✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

रिओ ऑलिम्पिक २०१६

ख
खेडूत यांनी
गुरुवार, 08/04/2016 - 21:29  ·  लेख
लेख
रिओ ऑलिम्पिक २०१६ गेल्या वेळी लंडन ऑलिम्पिकच्या वेळेस २०१२ ला इंग्लंडमधेच वास्तव्य असल्याने ऑलिम्पिकमधील पाचसहा इव्हेंट्स आणि सामने प्रत्यक्ष जाऊन पहाता आले. आयुष्यात कधीतरी ऑलिम्पिक सामने पाहू ही इच्छा याचि देही पूर्ण झाली. यंदा ब्राझीलमध्ये प्रथमच रिओला ऑलिम्पिक होत आहे. ब्रिक्स देश म्हणून ब्राझील महत्व टिकवून आहेच, पण या स्पर्धेच्या निमित्ताने शानदार आयोजन करून आंतरराष्ट्रीय पातळीवर आपले महत्व ठळक करण्याचा ते प्रयत्न करतील. भारत अद्याप दोन दशके तरी या आयोजनास मुकेल असे वाटते. ५ ते २१ ऑगस्ट चालणाऱ्या या स्पर्धेचा थरार माझ्यासह अनेकांना यावर्षी दूरचित्रवाणीवरच अनुभवावा लागणार आहे. प्रायोजक आणि आयोजक, माध्यमे यांची लगबग सुरू झाली असेल. सुरक्षितता हाही सर्वात महत्वाचा मुद्दा आहेच. अनेक अपुरी कामे आणि आयोजनाचा गोंधळ तिथेही ऐकायला मिळतोय. पण तेव्हढं चालायचंच. भारताची कामगिरी अलीकडच्या काळात चांगली होते आहे, त्यामुळे नव्या पिढीला प्रोत्साहन मिळून अधिकाधिक ऑलिम्पियन खेळाडू तयार व्हावेत ही अपेक्षा आहे. यंदा हॉकी, कुस्ती, टेनिस, बॅडमिंटन शिवाय तिरंदाजी, नेमबाजी, गोल्फमधेही दाखल घेण्याजोगी कामगिरी होईल असे वाटते. तिथे उपस्थित राहणारे मोजके मिपाकर तरी असतील अशी आशा आहे. असल्यास ते तिथल्या खेळाविषयी बातम्यां सोबत सामाजिक आणि तिथल्या वैशिष्ट्यपूर्ण खाद्यपदार्थांविषयी लिहीतीलच. त्यांच्याकडून आणि अन्य क्रीडारसिकांकडून वेळोवेळी ताजी माहिती मिळावी यासाठी हा धागा. भारतीय चमूला या ऑलिंपिक स्पर्धेसाठी शुभेच्छा ! काही दुवे स्पर्धेचे संस्थळ पदकतालिका
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
धोरण
समाज
जीवनमान
क्रीडा
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
शुभेच्छा
अभिनंदन
प्रतिक्रिया
बातमी
माहिती

प्रतिक्रिया द्या
79454 वाचन

💬 प्रतिसाद (405)

प्रतिक्रिया

अगदी थोडक्यात हुकले दीपाचे

खेडूत
Mon, 08/15/2016 - 00:12 नवीन
अगदी थोडक्यात हुकले दीपाचे पदक...:(
  • Log in or register to post comments

PV sindhu

कपिलमुनी
Mon, 08/15/2016 - 00:22 नवीन
सिंधू पुढच़्या फेरीत
  • Log in or register to post comments

दीपा कर्मकारचे पदक अगदी

श्रीगुरुजी
Mon, 08/15/2016 - 15:14 नवीन
दीपा कर्मकारचे पदक अगदी थोडक्यात हुकले. जिम्नॅस्टिकची फारशी परंपरा नसलेल्या भारतासारख्या देशाकडून ऑलिंपिकसाठी पात्र ठरून ४ था क्रमांक मिळविणे हे मोठे यश आहे. ती सहाव्या क्रमांकावर परफॉर्मन्ससाठी आली तेव्हा पहिल्या पाचातील प्रथम ३ क्रमांकांची कामगिरी दाखवित होते. तिने उत्कृष्ट कामगिरी करून थेट दुसर्‍या क्रमांकावर आली. तिच्या दुर्दैवाने शेवटच्या दोन जिमनॅस्ट तिच्या तुलनेत फारच दादा ठरल्यामुळे तिची कामगिरी चवथ्या क्रमांकावर गेली आणि पदक हुकले. भारताला एकंदरीत ४ था क्रमांक तापदायक ठरतोय. अभिनव बिंद्रा, पुरूष हॉकी संघ आणि आता दीपा कर्मकार. सर्वजण पदकापासून अगदी थोड्या अंतराने लांब राहिले.
  • Log in or register to post comments

