोळ्यात आहेतं

चौकस२१२'s picture

25 Mar 2021 - 6:19 pm | चौकस२१२

हे राम.. "kARONA हे थोतांड " हे अजून चालूच आहे का? मिपावर
त्या ब्राझील छाया बोल्सवर ने पण आपली टोपी फिरवली आहे .. आणि यु ट्यूब वरील जवळच्या पापुआ न्यू गिनी मधील रुग्णांचे व्हिडीओ बघितले, अमेरिकेतील आणि यूरोप मधील पण रुग्णांकचे वाईट अवस्थेचे विडिओ आहेत ..
सद्य सरकारला केवळ विरोध म्हणून असली बे जबाबदार विधाने करणाऱ्यांना एकदा या वॉर्डात पाठवले पाहिजे...वीतभर फाटेल

हारुन शेख's picture

26 Mar 2021 - 12:06 pm | हारुन शेख

मिसळपावची बरीच अधोगती झाली आहे असे दिसते. इथले संपादक झोपा काढत आहेत काय ? महामारीच्या काळात चक्क लसीविषयी गैरसमज पसरवणारं लिखाण इथे महिना झाला तरी प्रकाशित दिसतं आहे. हे जे कोण लेखक आहेत त्यांची वैद्यकीय क्षेत्रातली पात्रता काय आहे ते लेखात अगदी सुरवातीसच लिहिणं आवश्यक आहे अन्यथा या लेखास काडीची किंमत नाही.

रंगीला रतन's picture

26 Mar 2021 - 1:09 pm | रंगीला रतन

१०१% सहमत आहे.

Rajesh188's picture

26 Mar 2021 - 1:30 pm | Rajesh188

जेव्हा covid१९, व्हायरस चीन मध्येच अस्तित्वात होता तेव्हा .
Who झोपा काढत होती.त्या वेळी who नी व्हायरस विषयी जी काही माहिती दिली ती साफ चुकीची होती.
जास्त तापमानात व्हायरस जगू शकत नाही.
हे एक उदाहरण.
तेव्हाच चीन शी संबंध तोडून पूर्ण जगानी चीन ला पूर्ण सहकार्य केले असते तर ही अवस्था झालीच नसती.
संशोधक मंडळी स्वतः च गोंधळलेली आहेत त्यांनाच काही माहीत नाही
.
प्रतेक तासाला संशोधक नवीनच माहिती देत असतात.
आणि हुशार संशोधक लोकांत एकमत पण नाही.
इथे dr हा घटक घेवूच नका.
ते हुकमाचे दावेदार .
नाही तर डिग्री च रद्द होईल ही भीती.
ते स्वतंत्र भूमिका इच्छा असून पण घेवू शकत नाहीये

रंगीला रतन's picture

26 Mar 2021 - 1:51 pm | रंगीला रतन

बरोबर आहे. WHO कडून पुन्हा अशा चुका होऊ नयेत म्हणुन तुमची WHO चे प्रशासकीय अधिकारी पदी नेमणूक करावी असा आदेश मी जागतिक आरोग्य संघटनेला देत आहे.

मुक्त विहारि's picture

26 Mar 2021 - 4:46 pm | मुक्त विहारि

तसेही, WHO ला काय कळतं? असे कुणीतरी म्हटले आहेच...

मोहन's picture

26 Mar 2021 - 5:46 pm | मोहन

१०० % सहमत

सुबोध खरे's picture

27 Mar 2021 - 9:26 am | सुबोध खरे

गेले काही दिवस माझे दोन तीन प्रतिसाद काढून टाकले गेले आहेत.

हा संपादक मंडळाचा अधिकार आहे हे मान्य करूनही ते का काढून टाकले आहेत? याचे किमान स्पष्टीकरण त्यांनी मला दयावे.

इतक्याही सौजन्याची अपेक्षा मी करू नये का

माहितगार's picture

29 Apr 2021 - 12:58 pm | माहितगार

मालक आणि संपादक मंडळाचाच कोविड साथ आणि लस थोतांड आहे असा ठाम विश्वास आहे ? कि ते गोंधळलेले आहेत? , कि गा.पै. आणि तत्सम कॉन्स्पिरसीवादी मंडळींना मिपा विकले गेले आहे ? गेले वर्षभर कोविड अवाजवी संशयखोर षडयंत्रवादी मंडळींचा मिपाकूळ असाच चालू आहे.

डॉ. कुमार कोविडषडयंत्रवादी मंडळींशी वादायलाही जात नाहीत पण स्वतःच्या धाग्यातून लेखन करतात तेव्हा त्यांच्या लेखाचा षडयंत्रवादावर विश्वास नसलेल्या, अवाजवी संशयखोर नसलेल्या मंडळींसाठी दुवा.

रंगीला रतन's picture

29 Apr 2021 - 1:11 pm | रंगीला रतन

उंटावरच्या दिडशहाण्या कॉन्स्पिरसीवादी मंडळींशी वादायला न जण्यातच खरा शहाणपणा आहे

बेंगुताई's picture

30 Apr 2021 - 12:47 pm | बेंगुताई

बिक गयी ये गौरमिंट!

चौथा कोनाडा's picture

9 Apr 2021 - 9:08 pm | चौथा कोनाडा

महाराष्ट्रात लसींचा तुटवडा !
ज्यांना लस हे थोतांड वाटतेय त्यांना चिंते.कारणच नाही !

गामा पैलवान's picture

28 Apr 2021 - 7:19 pm | गामा पैलवान

हारून शेख,

हे जे कोण लेखक आहेत त्यांची वैद्यकीय क्षेत्रातली पात्रता काय आहे ते लेखात अगदी सुरवातीसच लिहिणं आवश्यक आहे अन्यथा या लेखास काडीची किंमत नाही.

लेखास काडीचीही किंमत नसली तरी चालेल. प्रश्न मूळ पुस्तकाचा आहे. ते तर एका नावाजलेल्या तत्ज्ञेनं लिहिलेलं आहे ना? त्याची विश्वासार्हता तपासून पाहायला हवी.

हे काम कोणीच करीत नाहीये. म्हणून तर हा असला लेख लिहावा लागला मला.

आ.न.,
-गा.पै.

अजूनही थोतांडच वाटतं का ?

श्रीगुरुजी's picture

28 Apr 2021 - 11:36 pm | श्रीगुरुजी

कोरोना थोतांड, कोरोनामुळे झालेले मृत्यु थोतांड, कोरोनाची लस थोतांड, कोरोनावरील तज्ज्ञांची मते थोतांड . . . हे अजब तर्कशास्त्र आहे.

श्रीगुरुजी's picture

28 Apr 2021 - 11:42 pm | श्रीगुरुजी
कॉमी's picture

29 Apr 2021 - 7:32 am | कॉमी

बापरे...

गामा पैलवान's picture

29 Apr 2021 - 1:15 pm | गामा पैलवान

श्रीगुरुजी,

करोना जर इतका घातक विषाणू आहे, तर मग त्याची इतकी सांगोपांग चाचणी ( = रिगरस टेस्टिंग ) का करावी लागते?

अमेरिकेत पेनसिल्व्हेनिया येथे असलेले डॉक्टर रवी गोडसे यांचं हे चलचित्र पहा : https://www.lokmat.com/videos/international/watch-video-getting-vaccinat...

तूनळी दुवा : https://youtu.be/6vTQVLCTxoA?t=480

वरील दुव्यात ८ मिनिटांनंतर साधारण मिनिटभरात डॉक्टर म्हणतात की करोना सर्दीसारखाच विषाणू आहे. त्यांनी 'सर्दीची क्रॉस इम्युनिटी' असा शब्दप्रयोग केलाय. म्हणजे करोना सर्दीपडशासारखाच सर्वसामान्य विषाणू आहे. मग त्याचं नाव मृत्यूच्या प्रमाणपत्रावर कसं येतं?

करोना घातक आहे की किरकोळ? काय ठरलं मग?

आ.न.,
-गा.पै.

रवी गोडसे यांचे मत तुम्ही तोडून फोडून मिसरिप्रेसेन्ट केले आहे. कॉमन कोल्ड मुळे आपल्याला क्रॉस प्रोटेक्शन मिळणार इतकेच ते म्हणाले. सर्दीपडशासारखा सर्वसामान्य विषाणू हे तुम्ही स्वतःचे मत देत आहात. हे त्यांचे मत नाही.

त्यांनी "जे रुग्ण आहेत त्यांना प्राण पणाला लावून वाचवू" असे किमान दोन वेळा म्हणले आहे. २०-३० कोटी लोकांना लस देऊ असे म्हणून त्यांनी लस या तंत्रज्ञानावरचा विश्वास दाखवला आहे. कोव्हाक्सिन पेक्षा कोव्हिशिल्ड चांगली आणि वयस्कर लोकांनी कोव्हिशिल्ड घ्यावी असे हि त्यांनी रेकमंडेशन दिले आहे. तुम्ही तुम्हाला हवे तितकेच चेरी पीक करून तेवढेच वाक्य टंकले आहे. गोडसे डॉक्टर पदोपदी किती टक्के संरक्षण, गंभीर आजारांपासून संरक्षण वैगेरे बोलत होते.

श्रीगुरुजी's picture

29 Apr 2021 - 2:34 pm | श्रीगुरुजी

असल्या मतांकडे संपूर्ण दुर्लक्ष करावे.

गामा पैलवान's picture

30 Apr 2021 - 1:39 am | गामा पैलवान

कॉमी,

सर्दीपडशासारखा सर्वसामान्य विषाणू हे तुम्ही स्वतःचे मत देत आहात. हे त्यांचे मत नाही.

करोनाशी लढायला नैसर्गिक प्रतिकारशक्ती उपलब्ध आहे. डॉक्टर रवी गोडसे यांचा संदर्भ फक्त याचसाठी दिला होता. मला स्वत:ला माझी स्वत:ची नैसर्गिक प्रतिकारशक्ती वाढवायला आवडेल. मला लस वगैरे टोचून घ्यायची नाहीये.

बाकी, करोना हा सर्दीपडशासारखा आहे की नाहीये ते माझी प्रतिकारशक्ती ठरवेल.

आ.न.,
-गा.पै.

हे मत.

बेंगुताई's picture

30 Apr 2021 - 12:52 pm | बेंगुताई

एकाच घरातील दोन भाऊ सारखे'च'. ('च' महत्वाचा) वागतील ही अपेक्षाचं मुळी चुकीची!

कोविड हे थोतांड नसून शंभर टक्के वस्तुस्थिती असली तरी मिपावर त्याबद्दल उलटसुलट चर्चा व्हायला कुणाचीही हरकत नसावी. धागा न वाचण्याचा पर्याय उपलब्ध आहेच.

चौकस२१२'s picture

30 Apr 2021 - 7:41 am | चौकस२१२

उलट सुलट चर्चच होत आहेच, तो प्रश्न नाही पण चक्क थोतांड असे कोणी भिरकावून देणे हे कितपत योग्य आहे? हे पूर्ण बेजाबदार पणाचे आणि खोडसाळ विधान आहे आणि घातक पण

अमर विश्वास's picture

30 Apr 2021 - 9:13 am | अमर विश्वास

नुसते खोडसाळ विधान नाही तर त्याचे लंगडे समर्थन ही करायचा प्रयत्न आहे ...

बाकी असली विधाने करणाऱ्यांनी लहानपणी पोलिओ / BCG इत्यादी लसी घेतल्याच असतील .. आणि आपल्या पुढल्या पिढीलाही दिल्याच असतील

