✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

उरलो आता भिंतीवरल्या ...  

च — चित्रगुप्त, Mon, 11/25/2019 - 05:11
तुका म्हणाला  उरलो आता  उपकारापुरता ...  मी म्हणालो उरलो आता  भिंतीवरल्या फोटोपुरता. नुरली शक्ती विरली काया  शिथिली गात्रे  आटली माया ... उरलो आता  भिंतीवरल्या फोटोपुरता. खपलो झिजलो  कोड चोचले  देहाचे पुरवाया ... उरलो आता  भिंतीवरल्या फोटोपुरता. वाटले - जिंकेन जग.  लोळेन -  सुखात मग.  धडपडलो - कडमडलो  नको तिथे अन गेलो वाया ... उरलो आता  भिंतीवरल्या फोटोपुरता.   हताश फिरलो  उदासवाणा  शोधत फिरलो  विगतदिनांच्या  पुसलेल्या त्या पादखुणा ... उरलो आता  भिंतीवरल्या फोटोपुरता.  हताश फिरलो  उदासवाणा  शोधत फिरलो  विगतदिनांच्या - पुसलेल्या त्या पादखुणा ... उरलो आता  भिंतीवरल्या फोटोपुरता.   एके दिवशी आणि अचानक  उन्मळला चैतन्य-झरा  विस्मयलो गहिंवरलो आणिक - अनुभवाला आनंद- सोहळा  उचलला- कुंचला -  रंग झराले झरा झरा  सूख दाटले - दुःख आटले - चित्र रंगले भरा भरा  उरलो आता  भिंतीवरल्या - .. .. रित्या चौकटी  भरण्याला  चित्रानंदी  लावुनि टाळी  गीत सृजेचे गाण्याला...   

प्रतिक्रिया द्या
10121 वाचन

💬 प्रतिसाद (11)

सिक !

जॉनविक्क
Mon, 11/25/2019 - 05:16 नवीन
  • Log in or register to post comments

काका छान लिहलंय .. माणसाचं

खिलजि
Mon, 11/25/2019 - 12:23 नवीन
काका छान लिहलंय .. माणसाचं आयुष्य हे शोधण्यातच जातं .. इथे जन्माला येणार प्रत्येक जीव , एका अश्या कलेत पारंगत असतो कि तो त्या कलेच्या साहाय्याने लोकांच्या हृदयावर राज्य करू शकतो .. पण दुर्दैवाने तीच कला , नव्यान्नव टक्के लोकांना उभी हयात समजत नाही .. ज्यांना संमजते ते राज्य करतात आणि नाही ते फोटोमध्ये जागा मिळवतात .. नैपुण्य फार इथे , पण तो जीव वेगळा ,,, पुण्य करा हो मायबाप , जेणे होईल संततीचे मोजमाप .. घडावा पुन्हा ते शिवराय घरोघरी ... हेचि मागणे त्या ईश्वरादारी ..
  • Log in or register to post comments

मस्त लिहीले आहे

ज्ञानोबाचे पैजार
Mon, 11/25/2019 - 15:58 नवीन
आवडली कविता पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

आवडली, कैच्या कै काही नाही,

यशोधरा
Mon, 11/25/2019 - 16:19 नवीन
आवडली, कैच्या कै काही नाही, निश्चित.
  • Log in or register to post comments

तेच म्हणतो. छान आहे.

पाषाणभेद
Mon, 11/25/2019 - 20:50 नवीन
तेच म्हणतो. छान आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

झरझर कुंचला रंगला... तुझे गीत गाण्यासाठी...

शशिकांत ओक
Mon, 11/25/2019 - 20:46 नवीन
तुझे गीत गाण्यासाठी... आपण केलेल्या कित्येक कलाकृतीतून आनंद वनभुवनी अवस्था झळकते.
  • Log in or register to post comments

छान आहे. ..

मुक्त विहारि
Tue, 11/26/2019 - 16:09 नवीन
आवडली
  • Log in or register to post comments

सुंदर

कर्नलतपस्वी
Wed, 10/26/2022 - 18:31 नवीन
भिंतीवरची जागा नक्की आज नाही तर उद्या,परवा केंव्हातरी नक्कीच पक्की जन्मा आलो तेव्हांच ठरले म्हणून काय कुणी जगणे सोडले आजचा दिवस माझा आहे आज तर जगून घेऊ चिंता कशाला उद्याची उद्याचे उद्या बघुन घेऊ
  • Log in or register to post comments

सुरुवातीच्या ओळी वाचून

चौथा कोनाडा
Fri, 10/28/2022 - 08:02 नवीन
सुरुवातीच्या ओळी वाचून उदासायला झालं.... भिवविती संध्या छाया... चे सावट बघून कातर होणे साहजिकच पण.. कुंचला - रंग झराले झरा झरा सूख दाटले - दुःख आटले - हे वाचलं आणि उमलायला झालं. चिगु साहेब आपल्या कलेने अतीव आनंद दिला आहे... तो असाच मिळत राहील त्याची खात्री या रचनेने मिळाली. येऊ द्यात तुमचे लेख अन् कलाकृती ! आणि ही रचना अर्थातच आवडली.
  • Log in or register to post comments

सकारात्मक कविता आवडली.

श्वेता व्यास
Fri, 10/28/2022 - 10:10 नवीन
सकारात्मक कविता आवडली.
  • Log in or register to post comments

व्याप कमी करण्याचा उपद्व्याप करून आता पुन्हा...

चित्रगुप्त
Fri, 10/28/2022 - 13:52 नवीन
कर्नल तपस्वी, चौथा कोनाडा आणि श्वेता व्यास, कविता आवडली हे वाचून समाधान वाटले. अनेक आभार. गेले संपूर्ण वर्ष विविध व्यापात व्यतीत झाले, त्यातून चित्रकला आणि लेखन झाले नाही. आपले व्याप कमी करणे, हाच एक मोठा व्याप (उपद्व्याप) असतो याची प्रचिती या एका वर्षात आली. आधी (दिल्लीजवळील) घराची दुरुस्ती आणि नंतर ते विकून 'आपुल्या गावी' स्थानांतरित होणे यात वर्ष गेले. मात्र आता पुन्हा नवीन उत्साहाने जीवनाला सामोरे जाण्याची सुरुवात दहा दिवस एकट्याने 'रोम' परिसरात भटकंती करण्यातून झालेली आहे. आणखी स्थळे हुडकतो आहे, चित्रकलेचीही सुरुवात केली आहे.
आपल्या कलेने अतीव आनंद दिला आहे... तो असाच मिळत राहील त्याची खात्री या रचनेने मिळाली. येऊ द्यात तुमचे लेख अन् कलाकृती !
असे प्रतिसाद खूपच प्रेरणादायी असतात. आता नक्की करतो.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा