रिओ ऑलिम्पिक २०१६

खेडूत's picture
खेडूत in जनातलं, मनातलं
4 Aug 2016 - 9:29 pm

रिओ ऑलिम्पिक २०१६

गेल्या वेळी लंडन ऑलिम्पिकच्या वेळेस २०१२ ला इंग्लंडमधेच वास्तव्य असल्याने ऑलिम्पिकमधील पाचसहा इव्हेंट्स आणि सामने प्रत्यक्ष जाऊन पहाता आले. आयुष्यात कधीतरी ऑलिम्पिक सामने पाहू ही इच्छा याचि देही पूर्ण झाली.

यंदा ब्राझीलमध्ये प्रथमच रिओला ऑलिम्पिक होत आहे. ब्रिक्स देश म्हणून ब्राझील महत्व टिकवून आहेच, पण या स्पर्धेच्या निमित्ताने शानदार आयोजन करून आंतरराष्ट्रीय पातळीवर आपले महत्व ठळक करण्याचा ते प्रयत्न करतील. भारत अद्याप दोन दशके तरी या आयोजनास मुकेल असे वाटते. ५ ते २१ ऑगस्ट चालणाऱ्या या स्पर्धेचा थरार माझ्यासह अनेकांना यावर्षी दूरचित्रवाणीवरच अनुभवावा लागणार आहे. प्रायोजक आणि आयोजक, माध्यमे यांची लगबग सुरू झाली असेल. सुरक्षितता हाही सर्वात महत्वाचा मुद्दा आहेच. अनेक अपुरी कामे आणि आयोजनाचा गोंधळ तिथेही ऐकायला मिळतोय. पण तेव्हढं चालायचंच.

भारताची कामगिरी अलीकडच्या काळात चांगली होते आहे, त्यामुळे नव्या पिढीला प्रोत्साहन मिळून अधिकाधिक ऑलिम्पियन खेळाडू तयार व्हावेत ही अपेक्षा आहे. यंदा हॉकी, कुस्ती, टेनिस, बॅडमिंटन शिवाय तिरंदाजी, नेमबाजी, गोल्फमधेही दाखल घेण्याजोगी कामगिरी होईल असे वाटते.

तिथे उपस्थित राहणारे मोजके मिपाकर तरी असतील अशी आशा आहे. असल्यास ते तिथल्या खेळाविषयी बातम्यां सोबत सामाजिक आणि तिथल्या वैशिष्ट्यपूर्ण खाद्यपदार्थांविषयी लिहीतीलच. त्यांच्याकडून आणि अन्य क्रीडारसिकांकडून वेळोवेळी ताजी माहिती मिळावी यासाठी हा धागा.

भारतीय चमूला या ऑलिंपिक स्पर्धेसाठी शुभेच्छा !

काही दुवे
स्पर्धेचे संस्थळ
पदकतालिका

धोरणसमाजजीवनमानक्रीडाप्रकटनशुभेच्छाअभिनंदनप्रतिक्रियाबातमीमाहिती

प्रतिक्रिया

थॉर माणूस's picture

13 Aug 2016 - 4:32 am | थॉर माणूस

सानिया-बोपण्णा टेनिस क्वार्टरफाइनल मधे
विकास बाॅक्सिंग क्वार्टरफाइनल मधे

हा धागा अगोदर ज्या उत्साहाने उघडला जायचा तितकाच आता भित भित उघ्डला जातोय... :(

दत्तू भोकनळ परत एकदा सुरेख खेळला मात्र काल...पूर्ण वेळ आघाडीवर राहून शेवटच्या एक सेकंदात दुसर्‍या स्थानावर गेला.

अरेरे, थोडक्यात हुकले, आत्ता पाहिलं..
उद्या दीपा आणि साईनाकडून मोठी अपेक्षा आहे.

खेडूत's picture

13 Aug 2016 - 7:43 pm | खेडूत

आजचे अपडेटस..
अश्विनी, ज्वाला, भारतीय महिला हॉकी संघ स्पर्धेबाहेर गेले.

