शब्दखेळ : विरंगुळा

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
24 May 2020 - 3:45 pm

शब्द्प्रेमींसाठी विरंगुळा

खालील शब्दांना समानार्थी शब्द लिहा.
प्रत्येक शब्द वै या अक्षरानेच सुरू व्हायला हवा.

1 ऐच्छिक :
2 अपूर्णता :
3 विष्णूचे स्थान :
4 वाचा :
5भिन्नता :
6काळी तुळस :

7 सावत्र :
8धन्वंतरी :
9कायदेशीर :
10 आश्चर्य :
11गरूड :
12 समृद्धी :

13 सीता :
14 ऐश्वर्य :
15 निष्फळता :
17 शत्रू :
18 चारा :

19 संन्यासी :
20 ओसाड :
21 कुबेर :
२२. चतुर्वर्णापैकी एक :

23. विष्णूभक्त :
24 निज
25 सूड उगवणे :
26 लग्नाची एक पद्धत :
27 अग्नी :

भाषाविरंगुळा

प्रतिक्रिया

गणेशा's picture

20 Jun 2020 - 5:30 pm | गणेशा

__^__

मराठी_माणूस's picture

21 Jun 2020 - 12:22 pm | मराठी_माणूस

धन्यवाद. आमच्या आनंदासाठी एव्हडे श्रम घेतल्याबद्दल.

कुमार१'s picture

22 Jun 2020 - 3:28 pm | कुमार१

मित्रहो,
आतापर्यंतच्या खेळांमध्ये गाणी ओळखणे हा सर्वात लोकप्रिय प्रकार ठरला आहे. म्हणून पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन येतोय मराठी गाणी ओळखण्याचा हा खेळ.

या प्रत्येक गाण्याच्या ध्रुवपदातील काही मोजक्या शब्दांचे समानार्थी किंवा भावार्थी शब्द दिले आहेत. तसेच ध्रुवपदातील एकूण शब्दांची संख्या देखील कंसात दिली आहे.

आता या माहितीवरून तुम्हाला त्या गाण्याचे पूर्ण ध्रुवपद ओळखायचे आहे. उत्तराची शब्दसंख्या सूत्राशी तंतोतंत जुळली पाहिजे. मला खात्री आहे की आपल्यातील दर्दी लोक हा खेळ पटदिशी सोडवतील !
……………………
१. निघताना, समजले, पिडले (१२)

२. जमिनीत, फिरते, मेघ (११)

३. सांगायचे, नाही, मापणार (११)

४. लाडका, मुक्त (१०)

५. विशेष, सगळा, चांदणी (१५)

६. हातावर, अंतरी, स्वीकारते (११)

७. दिवा, शरीर, मिळाला (१२)
..................................................................

सत्यजित...'s picture

22 Jun 2020 - 3:35 pm | सत्यजित...

इतकेच मला जाताना सरणावर कळले होते
मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते

सत्यजित...'s picture

22 Jun 2020 - 3:37 pm | सत्यजित...

काळ्या मातीत मातीत तिफन चालते
ईज थयथय नाचते ढग ढोल वाजवितो

सत्यजित...'s picture

22 Jun 2020 - 3:39 pm | सत्यजित...

काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही
देवळाच्या दारामध्ये भक्ती तोलणार नाही

सत्यजित...'s picture

22 Jun 2020 - 3:40 pm | सत्यजित...

मालवून टाक दीप, चेतवून अंग अंग
राजसा किती दिसात, लाभला निवांत संग

सत्यजित...'s picture

22 Jun 2020 - 3:42 pm | सत्यजित...

तळव्यावर मेंदीचा अजून रंग ओला
माझ्या मनी प्रीत तुझी घेते हिंदोळा

कुमार१'s picture

22 Jun 2020 - 4:01 pm | कुमार१

एकदम षटकार, तोही मैदानाबाहेर !!!
आता आपण निवृत्त व्हावे ....

कुमार१'s picture

22 Jun 2020 - 4:10 pm | कुमार१

एवढेच राहिलेत :

४. लाडका, मुक्त (१०)

५. विशेष, सगळा, चांदणी (१५)

सत्यजित...'s picture

22 Jun 2020 - 4:12 pm | सत्यजित...

आकाशी झेप घे रे
वाटतंय पण शब्दसंख्या जुळत नाही.

