Skip to main content

रिओ ऑलिम्पिक २०१६

लेखक खेडूत यांनी गुरुवार, 04/08/2016 21:29 या दिवशी प्रकाशित केले.
रिओ ऑलिम्पिक २०१६ गेल्या वेळी लंडन ऑलिम्पिकच्या वेळेस २०१२ ला इंग्लंडमधेच वास्तव्य असल्याने ऑलिम्पिकमधील पाचसहा इव्हेंट्स आणि सामने प्रत्यक्ष जाऊन पहाता आले. आयुष्यात कधीतरी ऑलिम्पिक सामने पाहू ही इच्छा याचि देही पूर्ण झाली. यंदा ब्राझीलमध्ये प्रथमच रिओला ऑलिम्पिक होत आहे. ब्रिक्स देश म्हणून ब्राझील महत्व टिकवून आहेच, पण या स्पर्धेच्या निमित्ताने शानदार आयोजन करून आंतरराष्ट्रीय पातळीवर आपले महत्व ठळक करण्याचा ते प्रयत्न करतील. भारत अद्याप दोन दशके तरी या आयोजनास मुकेल असे वाटते. ५ ते २१ ऑगस्ट चालणाऱ्या या स्पर्धेचा थरार माझ्यासह अनेकांना यावर्षी दूरचित्रवाणीवरच अनुभवावा लागणार आहे. प्रायोजक आणि आयोजक, माध्यमे यांची लगबग सुरू झाली असेल. सुरक्षितता हाही सर्वात महत्वाचा मुद्दा आहेच. अनेक अपुरी कामे आणि आयोजनाचा गोंधळ तिथेही ऐकायला मिळतोय. पण तेव्हढं चालायचंच. भारताची कामगिरी अलीकडच्या काळात चांगली होते आहे, त्यामुळे नव्या पिढीला प्रोत्साहन मिळून अधिकाधिक ऑलिम्पियन खेळाडू तयार व्हावेत ही अपेक्षा आहे. यंदा हॉकी, कुस्ती, टेनिस, बॅडमिंटन शिवाय तिरंदाजी, नेमबाजी, गोल्फमधेही दाखल घेण्याजोगी कामगिरी होईल असे वाटते. तिथे उपस्थित राहणारे मोजके मिपाकर तरी असतील अशी आशा आहे. असल्यास ते तिथल्या खेळाविषयी बातम्यां सोबत सामाजिक आणि तिथल्या वैशिष्ट्यपूर्ण खाद्यपदार्थांविषयी लिहीतीलच. त्यांच्याकडून आणि अन्य क्रीडारसिकांकडून वेळोवेळी ताजी माहिती मिळावी यासाठी हा धागा. भारतीय चमूला या ऑलिंपिक स्पर्धेसाठी शुभेच्छा ! काही दुवे स्पर्धेचे संस्थळ पदकतालिका

वाचने 80112
प्रतिक्रिया 405

प्रतिक्रिया

५-० अशी पिछाडी वर असताना पण, अखेर च्या वेळी जी जिगर साक्षी नी दाखवली तीला तोड नाय.... सिन्धु कडुन आशा आहेत

गोल्फ मध्ये आदिती अशोक संयुक्त पहिली असं दिसतंय...याचा अर्थ नक्की काय? गोल्फ बद्दल काय फार माहिती नाही...

रोमांचक! "पहायला" मिळायला हवी होती लढत...सिंधू दमलीये का? अवांतरः Saina Nehwal has been admitted to a hospital in Hyderabad to undergo treatment for her knee injury which affected her progress in the badminton event of the Rio Olympics.

१५-१० सिंधू स्टॅमिना महत्वाचा असणार आहे..

,,

In reply to by सामान्य वाचक

अभिनंदन...! अभ्याभाऊ: ब्यानर अपडेटवावे लागणार! :)

In reply to by खेडूत

दोघींना ठेवा बॅनरवर. स्त्री-शक्ति झिंदाबाद!

In reply to by बहुगुणी

दोघींचे बॅनर बसवतच आहे. आणि अजुन कितीही वेळा अपडेटावे लागले तरी मी करीन आनंदाने. . साक्षी आणि सिंधू, टोपी काढली आहे.

In reply to by चतुरंग

पदकासाठी म्हणून नाय रंगाकाका, मी स्वतः जिल्हा टीमकडून खेळलेलो आहे. अजुनही ग्राउंडवर रनिंगला जातो तेंव्हा असे काही एकांडे शिलेदार घाम गाळत असतात तेंव्हा मन भरुन येते. रेसलर, अ‍ॅथलीटस ह्यांची जिल्हा पातळीवर मेहनत तोंडात बोटे घालायला लावते. ह्या तर विश्वाशी लढा देताहेत. त्यांच्या तुलनेत अपुर्‍या सुविधा असताना सुध्दा. अंतर्गत राजकारण, कंपूबाजी, सुविधांची वानवा असे असताना केवळ जिद्द, मेहनत आणि अंगातील कला ह्याच्या जोरावर लढणारे मला कायमच वंदनीय आहेत. त्यांनी पदके मिळवली तर चीज असे नाहीच. लढा महत्त्वाचा. परवाचे दीपाचे प्रोडुनोवा पाहताना काळजाचा ठोका चुकला. काय ते डेडीकेशन. सलाम है भौ ह्या सार्‍यांना. म्हणून कीतीही सांगा ह्यांचे बॅनर. अपुन बनायेंगा.

