✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • लेख
  • भटकंती
  • कविता

शब्दखेळ : विरंगुळा

ह
हेमंतकुमार यांनी
Sun, 05/24/2020 - 15:45  ·  लेख
लेख
शब्द्प्रेमींसाठी विरंगुळा खालील शब्दांना समानार्थी शब्द लिहा. प्रत्येक शब्द वै या अक्षरानेच सुरू व्हायला हवा. 1 ऐच्छिक : 2 अपूर्णता : 3 विष्णूचे स्थान : 4 वाचा : 5भिन्नता : 6काळी तुळस : 7 सावत्र : 8धन्वंतरी : 9कायदेशीर : 10 आश्चर्य : 11गरूड : 12 समृद्धी : 13 सीता : 14 ऐश्वर्य : 15 निष्फळता : 17 शत्रू : 18 चारा : 19 संन्यासी : 20 ओसाड : 21 कुबेर : २२. चतुर्वर्णापैकी एक : 23. विष्णूभक्त : 24 निज 25 सूड उगवणे : 26 लग्नाची एक पद्धत : 27 अग्नी :
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
भाषा
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
148937 वाचन

💬 प्रतिसाद (523)

प्रतिक्रिया

नवा खेळ ...

हेमंतकुमार
गुरुवार, 06/25/2020 - 14:35 नवीन
धन्यवाद ! नवा खेळ खाली काही निरर्थक वाक्ये दिली आहेत. एका वाक्याच्या प्रत्येक शब्दातील कुठलेही फक्त एक अक्षर तुम्ही बाजूला काढायचे. अशी त्या वाक्यातली निवडलेली अक्षरे क्रमाने ठेवली, की भारतातील एका गावाचे नाव तयार होते. ते नाव तुम्ही सांगायचे आहे. प्रत्येक शब्दातील एकच अक्षर घ्यायचे आहे आणि ते जसेच्या तसे वापरूनच गावाचे नाव तयार होते. एक उदाहरण देतो. हे वाक्य बघा : वासोट्याचा गलबला जपून सरकायचे. याचे उत्तर आहे : सोलापूर .................................... पहिल्या दोन कोड्यांत शब्दांच्या क्रमाने गेल्यावर तुम्हाला उत्तर मिळेल. पण पुढच्या चारांत (३-७) तसे नाही. तिथे शब्दक्रम विस्कटून दिला आहे. ती पातळी जरा अवघड जाईल. ............................... १. फक्कड सोलकढी गटवा दणदणीत. २. दगाफटका कारस्थान प्रभंजन प्रभागातले. ............................................................................. शब्दक्रम विस्कटून : ३.भवताल सामाजिक तातडीने कळले समयसूचक. ४.सौरचूल सदनात सुमंगल फिरवायची. ५.समजतात उठाठेवी गावाकडच्या कारभार्‍याला. ६.. नकोसे सहवास करायचाय सदेह प्रदूषण ७. कोणाच्याही अटकेपूर्वी बोलणार नगरातून आबासाहेब. ............................................... (गावांचे उच्चार ‘विकी’नुसार स्थानिक भाषेप्रमाणे).
  • Log in or register to post comments

मस्त आयडिया...

ज्ञानोबाचे पैजार
गुरुवार, 06/25/2020 - 15:27 नवीन
१. फलटण २. दरभंगा ३. यवतमाळ ४. मंदसौर पुढची तीन पण आली आहेत. पण कुमार१ सरांनी निवृत्ती घ्या असे सांगायच्या आधि एवढ्यावरच थांबतो पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

पैजारबुवा,

हेमंतकुमार
गुरुवार, 06/25/2020 - 15:29 नवीन
जोरदार सलामी ! सर्व बरोबर. विश्रांती... धन्यवाद ! ५ ६ ७ राहिले.
  • Log in or register to post comments

५.

सत्यजित...
गुरुवार, 06/25/2020 - 21:53 नवीन
उमरगा
  • Log in or register to post comments

६.

सत्यजित...
गुरुवार, 06/25/2020 - 21:53 नवीन
देहरादून
  • Log in or register to post comments

७ बागलकोट.

पलाश
गुरुवार, 06/25/2020 - 22:14 नवीन
७ बागलकोट.
  • Log in or register to post comments

छान !

