शब्द्प्रेमींसाठी विरंगुळा
खालील शब्दांना समानार्थी शब्द लिहा.
प्रत्येक शब्द वै या अक्षरानेच सुरू व्हायला हवा.
1 ऐच्छिक :
2 अपूर्णता :
3 विष्णूचे स्थान :
4 वाचा :
5भिन्नता :
6काळी तुळस :
7 सावत्र :
8धन्वंतरी :
9कायदेशीर :
10 आश्चर्य :
11गरूड :
12 समृद्धी :
13 सीता :
14 ऐश्वर्य :
15 निष्फळता :
17 शत्रू :
18 चारा :
19 संन्यासी :
20 ओसाड :
21 कुबेर :
२२. चतुर्वर्णापैकी एक :
23. विष्णूभक्त :
24 निज
25 सूड उगवणे :
26 लग्नाची एक पद्धत :
27 अग्नी :
प्रतिक्रिया
3 Jul 2020 - 2:22 pm | ज्ञानोबाचे पैजार
अभिनंदन
पैजारबुवा,
3 Jul 2020 - 3:04 pm | पलाश
७. २०
3 Jul 2020 - 3:06 pm | पलाश
हे उत्तर दिलेलं दिसतं आहे. हे रद्द.
3 Jul 2020 - 4:06 pm | ज्ञानोबाचे पैजार
गणिताचे उत्तर माहित असले तरी सुध्दा गणित सोडवायला मजा येते.
जरी उत्तरे इथे आली असली तरी सुध्दा प्रत्येक गणित आपापले सोडवून पहायला हरकत नाही.
पैजारबुवा,
3 Jul 2020 - 3:05 pm | आवडाबाई
२=५८० ?
3 Jul 2020 - 3:41 pm | ज्ञानोबाचे पैजार
५८० हे चूकिचे उत्तर आहे
परत एकदा प्रयत्न करा.
पैजारबुवा,
3 Jul 2020 - 4:09 pm | पलाश
माझं उत्तर पण ५८० आलं पण बरोबर नाही हे कळलं.
मुलांचा माध्यमिक शिष्यवृृत्ती चा अभ्यास घेत असताना गणितासाठीच्या पंढरिनाथ राणे यांच्या पुस्तकात अशा प्रकारच्या गणितांसाठी सोपी सूत्रे होती हे आठवलं. आता ती सूत्रे आठवत नाहीत.
3 Jul 2020 - 4:22 pm | ज्ञानोबाचे पैजार
पंढरीनाथ राणे भारी पुस्तक आहे
आता लॉकडाउन मधे मी माझ्या पुतणीकडून उसने घेउन सगळे सोडवले होते.
शकुंतला देवींची पुस्तके सोडवायलाही भारी मजा येते..
पैजारबुवा,
3 Jul 2020 - 3:08 pm | आवडाबाई
१=२
3 Jul 2020 - 4:03 pm | ज्ञानोबाचे पैजार
अचुक उत्तर
पैजारबुवा,
3 Jul 2020 - 3:41 pm | पलाश
४. (१६३२/५१)= ३२ शिक्षक
3 Jul 2020 - 4:03 pm | ज्ञानोबाचे पैजार
बरोबर
पैजारबुवा,
3 Jul 2020 - 4:16 pm | कुमार१
२ = ५१०
3 Jul 2020 - 4:24 pm | ज्ञानोबाचे पैजार
५१० बरोबर उत्तर आहे
पैजारबुवा,
7 Jul 2020 - 2:41 pm | आवडाबाई
कसे ?
7 Jul 2020 - 4:33 pm | ज्ञानोबाचे पैजार
३५० मिटर लांबीची गाङी ३५० मिटर चा बोगदा १.२५ मिनिटात ओलांडते म्हणजे त्या गाडीला ७०० मिटर अंतर कापायला ७५ सेकंद लागतात.
म्हणजे त्या गाडीचा वेग मिनिटाला ७०० / ७५ x ६० = ५६० मिटर प्रतिमिनिट आहे.
जर हा वेग ६२० मिनिट प्रतिमिनीट केला तर ती आगगाडी दुसरा बोगदा दिड मिनिटात म्हणजे ९० सेकंदात ओलांडते
म्हणजे गाडी नव्या वेगाने ९० सेकंदात ९३० मिटर अंतर कापते. गाडीची लांबी ३५० मिटर म्हणुन बोगद्याची लांबी ९३० -३५० = ५८० मिटर.
तुम्ही दिलेले उत्तर बरोबर होते.
क्षमा करा, मी तुमच्या बरोबर उत्तराला चूक म्हणालो.
पैजारबुवा,
8 Jul 2020 - 11:03 am | आवडाबाई
होते असे, पण...
प्रायश्चित्त म्हणून अजून एक गणिती कोडे येऊ द्या.
हे सोडवायला मजा आली, वेळ मिळेल तसतसे सोडवत होते.
3 Jul 2020 - 5:37 pm | कुमार१
९. तुमच्या कडे ८ लिटर आणि ५ लिटरच्या बादल्या आहेत. पण तुमच्या मित्राला फक्त १ लिटर पाणी हवे आहे. >>>>
त्यासाठी आम्हाला तिसरी रिकामी बादली घ्यायची परवानगी पाहिजे बुवा !नाहीतर आम्ही नाही देत पाणी जा …..:))
3 Jul 2020 - 5:54 pm | चांदणे संदीप
१) ८ लिटरच्या बादलीत पूर्ण पाणी भरून घ्या ते ५ लिटरच्या बादलीत ओता आणि ती बादली पुन्हा बाहेर ओतून रिकामी करा.
२) ८ लिटरच्या बादलीत ३ लिटर शिल्लक असेल ते ५ लिटरच्या बादलीत टाका.
३) ८ लिटरची बादली पुन्हा भरून घेऊन ते सर्व पाणी ५ लिटरच्या बादलीत टाका आतीबापुबाओरिक.
४) ८ लिटरच्या बादलीत ६ लिटर शिल्लक असेल ते ५ लिटरच्या बादलीत टाका.
५) ८ लिटरमध्ये आता १ लिटर शिल्लक असेल! टॅन्टॅडॅण!
१३ लिटर पाणी ओतून दिलं पण १ लिटर काढलं का नाय! मित्रासाठी कायपण!
सं - दी - प
3 Jul 2020 - 6:16 pm | कुमार१
3 Jul 2020 - 6:16 pm | कुमार१
आता संदीप भाऊंनी पाणी ओतून देऊन जे उत्तर काढलं त्यासाठीच आम्ही सोळा लिटरची एक मोठी बादली मागत होतो.
म्हणजे ते सगळे पाणी त्यात ओतता आले असते.
हे पाणी वाया नाही घालवलं पाहिजे राव, पर्यावरण जपायला नको काय ! :)))
3 Jul 2020 - 10:00 pm | ज्ञानोबाचे पैजार
एकदम बराबर
पैजारबुवा,
3 Jul 2020 - 5:58 pm | पलाश
६.
(कमीतकमी) कोणतेही ४ मोजे.
3 Jul 2020 - 10:02 pm | ज्ञानोबाचे पैजार
सही जबाब
पैजारबुवा
3 Jul 2020 - 9:27 pm | सत्यजित...
६२ सामने
3 Jul 2020 - 10:04 pm | ज्ञानोबाचे पैजार
उत्तर बरोबर आहे
पैजारबुवा
3 Jul 2020 - 9:53 pm | कुमार१
3 नंबर मध्ये प्रत्येक संघ दुसऱ्याशी खेळला ,याचा अर्थ प्रत्येक संघ प्रत्येकाशी खेळाला का ? हे स्पष्ट करावे
3 Jul 2020 - 10:04 pm | ज्ञानोबाचे पैजार
सगळे संघ एकमेकांबरोबर खेळले
पैजारबुवा,
4 Jul 2020 - 8:18 am | ज्ञानोबाचे पैजार
सामनावीर किताब पलाश आणि कुमार१ यांना विभागून दिला जात आहे
पैजारबुवा,
4 Jul 2020 - 8:44 am | गणेशा
शनिवार रविवार येण्या अगोदरच कोडे सोडवायला खुप वेग येतो हे पण एक कोडेच झाले आहे..
