आत्ते-मामे भावंडे

नर्मदेतला गोटा's picture
नर्मदेतला गोटा in जनातलं, मनातलं
30 Jul 2018 - 8:38 am

मनामधे काही शंका आहेत.

1. आत्ते मामे भावंडांमधे लग्न केल्यामुळे नेमका काय फायदा होतो ?
(मामे बहीण, आत्ते भाऊ)

नात्यातल्या इतर लग्नांमधे काही साईड इफेक्टस् असतात तसे इथे असतात का !
की काहीच धोके नसतात ?

2. पुरुष कितव्या वर्षापर्यंत बाप बनू शकतो आणि स्त्री कितव्या वयापर्यंत आई बनू शकते ?

मांडणीसमाजविचार

प्रतिक्रिया

म्हंजी तुमी बाकीच्यांनीं लिव्हल्याल कधी वाचीत न्हाय म्हणायच !!!!
आर !!! बाबा महितगारांच जेव्हढे बी धागे हायेत त्ये सगळे वाचा तूंच्या प्रशनाची उत्तर आपसूक्क भेटत्याल . याच्या वरून मला यक ज्योक आठावला .
दोन मानस रस्त्याने लै वेळ मागोमाग पळत आस्त्यात , मागचा मानूस पुढच्याला पकडायचा लै प्रयत्न करीत आसतो पण त्यो काई सापडत न्हाई . दोघबी लै दमत्यात , थोड्या येळाने यक हावालदार मागच्या माणसाला पकडतो आणि ईचारतो
" आर का लागलायस त्याच्या माग ? "
तव्हा त्यो मानूस बोलतो " सोडा सायब सोडा मला ! , साला वो खुद की कविता सुना के भाग रहा है और मेरी नही सून रहा है " .
आगदी तस तुमच चाल्ललय .

नर्मदेतला गोटा's picture

2 Aug 2018 - 4:16 pm | नर्मदेतला गोटा

ओके पाहतो

विजुभाऊ's picture

31 Jul 2018 - 4:49 pm | विजुभाऊ

सोडा सायब सोडा मला ! , साला वो खुद की कविता सुना के भाग रहा है और मेरी नही सून रहा है " .

असे आहे होय. मला वाटले की तो म्हणाला की " वो मेरा आत्ते भाऊ है और मै उसका मामे भाऊ है....."

गामा पैलवान's picture

2 Aug 2018 - 6:38 pm | गामा पैलवान

न.गो.,

नात्यातल्या इतर लग्नांमधे काही साईड इफेक्टस् असतात तसे इथे असतात का !

हो. आतेमामे विवाह शक्यतो करूच नये. अगदीच कोणी मिळालं नाही तर आणि तरंच करावा. आमच्या ओळखीत एकीने असा विवाह केला आणि सारखे गर्भपात होऊ लागले. तेव्हा तपासणी केल्यावर गर्भ लटके (= बलहीन) राहिल्याचं दिसून आलं. आजही त्यांना मूलबाळ नाही. एकंदरीत बरंच झालं म्हणायचं. मूल झालं तरी सुदृढ असण्याची शक्यता अत्यल्प राहिली असती.

आ.न.,
-गा.पै.

सतिश गावडे's picture

2 Aug 2018 - 7:28 pm | सतिश गावडे

तुमच्या नात्यातील केवळ एका उदाहरणावरुन तुम्ही सगळ्या जगात असेच होते हा निष्कर्ष काढत आहात.

आमच्याकडे (जिल्हा रायगड राज्य महाराष्ट्र) अशी लग्ने अनादी काळापासून होत आहेत. माझ्या पाहण्यात एकच घर वडील आणि मुलाची सासरवाडी अशी उदाहरणे पाहण्यात आहेत.

मुलगी सुंदर असेल तर आत्या भाचीसाठी फिल्डिंग लावते. मुलगा चांगला शिकलेला असेल, कमावता असेल तर मामा भाच्यासाठी फिल्डिंग लावतो.
मुलगी सुंदर आणि मुलगा चांगला शिकलेला आणि कमावता असेल तर तो दुग्धशर्करा योग असतो.