कुमार१'s picture

22 Jun 2020 - 4:33 pm | कुमार१

आता तुम्ही थोडी विश्रांती घ्या !
:))))

आवडाबाई's picture

22 Jun 2020 - 5:03 pm | आवडाबाई

जगी हा खास वेड्यांचा, पसारा माजला सारा
गमे या भ्रांत संसारीं । ध्रुवाचा वेड? हा तारा

कुमार१'s picture

22 Jun 2020 - 5:27 pm | कुमार१

फक्त ४ राहिले.

कुमार१'s picture

22 Jun 2020 - 6:19 pm | कुमार१

सत्यजित यांनी पहिल्याच षटकात तुफान फटकेबाजी केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन आहेच. पण त्यामुळे इतरांसाठी फक्त दोनच गाणी शिल्लक राहिली. त्यातले आता एकच बाकी आहे म्हणून अजून थोडी भर घालून ठेवतो :

८. ममता, मीन (१४)

९. आकलन, देऊळ (१२)

१०. जंगल, जीव (१३)

११. प्रेमाचे, प्रचंड (८)

कुमार१'s picture

23 Jun 2020 - 10:43 am | कुमार१

बहुतेक सत्यजितना परत बोलवावे लागणार का !
:))

आवडाबाई's picture

23 Jun 2020 - 2:15 pm | आवडाबाई

लळा जिव्हाळा शब्दच खोटे माशा मासा खाई

आवडाबाई's picture

23 Jun 2020 - 2:17 pm | आवडाबाई

लळा जिव्हाळा शब्दच खोटे माश्या मासा खाई, कुणी कुणाचे नाही राजा कुणी कुणाचे नाही

कुमार१'s picture

23 Jun 2020 - 2:19 pm | कुमार१

८ बरोबर !

मराठी_माणूस's picture

23 Jun 2020 - 5:25 pm | मराठी_माणूस

११. बादशहाच्या अमर प्रितिचे मंदीर एक विशाल, यमुनाकाठी ताजमहाल

मराठी_माणूस's picture

23 Jun 2020 - 5:34 pm | मराठी_माणूस

९. ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते, त्या ज्ञानाचे मंदीर हे , सत्य शिवाहुन सुंदर हे

कुमार१'s picture

23 Jun 2020 - 5:44 pm | कुमार१

बरोबर ! छान .
४, १० राहिले.

कुमार१'s picture

24 Jun 2020 - 7:38 am | कुमार१

४. नाद, लाडका, स्वतंत्र (१०) : नाट्यगीत

१०. जंगल, सगळे, जीव (१३) ; एक जोशपूर्ण सामाजिक गीत.

सत्यजित...'s picture

24 Jun 2020 - 7:48 am | सत्यजित...

घेई छंद मकरंद प्रिय हा मिलिंद
मधुसेवनानंद स्वच्छंद हा धुंद

कुमार१'s picture

24 Jun 2020 - 7:51 am | कुमार१

फक्त १० राहिले.....
कोण मारणार विजयी चौकार ...!

सत्यजित...'s picture

24 Jun 2020 - 8:06 am | सत्यजित...

पेटलं आभाळ सारं,पेटला हा प्राण रे
उठला हा जाळ आतुन करपलं रान रे

सत्यजित...'s picture

24 Jun 2020 - 8:11 am | सत्यजित...

आणि शब्दांचा क्रम जुळत नाही पण

१०. आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान
शेतकर्‍यांच्या राज्यासाठी लावु पणाला प्राण

कुमार१'s picture

24 Jun 2020 - 9:44 am | कुमार१

वरील सर्व सहभागींचे अभिनंदन व आभार !
छान झाला हा डाव.

सुरवातीस एका फटक्यात ५ गाणी ओळखल्याबद्दल सत्यजित यांचे विशेष कौतुक !

गणेशा's picture

25 Jun 2020 - 1:44 pm | गणेशा

हो.. तसे सोप्पे वाटले सुरुवातीला पण नंतर खुप अवघड होते..

मला वेळ नाही मिळाला.. आणि मिळाला असता तरी नसते जमले असेच वाटत आहे

कुमार१'s picture

25 Jun 2020 - 2:35 pm | कुमार१

धन्यवाद !