In reply to by अभ्या..

मला तेच म्हणायचं होतं पदक हा फक्त साइडइफेक्ट आहे.... तू पदकासाठी हे करतो आहेस असं म्हणायचं नवहतं...असो आपल्या भावना एकच आहेत!! :)

In reply to by चतुरंग

येस रंगाकाका. आपल्या सार्‍यांच्या शुभेच्छा आहेत त्या सगळ्या लढवय्यांना.

८ मिनिटांत महत्वाची मीटींग होती.. मी येत नाही म्हणून सांगितलं :-) !

पि सिंधु चं अभिनन्दन.... अजुन एक पदक मिळालं. -दिलीप बिरुटे

टोकियोतल्या मावस बहिणीबरोबर सिंधूच्या गेम बद्दल चॅट करत होतो कारण ती सिंधू-ओकुहारा मॅच लाईव्ह पहात होती. तिने सांगितलं की काल ज्या तीन जपानी कुस्ती-पटू महिलांनी सुवर्ण पदक मिळवलं त्यांपैकी सलग तीन ऑलिंपिक्स मध्ये जिने सुवर्ण पदक मिळवलंय तिला म्हणे तिच्या मरणासन्न आईने सांगितलं होतं की losers get silver, so it is better to die while winning rather than taking silver.....

आज कधी नव्हे तो भारतीय खेळाडूंना 'किलर इन्स्टिंक्ट' ने खेळताना पाहिलं, अक्षरशः धुव्वा उडवला, सिंधूची उंची जास्त असल्याचा तिने पुरेपूर फायदा उठवत तिने जपानीला लोळवले, मजा आया!!! आता सिंधूची गाठ त्या कॅरोलीन शी आहे, ती पण talented खेळाडू आहे, फायनल रोमांचक होईल, गोल्फ मध्ये अदिती अशोक पुढील फेरीत जाण्याची शक्यता आहे, तिला शुभेच्छा!!! बबिता कुमारी कुस्तीमध्ये हरली. बाकी उद्या पुरुष चालण्याच्या शर्यतीत संदीप कुमार आणि महिलांमध्ये गुरुबारीत कौर आणि सपना आहेत. आणि मुख्य म्हणजे आपले कुस्तीगीर बाकी आहेत!

मस्त वाटतंय. आधी साक्षी, आज सिंधु. दीपा, दत्तू, श्रीकांत, अभिनव... सगळे बाजी लावून खेळले.. त्यांचही कौतुक..

सिंप्ली ग्रेट्ट!! आता सामना सुवर्णपदकासाठी. उद्याची लढत बघायलाच हवी!!! सिंधू पॉइंट्स घेते त्यावेळी खच्चून ओरडते तिची बॉडी लँग्वेजसुद्धा आक्रमक आहे.. अशी किलर इंस्टिंक्ट भारतीय खेळाडू क्वचितच दाखवतात.. महिलाशक्ती झिंदाबाद आहे!!! __/\__

In reply to by चतुरंग

+१ मस्तच खेळली ती. आपल्या उंचीचा व्यवस्थित उपयोग करून घेतला. आपल्या रक्षणाकरता स्त्रिया भावाला राखी बांधतात त्या मुहूर्तावर दोन स्त्रियांनीच देशाची लाज राखली.

कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन चा निकाल आज भारतीय प्रमाणवेळेला ९.३० रात्री जाहीर होणार होता, झाला का?

Awesome game by Sindhu! Hats off!! She was attacking well. Got so many points on right hand smash. Her opponent was only defending. Whatever points she got because of Sindhu's mistakes. Sindhu has to face a very very tough opponent in the finals Her Spanish counterpart is a very tough player. All the best Sindhu! Go for Gold!!!! We are proud of you!!!

शुक्र्वारी संध्याकाळी पहिली लढत खेळतोय फ्रान्सच्या झेलिमखान खादजिएव बरोबर. भारतीय वेळेनुसार शुक्रवारी संध्याकाळी ६.३८. शुभेच्छा नरसिंग!! अब पटक दे उठाके!!

In reply to by बहुगुणी

मीटिंग म्हणे ४ तास झाले चालू आहे, निकाल लागलेला नाही. ड्रॉ मध्ये त्याचं नाव आहे, पण निर्णय झाल्याशिवाय मॅच नक्की नाही!

सिंधुचे अभिनंदन आपल्या उंची चा पुरेपूर फायदा करून घेतला तिने. २र्‍या गेम मधे ११-१० ला जरा दडपण आले आहे अस वाटत होतं. पण बहुतेक कोचच्या सुचना आणि त्यांचे तंतोतंत अवलंबन केलं सिंधुनी. शेवटी अगदीच आरामात जिंकली. मरिन ला नक्की मारीन अश्याच भावनेने उतरुन आज सिंधु जिंकणार गोल्ड नक्की !

भारताचा कुस्तीगिर नरसिंग यादव आपले निर्दोषत्व सिद्ध करू न शकल्यामुळे ब्राजीलच्या कोर्ट ऑफ ऑर्बिट्रेशन फॉर स्‍पोर्ट्सने (सीएएस) त्याच्यावर चार वर्षांची बंदी घातली आहे. त्यामुळे तो रिओ ऑलिंपिक स्पर्धेतून बाहेर पडला आहे. - सकाळ

कुस्तीपटू नरसिंग यादव ऑलिम्पिकमधून बाहेर ...... हे नक्की मग काय आहे .... नक्की काय निकाल लागलाय, कोणी निश्चित माहिती पुरवेल का ??? http://maharashtratimes.indiatimes.com/sports/rio-olympic-games-2016/ri…

In reply to by जेसीना

http://www.hindustantimes.com/olympics/cas-upholds-world-anti-doping-ag… वाडा च अपील The Court of Arbitration for Sport ने उचलून धरलं त्यामुळे नरसींग वर ४ वर्षांची बंदी

रिओ - भारताचा कुस्तीगिर नरसिंग यादववर चार वर्षांची बंदीचा निर्णय आल्यापासून "तो बोलण्याच्या अवस्थेत नसून सतत रडत आहे‘ अशा प्रतिक्रिया भारतीय कुस्ती फाऊंडेशनचे बीबी शरन सिंह यांनी दिल्या - सकाळ

In reply to by नावातकायआहे

दुर्दैवी आहे, तरीही स्वीकारायला हवे आणि अन्य स्पर्धांमधे काळजी घ्यायला हवी. आज सिंधूचा खेळ बघायला अर्धा दिवस सुट्टी! संध्याकाळी ६:५५ ला सुरू!

लोकहो, नरसिंह यादवचा गेम केला आहे हे वेगळे सांगणे नलगे. प्रथमदर्शी पाहता त्यास आहारातून विष चारून अपात्रतेकडे ढकलण्यात आलंय. स्पर्धेच्या केवळ दोन आठवडे आधी उत्तेजक घेण्याइतका तो बावळट आहे का? या प्रकरणाची चौकशी भरकटत तर नाही? अमेरिकी जलतरणपटू रायन लॉख्त आणि त्याचे सहकारी रियोमध्ये धुडगूस घालतात. वर उलट्या बोंबा मारतात की आम्हाला चोरांनी लुबाडलं म्हणून. पोलीस बरोब्बर सगळी माहिती काढून त्यांना पकडतात आणि त्यातल्या दोघांना देश सोडायला बंदी घालतात. अशा वेळेस खास ऑलिंपिक न्यायालय भरवण्यात येते आणि त्यामार्गे या दोघांना अमेरिकेत परतायची मुभा मिळते. याउलट नरसिंह यादवला पात्र घोषित करूनही कुठलंसं अपील करण्यात येऊन त्याची संधी हिरावून घेतली जाते ! मोदींसमोर काय प्रकारची आव्हाने उभी आहेत याची एक झलक !! आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

मोदींसमोर काय प्रकारची आव्हाने उभी आहेत याची एक झलक !!
पै अण्णा इथे मोदींचा संबंध. ऑलिम्पिक न्यायालये आणि वाडा दोन्ही वेगवेगळी आहेत आणि स्वतंत्र आहेत.

सिन्धुचा सामन्यासाठी तयार व्हा. देवांना नमस्कार करून या...! आज सिंधु जिंकु दे...बस. -दिलीप बिरुटे

सिंधू- समुद्र मरिन (थोडं स्पेलिंग बदलून...)- समुद्रासंदर्भातील....

ही मॅच मला लाइव्ह कुठे बघता येईल. अमेरिकेतल्या कोणत्याही चॅनलवर दाखवत नाहीयेत. एक दोन लिंक्स वर गेले तर ह्या रिजन साठी नाही म्हणे..

In reply to by पिलीयन रायडर

डिडि नॅशनलचे लाइच स्ट्रिमेंग बघत आहे. तिथे वेगळीच मॅच आहे. सिंधुची मॅच अजुन सुरु व्हायचीये का?

In reply to by बहुगुणी

हो.. मी दिलेली लिंक मध्येच बंद पडली बरं का.. आता मी सुद्धा तुमच्याच लिंक वर पहातेय.. बॅकप ठेवला होता चालु!!