दुःखाच्या डोहामधुनी
करुणेची येते गाज
कुठलेसे पान तरंगत
लहरींना देते व्याज
कलतात उन्हे सोनेरी
रंगांची उधळत माया
डोहावर पसरत जाती
वृक्षांच्या काजळ छाया
ती काठावरती बसते
बुडवून स्वतःचे पाय
अन् हा हा म्हणता येते
पाण्यावर मोहक साय
मी 'कविता',वाचत असता
ती शांतच असते बहुधा
जणु चंद्रसरींनी भिजते
नित-निळी सावळी वसुधा!
—सत्यजित
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
6367
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुंदर कविता आणि कच्चामाल !
सुंदर कविता आणि कच्चामाल !
अवांतर : (सविता) असे अतिषय सुंदर विडंबन तत्काळ सुचले ! लिहायला घेतले होते पण लिहायला घेतल्यावर एस्पिशली ' शेवटच्या कडव्यावरील विडंबीत कडवे' लिहिल्यावर लक्षात आले की कविता ( आणि कदाचित आयडी देखील) संपादित होइल. तस्मात प्रकाशित करायचे टाळले आहे ;)
बाकी ह्या निमित्ताने परत सविताची आठवण झाली हे ही नसे थोडके !
मम
In reply to सुंदर कविता आणि कच्चामाल ! by प्रसाद गोडबोले
मम
मी सविताच्या ऐवजी कविथा डोक्यात बनवत होतो =))
बाकी तू लिहिलेली क्विता व्यनीत नाहीतर कायप्पावर पाठव
हन्त हन्त
In reply to मम by टवाळ कार्टा
हन्त हन्त
तुला सविता भाभी सोडुन कविथा आठवावी . छ्या हेच का ते अच्छे दिन !
=))))
वा वाह! मस्तच! आवडली कविता.
वा वाह!
मस्तच! आवडली कविता.
कविता छान आहे. 'ग्रेस' ची
कविता छान आहे. 'ग्रेस' ची आठवण आली. फक्त हे कडवं नीटसं समजलं नाही.
कुठलेसे पान तरंगत
लहरींना देते व्याज
हा व्याज शब्द जरासा विसंगत वाटला एकूण कवितेशी. अर्थात हे माझे वैयक्तिक मत झाले. कवीचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो.
तो फ्लोटिंग इंटरेस्ट रेट असेल
In reply to कविता छान आहे. 'ग्रेस' ची by एस
तो फ्लोटिंग इंटरेस्ट रेट असेल. ;)
किंबहुना झाडाने पाणी घेतले कर्जाऊ त्याची परतफेड म्हणून पान दिले असावे. आता ते डुबले तर पाण्याला वाईट वाटेल म्हणून तरंगत राहात व्याज देत असेल.
:-D
In reply to तो फ्लोटिंग इंटरेस्ट रेट असेल by अभ्या..
:-D
फ्लोटिंग इंटरेस्ट =))
In reply to तो फ्लोटिंग इंटरेस्ट रेट असेल by अभ्या..
=))
सुंदर
फार सुंदर रचना.
कविता सुरेख.
लिहित राहा.
ती काठावरती बसते
बुडवून स्वतःचे पाय
अन् हा हा म्हणता येते
पाण्यावर मोहक साय.
लैच आवडल्या चार ओळी.
-दिलीप बिरुटे
!! मस्त !!
!! मस्त !!
सुरेख !
शेवटच्या चार ओळी खास !
पहिल्या चार ओळी अशा चालतील बहुधा :
'दुःखाच्या दर्यामधुनी
करुणेची येते गाज
कुठलेसे पान तरंगत
लहरींना देते साज'
छान !
छान !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- अभिनेत्री ओ अभिनेत्री अभिनय नेत्री नट गायत्री... :- Mahanati
धन्यवाद!
सहसा ठरवून कविता लिहून होतंच नाही कधी! ती अशीच अवचित सुचून जाते कधीतरी!
सर्व प्रतिसादकांचे मनःपूर्वक खूप-खूप धन्यवाद!
मस्तच ,, सुंदर विचारांची
मस्तच ,, सुंदर विचारांची सलामी दिलीय काव्यदेवतेला . ह्या अश्या फैरी झडल्या मंचावर , कि सार्थक झाल्यासारखं वाटत .
सिद्धेश्वर विलास पाटणकर
ही कविता कशी सुटली नजरेतून?
ही कविता कशी सुटली नजरेतून? फार सुरेख!