'कविता'

सत्यजित...'s picture
सत्यजित... in जे न देखे रवी...
22 May 2018 - 4:58 am

दुःखाच्या डोहामधुनी
करुणेची येते गाज
कुठलेसे पान तरंगत
लहरींना देते व्याज

कलतात उन्हे सोनेरी
रंगांची उधळत माया
डोहावर पसरत जाती
वृक्षांच्या काजळ छाया

ती काठावरती बसते
बुडवून स्वतःचे पाय
अन् हा हा म्हणता येते
पाण्यावर मोहक साय

मी 'कविता',वाचत असता
ती शांतच असते बहुधा
जणु चंद्रसरींनी भिजते
नित-निळी सावळी वसुधा!

—सत्यजित

भावकवितामाझी कविताशांतरसकविता

प्रतिक्रिया

प्रसाद गोडबोले's picture

22 May 2018 - 9:33 am | प्रसाद गोडबोले

सुंदर कविता आणि कच्चामाल !

अवांतर : (सविता) असे अतिषय सुंदर विडंबन तत्काळ सुचले ! लिहायला घेतले होते पण लिहायला घेतल्यावर एस्पिशली ' शेवटच्या कडव्यावरील विडंबीत कडवे' लिहिल्यावर लक्षात आले की कविता ( आणि कदाचित आयडी देखील) संपादित होइल. तस्मात प्रकाशित करायचे टाळले आहे ;)

बाकी ह्या निमित्ताने परत सविताची आठवण झाली हे ही नसे थोडके !

टवाळ कार्टा's picture

22 May 2018 - 9:45 am | टवाळ कार्टा

मम
मी सविताच्या ऐवजी कविथा डोक्यात बनवत होतो =))
बाकी तू लिहिलेली क्विता व्यनीत नाहीतर कायप्पावर पाठव

प्रसाद गोडबोले's picture

22 May 2018 - 7:51 pm | प्रसाद गोडबोले

हन्त हन्त

तुला सविता भाभी सोडुन कविथा आठवावी . छ्या हेच का ते अच्छे दिन !

=))))

वा वाह!
मस्तच! आवडली कविता.

कविता छान आहे. 'ग्रेस' ची आठवण आली. फक्त हे कडवं नीटसं समजलं नाही.

कुठलेसे पान तरंगत
लहरींना देते व्याज

हा व्याज शब्द जरासा विसंगत वाटला एकूण कवितेशी. अर्थात हे माझे वैयक्तिक मत झाले. कवीचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो.

तो फ्लोटिंग इंटरेस्ट रेट असेल. ;)
किंबहुना झाडाने पाणी घेतले कर्जाऊ त्याची परतफेड म्हणून पान दिले असावे. आता ते डुबले तर पाण्याला वाईट वाटेल म्हणून तरंगत राहात व्याज देत असेल.

एस's picture

22 May 2018 - 6:04 pm | एस

:-D

सस्नेह's picture

25 May 2018 - 2:17 pm | सस्नेह

फ्लोटिंग इंटरेस्ट

=))

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

22 May 2018 - 4:55 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

फार सुंदर रचना.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 May 2018 - 10:27 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लिहित राहा.

ती काठावरती बसते
बुडवून स्वतःचे पाय
अन् हा हा म्हणता येते
पाण्यावर मोहक साय.

लैच आवडल्या चार ओळी.

-दिलीप बिरुटे

रातराणी's picture

25 May 2018 - 10:32 am | रातराणी

!! मस्त !!

सस्नेह's picture

25 May 2018 - 2:21 pm | सस्नेह

शेवटच्या चार ओळी खास !
पहिल्या चार ओळी अशा चालतील बहुधा :
'दुःखाच्या दर्यामधुनी
करुणेची येते गाज
कुठलेसे पान तरंगत
लहरींना देते साज'

मदनबाण's picture

25 May 2018 - 8:21 pm | मदनबाण

छान !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- अभिनेत्री ओ अभिनेत्री अभिनय नेत्री नट गायत्री... :- Mahanati

सत्यजित...'s picture

26 May 2018 - 12:19 pm | सत्यजित...

सहसा ठरवून कविता लिहून होतंच नाही कधी! ती अशीच अवचित सुचून जाते कधीतरी!
सर्व प्रतिसादकांचे मनःपूर्वक खूप-खूप धन्यवाद!

खिलजि's picture

31 May 2018 - 5:56 pm | खिलजि

मस्तच ,, सुंदर विचारांची सलामी दिलीय काव्यदेवतेला . ह्या अश्या फैरी झडल्या मंचावर , कि सार्थक झाल्यासारखं वाटत .

सिद्धेश्वर विलास पाटणकर

ही कविता कशी सुटली नजरेतून? फार सुरेख!