+१

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 08/15/2016 - 16:17 नवीन
>>>> भारताला एकंदरीत ४ था क्रमांक तापदायक ठरतोय. सहमत. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

हा चौथा क्रमांक भारताची

असंका
Mon, 08/15/2016 - 21:49 नवीन
हा चौथा क्रमांक भारताची प्रगती दाखवतोय....मिल्खा सिंग, पी टी उषा पण चौथे होते पण त्यांच्यानंतर किती वर्षांनंतर आपण पुन्हा तितके जवळ जाउ शकलो? आणि किती खेळात? पुन्हा पुन्हा चौथा क्रमांक येतोय याचाच अर्थ आपण आता जास्ती संख्येने, जास्ती जोरात आणि जास्ती ठिकाणी धडका मारतो आहोत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पुन्हा पुन्हा चौथा क्रमांक

शलभ
Mon, 08/15/2016 - 22:41 नवीन
पुन्हा पुन्हा चौथा क्रमांक येतोय याचाच अर्थ आपण आता जास्ती संख्येने, जास्ती जोरात आणि जास्ती ठिकाणी धडका मारतो आहोत.
+1
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका

श्रीकांत बॅडमिंटन

थॉर माणूस
Mon, 08/15/2016 - 23:28 नवीन
श्रीकांत बॅडमिंटन क्वार्टरफाइनलमधे पोहोचला.
  • Log in or register to post comments

कदम्बी आणि सिंधु

निर्धार
Mon, 08/15/2016 - 23:31 नवीन
कदम्बी छानच खेळला आज. त्याचा कोर्ट वरचा आक्रमकपणा आवडला. पण पुढची वाटचाल खडतर आहे.. सिंधु चे काय होताय पाहुयात आता.
  • Log in or register to post comments

सिंधू सुद्धा क्वार्टरफाइनल

थॉर माणूस
Tue, 08/16/2016 - 02:50 नवीन
सिंधू सुद्धा क्वार्टरफाइनल मधे पोहोचली.
  • Log in or register to post comments

सिंधू क्वार्टरफाइनल मधे विजयी

थॉर माणूस
Wed, 08/17/2016 - 04:53 नवीन
सिंधू क्वार्टरफाइनल मधे विजयी. एका पदकाची अंधुक आशा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: थॉर माणूस

आज श्रीकांत आणि उद्या सिंधूचे

खेडूत
Wed, 08/17/2016 - 08:50 नवीन
आज श्रीकांत आणि उद्या सिंधूचे क्वार्टरफायनल्स. दोन्ही प्रेक्षणीय होणार.. नरसिंग जाऊनही खेळणार का हा प्रश्नच आहे.वाडाची सुनावणी उद्या, आणि सामना परवा. बघुयात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: थॉर माणूस

पीवी सिंधू सेमीफायनमध्ये पोचली!

चतुरंग
Wed, 08/17/2016 - 11:27 नवीन
आणि श्रीकांत किदंबी क्वार्टरफायनलमधे पोचला! वा वा! मस्तच! कमॉन सिंधू आणि श्रीकांत, गुडलक!! :)
  • Log in or register to post comments

सिंधूच्या मॅचचे हायलाईट्स

चतुरंग
Wed, 08/17/2016 - 12:03 नवीन
http://www.nbcolympics.com/video/indias-sindhu-pusarla-stuns-2nd-ranked-yihan-wang-ws-qfs
  • Log in or register to post comments

सिंधू सेमीज मधे

मोहन
Wed, 08/17/2016 - 12:04 नवीन
वांग यीहान ला नामोहरम करुन सिंधू उपांत्य फेरीत ! जपानच्या नोझोमि ओकुहारा बरोबर लढ्त होणार ! सिंधूला अनेक शुभेछा .
  • Log in or register to post comments