पण किदम्बी श्रीकांतने बॅडमिंटन मधे विजयी सलामी दिली. उद्या स्वीडीश खेळाडूसोबत खेळणार. त्याला शुभेच्छा ...!
सानिया -बोपन्ना उपान्त्यपूर्व फेरीत उद्या खेळतेल

ललिता बाबर चा नॅशनल रेकॉर्ड. फायनल खेळणार. ३००० मीटर्स..स्टीपलचेज. ..?

खेडूत's picture

13 Aug 2016 - 7:52 pm | खेडूत

हो, तिचेही अभिनंदन आणि शुभेच्छा!
वादग्रस्त पैलवान नरसिंग आज रिओला पोहोचला. १९ तारखेला तो पहिला सामना खेळेल.
उद्या दीपा कर्माकर्च्या कामगिरीची उत्सुकता आहे!

ललिता बाबरचे अभिनंदन. पी
टी. उषानंतर ऍथलेटिक्स फायनलमध्ये खेळणारी पहिली भारतीय खेळाडू ठरेल.

श्रीगुरुजी's picture

14 Aug 2016 - 7:03 pm | श्रीगुरुजी

साईनाचा १८-२१, १९-२१ असा सरळ सेट्समध्ये पराभव. पदकाची आशा संपुष्टात.

असंका's picture

14 Aug 2016 - 11:27 pm | असंका

सायना फिट नव्हती बहुतेक.

दीपा करमाकर मैदानात येत आहे....

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Aug 2016 - 4:15 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सायनाचा खेळ पाहता ती जिंकेल असं एकदाही वाटलं नाही. अजिबात उत्साह नाही, की पर्फेक्ट स्म्याशिंग दिसली नाही की रिटर्न विशेष वाटले नाही.

-दिलीप बिरुटे

अगदी थोडक्यात हुकले दीपाचे पदक...:(

कपिलमुनी's picture

15 Aug 2016 - 12:22 am | कपिलमुनी

सिंधू पुढच़्या फेरीत

श्रीगुरुजी's picture

15 Aug 2016 - 3:14 pm | श्रीगुरुजी

दीपा कर्मकारचे पदक अगदी थोडक्यात हुकले. जिम्नॅस्टिकची फारशी परंपरा नसलेल्या भारतासारख्या देशाकडून ऑलिंपिकसाठी पात्र ठरून ४ था क्रमांक मिळविणे हे मोठे यश आहे. ती सहाव्या क्रमांकावर परफॉर्मन्ससाठी आली तेव्हा पहिल्या पाचातील प्रथम ३ क्रमांकांची कामगिरी दाखवित होते. तिने उत्कृष्ट कामगिरी करून थेट दुसर्‍या क्रमांकावर आली. तिच्या दुर्दैवाने शेवटच्या दोन जिमनॅस्ट तिच्या तुलनेत फारच दादा ठरल्यामुळे तिची कामगिरी चवथ्या क्रमांकावर गेली आणि पदक हुकले.

भारताला एकंदरीत ४ था क्रमांक तापदायक ठरतोय. अभिनव बिंद्रा, पुरूष हॉकी संघ आणि आता दीपा कर्मकार. सर्वजण पदकापासून अगदी थोड्या अंतराने लांब राहिले.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Aug 2016 - 4:17 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>> भारताला एकंदरीत ४ था क्रमांक तापदायक ठरतोय.
सहमत.

-दिलीप बिरुटे

असंका's picture

15 Aug 2016 - 9:49 pm | असंका

हा चौथा क्रमांक भारताची प्रगती दाखवतोय....मिल्खा सिंग, पी टी उषा पण चौथे होते पण त्यांच्यानंतर किती वर्षांनंतर आपण पुन्हा तितके जवळ जाउ शकलो? आणि किती खेळात?

पुन्हा पुन्हा चौथा क्रमांक येतोय याचाच अर्थ आपण आता जास्ती संख्येने, जास्ती जोरात आणि जास्ती ठिकाणी धडका मारतो आहोत.

पुन्हा पुन्हा चौथा क्रमांक येतोय याचाच अर्थ आपण आता जास्ती संख्येने, जास्ती जोरात आणि जास्ती ठिकाणी धडका मारतो आहोत.

+1

थॉर माणूस's picture

15 Aug 2016 - 11:28 pm | थॉर माणूस

श्रीकांत बॅडमिंटन क्वार्टरफाइनलमधे पोहोचला.

