Skip to main content

शब्दखेळ : विरंगुळा

लेखक हेमंतकुमार यांनी रविवार, 24/05/2020 15:45 या दिवशी प्रकाशित केले.
शब्द्प्रेमींसाठी विरंगुळा खालील शब्दांना समानार्थी शब्द लिहा. प्रत्येक शब्द वै या अक्षरानेच सुरू व्हायला हवा. 1 ऐच्छिक : 2 अपूर्णता : 3 विष्णूचे स्थान : 4 वाचा : 5भिन्नता : 6काळी तुळस : 7 सावत्र : 8धन्वंतरी : 9कायदेशीर : 10 आश्चर्य : 11गरूड : 12 समृद्धी : 13 सीता : 14 ऐश्वर्य : 15 निष्फळता : 17 शत्रू : 18 चारा : 19 संन्यासी : 20 ओसाड : 21 कुबेर : २२. चतुर्वर्णापैकी एक : 23. विष्णूभक्त : 24 निज 25 सूड उगवणे : 26 लग्नाची एक पद्धत : 27 अग्नी :
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 150777
प्रतिक्रिया 523

प्रतिक्रिया

आकाशी झेप घे रे वाटतंय पण शब्दसंख्या जुळत नाही.

जगी हा खास वेड्यांचा, पसारा माजला सारा गमे या भ्रांत संसारीं । ध्रुवाचा वेड? हा तारा

सत्यजित यांनी पहिल्याच षटकात तुफान फटकेबाजी केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन आहेच. पण त्यामुळे इतरांसाठी फक्त दोनच गाणी शिल्लक राहिली. त्यातले आता एकच बाकी आहे म्हणून अजून थोडी भर घालून ठेवतो : ८. ममता, मीन (१४) ९. आकलन, देऊळ (१२) १०. जंगल, जीव (१३) ११. प्रेमाचे, प्रचंड (८)

In reply to by आवडाबाई

लळा जिव्हाळा शब्दच खोटे माश्या मासा खाई, कुणी कुणाचे नाही राजा कुणी कुणाचे नाही

४. नाद, लाडका, स्वतंत्र (१०) : नाट्यगीत १०. जंगल, सगळे, जीव (१३) ; एक जोशपूर्ण सामाजिक गीत.

घेई छंद मकरंद प्रिय हा मिलिंद मधुसेवनानंद स्वच्छंद हा धुंद

पेटलं आभाळ सारं,पेटला हा प्राण रे उठला हा जाळ आतुन करपलं रान रे

वरील सर्व सहभागींचे अभिनंदन व आभार ! छान झाला हा डाव. सुरवातीस एका फटक्यात ५ गाणी ओळखल्याबद्दल सत्यजित यांचे विशेष कौतुक !

In reply to by हेमंतकुमार

हो.. तसे सोप्पे वाटले सुरुवातीला पण नंतर खुप अवघड होते.. मला वेळ नाही मिळाला.. आणि मिळाला असता तरी नसते जमले असेच वाटत आहे

धन्यवाद ! नवा खेळ खाली काही निरर्थक वाक्ये दिली आहेत. एका वाक्याच्या प्रत्येक शब्दातील कुठलेही फक्त एक अक्षर तुम्ही बाजूला काढायचे. अशी त्या वाक्यातली निवडलेली अक्षरे क्रमाने ठेवली, की भारतातील एका गावाचे नाव तयार होते. ते नाव तुम्ही सांगायचे आहे. प्रत्येक शब्दातील एकच अक्षर घ्यायचे आहे आणि ते जसेच्या तसे वापरूनच गावाचे नाव तयार होते. एक उदाहरण देतो. हे वाक्य बघा : वासोट्याचा गलबलापून सकायचे. याचे उत्तर आहे : सोलापूर .................................... पहिल्या दोन कोड्यांत शब्दांच्या क्रमाने गेल्यावर तुम्हाला उत्तर मिळेल. पण पुढच्या चारांत (३-७) तसे नाही. तिथे शब्दक्रम विस्कटून दिला आहे. ती पातळी जरा अवघड जाईल. ............................... १. फक्कड सोलकढी गटवा दणदणीत. २. दगाफटका कारस्थान प्रभंजन प्रभागातले. ............................................................................. शब्दक्रम विस्कटून : ३.भवताल सामाजिक तातडीने कळले समयसूचक. ४.सौरचूल सदनात सुमंगल फिरवायची. ५.समजतात उठाठेवी गावाकडच्या कारभार्‍याला. ६.. नकोसे सहवास करायचाय सदेह प्रदूषण ७. कोणाच्याही अटकेपूर्वी बोलणार नगरातून आबासाहेब. ............................................... (गावांचे उच्चार ‘विकी’नुसार स्थानिक भाषेप्रमाणे).

