१५ ऑगस्ट इ.स.२९४७ चे आवाहन आणि अभिनंदन संदेश

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
3 Feb 2014 - 7:47 am
गाभा: 

नमस्कार
आपणा सर्वांनाच माहिती आहे की १९४७ मध्ये झालेली भारताची फाळणी एक दुर्दैवी घटना होती. पाकीस्तान आणि बांग्लादेशात विभक्त झालेले प्रदेश भारतात उद्या परत आले तर तेही आपल्याला हवेच आहे. जर जर्मनीच पुर्नएकीकरण होऊ शकत व्हिएतनामच होऊ शकत तर भिविष्यातल्या कोणत्यातरी शुभ मुहूर्तावर एक ना एक दिवस पाकीस्तान आणि बांग्लादेशही भारतात येतील अशी आशा करता येईलच. या धाग्याच्या उद्दीष्टाकरता हे शांततामय मार्गाने होत आहे अस गृहीत धरून चालू (इतर मार्गांच्या चर्चेकरता वेगळा धागा काढला जाण्यास माझी ना नाही.)

१ अ) समजा तुम्ही एक सामान्य भारतीय नागरीक आहात. समजा एक पाकीस्तान अथवा बांग्लादेशातील एक लोकप्रीय तत्वज्ञ अथवा महापुरूष तुम्हाला मीत्र मानतो त्याला पाकीस्तान आणि बांग्लादेश या दोन्ही देशांना भारतात सामील होण्याच महत्व प्रतिपादन करत आवाहन करावयाच आहे ते तुम्ही कोणत्या शब्दात कराल ?

१ ब) तुम्ही भारतातील मुख्य विरोधी पक्षाचे अध्यक्ष आहात तर हे आवाहन तुम्ही कोणत्या शब्दात कराल

२ अ) समजा तुम्ही पाकीस्तान अथवा बांग्लादेशातील एक लोकप्रीय तत्वज्ञ अथवा महापुरूष आहात आणि तुम्हाला तुमच्या पाकीस्तानी बांधवांना भारतात सामील होण्याच आवाहन करायच आहे ते तुम्ही कसे (कोणत्या शब्दात) कराल ?

२ ब) समजा तुम्ही पाकीस्तान अथवा बांग्लादेशाचे राष्ट्राध्यक्ष आहात आणि आपला देश भारतात विलीन करण्याच महत्व तुम्हाला पटलेल आहे आणि ते मह्त्व तुम्ही तुमच्या पाकीस्तानी बांग्लादेशी बांधवांना महत्व समजावून देत आवाहनाच राष्ट्रास उद्देशून भाषण देत आहात ते तुम्ही कोणत्या शब्दा लिहाल ?

३) पाकीस्तान आणि बांग्लादेश भारतात सामील होण्यास आपखुषीने राजी झाले आहेत हा सुवर्णक्षणाचे स्वागत करण्याची जबाबदारी भारताचे राष्ट्रपती म्हणून तुमच्यावर येऊन पार पडते तुम्ही त्यांचे पाकीस्तान आणि बांग्लादेशाच्या विलिनीकरणाचे भाषण कोणत्या शब्दात कराल ? किंवा १५ ऑगस्ट इ.स.२९४७ च्या आधीच विलिनीकरण होऊन गेल आहे आणि १५ ऑगस्ट इ.स.२९४७ ला या सुवर्ण क्षणांच्या स्मृतीस उजाळा तुम्ही कोणत्या शब्दात द्याल ?

विषयांतर टाळण्याकरता धन्यवाद

प्रतिक्रिया

ता.क.: याधाग्यास कोणतेही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष लांगूलचालन अटी तह करारनामे अभिप्रेत नाहीत.

प्रतिसादांकरता धन्यवाद.