निर्धार's picture

15 Aug 2016 - 11:31 pm | निर्धार

कदम्बी छानच खेळला आज. त्याचा कोर्ट वरचा आक्रमकपणा आवडला.
पण पुढची वाटचाल खडतर आहे..
सिंधु चे काय होताय पाहुयात आता.

थॉर माणूस's picture

16 Aug 2016 - 2:50 am | थॉर माणूस

सिंधू सुद्धा क्वार्टरफाइनल मधे पोहोचली.

सिंधू क्वार्टरफाइनल मधे विजयी. एका पदकाची अंधुक आशा.

आज श्रीकांत आणि उद्या सिंधूचे क्वार्टरफायनल्स. दोन्ही प्रेक्षणीय होणार..
नरसिंग जाऊनही खेळणार का हा प्रश्नच आहे.वाडाची सुनावणी उद्या, आणि सामना परवा. बघुयात.

आणि श्रीकांत किदंबी क्वार्टरफायनलमधे पोचला!
वा वा! मस्तच! कमॉन सिंधू आणि श्रीकांत, गुडलक!! :)

मोहन's picture

17 Aug 2016 - 12:04 pm | मोहन

वांग यीहान ला नामोहरम करुन सिंधू उपांत्य फेरीत !
जपानच्या नोझोमि ओकुहारा बरोबर लढ्त होणार !
सिंधूला अनेक शुभेछा .

गामा पैलवान's picture

17 Aug 2016 - 1:20 pm | गामा पैलवान

लोकहो,

काल रियोतल्या संध्याकाळी किरियन सायकलिंगच्या स्पर्धेत ब्रिटीश सायकलपटू जेसन केनीस आगळीकीपायी अपात्र घोषित करायला हवं होतं. मात्र ब्रिटन बलाढ्य राष्ट्र असल्याने यातून मार्ग काढला गेला. शर्यतीचा चित्रक (=क्यामेरा) सुयोग्य प्रकारचा नसल्याने जेसन केनीस ठामपणे अपात्र ठरवणे अवघड आहे असा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे थांबवलेली शर्यत नव्याने सुरू करण्यात आली.

दुसऱ्यांदा सुरू झालेली शर्यत परत एकदा थांबवण्यात आली. कारण की मागच्या वेळेसारखीच आगळीक परत एकदा घडली. या खेपेस पोलंडच्या डेमियन झीलीन्स्की वा जर्मनीच्या योकिम आयलर्स यांच्यापैकी एकाला बाहेर व्हावं लागलं असतं. मात्र याही वेळेस कोणालाही अपात्र न ठरवता शर्यत परत सुरू करण्यात आली.

तिसऱ्या वेळेस मात्र शर्यत व्यवस्थितपणे पार पडली. जेसन केनीने जिंकली याबद्दल त्याचं अभिनंदन. मात्र एक प्रश्न उद्भवतो. नरसिंह यादवला अशी खास वागणूक कधीतरी मिळेल काय? कालच्या बातमीनुसार यादवच्या सहभागाबद्दल उद्या १८ तारखेला निर्णय होणार आहे. यादवला शेवटच्या क्षणापर्यंत लटकत ठेवण्यामागे कोण आहे?

आ.न.,
-गा.पै.

गामा पैलवान's picture

17 Aug 2016 - 1:21 pm | गामा पैलवान

सायकलिंगचा प्रकार किरीयन नसून ते केईरिन असे कृपया वाचावे.
-गा.पै.

महासंग्राम's picture

17 Aug 2016 - 4:36 pm | महासंग्राम

ऑलिम्पिक सामने नेटावर कुठे पाहायला मिळतील का ????

रघुनाथ.केरकर's picture

17 Aug 2016 - 7:24 pm | रघुनाथ.केरकर

hotstar वर पहाता येतील

असंका's picture

17 Aug 2016 - 7:12 pm | असंका

काय जबरदस्त टक्कर दिली श्रीकांतने!! दोन वेळचा गोल्ड मेडल विजेता लिन डॅन सरळ सरळ चिडलेला दिसला शेवटच्या सेटमध्ये..वेल प्लेड श्रीकांत...
लिन डॅन २१-६, ११-२१, २१-१८

रघुनाथ.केरकर's picture

17 Aug 2016 - 7:25 pm | रघुनाथ.केरकर

गंमत म्हणजे लिन डॅन हा श्री चा हीरो आहे.