:-))
4 Jul 2020 - 10:27 am | कुमार१
ज्ञा पै,
छान मजा आली धन्यवाद .
गणेशा,
खास तुमच्यासाठी म्हणून नागरिकशास्त्र भाग-2 कोडे तयार आहे सोडवणार का बोला !
4 Jul 2020 - 11:41 am | गणेशा
नक्कीच आवडते मला सोडवायला, पण खास माझ्या साठी नको..
मला समोर उत्तर दिसत असले तरी आठवत नाही नेमके काय उत्तर असेल ते..
सोडवण्याचा प्रयत्न करेल..
दुपारी 2 पर्यंत free आहे..:-)
5 Jul 2020 - 10:43 am | कुमार१
आता घेऊया ‘देशाचा कारभार’ हा विषय. खाली सहा निरर्थक वाक्ये दिलेली आहेत. त्यातील शब्दांचा क्रमही विस्कटलेला आहे. प्रत्येक वाक्यात दिलेल्या विषयाचा एक शब्द दडलेला आहे. योग्य ती अक्षरे उचलल्यावर तो तयार होईल. अशा प्रत्येक शब्दाची अक्षरसंख्या संबंधित वाक्याच्या शब्दसंख्येइतकी आहे.
असे विषयाशी संबंधित सहा शब्द तयार करा. ते झाल्यावर आणि खालीलप्रमाणे मांडल्यावर असे अर्थपूर्ण वाक्य तयार होईल :
(१ २ ३ ) आणि ( ४ ५ ६ ) आहे.
...............................
१. स्वातीताईंच्या प्रभातकाळी यांच्यासाठी सुरवंटाचे पाठीमागच्या दिवसाकाठी.
२. हटवादी तदनुसार विघटनशील मनेकाताई फरपटतात अतिसावध.
३. निशाचराच्या मकरंदराव दहीभातावर त्रिलोकेकर.
४. हरिहरन दणकट हिकमतीने प्रकाशराव दिल्याशिवाय.
५. मजल्यावरती सव्यसाचीला करावयास पूज्यदेवता सुस्थापित.
६. सबलीकरण कलीयुगात मावळताना घरातून लुकलुकले.
.............................................................
5 Jul 2020 - 2:39 pm | सत्यजित...
घटकानुसार?
5 Jul 2020 - 2:39 pm | सत्यजित...
लोकशाही
5 Jul 2020 - 2:57 pm | कुमार१
सत्यजित,
३. लोकशाही बरोबर.
२. घटकानुसार >>> हा अपेक्षित शब्द नाही ,पण तुम्ही जर शेवटी संपूर्ण अर्थपूर्ण वाक्यात बसवू शकलात, तर माझी हरकत नाही !
अंतिम उत्तर शेवटीच राहील.
5 Jul 2020 - 4:56 pm | सत्यजित...
पूर्वीच्या कोड्यांप्रमाणेच,एका शब्दातून एकच अक्षर निवडणे अपेक्षित आहे का?
5 Jul 2020 - 5:08 pm | सत्यजित...
राज्यव्यवस्था
5 Jul 2020 - 5:16 pm | कुमार१
होय.
५. राज्यव्यवस्था >>> बरोबर, छान !
5 Jul 2020 - 5:19 pm | कुमार१
पण,
समजा एखाद्याने कशाही प्रकारे ठराविक अक्षरांचा शब्द बनवला तरी चालेल.
शेवटी ते अर्थपूर्ण वाक्य 6 शब्द घेऊन तयार झाले पाहिजे ही अट आहे.
5 Jul 2020 - 5:56 pm | सत्यजित...
घटनेनुसार
5 Jul 2020 - 5:58 pm | कुमार१
घटनेनुसार >> आ हा, बरोब्बर !
निम्मी लढाई जिंकली ... :)
5 Jul 2020 - 6:00 pm | सत्यजित...
भारतीयांसाठी
5 Jul 2020 - 6:09 pm | कुमार१
भारतीयांसाठी
बरोबर, आता तुम्ही निघायचे !
झाले सामनावीर आत्ताच :))
5 Jul 2020 - 8:47 pm | कुमार१
हे राहिले:
४. हरिहरन दणकट हिकमतीने प्रकाशराव दिल्याशिवाय.
६. सबलीकरण कलीयुगात मावळताना घरातून लुकलुकले.
6 Jul 2020 - 8:58 am | आवडाबाई
कल्याणकारी ?
6 Jul 2020 - 9:41 am | कुमार१
कल्याणकारी ?
बरोबर छान
6 Jul 2020 - 10:50 am | कुमार१
हत्ती गेला, शेपूट (६) राहिले !
6 Jul 2020 - 5:23 pm | कुमार१
चे उत्तर तासाने लिहितो .
6 Jul 2020 - 6:29 pm | गणेशा
मला हे खुप अवघड जातेय.. नेहमी प्रमाणे :-))
6 Jul 2020 - 6:36 pm | कुमार१
६ = राबवलेली.
अंतिम वाक्य:
( भारतीयांसाठी घटनेनुसार लोकशाही) आणि (कल्याणकारी राज्यव्यवस्था राबवलेली ) आहे.
सत्यजित सर्वोत्तम !
धन्यवाद
7 Jul 2020 - 2:39 pm | आवडाबाई
नाहीच सापडला शेवटपर्यंत.
9 Jul 2020 - 2:44 pm | ज्ञानोबाचे पैजार
प्रायश्चित – आवडाबाइंचे बरोबर उत्तर चूक म्हटल्या मूळे प्रायश्चित म्हणून नवे गणित कोडे सादर करत आहे.
याचे उत्तर बरोबर का चूक ते मी देणार नाही. जो गणित सोडवेल त्यानेच ते उत्तर कसे आले ते ही लिहायचे आहे म्हणजे सोडवण्याच्या पायऱ्या लिहायच्या.
ते जर उत्तर बरोबर असेल तर बाकीचे पडताळा करुन त्याला बरोबर असे म्हणू शकतात पण जर कोणाला उत्तर चुकीचे वाटले तर त्याने बरोबर उत्तर इथे लिहायचे आहे, सोडवण्याच्या पायर्यांसकट. म्यान ऑफ द म्याच जाहिर करायला मी इथे परत येईन.
१. माझ्याकडे १२ कलिंगडे, जी सर्व एकाच मापाची-आकाराची आहेत. यातील १ कलिंगड १.५ किलो वजनाचे आहे व बाकी सगळी प्रत्येकी १ किलो वजनाची आहेत. फक्त एक वजनाचा तराजू (पण वजनाच्या मापांशिवाय) दिला असता केवळ ३ वेळा तराजू वापरुन हे जड कलिंगड कसे ओळखता येईल? हे अजून अवघड होईल जेव्हा आपल्याला वेगळे कलिंगड इतरांपेक्षा जड आहे की हलके हे माहित नसेल. त्या बद्दलही विचार करायला हरकत नाही (या दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर मला आलेले नाही)
२. एका कुटुंबात आई व मुलाच्या वयाची बेरीज बाबा व मुलीच्या वयाच्या बेरेजे इतकी आहे. आईचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट आहे. तर बाबा आई पेक्षा ५ वर्षांनी मोठे आहेत. कुटुंबातल्या सर्व सदस्यांचे एकूण वय ९६ आहे तर कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याचे वय सांगा
३. एका आयताच्या कर्णाची लांबी ५ सेमी आहे व त्याच्या एका बाजूची लांबी ३ सेमी आहे तर त्या आयाताचे क्षेत्रफळ किती?