नर्मदेतला गोटा's picture

2 Aug 2018 - 8:27 pm | नर्मदेतला गोटा

अशी लग्ने अनादी काळापासून होत आहेत

काय सांगताय

सतिश गावडे's picture

2 Aug 2018 - 8:51 pm | सतिश गावडे

काय सांगताय: "अशी लग्ने अनादी काळापासून होत आहेत" हे सांगतोय.

गामा पैलवान's picture

3 Aug 2018 - 1:10 pm | गामा पैलवान

सतिश गावडे,

तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. अशी लग्नं बराच काळ होताहेत. फक्त ते चांगलं नाही इतकंच सांगायचंय मला.

हे दोनतीन पिढ्या सतत झालं तर त्याचे दुष्परिणाम दिसू लागतात. माझ्या उदाहरणंतलं जोडपं दुसऱ्या किंवा तिसऱ्या पिढीतलं असावं बहुतेक.

आ.न.,
-गा.पै.

सतिश गावडे's picture

3 Aug 2018 - 5:11 pm | सतिश गावडे

हे दोनतीन पिढ्या सतत झालं तर त्याचे दुष्परिणाम दिसू लागतात.

हो. ही शक्यता मात्र असू शकेल.

मात्र आमच्याकडे मामे-आते भावंडं लग्ने सर्रास होतात आणि विशेष समस्या झालेली ऐकण्यात पाहण्यात नाही.

आमचे परंपरावादी गा.पै. बदलले पण जे तथकथित पुरोगामी डोळस न होता तिथेच पहिले पाढे पंचाव्वन्नवर वादत आहेत त्यांचे कौतुक, याच विषयावर म्हणजे चुलत/आत्ये/मामे/मावस भाऊ बहीण विवाह भावी पिढीच्या दृष्टीने जोखीमीचे असतात या बद्दल मागच्या धागा चर्चेत तिन तिन डॉक्टरांनी अशा विवाहातील भावी संततीसाठीची जोखीम मान्य केली, अनेक संदर्भ चर्चेत आले.

चुलत/आत्ये/मामे/मावस भाऊ बहीण विवाह करण्या पुर्वी आणि नंतर संतती पूर्व चाचण्या करुन तज्ञ जनुकशास्त्रीय डॉक्टरांचा सल्ला घेणे सर्वोत्तम असावे.

सतिश गावडे's picture

3 Aug 2018 - 3:46 pm | सतिश गावडे

नैतर काय. तथाकथित पुरोगाम्यांना ठोकून काढले पाहीजे. डोळस न होता तिथेच पहिले पाढे पंचाव्वन्नवर वादत आहेत लेकाचे.

मी तुम्हाला समाजात काय होत आहे ते सांगतोय आणि तुम्ही मलाच तथाकथित पुरोगामी म्हणताय.
(हे चंद्र आणि वाकडे बोट यांच्या चालीत वाचावे)

माहितगार's picture

3 Aug 2018 - 4:01 pm | माहितगार

.

माहितगार's picture

3 Aug 2018 - 4:08 pm | माहितगार

.

सतिश गावडे's picture

3 Aug 2018 - 5:05 pm | सतिश गावडे

तुम्ही मला तथाकथित पुरोगामी ठरवून माझे अज्ञान दूर करण्यासाठी आपण जो व्हिडीओचा भडीमार करत आहात ते कौतुकास्पद आहे.

मात्र तुमच्या दयाळू माहितीसाठी सांगतो, मी आमच्याकडे काय होते हे सांगितले म्हणजे मी त्याचे समर्थन करतो असा होत नाही.

माहितगार's picture

3 Aug 2018 - 7:11 pm | माहितगार

काहीही हं गापैश्री...

तुमच्या नात्यातील केवळ एका उदाहरणावरुन तुम्ही सगळ्या जगात असेच होते हा निष्कर्ष काढत आहात.............मुलगी सुंदर आणि मुलगा चांगला शिकलेला आणि कमावता असेल तर तो दुग्धशर्करा योग असतो.

consanguinity and perinatal mortality शोधल्यास गूगलवर खंडीभर संदर्भ मिळतील

सतिश गावडे's picture

3 Aug 2018 - 8:00 pm | सतिश गावडे

मागासाहेब, इकडचे तिकडचे दूवे देऊन काय सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहात? आते-मामे भावंडांमध्ये लग्न झाले की समस्या निर्माण होतात, त्यामुळे अशी लग्ने व्हायला नकोत?