रघुनाथ.केरकर's picture

17 Aug 2016 - 7:26 pm | रघुनाथ.केरकर

तिसर्‍या सेट मध्ये श्री ने त्याचा घाम काढला.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Aug 2016 - 7:33 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जिंकलो असतो राव.....!

-दिलीप बिरुटे

बेकार तरुण's picture

17 Aug 2016 - 7:40 pm | बेकार तरुण

वेल प्लेड श्रीकांत

विखि's picture

17 Aug 2016 - 10:37 pm | विखि

श्रीकान्त भारी खेळला, कुस्ती त पण चान्गला खेळ चाल्लाय, विनेश फोगट भारी खेळत होती, बेक्कार इन्जुरड झाली पण :(

थॉर माणूस's picture

17 Aug 2016 - 11:09 pm | थॉर माणूस

फोगट जखमी झाल्याने बाहेर. साक्षी हरली तरी तिला रेपेचेंज मधुन कांस्य पदक घेण्याचा मार्ग अजून खुला आहे.

साक्षीला मिळाल कांस्य पदक
अभिनंदन

रेपेचेंज मधुन परत येऊन कांस्य पदक मिळवले. साक्षी मलिक मुळे भारताचे खाते अखेर उघडले.

हे रेपेचेन्ज काय प्रकार आहे?
एनिवे वेलडन साक्षी मलिक.
सिंधूला बेस्ट विशेस.

साधा मुलगा's picture

18 Aug 2016 - 12:20 pm | साधा मुलगा

हा दुआ पहा.
जे थोड्या फरकाने हरले आहेत त्यांना पुन्हा संधी देणे असा काहीतरी अर्थ निघतो.

साहेब..'s picture

18 Aug 2016 - 1:20 pm | साहेब..

रेपेचेन्ज म्हणजे जे दोन स्पर्धक अंतिम फेरी खेळणार आहेत त्यांच्या सोबत जे हरले आहेत, ते स्वतंत्रपणे कास्यपदकाची लढत खेळतात. एखाद्याला कठीण स्पर्धक मिळाला तर पुन्हा संधी देण्याचा प्रकार आहे.

अधिक माहितीसाठी हा दुआ पहा.

असंका's picture

18 Aug 2016 - 5:06 pm | असंका

रेपेचेज...असं हवं ना? रेपेचेन्ज नसावं...

खेडूत's picture

18 Aug 2016 - 5:56 am | खेडूत

अभिनंदन.
आज सिंधू पण जोरदार खेळेल . तिला शुभेच्छा..!

बेकार तरुण's picture

18 Aug 2016 - 6:50 am | बेकार तरुण

+१११

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 Aug 2016 - 7:41 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

साक्षीचं अभिनंदन, खूप आनंद झाला. पदकाच्या अनेक हुलकावण्यानंतर अखेर कास्य पदकानेही खूप आनंद झाला.

-दिलीप बिरुटे

अरे वा...सकाळी सकाळी जबरदस्त बातमी!! अभिनंदन...!!

नाखु's picture

18 Aug 2016 - 8:43 am | नाखु

पुढील संभाव्य पदकाम्च्या प्राप्तीची...

साक्षीचे मनःपुर्वक अभिनंदन ,आणि खेडूत रावांचे आणि प्रतिसादकांचे विशेष कौतुक, धागा मशालीसारखा पेटता ठेवण्यापेक्षा देव्घरातील निरांजनासारखा निवांत प्रकाशी राहिला हे पाहिले गेले......

नितवाचक नाखु

साक्षीचे जोरदार अभिनंदन! जियो!

साधा मुलगा's picture

18 Aug 2016 - 10:56 am | साधा मुलगा

इतके दिवस फक्त पराभवाच्या बातम्यांनी मिपावर चर्चा करणे सोडले होते, धागा उघडायला पण भीती वाटायची, एकही पदक न मिळालेला सर्वात जास्त लोकसंख्येचा देश हा पाकिस्तानचा 1996 पासून असलेला रेकॉर्ड आपण मोडतोय कि काय हि भीती होती. तरी काल साक्षीचा आधीचा एक सामना पहिला , त्यात ती रशियाच्या खेळाडूंशी हरली, पण नंतर Repêchage राऊंड मध्ये मिळालेल्या संधीचे तिने अक्षरशः सोने केले, जिंकलस पोरी!!!