गुल्लू दादा's picture

30 Apr 2021 - 10:48 am | गुल्लू दादा

पुस्तकाच्या लेखिका आणि या लेखाचे लेखक यांच्या मताचा पूर्ण आदर आहेच. दोघांनी जसे मत/ संशोधन मांडले तसा मला सुद्धा माझे मत मांडायचा अधिकार असावा, नाही खरे साहेबांचे प्रतिसाद उडवले म्हणून म्हंटल. इथे मांडत असलेले विचार संपूर्ण माझे असून ते अनुभवावर आधारित आहेत लगेच पुरावे मागू नयेत. 'जपनाम' करणाऱ्या भक्तांची सेवा करून थकल्यामुळे जास्ती प्रतिवाद सुद्धा करण्याची इच्छा नाहीये. ज्यांना आधुनिक संशोधनावर विश्वास नाही त्यांनी समोर वाचूच नये, उगा मत परिवर्तन झाले तर अवघड व्हायचं.
तर विषय असा आहे की मी संपूर्ण आधुनिक संशोधनाला मानणारा माणूस आहे. विज्ञान जे पुराव्यानिशी सांगेल ती पूर्व दिशा माझ्यासाठी. कारण त्यापेक्षा अजून विश्वासार्ह मला दुसरी पद्धत सापडली नाहीये. ज्या दिवशी ती सापडेल त्या दिवशी मी विज्ञानाचा हात सोडून देईल. पुस्तक लिहिणाऱ्या लेखिकेचे मत खोडायला मी आलो नाहीये. त्यांनी एक बाजू मांडलीये अजून बऱ्याच बाजू आहेत त्यावरही बरेच संशोधन झालंय. 'लस फालतू आहे' असं म्हणणे हे सुद्धा साफ चूक आहे. फक्त करोना संबंधी नाहीये. विज्ञान कधीच कोणावर जबरदस्ती लादत नाही. लस घ्यायची का नाही ज्याचा त्याचा प्रश्न आहे, त्याला शासनकर्ते जबरदस्ती करू शकतात संशोधनाला दोष देऊन फायदा काय? पुराव्यानिशी सगळ्या गोष्टी समोर असताना त्याला विरोध याला काय म्हणायचं? मानवी स्वभावानुसार ज्याने नकारात्मक लिहिलं त्याकडे आपण लगेचच आकर्षित होतो. माझे दोन मित्र आहेत माझ्याकडेच येतात उपचारासाठी. एकाला अंडे खाल्ले की आणि दुसऱ्याला गोडम्बी खाल्ली की अंगावर पुरळ येते. मग आता अंडे आणि इतर अन्नपदार्थ अलोपॅथीचा भाग म्हणून दुर्लक्षित करायचे का. जास्ती जेवण झालं तरी अपचन होते, ते पण अलोपॅथीच हो ना. कारण त्याने दुष्परिणाम होतात.
आपले शरीर बहुसंख्य गोष्टींना परकीय समजते. त्यांचा शरीरात शिरकाव झाला की त्याला विरोध दर्शवते. लस सुद्धा परकीय त्याला सुद्धा विरोध दर्शवणार. विरोध कधी सौम्य असेल कधी तीव्र. पण जास्तीत जास्त सौम्य. मग घाबरायचं कशाला. आता पर्यंत करोडो लोकांनी लस घेतली तुमच्या ओळखीपैकी कोणाला तीव्र आजार झालाय, अगदी तुरळक. उगाच बाऊ करून सुद्धा उपयोग नाही ना. राहिला प्रश्न लसीच्या उपयोगीतेचा. सध्या जीव वाचणे महत्वाचे. ज्यांनी करोना लस घेतलीये (2 डोस पूर्ण) त्यांच्यात श्वसन आजार तीव्र स्वरूपाचे निदर्शनास आले नाहीत. अर्थात याला अपवाद आहेतच पण त्याला काही अटी आहेत. तुम्ही धूम्रपान करत असाल किंवा फक्त 1 डोस घेतला असेल, इतर व्यसन, ऍलर्जी, बरेच कारणे आहेत.
आमच्या बाजूला एक काका राहतात त्यांच्या दोन्ही आजोबांना (आईकडील आणि वडिलांकडील) थोड्या अंतराने करोना झाला. दोघांची गाव वेगळी, इतर सगळं वेगळं. एकाच वय 65 तर एकाच 68. 68 वाले धुम्रपान करायचे आणि सोबत मधुमेह सुद्धा. 68 वाले लस घेऊन आले होते. रिस्क फॅक्टर असताना सुद्धा ते वाचले. आणि 65 वाले करोना वगैरे काही नाही (थोतांड आहे) म्हणणारे 'जपनाम' करायला सर्रास भजनी मंडळात जाऊन देवाची आराधना करू लागले. फणाणून ताप आला तरी हेक्कड म्हातारं गावाकडच्या आयुर्वेदिक शिकून अलोपॅथीवर गुजराण करणाऱ्या डॉ. शिवाय कुठेच गेलं नाही. शेवटी म्हाताऱ्याची लाकडं स्मशानात न्यावी लागली. लस घ्यायची का नाही ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण आपल्या परिवारासाठी तरी एकदा अवश्य विचार करा. जवान जवान पोर जाताना स्वतः पाहतोय. अर्थात रिस्क फॅक्टर असतोच त्यांना.संख्या कमी असली तरी मरत आहेत ही वस्तुस्थिती आहे. लस चा व्यापार, अडवणूक हे सगळं वेगळं गणित आहे. त्याचा आणि सर्रास लस फालतू आहे किंवा आता पर्यंतच्या लसी बिनकामी होत्या अस म्हणणं कितपत योग्य आहे. ज्यांनी अलोपॅथीचा अभ्यास केलाय त्यांनीच प्रॅक्टिस केली असती तर अलोपॅथीचे इतके दुष्परिणाम पाहायला मिळाले नसते (अर्थात हा वेगळा विषय आहे पण मला या बद्दल प्रचंड चीड आहे म्हणून लिहिलंय). जे दुष्परिणाम करू शकते त्याचा योग्य वापर केल्यास तेच परिणामकारक पण ठरेल. बाकी ज्या दुष्परिणाम करत नाहीत त्या किती परिणामकारक ठरतील हा सुद्धा लक्षात घेण्यासारखा विषय आहे (आणि दुष्परिणाम होतात की नाही हे ठरवण्यापत संशोधन होतंय का त्या पॅथी मध्ये हे सुद्धा बघावं लागेल ना. दोन पॅथी सोबत चालू असताना झालेला दुष्परिणाम अगदी सहज अलोपॅथी वर लोटला जातो. अलोपॅथी चे दुष्परिणाम जग जाहीर आहेत कारण त्यावर तेवढं संशोधन दिवसरात्र चालू असत.आपलं औषध म्हणून डोळे झाकून चांगलं म्हणणं आपल्याला नाही बुवा पटत. एकदा वेळ मिळाला की या विषयावर खणखणीत शॉट मारायचाय आपल्याला;)). बाकीच्या पॅथी वर प्रतिक्रिया देण्याचा मला काहीही अधिकार नक्कीच नाही. पण मी शेवट पर्यंत आधुनिक विज्ञानाची साथ सोडणार नाही जो पर्यंत ते मला पुरावे देत राहणार. बाकी कोणाचे मन दुखावण्याचा हेतू नाही. काही प्रतिक्रिया वाचून आपली पण एक जोडून टाकावी म्हणून गडबड मध्ये केलेला हा खटाटोप.

चौथा कोनाडा's picture

30 Apr 2021 - 1:00 pm | चौथा कोनाडा

पोटतिडिकेने लिहिलेले आवडले.

बेंगुताई's picture

30 Apr 2021 - 1:01 pm | बेंगुताई

पटतंय.लसीकरण हाच एकमेव मार्ग आहे तिसऱ्या लाटेत जर नौका उतरवयाच्या नसतील तर...

आग्या१९९०'s picture

30 Apr 2021 - 11:53 am | आग्या१९९०

ॲलोपथीची प्रॅक्टीस इतर पॅथीच्या वैद्यांना करण्यास मनाई असावी. ॲन्टीबायोटीक आणि पेनकिलरचा कसलाही अभ्यास नसताना बिनधास्त वापर करताना आढळतात.

बेंगुताई's picture

30 Apr 2021 - 1:22 pm | बेंगुताई

यापुढे साल्कच्या लशीमुळे उत्पन्न झालेली कटर नामे कुप्रसिद्ध रोगाची साथ वर्णिलेली आहे. यांत लशीतल्या जिवंत विषाणूमुळे

साल्क मध्ये खरचं जिवंत विषाणू असतो का? कृपया माहिती देताना अचूक द्यावी.आपला वाचक वर्ग फार मोठा आहे हो पहिलेच ढ विद्यार्थ्यांची संख्या जास्त!

बेंगुताई,

हम्फ्रीज डॉक्टरबाईंचं मूळ इंग्रजी पुस्तक उघडून बघितलं. त्यात लिहिलंय की जोनास साल्कने चाचणी केल्यापैकी पाच गटांतला विषाणू निष्क्रिय केला होता. मात्र सहाव्या गोटाचा निकाल राखून ठेवला होता. त्यावर डॉक्टर पॉल मे(ई)यर यांनी भाष्य केलं आहे. ते म्हणतात की सल्लागार समिती नेमण्यात आली खरी, पण सहाव्या गोटाचा विषय चर्चेस आला की मतभेद व्यक्त करणाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला जाई. आणि समिती पुनर्गठीत करण्यात येत असे.

पॉल ऑफिट हा लशीतून भरगच्च नफा कमावणारा उद्योगपती आहे. त्याने लिहिलेल्या पुस्तकात हा प्रसंग सविस्तरपणे वर्णिलेला आहे. मी ते पुस्तक वाचलेलं नाही. पण त्यातलं एक वाक्य डॉक्टर हम्फ्रीज आपल्या पुस्तकात उद्धृत करतात : …the disease caused by Cutter’s vaccine was worse than the disease caused by natural polio virus.

याचा मागोवा घ्यायला The Cutter Incident वर गूगल केलं की बरेच निकाल दिसतात. त्यापैकी एक : https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC1383764/

विषाणू निष्क्रिय करण्यात गंभीर त्रुटी राहून गेल्या होत्या. त्यामुळे पोलियोच्या विषाणूपासून संरक्षण मिळणं दूरंच राहो, उलट पोलियो रोगाला बालकं बळी पडली.

बाकी, 'ढ' विद्यार्थ्यांचं म्हणाल तर मीही या विषयात 'ढ'च आहे. माझ्याकडे कोणतीही खास माहिती नाही व मला या क्षेत्राचा तत्ज्ञ म्हणून कसलाही अनुभव नाही. मात्र रोगी म्हणून बऱ्यापैकी अनुभव आहे.

आ.न.,
-गा.पै.

आ.न.,
-गा.पै.

गामा पैलवान's picture

1 May 2021 - 3:16 am | गामा पैलवान

चौकस२१२,

पण चक्क थोतांड असे कोणी भिरकावून देणे हे कितपत योग्य आहे? हे पूर्ण बेजाबदार पणाचे आणि खोडसाळ विधान आहे आणि घातक पण

थोतांड आहे म्हणूनंच ते प्राणघातक आहे. प्राणघातक नसतं तर मी आजिबात लक्ष दिलं नसतं.

मला हृदयविकार आहे. समजा मी भारतातल्या एखाद्या इस्पितळात दाखल झालो. माझी कोविड चाचणी केली. त्यात करोना सापडला. मग माझ्या हृदयविकारावर उपचार करण्याऐवजी जर कुठली औषधं करोनाच्या नावाखाली टोचीत बसले डॉक्टरलोकं तर मी काय कपाळ बडवून घेऊ ? आणि मेलो की माझ्या मुडद्यावर करोनाचा छाप मारायला सगळे तातडीने धावतील.

रोहित सरदाना हे ज्येष्ठ पत्रकार हृदयविकाराच्या धक्क्याने वारले आणि चर्चा कसली चाललीये तर त्यांना करोना असल्याची. कुणाचा पायपोस कुणाच्या पायांत आहे? माझ्यासारखे असंख्य रुग्ण आज भारतात आहेत. त्यांत हृदयविकारीच नाही तर इतर गंभीर व्याधी असलेलेही आहेत. त्यांच्यावर यथोचित उपचार कोण करणार? करोनाचं थोतांड माजवलंय म्हणून त्यांचे जीव धोक्यात आहेत हे दिसंत नाही का डॉक्टरांना? ते थोतांड कोण आवरणार?

आ.न.,
-गा.पै.

गुल्लू दादा's picture

1 May 2021 - 4:25 am | गुल्लू दादा

तुम्ही इतका करोनाचा अभ्यास केलात तरी या विषयात 'ढ' च राहिलात बुवा. आणि 'ढ' विद्यार्थ्यांचं कसं असतं ना त्याला गाढव शिकवलं तरी ते डुक्करच म्हणत त्यामुळे तुमच्या बाबतीत तरी आपला पास. कसयं ना साहेब तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील पण त्यासाठी तुम्हाला तुमचा मुलगा/मुलगी, नात/नातू किंवा अतिशय विश्वासू व्यक्तीला मेरिटवर शासकीय वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून प्रशासकीय सेवेत दाखल करावं लागेल. उगा दूरदेशी राहून, भरपूर वेळ आहे म्हणून 100 वर्ष जुन्या पुस्तकाचे संदर्भ देत आताच्या परिस्थितीचे गूगल बाबाच्या मदतीचे अवलोकन करत बसू नये. सद्य परिस्थिती ही अवघ्या मानवजातीत कधीच अनुभवली नव्हती त्या मुले जुने संदर्भ इथे लागू पडायचे नाहीत. बरंच काही आहे पण कसंयं ना जेव्हा हेक्कड लोक त्यांचे नातेवाईक अंतिम टप्प्यात रुग्णालयात त्यांच्या मर्जी विरुद्ध रुग्णालयात दाखल करतात ना त्यांच्यावर पण आम्ही हसत उपचार करतो. :)

बेंगुताई's picture

1 May 2021 - 12:09 pm | बेंगुताई

त्यासाठी तुम्हाला तुमचा मुलगा/मुलगी, नात/नातू किंवा अतिशय विश्वासू व्यक्तीला मेरिटवर शासकीय वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून प्रशासकीय सेवेत दाखल करावं लागेल.