साधी गोष्ट आहे, अशा लग्नात समस्या उद्भवू शकतात, पण म्हणजे झाले लग्न की आली समस्या असे होत नाही. आमच्याकडे अशी लग्न सर्रास होतात आणि कुणाला विशेष समस्या आल्याचे ऐकण्यात किंवा पाहण्यात नाही. माझ्या सोबत चला, आमच्या सत्तर ऐशी उंबरा असलेल्या गावात तुम्हाला अशी दहा घरे दाखवतो. तीच परिस्थिती आजूबाजूच्या गावांमध्ये आहे.

तुम्ही मला तथाकथित पुरोगामी ठरवून लिंका घेऊन तुमचा हेका खरा करण्यासाठी प्रतिसादावर प्रतिसाद देत असल्याने मलाही प्रतिसाद द्यावे लागत आहे आणि जे पहील्या प्रतिसादात लिहीले तेच पुन्हा लिहावे लागत आहे.

माहितगार's picture

3 Aug 2018 - 8:20 pm | माहितगार

तुमच्या नात्यातील केवळ एका उदाहरणावरुन तुम्ही सगळ्या जगात असेच होते हा निष्कर्ष काढत आहात. >>> तुमच्या नात्यातील केवळ काही उदाहरणावरुन तुम्ही उर्वरीत जगात असे होत नाही हा निष्कर्ष काढत आहात ? दुसर्‍या बाजूला मेडीकल स्टडीज आहेत. - आपल्याकडे नीगेटीव्ह केसेसची कुटूंबांतर्गत चर्चा कमी होते - झालेल्या/आलेल्या दुख्खद परिस्थितचे कारण माहित नसते - माहित झाए तरी चर्चा टाळल्या जातात . माझ्या परिचयातील एका कझीन मॅरेज केस मधील एक मुलगा गेला पण सांत्वना पलिकडे इथे उघड चर्चा करता येते तसे उघड चर्चा करणे प्रशस्त ठरत नाही म्हणून सोडून द्यावे लागते

सतिश गावडे's picture

3 Aug 2018 - 8:28 pm | सतिश गावडे

ओके :)

माहितगार's picture

3 Aug 2018 - 8:04 pm | माहितगार

11 July 2016 ऑस्ट्रेलिअन पेपर

....in Australia, but recently there has been migration from countries with widespread practice of consanguinity. ....

Conclusion
Women from consanguineous relationships are at higher risk of adverse perinatal outcomes, including stillbirth. Given the 5% prevalence of consanguinity in our obstetric population, these findings have significant implications for preconception counselling, obstetric care and health resource allocation.

गामा पैलवान's picture

3 Aug 2018 - 6:30 pm | गामा पैलवान

माहितगार,

आमचे परंपरावादी गा.पै. बदलले

हे काय बरें? मी परंपरावादी होतो म्हणजे काय? आणि बदललो म्हणजे काय? कुतूहल म्हणून विचारतोय.

आ.न.,
-गा.पै.

माहितगार's picture

3 Aug 2018 - 7:15 pm | माहितगार

उपरोध विरहीत कौतुक, परंपरावादी स्वःला विचारवंत म्हणुन सहसा दवंडी पिटत नाहीत नाहीत त्यामुळे आमच्यासारख्या स्वा:ला विचारवंत समजणार्‍यांपेक्षा कधी कधी वस्तुस्थिती लवकर स्विकारतात.

नर्मदेतला गोटा's picture

3 Aug 2018 - 8:15 pm | नर्मदेतला गोटा

इथे नुसत्या नात्यातील लग्ने नव्हे तर आत्ते भाऊ मामे बहीण या केसबद्दलच शंका आहे

माहितगार's picture

3 Aug 2018 - 8:33 pm | माहितगार

हा घ्या तुमच्यासाठी एम.एल. कुलकर्णींचा पेपर पिडीएफ यात आत्ते भाऊ मामे बहीण केसेसचा उल्लेखही आहे. पृष्ठ ५ शेवटचा परिच्छेद कनक्लूजन साठी पहावा

गामा पैलवान's picture

4 Aug 2018 - 12:32 pm | गामा पैलवान

माहितगार,

आतेमामे विवाह ही रूढी आहे. तिला कोणताही हिंदू शास्त्राधार नाही. त्यामुळे ती परंपरा नव्हे. निदान माझी तरी अशी धारणा आहे.

आ.न.,
-गा.पै.

माहितगार's picture

5 Aug 2018 - 12:50 pm | माहितगार

...आतेमामे विवाह ही रूढी आहे. तिला कोणताही हिंदू शास्त्राधार नाही. त्यामुळे ती परंपरा नव्हे. निदान माझी तरी अशी धारणा आहे.

इथे तुमच्या स्वतःसाठी विवीध अडचणीचे प्रश्न उभी करणारी भूमिका दिसते.

१) रुढी या परंपरा असू शकत नाहीत ?

किमान शब्दकोशीय आधार तपासले तर शब्दबांधानुसार , 'परंपरा, प्रथा, चाल, रीत, रुढी, वहिवाट, परिपाठ, शिरस्ता, प्रघात, पायंडा' हे सर्व समानार्थी शब्द आहेत. दाते कर्वे कोशानुसार परंपरा म्हणजे 'चालीरीती , प्रथा , रूढी; .

[सं-स्त्री.] - 1. वह व्यवहार जिसमें वर्तमान पीढ़ी पुरानी पीढ़ी की देखा-देखी करते हुए उनके रीति-रिवाज़ों का अनुकरण करती है 2. प्राचीन समय से चली आ रही रीति; परिपाटी; (ट्रैडिशन) 3. बहुत-सी घटनाओं, बातों या कार्यों के एक-एक कर होने का क्रम; अनुक्रम।
हिंदी टू डिक्शनरी. कॉम

या व्याख्यांमध्ये परंपरा आणि शास्त्राधारा / ग्रंथ प्रामाण्याचा संबंध दिसत नाही.

२) शास्त्राधार म्हणजे आपण ग्रंथ प्रामाण्य म्हणताहात असे दिसते. ग्रंथ प्रामाण्य म्हणजे परंपरा असा आपला अर्थ असेल तर ज्याला ग्रंथ प्रामाण्य नाही त्या प्रथा आपल्या मतानुसार बदलता येतात आणि आपल्या भूमिकेचे या स्तरा पर्यंत स्वागत आहे.

३) आपण म्हणता तसे आतेमामे भावंड विवाह बहुधा सपिंड विवाहात मोडत असल्यामुळे ग्रंथ प्रामाण्यानुसार मान्य नाहीत (चुभुदेघे) पण समजा याला ग्रंथाधाराने मान्य केलेले असते आणि विज्ञान त्या बद्दल साशंकता सुचवते हे पुढे दिसले तर आपण वस्तुनिष्ठ विज्ञान सोडून ग्रंथप्रामाण्याची भलावण केली असती ? मग आपल्या भूमिकात आणि 'त्यांच्या' भूमिकात अंतर काय राहीले असते ?

गामा पैलवान's picture

5 Aug 2018 - 1:51 pm | गामा पैलवान

माहितगार,

मग आपल्या भूमिकात आणि 'त्यांच्या' भूमिकात अंतर काय राहीले असते ?

याबाबतीत माझा युक्तिवाद नकारार्थी आहे. कुठल्याही धर्मशास्त्रात आतेमामे विवाह करावेत म्हणून निक्षून सांगितलेलं नाही. म्हणजेच ती परंपरा नव्हे. ती केवळ रूढी आहे. धर्मशास्त्र मानवाच्या हिताचा सांगोपांग विचार करून लिहिलेलं असतं असा माझा समज आहे. मी रूढींना फारसं महत्त्व देत नाही. विशेषत: घातक व/वा निरर्थक रूढी असेल तर ताबडतोब बंद करण्यास अडचण येऊ नये.

आ.न.,
-गा.पै.

माहितगार's picture

5 Aug 2018 - 10:23 pm | माहितगार

धागा लेखास अंशतः अवांतर होते आहे पण गापैंसोबत हा मुद्दा चर्चेस मिळालाय तेव्हा धागा लेखकाची माफी मागून ..

..विशेषत: घातक व/वा निरर्थक रूढी असेल तर ताबडतोब बंद करण्यास अडचण येऊ नये.

अत्यंत स्वागतार्ह भूमिका ,

पण ... घातक व/वा निरर्थक ग्रंथ बाह्य असेल तर बंद करावे पण ग्रंथात आधार असेल घातक व/वा निरर्थक असले तरी जपले पाहीजे अशी काही भूमिका आहे का ?

घातक व/वा निरर्थक रूढी म्हणून जे नाकारत आहात त्याला चुकून एखाद्या ग्रंथात आधार मिळाला तर त्याचे पुन्हा समर्थन केले जाईल का ?

गामा पैलवान's picture

5 Aug 2018 - 11:18 pm | गामा पैलवान

माहितगार,

हा जरतरी प्रश्न आहे. हिंदूंच्या धर्मग्रंथांचा अन्वयार्थ लावण्यास बुद्धी चालवावी लागते. तिजनुसार घातक प्रथेस शास्त्राधार सापडला तर शास्त्र सुधरणे इष्ट.

एखादं प्रत्यक्श उदाहरण मिळाल्यास चर्चेस बरं पडेल.

आ.न.,
-गा.पै.

...तिजनुसार घातक प्रथेस शास्त्राधार सापडला तर शास्त्र सुधरणे इष्ट.

आपल्या सकारात्म्क भूमिकेचे स्वागत.

जिथ पर्यंत धागा लेखाचा विषय आहे . हिंदू विवाह कायद्याच्या माध्यमातून केलेले बदल शोधगंगा डॉट कॉमवरील या शोध निबंधाच्या प्रकरण १० पिडीएफ मध्ये थोडक्यात अभ्यासता यावेत.

नर्मदेतला गोटा's picture

6 Aug 2018 - 12:29 am | नर्मदेतला गोटा

परंपरा म्हणजे काय ?
महाभारत काळात अशा विवाहांची काही उदाहरणे आहेत का

माहितगार's picture

6 Aug 2018 - 12:41 pm | माहितगार

...महाभारत काळात अशा विवाहांची काही उदाहरणे आहेत का

यातील अर्जून-सुभद्रा विवाहाचे उदाहरण सुपरिचीत असावे. अजूनही असतील. (यातही दुर्योधनाला दूर ठेवून राजकारणास्तव? रक्ताच्या नात्याला कृष्ण प्राधान्य देतो अशी काही कथा असावी चुभूदेघे) हाच अर्जून महाभारतात वेगळ्या नात्याच्या उर्वशीच्या विनंतीला धुडकावून लावताना दिसलेला आहे. (बौद्ध जातक कथातूनही समाजात होत असलेल्या अशा विवाहांची काही महिती शोधल्यास मिळावी) अर्थात अशी वेगवेगळी उदाहरणे मिळाली तरी, ऋग्वेदातील यम-यमी संवादात यम स्वतः बहिणीची विवाह विनंती नाकारताना दाखवलेला आहे. याज्ञवल्क्य स्मृती जी विवाह परंपरांवर प्रभाव ठेवून होती ती सगोत्री विवाह नाकारत होतीच पण सोबत सपिंड विवाह म्हणजे मागच्या पाच ते सात पिढ्यत्तून भाऊ बहीण विवाह नाते होऊ नये अशी अधिकची अपवाद रहीत अट घालत होती. (चुभूदेघे) त्यामुळे महाभारतात अर्जून-सुभद्रा विवाहाचे उदाहरण असूनही आत्ये भाऊ मामे बहीण विवाहाचे उत्तर भारतात फारसे प्रचलन दिसत नाही.

महाराष्ट्र ते दक्षीण भारतातली प्रचलन तमीळ संस्कृतीतून येते जिथे नवर्‍याला हाक मारण्यासाठी 'अत्तन' म्हणजे आत्ये भाऊ हा शब्द वापरला जात असे. दक्षिण भारतीय विवाह विधीतील एका प्रसंगात मुलगा मी आता काशीला निघालो म्हणतो तेव्हा त्याचा मामा त्याला थांबवतो आणि थांब माझ्या मुलीशी तुझे लग्न लावून देतो म्हणतो. व्यक्तिशः मला हि प्रथा आणि दक्षिणेतील मागे पडलेली मातृसत्ताक पद्धत यांचा काही संबंध असेल का असा प्रश्न पडतो.

अशा स्थानिक प्रथांसाठी १९५५ च्या हिंदू विवाह कायद्यात अपवाद ठेवले तरीही मुलतः नवा कायदा याज्ञवल्क्य स्मृतीत कालानुरुप बदल करत स्विकारता गेला असे दिसून येते.
* हिंदू विवाह कायदा कसा विकसीत होत आला आहे याच्या अधिक माहिती साठी Jayasree, L यांचा शोधगंगा डॉट्कॉमवरील शोध निबंध दहावे प्रकरण पहावे (पिडीएफ दुवा)

* याज्ञवल्क्य स्मृती इंग्रजी विकिपीडिया लेख

* सपिंड संकल्पना इंग्रजी विकिपीडिया लेख

Sapind vivah

** Any person belonging to the yellow area will be a "sapinda" of the "Subject" सौजन्य इंग्रजी विकि आणि विकिमिडिया कॉमन्स चुभूदेघे.

माहितगार's picture

6 Aug 2018 - 3:01 pm | माहितगार

2. पुरुष कितव्या वर्षापर्यंत बाप बनू शकतो आणि स्त्री कितव्या वयापर्यंत आई बनू शकते ?

ह्या विषयाची मिपावर या पुर्वी चर्चा झाली आहे का कल्पना नाही. डॉक्टर मंडळी या विषयावर अधिक माहिती देऊ शकतील असे वाटते. हा प्रश्न कदाचित वेगळा असावयास हवा असे वाटते प्रश्नाच्या पुर्नरचने आधी , आहे त्या स्वरुपात या प्रश्नाचे टेक्निकल उत्तर स्त्रीयांना मेनॉपॉज येई पर्यंत आणि पुरुषांना अशी मर्यादा नसावी चुभूदेघे.

पण आधूनिक काळात या प्रश्नाच्या पुर्नरचनेची कदाचित आवश्यकता असावी. असे वाटते.

2. संतती आणि आईच्या आरोग्याच्या दृष्टीने आई आणि वडील कोणत्या वयोगटातील असणे आदर्श ठरते ?

मी पुर्वी माहिती घेतली होती त्यानुसार

* आईच्या स्वतःच्या आरोग्य सुरक्षेच्या दृष्टीने १८ ते २८ हे आदर्श वय आहे ,

* संततीच्या दृष्टीने आईचे अथवा वडिलांचे वय ३५ च्या पुढे असेल तर संततीच्या आरोग्य विषयक जोखीम वाढते. कारण या वयानंतर बिजांडे आणि शुक्रजंतू च्या सक्षमतेत मर्यादा येत जातात आणि भावी संतती व्याधी ग्रस्त असण्याच्या काही शक्यता असू शकतात. (चुभूदेघे)

* आई वडीलांच्या भावनिक गरजा आणि संतती अधिकार लक्षात घेऊन उशीर-वयातील संततीचेही समर्थन केले जाते. अपवादात्मक स्थितीत असे समर्थन समजून घेता येऊ शकेल. पण उशीर-वयातील संतती आरोग्य जोखीमीची एक विचीत्र तुलना चुलत/आत्ये/मामे/मावस भाऊ-बहीण विवाहाच्या समर्थनार्थ केली जाते. उशीर-वयातील संतती आरोग्य जोखीम असते तशीच चुलत/आत्ये/मामे/मावस भाऊ-बहीण विवाहीतांच्या संततीस असते मग चुलत/आत्ये/मामे/मावस भाऊ-बहीण विवाहीत वावगे काय आहे ? हा युक्तिवाद म्हणजे एकातील जोखीमेने दुसर्‍या जोखीमेचे निराकरण होते म्हणण्यासारखे असावे ; किंवा एकाच्या चुकीने दुसर्‍याची चुक झाकली जाते म्हणण्यासारखे असावे, या कडे दुर्लक्ष होत असावे.

आत्ये-मामे भाऊ-बहीण विवाहपूर्व आणि संतती होऊ देण्याच्या निर्णयापुर्वी जनुकीय तत्ज्ञ डॉक्टरांकडून सुयोग्य चाचण्या करुन मगच निर्णय घेणे सुयोग्य असावे. आणि वय उलटून गेल्या नंतरही संततीला होणारी संभाव्य जोखीम आणि संबंधीत चाचण्या जनुकीय तत्ज्ञ डॉक्टरांकडून करुन मगच निर्णय घेणे श्रेयस्कर असावे असे माझे व्यक्तिगत मत .

चुभूदेघे