गामा पैलवान's picture

18 Aug 2016 - 12:54 pm | गामा पैलवान

लोकहो,

आज नरसिंह यादवच्या पात्रतेचा निर्णय होणार आहे. यादव निघतांना मोदींना भेटला होता. मोदीं यांत लक्ष घालून तो अपात्र ठरणार नाही याची काळजी घेतील अशी आशा आहे.

आ.न.,
-गा.पै.

गामा पैलवान's picture

18 Aug 2016 - 1:22 pm | गामा पैलवान

लोकहो,

मुष्टीयोद्धा विकास कृष्णन उपांत्यपूर्व फेरीत का हरला याची कारणीमीमांसा करतोय. लेख इथे आहे : http://maharashtratimes.indiatimes.com/sports/rio-olympic-games-2016/rio...

भारतीय मुष्टियुद्ध संघटनेवर बंदी असतांनाही पराभवाचा दोष विकास केवळ स्वत:लाच देतोय. ही केविलवाणी वेळ त्याच्यावर कशापायी आली आली असेल?

उत्तर साधं आहे. विकासकडे पैसे नाहीत. अभिनव बिंदराकडे स्वत:चे पैसे होते. त्याने सरकारी मदतीवर अवलंबून न राहता स्वधनावर सुवर्णपदक मिळवलं. विकासकडे तो पर्याय नाही. म्हणून पदाधिकाऱ्यांची हांजीहांजी करावी लागते.

भारतीय खेळाडूंसमोरच्या अडचणी मांडण्याचा माझ्याकडून एक अल्पसा प्रातिनिधिक प्रयत्न.

आ.न.,
-गा.पै.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 Aug 2016 - 5:27 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बातम्या आणि तुमचं विश्लेषण वाचतोय.

-दिलीप बिरुटे

आज सिंधू ची सेमिफायनल आहे संध्याकाळी ७.३० वाजता. बघायला विसरू नका.

विखि's picture

18 Aug 2016 - 7:42 pm | विखि

५-० अशी पिछाडी वर असताना पण, अखेर च्या वेळी जी जिगर साक्षी नी दाखवली तीला तोड नाय....
सिन्धु कडुन आशा आहेत

असंका's picture

18 Aug 2016 - 8:37 pm | असंका

गोल्फ मध्ये आदिती अशोक संयुक्त पहिली असं दिसतंय...याचा अर्थ नक्की काय? गोल्फ बद्दल काय फार माहिती नाही...

सध्या ११-६ अशी पहिल्या सेटमधे आघाडीवर आहे!!

बहुगुणी's picture

18 Aug 2016 - 9:03 pm | बहुगुणी

तुल्यबळ लढत होणार...

चतुरंग's picture

18 Aug 2016 - 9:00 pm | चतुरंग

हे धत्तड तत्तड!!!

खेडूत's picture

18 Aug 2016 - 9:12 pm | खेडूत

:)
जर कोणी मॅच पहात नसतील तर लगेच पहा. मस्त खेळत आहेत.!

रोमांचक! "पहायला" मिळायला हवी होती लढत...सिंधू दमलीये का?

अवांतरः Saina Nehwal has been admitted to a hospital in Hyderabad to undergo treatment for her knee injury which affected her progress in the badminton event of the Rio Olympics.

बहुगुणी's picture

18 Aug 2016 - 9:18 pm | बहुगुणी

Fight on, baby!....४० मिनिटे मॅच चालू आहे..

सामान्य वाचक's picture

18 Aug 2016 - 9:19 pm | सामान्य वाचक

कॉन्फिडेन्ट दिसती आहे

बहुगुणी's picture

18 Aug 2016 - 9:20 pm | बहुगुणी

१५-१० सिंधू

स्टॅमिना महत्वाचा असणार आहे..