नवा खेळ
खाली काही निरर्थक वाक्ये दिली आहेत. एका वाक्याच्या प्रत्येक शब्दातील कुठलेही फक्त एक अक्षर तुम्ही बाजूला काढायचे. अशी त्या वाक्यातली निवडलेली अक्षरे क्रमाने ठेवली, की भारतातील एका गावाचे नाव तयार होते. ते नाव तुम्ही सांगायचे आहे. प्रत्येक शब्दातील एकच अक्षर घ्यायचे आहे आणि ते जसेच्या तसे वापरूनच गावाचे नाव तयार होते.

एक उदाहरण देतो.
हे वाक्य बघा :
वासोट्याचा गलबलापून सकायचे.
याचे उत्तर आहे : सोलापूर
....................................
पहिल्या दोन कोड्यांत शब्दांच्या क्रमाने गेल्यावर तुम्हाला उत्तर मिळेल. पण पुढच्या चारांत (३-७) तसे नाही. तिथे शब्दक्रम विस्कटून दिला आहे. ती पातळी जरा अवघड जाईल.
...............................

१. फक्कड सोलकढी गटवा दणदणीत.
२. दगाफटका कारस्थान प्रभंजन प्रभागातले.
.............................................................................
शब्दक्रम विस्कटून :

३.भवताल सामाजिक तातडीने कळले समयसूचक.

४.सौरचूल सदनात सुमंगल फिरवायची.

५.समजतात उठाठेवी गावाकडच्या कारभार्‍याला.

६.. नकोसे सहवास करायचाय सदेह प्रदूषण

७. कोणाच्याही अटकेपूर्वी बोलणार नगरातून आबासाहेब.
...............................................
(गावांचे उच्चार ‘विकी’नुसार स्थानिक भाषेप्रमाणे).

ज्ञानोबाचे पैजार's picture

25 Jun 2020 - 3:27 pm | ज्ञानोबाचे पैजार

१. फलटण
२. दरभंगा
३. यवतमाळ
४. मंदसौर

पुढची तीन पण आली आहेत. पण कुमार१ सरांनी निवृत्ती घ्या असे सांगायच्या आधि एवढ्यावरच थांबतो

पैजारबुवा,

कुमार१'s picture

25 Jun 2020 - 3:29 pm | कुमार१

जोरदार सलामी !
सर्व बरोबर.
विश्रांती... धन्यवाद !

५ ६ ७ राहिले.

सत्यजित...'s picture

25 Jun 2020 - 9:53 pm | सत्यजित...

उमरगा

सत्यजित...'s picture

25 Jun 2020 - 9:53 pm | सत्यजित...

देहरादून

पलाश's picture

25 Jun 2020 - 10:14 pm | पलाश

७ बागलकोट.

कुमार१'s picture

26 Jun 2020 - 8:10 am | कुमार१

वरील सर्व बरोबर. मस्त !
या खेपेस ज्ञा पै सामनावीर !
मंदसौर या उत्तराबद्दल विशेष कौतुक.
..............................................................................
शाळेत माझ्या वर्गात मंदसौरवाले नावाचा मुलगा होता. आतापर्यंत त्या आडनावाचा मी ऐकलेला एकमेव माणूस !

पण तेव्हापासूनच मला त्या गावाच्या नावाचे कुतूहल वाटत आले आहे.

कुमार१'s picture

28 Jun 2020 - 7:56 am | कुमार१

संगीताच्या बाबतीत आपण बरेच लोक ‘कानसेन’ नक्कीच आहोत. आपले जितके मराठी गाण्यांवर प्रेम आहे, तितकेच हिंदी गाण्यांवर देखील. किंबहुना आपला एक कान मराठी तर दुसरा हिंदी गाणी ऐकण्यासाठी आसुसलेला असतो !

... तर घेऊन आलोय पुन्हा एकवार गाण्यांचा खेळ पण....
अब की बार हिंदी गानोंके साथ …..
……………………………………………………….
इथे तुम्हाला हिंदी चित्रपटातील गाणे ओळखायचे आहे. त्यासाठी प्रत्येक गाण्याची शोधसूत्रे अशी दिली आहेत:

१. गाण्याच्या ध्रुवपदातील दोन शब्दांचे समानार्थी किंवा भावार्थी मराठी शब्द, आणि
२. त्या गाण्यासंबंधी काही वैशिष्ट्यपूर्ण माहिती.