कदाचित इथंच घोळ दिसतोय. कोणाला तरी govt सीट भेटलीली नाहीये बहुधा. त्यामुळेच डॉक्टरला बदनाम करण्याचा हा प्रपंच.
पैलवान क्या जाणे सीट का स्वाद!!!

बेंगुताई's picture

1 May 2021 - 11:41 am | बेंगुताई

मग माझ्या हृदयविकारावर उपचार करण्याऐवजी जर कुठली औषधं करोनाच्या नावाखाली टोचीत बसले डॉक्टरलोकं तर मी काय कपाळ बडवून घेऊ ?

सायटोकाईन स्टॉर्म का नाम सुने हो कभी जिंदगी मे?
हह आला मोठा पैलवान!

कधी आलीच अशी परिस्थिती तर घरीच (च) जपनाम करत बसू नका पैलवान साहेब. आणि हो पुढच्या तासाला जरा थोडा अभ्यास करून या. किती दिवस अजून एकाच वर्गात बसणार?

गामा पैलवान's picture

1 May 2021 - 3:22 pm | गामा पैलवान

बेंगुताई,

१.

सायटोकाईन स्टॉर्म का नाम सुने हो कभी जिंदगी मे?

नाही. म्हणून सर्च मारला. तर ही संज्ञा ओळखीची निघाली. थोडक्यात सांगायचं तर हे लक्षण म्हणजे शरीराच्या रक्षायंत्रणेत उद्भवलेली यादवी. सोप्या शब्दांत वर्णन करायचं झालं तर रक्षायंत्रणेचा एक भाग दुसऱ्या भागावर हल्ला करतो असं म्हणता येईल.

करोनाच्या तथाकथित उपचारांतनं नेमकी हीच यादवी माजंत नसेल हे कशावरनं?

२.

आला मोठा पैलवान!

इथे पैलवानकीचा संबंध नाही. कालंच पस्तिशीचा तरुण असलेला जगदीश लाड हा शरीनसौष्ठवकार अचानक वारला. सांगायचा मुद्दा काय की तुम्ही पैलवान जरी असलात तरी करोनाकेंद्रावर आजीबात दाखल व्हायचं नाही.

आ.न.,
-गा.पै.

बेंगुताई's picture

1 May 2021 - 3:42 pm | बेंगुताई

आपली मतं या विषयावर जुळत नाहीत. निदान आमच्या सारख्या प्रामाणिक काम करणाऱ्या डॉक्टरांना बदनाम करू नका.असो मला नाही वाटत की तुमच्या विचारसरणीत काही बदल घडेल. हे संभाषण पुढे वाढवण्यात काडीचाही रस नाही.

आ.न.
बेंगुताई

गामा पैलवान's picture

2 May 2021 - 11:09 pm | गामा पैलवान

बेंगुताई,

तुम्ही प्रामाणिक आहात याविषयी मला कसलीही शंका नाही. पण तुम्ही ज्यावर विसंबून औषध देता ती यंत्रणा कितपत विश्वासार्ह आहे? प्रोग्रामिंग मध्ये सुरक्षेत chain of trust अशी एक संकल्पना आहे. संगणक, स्मार्टफोन वा ल्यापटाप चं बूटिंग सुरु होतं त्याच्या आधीपासनं ही विश्वासदर्शक साखळी सुरु होते. ही जर का खंडित झाल्याचा संशय जरी आला तरी बूटिंग थांबवलं जातं आणि एरर मेसेज दाखवून मशीन थंड पडतं. करोनाच्या लशीच्या बाबतीत तर प्राणांशी गाठ आहे. जरा जरी विश्वास डळमळला तर लोकं लस नाकारणार.

लसीकरण गेल्या २५०+ वर्षापासून चालंत आलेलं आहे. त्यालाही इतिहास आहे आणि तो काळाकुट्ट आहे. हे लक्षांत कोणी घ्यायचं? कोण्या एका डॉक्टरबाईंनी हा इतिहास जगासमोर मांडला तर ते पुस्तक कोणी वाचायचं?

तुमचे एक व्यवसायबंधू आहेत. त्यांना इतरत्र कायप्पा समूहावर मी स्पष्ट शब्दांत विचारलं की तुम्ही हे पुस्तक वाचून खरंखोटं करणार का. तर ते नाही म्हणतात. त्यांच्या मते हे पुस्तक म्हणजे कोण्या सोम्यागोम्याच्या सपाट पृथ्वीच्या समजासारखं आहे. कुण्या लुंग्यासुंग्याने लिहिलेल्या पुस्तकावर मी माझा वेळ कशाला घालवू, असं म्हणाले. अशा वेळेस माझ्यासारख्या अवैद्यकीय माणसालाच ते वाचावं लागणार ना?

लशीकरणाची दुसरी बाजू कोणी जगासमोर आणायची? डॉक्टरांनी? की माझ्यासारख्या सामान्य माणसांनी?

आ.न.,
-गा.पै.

रात्रीचे चांदणे's picture

1 May 2021 - 8:17 am | रात्रीचे चांदणे

दुर्दैवाने बरेच लोक गा. पै यांच्या विचारांशी सहमत आहेत. माझ्या गावात करोना झाला तरी हॉस्पिटलमध्ये जाण्याचे टाळले जाते. कारण काय तर डॉक्टर इंजेकशन देऊन मारून टाकतात आणि त्यातून डॉक्टरांना दीड लाख मिळतात.
बरेच डॉक्टर रेमडीसीविर जास्त काय कामाचे नाही आसे म्हणत आहेत आणि त्यांनी रेमडीसीविर ला स्वस्त पर्याय ही सांगितला आहे, मग समजत नाही की कोविड चे डॉक्टर रेमडीसीविर च आणण्याचा आग्रह का करत आहेत. माझ्या दूरच्या नात्यातील एक जण करोना झाल्या मुळे कोरोना सेंटर मध्ये होता, तब्बेत अतिशय ठणठणीत होती पण अचानक वारला, डॉक्टर म्हणाले की अचानक हार्ट अटक आला अर्थातच प्रेत मिळले नाही पण मृत्यू मात्र करोना ने मेलेल्यांच्या संख्येतच धरला गेला.

बेंगुताई's picture

1 May 2021 - 11:58 am | बेंगुताई

बरेच डॉक्टर रेमडीसीविर जास्त काय कामाचे नाही आसे म्हणत आहेत आणि त्यांनी रेमडीसीविर ला स्वस्त पर्याय ही सांगितला आहे, मग समजत नाही की कोविड चे डॉक्टर रेमडीसीविर च आणण्याचा आग्रह का करत आहेत.

रेमडेसीविर ची मागणी ही मुळातच पेशंट कडून वाढत आहे.(जो तो स्वतहाला डॉक्टर समजतो आहे ) आमच्या पेशंट ला ते इंजेक्शन दिलय का? द्या मग लिहून नाहीतर खा मार.(स्वतःच्या अनुभवावरून)

remdesivir हे काय जादुई औषध नाही.ते एक antiviral आहे ज्याचा उपयोग फक्त पहिल्या 2-7 दिवसांमध्ये गुणकारी ठरतो viral load कमी करण्यासाठी.जीव वाचवण्यात त्याचा हातभार आहे (पहिल्या काही दिवसात) पण याने जीव वाचतोच हे चुकीचे आहे.
त्यामुळेच AIIMS ने पण हे औषध आता नियमवाली मधून काढून टाकले आहे.

https://youtu.be/-l-5KhOvRIg
हे एकदा बघा.

कॉमी's picture

1 May 2021 - 7:15 pm | कॉमी

मग फॅबीफ्ल्यू हे रेमिडीसीव्हीर चे अल्टरनेटिव्ह आहे काय ?

गामा पैलवान's picture

1 May 2021 - 3:13 pm | गामा पैलवान

रात्रीचे चांदणे,

हे दुर्दैव नसून सुदैव आहे. वस्तुस्थिती अशीये की करोनाच्या नावाखाली भलतेच उपचार सुरु आहेत. आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी अशी परिस्थिती आहे. गावाकडले लोकं शहाणे आहेत. फक्त त्यांना त्यांचा शहाणपणा व्यवस्थित शब्दांत मांडता येत नाही.

ठणठणीत तब्ब्येत असेलला माणूस अचानक म्हणे करोनाने अचानक मरतो. यावरनं काय ओळखायचंय ते ओळखा. बाकी काय सांगायचं. आपण सुज्ञ आहात.

आ.न.,
-गा.पै.

अमर विश्वास's picture

1 May 2021 - 4:45 pm | अमर विश्वास

वस्तुस्थिती अशीये की करोनाच्या नावाखाली भलतेच उपचार सुरु आहेत >>>>

हा लेख आणि लेखकाची मते हेच एक थोतांड आहे .

मला आता स्वानुभवावरून या सगळ्या करोना प्रकरणात प्रचंड घपलेबाजी आहे याची खात्री पटत चालली आहे. मला लस घेऊनही पुन्हा बाधा झालेली आहे परंतु मी कोणतेही औषध न घेता नक्की बरा होणार याची खात्री आहे.

रात्रीचे चांदणे's picture

1 May 2021 - 6:56 pm | रात्रीचे चांदणे

कोविड ची चाचणी न करताही तुम्हला कोरोना झालेलाच आहे असा निष्कर्ष कसा काय काढला? तसही लस घेतल्या नंतरही कोरोना होऊ शकतो आस भारतात तरी सांगितले आहे.

कोविड असेल किंवा नसेलही पण त्यावर औषध नाहीच तर चाचणी करून तरी काय उपयोग ? शिवाय या चाचण्या सुमारे ६०-७० टक्केच बरोबर येतात म्हणे. हे एक कारण.
दुसरे म्हणजे इथे कुठेही बाहेर जायचे म्हणजे सर्वस्वी मुलावर अवलंबून रहावे लागते. त्याला मुद्दाम सुट्टी घेणे वगैरे करावे लागते.

चौकस२१२'s picture

4 May 2021 - 6:29 am | चौकस२१२

शिवाय या चाचण्या सुमारे ६०-७० टक्केच बरोबर येतात म्हणे. हे एक कारण.
चित्रगुप्त साहेब पण हे आपण म्हणत ते जर खरे असते तर इथे अनेक ओरामनात रोगबाधा दिसली असती
लोकसंख्येच्या मानाने ऑस्ट्रेल्यात चाचण्यांचे प्रमाण खूप वरती आहे बर येथे करा चाचणी आणि काडः पैसे हा प्रकार नाही ( नसावं फारसे ) कारण इंग्लंड सरकेचे राष्ट्रीय मेडिकेर मग जर चाचण्या बेभरंवशाचाच्या असत्या तर येथे पण त्यायून मृत्यू बरेच झाले असते कि हो?
आपण आजार मुळे वैतागलेले असाल हे समजते पण एकदम थोडांत आहे च्या "कॉन्स्पिरसी थेअरी पक्षात" बसलात ? जरा आश्चर्य वाटले
कृपया काळजी घ्या

चित्रगुप्त's picture

4 May 2021 - 6:56 am | चित्रगुप्त

खोकला वगैरे कमी होतो आहे. इथे लस घेतली की वरुन पाच डॉलर्स दक्षिणा पण मिळते आहे. तरीपण बरेच लोक - विशेषतः कृष्णवर्णीय- घेत नाहीयेत असे पण समजते. काय कारण ते ठाऊक नाही. आपल्या आपुलकीबद्दल अनेक आभार.

कॉमी's picture

2 May 2021 - 7:55 am | कॉमी

गामा पैलवान,

कोव्हिड पॉझिटिव्ह रिपोर्ट आला, घरीच होते कारण बरं वाटत होत.
अचानक रात्री श्वास घेताना त्रास होऊ लागला.
रात्रीतून गेले.