सामान्य वाचक's picture

18 Aug 2016 - 9:20 pm | सामान्य वाचक

,,

सामान्य वाचक's picture

18 Aug 2016 - 9:21 pm | सामान्य वाचक

येईईईई

खेडूत's picture

18 Aug 2016 - 9:24 pm | खेडूत

अभिनंदन...!
अभ्याभाऊ: ब्यानर अपडेटवावे लागणार! :)

बहुगुणी's picture

18 Aug 2016 - 9:26 pm | बहुगुणी

दोघींना ठेवा बॅनरवर.
स्त्री-शक्ति झिंदाबाद!

अभ्या..'s picture

18 Aug 2016 - 10:21 pm | अभ्या..

दोघींचे बॅनर बसवतच आहे.
आणि अजुन कितीही वेळा अपडेटावे लागले तरी मी करीन आनंदाने.
.
साक्षी आणि सिंधू,
टोपी काढली आहे.

बहुगुणी's picture

18 Aug 2016 - 10:25 pm | बहुगुणी

आणि अजुन कितीही वेळा अपडेटावे लागले तरी मी करीन आनंदाने.
That's the spirit! टोपी काढली आहे.

पदकासाठी कायपण!! __/\__

पदकासाठी म्हणून नाय रंगाकाका,
मी स्वतः जिल्हा टीमकडून खेळलेलो आहे. अजुनही ग्राउंडवर रनिंगला जातो तेंव्हा असे काही एकांडे शिलेदार घाम गाळत असतात तेंव्हा मन भरुन येते. रेसलर, अ‍ॅथलीटस ह्यांची जिल्हा पातळीवर मेहनत तोंडात बोटे घालायला लावते. ह्या तर विश्वाशी लढा देताहेत. त्यांच्या तुलनेत अपुर्‍या सुविधा असताना सुध्दा. अंतर्गत राजकारण, कंपूबाजी, सुविधांची वानवा असे असताना केवळ जिद्द, मेहनत आणि अंगातील कला ह्याच्या जोरावर लढणारे मला कायमच वंदनीय आहेत. त्यांनी पदके मिळवली तर चीज असे नाहीच. लढा महत्त्वाचा. परवाचे दीपाचे प्रोडुनोवा पाहताना काळजाचा ठोका चुकला. काय ते डेडीकेशन. सलाम है भौ ह्या सार्‍यांना.
म्हणून कीतीही सांगा ह्यांचे बॅनर. अपुन बनायेंगा.

मला तेच म्हणायचं होतं पदक हा फक्त साइडइफेक्ट आहे....
तू पदकासाठी हे करतो आहेस असं म्हणायचं नवहतं...असो आपल्या भावना एकच आहेत!! :)

अभ्या..'s picture

18 Aug 2016 - 11:11 pm | अभ्या..

येस रंगाकाका. आपल्या सार्‍यांच्या शुभेच्छा आहेत त्या सगळ्या लढवय्यांना.

क्षमस्व's picture

19 Aug 2016 - 8:17 am | क्षमस्व

अभ्या तुमच्या तळमळीला मनापासून सलाम।
अगदी मनातलं बोललात।।

निओ's picture

19 Aug 2016 - 11:00 pm | निओ

भारी काम केले आहे.

बहुगुणी's picture

18 Aug 2016 - 9:23 pm | बहुगुणी

८ मिनिटांत महत्वाची मीटींग होती.. मी येत नाही म्हणून सांगितलं :-) !

...आणि मला एकाने पार डेस्काशी येऊन पकडलं. नेमका विजयाचा क्षण मिसला :(

बहुगुणी's picture

18 Aug 2016 - 9:24 pm | बहुगुणी

वॉव!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 Aug 2016 - 9:27 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पि सिंधु चं अभिनन्दन.... अजुन एक पदक मिळालं.

-दिलीप बिरुटे

पिशी अबोली's picture

18 Aug 2016 - 9:31 pm | पिशी अबोली

या धाग्यावर सतत येऊन वाचतेय. कालपासून खूप बरं वाटतंय इथे वाचून.
सिंधूचे अभिनंदन.

बॅनर भारी आहे.

अगगगगग्गग्ग्ग्ग्ग, काय सामना होता, , स्मॅश बघुन पारणे फीटले, वाह्ह्ह्ह्ह सिन्धु वेल्ल डन....