गाणे ओळखल्यावर ध्रुवपद पूर्ण लिहावे.
………………………………………………

१. गाणे, जगणारे
हे गाणे असलेला चित्रपट मूळ तेलुगुचा ‘रिमेक’ आहे.
....................................................
२. संध्याकाळ, आठवण
याचे गीतकार कवी आणि पटकथाकारही होते. सुरवातीस त्यांनी कारकुनाची नोकरी केली.
.................................................
३. सोबत, गाणे
याच्या गायकांनी देशभक्तीपर हिंदी आणि अन्य मराठी गाणीही गायली.
................................................................
४. हाच, क्षण
याचे जे गीतकार, त्यांची आयुष्यात दोन कलाकारांशी असफल प्रेमप्रकरणे झाली.
..........................................
५. आनंद, दुःख
या गाण्याची चाल याच्या संगीतकारांनी आपल्याच एका बंगाली गाण्यावरून घेतलीय.
....................................................
६. नोकर, चांगुलपणा
याचे संगीतकार एकेकाळी नट आणि गायक देखील होते.
................................................................
७. आयुष्य, ऊन.
याचे गीतकार पटकथाकार देखील. त्यांना विज्ञान क्षेत्रातला एक परदेशी पुरस्कार पण आहे.
……………………………………………………………………………………………..

मराठी_माणूस's picture

28 Jun 2020 - 8:26 am | मराठी_माणूस

२. फिर वोहि शाम वोहि गम वोहि तनहाई है, दिल को समझाने तेरी याद चली आई है

मराठी_माणूस's picture

28 Jun 2020 - 8:28 am | मराठी_माणूस

३. तुम अगर साथ देने का वादा करो, मैं यूँ ही मस्त नग़में लुटाता रहूँ

मराठी_माणूस's picture

28 Jun 2020 - 8:31 am | मराठी_माणूस

४.आगे भी जाने ना तू, पीछे भी जाने ना तूजो भी है बस यही एक पल है

मराठी_माणूस's picture

28 Jun 2020 - 8:54 am | मराठी_माणूस

७. तुमको देखा तो ये ख़याल आया ज़िन्दगी धूप तुम घना साया.

कुमार१'s picture

28 Jun 2020 - 9:26 am | कुमार१

मस्तच....
२, ३,४ अगदी बरोबर.
७ पर्यायी उत्तर म्हणून बरोबर. माझे वेगळे होते.
कोणी ते ओळखतय का बघू .
.............................................
आता तुम्ही इथून विश्रांती घ्यावी ! :))

मराठी_माणूस's picture

28 Jun 2020 - 10:20 am | मराठी_माणूस

थांबतो. कोड्यासाठी धन्यवाद. बाकीच्या गाण्यांबद्दल उत्सुकता आहेच.

१. एक बंजारा गाए, जीवन के गीत सुनाए
हम सब जीने वालों को, जीने की राह बताए

कुमार१'s picture

28 Jun 2020 - 12:47 pm | कुमार१

१. एक बंजारा गाए, >>> बरोबर, छान !

५. प्यार दिवाना होता है, मस्ताना होता है
हर खुशी से हर गम से, बेगाना होता है

कुमार१'s picture

28 Jun 2020 - 1:23 pm | कुमार१

५. प्यार दिवाना होता है >> हेही बरोबर.
..................................
६ राहिले आणि ७ चे सुधारित सूत्र देतो : जमल्यास माझे गाणे ओळखा.

७. आयुष्य, ऊन, क्षण .

७ ये जीवन है इस जीवन का यही है रंगरूप -पिया का घर मधले
किंवा
कल हो ना हो चे टायटल सॉंग
हर घडी बदल रही है रूप जिंदगी
छाव है कहीं कहीं है धूप जिंदगी

कुमार१'s picture

28 Jun 2020 - 3:12 pm | कुमार१

हर घडी बदल रही है रूप जिंदगी
छाव है कहीं कहीं है धूप जिंदगी
>>>
होय, हेच !
... ६ चा विजयी षटकार कोण मारणार !

पलाश's picture

28 Jun 2020 - 4:27 pm | पलाश

६. ऐ मालिक तेरे बंदे हम,
ऐसे हो हमारे करम
नेकी पर चले, और बदी से टले
ताकी हसते हुए निकले दम

कुमार१'s picture

28 Jun 2020 - 4:51 pm | कुमार१

वा पलाश, बरोबर !

कुमार१'s picture

28 Jun 2020 - 5:34 pm | कुमार१

आपणा सर्वांच्या सहभागाने खेळ छान झाला.
म मा, पलाश आणि प्राजक्ता, छान.

हे कोडे रचतानाचे काही अनुभव:
सुरुवातीस दोन शब्द आणि शब्दसंख्या देणार होतो. पण मराठी गाण्यांच्या तुलनेत इथे ध्रुवपद हा गोंधळाचा भाग आहे. काही दोन ओळींची तर काही चार ओळींची. पुन्हा कित्येकदा चारोळी झाल्यावर पहिली ओळ पाचवी म्हणून तीच येते. तसेच, काही शब्द जे आपण मराठीत जोडून लिहितो ते हिंदीत तोडून लिहिलेले आढळतात.
त्यामुळे शब्दसंख्या हा वादग्रस्त मुद्दा होऊ शकतो. म्हणून अन्य वैशिष्ट्यांचा पर्याय निवडला.
गाणे ओळखण्याच्या दृष्टिकोणातून शब्दसंख्या ठीक, की अन्य वैशिष्ट्य देणे ठीक, याबद्दल तुमचे अनुभव जाणण्यास उत्सुक.

एकंदरीत संगीत रजनी छान झाली.
सर्वांना धन्यवाद !

आवडाबाई's picture

28 Jun 2020 - 6:17 pm | आवडाबाई

जेव्हा गाण्याचे वैशिष्ट्य दिले असेल तेव्हा गाणे ओळखण्या बरोबरच त्या क्लूचे उत्तर पण दिले तर जास्त मजा येईल (गाणे ओळखणार्याने ते आधीच ओळखलेले असते, फक्त उत्तरामधे लिहायचे आहे)

शब्दसंख्या हा वादग्रस्त मुद्दा होऊ शकतो - सहमत.
की अन्य वैशिष्ट्य देणे ठीक - ह्या मुळे थोडी तरी गाणी ओळखू आली :-)

पलाश's picture

28 Jun 2020 - 7:14 pm | पलाश

धन्यवाद. _/\_
अन्य वैशिष्ट्ये गाणे शोधण्यासाठी सोयीची वाटत आहेत.
आजचे कोडे सोडवताना नवीन गोष्टी माहीत झाल्या. बंगाली भाषेतल्या ज्या गाण्याच्या चालीवर
५. "प्यार दिवाना होता है, मस्ताना होता है" गाण्याची चाल आधारित आहे ते गाणं https://gaana.com/song/gun-gun-gun-kunje-amar या लिंकवर ऐकता येईल.

कुमार१'s picture

28 Jun 2020 - 7:03 pm | कुमार१

आवडाबाई धन्यवाद.
मुद्दा एकदम पटला. आता मी सर्व वैशिष्ट्यांची उत्तरे एकत्र लिहितो :
……………………………………………………….
१. हे गाणे असलेला चित्रपट मूळ तेलुगुचा ‘रिमेक’ आहे.


२. याचे गीतकार कवी आणि पटकथाकारही होते. सुरवातीस त्यांनी कारकुनाची नोकरी केली.
राजिंदर कृष्ण.

३. याच्या गायकांनी देशभक्तीपर हिंदी आणि अन्य मराठी गाणीही गायली.
महेंद्र कपूर

४. याचे जे गीतकार, त्यांची आयुष्यात दोन कलाकारांशी असफल प्रेमप्रकरणे झाली.
साहीर लुधियानवी

५. या गाण्याची चाल याच्या संगीतकारांनी आपल्याच एका बंगाली गाण्यावरून घेतलीय.
आर डी बर्मन

६. याचे संगीतकार एकेकाळी नट आणि गायक देखील होते.
वसंत देसाई

७. याचे गीतकार पटकथाकार देखील. त्यांना विज्ञान क्षेत्रातला एक परदेशी पुरस्कार पण आहे.
जावेद अख्तर (रिचर्ड डॉकिन्स पु).
……………………………………………………………………………………………..

कुमार१'s picture

28 Jun 2020 - 7:04 pm | कुमार१

वर असे वाचावे:
१. हे गाणे असलेला चित्रपट मूळ तेलुगुचा ‘रिमेक’ आहे.
जीने की राह

मज्जा आली.. 1-2 गाणी येत होती.. उलट ते कल हो ना हो या गाण्यावरून सलाम नमस्ते मधले.. ' तू जहाँ.. मै वहा.... जो धूप निकले छाया बन जाऊंगा ' हे गाणे आठवले.. जुनी आठवण सगळे कंपनीचे मित्र मैत्रिणी पहिल्यांदा एकत्र गेलो होतो ह्या सिनेमाला ते आठवले..

