तुझ्या नाजूक ओठांनी...

Primary tabs

सत्यजित...'s picture
सत्यजित... in जे न देखे रवी...
9 Jan 2018 - 9:55 pm

अवेळी मोहरावे तू.. ऋतूंना साद घालावी
तुझ्या नाजूक ओठांनी कळ्यांची चुंबने घ्यावी!

फुले वेचून मी सारी तुझ्या हातात देताना
तुझ्या अलवार स्पर्शांनी मला आलिंगने द्यावी!

कपाळी चंद्र कोरावा,चुड्याने चांदणे ल्यावे
तुझा शृंगार होताना,गुलाबी रात्र जागावी!

जरासा तोल ढळला की मला बाहूंत घ्यावे तू
तुझ्या आरक्त डोळ्यांची शराबी धुंद मी प्यावी!

सुगंधी स्पंदने अपुली उराशी खोल लपवू,ये...
फुलांचे देह शिणले की, धुक्याची शाल ओढावी!

—सत्यजित

gajhalgazalमराठी गझलशृंगारकविताप्रेमकाव्यगझल

प्रतिक्रिया

चांदणे संदीप's picture

10 Jan 2018 - 5:54 am | चांदणे संदीप

सुरेख रचना! जियो!

Sandy

जयंत कुलकर्णी's picture

10 Jan 2018 - 10:01 am | जयंत कुलकर्णी

मस्त....
खर्‍या जाती दोनच. आणि त्या एकमेकांवर प्रेम करतात.... :-) रेफः सध्याचा गदारोळ

प्राची अश्विनी's picture

10 Jan 2018 - 11:09 am | प्राची अश्विनी

सुंदर!

विशाल कुलकर्णी's picture

11 Jan 2018 - 4:52 pm | विशाल कुलकर्णी

मस्तच !
फक्त ते आलिंगणेच्या ऐवजी आलिंगने करा.

सत्यजित...'s picture

12 Jan 2018 - 1:48 pm | सत्यजित...

हो,ते नंतर लक्षात आले!
'आमंत्रणा'चे 'आलिंगन' होता होता राहून गेलेले ते!

प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Jan 2018 - 9:01 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आवडली कविता. लिहीत राहा.
GN ;)

-दिलीप बिरुटे

नाखु's picture

11 Jan 2018 - 9:12 pm | नाखु

अभिनंदन

सद्गय गदारोळात( मंडई, स्वारगेट, तुळशीबाग, गावठी अड्डा यांची समुच्चय अनुभुती) पिडीतांना दिलेली झुळूक

शिव कन्या's picture

11 Jan 2018 - 10:00 pm | शिव कन्या

गुलाबी झुळूक.
सुंदर.

सत्यजित...'s picture

12 Jan 2018 - 1:50 pm | सत्यजित...

सर्व प्रतिसादकर्त्यांचे धन्यवाद,आभार!

प्रचेतस's picture

12 Jan 2018 - 2:58 pm | प्रचेतस

क्या बात है....! अप्रतिम

सत्यजित...'s picture

25 Jan 2018 - 7:55 pm | सत्यजित...

प्रतिसादाबद्दल प्रचेतस व टंकणातील चूक दुरुस्त केल्याबद्दल सा.सं.चे मनःपूर्वक आभार!