१. फलटण २. दरभंगा ३. यवतमाळ ४. मंदसौर पुढची तीन पण आली आहेत. पण कुमार१ सरांनी निवृत्ती घ्या असे सांगायच्या आधि एवढ्यावरच थांबतो पैजारबुवा,

वरील सर्व बरोबर. मस्त ! या खेपेस ज्ञा पै सामनावीर ! मंदसौर या उत्तराबद्दल विशेष कौतुक. .............................................................................. शाळेत माझ्या वर्गात मंदसौरवाले नावाचा मुलगा होता. आतापर्यंत त्या आडनावाचा मी ऐकलेला एकमेव माणूस ! पण तेव्हापासूनच मला त्या गावाच्या नावाचे कुतूहल वाटत आले आहे.

संगीताच्या बाबतीत आपण बरेच लोक ‘कानसेन’ नक्कीच आहोत. आपले जितके मराठी गाण्यांवर प्रेम आहे, तितकेच हिंदी गाण्यांवर देखील. किंबहुना आपला एक कान मराठी तर दुसरा हिंदी गाणी ऐकण्यासाठी आसुसलेला असतो ! ... तर घेऊन आलोय पुन्हा एकवार गाण्यांचा खेळ पण.... अब की बार हिंदी गानोंके साथ ….. ………………………………………………………. इथे तुम्हाला हिंदी चित्रपटातील गाणे ओळखायचे आहे. त्यासाठी प्रत्येक गाण्याची शोधसूत्रे अशी दिली आहेत: १. गाण्याच्या ध्रुवपदातील दोन शब्दांचे समानार्थी किंवा भावार्थी मराठी शब्द, आणि २. त्या गाण्यासंबंधी काही वैशिष्ट्यपूर्ण माहिती. गाणे ओळखल्यावर ध्रुवपद पूर्ण लिहावे. ……………………………………………… १. गाणे, जगणारे हे गाणे असलेला चित्रपट मूळ तेलुगुचा ‘रिमेक’ आहे. .................................................... २. संध्याकाळ, आठवण याचे गीतकार कवी आणि पटकथाकारही होते. सुरवातीस त्यांनी कारकुनाची नोकरी केली. ................................................. ३. सोबत, गाणे याच्या गायकांनी देशभक्तीपर हिंदी आणि अन्य मराठी गाणीही गायली. ................................................................ ४. हाच, क्षण याचे जे गीतकार, त्यांची आयुष्यात दोन कलाकारांशी असफल प्रेमप्रकरणे झाली. .......................................... ५. आनंद, दुःख या गाण्याची चाल याच्या संगीतकारांनी आपल्याच एका बंगाली गाण्यावरून घेतलीय. .................................................... ६. नोकर, चांगुलपणा याचे संगीतकार एकेकाळी नट आणि गायक देखील होते. ................................................................ ७. आयुष्य, ऊन. याचे गीतकार पटकथाकार देखील. त्यांना विज्ञान क्षेत्रातला एक परदेशी पुरस्कार पण आहे. ……………………………………………………………………………………………..

मस्तच.... २, ३,४ अगदी बरोबर. ७ पर्यायी उत्तर म्हणून बरोबर. माझे वेगळे होते. कोणी ते ओळखतय का बघू . ............................................. आता तुम्ही इथून विश्रांती घ्यावी ! :))

In reply to by हेमंतकुमार

थांबतो. कोड्यासाठी धन्यवाद. बाकीच्या गाण्यांबद्दल उत्सुकता आहेच.

५. प्यार दिवाना होता है >> हेही बरोबर. .................................. ६ राहिले आणि ७ चे सुधारित सूत्र देतो : जमल्यास माझे गाणे ओळखा. ७. आयुष्य, ऊन, क्षण .

७ ये जीवन है इस जीवन का यही है रंगरूप -पिया का घर मधले किंवा कल हो ना हो चे टायटल सॉंग हर घडी बदल रही है रूप जिंदगी छाव है कहीं कहीं है धूप जिंदगी

हर घडी बदल रही है रूप जिंदगी छाव है कहीं कहीं है धूप जिंदगी >>> होय, हेच ! ... ६ चा विजयी षटकार कोण मारणार !

आपणा सर्वांच्या सहभागाने खेळ छान झाला. म मा, पलाश आणि प्राजक्ता, छान. हे कोडे रचतानाचे काही अनुभव: सुरुवातीस दोन शब्द आणि शब्दसंख्या देणार होतो. पण मराठी गाण्यांच्या तुलनेत इथे ध्रुवपद हा गोंधळाचा भाग आहे. काही दोन ओळींची तर काही चार ओळींची. पुन्हा कित्येकदा चारोळी झाल्यावर पहिली ओळ पाचवी म्हणून तीच येते. तसेच, काही शब्द जे आपण मराठीत जोडून लिहितो ते हिंदीत तोडून लिहिलेले आढळतात. त्यामुळे शब्दसंख्या हा वादग्रस्त मुद्दा होऊ शकतो. म्हणून अन्य वैशिष्ट्यांचा पर्याय निवडला. गाणे ओळखण्याच्या दृष्टिकोणातून शब्दसंख्या ठीक, की अन्य वैशिष्ट्य देणे ठीक, याबद्दल तुमचे अनुभव जाणण्यास उत्सुक. एकंदरीत संगीत रजनी छान झाली. सर्वांना धन्यवाद !