नरसिंह यादव आणि जेसन केनी

गामा पैलवान
Wed, 08/17/2016 - 13:20 नवीन
लोकहो, काल रियोतल्या संध्याकाळी किरियन सायकलिंगच्या स्पर्धेत ब्रिटीश सायकलपटू जेसन केनीस आगळीकीपायी अपात्र घोषित करायला हवं होतं. मात्र ब्रिटन बलाढ्य राष्ट्र असल्याने यातून मार्ग काढला गेला. शर्यतीचा चित्रक (=क्यामेरा) सुयोग्य प्रकारचा नसल्याने जेसन केनीस ठामपणे अपात्र ठरवणे अवघड आहे असा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे थांबवलेली शर्यत नव्याने सुरू करण्यात आली. दुसऱ्यांदा सुरू झालेली शर्यत परत एकदा थांबवण्यात आली. कारण की मागच्या वेळेसारखीच आगळीक परत एकदा घडली. या खेपेस पोलंडच्या डेमियन झीलीन्स्की वा जर्मनीच्या योकिम आयलर्स यांच्यापैकी एकाला बाहेर व्हावं लागलं असतं. मात्र याही वेळेस कोणालाही अपात्र न ठरवता शर्यत परत सुरू करण्यात आली. तिसऱ्या वेळेस मात्र शर्यत व्यवस्थितपणे पार पडली. जेसन केनीने जिंकली याबद्दल त्याचं अभिनंदन. मात्र एक प्रश्न उद्भवतो. नरसिंह यादवला अशी खास वागणूक कधीतरी मिळेल काय? कालच्या बातमीनुसार यादवच्या सहभागाबद्दल उद्या १८ तारखेला निर्णय होणार आहे. यादवला शेवटच्या क्षणापर्यंत लटकत ठेवण्यामागे कोण आहे? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

किरीयन नव्हे केईरिन वाचावे.

गामा पैलवान
Wed, 08/17/2016 - 13:21 नवीन
सायकलिंगचा प्रकार किरीयन नसून ते केईरिन असे कृपया वाचावे. -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

ऑलिम्पिक सामने नेटावर कुठे

महासंग्राम
Wed, 08/17/2016 - 16:36 नवीन
ऑलिम्पिक सामने नेटावर कुठे पाहायला मिळतील का ????
  • Log in or register to post comments

hotstar

रघुनाथ.केरकर
Wed, 08/17/2016 - 19:24 नवीन
hotstar वर पहाता येतील
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महासंग्राम

काय जबरदस्त टक्कर दिली

असंका
Wed, 08/17/2016 - 19:12 नवीन
काय जबरदस्त टक्कर दिली श्रीकांतने!! दोन वेळचा गोल्ड मेडल विजेता लिन डॅन सरळ सरळ चिडलेला दिसला शेवटच्या सेटमध्ये..वेल प्लेड श्रीकांत... लिन डॅन २१-६, ११-२१, २१-१८
  • Log in or register to post comments

हीरो

रघुनाथ.केरकर
Wed, 08/17/2016 - 19:25 नवीन
गंमत म्हणजे लिन डॅन हा श्री चा हीरो आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका

घाम काढला

रघुनाथ.केरकर
Wed, 08/17/2016 - 19:26 नवीन
तिसर्‍या सेट मध्ये श्री ने त्याचा घाम काढला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका

:(

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 08/17/2016 - 19:33 नवीन
जिंकलो असतो राव.....! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका

वेल प्लेड श्रीकांत

बेकार तरुण
Wed, 08/17/2016 - 19:40 नवीन
वेल प्लेड श्रीकांत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका

श्रीकान्त भारी खेळला

विखि
Wed, 08/17/2016 - 22:37 नवीन
श्रीकान्त भारी खेळला, कुस्ती त पण चान्गला खेळ चाल्लाय, विनेश फोगट भारी खेळत होती, बेक्कार इन्जुरड झाली पण :(
  • Log in or register to post comments

फोगट जखमी झाल्याने बाहेर.