बहुगुणी's picture

18 Aug 2016 - 9:43 pm | बहुगुणी

टोकियोतल्या मावस बहिणीबरोबर सिंधूच्या गेम बद्दल चॅट करत होतो कारण ती सिंधू-ओकुहारा मॅच लाईव्ह पहात होती. तिने सांगितलं की काल ज्या तीन जपानी कुस्ती-पटू महिलांनी सुवर्ण पदक मिळवलं त्यांपैकी सलग तीन ऑलिंपिक्स मध्ये जिने सुवर्ण पदक मिळवलंय तिला म्हणे तिच्या मरणासन्न आईने सांगितलं होतं की losers get silver, so it is better to die while winning rather than taking silver.....

खेडूत's picture

18 Aug 2016 - 9:59 pm | खेडूत

वाह! क्या बात है!
त्यांच्या जिद्दीला सलाम.

साधा मुलगा's picture

18 Aug 2016 - 10:02 pm | साधा मुलगा

आज कधी नव्हे तो भारतीय खेळाडूंना 'किलर इन्स्टिंक्ट' ने खेळताना पाहिलं, अक्षरशः धुव्वा उडवला, सिंधूची उंची जास्त असल्याचा तिने पुरेपूर फायदा उठवत तिने जपानीला लोळवले, मजा आया!!! आता सिंधूची गाठ त्या कॅरोलीन शी आहे, ती पण talented खेळाडू आहे, फायनल रोमांचक होईल,
गोल्फ मध्ये अदिती अशोक पुढील फेरीत जाण्याची शक्यता आहे, तिला शुभेच्छा!!! बबिता कुमारी कुस्तीमध्ये हरली.
बाकी उद्या पुरुष चालण्याच्या शर्यतीत संदीप कुमार आणि महिलांमध्ये गुरुबारीत कौर आणि सपना आहेत.
आणि मुख्य म्हणजे आपले कुस्तीगीर बाकी आहेत!

आतिवास's picture

18 Aug 2016 - 10:07 pm | आतिवास

मस्त वाटतंय. आधी साक्षी, आज सिंधु.
दीपा, दत्तू, श्रीकांत, अभिनव... सगळे बाजी लावून खेळले.. त्यांचही कौतुक..

चतुरंग's picture

18 Aug 2016 - 10:15 pm | चतुरंग

सिंप्ली ग्रेट्ट!! आता सामना सुवर्णपदकासाठी. उद्याची लढत बघायलाच हवी!!!
सिंधू पॉइंट्स घेते त्यावेळी खच्चून ओरडते तिची बॉडी लँग्वेजसुद्धा आक्रमक आहे..
अशी किलर इंस्टिंक्ट भारतीय खेळाडू क्वचितच दाखवतात..
महिलाशक्ती झिंदाबाद आहे!!! __/\__

अंतरा आनंद's picture

18 Aug 2016 - 10:18 pm | अंतरा आनंद

+१
मस्तच खेळली ती. आपल्या उंचीचा व्यवस्थित उपयोग करून घेतला.
आपल्या रक्षणाकरता स्त्रिया भावाला राखी बांधतात त्या मुहूर्तावर दोन स्त्रियांनीच देशाची लाज राखली.

बहुगुणी's picture

18 Aug 2016 - 10:19 pm | बहुगुणी

कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन चा निकाल आज भारतीय प्रमाणवेळेला ९.३० रात्री जाहीर होणार होता, झाला का?

आदूबाळ's picture

18 Aug 2016 - 10:23 pm | आदूबाळ

त्या वेळेला हियरिंग सुरू होणार होतं. निकाल आता कधीपण लागेल.

संदीप डांगे's picture

18 Aug 2016 - 10:27 pm | संदीप डांगे

डोळे भरून आले राव! सगळ्यांच्या मेहनतीला सलाम!!!

श्रीगुरुजी's picture

18 Aug 2016 - 10:56 pm | श्रीगुरुजी

Awesome game by Sindhu! Hats off!!

She was attacking well. Got so many points on right hand smash. Her opponent was only defending. Whatever points she got because of Sindhu's mistakes.

Sindhu has to face a very very tough opponent in the finals
Her Spanish counterpart is a very tough player.

All the best Sindhu! Go for Gold!!!!

We are proud of you!!!