In reply to by हेमंतकुमार

जेव्हा गाण्याचे वैशिष्ट्य दिले असेल तेव्हा गाणे ओळखण्या बरोबरच त्या क्लूचे उत्तर पण दिले तर जास्त मजा येईल (गाणे ओळखणार्याने ते आधीच ओळखलेले असते, फक्त उत्तरामधे लिहायचे आहे) शब्दसंख्या हा वादग्रस्त मुद्दा होऊ शकतो - सहमत. की अन्य वैशिष्ट्य देणे ठीक - ह्या मुळे थोडी तरी गाणी ओळखू आली :-)

In reply to by हेमंतकुमार

धन्यवाद. _/\_ अन्य वैशिष्ट्ये गाणे शोधण्यासाठी सोयीची वाटत आहेत. आजचे कोडे सोडवताना नवीन गोष्टी माहीत झाल्या. बंगाली भाषेतल्या ज्या गाण्याच्या चालीवर ५. "प्यार दिवाना होता है, मस्ताना होता है" गाण्याची चाल आधारित आहे ते गाणं https://gaana.com/song/gun-gun-gun-kunje-amar या लिंकवर ऐकता येईल.

आवडाबाई धन्यवाद. मुद्दा एकदम पटला. आता मी सर्व वैशिष्ट्यांची उत्तरे एकत्र लिहितो : ………………………………………………………. १. हे गाणे असलेला चित्रपट मूळ तेलुगुचा ‘रिमेक’ आहे. २. याचे गीतकार कवी आणि पटकथाकारही होते. सुरवातीस त्यांनी कारकुनाची नोकरी केली. राजिंदर कृष्ण. ३. याच्या गायकांनी देशभक्तीपर हिंदी आणि अन्य मराठी गाणीही गायली. महेंद्र कपूर ४. याचे जे गीतकार, त्यांची आयुष्यात दोन कलाकारांशी असफल प्रेमप्रकरणे झाली. साहीर लुधियानवी ५. या गाण्याची चाल याच्या संगीतकारांनी आपल्याच एका बंगाली गाण्यावरून घेतलीय. आर डी बर्मन ६. याचे संगीतकार एकेकाळी नट आणि गायक देखील होते. वसंत देसाई ७. याचे गीतकार पटकथाकार देखील. त्यांना विज्ञान क्षेत्रातला एक परदेशी पुरस्कार पण आहे. जावेद अख्तर (रिचर्ड डॉकिन्स पु). ……………………………………………………………………………………………..

वर असे वाचावे: १. हे गाणे असलेला चित्रपट मूळ तेलुगुचा ‘रिमेक’ आहे. जीने की राह

मज्जा आली.. 1-2 गाणी येत होती.. उलट ते कल हो ना हो या गाण्यावरून सलाम नमस्ते मधले.. ' तू जहाँ.. मै वहा.... जो धूप निकले छाया बन जाऊंगा ' हे गाणे आठवले.. जुनी आठवण सगळे कंपनीचे मित्र मैत्रिणी पहिल्यांदा एकत्र गेलो होतो ह्या सिनेमाला ते आठवले.. मज्जा आली.. नंतर हेच गाणे ऐकत बसलो आणि प्राजक्ता यांनी उत्तर दिले बहुतेक तोपर्यंत.. पण मज्जा आली.. कोडी सोडवण्यात थोडा भाग घेता आला नाही पण मज्जा आली.

पलाश, बंगाली गाणे ऐकले. छान आहे. (एकदा 'पलाश' या मधुर नावाबद्दल काही विशेष अर्थ असल्यास जरूर सांगणे !) गणेशा, धन्यवाद. या सुसंवादातच खरी मजा येते. आता थोडेसे अधिक : १.जेव्हा कोडेनिर्माता शब्दसंख्या देतो (आणि ती जर वादातीत असेल तर) तेव्हा निर्मात्याच्या मनातले गाणे हेच ओळखण्याचे एकमेव गाणे ठरते. हे थोडेसे दोन व्यक्तींचे डीएनए जुळण्याची शक्यता अति अत्यल्प असते, यासारखा प्रकार आहे. २. याउलट आजच्या खेळावरून एक दिसून येईल. जेव्हा वैशिष्ट्ये या निकषावर गाणे ओळखले जाते, तेव्हा एकासारखी दोन-तीन गाणी निघू शकतात. मग त्यांना पर्यायी उत्तर म्हणून बरोबर द्यावेच लागते !

In reply to by हेमंतकुमार

सदस्यनाम घेताना फुलांची, झाडांची नावे पहात होते. मराठीतल्या "पळसाला पाने तीन" मधल्या पळसाचं "पलाश" हे संस्कृृृत नाव आवडलं. ते सदस्यनाम घेतलं.

हा पाचवीचा इतिहास असल्याने वल्ली, मनो व दुर्गविहारी यांनी कृपया पंचाची भूमिका स्वीकारावी इ. १ -भारताची राजमुद्रा सारनाथ येथील अशोक स्तंभाच्या आधारे तयार करण्यात आली आहे. या अशोक स्तंभावर एकूण किती प्राण्यांच्या प्रतिमा आहेत? इ . २- सातवाहन वंशातला शेवटचा राजा इ. ३ - छत्रपती शिवाजी महाराजांनी कालगणनेसाठी सुरु केलेल्या नव्या शकाचे नाव काय होते? इ. ४- कनिष्काच्या दरबारातील एका प्रसिद्ध वैद्य इ. ५- पुरंदर च्या तहात २३ किल्ले गमावल्या नंतर शिवाजी महाराजांनी त्यातला कोणता किल्ला पहिल्यांदा काबीज केला? इ. ६- शिवाजी महाराजांच्या पणजोबांचे नाव काय होते? इ. ७- ४० वर्षांच्या आयुष्यात ४७ लढाया जिंकणारा मराठा योध्दा इ. ८- छत्रपती राजारामांनी यांच्या कामगिरी वर खुष होऊन त्यांना ‘सरखेल’ हा किताब दिला इ. ९- १८५७ च्या उठावातील एक प्रसिद्ध सेनानी ज्यांचे मुळ नाव रामचंद्र पांडुरंग भट असे होते इ. १०- दिल्लीच्या गादीवर बसणारा पहिला मुसलमान सुलतान व गुलाम घराण्याचा संस्थापक पैजारबुवा,

In reply to by गणेशा

म्हणजे चार सिंह आहेत वरती, आणि त्याखालील गोलाकार भागात, चार प्राणी - बैल, हत्ती, घोडा आणि सिंह.

१, ९ ५, ६ सगळी उत्तरे बरोबर आहेत..
पण बेसिक प्रश्न आहेत खूपच सोप्पे :-)
परवा माझ्या मुलीचे इतिहासाचे पुस्तक चाळत होतो त्यातल्या धड्या खाली दिलेल्या प्रश्र्णांवरुन हे कोडे बनवले आहे. पैजारबुवा,

२.पुलुमावी ३.शिवशक ४.चरक ७.थोरले बाजीराव ८.सरखेल कान्होजी अंग्रे १०.कुतुबुद्दीन ऐबक

छान गाणी आणि ह्या कोड्याची उत्तरे सापडेपर्यंत आली सुद्धा ए मलिक तेरे बंदे हम --- हे तर काखेत कळस गावाला वळसा असे झाले मला मदनमोहन यांचे एखादे गाणे वाटले होते सर्वांना धन्यवाद पुलुमावी ---माहितीबद्दल धन्यवाद मला शालिवाहन वाटले होते

वर इतिहास छान झाला. आता यावेळेस घेऊया थोडे नागरिकशास्त्र. खाली ५ निरर्थक वाक्ये दिली आहेत. त्यातील शब्दांचा क्रमही विस्कटलेला आहे. प्रत्येक वाक्यात नागरिकशास्त्राचा एक शब्द दडलेला आहे. योग्य ती अक्षरे उचलल्यावर तो तयार होईल. अशा प्रत्येक शब्दाची अक्षरसंख्या संबंधित वाक्याच्या शब्दसंख्येइतकी आहे. असे एकूण पाच शब्द (अनुक्रम १ ते ५) तयार करा. ते तयार झाल्यावर खालील गोष्टी जुळल्या पाहिजेत: * शब्द १ आणि २ एका कृतीने जोडले आहेत. * शब्द ३ ते ५ ची उत्तरे एकत्र लिहिल्यास एकजण तयार होतो. ……………………………………………………………………………….. १. सचेतन सगळेजण सारीपाटावर अनाकलनीय सौभाग्यकांक्षिणी २. आमच्याकडे घनदाट शेतजमिनीमध्ये शेंगदाणे. ३. मनसोक्त सुभानरावांच्या कसल्यातरी सुधारणा अविस्मरणीय. ४. सुकाणूला चकविण्यासाठी धडकला अनिकेतराव बावरलेला. ५. खरीदायची विकायसाठी अज्ञानीला विधिलिखित. ...........................