४. १५४ वर्ग मीटर क्षेत्रफळ असलेल्या एका वर्तुळाकृती तलावा भोवती प्रत्येकी अर्धा मीटर अंतरावर मला काही कुंड्या ठेवायच्या आहेत तर मी एकूण किती कुंड्या विकत घेऊ?
५. एका मीटर उंची एका मिटर लांबी आणि एक मीटर रुंदी असलेल्या एका घनाचे १ सेंमी लांबी एक सेंमी रुंदी आणि १ सेंमी उंची असलेले समान तुकडे केले व हे तुकडे एकमेकांवर ठेवले तर त्यांची एकूण उंची किती भरेल?
६. मी नुकताच एका श्रीधर आणि राधाच्या लग्नाच्या १२ व्या वाढदिवसा निमित्त आयोजित केलेंल्या सामारंभाला गेलो होतो. त्यावेळी श्रीधर मला म्हणाला की ज्या वेळी आमचे लग्न झाले त्यावेळी राधा माझ्या तीन चतुर्थांश वयाची होती आणि आज ती माझ्या पाच षष्ठांश वयाची आहे. तर लग्नाच्या दिवशी त्या दोघांची वये काय असतील?
७. कुरियर बॉय हरीश ला १०० काचेचे ग्लास एका ठिकाणी पोचवायचे आहेत. प्रत्येक ग्लास न फोडता पोचवण्या करता त्याला ३ रुपये मिळणारा आहेत तर प्रत्येक फुटलेल्या ग्लासा करता त्याला ९ रुपये दंड भरावा लागणारा आहे. त्याने एकूण २४० रुपये मिळवले. तर त्याने प्रवासात किती ग्लास फोडले असतील?
८. सोनियाने ६०० रुपयांना एक प्रेशर कुकर विकत घेतला पण तो खराब निघाला. तिने तो तिच्या मैत्रिणीला ७०० रुपयांना विकून टाकला, पण मग तिला मैत्रिणीला फसवल्याचे वाईट वाटले म्हणून तिने तो कुकर तिच्या कडून ८०० रुपयांना विकत घेतला. मग एका जुने देऊन नवे घ्या स्कीम मध्ये तिने तो कुकर ९०० रुपयांना विकून टाकला. या व्यवहारात सोनियाला नफा झाला की तोटा? आणि किती?
९. पुणे ते मुंबई अंतर १८० किमी आहे. एक आगगाडी पुण्याहुन मुंबईला निघाली जिचा वेग ५० किमी प्रति तास आहे त्याच वेळी दुसरी आगगाडी मुंबई वरुन पुण्याला निघाली जिचा वेग ४० किमी प्रतितास इतका आहे. जेव्हा पुण्यावारुन गाडी निघाली त्याच वेळी त्या गाडीवर बसलेला एक कावळा गाडीवरुन उडाला आणि उडत उडत समोरून येणाऱ्या गाडीवर बसला व तसाच लगेच मागे फिरुन पहिल्या गाडीवर येउन बसला व लगेच मागे दुसऱ्या गाडी कडे उडाला. जो पर्यंत त्या गाड्या एकमेकासमोर येत नाहीत तो पर्यंत त्याचा हा प्रवास सुरु होता कावळ्याचा वेग जरा ताशी १०० किमी असेल तर त्या दिवशी तो कावळा किती अंतर उडाला?
१०. चार या आकड्याचा सोळा वेळा वापर करून व अधिक, वजा, गुणिले किंवा भागिले ह्या पैकी कोणतीही चिन्हे कितीही वेळा वापरुन तुम्ही बनवलेल्या गणिताचे उत्तर एक हजार आले पाहिजे
पैजारबुवा,
9 Jul 2020 - 3:11 pm | शा वि कु
मुलाचे वय 12, मुलीचे 7, आईचे 36, वडिलांचे 41.
मुलाचे वय क्ष मानले. आईचे वय 3क्ष झाले. वडिलांचे वय 3क्ष +5 झाले. मुलीचे वय य मानले. महितीवरून:
क्ष+3क्ष=3क्ष +5+य
यावरून य=क्ष-5
मग क्ष+3क्ष+3क्ष+5+क्ष-5=96
क्ष=12.
9 Jul 2020 - 9:11 pm | आवडाबाई
असेच काढले.
9 Jul 2020 - 9:30 pm | आवडाबाई
४४४+४४४+४४+४४+४+४+४+४+४+४=१०००
हे trial and error वापरून काढले, १६ वेळा वापरायचे होते म्हणून बेरीजच असेल असे वाटले.
9 Jul 2020 - 4:29 pm | सत्यजित...
प्रथम ६-६ कलिंगडे दोन बाजूस
यापैकी जी बाजू वजनदार असेल तीत १.५ किलोचे कलिंगड अलेल.
दुसर्या वेळी या सहापैकी ३-३ कलिंगडे दोन बाजूस
यापैकी जी बाजू वजनदार असेल तीत १.५ किलोचे कलिंगड अलेल
अता तीन कलिंगडे मिळाली ज्यात एक १.५ किलोचे आहे
तिसर्या वेळी या तीनपैकी कोणतीही दोन कलिंगडे दोन बाजूस ठेवली असता, जी बाजू वजनदार असेल त्या बाजूचे कलिंगड १.५ किलोचे असेल.दोनही बाजू समान असतील तर राहिलेले तिसरे कलिंगड १.५ किलोचे असेल!
9 Jul 2020 - 6:42 pm | गणेशा
उत्तरे न पाहता पहिले गणित सोडवताना माझ्याही ह्याच steps होत्या :-))
__^__
नंतरचे नंतर पाहतो
9 Jul 2020 - 9:11 pm | आवडाबाई
सेम असेच
9 Jul 2020 - 4:34 pm | सत्यजित...
कर्ण^२ =पाया^२+उंची^२
२५=क्ष^२ + ९
क्ष=४
आयताचे क्षेत्रफळ=लांबी x रुंदी
=४x३ =१२ चौ.सेमी
9 Jul 2020 - 9:34 pm | आवडाबाई
असेच
9 Jul 2020 - 4:43 pm | सत्यजित...
वर्तुळाचे क्षेत्रफळ=πxतत्रिज्या^२
१५४=२२/७ x क्ष^२
क्ष=७ मी.
वर्तूळाचे परीघ=2π x त्रिज्या
=४४/७ x ७
=४४ मी
प्रत्येकी अर्ध्या मी.वर एक कुंडी याप्रमाणे एकूण ४४x२=८८ कुंड्या खरेदी करा!
9 Jul 2020 - 9:12 pm | आवडाबाई
८७ ना? कारण शेवटची कुंडी पहिल्या कुंडीच्याच जागी येईल?
10 Jul 2020 - 4:18 am | सत्यजित...
प्रत्येक मीटरच्या सुरुवातीस एक व मध्यावर एक अश्या दोन कुंड्या येतील,शेवटची ८८ क्रमांकाची कुंडी ४४व्या मीटरच्या मध्यावर येईल.
9 Jul 2020 - 5:13 pm | सत्यजित...
मैत्रिणीस विकला तेंव्हा +१००
तिच्या आईकडून परत घेतला तेंव्हा नफ्याचे १०० जावून पदरचे १०० नुकसान
९०० रुपयांस विकला असता,मुद्दल ६०० व पदरमोड झालेले १०० वगळता,२०० रुपये निव्वळ नफा राहिल.
9 Jul 2020 - 9:18 pm | आवडाबाई
माझ्या स्टेप्स
-६००+७००-८००+९००=२००
9 Jul 2020 - 11:04 pm | सत्यजित...
हे आठव्या प्रश्नाचे उत्तर!
9 Jul 2020 - 5:22 pm | सत्यजित...
दोनही गाड्या विरुद्ध दिशेने एकमेकींच्या दिशेने धावत आहेत तेंव्हा त्यांच्या गती अनुसार,एका तासात त्यांच्यातील अंतर ५०+४०=९०किमी कमी होईल,तर दोन तासांत १८० किमी कमी होवून गाड्या समोरासमोर असतील!
कावळा ताशी १०० किमी वेगाने या दोन तासांत,अकूण २०० किमी उडाला.
9 Jul 2020 - 9:46 pm | आवडाबाई
समोरासमोर यायला २ तास लागतील इथ पर्यंत पोहोचले आणि पुढे काय लॉजिक लावायचे तेच नाही समजले.
MVP
9 Jul 2020 - 6:21 pm | पलाश
श्रीधरचे वय लग्नाचे वेळी (क्ष) असेल तर राधाचे वय (३/४ क्ष)
आता श्रीधरचे वय( क्ष +१२) तर राधाचे वय ५/६ (क्ष+१२) येते.
राधाचे वय =
३/४ क्ष + १२ = ५/६ (क्ष+१२)
३/४ क्ष + १२ = ५/६ क्ष +(५/६x१२)
१२-१० = (५/६क्ष - ३/४क्ष
२ x१२ = ५/६x१२क्ष - ३/४x१२क्ष
२४ = १०क्ष - ९क्ष =क्ष
लग्नावेळचे श्रीधरचे वय २४ व राधाचे वय १८ (३/४)
आजचे श्रीधरचे वय ३६ व राधाचे वय ३० (५/६)
9 Jul 2020 - 9:24 pm | आवडाबाई
मी अंदाजाने एक आकडा घेउन बघू म्हणून प्रयत्न करत होते आणि पहिलाच आकडा २४ धरला, तेच उत्तर निघाले :-)
पण क्ष धरून नंतर करुन पाहिले, ते असेच केले.
9 Jul 2020 - 9:30 pm | पलाश
मीपण!! :)
9 Jul 2020 - 7:00 pm | पलाश
७.
न फुटलेले ग्लास क्ष व फुटलेले ग्लास य मानले तर
क्ष + य = १००
क्ष = १०० - य.....(a)
३क्ष - ९य = २४०
३(१०० - य) - ९ य =२४०
३०० - ३य -९य = २४०
३०० - २४० = १२ य
६० = १२ य
य = ५ व क्ष = ९५ (प्रवासात य म्हणजे ५ ग्लास फुटले असतील.)
( ९५x३) - (५x९)
२८५ - ४५ = २४०
9 Jul 2020 - 9:25 pm | आवडाबाई
फक्त क्ष वापरून केले
9 Jul 2020 - 9:42 pm | आवडाबाई
५. १००० मीटर
9 Jul 2020 - 10:18 pm | डॅनी ओशन
एक राजपुत्र आहे, तो खजिन्याच्या शोधात आहे. तो शोधत शोधत एका गुहेत येतो. पुढे आल्यावर दोन रस्ते फुटलेले दिसतात. प्रत्येक रस्त्यावर एक द्वारपाल उभा असतो. बाजूच्या भिंतीवर नियम कोरलेले असतात, ते असे असतात-
एका रस्त्यातून पुढे गेल्यावर खजिना आहे, तर दुसऱ्या रस्त्यावर मृत्यू. ह्या दोन द्वारपाळांपैकी एक जण कायम खरं बोलतो तर एकजण कायम खोटं बोलतो. दोघांपैकी एकाला एकच प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्या एका प्रश्नाच्या उत्तरानंतर दोघे काहीही बोलणार नाहीत.
राजपुत्राने कोणता प्रश्न विचारायचा ?
9 Jul 2020 - 11:35 pm | आवडाबाई
पहिल्याला विचारायचा प्रश्न "मी दुसर्याला खजिन्याचा दरवाजा कोणता हे विचारले तर तो काय उत्तर देईल? " ह्याचे जे उत्तर मिळेल त्याच्या विरूद्ध रस्ता घ्यायचा.
