तुका म्हणाला
उरलो आता
उपकारापुरता ...
मी म्हणालो
उरलो आता
भिंतीवरल्या
फोटोपुरता.
नुरली शक्ती
विरली काया
शिथिली गात्रे
आटली माया ...
उरलो आता
भिंतीवरल्या
फोटोपुरता.
खपलो झिजलो
कोड चोचले
देहाचे पुरवाया ...
उरलो आता
भिंतीवरल्या
फोटोपुरता.
वाटले -
जिंकेन जग.
लोळेन -
सुखात मग.
धडपडलो - कडमडलो
नको तिथे अन गेलो वाया ...
उरलो आता
भिंतीवरल्या
फोटोपुरता.
हताश फिरलो
उदासवाणा
शोधत फिरलो
विगतदिनांच्या
पुसलेल्या त्या पादखुणा ...
उरलो आता
भिंतीवरल्या
फोटोपुरता.
हताश फिरलो
उदासवाणा
शोधत फिरलो
विगतदिनांच्या -
पुसलेल्या त्या पादखुणा ...
उरलो आता
भिंतीवरल्या
फोटोपुरता.
एके दिवशी आणि अचानक
उन्मळला चैतन्य-झरा
विस्मयलो गहिंवरलो आणिक -
अनुभवाला आनंद- सोहळा
उचलला-
कुंचला -
रंग झराले झरा झरा
सूख दाटले -
दुःख आटले -
चित्र रंगले भरा भरा
उरलो आता
भिंतीवरल्या -
..
..
रित्या चौकटी
भरण्याला
चित्रानंदी लावुनि टाळी
गीत सृजेचे गाण्याला...
प्रतिक्रिया
25 Nov 2019 - 5:16 am | जॉनविक्क
25 Nov 2019 - 12:23 pm | खिलजि
काका छान लिहलंय .. माणसाचं आयुष्य हे शोधण्यातच जातं .. इथे जन्माला येणार प्रत्येक जीव , एका अश्या कलेत पारंगत असतो कि तो त्या कलेच्या साहाय्याने लोकांच्या हृदयावर राज्य करू शकतो .. पण दुर्दैवाने तीच कला , नव्यान्नव टक्के लोकांना उभी हयात समजत नाही .. ज्यांना संमजते ते राज्य करतात आणि नाही ते फोटोमध्ये जागा मिळवतात ..
नैपुण्य फार इथे , पण तो जीव वेगळा ,,, पुण्य करा हो मायबाप , जेणे होईल संततीचे मोजमाप .. घडावा पुन्हा ते शिवराय घरोघरी ... हेचि मागणे त्या ईश्वरादारी ..
25 Nov 2019 - 3:58 pm | ज्ञानोबाचे पैजार
आवडली कविता
पैजारबुवा,
25 Nov 2019 - 4:19 pm | यशोधरा
आवडली, कैच्या कै काही नाही, निश्चित.
25 Nov 2019 - 8:50 pm | पाषाणभेद
तेच म्हणतो. छान आहे.
25 Nov 2019 - 8:46 pm | शशिकांत ओक
तुझे गीत गाण्यासाठी... आपण केलेल्या कित्येक कलाकृतीतून आनंद वनभुवनी अवस्था झळकते.
26 Nov 2019 - 4:09 pm | मुक्त विहारि
आवडली