मज्जा आली.. नंतर हेच गाणे ऐकत बसलो आणि प्राजक्ता यांनी उत्तर दिले बहुतेक तोपर्यंत..

पण मज्जा आली.. कोडी सोडवण्यात थोडा भाग घेता आला नाही पण मज्जा आली.

कुमार१'s picture

28 Jun 2020 - 8:13 pm | कुमार१

पलाश, बंगाली गाणे ऐकले. छान आहे.
(एकदा 'पलाश' या मधुर नावाबद्दल काही विशेष अर्थ असल्यास जरूर सांगणे !)

गणेशा, धन्यवाद. या सुसंवादातच खरी मजा येते.

आता थोडेसे अधिक :

१.जेव्हा कोडेनिर्माता शब्दसंख्या देतो (आणि ती जर वादातीत असेल तर) तेव्हा निर्मात्याच्या मनातले गाणे हेच ओळखण्याचे एकमेव गाणे ठरते. हे थोडेसे दोन व्यक्तींचे डीएनए जुळण्याची शक्यता अति अत्यल्प असते, यासारखा प्रकार आहे.

२. याउलट आजच्या खेळावरून एक दिसून येईल. जेव्हा वैशिष्ट्ये या निकषावर गाणे ओळखले जाते, तेव्हा एकासारखी दोन-तीन गाणी निघू शकतात. मग त्यांना पर्यायी उत्तर म्हणून बरोबर द्यावेच लागते !

सदस्यनाम घेताना फुलांची, झाडांची नावे पहात होते. मराठीतल्या "पळसाला पाने तीन" मधल्या पळसाचं "पलाश" हे संस्कृृृत नाव आवडलं. ते सदस्यनाम घेतलं.

पळसाचं "पलाश" हे संस्कृृृत नाव

/>>>>
अरे वा, छान माहिती
शुभेच्छा !

ज्ञानोबाचे पैजार's picture

29 Jun 2020 - 4:59 pm | ज्ञानोबाचे पैजार

हा पाचवीचा इतिहास असल्याने वल्ली, मनो व दुर्गविहारी यांनी कृपया पंचाची भूमिका स्वीकारावी

इ. १ -भारताची राजमुद्रा सारनाथ येथील अशोक स्तंभाच्या आधारे तयार करण्यात आली आहे. या अशोक स्तंभावर एकूण किती प्राण्यांच्या प्रतिमा आहेत?
इ . २- सातवाहन वंशातला शेवटचा राजा
इ. ३ - छत्रपती शिवाजी महाराजांनी कालगणनेसाठी सुरु केलेल्या नव्या शकाचे नाव काय होते?
इ. ४- कनिष्काच्या दरबारातील एका प्रसिद्ध वैद्य
इ. ५- पुरंदर च्या तहात २३ किल्ले गमावल्या नंतर शिवाजी महाराजांनी त्यातला कोणता किल्ला पहिल्यांदा काबीज केला?
इ. ६- शिवाजी महाराजांच्या पणजोबांचे नाव काय होते?
इ. ७- ४० वर्षांच्या आयुष्यात ४७ लढाया जिंकणारा मराठा योध्दा
इ. ८- छत्रपती राजारामांनी यांच्या कामगिरी वर खुष होऊन त्यांना ‘सरखेल’ हा किताब दिला
इ. ९- १८५७ च्या उठावातील एक प्रसिद्ध सेनानी ज्यांचे मुळ नाव रामचंद्र पांडुरंग भट असे होते
इ. १०- दिल्लीच्या गादीवर बसणारा पहिला मुसलमान सुलतान व गुलाम घराण्याचा संस्थापक

पैजारबुवा,

कुमार१'s picture

29 Jun 2020 - 5:19 pm | कुमार१

रामचंद्र पांडुरंग भट>>> तात्या टोपे

गणेशा's picture

29 Jun 2020 - 6:24 pm | गणेशा

इ. १-
चार

म्हणजे चार सिंह आहेत वरती, आणि त्याखालील गोलाकार भागात, चार प्राणी - बैल, हत्ती, घोडा आणि सिंह.

गणेशा's picture

29 Jun 2020 - 6:37 pm | गणेशा

इ. ५- कोंडाणा?

गणेशा's picture

29 Jun 2020 - 6:40 pm | गणेशा

आता थांबतो.. पुढील काही प्रश्नांची उत्तरे येतायेत.. पण बेसिक प्रश्न आहेत खूपच सोप्पे :-)

कुमार१'s picture

29 Jun 2020 - 8:49 pm | कुमार१

६ बाबाजी राजे भोसले

ज्ञानोबाचे पैजार's picture

30 Jun 2020 - 8:44 am | ज्ञानोबाचे पैजार

१, ९ ५, ६ सगळी उत्तरे बरोबर आहेत..


पण बेसिक प्रश्न आहेत खूपच सोप्पे :-)

परवा माझ्या मुलीचे इतिहासाचे पुस्तक चाळत होतो त्यातल्या धड्या खाली दिलेल्या प्रश्र्णांवरुन हे कोडे बनवले आहे.

पैजारबुवा,

सत्यजित...'s picture

30 Jun 2020 - 4:35 pm | सत्यजित...

२.पुलुमावी
३.शिवशक
४.चरक
७.थोरले बाजीराव
८.सरखेल कान्होजी अंग्रे
१०.कुतुबुद्दीन ऐबक

ज्ञानोबाचे पैजार's picture

30 Jun 2020 - 4:43 pm | ज्ञानोबाचे पैजार

सत्यजित... फिरसे मॅन ऑफ द मॅच

पैजारबुवा,

गणेशा's picture

1 Jul 2020 - 12:45 am | गणेशा

मस्त.

2 माहित नव्हते..

Prajakta२१'s picture

1 Jul 2020 - 12:01 am | Prajakta२१

छान

गाणी आणि ह्या कोड्याची उत्तरे सापडेपर्यंत आली सुद्धा
ए मलिक तेरे बंदे हम --- हे तर काखेत कळस गावाला वळसा असे झाले
मला मदनमोहन यांचे एखादे गाणे वाटले होते
सर्वांना धन्यवाद

पुलुमावी ---माहितीबद्दल धन्यवाद मला शालिवाहन वाटले होते

कुमार१'s picture

1 Jul 2020 - 6:03 pm | कुमार१

वर इतिहास छान झाला. आता यावेळेस घेऊया थोडे नागरिकशास्त्र.

खाली ५ निरर्थक वाक्ये दिली आहेत. त्यातील शब्दांचा क्रमही विस्कटलेला आहे. प्रत्येक वाक्यात नागरिकशास्त्राचा एक शब्द दडलेला आहे. योग्य ती अक्षरे उचलल्यावर तो तयार होईल. अशा प्रत्येक शब्दाची अक्षरसंख्या संबंधित वाक्याच्या शब्दसंख्येइतकी आहे.

असे एकूण पाच शब्द (अनुक्रम १ ते ५) तयार करा. ते तयार झाल्यावर खालील गोष्टी जुळल्या पाहिजेत:

* शब्द १ आणि २ एका कृतीने जोडले आहेत.
* शब्द ३ ते ५ ची उत्तरे एकत्र लिहिल्यास एकजण तयार होतो.
………………………………………………………………………………..
१. सचेतन सगळेजण सारीपाटावर अनाकलनीय सौभाग्यकांक्षिणी

२. आमच्याकडे घनदाट शेतजमिनीमध्ये शेंगदाणे.

३. मनसोक्त सुभानरावांच्या कसल्यातरी सुधारणा अविस्मरणीय.

४. सुकाणूला चकविण्यासाठी धडकला अनिकेतराव बावरलेला.

५. खरीदायची विकायसाठी अज्ञानीला विधिलिखित.
...........................

पलाश's picture

1 Jul 2020 - 7:07 pm | पलाश

२. मतदान
४. निवडणूक

कुमार१'s picture

1 Jul 2020 - 7:14 pm | कुमार१

२, ४ बरोबर , छान

सत्यजित...'s picture

1 Jul 2020 - 7:29 pm | सत्यजित...

५.अधिकारी

कुमार१'s picture

1 Jul 2020 - 7:31 pm | कुमार१

५.अधिकारी >>> बरोबर..

सत्यजित...'s picture

1 Jul 2020 - 7:44 pm | सत्यजित...

मतसुविधा??

कुमार१'s picture

1 Jul 2020 - 7:53 pm | कुमार१

मतसुविधा?? >> चूक

ज्ञानोबाचे पैजार's picture

2 Jul 2020 - 9:24 am | ज्ञानोबाचे पैजार

१. नागरीकांचे
३. विधानसभा

पैजारबुवा,

कुमार१'s picture

2 Jul 2020 - 9:40 am | कुमार१

बरोबर !

अरेरे...मी येई पर्यंत सगळीच कोडी सुटली आहेत! [अर्थात वरील पैकी एकाचेही उत्तर मला माहित नव्हते तो भाग वेगळा :)]
आता पुढच्या नवीन शब्दखेळात सहभागी होतो.

कुमार१'s picture

2 Jul 2020 - 11:16 am | कुमार१

स्वागत !
तुम्हीच नवा खेळ घेऊन या की !

१. एका संख्येला १७ ने भागले तर बाकी ११ उरते, त्याच संख्येच्या वर्गाला जर १७ ने भागले तर बाकी किती उरेल?

२. ३५० मीटर लांबीची आगगाडी ३५० मीटर लांबीचा बोगदा सव्वा मिनिटात ओलांडते त्याच आगगाडीचा वेग जरा मिनिटाला ६० मीटर ने वाढवला तर पुढचा बोगदा ती दीड मिनिटात ओलांडते. तर पुढच्या बोगद्याची लांबी किती?

३. एका क्रिकेट स्पर्धेत ११ संघ सहभागी झाले होते प्रत्येक संघ दुसऱ्याशी एक सामना खेळला त्यातून चार संघ निवडले गेले त्यांनी प्रत्येक संघाबरोबर एक सामने खेळला, त्यातून निवडलेल्या दोन संघांनी अंतिम सामना खेळला तर एकूण किती सामने खेळले गेले?

४. एका शाळेत शिक्षक आणि विद्यार्थी यांची एकुण संख्या १६३२ आहे. त्या शाळेत प्रत्येक ५० विद्यार्थ्यांमागे एका शिक्षक असेल तर त्या शाळेत एकूण किती शिक्षक आहेत?

५. एक दुकानदार ५ रिकाम्या बाटल्यांच्या बदल्यात सरबताची एक भरलेली बाटली देतो. एका मुलाकडे ७७ रिकाम्या बाटल्या आहेत तर तो दुकानदारां कडून किती भरलेल्या बाटल्या मिळवू शकतो?

६. एका अंधाऱ्या खोलीत ३० निळे मोजे २० काळे मोजे आणि २५ पांढरे मोजे आहेत. तुम्हाला जर एक सारख्या रंगाची जोडी हवी असेल तर तुम्ही एका वेळेला त्या खोलीतून किती मोजे उचलाल?

७. पाच बगळे पाच मिनिटात पाच मासे खातात तर १० बगळे १० मिनिटात किती मासे खातील?

८. पुढील साखळीत शेवटचा आकडा कोणता येईल? २-३-१०-१५-२६-३५-५०-?

९. तुमच्या कडे ८ लिटर आणि ५ लिटरच्या बादल्या आहेत. पण तुमच्या मित्राला फक्त १ लिटर पाणी हवे आहे. कसे द्याला?

१०. एका विमानास मुंबई ते नागपूर हे अंतर कापायला सव्वा तास लागतो मात्र परत येताना तेच विमान फक्त ७५ मिनिटात येते. असा फरक कशा मुळे होत असेल?

पैजारबुवा,

कुमार१'s picture

3 Jul 2020 - 12:23 pm | कुमार१

एका विमानास मुंबई ते नागपूर हे अंतर कापायला सव्वा तास लागतो मात्र परत येताना तेच विमान फक्त ७५ मिनिटात येते. असा फरक कशा मुळे होत असेल?

>>>> हे भारीच की !
६० +१५ = ७५ !!! दोन्ही बी एकच की !

ज्ञानोबाचे पैजार's picture

3 Jul 2020 - 12:34 pm | ज्ञानोबाचे पैजार

बरोबर पकडले
आता १ ते ९ राहिले

पैजारबुवा,

५. १९ भरलेल्या बाटल्या मिळवू शकतो.
७५/५= १५ (७७-७५=२ उरल्या)
१५/५= ३
५/५= १ (३+ सर्वप्रथम उरलेल्या २ )

ज्ञानोबाचे पैजार's picture

3 Jul 2020 - 2:21 pm | ज्ञानोबाचे पैजार

अभिनंदन

पैजारबुवा,

कुमार१'s picture

3 Jul 2020 - 2:15 pm | कुमार१

७ = २०

८ = ६३