थॉर माणूस
Wed, 08/17/2016 - 23:09 नवीन
फोगट जखमी झाल्याने बाहेर. साक्षी हरली तरी तिला रेपेचेंज मधुन कांस्य पदक घेण्याचा मार्ग अजून खुला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विखि

साक्षीला मिळाल कांस्य पदक

धनावडे
गुरुवार, 08/18/2016 - 02:58 नवीन
साक्षीला मिळाल कांस्य पदक अभिनंदन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: थॉर माणूस

रेपेचेंज मधुन परत येऊन कांस्य

थॉर माणूस
गुरुवार, 08/18/2016 - 03:06 नवीन
रेपेचेंज मधुन परत येऊन कांस्य पदक मिळवले. साक्षी मलिक मुळे भारताचे खाते अखेर उघडले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनावडे

हे रेपेचेन्ज काय प्रकार आहे?

अभ्या..
गुरुवार, 08/18/2016 - 11:37 नवीन
हे रेपेचेन्ज काय प्रकार आहे? एनिवे वेलडन साक्षी मलिक. सिंधूला बेस्ट विशेस.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: थॉर माणूस

हा दुआ पहा.

साधा मुलगा
गुरुवार, 08/18/2016 - 12:20 नवीन
हा दुआ पहा. जे थोड्या फरकाने हरले आहेत त्यांना पुन्हा संधी देणे असा काहीतरी अर्थ निघतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

रेपेचेन्ज दुआ

साहेब..
गुरुवार, 08/18/2016 - 13:20 नवीन
रेपेचेन्ज म्हणजे जे दोन स्पर्धक अंतिम फेरी खेळणार आहेत त्यांच्या सोबत जे हरले आहेत, ते स्वतंत्रपणे कास्यपदकाची लढत खेळतात. एखाद्याला कठीण स्पर्धक मिळाला तर पुन्हा संधी देण्याचा प्रकार आहे. अधिक माहितीसाठी हा दुआ पहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साधा मुलगा

रेपेचेज...असं हवं ना?

असंका
गुरुवार, 08/18/2016 - 17:06 नवीन
रेपेचेज...असं हवं ना? रेपेचेन्ज नसावं...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साहेब..

अभिनंदन.

खेडूत
गुरुवार, 08/18/2016 - 05:56 नवीन
अभिनंदन. आज सिंधू पण जोरदार खेळेल . तिला शुभेच्छा..!
  • Log in or register to post comments

+१११

बेकार तरुण
गुरुवार, 08/18/2016 - 06:50 नवीन
+१११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत

आनंद झाला.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 08/18/2016 - 07:41 नवीन
साक्षीचं अभिनंदन, खूप आनंद झाला. पदकाच्या अनेक हुलकावण्यानंतर अखेर कास्य पदकानेही खूप आनंद झाला. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

अरे वा...सकाळी सकाळी जबरदस्त

असंका
गुरुवार, 08/18/2016 - 07:44 नवीन
अरे वा...सकाळी सकाळी जबरदस्त बातमी!! अभिनंदन...!!
  • Log in or register to post comments

ही सुरुवात ठरावी

नाखु
गुरुवार, 08/18/2016 - 08:43 नवीन
पुढील संभाव्य पदकाम्च्या प्राप्तीची...

साक्षीचे मनःपुर्वक अभिनंदन

,आणि खेडूत रावांचे आणि प्रतिसादकांचे विशेष कौतुक, धागा मशालीसारखा पेटता ठेवण्यापेक्षा देव्घरातील निरांजनासारखा निवांत प्रकाशी राहिला हे पाहिले गेले...... नितवाचक नाखु
  • Log in or register to post comments

साक्षीचे जोरदार अभिनंदन! जियो

एस
गुरुवार, 08/18/2016 - 09:39 नवीन
साक्षीचे जोरदार अभिनंदन! जियो!
  • Log in or register to post comments

इतके दिवस फक्त पराभवाच्या

साधा मुलगा
गुरुवार, 08/18/2016 - 10:56 नवीन
इतके दिवस फक्त पराभवाच्या बातम्यांनी मिपावर चर्चा करणे सोडले होते, धागा उघडायला पण भीती वाटायची, एकही पदक न मिळालेला सर्वात जास्त लोकसंख्येचा देश हा पाकिस्तानचा 1996 पासून असलेला रेकॉर्ड आपण मोडतोय कि काय हि भीती होती. तरी काल साक्षीचा आधीचा एक सामना पहिला , त्यात ती रशियाच्या खेळाडूंशी हरली, पण नंतर Repêchage राऊंड मध्ये मिळालेल्या संधीचे तिने अक्षरशः सोने केले, जिंकलस पोरी!!!
  • Log in or register to post comments