माहितगार's picture

3 Feb 2014 - 8:12 am | माहितगार

प्रतिसाद देताना या धाग्यात दिले जाणारे सर्व चांगले संदेश आवाहने अभिनंदने सर्वभाषी अनुवादाकरीता सार्वजनिक अधिक्षत्रात प्रताधिकार मुक्त copyright free in public domain असतील होत आहेत हे लक्षात घ्यावे हि नम्र निवेदन

टवाळ कार्टा's picture

3 Feb 2014 - 11:54 pm | टवाळ कार्टा

ज्यांना वंदे मातरम म्हणायला नको असे लोक गेले ते बरेच झाले...उद्या परत जर "अधिक्रूतरीत्या" आले तर किती डोक्यावर बसतील याचाही विचार करा

माहितगार's picture

4 Feb 2014 - 6:49 am | माहितगार

वंदे मातरम म्हणाले तर ?
एका मुस्लीम बहुल प्रदेशात (भारतात नव्हे) रेडीओवर लहान बालगट मुलांकरता 'धार्मीक' कार्यक्रम चालू होता. निवेदक धार्मीक ग्रंथांच्या नंतर तुम्ही कुणाच ऐकणार असा प्रश्न विचारत होता आणि सगळी मूल आनंदानी मदर अस उत्तर देत होती. आई हे वैश्विक मुल्य आहे 'पवित्र' भारतातल्या कालच्या नाही तर आजच्या नाही तर त्या नंतरच्या पिढीकडून निश्चित स्विकारल जाईल अस मला तरी वाटत.

प्रसाद गोडबोले's picture

4 Feb 2014 - 12:11 pm | प्रसाद गोडबोले

तरीही नकोच .

फाळणी झाली हे चांगलेच झाले आहे भारताच्या दृष्टीने !

क्लिंटन's picture

4 Feb 2014 - 12:15 pm | क्लिंटन

फाळणी झाली हे चांगलेच झाले आहे भारताच्या दृष्टीने !

सहमत आहे.

प्यारे१'s picture

4 Feb 2014 - 1:08 pm | प्यारे१

सहमत आहे.

शैलेन्द्र's picture

4 Feb 2014 - 1:49 pm | शैलेन्द्र

सहमत आहे..

माहितगार's picture

4 Feb 2014 - 2:35 pm | माहितगार

डोक्यावर बसण्याचीच आहे का ? जवळपास १००० वर्षाचा कालावधी धरला आहे. एवढ्या प्रदीर्घ कालावधीतही मत आणि मन परीवर्तन होणार नाही? प्रस्ताव तसा कोणतीही तडजोड न स्विकारतावाला आहे. भारतात हिंदी मातृभाषा बोलणार्‍यांची संख्या अधिक आहे म्हणून महाराष्ट्रात आमची मराठी संस्कृती हवी एवढेच म्हणतो आपण फारतर. हिंदीप्रदेश डोक्यावर बसेल भारतात नको असे थोडीच म्हणतो आपण.

इन एनी केस प्रतिसादांकरता सर्वांना धन्यवाद आणि शुभेच्छा

टवाळ कार्टा's picture

4 Feb 2014 - 4:08 pm | टवाळ कार्टा

भारताला ५००० वर वर्षांचा इतिहास आहे
अगदी बाबरापासुन धरला तरी जवळपास १००० वर्षे होतात

तरीसुध्धा फाळणी आणि फाळणीच्या वेळच्या दंगली झाल्याच ना??? अगदी कालपरवा झालेल्या मुंबैमधल्या हिंसेमधेसुध्धा "अमर जवान"ला लाथेने तुडवणारे मा***** भ** गेल्या १००० वर्षांपासुन याच भारत देशात रहात आहेत ना???

प्रसाद गोडबोले's picture

4 Feb 2014 - 4:23 pm | प्रसाद गोडबोले

(कालगणने मधे जरा गडबड आहे , बाबर १३००-१४०० च्या आसपास भारतात आला होता) पण

मुद्द्यात पॉईंट आहे !

माहितगार's picture

4 Feb 2014 - 5:19 pm | माहितगार

का बर गेल्या पाच हजार वर्षात भगवान महाविर गौतम बुद्ध वैदीक सप्तर्षी गुरुनानक ते आदीशंकराचार्य ते विवेकानंद असे तसेच थेट मंगोलीया पर्यंत बौद्ध धर्म नेणारे अनेक महापुरूष भारतभूमीने दिले. इराण मध्ये बहाई धर्माला खूप यश नाही मिळाल पण तो स्वतःच्याच बळावर निर्माण झाला आणि आपण इतिहासाच्या या सकारात्मक पुनरावृत्तीवर विश्वास ठेऊ शकतोच की.

प्रसाद गोडबोले's picture

4 Feb 2014 - 5:43 pm | प्रसाद गोडबोले

कुणाची कुणाशी तुलना करताय राव ?

जेव्हा आदिशंकराचार्य , कुमारिल भट्ट ह्या विद्वानांनी बौध्द लॉजिक मधले फ्लॉज आणि सेल्फ कॉन्टृअ‍ॅडिक्श्न दाखवले तेव्हा जवळपास सर्व बौध्द धर्मातील लोक परत वैदिक धर्मात आहे ....

असे काही मध्यपुर्वेतील हट्टाग्रही धर्मानबाबत होईल ही आशा बालगणे हा फारच मोठ्ठा आशावाद आहे बुवा .

माहितगार's picture

4 Feb 2014 - 6:00 pm | माहितगार

फारच मोठ्ठा आशावाद आहे बुवा .

तसा तो आहे :)

सुहास..'s picture

4 Feb 2014 - 7:01 pm | सुहास..

जेव्हा आदिशंकराचार्य , कुमारिल भट्ट ह्या विद्वानांनी बौध्द लॉजिक मधले फ्लॉज आणि सेल्फ कॉन्टृअ‍ॅडिक्श्न दाखवले तेव्हा जवळपास सर्व बौध्द धर्मातील लोक परत वैदिक धर्मात आहे ... >>>

आर यु किडिंग !!

मंदार दिलीप जोशी's picture

5 Feb 2014 - 2:40 pm | मंदार दिलीप जोशी

अनुमोदन

माहितगार's picture

5 Feb 2014 - 7:03 pm | माहितगार

या धागा पद्धतीमुळे आपण अनुमोदन नेमके कशाचे केले ते नीटसे लक्षात नाही आले.

प्रतिसादा करता धन्यवाद.

पिवळा डांबिस's picture

4 Feb 2014 - 12:19 pm | पिवळा डांबिस

तुम्ही दिलेल्या कलमांत अजुन एक कलम घालायला हवं....
४. तुम्ही भारतीय लोकप्रीय तत्वज्ञ अथवा महापुरूष आहात आणि तुम्हाला तुमच्या भारतीय बांधवांना पाकिस्तानात/ बांगला देशात सामील होण्याच आवाहन करायच आहे ते तुम्ही कसे (कोणत्या शब्दात) कराल ?

अन्यथा हा धागा एक पॉप्युलरिस्ट देखावा आहे असं समजलं जाईल....
स्पष्टोक्तीबद्दल क्षमस्व...

माहितगार's picture

4 Feb 2014 - 2:25 pm | माहितगार

अन्यथा हा धागा एक पॉप्युलरिस्ट देखावा आहे असं समजलं जाईल....

बराचसा आश्चर्यचकीत आहे

जी गोष्ट माझ्या स्वतःच्या आणि आपल्या समकालीन पिढीच्या हयातीत होण्याची शक्यता कमीत कमी आहे इथे काही मिपा सदस्य मंडळाची निवडणूक लावलेली नाही :) आणि आम्ही ग्रामपंचायतीच्या सदस्यत्वाच्या सुद्धा निवडणूकीस उभे टाकण्याची सुतराम शक्यता नाही. टोपण नावाने लिहितो आहे ज्याचे व्यक्तीगत नावाला पसाभरही क्रेडीट मिळावयाचे नाही त्या बद्दल पॉप्युलरिस्ट असा तर्क अचंबित करणारा आहे.

समजा उद्द्या एखाद्या पंतप्रधानाने जाणीवपुर्वक पॉप्युलीस्ट होण्याकरता पाकीस्तान सोबत युद्ध लावलेच आणि सैन्य भरतीचे आवाहन केले किंवा ब्लड डोनेशनचे आवाहन केले तर त्याला पॉप्युलीस्ट आहे हो ब्लड डोनेट करणार नाही करू देणार नाही अशी आपल भूमिका तर्कसुसंगत असणार आहे ?

तुम्ही दिलेल्या कलमांत अजुन एक कलम घालायला हवं....
४. तुम्ही भारतीय लोकप्रीय तत्वज्ञ अथवा महापुरूष आहात आणि तुम्हाला तुमच्या भारतीय बांधवांना पाकिस्तानात/ बांगला देशात सामील होण्याच आवाहन करायच आहे ते तुम्ही कसे (कोणत्या शब्दात) कराल ?

पिवळा ('रंगावर जाऊ नये तरीपण) तुम्ही खरच चीन मधन नाही न आलेले ? आम्ही (मी) भारताचे पवित्र भाग कोणत्याही तडजोडी शिवाय भारतात वापस आणावया करीता नऊशे वर्षांहून अधिक कालावधी पकडला आहे. आमची देशभक्ती एवढीही कातडी बचाऊ आणि तकलादू नाही त्या मुळे आपला आपला प्रस्ताव एक केवळ हस्यास्पद प्रयत्न म्हणून दुर्लक्षीत करत पास देत आहोत.धन्यवाद

टवाळ कार्टा's picture

4 Feb 2014 - 4:21 pm | टवाळ कार्टा

समजा उद्द्या एखाद्या पंतप्रधानाने जाणीवपुर्वक पॉप्युलीस्ट होण्याकरता पाकीस्तान सोबत युद्ध लावलेच

=))

आपण फक्त "कडक शब्दांत तीव्र निषेध करतो" त्यामानाने वरचे वाक्य म्हणजे पु.लं.च्या भाषेत "सशाच्या टाळुला गंडस्थळ म्हणणे"

माहितगार's picture

4 Feb 2014 - 5:06 pm | माहितगार

:)

पिवळा डांबिस's picture

4 Feb 2014 - 11:07 pm | पिवळा डांबिस

अहो हा गंमतीचा धागा आहे हे समजतंय. आणि मी तुम्हाला नाही हो पॉप्युलरिस्ट म्हणत आहे, धाग्याला म्हणतोय...
तीनही प्रांत एकच करायचे तर मग ते आपल्यात आले काय किंवा आपण त्यांच्यात गेलो काय, परिणाम एकच ना?
त्या प्रांतातल्या लोकांकडेही काही चांगल्या गोष्टी असतीलच ना...
म्हणून तुमच्या काथ्याकूटाला पूर्णत्व येण्यासाठी चौथा पर्याय सुचवला...

पिवळा ('रंगावर जाऊ नये तरीपण) तुम्ही खरच चीन मधन नाही न आलेले ?

हो, आम्ही मूळचे तिथलेच! आमचे पूर्वज गोबीच्या वाळवंटात कोबीची शेती करायचे!!! :)
असो. धन्यवाद.

प्रसाद गोडबोले's picture

4 Feb 2014 - 11:11 pm | प्रसाद गोडबोले

गोबीच्या वाळवंटात कोबीची शेती

=))

माहितगार's picture

5 Feb 2014 - 8:22 am | माहितगार

अहो हा गंमतीचा धागा आहे हे समजतंय. आणि मी तुम्हाला नाही हो पॉप्युलरिस्ट म्हणत आहे, धाग्याला म्हणतोय...

गंमत केल्याने (महापुरुष संत येती धाग्यावर तोची) दिवाळी (दसरा) यावर आता विश्वास बसला :) (ह.घ्या)

तीनही प्रांत एकच करायचे तर मग ते आपल्यात आले काय किंवा आपण त्यांच्यात गेलो काय, परिणाम एकच ना?
त्या प्रांतातल्या लोकांकडेही काही चांगल्या गोष्टी असतीलच ना...

जो पर्यंत झेंडा तिरंगाच राहील तो पर्यंत मंजूर !!

>>त्या प्रांतातल्या लोकांकडेही काही चांगल्या गोष्टी असतीलच ना...>>
पुर्वेचे लोक गंगेचेच पाणी पितात. आणि गंगोत्रीचे थोडे पाणी सिंधूत सोडण्याची व्यवस्था करूयात. :)

हो, आम्ही मूळचे तिथलेच! आमचे पूर्वज गोबीच्या वाळवंटात कोबीची शेती करायचे!!! Smile

सहज सुचल म्हणून.... पुर्वजांना बोलावून मागच्या तारखेने भारत चीन सीमा करारावर जुन्या तारखेने सह्या घेता येतील का ? बदल्यात गोबीच्या वाळवंट तुम्हास्नी आंदण :)

अनिरुद्ध प's picture

4 Feb 2014 - 4:58 pm | अनिरुद्ध प

आपण बघीतलेले हे 'दिवा स्वप्न' आहे असे जाणवते त्यामुळे त्यावर लिहिण्या एव्हडी माझी मती नसल्याने माझा पास.

माहितगार's picture

4 Feb 2014 - 5:09 pm | माहितगार

दुनीया उम्मीदपे वैगैरै तरीपण पास स्विकारला. आणि प्रतिसादाकरता धन्यवाद

तरी शक्य नाय. :( इस्लामिक देश बदलणे हे जवळपास अशक्यच आहे. कमी कट्टर असलेले जास्त कट्टर होत चाललेलेच बघायला मिळत आहेत. आणखी एक हजार काय दहा हजार वर्षे घेतलीत तरी हे व्हायचे नाही. जे काही होईल ते कोणाची शस्त्रे जास्त बलवान आहेत यावरच ठरेल. आताच पाकिस्तानी अतिरेकी आणि बांगलादेशी घुसखोरांनी नाकी नऊ आणलेत. एकत्र झाले तर अवघडच आहे. हां. भारत इस्लामिक देश बनला तरच हे एकत्रीकरण शक्य आहे. पण ही शक्यताही जवळपास शून्य वाटते. एकूणात ती पाकिस्तान आणि बांगलादेशातील अराजकाची घाण आपल्याला नको यापलिकडे काहीच सुचत नाही.

माहितगार's picture

9 Feb 2014 - 8:29 am | माहितगार

इन एनी केस भारत इस्लामिक देश बनला तर अशा टोकाच्या शक्यता गृहीत धरलेली नाही. भारत चिनी भाई भाई सारखा अथवा कारगील सारख्या परिस्थिती ओढवणारे दिखाऊ सौहार्दाचे खेळ हि या धाग्यात गृहीत धरलेले नाहीत. एकसंघ राष्ट्राच्या आड येणार्‍या संघर्षास प्रवृत्त करणार्‍या एकुण विचारधारा ज्या फिलॉसॉफींवर अवलंबून आहेत त्या अंशतः रिव्हिजीट आणि चॅलेंज होऊ लागतील ज्यामुळे तर्कसुसंगत नसलेल्या विचारधारा आणि वृत्ती गळून पडण्यास सहाय्य होईल असा काही एक विचार या धाग्या मागे आहे.

एनीवे या धाग्यानी सध्याच्या बहुसंख्य लोकांच्या चिंता मोकळे पणाने व्यक्त होत आहेत असे म्हणण्यास हरकत नसावी. अर्थात सध्याच प्रतिसादांसमोर अधिक प्रतिपक्ष मांडण्यापेक्षा गोगलगाईच्या गतीने का असेना चर्चा ऑन इट्स ओन पुढे गेलेली पाहण्यास आवडेल. या चर्चा धाग्याकरता मिपा हजारवर्षे जगो असाही आशावाद. (धाग्यातले विचार पटोत अथवा न पटोत मिपा हजारवर्षे जगो या शुभेच्छांनी तात्या आणि निलकांत अंमळ सुखावतील :) असे वाटते) त्या मुळे सध्यातरी सर्व प्रतिसादांना केवळ पोच आणि आणि धन्यवाद. खालील अक्शु यांच्या प्रतिसादाकरता त्यांना सुद्धा धन्यवाद
आणि शुभेच्छा.

जर पाकिस्तान आणि बान्ग्लादेश यान्च्यात एक हजार वर्षात भारतात विलीन होण्याइतपत बदल होतील अस गृहीत धरलं असेल,तर त्याच एक हजार वर्षातले भारतीय मानसिकतेमधले बदल देखिल विचारात घ्यायला हवेत. धाग्यामध्ये विचारलेल्या प्रश्नांना इथे जी उत्तरे मिळतील ती एक हजार वर्षांनंतरच्या पाकिस्तान आणि बांगलादेश वासियांना २०१४ मधील भारतीयांच्या मानसिकतेतुन केलेलं आवाहन या स्वरूपातली असतील. त्यामुळे एक हजार वर्षांनंतरच्या भारतीय मानसिकतेमधील बदलांबद्दल देखिल काही ठोस गृहितके असावित असे वाटते.

माहितगार's picture

20 Dec 2014 - 2:33 pm | माहितगार

Pratap Bhanu Mehta यांचा इंडियन एक्सप्रेसमध्ये Pakistan needs a new story हा एक चांगला लेख आला आहे.