9 Jul 2020 - 11:45 pm | आवडाबाई
आटपाट नगरात जर ५ चे ½=३ असतील तर ह्या न्यायाने १० चे ⅓ किती असतील?
10 Jul 2020 - 4:06 am | सत्यजित...
घनाचे घनफळ =बाजू^३
१ मी.= १००सेमी
मोठ्या घचेघ = १०००००० क्युसेमी
लहान घचेघ = १ क्युसेमी
म्हणजे एकूण १०००००० लहान आकाराचे घन तयार होतील.
प्रत्येकाची उंची १ सेमी असल्याने,एकावर एक ठेवले असता,
एकूण उंची = १०००००० सेमी
= १०००० मीटर
= १० किमी
10 Jul 2020 - 9:31 am | कुमार१
छान खेळलेत.
मजा आली.
10 Jul 2020 - 10:34 am | ज्ञानोबाचे पैजार
कोडं बनवायला जेवढा वेळ लागला नाही त्याच्या एक तृतिअंश वेळात सोडवले पण? पण मजा आली खेळताना.. सगळी उत्तरे बरोबर आहेत.

म्यान ऑफ द म्याच परत एकदा "सत्यजित"
10 Jul 2020 - 10:37 am | कुमार१
वरील गणिते छान झाली. त्यातून खेळाडूंचा मेंदू शिणला असेल ! तर चला आता पुन्हा एकदा चित्रपटांच्या विश्वात.
या नव्या खेळात तुम्हाला सहा मराठी चित्रपटांची नावे ओळखायची आहेत. त्यासाठी दोन प्रकारची माहिती दिली आहे :
१. चित्रपटाच्या नावांची अक्षरसंख्या अशी आहे:
२ चित्रपट तीन अक्षरी,
२ चित्रपट सहा अक्षरी,
१ पाच अक्षरी आणि
उरलेला आठ अक्षरी.
२. वरील सहा चित्रपटांत मिळून भूमिका केलेल्या कलाकारांची नावे एकत्र मिसळून पुढे दिली आहेत :
आनंद इंगळे, श्रेयस तळपदे, मोहन जोशी, संदीप कुलकर्णी, संजय मोने, जयवंत वाडकर,
वंदना गुप्ते, पल्लवी पाटील, कादंबरी कदम, मधुरा वेलणकर, अश्विनी भावे आणि पद्मिनी कोल्हापुरे.
३. आता तुम्ही असे करायचंय :
वरील कलाकारांच्या यादीतून एक अभिनेता आणि एक अभिनेत्री अशी एकाच चित्रपटात काम केलेली जोडी निवडायची. मग त्या जोडीची सांगड योग्य त्या अक्षर संख्येशी घालून चित्रपट ओळखायचा.
४.उत्तरांना क्रमांक नाही. ‘कलाकार जोडी आणि चित्रपट’ असे एकत्र लिहा.
५. एक जोडी वापरून ते उत्तर बरोबर ठरले की ती जोडी पुन्हा वापरू नका.
10 Jul 2020 - 12:15 pm | सत्यजित...
सरीवर सर
10 Jul 2020 - 12:19 pm | कुमार१
सरीवर सर >> सरी.
बरोबर.
छान सुरवात!
10 Jul 2020 - 2:50 pm | सत्यजित...
वाॅट्सअप लग्न
10 Jul 2020 - 2:56 pm | सत्यजित...
प्रवास
10 Jul 2020 - 3:00 pm | सत्यजित...
संजय-मधुरा-वंदना
मातीच्या चुली
10 Jul 2020 - 3:00 pm | कुमार१
चूक, कारण
"व्हाट्सअप लग्न" हे ७ अक्षरी आहे !
10 Jul 2020 - 3:03 pm | कुमार१
प्रवास, मातीच्या चुली >> बरोबर !
...
तुमची निघायची वेळ झाली, चला !
छान
10 Jul 2020 - 3:04 pm | सत्यजित...
क्लासमेट्स