नरसिंह यादवास शुभेच्छा

गामा पैलवान
गुरुवार, 08/18/2016 - 12:54 नवीन
लोकहो, आज नरसिंह यादवच्या पात्रतेचा निर्णय होणार आहे. यादव निघतांना मोदींना भेटला होता. मोदीं यांत लक्ष घालून तो अपात्र ठरणार नाही याची काळजी घेतील अशी आशा आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

मुष्टीयोद्धा विकास कृष्णन

गामा पैलवान
गुरुवार, 08/18/2016 - 13:22 नवीन
लोकहो, मुष्टीयोद्धा विकास कृष्णन उपांत्यपूर्व फेरीत का हरला याची कारणीमीमांसा करतोय. लेख इथे आहे : http://maharashtratimes.indiatimes.com/sports/rio-olympic-games-2016/rio-olympic-games-2016-news/rio-olympic/articleshow/53728206.cms भारतीय मुष्टियुद्ध संघटनेवर बंदी असतांनाही पराभवाचा दोष विकास केवळ स्वत:लाच देतोय. ही केविलवाणी वेळ त्याच्यावर कशापायी आली आली असेल? उत्तर साधं आहे. विकासकडे पैसे नाहीत. अभिनव बिंदराकडे स्वत:चे पैसे होते. त्याने सरकारी मदतीवर अवलंबून न राहता स्वधनावर सुवर्णपदक मिळवलं. विकासकडे तो पर्याय नाही. म्हणून पदाधिकाऱ्यांची हांजीहांजी करावी लागते. भारतीय खेळाडूंसमोरच्या अडचणी मांडण्याचा माझ्याकडून एक अल्पसा प्रातिनिधिक प्रयत्न. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

पैलवान

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 08/18/2016 - 17:27 नवीन
बातम्या आणि तुमचं विश्लेषण वाचतोय. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

आज सिंधू ची सेमिफायनल आहे

शलभ
गुरुवार, 08/18/2016 - 18:05 नवीन
आज सिंधू ची सेमिफायनल आहे संध्याकाळी ७.३० वाजता. बघायला विसरू नका.
  • Log in or register to post comments

लै भारी साक्षी...

विखि
गुरुवार, 08/18/2016 - 19:42 नवीन
५-० अशी पिछाडी वर असताना पण, अखेर च्या वेळी जी जिगर साक्षी नी दाखवली तीला तोड नाय.... सिन्धु कडुन आशा आहेत
  • Log in or register to post comments

गोल्फ मध्ये आदिती अशोक

असंका
गुरुवार, 08/18/2016 - 20:37 नवीन
गोल्फ मध्ये आदिती अशोक संयुक्त पहिली असं दिसतंय...याचा अर्थ नक्की काय? गोल्फ बद्दल काय फार माहिती नाही...
  • Log in or register to post comments

सिंधूची मॅच उशीरा सुरु झाली

चतुरंग
गुरुवार, 08/18/2016 - 20:44 नवीन
सध्या ११-६ अशी पहिल्या सेटमधे आघाडीवर आहे!!
  • Log in or register to post comments

21-19 सिंधू पहिला गेम जिंकली!

बहुगुणी
गुरुवार, 08/18/2016 - 21:03 नवीन
तुल्यबळ लढत होणार...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

सिंधूने पहिला गेम घेतला!!

चतुरंग
गुरुवार, 08/18/2016 - 21:00 नवीन
हे धत्तड तत्तड!!!
  • Log in or register to post comments

:)

खेडूत
गुरुवार, 08/18/2016 - 21:12 नवीन
:) जर कोणी मॅच पहात नसतील तर लगेच पहा. मस्त खेळत आहेत.!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

दुसरा गेम, ओकुहारा-सिंधू ७-७ बरोबरीवर...

बहुगुणी
गुरुवार, 08/18/2016 - 21:14 नवीन
रोमांचक! "पहायला" मिळायला हवी होती लढत...सिंधू दमलीये का? अवांतरः Saina Nehwal has been admitted to a hospital in Hyderabad to undergo treatment for her knee injury which affected her progress in the badminton event of the Rio Olympics.
  • Log in or register to post comments

सिंधू ११-१०

बहुगुणी
गुरुवार, 08/18/2016 - 21:18 नवीन
Fight on, baby!....४० मिनिटे मॅच चालू आहे..
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा