चुलत,आत्ये,मामे,मावस भाऊ विवाह आणि वैद्यकीय, जनुकीय आणि सामाजिक प्रश्न

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
20 Jun 2018 - 8:44 am
गाभा: 

* मराठीतील म्हणी वाच्यार्थाने नव्हे लक्ष्यार्थाने घ्यायच्या असतात . म्हणी या मराठी भाषेची भाषिक संपत्ती आहेत . त्याचे अर्थ समजले नाही तर चुकीचे निष्कर्ष काढण्यापुर्वी संबंधीत लेखक भाषातज्ञांकडून नीट समजावून घ्यावे

धागा चर्चेत शत्रुचा शत्रू तो आपला मित्र या न्यायाने त्यांच्या व्याह्यांच्या तबेल्यातल्या उणीवा झाकू इच्छित आमच्याही घरात उणिवा आहेतच की म्हणण्यसाठी आले आहेत आणि त्यांचे म्हणणे बरोबरच आहे हे आम्ही मोठ्या मनाने स्विकारतो पण तरीही आम्हाला त्यांच्या व्याह्यांच्या तबेल्यातील उणीवा दिसतातच त्यास आमचा नाईलाज आहे. ते असो

धागा चर्चेत आमचे पुरोगामी आणि नास्तिक मित्र आलेच आहेत तर त्यांच्या साठी आम्ही काही अधिक चर्चांचे आयोजन केले आहे तेथेही त्यांना सादर निमंत्रण आहे.

* कितीसा पुरोगामी आहेस ?

* Where the mind is without fear कवितेचा अनुवाद हवा आहे.

* मुस्लीमांमधली पडदा पद्धती योग्य आहे काय ? (खर म्हणजे तो धागा एकालच टार्गेट करून लिहिलेला नाही पण एकाला टार्गेट नाही केले तर समाज सुधारणांची चर्चा पुरोगामी नास्तिक पुढे नेत नाहीत कारण ते एकतर्फी अंधश्रद्धात गुरफटलेले असतात असा आमचा दावा आहे, म्हणून पुरोगामी आणि नास्तिकांसाठी त्या लेखाचे शीर्षक तात्पुरते बदलत आहे.

* पुरोगामी आणि नास्तीकांची वैचारीक भूक शमवण्यासाठी 'मुस्लीम सत्यशोधक समाज' असा एक धागा चर्चा काढणार आहे पुरोगामी आणि नास्तिकांनी धाग्यावर वैचारीक भूक शमवण्याची पूर्वतयारी करून ठेवण्याचे आवाहन आहे.

* ज्यांची पुरोगामी वैचारीक भूक कमी आहे त्यांच्या साठी सुद्धा चर्चा धागे आहेत
** संस्कृती आणि धर्म यातील गल्लत
** 'सर्व'-समावेशक सण आणि उत्सवांचे महत्व
** कुराण आणि हदिथ मधील कोणत्या चांगल्या गोष्टी हिंदू आणि भारतीय संस्कृतीस एकमनाने घेता येऊ शकतील ?
** आईचा समभाव, वडीलांची तटस्थता न्याय्य निष्पक्षता यांच्या वरील पक्षपाताच्या टिकेचे आव्हान
** १५ ऑगस्ट इ.स.२९४७ चे आवाहन आणि अभिनंदन संदेश

*** इतर धागा निमंत्रण जाहीरात समाप्त ***

*** या धागा लेखाचे आधीचे शीर्षक : चुलत विवाह आणि वैद्यकीय व जनुकीय प्रश्न ***

या धागा चर्चेतून आता पर्यंत पुढे आलेली माहिती

* ( चुलत,आत्ये,मामे,मावस) भाऊ-बहीण विवाहातून होणार्‍या संतती जन्मतः व्याधीग्रस्त होण्याचा बर्‍यापैकी संभव असतो.

* ( चुलत,आत्ये,मामे,मावस) भाऊ-बहीण विवाह खरेच प्रेम विवाह असतील आणि संतती व्याधीग्रस्त न होण्याची काळजी घेतली असेल तर - खरे म्हणजे अशी काळजी घेण्याची वैज्ञानिक सुविधा या चर्चेतून तरी पुढे आलेली नाही म्हणजे विज्ञान अद्याप तेवढे पुढे गेलेले नाही - तर हरकत नाही.

** एक पुरोगामी १०-२० वर्षांनतर येणार्‍या कृत्रिम जनुकीय बदलाच्या तंत्रज्ञानाचे गाजर घेऊन आले आहेत पण त्या बद्दलच्या दाखवलेल्या साशंकतांबद्दल अद्याप तरी तथ्य वाटते. मुख्य म्हणजे तंत्रज्ञान सिद्ध होऊन सर्वसामान्यांच्या हातात येत नाही तो पर्यंत टाळ्या वाजवायच्या का काय ते समजत नाही.

* या धाग्यात व्यक्त झालेली काही तथाकथित नास्तिक पुरोगामी मते ( चुलत,आत्ये,मामे,मावस) भाऊ-बहीण विवाह कर्त्यां नी आधी भ्रूण तयार होऊ द्यावे मग पोटत असताना व्याधीग्रस्त असल्याचे लक्षात आल्यास गर्भपात करून घ्यावेत असे काहीसे आहे.

* ( चुलत,आत्ये,मामे,मावस) भाऊ-बहीण विवाहाचे एक अजब समर्थन कंपल्शन तर नाही ऑप्शनल तर आहे असे आहे . त्यांना अशा वैवाहीक संतती व्याधीग्रस्त असण्याची शक्यता मोठी असल्याचेही मान्य आहे पण तरीही मागच्या दाराने घरातील वडीलधार्‍यांकडून अंढश्रद्धेतून घडवल्या जाणार्‍या ( चुलत,आत्ये,मामे,मावस) भाऊ-बहीण विवाहांच्या अनीष्ठ प्रथेचे समर्थनही करायचे . या दोन परस्पर विरोधी भूमिकेत समन्वय कसा साधला जातो ते धागा लेखकास अद्याप उमजलेले नाही.

* भारतातील सर्व समाजात ( चुलत,आत्ये,मामे,मावस) भाऊ-बहीण विवाहाचे प्रचलन आहे , प्रदेश आणि सधर्म, जात धर्मवार कमी जास्त आहे, पण अ‍ॅव्हरेज मुस्लीम समाजात ८% ते दुप्पट ने अधिक असावे असे संदर्भ दिसत आहेत. या बद्दल अधिक ताजी आक्डेवारी संदर्भासहीत आली तर हरकत नाही.

* पुरोगामी / नास्तिकांच्या मते मुस्लीमांमधील ( चुलत,आत्ये,मामे,मावस) भाऊ-बहीण विवाहाचे प्रचलन हिंदूंमधील विवाहांप्रमाणेच सर्वसाधारण रूढी आहे,मुस्लीम धर्मातील घ्रंथ प्रामाण्या ने येणार्‍या अंधश्रध्दांचा संबंध नाही असे अंधश्रद्धा विरोधकांना वाटते . आता मुस्लिम समाजातील स्वधर्मीय अंधश्रद्धा निर्मुलक आणि समाज सुधारक येऊन गैरसमज दूरकरत नाहीत तो पर्यंत अंधश्रद्धा विरोधकांना त्यांच्या सोयीच्या अंधश्रद्धा जपण्याचे स्वातंत्र्य आहेच.

खरे म्हणजे अल्प प्रमाणात मामे-आते भाऊ बहीण विवाह या पलिकडे एकपरीवारीय विवाहांचे हिंदूमध्ये प्रमाण कमी असते , पण शांततामयी मुस्लीम धर्मीयात चुलत भावंडांच्या विवाहाचे प्रमाण बरेच असल्याचे ऐकुन आहे. शांततामयी विज्ञान संपन्न (?) ग्रंथातून त्याचे समर्थन होते पारिवारीक संपत्तीचे विभाजन टाळणे हा मुख्य आर्थीक हेतु असल्याचे ऐकुन आहे (चुभूदेघे). तसे चुलत भावा बहिणींना एकमेकांचे वैवाहीक (शारिरीक) आकर्षण कसे वाटू शकते हा भाबड्या मनाला प्रश्न पडतोच, कदाचित पडदा पद्धतीमुळे परिवार बाह्य स्त्रीचे दर्शन कमी होते आणि मग परिवारातल्या चुलत बहीण भावंडांशी जमवून घेण्या पलिकडे मार्ग उरत नाही असे काही होते का माहित नाही. अशा वेळी मानसिक ओढाताण काय होत असेल त्याचा मानसशास्त्रीय अभ्यास फारसा वाचनात आलेला नाही.

चुलत भावाबहिणीशी वैवाहीक जोडीदार म्हणून जुळवून घेण्यातील मानसशास्त्रीय ओढाताण बाजूला ठेवली तरी, अपेक्षित संततीवर जनुकीय वैविध्यावर मर्यादा पडल्यामुळे नेमक्या कोणत्या वैद्यकीय समस्या येतात , कोणत्या चाचण्या केल्या जाताता, या कारणाने संतती जन्मतः शारिरीक-मानसिक अपंग होऊ नये असे काही वैज्ञानीक शोध लागले आहेत का ? हे मिपावरील डोक्टर मंडळी आणि जनुकशास्त्र जाणत्यांकडुन जाणून घ्यायचे आहे. धागा लेखाचा ह मुख्य चर्चा विषय आहे

(आणि दर पिढी काही टक्के संततीवर असे शतको न शतके समस्या पुढे गेलेल्या असतील तर या कुटूंबांची आनि समुदायाची मानसशास्त्रीय स्थिती नेमकी कशी असते हा पुन्हा अजून एक वेगळा विषय) मी या विषयाचा जाणता नाही केवळ जिज्ञासू म्हणून चर्चा धागा काढला आहे. माझ्या मांडणीत काही तांत्रिक उणीवा असतील तर चुभूदेघे.

बेसिकली अत्यल्प प्रमाणात का होईना बाह्य धर्मीय शांततेचा धर्म स्विकारताना दिसतातर, त्या समुदायाची संस्कृती स्विकारताना पुढच्या पिढ्यांना पारिवारीक विवाह संस्कृती नकळत लादणे कितपत योग्य असू शकते याची माहिती आमच्या सारख्या अनभिज्ञांना होऊ शकेल तर बरे हा धाग्याचा एक उद्देश्य.

दुसरे असे की दुसर्‍या ताज्या घडामोडी धाग्यावर वैद्यकीय अभ्यासक डॉ. मंगऊ त्यांच्या राजकीय आणि धार्मीक संस्थांकडून गरीबांना कशी आर्थीक मदत केली जाते याचे कौतुक चालू होते . तर या धाग्यात चर्चीलेल्या कारणाने येणार्‍या जनुकीय आणि वैद्यकीय समस्यांच्या संदर्भाने कोणती आर्थीक मदतीची साखळी , जनुकीय
चाचण्यांची उपलब्धता इत्यादी त्यांच्या राजकिय आणि धार्मीक संस्थांनी उभी केली आहे याची माहिती सुद्धा डॉ. मंगऊ यांना शेअर करण्याची संधी मिळावी असा धाग्याचा उप उद्देश्य आहे.

*** When Cousins Marry (Family Documentary) - Real Stories ***

*** या धागा चर्चे नंतर याच विषयावर स्वतंत्र धाग्यात झालेली चर्चा ***

* आत्ते-मामे भावंडे

प्रतिक्रिया

...काही सकस विचार

नमनाला अर्धा पायली

आपल्या हळव्या स्त्री मनास क्ठोर चिकित्सा , कठोर भाषा झेपत नाही हे समजण्यासारकेह आहे. त्रोटक ट्विटर उत्तर, जे काही लेखन केले आहे ते पुर्णतः संसदीय सभ्यतेच्या संकेतात बसणारे आहे. सुमारे पाच वर्षांपुर्वी, मी माझ्या मिपा धाग्यांची सुरवातच कठोर (पण सभ्य) टिका कशी करावी ?/ करतो ?/ करतात ? अशी केलेली आहे. इथे मी डायलॉअ मारु शकतो पण दोन्ही बाजूने वाद वाढवण्या पेक्षा -ऐन वादात कुणिही ऐकत नसते कठोर (पण सभ्य) टिका कशी करावी ?/ करतो ?/ करतात ? आपण या धाग्यात सकस भर घालावी.

सभ्यतेची तत्वे मान्य करु शकतो, मतांची खडने करताना कुणि खाली डोके वर पाय केले तरी टिकेतील कठोरतेशी तडजोड आणि सेंसॉरशीपशी कॉम्प्रमाईझेस करण्याचा कोणताही विचार नव्हता , नाही आणि नसेल ज्यांना कठोरता झेपत नाहीत त्यांनी माझ्या धागालेख आणि प्रतिसादांना फाट्यावर मारणे चांगले. आपणास मिसळपावचा इतिहास किती ठाऊक आहे माहित नाही, मिसळपावची सुरवातच वैचारीक स्वातंत्र्याच्या गरजेतून झाली, मी मिसळपावच्या पहिल्या मालकांचे निमंत्रण लक्षात ठेऊन मिसळपाव संकेतस्थळावर सामील झालो कारण पहिले मालक टिनपॉट सेंसॉरशीप लादत नसत .

ह्या सगळ्या वादापेक्षा आपले पाय अजूनही जमिनीवर असतील तर सकस सहभाग देण्या जोगे आपल्याला पटतील असे माझे अनेक धागे आहेत. अगदी पाकिस्तानातील मुस्लीमांशी जुळवून घेण्यासाठीही १५ ऑगस्ट इ.स.२९४७ चे आवाहन आणि अभिनंदन संदेश धागा आहे, पाकिस्तानातील मुस्लीमांशी जुळवून घेण्याचा विचार अद्याप मिपा पुरोगामींनाही झेपलेला नाही तुमची तेवढी पोच असेल तर अवश्य योगदान द्यावे. भारतीय धार्मीक कलहाचे एक कारण संस्कृती आणि धर्म यातील गल्लत
आहे. त्या धाग्यातही आपण सहभागी होऊन सकस चर्चा करु शकता. सांस्कृतिक गल्लती कडे दोन्ही धर्मीयांचे लक्ष जावे म्हणून गणपतीस मुकुटा एवजी मुस्लीम टोपीचे (व्यवस्थीत सभ्य भावना न दुखावणारे) चित्र मागे मिपावर लावून चर्चा घेतल्याचे आठवते, पण ज्या सम्केतस्थळावर ते चित्र टाकले होते त्यावरुन ते वगळले गेल्यामुळे आता ते मिपावर दिसण्याची शक्यता नसावी.

सामाजिक अभिसरणास हातभार लागावा म्हणुन सर्व'-समावेशक सण आणि उत्सवांचे महत्व
नावाचा माझा चर्चा धागा आहे त्यातही आपण सहभागी होऊ शकता. आपण ज्या पद्धतिचे आक्षेप घेत आहात त्या पद्धतीचे आक्षेप नेहमी दोन्ही बाजू घेत असतात त्याचे दीर्घकालीन निराकरण कसे करावे या संबंधाने भारतातील सामाजिक सद्भाव वाढवण्यासाठी आईचा समभाव, वडीलांची तटस्थता न्याय्य निष्पक्षता यांच्या वरील पक्षपाताच्या टिकेचे आव्हान हा धागा आहे. या धाग्यातील एक परिच्छेद खालील प्रमाणे आहे.

..पण जेव्हा आपण सामाजिक परिस्थितीकडे येतो ज्या व्यक्ती समभाव आणि निष्पक्षतेने वागू इच्छितात अथवा तटस्थता बाळगू इच्छितात त्यांना केवळ पक्षपाताच्याच आरोपांना सामोरे जावे लागत नाही तर आपल्याच मंडळींच्या निष्ठूरतेस सहनही करावे लागते. नेत्यांवर बर्‍याचदा लोकानुनय न करता स्वतःच्याच समूहाच्या लोकांना समजवण्याची वेळ येऊ शकते पण त्यांचे अनुयायी किंवा त्यांच्या स्वतःच्या समुदायाचे लोकही अशा नेत्यांवर नाराज होताना दिसतात, प्रसंगी नेते मंडळींना स्वतःच्याच लोकांच्या संतापास सामोरेही जावे लागताना दिसते.

आपण स्वतः, डॉ. मंगु, राही या सारख्या सगळ्या पुरोगामींसाठी कुराण आणि हदिथ मधील कोणत्या चांगल्या गोष्टी हिंदू आणि भारतीय संस्कृतीस एकमनाने घेता येऊ शकतील ? यात नास्तिकांना आणि पुरोगाम्यांना हिंदू धर्माचे नाव खटकू नये म्हणून संस्कृती हा शब्द सुद्धा वापरला आहे. आता या धाग्यास पुरोगामी अथव डॉ.मंगु आपण म्हणतातसे मुस्लीम असतीलत किंवा नसतील तरी ( कारण त्याम्च्या व्यक्तिगत धर्माचा विषय आपण आणि त्यांनी काढला मी नव्हे) कुराण आणि हदिथ मधील कोणत्या चांगल्या गोष्टी हिंदू आणि भारतीय संस्कृतीस एकमनाने घेता येऊ शकतील ? या धाग्यात सहभग घेऊन दाखवावा. राजकीय वादापलिकडे सहकार्याची स्थळे बघता येऊ शकतीलच की, तसे धागेही आहेत.

अगदी कालच्या Where the mind is without fear कवितेचा अनुवाद हवा आहे.
ह्या धाग्यात पुरोगाम्यांना चिडवले असले तरी त्या कवितेस परंपरावाद्यांनाच अधिक सामोरे जावे लागते हे खरे नाही का ? पण वस्तुस्थिती हिच आहे की टागोरांनी त्यांच्या कवितेत वर्णन केलेल्या बर्‍याच स्थिती जशा परंपरावाद्यांना लागू पडतात तशा सुडोपुरोगाम्यांनाही लागू पडतात.

अर्थात माझ्या समन्वय वादी भूमिका लांगूलचालनावर अवलंबून नाहीत . तुम्ही माझ्या चुका काढण्याचा प्रयत्न करताय तशा विवीध धर्म आनि धर्मीयांच्या तार्कीक उणीवा आणि अंधश्रद्धांची कठोर विविधांगी चिकित्सा केल्या शिवाय उणीवा दाखवून दिल्या शिवाय सामाजिक एकोपा निर्माण व्हायचा असता तर तो गेल्या दिड दोन हजार वर्षात सहज झाला असता. सगळ्यांच्या चांगल्या बाजू माहित आहेत आणि उणीवाही व्यवस्थीत माहित आहेत असे माझ्या स्वतःकडे आत्म प्रौढीचा धोका पत्करुन सांगावे वाटते. केवळ मलाच कळते असा माझा दावा नाही , आणि केवळ आपल्यालाच कळते असा दावा आपलाही नसावा.

आपल्याला आम्ही वाद घालणारे मी डॉ. मगु इत्यादी बाळे वाटत असलो तरी कदाचित तसे नसण्याची सुद्धा शक्यता असू शकते. डॉ. मंगुंची आणि त्यांच्या धर्माची बाजू घ्यायची असेल आणि वाद विवादांमधील प्रसंगी येणारी कठोरता झेपत असेल तर अभ्यासपूर्णपणे चर्चा मध्ये अवश्य सामील व्हावे. कशाचाच ना आगा माहित ना पिछा माहित निघालो आपले उपदेश करावयास आणि असले उपदेश ऐकले जातात या भ्रमान कुणि असेल तर ते वेळीच काढलेले बरे.

लास्ट बट नॉट लीस्ट वादांवर सेंसॉरशीप हा रामबाण उपाय नाही त्या साठी प्रचंड अभ्यास आणि आवाका लागतो जो आपल्याकडे कितपत आहे या बद्दल साशंकता वाटते , तो असता तर आपला अ‍ॅप्रोच वेगळा राहीला असता . अर्थात असे वाद होतात तेव्हा तुम्ही मझे आणि मी तुमचे ऐकणे किमान वादाच्या मनस्थितीत होत नसते.

आपल्या वाचन क्षमता आधीच मर्यादीत असताना उर्वरीत बाबीं बद्दल एक्सप्लनेशन देण्यात माझा आणि तुमचा वेळ खर्च करत नाही. आपल्या रचनात्मक कामांच्या इच्छेसाठी सकस धागे उपलब्ध आहेत. त्यात सहभागाचे स्वागत असेल.

अधिक काही लिहायचे होते पण असो.

* मराठीतील म्हणी वाच्यार्थाने नव्हे लक्ष्यार्थाने घ्यायच्या असतात . म्हणी या मराठी भाषेची भाषिक संपत्ती आहेत . त्याचे अर्थ समजले नाही तर चुकीचे निष्कर्ष काढण्यापुर्वी संबंधीत लेखक कडून नीट समजावून घ्यावे

हे मलाही माहित नव्हतं. (अर्थात, "अरे, ये पिएस्पीओ नहि जानता" असं विशेष त्यात काहि नाहि).
वर राहि मड्डम आणि इथे तुम्ही म्हणता तसं मंगुरावांच्या प्रतिसाद क्वालिटीबद्दल सहमत.

माहितगार's picture

25 Jun 2018 - 9:52 am | माहितगार

"अरे, ये पिएस्पीओ नही जानता"

असंख्य आयडी टोपणनावाने लिहित असताना प्रत्येकाचा पिएस्पीओ कोण तपासत बसते अहो. मे महिन्याच्या शेवटी चर्च गुरुच्या धार्मीक पदावरुन राजकीय हस्तक्षेपा बाबत चर्चा झाली त्यात आधी चर्चा माईसाहेब कुरसुंदीकरांशी झाली , त्याच विषयावर नंतर चर्चा डॉ. मंगुशी झाली बर्‍याच जणांनी संवाद साधला आता चर्चा धार्मीक हस्तक्षेपाबाबत होती तरीही चर्चा करणार्‍यापैकी कोण कोणाचा धर्माचा पिएस्पीओ तपासत आणि लक्षात ठेवत बसेल हो ? प्रत्येकाचा धर्म विचारुन संवाद साधायचा ?

तोच विषय चर्चा सारंग दर्शनेंच्या लेखावर आली

तिथे खालील भूमिका मांडली

व्यक्तिगत राजकीय मत असणे आणि ते राजकिय व्यासपिठावरुन व्यक्त करण्यात गैर काहीच नाही. धर्मनिरपेक्ष राजकीय व्यवस्थेत, राजकीय मत प्रसारासाठी धार्मिक व्यासपिठाचा उपयोग हा धर्मसंस्थेचा राजकारणातील हस्तक्षेप साशंकीत करणारा असतोच.

पुढे डॉ.मंगुराव चर्चेत आले त्यांच्याशी चर्चेत

एखाद्या शंकराचार्याने राजकीय भाष्य धार्मिक पिठाधिपती या नात्याने केले भारतातल्या सर्व पुरोहितांना अमुक राजकीय भूमिका घेण्याचे प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष सूचित केले तर ती धर्मसंस्थेची राजकारणातील अनावश्यक लुडबुड असते जी धर्मनिरपेक्ष राज्यव्यवस्थेस पोषक असणार नाही .....आणि हाच दृष्टिकोन दुसर्या कोणत्याही धर्मगुरूंबद्दलही लागू पडेल.

असे सर्वच धार्मीक व्यासपीठांचा राजकीय हस्तक्षेप नाकारणारे विधान केले माझे पुढचे विधान असे :

यात वैचारीक सातत्य आहे -आणि सुस्पष्ट कबुलीही - जे हिंदू धर्मगुरुंना आणि इतर धर्मीय धर्मगुरुंनाही लागू केले, हे लक्षात येतय का तुम्हाला ? आता वळसा न घालता 'धर्मसंस्थेची राजकारणातील अनावश्यक लुडबुड' तत्वतः नाकारणार का ? आणि या नाकरण्यात ख्रिश्च्न धर्मगुरुंचाही आणि इतर धर्मगुरुम्चाही तुम्ही तुम्ही समावेश करण्यास तयार आहात या भूमिकेत वैचारीक सातत्य आणून ख्रिश्च्न धर्मगुरुंचा धार्मीक व्यासपीठाचा राजकीय उपयोग योग्य नसल्याची सुस्पष्ट कबुली आपण देण्यास तयार आहात का ? मी माझ्या कडून दिली आहे आता गोल पोस्ट चेंज न करता सुस्पष्ट कबुली देण्याची तुमची जबाबदारी आहे , ती तुम्ही पार पाडली तर पुढे बोलू.

त्यास डॉ. मंगुंचे उत्तर आले नाही तर चार दिवसांनी पुन्हा विषय निघताच डॉ. मंगुंना धार्मीक व्यासपीठाचा राजकीय उपयोग योग्य नसण्यावर भूमिका घेण्याचे आवाहन पुन्हा एकदा केले ते असे

केवळ चार दिवसा पुर्वीच्या याच धाग्यावरील चर्चेत, धार्मीक व्यासपीठाचे राजकीय उपयोग योग्य नसल्याची सुस्पष्ट भूमिका घेण्याचे आपणास खणखणीत आव्हान "आता वळसा न घालता 'धर्मसंस्थेची राजकारणातील अनावश्यक लुडबुड' तत्वतः नाकारणार का ? " या शब्दात केले. त्यास आपले अद्याप उत्तर आलेले नाही. हे केवळ आपल्या बद्दल म्हणून नव्हे, आपल्यासारख्या सर्वच तथाकथित धर्म निरपेक्षतावाद्यांबद्दल एकाच समुहगटास धर्मनिरपेक्षता सोईने सांगणार्‍यां दांभिकते बद्दल आहे ! संभाजी भिडे असोत वा गापै असोत त्यांच्या कडे बोट दाखवण्यासाठी नैतीकता असण्यासाठी आपल्याकडे (तथाकथित धर्म-निरपेक्षता वाद्यांकडे) 'निरपेक्षता' असावी की नको ? आपल्याच दृष्टीकोणांच्या आधारांना सापेक्ष /एकेरी आणि म्हणून ढिसाळ भूमिका बाळगू शकण्याचे कौतुक वाटते.

तुर्तास असो , 'तथाकथित' धर्म निरपेक्षतावाद्यांच्या निरपेक्षतेस जेव्हा जेव्हा ग्लानी येईल आणि दांभिक होईल तेव्हा तेव्हा त्यांच्या पाठीमागे लागण्यासाठी आम्ही आहोतच :)

त्याला डॉ. मंगुंचे खालील प्रमाणे उत्तर आले अजून अधिक स्पष्ट व्हा म्हणालो तर आम्ही वळसे फेरे घालत नाही म्हणाले.

दांभिकता सर्वत्र असते. राजकारणी , धर्मपीठे, उद्योजक , भुमिगतवाले ... सर्वांचे साटेलोटे त्यांच्या स्वार्थासाठी असतात.

सबंध चर्चा चर्च ह्या धर्मसंस्थेच्या राजकीय हस्तक्षेपाच्या अंगानी झाली ह्यात डॉ. मंगुंचा धर्माशी टार्गेट करण्यासारखा कुठे काय संबध होता, ते त्यांची धर्म निरपेक्षतेची भूमिका पारपाडण्याचे काम करत होते आणि मी धर्मनिरपेक्ष भूमिका दुटप्पी दांभिकता विरहीत निरपेक्ष असावी या साठी आग्रह धरुन आहे. वैचारीक भूमिकेवर वैचारीक चर्चा आहेत यात व्यक्तिगत टार्गेट बिर्गेट कसले आले आहे ?

आता एकदा दांभिकता सर्वत्र असते. राजकारणी , धर्मपीठे, उद्योजक , भुमिगतवाले ... सर्वांचे साटेलोटे त्यांच्या स्वार्थासाठी असतात.
डॉ. मंगुच स्विकारताहेत . मुस्लिम लिगचा देखावाही दांभिकतेचा भाग आहे हे दाखवून देण्यात कुणाच्या व्यक्तीगत टार्गेट करण्याचा काय संबंध येतो. मुस्लिम लीग या दोन शब्दातच वस्तुतः धर्म निरपेक्षता या दोन शब्दांचे तीन तेरा झालेले असतात.

बरय मुस्लिम लीग बद्दल चर्चा होण्या आधी चर्च बद्दल झाली आणि हिंदू धर्मपीठा बाबत मी वेगळी भूमिका ठेवली नाही हे सगळे माझ्याकडे सिद्ध करण्यासाठी आहे म्हणून बरे आहे.

बेसिकली सुडोपुरोगामींचा माझ्यावरील वार हुकतो आहे. पण मान्य करतील तर त्यांना सुडो म्हणायची वेळ आली नसती. असो.

अर्धवटराव's picture

25 Jun 2018 - 8:47 pm | अर्धवटराव

:)

सोमनाथ खांदवे's picture

23 Jun 2018 - 10:07 am | सोमनाथ खांदवे

मंगुशेठ , तुमच्या भावना कितीही अनावर झाल्या तरी ओपणली फोन न देऊ नगा .
कोण , कुठ वचपा काढील काहीही सांगता येत नाय बुवा !
मायबोलीवर माझ्या एका मित्राने आसच रागारागात फोन नं दिला मग त्या नंतर त्याला बवासिर , भगंदर , मूळव्याध झालेल्या पेशन्ट चे फोन यायला लागले .

विशुमित's picture

23 Jun 2018 - 10:19 am | विशुमित

विचार नाही पटले तर लोक कोणत्या थराला जाऊ शकतील सांगू शकत नाही.
गोळ्या सुद्धा घालतात राव.

सोमनाथ खांदवे's picture

23 Jun 2018 - 10:42 am | सोमनाथ खांदवे
विशुमित's picture

23 Jun 2018 - 10:50 am | विशुमित

हमारा तालुका तो आपको पत्याच होगा !

सोमनाथ खांदवे's picture

23 Jun 2018 - 11:06 am | सोमनाथ खांदवे

काय राव ? झाली का सुर्वात परत , आन ती पण सक्काळी ! सक्काळी .

आम्ही संपर्क महिती न वाचताच वगळण्याचे मिपा मालकांना लगोलग आवाहन केले . त्यांनी वगळलय्की नाही ते पण चेक केलेले नाही अजून असेल तर संपादकांनी लौकरत लौकर वगळावे असे आवाहन आहे.

कुणितरी काहीतरी करायचे आणि नसती लचांडे तिसर्‍याच्या गळ्यात.

आपण इथे फक्त वैचारीक चर्चेसाठी येतो , वैचारीकतेवरून पर्सनल होण्यासाठी नव्हे.

गावठी फिलॉसॉफर's picture

23 Jun 2018 - 10:19 am | गावठी फिलॉसॉफर

माज्या आत्याची( वडिलांची मावस बहीण) मुलगी माज्यासोबत कॉलेज ला होती..... माझे विचार, बोलणं, वागणं, डॅशिंग पण तिला खूप आवडायचा....... ती बोलायची म्हणून मी तिला १५दिवसांपूर्वीच प्रपोज केलं...... तिचे ही लग्नासाठी तायर आहे असं उत्तर मिळलं.

हा धागा वाचून थोड्याफार शिट्ट्या वाजल्या आहेत.....आमच्यात मुलगी मिळत नसेल तर अत्याची मुलगी लग्नाला हक्काची समजले जाते...... ही तर माज्या आवडीची, पसंतीची, जिवलग...... सगळं काही........ मी जर तिच्याशी लग्न केलं तर काही प्रॉब्लेम येणार नाही ना?

कृपया तज्ञानी मार्गदर्शन करावे

विशुमित's picture

23 Jun 2018 - 10:26 am | विशुमित

आता रियल टाईम केस स्टडी मिळाली. गावठी फिलॉसॉफर यांनी परवानगी दिली तर त्यांच्या समस्येवर तज्ज्ञांनी प्रयोग सुरु करा (कृपया हा घ्या ).

गावठी फिलॉसॉफर's picture

23 Jun 2018 - 10:29 am | गावठी फिलॉसॉफर

उत्तर मिळावे यासाठीच प्रश्न केला आहे

सुबोध खरे's picture

23 Jun 2018 - 1:11 pm | सुबोध खरे

गावठी फिलॉसॉफर साहेब
वडिलांची मावस बहीण आणि तिची मुलगी हे तसे बरेच लांबचे नाते (मावस आते बहीण) आहे.
याच्यात जनुकीय आजार असण्याची शक्यता जवळच्या नात्यापेक्षा( सख्ख्या चुलत/ मावस/ जाते मामे भावंडं) बरीच कमी आहे.
साधारण जन्मजात आजाराचे प्रमाण नाते संबंध नसलेल्या जोडप्यात २% असते तर हेच प्रमाण जवळच्या नात्यातील विवाहात तिप्पट म्हणजे ६ ते ७ % पर्यंत असते. यात गंभीर आजारांचे प्रमाण १० % असते. बाकी ९० % आजार थोड्या फार प्रमाणात असतात. म्हणजेच सामान्य जोडप्यांच्या संततीत जन्मजात गंभीर आजाराचे प्रमाण हजारात २ इतके असते तर जवळच्या नात्यातील विवाहात हजारात ६ ते सात इतके असते
आपल्या परिस्थितीत हे प्रमाण हजारात तीन ते साडेतीन इतके जाईल असा माझा अंदाज आहे म्हणजे सर्व सामान्य जोडपयांपेक्षा दीड पट.
याचा अर्थ असा आहे कि आपल्यासारख्या लांबच्या नात्यात लग्न होणाऱ्या जोडप्यांच्या संततीत जन्मजात गंभीर आजाराचे प्रमाण हजारात तीन ते साडेतीन आहे.
आपले एकमेकांवर प्रेम आहे हे लक्षात घेऊन आपण जनुकीय सल्लागाराकडे जाऊन समुपदेशन करून घ्या आणि खुशाल लग्न करा असाच सल्ला देईन. आणि ज्यावेळेस आपण मूल होऊ द्यावे असा विचार कराल तेंव्हा जनुकीय सल्लागाराकडे जाऊन समुपदेशन करून घ्या म्हणजे गर्भारपणात कोणत्या चाचण्या कराव्या लागतील याची महिती मिळू शकेल

एमी's picture

23 Jun 2018 - 3:17 pm | एमी

प्रतिसाद आवडला.

माहितगार's picture

23 Jun 2018 - 3:39 pm | माहितगार

प्रति हजार जोडपी की प्रति हजार संतती ?

गावठी फिलॉसॉफर's picture

23 Jun 2018 - 7:44 pm | गावठी फिलॉसॉफर

Dr साहेब खूप छान मार्गदर्शन केलेत.... तुमचा सल्ला वेळ आल्यावर अंमलात आणला जाईल.

ठ्ठो =)) =))

विवाह पूर्व जनुकीय चाचणी करून घेणे उत्तम. उगीच घाबराववायचे म्हणून धागा चर्चा काढलेली नाही. बाकी इतर डॉक्टर मंडळी उत्तर देतीलच.

धागा चर्चेचा कुणालातरी उपयोग होतोय पाहून बरे वाटले.

विशुमित's picture

23 Jun 2018 - 11:36 am | विशुमित

<<<उगीच घाबराववायचे म्हणून धागा चर्चा काढलेली नाही.>>>
==>> १५० प्रतिसाद झाल्यावर तुम्ही असे म्हंटल्यावर कसे काय होयच?
विवाह पूर्व जनुकीय चाचणी करून घेणे उत्तम. मग संपूर्ण चर्चेचा एवढाच सार निघतोय.
===
तरीही मनमोकळी चर्चा घडवून आणलीत यासाठी अनेक आभार ! (तुमचे शब्द उचल्याबद्दल क्षमस्व !)

माहितगार's picture

23 Jun 2018 - 1:12 pm | माहितगार

विवाह पूर्व जनुकीय चाचणी करून घेणे उत्तम. मग संपूर्ण चर्चेचा एवढाच सार निघतोय.

अंशतः होय. जे ग्रंथीय अंधश्रद्धा मानत नाहीत त्यांच्या पुरते. ज्यांना झाकीर नाईक प्रसृत अंधश्रद्धा खोडणार्‍या जागा माहित करून हव्या असतील त्यांना ह्या धाग्यात चर्चा झालेल्या विज्ञानाची माहिती उपयूक्त ठरु शकते. असो

charming atheist's picture

23 Jun 2018 - 10:33 am | charming atheist

चर्चा चालूद्या!
पण येऊ घातलेले/ आलेले CRISPR Cas9 gene editing तंत्रज्ञानाने कोणाताही जनुकिय रोग बरा करता येऊ शकतो.या तंत्रज्ञानाने कोणताही फॉल्टी gene दुरुस्त करता येतो.एक दोन दशकात जनुकीय रोग नष्ट करता येतील. नुसतेच रोग नाही तर सुपरह्युमनस् ही तयार करता येतील्.यातून काही एथिक्सचे प्रश्न तयार होतील.ते एक असो.
त्यामुळे धागाकर्त्याने मुस्लिम समाजाची काळजी वाहू नये.

विशुमित's picture

23 Jun 2018 - 10:40 am | विशुमित

यासाठी वेगळा फंड साठवून ठेवावा म्हणतोय. २० वर्षांनी कामी येईल.

माहितगार's picture

23 Jun 2018 - 10:43 am | माहितगार

...त्यामुळे धागाकर्त्याने मुस्लिम समाजाची काळजी वाहू नये.

आमी नाही, ती तुमी वाहाताय ! CRISPR Cas9 gene editing तंत्रज्ञानाचे आम्ही मनमोकळे स्वागत करतो, पण तंत्रद्यान पूर्णत्वाला जाऊन सिद्ध होत नाही तो पर्यंत टाळ्या वाजवायच्या काय ?

पण इन एनी केस नव्या तंत्रज्ञांनामध्ये ग्रंथ प्रामाण्यामुळे त्यांच्यातील अंधश्रद्धा आडव्या आल्या तर त्या अंधश्रद्धा नाहीत हे सिद्ध करण्यासाठीच्या वैचारीक पूर्व तयारी साठी लागणार्‍या हार्दीक शुभेच्छा समस्त नास्तिक आणि पुरोगामी मंडळींना .

सुबोध खरे's picture

23 Jun 2018 - 12:05 pm | सुबोध खरे

अंधश्रद्धा आडव्या आल्या तर
सौदी अरेबियात साधी टेलिफोनची तार बसवायची तर तिथल्या मौलवींनी विरोध केला होता. त्यांचे म्हणणे होते की यावर सैतानाचा प्रभाव असेल.
शेवटी तेथे अमेरिकन अभियंत्यांनी त्यांना समजावले कि या तारेतून कुराणाची आयते पलीकडच्या बाजूच्या लोकांना ऐकू अली तर त्यात सैतानाचा प्रभाव नाही हे सिद्ध होईल.
अशी कुराणातील आयते पलीकडे ऐकू आल्यावर मौलवींचे समाधान झाले आणि त्यांचा या तारा बसवण्याला असलेला विरोध मावळला.

सुबोध खरे's picture

23 Jun 2018 - 11:00 am | सुबोध खरे

हे जीन एडिटिंग केंव्हा वापरायचं ? मूल जन्माला आल्यावर नाही ना?

या तंत्रज्ञानाने कोणताही फॉल्टी gene दुरुस्त करता येतो.

ते जन्माला आलेल्या मुलात दुरुस्त कसं हो करायचं?

जर आई बापामध्ये जनुकीय आजार आहेत हे सिद्ध झाले तर त्यांचे शुक्राणू आणि स्त्रीबीज याना बाहेर काढून त्यातील जनुकीय दोष दूर करून तो भ्रूण आईच्या गर्भाशयात रोपण करून मूल होऊ द्यायचे. अशी हि लांब आणि किचकट प्रक्रिया आहे.

याचा खर्च किती आहे आपल्याला माहिती आहे का?

काही लाख रुपये.

हे किती गरिबांनाच काय मध्यमवर्गीयांना परवडतील.

आणि हे एक दोन दशकात होण्याची शक्यता फारच कमी आहे.

तुम्ही डॉक्टर आहात ना नक्की?
CRISPR cas9 हे तंत्रज्ञान embryonic gene editing बरोबरच जिवंत माणसावरही वापारता येते.नीट माहीती घ्या,युट्युबवर सर्च केले तर व्यवस्थित समजेल.
hunter disease झालेल्या एका ४४ वर्षीय अमेरीकन व्यक्तीचा फॉल्टी gene बदलण्यात आला आहे. या टेक्नॉलॉजीने sickle cell disease वर मोठ्या प्रमाणात उपचार करण्यात येत आहेत.एवढेच नाही तर maleria resistant डासांची पैदास करुन एका वर्षात मलेरीया नष्ट करता येईल इतपत हे प्रकरण पोचले आहे.
चर्चा मुस्लिमद्वेष ,जातव्यवस्था समर्थन या अंगाने व्हावी असे दिसत आहे.त्यामुळे इथेच थांबतो.धन्यवाद.

विशुमित's picture

23 Jun 2018 - 11:24 am | विशुमित

CRISPR cas9 बाबतीतले यू ट्यूब चाळतोय. गजब आहे सगळं.
===
या विषयाबाबत आमच्या सारख्या सामान्य वाचकांना समजेल असा माहिती(पूर्ण) नवीन धागा कृपया काढाल का ?

या विषयाबाबत आमच्या सारख्या सामान्य वाचकांना समजेल असा माहिती(पूर्ण) नवीन धागा कृपया काढाल का ? >> +१

...जातव्यवस्था समर्थन या अंगाने व्हावी असे दिसत आहे

धागा लेखकाने जात व्यवस्था समर्थन कुठे केले आहे ? आंतरजातीय विवाहाचे समर्थन इतर संबंधीत धाग्यात करून झाले आहे. या धाग्याची मर्यादा कुटूंब परिवरातील निकट भाऊ बहीण नाते संबंध एवढी मर्यादीत आहे तर मर्यादीत आहे ; कुटूंब / परिवार = जात हे समिकरण मांडण्याचा अट्टाहास कशा साठी ?

जेव्हा हिंदू धर्मातील अंधश्रद्धांची चर्चा करता तेव्हा तुम्ही हिंदूद्वेषाने आंधळे आहात चर्चा करु नका म्हटले तर चालते का ? तुम्ही खरे आणि पूर्न नास्तीक असाल तर ईतर धर्मीय अंधश्रद्धांवरील टिका खटकण्याचे कारण काय ? एकच प्रथा आहे एक समाज अंधश्रद्धेशिवाय रुढी म्हणून पाळतो, एका समाजाच्या पाळण्यात अंधश्रद्धेचा अंश असण्याअची शक्यता आहे. अंधश्रद्धा विरोध इथे का चालत नाही ? हा दुटप्पीपणा कशामुळे.

भविष्यात येणारे विज्ञान तंत्रज्ञान पुढे येईल . पण साधारणतः १४०० वर्षा पुर्वी एका ग्रंथाचे ईश्वरीय असल्याचे आरोपण झाले त्या ग्रंथाने चुलत भाऊ-बहीण विवाह ऑप्शनल म्हणून चालवून घेतला. त्रिकाल दर्शी इश्वराला CRISPR cas9 हे तंत्रज्ञान embryonic gene editing तंत्रज्ञान सर्वसामान्य जनतेच्या आवाक्यात येई पर्यंत सुमारे १४०० वर्षाच्या काळासाठी ( चुलत/ आत्ये/मामे/ मावस) विवाह पुढील संतती साठी अयोग्य असल्याचे कळले कसे नाही हा अंधश्रद्धा निर्मुलनार्थचा तार्कीक प्रश्न आहे . नास्तिकांप्रमाणे इतर श्रद्धा खोडण्यात रस नसल्यामुळे आता स्पष्ट उल्लेख केला आहे तसा केला नव्हता पण द्वेषाचा आरोप केल्यामुळे अंधश्रद्धा निर्मुलनाची जागा दाखवावी लागत आहे.

आम्ही फक्त अंधश्रद्ध चाली रितीवर टिका केली त्यात द्वेष पहाण्याचे आणि द्वेषीय वातावरणास हातभार लावण्याचे दुस्साहस तथाकथित पुरोगामी आणि नस्तिकच करत आहेत हि खेदाची बाब आहे.

तुम्ही डॉक्टर आहात ना नक्की?

हा हा हा !!!

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 Jun 2018 - 1:06 pm | डॉ सुहास म्हात्रे

पण येऊ घातलेले/ आलेले CRISPR Cas9 gene editing तंत्रज्ञानाने कोणाताही जनुकिय रोग बरा करता येऊ शकतो.

नाही हो साहेब. अजून ते बाल्यावस्थेतले प्रायोगीक स्तराचे संशोधन आहे. मानवासाठीचा उपचार म्हणून ते व्यवहारात (आले तर) येण्यासाठी लागणारा वेळ वर्षांच्या दशकांमध्ये मोजावा लागेल.

सोमनाथ खांदवे's picture

23 Jun 2018 - 11:42 am | सोमनाथ खांदवे

यका पानाला प्रतिक्रीया च लिमिट ठ्येवता यणार न्हाय का ?
चाळीस पन्नास प्रतिक्रिया नंतर ऍप मदी आस दिसतय

हा
भा


त्यामुळ व्हतय काय की काही तज्ज्ञ मंडळी चे इचार न कळल्या मूळ डायरेक्ट बायपास व्हत्यात .

मोबाईल वर पाहत असाल तर उजव्या वरच्या साईडला ३ उभ्या टिम्ब टिम्ब वर क्लिक करून "Desktop Site " सिलेक्ट करा.
सगळे तज्ज्ञ मंडळींचे इचार व्यवस्थित दिसतील.

सोमनाथ खांदवे's picture

23 Jun 2018 - 5:51 pm | सोमनाथ खांदवे

धन्यवाद विशुमित भाऊ ,
ऍप मदिल तीन टिंब दाबून न्हाय झालं याआणि आदी की बोर्ड पण लई स्लो चालायचा म्हणून म्या ऍप डिलिट क्येल , मग प्ले स्टोर वर शोधतोय तर कुटय ऍप ?. मला वाटलं तुमच्या तकारारी मुळ मला तडीपार क्येला की काय ?
आता मिसळपाव .कॉम वर ग्येल्यावर कळल की माझा id जीवंत हाये ,

manguu@mail.com's picture

23 Jun 2018 - 6:13 pm | manguu@mail.com

मीही तो तिंबाचा प्रयोग केला.

फेल गेला .
आपल्या दोघांच्या मोबाईलात जेनेटिक लोच्या दिसतोय

विशुमित's picture

23 Jun 2018 - 9:13 pm | विशुमित

Google chrome madhe ughadun bagha...
Nahi zale tar sampadak mandalachi madat ghya.

सोमनाथ खांदवे's picture

23 Jun 2018 - 10:54 pm | सोमनाथ खांदवे

मंगुशेठ , ऍप पेक्षा गुगल क्रोम वर जाऊन मिसळपाव ची लिंक सेव केली तर बरं पडतंय , ऍप ला अपडेट्स नसल्याने ते गंडतय आणि आता तर प्ले स्टोर मध्ये दिसतच नाही .

manguu@mail.com's picture

24 Jun 2018 - 12:02 am | manguu@mail.com

तरी तोच प्रॉब्लेम आहे

desktop page वर न जाता ते app मध्येच open होते

सोमनाथ खांदवे's picture

24 Jun 2018 - 12:30 pm | सोमनाथ खांदवे

त्या साठी पाहिले ऍप डिलिट करावे लागेल .

सुबोध खरे's picture

23 Jun 2018 - 11:53 am | सुबोध खरे

@ charming atheist
तुम्ही डॉक्टर आहात ना नक्की?
भारतीय आयुर्विज्ञान कायद्याने पदवी आणि पंजीकरणपण आहे.
असो
हंटर सिन्ड्रोम मध्ये हे तंत्र प्रायोगिक तत्वावर वापरले गेले आहे परंतु त्यामुळे अशा रुग्णात असलेले मतिमंदत्व, संधिवात, कर्णबधिरता किंवा हाडांचा ठिसूळ पणा कसा जाईल ?

प्रत्येक पेशीत असलेले विकरातील दोष (enzyme deficiency) नाहीसे करणे प्रायोगिक तत्वावर ठीक आहे परंतु प्रत्यक्ष रुग्णात किती बदल घडेल हे आजही सांगता येत नाही?

http://www.sciencemag.org/news/2017/11/human-has-been-injected-gene-edit...

There is a caveat, however: The enzyme Hunter patients now receive does not cross the blood-brain barrier, the tight network of cells that protects the brain from pathogens, and the livermade enzyme produced by the gene edit may not either. So the new treatment may not stop the brain damage that can occur in Hunter syndrome.

And in vivo gene editing poses additional risks. Similar to the problem of traditional gene therapy hitting the wrong spot, ZFNs could make cuts in places where they weren’t supposed to and turn on a cancer gene.

The age at onset of symptoms and the presence/absence of behavioral disturbances are predictive factors of ultimate disease severity in very young patients. Behavioral disturbances can often mimic combinations of symptoms of attention deficit hyperactivity disorder, autism, obsessive compulsive disorder, and/or sensory processing disorder, although the existence and level of symptoms differ in each affected child. They often also include a lack of an appropriate sense of danger, and aggression. The behavioral symptoms of Hunter syndrome generally precede neurodegeneration and often increase in severity until the mental handicaps become more pronounced.[7] By the time of death, most children with severe MPS II have severe mental disabilities and are completely dependent on their caretakers.[2]
आपल्या हातात एक मोती लागला आहे तो पाहून तुम्ही सागराची खोली किती आणि मोती किती सहजतेने काढता येतात यावर टिप्पणी करता आहात असे म्हणावेसे वाटते.
आपण हंटर सिंड्रोमचे (MPS -II) किती रोगी पहिले आहेत हे विचारण्याचा मोह होतो आहे.
असो

डॉक्टर,मी असे म्हणत नाही की हे तंत्र पुर्ण विकसीत आहे.पण जी गोष्ट फक्त निसर्गाला शक्य होती ती आता आपण करु शकतो यावर तरी विश्वास ठेवाल की नाही.?
अनेक डिसऑरडरमधील candidate SNPs शोधने आणि परस्पर संबंध लावणे हे जरी शक्य असले तरी अजून काही वर्ष थांबावे लागेल यावर कुणाचेच दुमत नाही. पुन्हा nature vs nurture हा प्रकार आहेच.
epigenitics चाही प्रभाव असतो.कोणता जीन सायलेंट मोडवर आणि कोणता लाऊड मोडमध्ये जाईल हे आहार ,विहार आणि परिस्थीतीवर अवलंबून असते.त्यामुळे genes are destiny यावर माझा तितकासा भरवसा नाही पण ते एक असो.हे जास्त टेक्निकल होत आहे .
तुर्तास मुस्लिमांमध्ये आणि हिंदूंमध्ये आंतरधर्मिय /जातीय विवाहांना प्रोत्साहन देणे हाच उपाय आहे.पुढील काही वर्षात जनुकीय संपादन नॉर्म होईल तेव्हा मग जनुकीय रोग वगैरे भुतकाळातल्या गोष्टी असतील.

सुबोध खरे's picture

23 Jun 2018 - 12:26 pm | सुबोध खरे

निकृष्ठ समाजातील स्त्री पुरुषांमध्ये जर्मलाईन म्युटेशन रेट जास्त असतो.
यात

"निकृष्ठ समाज"

म्हणजे नक्की कोणता आणि त्यातील स्त्री पुरुषांमध्ये जर्मलाईन म्युटेशन रेट जास्त असतो हे दाखवणारा एक तरी दुवा आपण देऊ शकाल का?

यावर आपण काय सांगणार आहात?

निकृष्ठ म्हणजे ज्यासामाजाचे आकारमान लहान आहे असा.भारतात अनेक आदिवासी जमातींचे आकारमान लहान आहे व त्यांच्यात सिकल सेल आनिमिया जवळपास ३०% पर्यंत आहे हे आपल्याला माहीत असेलच(मान्य करणार नाहीच).सिकल सेल हे उदाहरण झाले पण अनेक आजार जसे की x linked recessive डिसओर्डर्स चे प्रमाणही बरेच आहे. पारश्यांचेही लोकसंखेच्या कमी आकारमानामुळे इनब्रिडींग होऊन जनुकीय रोगाला बळी पडत आहेत.
जर्मलाईन म्युटेशनचा स्टडी आहे ncbi वर,पण लिंक सापडली तर देतो.
we found a negative correlation between effective population size and rate of germline mutations "असं वाचल्याचं आठवतं. तुम्हीही शोधून बघितले तरी सापडेल ,मला किवर्ड देऊन सापडत नाही आहे. मे बी तुम्ही शोधू शकाल.

सुबोध खरे's picture

23 Jun 2018 - 8:15 pm | सुबोध खरे

निकृष्ठ म्हणजे ज्यासामाजाचे आकारमान लहान आहे असा.

म्हणजे पारशी समाज भारतात( कि जगात) सर्वात निकृष्ट आहे असे म्हणायचे का?

मी शिकलेल्या मराठीत निकृष्ट म्हणजे हलक्या दर्जाचा किंवा गुणवत्तेचा. संख्येचा त्याच्याशी संबंध नाही.
कोणताही समाज हलक्या दर्जाचा किंवा गुणवत्तेचा नसतो. हलकं दर्जा किंवा हलकी गुणवत्ता हि असा विचार करणाऱ्या मेंदूची असू शकते .

बाकी कमी लोकसंख्येचा आणि जर्मलाईन म्युटेशनचा मला तरी संबंध सापडला नाही

कारण संख्येचा आणि उत्परिवर्तनाचा( mutation) संबंध नाही. mutation is randomly occuring change in genomic sequence. त्यावर वातावरण किंवा बाह्य कारणांचा( ionising radiations,chemicals) प्रभाव पडू शकतो.

@सुबोध खरे,ncbi चे स्ट्डीज वाचा.कळेल बरंच. फुकट आहे ते ऑनलाईन सेंटर.

हो मी पाहिलं हं ते. फुकटच आहे. बरं झालं सांगितलंत.

पण त्यात हि मला असं कुठे हि सापडलं नाही कि निकृष्ट लोकसंख्येत जर्मलाईन म्युटेशन जास्त होतात.

कोणत्या जातींचा gene pool मर्यादित आहे हे हि जरा सांगाल तर बरं होईल.

बाकी जेव्हा जातव्यवस्था तयार केली गेली तेव्हा आकाराने छोटे जातसमुह या population bottleneck परीणामाला बळी पडले. याचाही संदर्भ कुठे मिळाला तर बरं होईल.

manguu@mail.com's picture

23 Jun 2018 - 8:38 pm | manguu@mail.com

कारण संख्येचा आणि उत्परिवर्तनाचा( mutation) संबंध नाही. mutation is randomly occuring change in genomic sequence. त्यावर वातावरण किंवा बाह्य कारणांचा( ionising radiations,chemicals) प्रभाव पडू शकतो.

हो . Mutations occur randomly. पण अशी मुटेशन्स पुढच्या पिढीत जाणे , त्यासाठी त्या पुलात ती साठून रहाणे , हाही एक मुद्दा आहे ना ? देवदयेने ( खुदा की रहम से) अती गंभीर म्ञुटेशन्स असतील तर अशा बेबीज गर्भपात , जन्मजात मृत्यु ला सामोरे जातात आणि ही म्ञुटेशन्शी नष्ट होतात. ती पुढे पसरत नाहीत.

पण म्युटेशन्स होऊन एखादा आजार होणार असेल , आणि , अदरवाइज ती व्यक्ती बरेचसे नॉर्मल जीवन जगणार असेल तर तिच्या लग्नान्ण्तर ही म्युटेशन्स पुढच्या पिढीत सरकत रहतात , लग्ने जर विशिष्ट प्रदेशात , विशिष्ट जातीतच होणार असतील , आणि तो हेड काउंट जर लिमिटेड असेल तर हे जीन्स त्या पूलमधुन फिल्टर होऊ शकत नाहीत आणि अ‍ॅफेक्टेड बेबीजची संख्या वाढत जाते.

पारशी , भारतीत्ल सिंधी , मालदीव बेटावरील बंदिस्त लोक्संख्या आणि त्यांच्यात आढळणारे काही विशिष्ट विकार ह्यांचे हेच मेकॅनिझम आहे.

निकृष्ट लोकसंख्येत जर्मलाईन म्युटेशन जास्त होत नाहीत , पण झाल्यास अधिक प्रमाणात साचून रहातात.

सुबोध खरे's picture

23 Jun 2018 - 8:42 pm | सुबोध खरे

तुम्ही डॉक्टर आहात ना नक्की?

हा हा हा !!!

या नंतर तुम्हाला माझ्याशी सहमत व्हावेसे कसे काय वाटले?

मी धन्य धन्य झालो.

वीकांत सुखात जाणार असं दिसतंय.

हा प्रश्न तुम्हालाही चुकला नाही, आमच्यासारख्या क्षूद्रानी असा प्रश्न वाट्यास आल्यास वाईट वाटून घेऊ नये, म्हणुन हा हा हा लिहिले होते.

सुबोध खरे's picture

23 Jun 2018 - 10:02 pm | सुबोध खरे

हा प्रश्न मला अनेक वेळेस विचारला गेलेला आहे पण ज्या तर्हेने इथे विचारला गेला आहे ती स्थिती वेगळी आहे.

http://genomesunzipped.org/2011/04/inbreeding-genetic-disease-and-the-ro...

रॉय्ल फॅमिली आणि हिमोफिलिया ..

The royal families of Europe were inbred in the late 19th and early 20th centuries, to the extent that they were passing on genetic diseases.

Since then, many royals have chosen to marry both outside of royalty, and outside of Europe.

Monaco had a princess from America, and now has a South African.

Britain has many “commoners” marrying in (the Queen Mother, Diana, Fergie, Kate, Sophie), and is about to have an American.

The Dutch Queen is Argentinian.

The Crown Princess of Denmark is Australian.

The gene pool has now been significantly widened. If, for instance, one of the younger princesses of the Netherlands chose to marry Viscount Severn, any degree of relationship between them would be fairly slight.

https://www.quora.com/How-inbred-are-todays-royal-families

बाकी जेव्हा जातव्यवस्था तयार केली गेली तेव्हा आकाराने छोटे जातसमुह या population bottleneck परीणामाला बळी पडले. याचाही संदर्भ कुठे मिळाला तर बरं होईल.
>>>>>
bottleneck effect समजला असता तर हा प्रश्न पडला नसता.
१००० विविध गुणधर्माचे लोक ज्यांच्यामध्ये रंग ,रुप ,उंची ,आरोग्य याचं वैविध्य आहे अश्यांपैकी फक्त शंभर जण सिलेक्ट केले तर काही एक्स्क्लुझिव्ह ट्रेट्स त्या शंभरांमध्ये येतील,चांगले वा वाईट,त्यांचे पुढे सिलेक्टीव्ह ब्रिडींग केले तर कालांतराने तेच ते गुण ,अवगुण दिसत राहतील कारण मुळच्या १००० जणांमध्ये जे जनुकीय वैविध्य /genetic variation होते ते या १०० जणांच्या सिलेक्शनमुळे कमी झाले.
बहुतांश म्युटेशन्स ही न्युट्रल असतात. बाकीची बर्याचदा हानिकारकच असतात .रिसेसिव्ह डिसऑर्डर्स या डॉमिनंट डिसऑर्डर्सपेक्षा संख्येने अधिक असल्याने समुहाची संख्या कमी असेल तर अशी म्युटेशन साठत राहतात व तो समुह अधिक रोगट बनत जातो. bad mutation पेक्षा beneficial mutations चा रेट जास्त असता तर जातव्यवस्थेचा फायदा झाला असता पण मामला नेमका उलटा आहे.
हिंदू जातव्यवस्था हे सिलेक्टीव्ह ब्रिडींगच आहे.जे अज्ञान व द्वेषातून केलेले segregation आहे.याचा हिंदूंना फायदा शून्य व तोटा अधिक झाला आहे.पण जातव्यवस्थेच्या आधी जो हिंदू समाज होता त्याची गुणवैशिष्टे आज अनेक जातीत विखुरली आहेत,ती परत दिसावीत व समाज एकजिनसी व्हावा यासाठी हिंदूंनी आंतरजातीय विवाहांना सर्वोच्च प्राधान्य देणे गरजेचे आहे.
(हा प्रतिसाद चर्चा वाचणार्या सामान्य वाचकांना समजावे म्हणून लिहले आहे,अतिहुच्च सर्वज्ञानी हुशार लोकांसाठी नाही आहे याची संबंधितांनी नोंद घेणेचे करावे!)

सुबोध खरे's picture

25 Jun 2018 - 9:37 am | सुबोध खरे

बहुतांश म्युटेशन्स ही न्युट्रल असतात. बाकीची बर्याचदा हानिकारकच असतात

या आपल्या विधानाला काय शास्त्राधार आहे?

mutations are "random".

bad mutation पेक्षा beneficial mutations चा रेट जास्त असता तर जातव्यवस्थेचा फायदा झाला असता पण मामला नेमका उलटा आहे.

जातीव्यवस्थेत फक्त वाईट उत्परिवर्तनाचा गुणाकार होतो या आपल्या गृहीतका ला आपल्या कडे कोणताही आधार नाही.

उदाहरणार्थ जर उंचीची जीन्स (अप्रभावी) रिसेस्सीव्ह असली तर दोन्ही माता पित्याची गुणसूत्रे एकत्र होऊन होणारे अपत्य जास्त उंचीचे असेल.

आपले मूळ गृहीतक हे आहे कि चांगली गणसुत्रे प्रभावी(dominant) असतात आणि वाईट गुणसूत्रे (अप्रभावी) रिसेस्सीव्ह असतात. असे काहीही नसते. हे तुमचे सोयीस्कर गृहीतक आहे. आणि आपले म्हणणे समर्थन करण्यासाठी आपण कोणत्याही टोकाला( माझ्या पदवी आणि व्यवसायाची पातळी विचारण्यापर्यंत) जात आहात.

आणि सगळेच जनुकीय आजार केवळ तोट्याचेच आहेत हेही आपले गृहीतक चुकीचे आहे.
उदा सिकल सेल ऍनिमिया हा मलेरिया विरुद्ध संरक्षण करतो.
Protective Effect of Sickle Cell Trait Against Malaria-Associated Mortality And Morbidity
https://www.cdc.gov/malaria/about/biology/sickle_cell.html

मूळ गृहितकच(पाया) चूक असल्याने कळस अर्थातच चुकणार.

नीट वाचत चला डॉक्टर.चांगले गुण कोणते यावर चर्चा चालू नाही ,वाईट गुणधर्म जे जनुकीय आहेत त्यावर धागा आहे.आणि bad mutations चा रेट beneficial mutations पेक्षा जास्त आहे हे माहित असूनही जातव्यवस्थेचे समर्थन करत असाल तर मग अवघड आहे.

सुबोध खरे's picture

25 Jun 2018 - 1:00 pm | सुबोध खरे

जातिव्यवस्थेचे समर्थन कुठे आणि केंव्हा केले हे दाखवता येईल का?

याच धाग्यावरच अगोदर मी खाप पंचायती वर दिलेला प्रतिसाद आपण वाचलेला दिसत नाही.

मी परत एकच सांगतो आहे कि mutations are RANDOM

bad mutations चा रेट beneficial mutations पेक्षा जास्त आहे या आपल्या विधानाचा एक तरी स्पष्ट पुरावा आपल्याला देता येईल का?

हे गृहीतक मुळातच चूक आहे कारण अन्यथा सर्व प्राणिमात्र नष्ट झाले असते हा साधा नियम आहे. उलट जी उत्परिवर्तने वाईट होती त्यातील बहुसंख्य काळाच्या ओघात नष्ट झाली आणि जितकी चांगली होती ती बहुसंख्य टिकून राहिली.म्हणूनच प्राणिमात्र उत्क्रांत होत होत विकसित होत गेले. यालाच जीवशास्त्राचा मूलभूत नियम SURVIVAL OF THE FITTEST म्हणतात.

केवळ आपली चुकीची मते रेटण्यासाठी आपण काहींच्या काही गोष्टी लिहीत आहात आणि त्याच्या समर्थनासाठी नुसती आपलीच मते पुढे करीत आहात. आपण लिहिलॆल्या एका तरी गोष्टीचा स्पष्ट पुरावा आपल्याला देता आला आहे का?

मी माझ्या गोष्टीचे खंडन करताना स्पष्ट पुरावे दिलेले आहेत.त्याचा आपल्याला प्रतिवाद करता येत नाही म्हणून असे वितंडवाद घालत आहात एवढेच म्हणेन.याला काही जण स्वमतांध दांभिकता असे म्हणतात. असो या पुढे आपल्याशी वितंडवाद घालण्यात मला कोणताही रस नाही.

आपल्या पुढच्या वाटचाली साठी शुभेच्छा.

डोळे पाणावले.
जय मिपा.