हेमंतकुमार
Fri, 06/26/2020 - 08:10 नवीन
वरील सर्व बरोबर. मस्त ! या खेपेस ज्ञा पै सामनावीर ! मंदसौर या उत्तराबद्दल विशेष कौतुक. .............................................................................. शाळेत माझ्या वर्गात मंदसौरवाले नावाचा मुलगा होता. आतापर्यंत त्या आडनावाचा मी ऐकलेला एकमेव माणूस ! पण तेव्हापासूनच मला त्या गावाच्या नावाचे कुतूहल वाटत आले आहे.
  • Log in or register to post comments

हिंदी गाणी...

हेमंतकुमार
Sun, 06/28/2020 - 07:56 नवीन
संगीताच्या बाबतीत आपण बरेच लोक ‘कानसेन’ नक्कीच आहोत. आपले जितके मराठी गाण्यांवर प्रेम आहे, तितकेच हिंदी गाण्यांवर देखील. किंबहुना आपला एक कान मराठी तर दुसरा हिंदी गाणी ऐकण्यासाठी आसुसलेला असतो ! ... तर घेऊन आलोय पुन्हा एकवार गाण्यांचा खेळ पण.... अब की बार हिंदी गानोंके साथ ….. ………………………………………………………. इथे तुम्हाला हिंदी चित्रपटातील गाणे ओळखायचे आहे. त्यासाठी प्रत्येक गाण्याची शोधसूत्रे अशी दिली आहेत: १. गाण्याच्या ध्रुवपदातील दोन शब्दांचे समानार्थी किंवा भावार्थी मराठी शब्द, आणि २. त्या गाण्यासंबंधी काही वैशिष्ट्यपूर्ण माहिती. गाणे ओळखल्यावर ध्रुवपद पूर्ण लिहावे. ……………………………………………… १. गाणे, जगणारे हे गाणे असलेला चित्रपट मूळ तेलुगुचा ‘रिमेक’ आहे. .................................................... २. संध्याकाळ, आठवण याचे गीतकार कवी आणि पटकथाकारही होते. सुरवातीस त्यांनी कारकुनाची नोकरी केली. ................................................. ३. सोबत, गाणे याच्या गायकांनी देशभक्तीपर हिंदी आणि अन्य मराठी गाणीही गायली. ................................................................ ४. हाच, क्षण याचे जे गीतकार, त्यांची आयुष्यात दोन कलाकारांशी असफल प्रेमप्रकरणे झाली. .......................................... ५. आनंद, दुःख या गाण्याची चाल याच्या संगीतकारांनी आपल्याच एका बंगाली गाण्यावरून घेतलीय. .................................................... ६. नोकर, चांगुलपणा याचे संगीतकार एकेकाळी नट आणि गायक देखील होते. ................................................................ ७. आयुष्य, ऊन. याचे गीतकार पटकथाकार देखील. त्यांना विज्ञान क्षेत्रातला एक परदेशी पुरस्कार पण आहे. ……………………………………………………………………………………………..
  • Log in or register to post comments

२. फिर वोहि शाम वोहि गम वोहि

मराठी_माणूस
Sun, 06/28/2020 - 08:26 नवीन
२. फिर वोहि शाम वोहि गम वोहि तनहाई है, दिल को समझाने तेरी याद चली आई है
  • Log in or register to post comments

३. तुम अगर साथ देने का वादा

मराठी_माणूस
Sun, 06/28/2020 - 08:28 नवीन
३. तुम अगर साथ देने का वादा करो, मैं यूँ ही मस्त नग़में लुटाता रहूँ
  • Log in or register to post comments

४.आगे भी जाने ना तू, पीछे भी

मराठी_माणूस
Sun, 06/28/2020 - 08:31 नवीन
४.आगे भी जाने ना तू, पीछे भी जाने ना तूजो भी है बस यही एक पल है
  • Log in or register to post comments

७. तुमको देखा तो ये ख़याल आया

मराठी_माणूस
Sun, 06/28/2020 - 08:54 नवीन
७. तुमको देखा तो ये ख़याल आया ज़िन्दगी धूप तुम घना साया.
  • Log in or register to post comments

छान !

हेमंतकुमार
Sun, 06/28/2020 - 09:26 नवीन
मस्तच.... २, ३,४ अगदी बरोबर. ७ पर्यायी उत्तर म्हणून बरोबर. माझे वेगळे होते. कोणी ते ओळखतय का बघू . ............................................. आता तुम्ही इथून विश्रांती घ्यावी ! :))
  • Log in or register to post comments

थांबतो. कोड्यासाठी धन्यवाद.

मराठी_माणूस
Sun, 06/28/2020 - 10:20 नवीन
थांबतो. कोड्यासाठी धन्यवाद. बाकीच्या गाण्यांबद्दल उत्सुकता आहेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

१. एक बंजारा गाए, जीवन के गीत

पलाश
Sun, 06/28/2020 - 12:45 नवीन
१. एक बंजारा गाए, जीवन के गीत सुनाए हम सब जीने वालों को, जीने की राह बताए
  • Log in or register to post comments

होय,

हेमंतकुमार
Sun, 06/28/2020 - 12:47 नवीन
१. एक बंजारा गाए, >>> बरोबर, छान !
  • Log in or register to post comments

५. प्यार दिवाना होता है,

पलाश
Sun, 06/28/2020 - 13:00 नवीन
५. प्यार दिवाना होता है, मस्ताना होता है हर खुशी से हर गम से, बेगाना होता है
  • Log in or register to post comments

छान !

हेमंतकुमार
Sun, 06/28/2020 - 13:23 नवीन
५. प्यार दिवाना होता है >> हेही बरोबर. .................................. ६ राहिले आणि ७ चे सुधारित सूत्र देतो : जमल्यास माझे गाणे ओळखा. ७. आयुष्य, ऊन, क्षण .
  • Log in or register to post comments

७ ये जीवन है इस जीवन का यही

Prajakta२१
Sun, 06/28/2020 - 14:56 नवीन
७ ये जीवन है इस जीवन का यही है रंगरूप -पिया का घर मधले किंवा कल हो ना हो चे टायटल सॉंग हर घडी बदल रही है रूप जिंदगी छाव है कहीं कहीं है धूप जिंदगी
  • Log in or register to post comments

छान !

हेमंतकुमार
Sun, 06/28/2020 - 15:12 नवीन
हर घडी बदल रही है रूप जिंदगी छाव है कहीं कहीं है धूप जिंदगी >>> होय, हेच ! ... ६ चा विजयी षटकार कोण मारणार !
  • Log in or register to post comments

६. ऐ मालिक तेरे बंदे हम,

पलाश
Sun, 06/28/2020 - 16:27 नवीन
६. ऐ मालिक तेरे बंदे हम, ऐसे हो हमारे करम नेकी पर चले, और बदी से टले ताकी हसते हुए निकले दम
  • Log in or register to post comments

छान !

हेमंतकुमार
Sun, 06/28/2020 - 16:51 नवीन
वा पलाश, बरोबर !
  • Log in or register to post comments

समारोप..

हेमंतकुमार
Sun, 06/28/2020 - 17:34 नवीन
आपणा सर्वांच्या सहभागाने खेळ छान झाला. म मा, पलाश आणि प्राजक्ता, छान. हे कोडे रचतानाचे काही अनुभव: सुरुवातीस दोन शब्द आणि शब्दसंख्या देणार होतो. पण मराठी गाण्यांच्या तुलनेत इथे ध्रुवपद हा गोंधळाचा भाग आहे. काही दोन ओळींची तर काही चार ओळींची. पुन्हा कित्येकदा चारोळी झाल्यावर पहिली ओळ पाचवी म्हणून तीच येते. तसेच, काही शब्द जे आपण मराठीत जोडून लिहितो ते हिंदीत तोडून लिहिलेले आढळतात. त्यामुळे शब्दसंख्या हा वादग्रस्त मुद्दा होऊ शकतो. म्हणून अन्य वैशिष्ट्यांचा पर्याय निवडला. गाणे ओळखण्याच्या दृष्टिकोणातून शब्दसंख्या ठीक, की अन्य वैशिष्ट्य देणे ठीक, याबद्दल तुमचे अनुभव जाणण्यास उत्सुक. एकंदरीत संगीत रजनी छान झाली. सर्वांना धन्यवाद !
  • Log in or register to post comments

आजचे कोडे पण आवडले

आवडाबाई
Sun, 06/28/2020 - 18:17 नवीन
जेव्हा गाण्याचे वैशिष्ट्य दिले असेल तेव्हा गाणे ओळखण्या बरोबरच त्या क्लूचे उत्तर पण दिले तर जास्त मजा येईल (गाणे ओळखणार्याने ते आधीच ओळखलेले असते, फक्त उत्तरामधे लिहायचे आहे) शब्दसंख्या हा वादग्रस्त मुद्दा होऊ शकतो - सहमत. की अन्य वैशिष्ट्य देणे ठीक - ह्या मुळे थोडी तरी गाणी ओळखू आली :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

धन्यवाद. _/\_

पलाश
Sun, 06/28/2020 - 19:14 नवीन
धन्यवाद. _/\_ अन्य वैशिष्ट्ये गाणे शोधण्यासाठी सोयीची वाटत आहेत. आजचे कोडे सोडवताना नवीन गोष्टी माहीत झाल्या. बंगाली भाषेतल्या ज्या गाण्याच्या चालीवर ५. "प्यार दिवाना होता है, मस्ताना होता है" गाण्याची चाल आधारित आहे ते गाणं https://gaana.com/song/gun-gun-gun-kunje-amar या लिंकवर ऐकता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

वैशिष्ट्यांची उत्तरे

हेमंतकुमार
Sun, 06/28/2020 - 19:03 नवीन
आवडाबाई धन्यवाद. मुद्दा एकदम पटला. आता मी सर्व वैशिष्ट्यांची उत्तरे एकत्र लिहितो : ………………………………………………………. १. हे गाणे असलेला चित्रपट मूळ तेलुगुचा ‘रिमेक’ आहे. २. याचे गीतकार कवी आणि पटकथाकारही होते. सुरवातीस त्यांनी कारकुनाची नोकरी केली. राजिंदर कृष्ण. ३. याच्या गायकांनी देशभक्तीपर हिंदी आणि अन्य मराठी गाणीही गायली. महेंद्र कपूर ४. याचे जे गीतकार, त्यांची आयुष्यात दोन कलाकारांशी असफल प्रेमप्रकरणे झाली. साहीर लुधियानवी ५. या गाण्याची चाल याच्या संगीतकारांनी आपल्याच एका बंगाली गाण्यावरून घेतलीय. आर डी बर्मन ६. याचे संगीतकार एकेकाळी नट आणि गायक देखील होते. वसंत देसाई ७. याचे गीतकार पटकथाकार देखील. त्यांना विज्ञान क्षेत्रातला एक परदेशी पुरस्कार पण आहे. जावेद अख्तर (रिचर्ड डॉकिन्स पु). ……………………………………………………………………………………………..
  • Log in or register to post comments

सुधारणा ..

हेमंतकुमार
Sun, 06/28/2020 - 19:04 नवीन
वर असे वाचावे: १. हे गाणे असलेला चित्रपट मूळ तेलुगुचा ‘रिमेक’ आहे. जीने की राह
  • Log in or register to post comments

मज्जा आली.. 1-2 गाणी येत होती

गणेशा
Sun, 06/28/2020 - 19:55 नवीन
मज्जा आली.. 1-2 गाणी येत होती.. उलट ते कल हो ना हो या गाण्यावरून सलाम नमस्ते मधले.. ' तू जहाँ.. मै वहा.... जो धूप निकले छाया बन जाऊंगा ' हे गाणे आठवले.. जुनी आठवण सगळे कंपनीचे मित्र मैत्रिणी पहिल्यांदा एकत्र गेलो होतो ह्या सिनेमाला ते आठवले.. मज्जा आली.. नंतर हेच गाणे ऐकत बसलो आणि प्राजक्ता यांनी उत्तर दिले बहुतेक तोपर्यंत.. पण मज्जा आली.. कोडी सोडवण्यात थोडा भाग घेता आला नाही पण मज्जा आली.
  • Log in or register to post comments

सुसंवाद....