असे आजच एक उदाहरण (सो टू से) पाहिले आहे.
इथे सायटोस्टोर्म चा आडोसा नाही, कारण औषधं नव्हतीच.
मग काय झाले असावे ? इथे सिमिंगली निरोगी आणि पन्नाशीचा व्यक्ती.

गामा पैलवान's picture

2 May 2021 - 11:13 pm | गामा पैलवान

कॉमी,

प्रत्येक मृत्यूवर ( तेही ऐकीव ) भाष्य करणं मला अशक्य आहे. मयतास कोविड केंद्राचा भरवसा वाटला पाहिजे. केवळ केंद्राचाच नाही तर त्यासोबाज औषधांचा आणि डॉक्टरांचाही. तो वाढवा यासाठी कोणी कसली पावलं उचलली आहेत?

आ.न.,
-गा.पै.

मराठी_माणूस's picture

3 May 2021 - 10:46 am | मराठी_माणूस

अतिशय महत्वाचा मुद्दा

गामा पैलवान's picture

3 May 2021 - 2:02 pm | गामा पैलवान

चित्रगुप्त,

मला आता स्वानुभवावरून या सगळ्या करोना प्रकरणात प्रचंड घपलेबाजी आहे याची खात्री पटत चालली आहे.

तुमचा अनुभव विदित केल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही लस घेतली तेव्हा तांत्रिकदृष्ट्या तुम्ही एका चाचणीत सहभागी झालेले होतात. मात्र हे तुम्हांस कोणी स्पष्टपणे सांगितलं नाही. ही तुमची फसवणूक आहे.

अमेरिकेतल्या तुमच्यासारख्या सुशिक्षितास बेमालूमपणे बनवण्यात येतं. भारतात मोठ्या प्रमाणावर असलेल्या अ(र्ध)साक्षर जनतेचं तर विचारायला नको.

आ.न.,
-गा.पै.

चौकस२१२'s picture

4 May 2021 - 7:48 am | चौकस२१२

अमेरिकेतल्या तुमच्यासारख्या सुशिक्षितास बेमालूमपणे बनवण्यात येतं
नक्की कसा काय गंडवला?
"लस" या उपयाचा शोध अनेक वर्षे झाली... ती एफडी एफ दि ए च्या चाचणीतून गेली मग दिली गेली .. चित्रगुप्त काही लसीच्या प्राथमिक चाचणी सहभागी झालेलं नाहीयेत !

लसीकरणाचे त्यातील फायदे तोटे दोन्ही आहेत ... कोण्ही शास्त्रन्या वैद्य फक्त फायदे आहेत असे म्हणत नाही तुम्ही मात्र थोतांड म्हणून ठोकून देता ..

बर गेला बाजार त्या क्षेत्रातील मान्यवर असतात तर निदान ऐकले तरी असते ..
लसहीचे अर्थ आणि राजकारण यावर भाष्य आणि टीका करा जरूर हवे तर .. पण भारतातात जे घडते त्यावर बेतून अख्या जगातील लोक उल्लू बनले असे भासवणे ... हा एक मंत्रचळे पणा दिसतोय !

गामा पैलवान's picture

4 May 2021 - 7:02 pm | गामा पैलवान

चौकस२१२,

१.

"लस" या उपयाचा शोध अनेक वर्षे झाली... ती एफडी एफ दि ए च्या चाचणीतून गेली मग दिली गेली

लस हा उपाय जुनाच असला तरी करोनाची लस हा प्रकार नवीनंच आहे. इतक्या नवीन ल्शीवर FDA ने खात्रीलायक ठराव्यात अशा नेमक्या कोणत्या चाचण्या केल्या होत्या?

२.

चित्रगुप्त काही लसीच्या प्राथमिक चाचणी सहभागी झालेलं नाहीयेत !

ही सुस्थापित लस नाही. ही अजूनही प्रायोगिक अवस्थेतच आहे. कारण की करोना हा नवीन रोगजंतू आहे. ही लस प्रायोगिक अवस्थेत ( experimental phase मध्ये ) आहे याची पूर्ण कल्पना चित्रगुप्त यांना दिलेली होती का? मला वाटतं नसावी. तशी दिली नसेल तर चित्रगुप्त यांना सरळ फसवण्यात आलं आहे.

३.

कोण्ही शास्त्रन्या वैद्य फक्त फायदे आहेत असे म्हणत नाही तुम्ही मात्र थोतांड म्हणून ठोकून देता ..

मग जे तोटे आहेत ते कोणी लोकांसमोर मांडायचे? शास्त्रज्ञ वैद्य मांडताहेत का? नाही ना? मग लशीस थोतांडच मानणार. करण की असं मानणं माझ्यासाठी सुरक्षित आहे.

४.

बर गेला बाजार त्या क्षेत्रातील मान्यवर असतात तर निदान ऐकले तरी असते ..

या क्षेत्रातले काही मान्यवर तर लशीकरणास दुसरी बाजू आहे हे मुळी मानायलाच तयार नाहीत. त्यांच्या शिक्षण व अनुभवाविषयी मूलभूत प्रश्न उपस्थित होतात ना. जोवर खुली चर्चा होत नाही तोवर तुम्हांस माझ्यासारखे अवैद्यकीय भाष्यकार सहन करावे लागणार.

आ.न.,
-गा.पै.

चौकस२१२'s picture

5 May 2021 - 4:53 am | चौकस२१२

गा.पै.
रोग नवीन आहे, लस नवीन आहे त्यामुळे त्यामुळे लस एफडीए ने लवकर काळजी ना घेता मान्यता दिली असे आपले म्हणणे आहे असे दिसतंय !

कि मुळात लास या प्रकारालाच विरोध आहे? ( कारण कोणतीच लस नको असे विचार करणारे लोक या भूतलावर आहेत ) नक्क्की काय?

लसीचे तोटे असणार... जसे कोणत्याही लसीचे असतात आणि "त्याबद्दल गुप्तता पाळली गेली आणि लोकांना गंडवले" असे आपले म्हणणे असेल तर तो फार मोठा दावा ठरेल !
आरौग्य तंज्ञांनी याचा सारासार विचार करूनच "काहीच ना करण्यापेक्षा हि लस देण्याततीळ धोके पत्करणे बरे" असा सल्ला सरकार ला दिला असणार

लस म्हणजे थोतांड या आपल्या दाव्याचा हा अर्थ निघतो कि
अब्जावधी रुपायनाचा/ युरोंचा व्यवहार सांभाळणारी जगातील सर्वप्रकारची सरकारे आपापल्या "सार्वजनिक आरोग्य" खाते , महाविद्यालयातील संशोधक आणि इतर शास्त्रन्य यांचं सल्ल्यानुसार वागत आहेत ती सर्व गंडली गेली आहेत !

मला आठवतंय ( चूक असू शकेल) त्याप्रमाणे गामा पैलवान आपला हा मूळ दावा होता कि
- हा रोगचं थोतांड आहे!
आत फक्त लस थोतांड असे म्हणताय का? नक्की काय
गोल पोस्ट बदलू नका

असो जे काही असेल , आपण अशी आशा करू की कोण्ही नागरिक आपापल्या देशातील मान्यवर वैद्यकीय सालगरांचे ऐकतील ... अश्या स्वैर दाव्यावर वर अवलंबून राहणार नाहीत

चित्रगुप्त's picture

3 May 2021 - 10:22 pm | चित्रगुप्त

घरीच चाचणी करण्यासाठी आवश्यक साधन मुलगा आणणार आहे. ती केल्यावर पुन्हा लिहीन.

माननीय संपादक,

नुकताच खरे डॉक्टर यांचा एक संदेश वाचला. ते म्हणतात की :

गेले काही दिवस माझे दोन तीन प्रतिसाद काढून टाकले गेले आहेत.

हे खरंय का? बहुतेक खरं दिसतंय.

माझी विनंती आहे की ते प्रतिसाद सत्वर खुले करावेत. सांगोपांग चर्चेसाठी ते उपयोगी असावेत अशी माझी अटकळ आहे. अर्थात अंतिम निर्णय तुमचाच आहे.

आ.न.,
-गा.पै.

गामा पैलवान's picture

6 May 2021 - 2:09 am | गामा पैलवान

चौकस२१२,

तुमचा इथला संदेश वाचला. माझी मतं सांगतो.

१.

आपला हा मूळ दावा होता कि
- हा रोगचं थोतांड आहे!
आत फक्त लस थोतांड असे म्हणताय का? नक्की काय
गोल पोस्ट बदलू नका

गोल पोस्ट बदलणं साहजिक आहे. कारण की रोग नामे एका थोतांडातनं लस नामे दुसरं थोतांड उत्पन्न होतंय. दुसरं थोतांड पहिल्यापेक्षा अधिक प्राणघातक ठरण्याची शक्यता आहे.

सर्दीपडशावर कोणी लस काढंत नसतं. म्हणून करोनाचे बेडकी प्रमाणाबाहेर फुगवण्यात आली. पंतप्रधानांच्या मनकी बात मध्ये मोदींशी संवाद साधणारे मुंबईचे डॉक्टर शशांक जोशी उघडपणे म्हणतात की ८० % ते ९० % लोकांना लक्षणंच नसतात. संदर्भ ( इंग्रजी दुवा ) : https://www.hindustantimes.com/india-news/dont-panic-don-t-rush-after-re...

करोना हा खरंच इतका घातक आहे का? की तसं चित्रं उभं केलं गेलंय? यामागे कारण आहे. ते म्हणजे गलेलठ्ठ औषधास्थापनांची लस पुढे रेटणे.

२.

लस म्हणजे थोतांड या आपल्या दाव्याचा हा अर्थ निघतो कि
अब्जावधी रुपायनाचा/ युरोंचा व्यवहार सांभाळणारी जगातील सर्वप्रकारची सरकारे आपापल्या "सार्वजनिक आरोग्य" खाते , महाविद्यालयातील संशोधक आणि इतर शास्त्रन्य यांचं सल्ल्यानुसार वागत आहेत ती सर्व गंडली गेली आहेत !

गंडली आहेत म्हणण्यापेक्षा मी भ्रष्टावली आहेत असं म्हणेन.

३.

लसीचे तोटे असणार... जसे कोणत्याही लसीचे असतात आणि "त्याबद्दल गुप्तता पाळली गेली आणि लोकांना गंडवले" असे आपले म्हणणे असेल तर तो फार मोठा दावा ठरेल !

आपल्या अंगात काय घुसतंय ते जाणून घ्यायचा लोकांना हक्क नाही का ? आणि ती गुप्तता कसली ? उलट लशीच्या बाबतीत पारदर्शकता हवीये. तीच नेमकी दिसंत नाही.

४.

कि मुळात लास या प्रकारालाच विरोध आहे? ( कारण कोणतीच लस नको असे विचार करणारे लोक या भूतलावर आहेत ) नक्क्की काय?

माझा लशीस सरसकट विरोध नाही. मी स्वत: दरवर्षी हिवाळ्याच्या आधी फ्ल्यूचे लस घेतो. कारण की मला हृदयविकार आहे. आणि सदर लस अनेक वर्षं सुस्थापित झालेली आहे. फ्ल्यूमुळे हृदयाच्या पिशावीस सूज येते हे सर्वज्ञात आहे. ही सूज हृदयापर्यंत पोहोचली तर हृदयाच्या राक्तावाहीन्यंत अडथला उत्पन्न होऊन हृत्शूल ( = heart attack ) होऊ शकतो. तसंच जर आत विस्फारजाळी टाकलेली असेल तर ती चेमटण्याचाही धोका ( = stenosis ) असतो. ही सर्व माहिती व फ्ल्यूच्या लशीचे संभाव्य दुष्परिणाम ज्ञात आहेत. इंग्लंड मधल्या फ्ल्यूच्या लशीविषयी इथे माहिती सापडेल : https://vk.ovg.ox.ac.uk/vk/inactivated-flu-vaccine

असा काही माहिती / विदा करोनाच्या लशीसंबंधी उपलब्ध आहे का ? असल्यास तो का चर्चेत येत नाही ? किंबहुना करोना हा नवा रोग असल्याने विगतवार विदा ( = detailed data ) निर्माण चायला काही दशकं जावी लागतील. मग लशीची इतकी घाई का ?

मला गरज आहे म्हणून मी लस घेतो. धडधाकट निरोगी माणसाला लस टोचायची गरजंच काय मुळातून ?

आ.न.,
-गा.पै.