हेमंतकुमार
Sun, 06/28/2020 - 20:13 नवीन
पलाश, बंगाली गाणे ऐकले. छान आहे. (एकदा 'पलाश' या मधुर नावाबद्दल काही विशेष अर्थ असल्यास जरूर सांगणे !) गणेशा, धन्यवाद. या सुसंवादातच खरी मजा येते. आता थोडेसे अधिक : १.जेव्हा कोडेनिर्माता शब्दसंख्या देतो (आणि ती जर वादातीत असेल तर) तेव्हा निर्मात्याच्या मनातले गाणे हेच ओळखण्याचे एकमेव गाणे ठरते. हे थोडेसे दोन व्यक्तींचे डीएनए जुळण्याची शक्यता अति अत्यल्प असते, यासारखा प्रकार आहे. २. याउलट आजच्या खेळावरून एक दिसून येईल. जेव्हा वैशिष्ट्ये या निकषावर गाणे ओळखले जाते, तेव्हा एकासारखी दोन-तीन गाणी निघू शकतात. मग त्यांना पर्यायी उत्तर म्हणून बरोबर द्यावेच लागते !
  • Log in or register to post comments

सदस्यनाम घेताना फुलांची,

पलाश
Sun, 06/28/2020 - 21:20 नवीन
सदस्यनाम घेताना फुलांची, झाडांची नावे पहात होते. मराठीतल्या "पळसाला पाने तीन" मधल्या पळसाचं "पलाश" हे संस्कृृृत नाव आवडलं. ते सदस्यनाम घेतलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

पळसाचं "पलाश" हे संस्कृृृत

हेमंतकुमार
Sun, 06/28/2020 - 21:37 नवीन
पळसाचं "पलाश" हे संस्कृृृत नाव
/>>>> अरे वा, छान माहिती शुभेच्छा !
  • Log in or register to post comments

आता थोडे इतिहासात डोकावूया...

ज्ञानोबाचे पैजार
Mon, 06/29/2020 - 16:59 नवीन
हा पाचवीचा इतिहास असल्याने वल्ली, मनो व दुर्गविहारी यांनी कृपया पंचाची भूमिका स्वीकारावी इ. १ -भारताची राजमुद्रा सारनाथ येथील अशोक स्तंभाच्या आधारे तयार करण्यात आली आहे. या अशोक स्तंभावर एकूण किती प्राण्यांच्या प्रतिमा आहेत? इ . २- सातवाहन वंशातला शेवटचा राजा इ. ३ - छत्रपती शिवाजी महाराजांनी कालगणनेसाठी सुरु केलेल्या नव्या शकाचे नाव काय होते? इ. ४- कनिष्काच्या दरबारातील एका प्रसिद्ध वैद्य इ. ५- पुरंदर च्या तहात २३ किल्ले गमावल्या नंतर शिवाजी महाराजांनी त्यातला कोणता किल्ला पहिल्यांदा काबीज केला? इ. ६- शिवाजी महाराजांच्या पणजोबांचे नाव काय होते? इ. ७- ४० वर्षांच्या आयुष्यात ४७ लढाया जिंकणारा मराठा योध्दा इ. ८- छत्रपती राजारामांनी यांच्या कामगिरी वर खुष होऊन त्यांना ‘सरखेल’ हा किताब दिला इ. ९- १८५७ च्या उठावातील एक प्रसिद्ध सेनानी ज्यांचे मुळ नाव रामचंद्र पांडुरंग भट असे होते इ. १०- दिल्लीच्या गादीवर बसणारा पहिला मुसलमान सुलतान व गुलाम घराण्याचा संस्थापक पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

सुरवात..

हेमंतकुमार
Mon, 06/29/2020 - 17:19 नवीन
रामचंद्र पांडुरंग भट>>> तात्या टोपे
  • Log in or register to post comments

इ. १- चार

गणेशा
Mon, 06/29/2020 - 18:24 नवीन
इ. १- चार
  • Log in or register to post comments

म्हणजे चार सिंह आहेत वरती,

गणेशा
Mon, 06/29/2020 - 18:28 नवीन
म्हणजे चार सिंह आहेत वरती, आणि त्याखालील गोलाकार भागात, चार प्राणी - बैल, हत्ती, घोडा आणि सिंह.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

इ. ५- कोंडाणा?

गणेशा
Mon, 06/29/2020 - 18:37 नवीन
इ. ५- कोंडाणा?
  • Log in or register to post comments

आता थांबतो.. पुढील काही

गणेशा
Mon, 06/29/2020 - 18:40 नवीन
आता थांबतो.. पुढील काही प्रश्नांची उत्तरे येतायेत.. पण बेसिक प्रश्न आहेत खूपच सोप्पे :-)
  • Log in or register to post comments

६ बाबाजी राजे भोसले

हेमंतकुमार
Mon, 06/29/2020 - 20:49 नवीन
६ बाबाजी राजे भोसले
  • Log in or register to post comments

आता पर्यंत आलेली

ज्ञानोबाचे पैजार
Tue, 06/30/2020 - 08:44 नवीन
१, ९ ५, ६ सगळी उत्तरे बरोबर आहेत..
पण बेसिक प्रश्न आहेत खूपच सोप्पे :-)
परवा माझ्या मुलीचे इतिहासाचे पुस्तक चाळत होतो त्यातल्या धड्या खाली दिलेल्या प्रश्र्णांवरुन हे कोडे बनवले आहे. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

2.

सत्यजित...
Tue, 06/30/2020 - 16:35 नवीन
२.पुलुमावी ३.शिवशक ४.चरक ७.थोरले बाजीराव ८.सरखेल कान्होजी अंग्रे १०.कुतुबुद्दीन ऐबक
  • Log in or register to post comments

और ये लगा सिक्सर

ज्ञानोबाचे पैजार
Tue, 06/30/2020 - 16:43 नवीन
सत्यजित... फिरसे मॅन ऑफ द मॅच पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सत्यजित...

मस्त. 2 माहित नव्हते..

गणेशा
Wed, 07/01/2020 - 00:45 नवीन
मस्त. 2 माहित नव्हते..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सत्यजित...

छान

Prajakta२१
Wed, 07/01/2020 - 00:01 नवीन
छान गाणी आणि ह्या कोड्याची उत्तरे सापडेपर्यंत आली सुद्धा ए मलिक तेरे बंदे हम --- हे तर काखेत कळस गावाला वळसा असे झाले मला मदनमोहन यांचे एखादे गाणे वाटले होते सर्वांना धन्यवाद पुलुमावी ---माहितीबद्दल धन्यवाद मला शालिवाहन वाटले होते
  • Log in or register to post comments

नागरिकशास्त्र !

हेमंतकुमार
Wed, 07/01/2020 - 18:03 नवीन
वर इतिहास छान झाला. आता यावेळेस घेऊया थोडे नागरिकशास्त्र. खाली ५ निरर्थक वाक्ये दिली आहेत. त्यातील शब्दांचा क्रमही विस्कटलेला आहे. प्रत्येक वाक्यात नागरिकशास्त्राचा एक शब्द दडलेला आहे. योग्य ती अक्षरे उचलल्यावर तो तयार होईल. अशा प्रत्येक शब्दाची अक्षरसंख्या संबंधित वाक्याच्या शब्दसंख्येइतकी आहे. असे एकूण पाच शब्द (अनुक्रम १ ते ५) तयार करा. ते तयार झाल्यावर खालील गोष्टी जुळल्या पाहिजेत: * शब्द १ आणि २ एका कृतीने जोडले आहेत. * शब्द ३ ते ५ ची उत्तरे एकत्र लिहिल्यास एकजण तयार होतो. ……………………………………………………………………………….. १. सचेतन सगळेजण सारीपाटावर अनाकलनीय सौभाग्यकांक्षिणी २. आमच्याकडे घनदाट शेतजमिनीमध्ये शेंगदाणे. ३. मनसोक्त सुभानरावांच्या कसल्यातरी सुधारणा अविस्मरणीय. ४. सुकाणूला चकविण्यासाठी धडकला अनिकेतराव बावरलेला. ५. खरीदायची विकायसाठी अज्ञानीला विधिलिखित. ...........................
  • Log in or register to post comments

२. मतदान ४. निवडणूक

पलाश
Wed, 07/01/2020 - 19:07 नवीन
२. मतदान ४. निवडणूक
  • Log in or register to post comments

पलाश,

हेमंतकुमार
Wed, 07/01/2020 - 19:14 नवीन
२, ४ बरोबर , छान
  • Log in or register to post comments

५.

सत्यजित...
Wed, 07/01/2020 - 19:29 नवीन
५.अधिकारी
  • Log in or register to post comments

वा

हेमंतकुमार
Wed, 07/01/2020 - 19:31 नवीन
५.अधिकारी >>> बरोबर..
  • Log in or register to post comments

३.

सत्यजित...
Wed, 07/01/2020 - 19:44 नवीन
मतसुविधा??
  • Log in or register to post comments

-१

हेमंतकुमार
Wed, 07/01/2020 - 19:53 नवीन
मतसुविधा?? >> चूक
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा