रा.स्व. संघावरील हि वेगळी टिका तुम्हाला पटते का ?

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
12 Mar 2016 - 2:16 pm

जानेवारी २०१६ मध्ये 'ज्ञानयोद्धा' नावाची काही एक व्याख्यानमाला झाली असावी, रमेश ओझा नावाचे कुणि एक गांधीवादी आहेत त्यांचे या व्याख्यानमालेत रास्वसंघाची ९० वर्षे या विषयावर भाषण झाले असावे; ज्याचे महाराष्ट्र टाईम्स या वृत्तपत्राने वृत्तांकन केले होते. , रमेश ओझांनी रा.स्व. संघावर विरोधकांकडून होणार्‍या काही प्रचलीत टिकेतील उणिवा निदर्शनास आणल्या आहेत - आधार नसलेल्या टिका करु नयेत, निगेटीव्ह मार्केटींगने आधार नसलेल्या टिकाकारांचा जनाधार हरवू शकतो असे मलाही वाटते- त्याच वेळी रास्व संघावर नेहमीच्या टिकांपेक्षा रमेश ओझांनी काही वेगळी टिका केलेली दिसते.

१) संघाकडे 'हिडन अजेंडा' असल्याचा प्रचार केला जातो, ९० वर्षांपर्यंत एखादी संघटना एकच एक अजेंडा रचू शकते पुढील ९० वर्षांचा विचार करुन कट वगैरे रचू शकते असे रमेश ओझांना वाटत नाही.

माझ व्यक्तिगत मत संघ समर्थकांमध्ये परंपरावाद नक्कीच आहे, रास्व संघाच्या शाखा तशा खुल्या मैदानांवर भरतात, मीही दूरुनच मैदानांवर पाहतो, मोदी निवडून येई पर्यंत माझ्या जवळच्या मैदानावर सकाळी ८०+ वयाचे काही वयोवृद्ध पारंपारीक पोषाख घालून थोडीफार एक्सरसाईज करताना पाहीले आहेत पण तरुणवर्ग मोदी निवडून येईपर्यंत दिसला नव्हता, आता मोदी निवडून आल्यावर एखाद दुसरा तुरळक तरुण कोणत्याही पोषाखा शिवाय असलेली ५-१० कच्ची बच्ची गोळा करून एखाद्या दिवशी अधून मधून सराव करताना दिसतो. उर्वरीत १०० एक मुले स्वतंत्र प्लेग्रूप मधून त्याच मैदानावर खेळताना दिसतात, म्हणजे मिडीयात दाखवले जाते तेवढे रास्वसंघाच्या शाखांचे प्रस्थ नविन पिढीततरी शिल्लक आहे का या बद्दल साशंकता वाटते.

२) रमेश ओझांनी एक टिका संघाच्या वैचारीक गोधळावर केली आहे, - किमान मटा वार्ताहाराने केलेल्या वृत्तांकनात गोंधळ आहे का काय अशी शंका वाटते - संघ लोकशाहीचेही समर्थन करतो आहे आणि धर्म हा आधार ठेऊन काही विषीष्ट धर्मांशी संघर्ष करतो आहे असे रमेश ओझांना म्हणावयाचे असावे (चुभूदेघे) इथे रमेश ओझांचे म्हणणे अंशतः पटते की लोकशाहीत तुम्हाला तुमच्या सर्वच मतदारांशी जुळवून घ्यावे लागते -गोव्यातील राजकारणाच्या निमीत्ताने ह्या प्रक्रीयेस अंशतः सुरवात झाली असावी आणि इतर राज्यातही राजकारण जसे करावे लागेल तसे अधिक जमवून घ्यावे लागेल, जुनी पिढी जशी मागे पडेल तसे त्यातून विचारातील संकुचितता कमी होईल हा माझा व्यक्तिगत आशावाद

३) रमेश ओझांनी लोकशाही बरोबर रास्व संघ सनातन आणि उदात्त हिंदू धर्माचे समर्थन करतो यास वैचारीक गोंधळ म्हटले आहे. वस्तुतः माझ्या मते सनातनेचे-पारंपारीकतेचे आग्रह आणि उदात्ततेचे आग्रह ह्या दोन्ही स्वतंत्र गोष्टी आहेत सर्व पारंपारीकता उदात्त असतीलच अथवा नसतीलच असे सरसकट सांगणे कठीण असते प्रत्येक परंपरेचा स्वतंत्र विचार करावयास हवा आणि परंपरेत उदात्ततेची बाजू जिथे कमी पडते तिथे परंपरा चटकन नाकारली जावयास हवी, कोणत्याही लोकशाहीतील परंपरावादी संघटनाप्रमाणे संघ आणि भाजपातील परंपरावादी सुधारणावाद्याम्च्या दबावापुढे काळाच्या ओघात बदलत जातात पण लगेच बदलत नाहीत. आणि नेमके इथे संघ विरोधकांच्या टिकेचे लक्ष्य बनतो.

हिंदू धर्माची उदात्त बाजू कुणालाही कोणत्याही पद्धतीने इश्वर प्रार्थनेचे स्वातंत्र्य देते तेव्हा तुम्हाला काही विशीष्ट धर्म ग्रंथातील जेवढा भाग अत्यावश्यक म्हणून नाकारावयाचा आहे तेवढाच नाकारावा सरसकट नाकारण्याची गरज नसावी, 'भारतात जे राहतात त्यांना हिंदू म्हणतात' - 'भारतात जे कोणी राहतात त्यांना हिंदू म्हणू' आणि 'भारतात जे कोणी राहतात ते हिंदूच असावेत' या वाक्यांमध्ये सुक्ष्म पण महत्वाचे फरक आहेत.

* 'भारतात जे राहतात त्यांना हिंदू म्हणतात' या व्याख्येची मर्यादा बघा हे हिंदू परदेशात जाऊन राहतात तेव्हा त्यांना काय म्हणतात ?

* 'भारतात जे कोणी राहतात त्यांना हिंदू म्हणू' हि व्याख्या वस्तुतः अंशतः उदात्त असू शकते तुम्ही कोणत्याही धर्माचे आचरण करण्यास स्वातंत्र्य आहात एका मुस्लिम ख्रिश्चन अथवा ज्यु व्यक्तिस हिंदू असण्यासाठी काहीच करावयाचे नाही केवळ भारतीय असावयाचे आहे. त्याचा 'भारतात जे कोणी राहतात ते हिंदूच असावेत' आणि 'सनातन नाहीत ते हिंदू नाहीत' असे म्हटले की हि व्याख्या संकुचित होते, आणि संघाचे नेतृत्व नेमके या ठिकाणी उदात्ततेची तळी उचलून न घेता इस्वर प्रार्थना करणार्‍या लोकांनी कोणत्या दिशेस पाहून प्रार्थना करू नये हे सांगते -नव्या संघ नेतृत्वासोबत यात जरा बदल झाला असावा आणि संघ असे न कबुल करता बदलतही असतो- तुम्ही प्रार्थना कोणत्या दिशेने करावी हे जिथे सांगता तिथे तुमच्या उदात्त मुल्याची घसरणच होत नाहीए तुम्ही तुमच्या स्वतःच्या धर्मातील कोणत्याही पद्धतीने इश्वर प्रार्थनेच्या स्वातंत्र्याच्या मुलभूत तत्वाला नाकारता आहात हे लक्षातच घेतले जात नाही. संघाचे विरोधकही या नेमक्या मुद्द्यावर टिका करताना दिसत नाहीत तर रमेश ओझा म्हणतात तसे साप साप म्हणून तिसरीकडेच रिकाम्या जागेवर काठ्या मारताना दिसतात म्हणून संघाच्या टिकाकारांची टिकाही अभ्यासपूर्ण आणि तर्कसुसंगत होताना दिसत नाही. म्हणुन संघ आणि संघाचे टिकाकार दोन्हीही वैचारीक गोंधळात अडकले आहेत असे एक तटस्थ निरिक्षक म्हणून म्हणता येऊ शकते का ?

४) १९४० च्या दशकातील संघाची भूमिका प्रगतीशील नव्हती असे काहीसे रमेश ओझांना म्हणावयाचे असावे असे त्या वृत्तांकनातील एका मुद्यावरुन माझा समज झाला (चुभूदेघे) पण पुन्हा तेच की संघाचे टिकाकार संघ (तसे कोणतेही परंपरावादी पक्ष) काळाच्या ओघात -बदल स्विकारल्याचे जाहीरपणे न स्विकारता- बदलत जाताना दिसतात भारतीय घटना असो, भारतीय लोकशाही असो भारताचा तिरंगा असो हे संघ सावकाशपणे स्विकारत जाताना दिसतो, मागचे नेतृत्व लोकांनी कोणत्या दिशेने प्रार्थना करु नये ते सांगत होते आजचे संघाचे नेतृत्व कोणत्या दिशेने प्रार्थना करु नये यावर भाष्य करताना दिसत नाही

अर्थात पुरोगामी भूमिका जेवढ्या ठळकपणे संघाने घेऊन पुरोगामीत्व काय असते ते तुम्हीच आमच्याकडून शिका असे विरोधकांना छाती ठोकपणे सांगण्यासाठी लागणारी उदात्तता हिंदू धर्मात आहे पण ती हिंदू धर्माचे प्रतिनिधीत्वाचा दावा करणार्‍या संघात कमी पडते का ? - पुरोगामीत्वाच्या बाबतीत ज्युडायिक धर्मीय मागे पडले तर समजता येते हिंदू धर्मीय पुरोगामीतेत मागे पडण्याचे कारन नसावे जसे सनातन हिंदुत्ववाद असू शकेल त्या पेक्षा मोठी संधी पुरोगामी हिंदूत्ववादास हिंदू धर्मात इंट्रिसिकली आहेच त्याचा पुरोगामी लोक पुरेसा वापर करतात का या बद्दल साशंकता वाटते. खासकरुन संघ भाजपाचा जो फिल्डवरचा कार्यकर्ता आहे तो टोकाचा परंपरावाद जोपासतो आणि संघ-भाजपातला पुरोगामी फिल्डवर काम करतना तेवढा दिसत नाही त्यामुळे संघ भाजपा सारख्या संघटनांचे नेतृत्वातील मोठा भाग परंपरावादाच्या प्रभावाखाली असल्याचे चित्र निर्माण होते आणि विरोधकांना त्यांच्या परंपरावादातील टोकावर तोंडसूख घेण्याची आयती संधी मिळते असे काही होते का ?

इथे अजून एक मुद्दा विरोधकांना संघावर टिका करण्यासाठी उपलब्ध असतो तो म्हणजे संघ-हिंदुत्ववादी समर्थक स्वतःच्या पुरोगामित्वाचा जो काही टेंभा मिरवताना दिसतात त्याचे खरे क्रेडीट पुरोगाम्यांनी कधीतरी मागे प्रेशर दिले असते आणि परंपरावादी अपरिहार्यतेने बदलले असतात तुम्ही स्वत: होऊन पुरोगामीत्वात कोणता पुढाकार घेतला या प्रश्नास परंपरावाद्यांकडील उत्तरास मर्यादा येऊ शकते पण विरोधक या मुद्द्यावरुन टिका करताना दिसत नाहीत, म्हणजे पुरोगामी भूमिकेची मशागत पुरोगाम्यांनी करावयाची, दबावाच्या खाली न बोलता काळाच्या ओघात बदलायचे आणि पुन्हा पुरोगामी म्हणून पुरोगाम्यांएवजी परम्परावाद्यांनीच क्रेडीट घ्यायचे असे काही होताना दिसते का?

लोकशाहीतील राजकीय सहभागातून अपरिहार्यतेने संघ-भाजपा कोणत्यान कोणत्या वळणावर अतीटोकाच्या परंपरावाद्यांना बाजूला करुन बहुजनवादाची कास धरेलच अर्थात मतांच्या राजकारणात उघडपणे कबूल करुन खात्रीची मते देणारा परंपरावादी मतदारही जाहीरपणे दूर करता येत नाही आणि मते वाढवायची तर पुरोगामी आणि नवीन मतदारवर्ग मिळवणे आणि टिकवणे आले -मग परंपरावाद्यांच्या खांद्यावर बसताना चेहरा पुरोगामीतर असला पाहीजे पण परंपरावाद्यांना आपलाच आहे असे वाटले पाहीजे अशा दुविध स्थितीतून सातत्याने राईट ऑफ सेंटर परंपरावादी पक्षांना जावे लागते आणि तिच कसरत संघ-भाजपाच्या बाबतीतही होते का ?

५) या सर्वा पेक्षा विरोधकांच्या हातचे खरे कोलीत असावे अशी टिका रमेश ओझा करतात ती म्हणजे "संघाने आजवर एकही आंदोलन पूर्णत्वास नेले आणि त्यातून काही हाती लागले, असे आजवर कधीही झाले नाही. एकही मोठे सामाजीक काम, बाबा आमटेंसारखी मोठी व्यक्तिमत्वे, एखादी संकल्पना किंवा मान्यवर विचारक संघाने घडविल्याची उदाहरणे दिसत नाहीत. ज्यांना समाजातील सर्वोत्कृष्ट म्हणावे, अशी माणसे संघासोबत फारच कमी आहेत. संघातील या बुद्धीदारीद्र्याचे कारण काय आहे याचा विचार करावा" इति रमेश ओझा.

रमेश ओझांच्या या टिकेशी शंभर टक्के सहमत होता येईल का हे कदाचित विवाद्य असेल पण संघावर टिका करून त्यांना डिफेन्सीवला ठेवतानाच उत्तरादाखल संघ-भाजपाला सतत रचनात्मक काम आणि सकारात्मक व्यक्तिमत्वे उदाहरण म्हणून उत्तरा दाखल द्यावी लागतील, उत्तर व्यवस्थित द्यायचे असेल तर रचनात्मक आणि सकारात्मक घडण करणे आले, तसे संघानी न करताच संकुचित स्वरुपाची उदाहणे समर्थकांनी पुढे ठेवली कि टिकेची आयती संधी म्हणून अ‍ॅडव्ह्कसी पॉईंट ऑफ व्ह्यू विरोधकांनी संघ-भाजपावर टिका करावयाचीच असेल तर तेच ते त्यांच्या शाखा आणि नथुराम हे उगाळून कोळसा झालेले मुद्दे पुन्हा उगाळण्यापेक्षा रमेश ओझांचे वाक्य जसेच्या तसे शंभरवेळा पाठ करुन पुन्हा पुन्हा म्हटले तरी हरकत नाही. फक्त रिस्क एवढीच कि संघ समर्थ प्रत्युत्तर म्हणून तुमचे स्वतःचे रचनात्मक काम दाखवा म्हणतील तर ते दाखवण्यास टिकाकारांपाशीही उपलब्ध असावयास हवे किंवा कसे.

६) धागा लेख संपवताना संस्कृती आणि धर्म यांची गल्लत करण्यात ना संस्कृती संवर्धन निटसे होते न धर्म संवर्धन निटसे होते आणि हि गल्लत जगातील सर्वच परंपरावादी करतात, पण संस्कृती आणि धर्म वेगवेगळे प्रोमोट करण्याचा पर्याय / मार्ग हिंदुत्ववादी स्वतःहून बंद करत असतात का अशी साशंकता मला नमुद कराविशी वाटते.

उपरोक्त टिका जशिच्या तशी स्विकारावी असे नाही रमेश ओझा काय किंवा माझ्या टिकेत काय उणीवा असतील -किमान माझी टिका राजकीय अथवा धार्मीक द्वेषातून नक्कीच नाही- कदाचित मला माझी मते बदलावी लागतील तर बदलेनही. पण दुसर्‍या बाजूने शक्यतो टिकेस उत्तर द्यायचे म्हणून देण्या पेक्षा मनाचा खुलेपणा जोपासल्यास आत्मपरि़क्षणाची संधी म्हणून टिकेकडे पाहून मग टिके बद्दल चर्चा केल्यास संघ-भाजपा समर्थकांनाच या चर्चेचा अधिकाधीक लाभ घेता येऊ शकेल अशी आशा आहे. लास्ट बट नॉट लिस्ट मटाचे वृत्तांकन मुळापासून वाचावे मला ते जसे च्या तसे कॉपीपेस्ट करता आलेले नाही.

*** या विषयावरील माझे धागा लेख ***

* रा.स्व. संघावरील हि वेगळी टिका तुम्हाला पटते का ?

* संघ भाजपाने याचा विस्तार करावा

* दूध, 'वीरजण' ते तुप आणि परंपरावादाची सुयोग्य जोपासना

समाजविचार

प्रतिक्रिया

नाना स्कॉच's picture

12 Mar 2016 - 2:26 pm | नाना स्कॉच

६) धागा लेख संपवताना संस्कृती आणि धर्म यांची गल्लत करण्यात ना संस्कृती संवर्धन निटसे होते न धर्म संवर्धन निटसे होते आणि हि गल्लत जगातील सर्वच परंपरावादी करतात, पण संस्कृती आणि धर्म वेगवेगळे प्रोमोट करण्याचा पर्याय / मार्ग हिंदुत्ववादी स्वतःहून बंद करत असतात का अशी साशंकता मला नमुद कराविशी वाटते.

+कैक वेळा!!

संस्कृती सुंदर शिल्प निपजते अन धर्म आधारित परंपरावादी त्यावर जीर्णोद्धाराच्या नावाने ऑइल पेंटचे फटकारे मारतो! काय बोलणार!

संघाच्या कट्टर समर्थकांनाही संघ हा काय प्रकार आहे ते अजून समजलेलं नाही. मुळात संघावर उत्तरं द्यायची सक्ती करता येईल का? भाजप हा राजकीय पक्ष असल्यामुळे लोकांना उत्तरदायी आहे असं म्हणता येईल. संघ हा राजकीय पक्ष नाही. ती एक सांस्कृतिक संघटना आहे असं संघ स्वयंसेवकांचं म्हणणं आहे. संघाचे विरोधक त्याची तुलना सिमी किंवा लष्कर ए तोयबा यासारख्या संघटनांशी करतात. नाझी किंवा फॅसिस्ट संघटना आणि संघ यांच्यात खूप साधर्म्य आहे हे अनेक पत्रकार मित्रांकडून ऐकलेलं आहे. संघ १९२५ मध्ये स्थापन झाला तेव्हापासून ते आत्तापर्यंत अनेक स्थित्यंतरं देशात आणि जगात आलेली आहेत. त्यानुसार संघाची भूमिकाही बदललेली आहे.
माझ्या मते संघाचं एक contribution मान्य करावंच लागेल - एक genuine विरोधी पक्ष त्यांनी आधी जनसंघ आणि नंतर १९८० पासून भारतीय जनता पक्षाच्या नावाने भारताला दिला. त्या आधी जे पक्ष काँग्रेसविरोधी होते त्यातले कम्युनिस्ट हे देशाच्या काही भागांत - उदाहरणार्थ केरळ, खूप प्रभावी होते पण त्यांना अखिल भारतीय स्थान नव्हतं. प्रजा समाजवादी पक्ष आणि मिनू मसानींचा स्वतंत्र पक्ष हे काँग्रेसला पर्याय उभा करु शकले नाहीत. १९७७ च्या जनता पक्ष प्रयोगात सारे विरोधी पक्ष भारतीय लोकदलाच्या झेंड्याखाली लढले पण जास्तीत जास्त जागा जनसंघाला मिळाल्या.
पुढे इंदिरा गांधी आणि राजीव गांधींच्या मृत्यूनंतर काँग्रेस पक्ष दुर्बळ झाला आणि भाजप रामजन्मभूमी-बाबरी मशीद वादाच्या पार्श्वभूमीवर एकदम पुढे आला. १९९६ मध्ये अटलबिहारी वाजपेयींचं सरकार फक्त १३ दिवसांच्या कारकीर्दीनंतर पडलं तेव्हा विरोधी पक्षांनी एकत्र येऊन भाजपला सभागृहात बहुमत मिळू दिलं नव्हतं. मला वाटतं - संघ आणि भाजप या दोघांसाठी हा एक landmark क्षण होता. अजाणतेपणी इतर पक्षांनी भाजपला एवढं महत्त्व दिलं होतं. त्याचं कारण जरी या इतर पक्षांनी धर्मनिरपेक्षतेचं संरक्षण वगैरे कारण दिलं असलं तरी भाजप एक वेगळा राजकीय पर्याय म्हणून समोर आल्याची ही अप्रत्यक्ष कबुली होती.
२०१४ चा विजय हा संघ आणि भाजप या दोघांसाठीही अभूतपूर्व असला तरी सरकार चालवणं आणि विरोधी पक्षात राहून टीका करणं या गोष्टी वेगळ्या आहेत हे त्यांना लवकरात लवकर समजून घ्यायला पाहिजे. भारतीय मतदारांनीही एकाच पक्षाला सत्तेत दीर्घकाळ न बसवता दोन्हीही राष्ट्रीय पक्षांना - भाजप आणि काँग्रेस - संधी दिली पाहिजे.

विवेकपटाईत's picture

12 Mar 2016 - 4:26 pm | विवेकपटाईत

एकही मोठे सामाजीक काम, बाबा आमटेंसारखी मोठी व्यक्तिमत्वे, एखादी संकल्पना किंवा मान्यवर विचारक संघाने घडविल्याची उदाहरणे दिसत नाहीत. बाबा रामदेवाना सर्वोकृष्ट म्हणणार नाही. (आज लाखो शेतकर्यांचे भल त्यांनी केल आहे, शिवाय भारताच्या गायींचे दुग्ध उत्पादन वाढविण्यासाठी ५०० कोटींची विशाल गौ शाळा / नंदी शाळा वर्षभरातच तैयार होणार आहे). येत्या काही वर्षांतच भारतीय गायी हि १० किलो पेक्षा जास्त दूध देताना दिसतील.
बाकी आज जे समाज सेवक आणि दलित उद्धारक म्हणून समाजात मिरवितात त्यांनी दलितांसाठी काही एक केलेले नाही.

एखाद वर्ष हि जो कुणी संघाच्या शाखेत गेलेला असेल, तो खर्या अर्थाने पुरोगामी बनतो.
अधिकांश शिक्षित लोक संघाशी जुळलेले आहे, संघात जाणारा भाजीवाला हि शिक्षित आणि काही वर्षात सुखवस्तू हि बनतो. (आमच्या गल्लीतच पटरीवर भाजी मांडणारा, २० एक वर्ष आधी संघाच्या शाखेत जाऊ लागला होता, आज त्याचे घर माझ्या घरापेक्षा चांगले आहे, कारण संघाच्या शाखेतल्या इतर शिक्षित लोकांचा सहवास आणि आपुलकी त्याला मिळाली, शिवाय बाजार हि..

नाना स्कॉच's picture

12 Mar 2016 - 4:47 pm | नाना स्कॉच

पटाईत सर आये और साथ में पतंजलि ण लाये ऐसे हो नै सकता म्हणे मी

येत्या काही वर्षांतच भारतीय गायी हि १० किलो पेक्षा जास्त दूध देताना दिसतील.

सर मुदलातच नाही तर व्याजात कसे येणार????

नाव आडनाव's picture

12 Mar 2016 - 5:04 pm | नाव आडनाव

भारताच्या गायींचे दुग्ध उत्पादन वाढविण्यासाठी ५०० कोटींची विशाल गौ शाळा / नंदी शाळा वर्षभरातच तैयार होणार आहे). येत्या काही वर्षांतच भारतीय गायी हि १० किलो पेक्षा जास्त दूध देताना दिसतील.

मला वाटतंय तुम्हाला भारतीय गाय म्हणजे गावरान गाय म्हणायचंय आणि १० किलो म्हणजे १० लिटर, बरोबर?
गावरान गायीचं दूध उत्पादन वाढवण्यसाठी काय आणि कसे प्रयत्न करण्यात येणार आहेत हे थोडक्यात लिहू शकता का?

देशाच्या मागासलेल्या भागात संघाच्या हजारोंच्या संख्येने शाळा विद्या भारती च्याच २०,००० हून शाळा आणि ६५००० हून जास्त एकल विद्यालय आहेत. मोठ्या शहरातल्या कुठल्या हि झुग्गी कालोनीत जा बहुतेक गरीब, दलित, मागासलेल्या विध्यार्थाना शिकविताना संघाचे लोक दिसतीलच. सरस्वती शिशु मंदिर हि निम्न मध्यम वर्गीय लोकांसाठी आहेतच.
संघाचे स्वयं सेवक प्रसिद्धी पासून दूर राहतात एवढेच.

हेच लिहायला आलो होतो.

आनन्दा's picture

12 Mar 2016 - 6:41 pm | आनन्दा

बाकीच्या गोष्टी चर्चा करण्यायोग्य असतील, पण हा कामाचा मुद्दा निर्विवाद असत्य आहे. संघाचे प्रचंड काम आहे. पण ते डोळ्यात भरत नाही. माझ्या स्वतःच्या घरात पूर्णवेळ स्वयंसेवक असल्यामुळे मी या गोष्टी नक्कीच सांगू शकतो.

पटाईतजी चर्चा सहभागा बद्दल आणि रचनात्मक कार्य मांडण्याच्या प्रयत्ना बद्दल आभार, या धागा चर्चेतून मनमोकळे आत्मपरिक्षणपण अभिप्रेत असावे.

बाकी आज जे समाज सेवक आणि दलित उद्धारक म्हणून समाजात मिरवितात त्यांनी दलितांसाठी काही एक केलेले नाही.

इथे दुसर्‍यांनी काय केले नाही हे आपण मोजता आहात त्यांना हा प्रश्न जरुर विचारला जावयास हवा. पण आपण स्वतःच विषय काढला आहे तर विषमता निर्मुलन, समान संधी आणि सकारात्मक कृती (अफर्मेटीव्ह) अ‍ॅक्शनच्या बाबतीतील संघाचे रचनात्मक योगदान या विषयावर या निमीत्ताने आपण प्रकाश टाकल्यास आम्हा सर्वांच्याच माहितीत भर पडेल.

श्रीगुरुजी's picture

12 Mar 2016 - 5:27 pm | श्रीगुरुजी

संपूर्ण लेखात संघ म्हणजे केवळ अर्धी खाकी विजार, पांढरा सदरा व काळी टोपी घालून शाखेत जाणारे स्वयंसेवक एवढेच गृहीत धरले असावे असे वाटते. वास्तविक संघाने अनेक वेगवेगळ्या क्षेत्रात विस्तार करून संघटना काढलेल्या आहेत (राजकीय क्षेत्रात भाजप, विद्यार्थी क्षेत्रात अभाविप, धार्मिक क्षेत्रात विहिंप, कामगार क्षेत्रात भामसं, वनवासी क्षेत्रात वनवासी संघ इ.) मूळ संघ या पितृसंघटनेत नसलेले पण या इतर संघटनेत असलेले संघाच्या मूळ तत्वज्ञानाशी सहमत असतातच असे नाही व तसे असण्याची सक्ती देखील नाही. संघ हा वृक्ष समजला तर या इतर संघटना त्या वृक्षाच्या फांद्या आहेत. या संघटनांव्यतिरिक्त इतर संघटना (बजरंग दल, पतितपावन संघटना, हिंदू एकता आंदोलन, श्रीराम सेने इ.) संघाच्या नियंत्रणाखाली नाहीत. परंतु जेव्हा जेव्हा या इतर संघटनांकडून काही टीकायोग्य कृत्य घडते, तेव्हा तेव्हा संघपरिवाराकडून ते कृत्य घडल्याच्या चुकीच्या बातम्या छापल्या जातात.

संघ कार्यकर्ते हे प्रसिद्धिपराङमुख राहून काम करतात. त्यामुळे त्यांनी कार्याचा गाजावाजा होत नाही. त्यामुळे बाबा आमटे यांच्यासारखी थोर व्यक्तिमत्वे संघाने घडविल्याचे दिसत नाही. कै. नानाजी देशमुखांसारखा एखादाच अपवाद.

संघाने भारताच्या सर्व क्षेत्रात शिरकाव करून आपले स्थान भक्कम केले आहे. संघाला भारताच्या अवकाशातून नष्ट करणे अत्यंत अवघड आहे. संघावर एकूण ३ वेळा बंदी आणली गेली. प्रत्येक बंदीनंतर संघ नेस्तनाबूत होण्याऐवजी अधिकाधिक मजबूत होत गेला. १९४८ मधील पहिल्या बंदीनंतर संघ अधिक फोफावला. १९७५ मधील बंदीनंतर संघ कार्यकर्त्यांना प्रथमच केंद्रात व काही राज्यात सत्तेत स्थान मिळाले. १९९२-९३ मधील बंदीनंतर संघ स्वयंसेवक पंतप्रधान झाला आणि आता संघाच्या राजकीय शाखेला स्वबळावर बहुमत मिळून केंद्रात सरकार आहे.

डॉ. हेडगेवारांच्या काळात संघ जन्म घेऊन तग धरून राहिला. कै. गोळवलकर गुरूजींच्या काळात संघ जोमाने वाढला परंतु संघाची प्रतिमा साधुबैराग्यांची संघटना अशीच राहिली. नंतर कै. देवरसांच्या काळात संघ व्यावहारिक व्हायला सुरूवात होऊन राजकारणात जोमाने वाढू लागला. त्यानंतर आजतगायत संघ भक्कम उभा आहे. बदलत्या काळानुसार संघाने आधुनिकतेचा स्वीकार केला, परंतु गणवेष, शाखा इ. बाबतीत संघ अजूनही स्थापनेच्या काळातच वावरत आहे. संघ गणवेष बदलणार असल्याच्या बातम्या कायम येत असतात, परंतु अजून कार्यवाही झालेली दिसत नाही.

बदलत्या गतिमान जीवनात संध्याकाळी १ तास शाखेवर जाणे बहुतेक विद्यार्थ्यांना शक्य नाही. त्यामुळे संघशाखेवर उपस्थिती कमी होत आहे हे निरीक्षण सत्य आहे. परंतु शाखेवर न जाता सुद्धा संघाचे विचार मनात ठेवता येतात. महाविद्यालयीन १-२ दिवसांची छोटी शिबिरे आयोजित करून संघ विद्यार्थ्यांशी नाळ जोडण्याचा प्रयत्न करीत आहे.

अनुप ढेरे's picture

12 Mar 2016 - 9:55 pm | अनुप ढेरे

राजकीय क्षेत्रात भाजप, विद्यार्थी क्षेत्रात अभाविप, धार्मिक क्षेत्रात विहिंप, कामगार क्षेत्रात भामसं, वनवासी क्षेत्रात वनवासी संघ इ.

यातलं वनवासी कल्याण आश्रम सोडलं तर कंस्ट्रक्टिव काम कोण करतं? आणि काय करतं? सगळे गुंंडगिरीसाठी प्रसिद्ध आहेत.

संघ परिवाराच्या मानल्या जातात अशा बँकांनी (पश्चिम महाराश्ट्रात सहकारी बँकांचा सावळा गोंधळ असताना देखील) चांगल्या पध्दतीने सहकाराचे जाळे विणलेले आहे. काही क्षुल्लक अपवाद वगळता अन इतर पक्षांनी खाजगी संस्थानासारख्या चालवलेल्या मध्यवर्ती बँकासमोर हे यश अत्यंत डोळ्यात भरणारे आहे.

नितिन थत्ते's picture

13 Mar 2016 - 9:27 am | नितिन थत्ते

>>संघ हा वृक्ष समजला तर या इतर संघटना त्या वृक्षाच्या फांद्या आहेत. या संघटनांव्यतिरिक्त इतर संघटना (बजरंग दल, पतितपावन संघटना, हिंदू एकता आंदोलन, श्रीराम सेने इ.)परंतु जेव्हा जेव्हा या इतर संघटनांकडून काही टीकायोग्य कृत्य घडते, तेव्हा तेव्हा संघपरिवाराकडून ते कृत्य घडल्याच्या चुकीच्या बातम्या छापल्या जातात.

हे विधान टिपिकल संघी आहे. बजरंग दलाची कृत्ये संघाला मान्य नसतात का? मान्य नसतील तर विनय कटियार यांना भाजपने आपल्या पक्षातर्फे उमेदवारी देऊ नये असे संघाने कधी भाजपला सांगितले आहे काय? सांगितले असूनही भाजप ऐकत नसेल तर संघ स्वयंसेवक कटियार यांच्या प्रचाराला जाणार नाहीत अशी भूमिका संघाने घेतली आहे का?

उगाच काय आपलं !!!

तर्राट जोकर's picture

13 Mar 2016 - 11:28 am | तर्राट जोकर

उगाच काय आपलं !!!>>> ताकाला जाऊन भांडं लपवणं??

श्रीगुरुजी's picture

13 Mar 2016 - 12:54 pm | श्रीगुरुजी

बजरंग दलाची कृत्ये संघाला मान्य किंवा अमान्य असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही कारण बजरंग दल ही एक पूर्ण वेगळी संघटना आहे. भाजपचे उमेदवार संघ ठरवीत नसतो. भाजप अनेकवेळा भाजपशी संबंधित नसलेल्यांना उमेदवारी देतो (उदा. सुरेश प्रभू).

विनय कटीयार सुरवातीला अभाविपमध्ये होते. नंतर ते संघाचे पूर्णवेळ प्रचारकही होते. त्यानंतर काही काळाने त्यांनी हिंदू जागरण मंच नावाची संघटना व नंतर बजरंग दलाची स्थापना केली. म्हणजे तसे ते संघाशी काही काळ संबंधित होते परंतु नंतर त्यांनी स्वतःची वेगळी चूल मांडली.

अर्धवटराव's picture

13 Mar 2016 - 12:58 pm | अर्धवटराव

=))
=))
=))

तर्राट जोकर's picture

13 Mar 2016 - 1:30 pm | तर्राट जोकर

बजरंग दल ही एक पूर्ण वेगळी संघटना आहे >> आपसेना ही पूर्ण वेगळी संघटना आहे हे मान्य न करणार्‍या गुरुजींना बजरंग दल ही पूर्ण वेगळी संघटना आहे हे कसे मान्य होते?

नाना स्कॉच's picture

13 Mar 2016 - 1:34 pm | नाना स्कॉच

*श्री गुर्जी मोड़ ऑन*

कमाल आहे ! इथे कोणी केजरीवालचे नाव तरी घेतले आहे का उगीच आपले काहीही

*श्री गुर्जी मोड़ ऑफ़*

(फ्री) भुर्जी फॅन

नाना

तर्राट जोकर's picture

13 Mar 2016 - 1:41 pm | तर्राट जोकर

स्वाभिमान संघटना ही काँग्रेसशी संबंधित नसूनही ती आहेच असा दावा केवळ नितिश राणे हे युवा काँग्रेस, मुंबैचे काही काळ पदाधिकारी होते ह्यावरुन करणारे श्रीगुरुजी संघप्रचारक (माजी?) विनय कटीयार यांनी बजरंग दलाची 'वेगळी चूल' मांडली हेही ठसक्यात सांगतात.

श्रीगुरुजी's picture

13 Mar 2016 - 1:59 pm | श्रीगुरुजी

स्वाभिमान संघटना ही काँग्रेसशी संबंधित नसूनही ती आहेच

हा दावा मी कोठे केला आहे?

श्रीगुरुजी's picture

13 Mar 2016 - 2:00 pm | श्रीगुरुजी

आपसेना ही पूर्ण वेगळी संघटना आहे हे मान्य न करणार्‍या गुरुजींना

आपसेना ही पूर्ण वेगळी संघटना आहे हे मी कोठे अमान्य केले आहे?

तर्राट जोकर's picture

13 Mar 2016 - 2:11 pm | तर्राट जोकर

तुम्हाला सोयिस्करपणे विसरायचे असेल तर तुम्हाला घटनेने पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे.

श्रीगुरुजी's picture

13 Mar 2016 - 2:19 pm | श्रीगुरुजी

मी कोणतीच गोष्ट विसरलेलो नाही. तुम्हाला दुसर्‍याच्या नावावर खोटे खपवायची सवय लागलेली आहे. म्हणूनच माझ्या नावावर तुम्ही जे दावे खपवित आहेत ते मी दावे नक्की कोठे केले आहेत याचा संदर्भ मागत आहे. ते संदर्भ द्या अथवा माझ्या नावावर जे खोटे दावे खपवित आहात ते मागे घ्या.

तर्राट जोकर's picture

13 Mar 2016 - 2:40 pm | तर्राट जोकर

स्वतःच्या प्रतिसादांची नोंद घेऊन ठेवत जा.

http://www.misalpav.com/comment/793343#comment-793343

ती मूळची आआपचीच कार्यकर्ती आहे. ती इतर कोणत्याही पक्षाशी संबंधित नाही. तिचा एखाद्या पक्षाशी संबंध असेल तर तो फक्त आआपशीच असेल. राष्ट्रवादी काँग्रेस व संभाजी ब्रिगेड किंवा इंदिरा काँग्रेस व सेवा दल हे जसे वरवर वेगळे वाटतात तसेच आआप पक्ष व आम आदमी सेना आहेत.

http://www.misalpav.com/comment/793523#comment-793523
आआप पक्ष आणि आम आदमी सेना हे फक्त वरवर वेगळे आहेत (जसे इंदिरा काँग्रेस व सेवादल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस व संभाजी ब्रिगेड). ही सर्व नौटंकी मागील नौटक्यांचीच पुनरावृत्ती आहे. त्यात तसूभरही फरक नाही.

http://www.misalpav.com/comment/794554#comment-794554

अहो, ते दोन्ही एकच आहेत. जसा इंदिरा काँग्रेस व सेवा दल यांच्यात अजिबात फरक नाही, तसाच या दोघांमध्येही काहीही फरक नाही.

http://www.misalpav.com/comment/805503#comment-805503

आम आदमी सेना व आआप हे एक नसून आम आदमी सेना ही आआपमधील लोकांनीच सुरु केलेली संघटना आहे हे मी सुरवातीपासूनच सांगत आहे. एक संघटना आहे व एक राजकीय पक्ष आहे. परंतु त्या राजकीय पक्षातीलच मंडळी या संघटनेत आहेत. भावना अरोरा ही एकाच वेळी आआपची सदस्य असून आम आदमी सेनेची सुद्धा सदस्य आहे. अशी 'दुहेरी निष्ठा' असलेले नेते सर्व पक्षात असतात. इथेही तसेच आहे.

श्रीगुरुजी's picture

13 Mar 2016 - 3:09 pm | श्रीगुरुजी

जरा नीट वाचा. मला जे सांगायचे होते तेच मी स्पष्ट लिहिले आहे.

तर्राट जोकर's picture

13 Mar 2016 - 3:12 pm | तर्राट जोकर

काय सांगायचे आहे आणि काय स्पष्ट लिहिले आहे?

Ranapratap's picture

12 Mar 2016 - 6:30 pm | Ranapratap

Any way RSS is great

तर्राट जोकर's picture

12 Mar 2016 - 9:36 pm | तर्राट जोकर

जे आपल्या कामामुळे प्रसिद्ध होतात ते प्रत्यक्षात प्रसिद्धीलोलुप असतात म्हणून प्रसिद्ध होतात.

बाकी चालू द्या.

अनुप ढेरे's picture

12 Mar 2016 - 9:59 pm | अनुप ढेरे

संघ सनातनी आहे हे खर आहे. हिंदू धर्म हा इस्लाम/जुडाइझम च्या धरतीवर ऑर्गनाइज्ड करणं हे नक्की यांच उद्दिष्ट आहे.
हिंदूंनी चार मुलं काढली पाहिजेत हे आणि यासारखे विचार संघ/त्याच्याशी अफिलिएटेड लोकांकडून कैक वेळेला ऐकलेले आहेत.

नाना स्कॉच's picture

12 Mar 2016 - 10:35 pm | नाना स्कॉच

हिंदु धर्म कधीच ह्या सेमिटिक धर्मांसारखा मोनोलिथिक होऊ शकत नाही! इथे एकच धर्माच्या टाइटल खाली असंख्य कंट्राडिक्टरी विचार नांदतात, हजारो वर्षे नांदले आहेत नांदलेच पाहिजेत, तेच हिंदु धर्माचे सौंदर्य आहे अन तेच बलस्थान सुद्धा आहे, ह्याच एका कारणांमुळे जे कोणी व्यक्ति/संस्था मोनोलिथिक हिंदुत्व पुढे करतात त्याचा उदोउदो करतात तेच सगळ्यात मोठा धोका वाटतात मला धर्माला असलेला,.

राही's picture

13 Mar 2016 - 11:01 am | राही

नाना स्कॉच आणि मूळ अनुप ढेरे यांचा प्रतिसाद, दोन्हींशी सहमत.
संघाच्या दृष्टीने संगठन म्हणजे एकजिनसीपणा, तोही त्यांना अभिप्रेत असलेला. यात हिंदुधर्माचे जे खरे बलस्थान विविधता, ते नष्ट होते. अनेक छोट्याछोट्या अस्मिता ज्या या समाजगटांना जगण्याचे बळ देतात, त्या दडपल्या जातात. भाषा, खानपानसवयी, आचार यावर संघ आणि प्रणीत संस्थांकडून नक्कीच आक्रमण होत असते. संघ आणि प्रणीतांना अभिप्रेत पद्धतीचाच प्रसार होईल असे पाहिले जाते. भाषा हा यातला ठळक मार्ग आहे. अलीकडच्या सरकारी जाहिराती पाहिल्या तर त्यांची भाषा नको वाटावी इतकी संस्कृतनिष्ठ/मय होत चालली आहे. अशी कायशीशी एक जाहिरात पाहा : "अपने शौचके समापन के लिए शौचालय की उपलब्धि का प्रयोग करें". अनेक योजनांची नावे संस्कृतमय झाली आहेत. बहुविधता झटकण्याचाच हा एक भाग आहे असे मला वाटते.

संघाने 'आदिवासी' हा शब्द बदलून त्याऐवजी 'वनवासी' हा शब्दप्रयोग वापरणे का सुरू केले? त्यामागे आदिवासींची या भूमीचे आदिम रहिवासी ही ओळख पुसण्याचा हेतू नव्हता? वनवासी हा शब्द मराठीत हेटाळणी, कुचेष्टेच्या रूपाने वापरला जातो. उदा. 'असा काय वनवाश्यासारखा फिरतोयस?'. त्यामुळे मला संघाचा हेतू हा आदिवाश्यांचे हिंदूकरण करणे आणि मिशनरींच्या धर्मप्रसाराला हिंदू पर्याय उभा करणे हा वाटतो.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

13 Mar 2016 - 8:37 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

माझं धर्मांतरावरचं वाचन अत्यंत कमी आहे. त्यामुळे ठामपणे ह्यावर मतं मांडु शकणार नाही.

बहुतांश आदिवासी माझ्या माहितीप्रमाणे तरी हिंदु धर्मातचं मोडतात आणि ख्रिश्चन मिशनरी किरकोळ आमिषं दाखवुन आनंद चा अँटोनी करतात. स्वधर्माचं संरक्षण करणं ह्यामधे मलातरी काही चुक वाटत नाही.

नमस्ते सदा वत्सले मातृभुमे,
त्वया हिंदुभुमे सुखम वर्दितोहम
महामंगले पुण्यभुमे त्वदर्थे
पतत्वेशकायो नमस्ते नमस्ते

प्रभो शक्तीमन हिंदुराष्ट्रांगभुता

संघ प्रार्थनेचं पहिलं कडवं आणि दुसर्‍या कडव्याची पहिली ओळ पहा. :)

नाना स्कॉच's picture

13 Mar 2016 - 9:06 am | नाना स्कॉच

आदिवासी (ते वनवासी वगैरे मी नाही म्हणत) किरिस्ताव होतात ते सुद्धा काही धर्मावर फार मोठा राग आहे म्हणून वगैरे नाही तर 2 वेळच्या भाकरीची सोय ह्या एकमेव एजेंडा वर होतात, आपण कधी मध्य भारतीय आदिवासी बेल्ट मधे फिरला आहात का ते माहीती नाही, पण हे फॅक्ट आहे, सीमांध्र प्रांतात तर सुनामी नंतर संघ तिथे पोचायच्या आत मास कन्वर्शन झाली होती, त्यातला एक अनुभव वाचला होता कुठेतरी एक माणुस मदत घ्यायला (धान्य प्लास्टिक शीट भांडीकुंडी इत्यादी) कधी क्रिस्चियन होत असे तर कधी हिंदु धर्मात टिकून राहत असे , त्यांच्या धर्मनिष्ठेवर शंका घ्यायचे कारण नसते तर सर्वाइवल हे प्रायोरिटी असते .

वनवासी (संघाच्या भाषेत) हिंदु फोल्ड मधे ठेवायचे असले तर पहिले म्हणजे त्यांना त्यांचे महत्व सांगा, पोटाला भाकरी अन हाताला काम द्या! त्यांना धर्माची गोळी नुसतीच देऊन उपयोग नाही. बाकी हे माझा धर्म तुझा धर्म धर्मरक्षण वगैरे कन्वर्शन वगैरे आपल्या शहरी निमशहरी किंवा कनेक्टिविटी असलेल्या ग्रामीण भागात असलेली फैड आहेत.

शिवाय अजुन एक मुद्दा म्हणजे , स्वधर्माचे रक्षण म्हणजे हिंदु धर्माच्या पर्सपेक्टिव मधे काय?? हा मुलभुत विचार प्रथम व्हावा, संघ जसा मोनोलिथिक हिंदु धर्म अपेक्षितो तसा तो होणे नाही कधीच, स्वधर्मरक्षण अन आदिवासी जनतेला कन्वर्शन पासून वाचवणे म्हणजे प्रथम त्यांच्या चालीरीती अन मान्यता अन संस्कार वगैरेना मुख्यधारेचे अधिष्ठान देणे होय, अमुक एक पद्धत चुक अन तमुक बरोबर असे नसावे/नकोय. असो!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

13 Mar 2016 - 10:23 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

तुमच्या मताशी सहमत आहे.

आदिवासी (ते वनवासी वगैरे मी नाही म्हणत) किरिस्ताव होतात ते सुद्धा काही धर्मावर फार मोठा राग आहे म्हणून वगैरे नाही तर 2 वेळच्या भाकरीची सोय ह्या एकमेव एजेंडा वर होतात,

हेच्चं किरकोळ आमिषं दाखवुन धर्मांतरण.

पोटाला भाकरी आणि हाताला काम मिळालं तर ह्या धर्मांतरणाचं प्रमाण शुन्यवत होईल.

स्वधर्माचं रक्षण म्हणजे हो हिंदु धर्माचं रक्षण. सगळ्या जाती पोटजातींसकट. मात्रं ह्याचा अर्थ नित्यनेमाने चुकीचा लावला जातो असं आजवरचं निरिक्षण आहे. स्वधर्माचं रक्षण करणं हि भुमिका आक्रमक नाही (माझ्या मते आक्रमक असायला हवी) तर डिफेन्स स्टान्स आहे. दुसर्‍या धर्माचा आदर जरुर करावा ना नाही, पण त्यासाठी स्वधर्माचा बळी द्यायचा विचारही नको एवढी साधी स्पष्ट विचारसरणी हवी.

तर्राट जोकर's picture

13 Mar 2016 - 11:31 am | तर्राट जोकर

ह्याच पर्टिक्युलर केसेस मधे संघ स्वधर्माचं रक्षण कसं करतो?

स्वधर्माचं रक्षण म्हणजे हो हिंदु धर्माचं रक्षण. सगळ्या जाती पोटजातींसकट.

हेहेहेहेहेहे
आदीवासींना मुख्य प्रवाहात आणायचे, त्यांचा विकास करायचा सगळे ठिक आहे हो बोलायला. पण मुख्य प्रवाह काय? बहुजनांचा, अभिजनांचा? आपली जी धर्मरक्षणाची भुमिका तीच त्यांनी पण पाळावी? मग हिंदु धर्मातल्या वेगवेगळ्या पोटजातीचा त्यांच्या परंपरांचा आदर करायच्या भुमिकेचे कसे? त्यांची भुमिका त्यांना ठरवू द्या ना.
आदिवासी सोडा, साधे पारधी वगैरे जमातीसाठी चालवल्या जाणार्‍या शाळांचे अनुभव बोलके आहेत. त्यांना मुक्त प्रवाहात आणताना त्यांची पिढ्यानपिढ्यांची जीवनवैशिश्ट्ये नष्ट नाही ना करत आपण?
संस्कृत सरस्वती स्तोत्र शिकवून म्हणवून घेणे एकवेळ कौतुकास्पद पण तीच मुले मोर खाया लै चांगला लागतो असे म्हणले की पांढरपेशांना धक्का बसतो. शाळेतल्या खिचडीला कंटाळून ही मुले गलोलीने पाखरे टीपून काट्याकुटक्यावर भाजून खातात.
हिंदू म्हणजे काय, पुराणे काय ह्याचे त्यांना देणेघेणे नाही. भाकरीसाठी किरीस्ताव झालेली आदिवासी मंडळी गळ्यात क्रॉसही घालतील पण निसर्ग पुजायची सोडणार नाहीत.
धर्मांतर म्हणजे राश्ट्रांतर ही कल्पना आवेश आणायला जेवढी सोपी तेवढीच धर्मांतराचा विरोध करण्यासाठी अवघड.
पूर्वांचल, नागालँड सारखी उदाहरणे वारंवार दिली जातात. पण आदीवासींना काय हवे याचा विचार कसा करणार? भाकरी अन थोड्या पैशासाठी ते धर्म बदलतात. मग त्यांची बुध्दी कशी बदलते? काही ठिकाणी तथाकथित वर्गलढा ह्या संकल्पनेलाही आदीवासी आपलेसे करतात म्हणतात. तेथे धर्माचा काय रोल असतो? भारत देश अन देशप्रेम नामक संकल्पनेत हिंदू असणे अन एकच एक पध्दतीची धर्मपालनाची स्टाइल मस्टच आहे का?

नाना स्कॉच's picture

13 Mar 2016 - 12:32 pm | नाना स्कॉच

मला नेमके असेच म्हणायचे होते पण कदाचित माझ्यात ती कला नाही (एग्रेसिवली मुद्दा मांडणे), हिंदु धर्म रक्षण म्हणले की त्यात पोथीनिष्ठा आली अन आपल्या पोथ्या तर एकलव्य सारख्या शोकांतिका सांगत असतात, त्यांचा (आदिवासी लोकांचा हिंदु ) धर्म कुठला? का आजपण त्यांनीही एकलव्याचा अंगठा घेणे कसे उत्तम होते हेच म्हणावे?

"सकल हिंदु धर्म रक्षण" हे टिपिकल पुस्तकी वचन वाटते बऱ्याच वेळी!

तर्राट जोकर's picture

13 Mar 2016 - 12:39 pm | तर्राट जोकर

दोन्ही प्रतिसाद आवडले. अजून खुप लिहिण्यासारखे आहे. चर्चा पुढे जाऊ द्या.

राही's picture

13 Mar 2016 - 6:46 pm | राही

अगदी अगदी.

अभ्या..'s picture

13 Mar 2016 - 1:01 pm | अभ्या..

स्वधर्माचं रक्षण करणं हि भुमिका आक्रमक नाही (माझ्या मते आक्रमक असायला हवी) तर डिफेन्स स्टान्स आहे.

हिटलरी तत्वांचा अंगीकार नाही वाटत?
स्वधर्म... हम्म. अशा कोणत्या सूत्रात बांधलेय/ बांधू शकू/ बांधणार आहोत?
अगदी सिंपल, समजा आदिवासींनी म्हणले आमचा धर्म खरा हिंदू धर्म आहे आणि त्यानुसारच सर्वांनी वागावे. धर्माचरण करावे. असे म्हणत नाहीत ते सोडा पण शक्य आहे का ते?

अर्धवटराव's picture

13 Mar 2016 - 1:16 pm | अर्धवटराव

हिटलरी तत्वांचा अंगीकार नाही वाटत?

हे नेमकं काय तत्वज्ञान आहे?

जस्ट परवा परवा आला होता हो धागा. ऊडवला :(
तीच लिंक दिली असती नाहीतर.

आदिवासी जनतेला कन्वर्शन पासून वाचवणे म्हणजे प्रथम त्यांच्या चालीरीती अन मान्यता अन संस्कार वगैरेना मुख्यधारेचे अधिष्ठान देणे होय, अमुक एक पद्धत चुक अन तमुक बरोबर असे नसावे/नकोय. असो!

अगदी बरोबर, ३३ कोटी देवांमध्ये जगातल्या सर्व आदीवासींच्या देवतांना स्थान द्यावयास हवे. ज्याला त्याला त्याचा देव त्याच्या पद्धतीने पुजू द्यावा केवळ काही जमातीत विच हंटींग सारख्या अंधश्रद्धा आहेत तेवढ्या पुरती पुरोगामी प्रबोधन करावे.

तर्राट जोकर's picture

13 Mar 2016 - 3:33 pm | तर्राट जोकर

तेहतीस कोटी देव ही वेगळी संकल्पना आहे. ब्रह्मांडाचे तीन स्तर धरुन प्रत्येकी अकरा देवता अशा तेहेत्तीस प्रकारच्या देवता. कोटी म्हणजे प्रकार की आणखी काही असेल पण ती संख्यामात्र निश्चित नाही.

आदिवासींच्या देवतांना इतर कोणाच्या देवतांमधे स्थान देणे हे आपसूक घडत आलेले सांस्कृतिक अभिसरण आहे. ठळकपणे बघायचे तर शिवलिंग हे उदाहरण आहे. शिवलिंगाचा मूळ अर्थ आणि त्याच्या पुजनाच्या मागची कारणे आजच्या सुशिक्षित मुख्यप्रवाहातल्या अभिजात सुसंस्कृत म्हणवल्या जाणार्‍या वर्गाला गळी उतरवणे शक्य नाही. भारत देशात अशा अनेक मान्यता आणि रुढी आहेत ज्या इतर लोकांन पचनी पडणार नाहीत.

घटनेने दिलेल्या हक्कांच्या अंमलबजावणीस आडकाठी ठरणार्‍या सर्व प्रथा, रुढी बंद कराव्यात. त्यासाठी पुढाकार घ्यावा. भाजपसरकारने जातीने वाळीत टाकण्याच्या कृतीला दंडनीय अपराध ठरवून ह्या बद्दल एक चांगले पाऊल टाकले आहे. पण जाती जातीच्या वोटब्यांका परत जात पंचायतींच्याच हातात असल्याने ह्या कायद्याच्या अंमलबजावणीच्या प्रभावाबद्दल साशंकता आहे.

सतिश गावडे's picture

13 Mar 2016 - 3:56 pm | सतिश गावडे

ठळकपणे बघायचे तर शिवलिंग हे उदाहरण आहे. शिवलिंगाचा मूळ अर्थ आणि त्याच्या पुजनाच्या मागची कारणे आजच्या सुशिक्षित मुख्यप्रवाहातल्या अभिजात सुसंस्कृत म्हणवल्या जाणार्‍या वर्गाला गळी उतरवणे शक्य नाही. भारत देशात अशा अनेक मान्यता आणि रुढी आहेत ज्या इतर लोकांन पचनी पडणार नाहीत.

यावर लिहा हो. वेदांमधला रुद्र पुढे "शिव" झाला असे एखादे वाक्य वाचायला मिळते. मात्र त्यावर सविस्तर कुठेच लिहिलेलं नाही. अमिश त्रिपाठीच्या शिवा ट्रायॉलॉजीमधून थोडीफार कल्पना येईल असे वाटते. मात्र ते "फिक्शन" असेल बरंचसं.

तर्राट जोकर's picture

13 Mar 2016 - 4:12 pm | तर्राट जोकर

ह्याबद्दल माझ्यापेक्षा जास्त चांगले प्रचेतस सर सांगू शकतील. मला आता जास्त काही आठवत नाही. लिंगपुजा प्राचीन भारतीय परंपरा आहे, कदाचित आर्यांच्याही आधीची, द्रविडी असावी. ह्यात लिंग व योनी ह्यादोघांचे एकत्र अवस्थेतले पूजन आहे. निसर्गाच्या निर्मितीचे प्रतिक म्हणून आदीम भारतीय ह्याची पुजा करत असावेत. आताच्या शिवलिंगांमधे जी योनी ही रचना लिंगावर केलेला अभिषेकाचे पाणी, दूध इत्यादी वाहून जाण्याची सोय आहे असं मला लहानपणी शिकवल्या जायचे (ती योनी आहे हे पुढे वाचल्यावर कळलं).

माहितगार's picture

13 Mar 2016 - 4:15 pm | माहितगार

आपले प्रचेतस आहेत की माहिती देण्यासाठी. एका मराठी संधोधिकेचा भरातातील लिंगपुजेच्या विकासाच्या टप्प्यांच्या संदर्भाने रिलायेबली माहिती देणारा लेख बर्‍याच वर्षांपुर्वी लोकप्रभा साप्ताहीकात वाचण्यात आला होता, मी त्या बंतर वाचलेल्या सर्व लेखना पेक्षा तो उजवा होता असे अंधूकसे आठवते.

सतिश गावडे's picture

13 Mar 2016 - 4:19 pm | सतिश गावडे

आता प्रचेतस सरांना भेटणे आले. :)

माहितगार's picture

13 Mar 2016 - 4:25 pm | माहितगार

पाकीस्तानातील आदीवासीतील लिंगपूजा धर्मांतर फाळणी यातून अलिकडे पर्यंत कशी टिकुन राहीली होती, याची एका पाकिस्तानी अँथ्रॉपॉलॉजीस्टने अलिकडे दखल घेतली आहे. आंजावर शोधल्यास मिळेल. भूतान मधील पवित्रा देवक-टोटेम लिंग प्रतिक प्रथा या बद्दलही आंजावर शोधल्यास काही माहिती मिळू शकेल असे वाटते

बोका-ए-आझम's picture

13 Mar 2016 - 1:38 pm | बोका-ए-आझम

बहुतांश आदिवासी माझ्या माहितीप्रमाणे तरी हिंदु धर्मातचं मोडतात

काही आदिवासी जमाती या स्वतःचा वेगळा धर्म पाळतात. इंग्रजीत त्याला Pagan हा शब्द आहे. हा धर्म फक्त त्या जमातीपुरता मर्यादित असतो. मला स्वतःला मध्य प्रदेशात होशंगाबादमध्ये एका project वर काम करत असताना भेटलेल्या आदिवासींनी - राम आणि कृष्ण म्हणजे काय? आमच्यासाठी झाडे, विंध्य पर्वत, नर्मदा नदी हे देव आहेत असं सांगितलं होतं. त्यांना हनुमान, रावण हे कोण आहेत हेही माहित नव्हतं. ईशान्य भारतातही असे अनेक आदिवासी आहेत. मी पुण्याला शिकत असताना दोन्ही - हिंदू आणि pagan आदिवासी मुलांशी (मणिपूर, आसाम, मिझोराम येथून आलेल्या) ओळख झाली होती. त्यावरून हे सांगू शकतो. पण या pagan लोकांचा पूर्ण आदिवासी लोकसंख्येतला हिस्सा माहित नसल्यामुळे ठाम सांगू शकत नाही.

माहितगार's picture

13 Mar 2016 - 3:25 pm | माहितगार

काही आदिवासी जमाती या स्वतःचा वेगळा धर्म पाळतात. इंग्रजीत त्याला Pagan हा शब्द आहे.

इथे महत्वपुर्ण दुरुस्तीची गरज असावी, पागान, हैदा हे शब्द काफीरच्या खालोखाल ज्युडायिक धर्मीयांकडून इतरांसाठी तुच्छतेने वापरले जातात, त्यात मुर्ती पुजक हिंदुंचाही नंबर लागतो -फक्त तोंडावर तुम्हाला स्वतःला उद्देशून म्हणणार नाहीत एवढेच. ज्युडायिक धर्मीयांनी पागान, हैदा हे शब्द वापरले म्हणून कोणत्याही हिंदुने आणि सहिष्णू व्यक्तिने ते वापरु नयेत.

मराठीत पाखंडी किंवा उर्दू/फारसीमध्ये काफिर या अर्थाने. पण Pagan हा शब्द तुच्छतापूर्ण शब्द आहे असं वाटत नाही. तो तसा वापरला जात असेल तर क्षमस्व. माझ्या पाहण्यात तरी तो तसा वापरलेला कुठे आढळला नाही. Dan Brown च्या Da Vinci Code मध्ये बरेच वेळा हा शब्द वापरलेला आहे. बोर्निओ बेटावरील लोकांचं वर्णन करणारा एक संशोधनपर लेख National Geographic मध्ये वाचला होता. त्यात Pagan Tribes असा स्पष्ट उल्लेख होता.

हम्म. दा विंची कोड मध्ये आहेच पण पॅगन म्हणजे एकच धर्मग्रन्थ, प्रेषित नसणारे, अनेकेश्वरी/खूप देवांना भजणारे लोक, ख्रिस्तपूर्व परंपरांना सुध्दा चालू ठेवणारे निसर्गपूजक लोक या अर्थी वापरला जातो असे वाटते.
त्यात तुच्छतेची छटा आहे हे माहीत नवते.

बोका-ए-आझम's picture

14 Mar 2016 - 1:07 am | बोका-ए-आझम

हा अर्थ लावला तर हिंदूपण pagan होतात.

बोका-ए-आझम's picture

14 Mar 2016 - 1:08 am | बोका-ए-आझम

हा अर्थ लावला तर हिंदूपण pagan होतात.

अभ्या..'s picture

14 Mar 2016 - 1:13 am | अभ्या..

हम्म.
पॅगन विषयी नाही जास्त माहीती मला. :(
थोडीफार वाचनातूनच.

माहितगार's picture

14 Mar 2016 - 8:11 am | माहितगार

पण Pagan हा शब्द तुच्छतापूर्ण शब्द आहे असं वाटत नाही. तो तसा वापरला जात असेल तर क्षमस्व.

किमानपक्षी दुसर्‍या संस्कृती किंवा धर्मांतर होण्याच्या आधीच्या त्यांच्याही पुर्वजांच्या संस्कृती दखल न घेण्याजोगे हि अप्रत्यक्ष अर्थछटा व्यक्तिशः मला जाणवते आणि काही सांस्कृतिक भाग प्रथा पागान असल्यावरुन जे सांस्कृतिक छळ जगात वेळोवेळी केले गेले - मला या विषयावर धागा लेख टाकणे बाकी आहे- ते पागान शब्दाचा वापर स्पृहणिय ठरवतात असे व्यक्तिशः मला वाटत नाही.

बोका-ए-आझम's picture

13 Mar 2016 - 1:43 pm | बोका-ए-आझम

लहानपणी केस वाढल्यावर " काय ते कातक-यासारखे केस वाढले आहेत, जा कापून ये " असं अनेक वेळा ऐकलेलं आहे. कातकरी म्हणजे काय हे विचारल्यावर आदिवासी हे उत्तर मिळालं होतं, वनवासी नाही.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

12 Mar 2016 - 11:55 pm | निनाद मुक्काम प...

संघाच्या चूक माझ्यामते एकच झाली ती घोडचूक होती
देशात संघाची स्थापना झाली तेव्हा ती सांस्कृतिक संघटना होती ,
पण त्यांनी सुरवातीपासून स्वताची राजकीय विंग काढणे गरजेचे होते.
देशात कोन्ग्रेज ला पर्याय तुरळक प्रमाणात कम्युनिस्ट व मुस्लिमांच्या साठी मुस्लिम लीग होती
सावकारांची हिंदू महासभा होती पण माझे प्रामाणिक मत आहे
जनसंघ फार उशिरा झाला.
तो स्वातंत्र्यपूर्व काळात निर्माण झाला असता तर किमान काही प्रांतात त्यांची सरकारे अस्तित्वात असती गव्हर्नन्स चा अनुभव मिळाला असता फाळणी व इतर अनेक मुद्यांच्या वर त्यांना नेहरू जिन्हा सोबत इंग्रजांनी चर्चेस बोलावले असते.
सत्ता हाती आल्याशिवाय केवळ सांस्कृतिक संघटना करून हिंदूचे भले शक्य नव्हते त्यातच गोडसे च्या निमित्ताने कारण नसतांना संघावर बंदी तसेस त्यांना बदनाम करण्यात आले
मुळात राजकीय अस्तित्व नसल्याने उद्योगपती प्रसार माध्यमे ह्यांचे पाठबळ केवळ सत्ताधारी पक्षाला असल्याने त्यांनी संघांची पध्धतशीर पणे बदनामी केली व जनसामान्यात संघाची कट्टर व जातीयवादी अशी प्रतिमा निर्माण झाली ,
संघ सुरवातीपासून राजकारणात असतात तर कोन्ग्रेज ला पर्याय म्हणून इंग्रजांनी सुद्धा संघाच्या राजकीय वाटचालीवर बंधने आणली नसती अनेक संस्थानिक व उद्योगपती ह्यांचा संघाला पाठिंबा लाभला असता. लोकशाहीत भारतात अनेक वर्ष कोन्ग्रेज ला प्रबळ विरोधक नव्हता म्हणून त्यांचे फावले किंबहुना ह्यात भारताचे नुकसान झाले देशाव

संघाच्या वैचारिक गोंधळावर अनेक चांगली पुस्तकें उपलब्ध आहेत. ओझा ह्याच्या मताशी मी सुमारे १००% सहमत आहे.

लेखकाला जर सदर विषयावर आणखीन माहिती हवी असेल तर कृपया Elst, सीताराम गोयल, राम स्वरूप इत्यादीचे लिखाण वाचावे. बाकीचे हिडन अजेंडा वगैरे सगळ्या कोन्ग्रेसी थापा आहेत त्या धुळवडीत मी शिरत नाही. वैचारिक गोंधळ पाहूया:

माझ्या मते संघाच्या वैचारिक गोंधळाचे कारण संघाच्या मुळात आहे. गोळवलकर गुरुजी किंवा डॉक्टर दोघेही जणांना वैचारिक आधाराचा तिटकारा होता. म्हणून संघाची मुलभूत विचारसारणी निर्माण करण्याचा त्यांनी जाणून बुजून प्रयत्न केला नाही. संघाच्या ह्या दोन्ही प्रमुखांनी विशेष असे लिखाण केले नाही, जे काही केले ते सुद्धा अतिशय नायीलाजाने केले. गुरुजी तर स्वयंसेवकांना "वाचन करण्यात वेळ घालवू नका" असे सांगत असत.

ह्यात चुकीचे असे काही होते असे मला वाटत नाही. "संघटना कशासाठी?" हा प्रश्न डॉक्टरना कुणी तर विचारला आणि त्यांनी उत्तर दिले "चांगले आरोग्य कशासाठी?". डॉक्टर साहेब अतिशय स्पष्ट शब्दांत सांगत कि हि संघटना केवळ "हिंदू संघटन" ह्याच्या साठीच असून त्याला दुसरा वेगळा उद्धेश नाही. ( राजकीय किंवा सामाजिक ).

अर्थांत त्यांचा उद्धेष सफल झाला ह्यांत संशय नाही. संघटना ह्या दृष्टीने RSS ला तोड नाही. १००० लोक हे सहज पाणे गोळा करू शकतात. पण दूरगामी विचार करण्या साठी संघटने शिवाय जे काही लागते ते ह्यांच्या कडे नाही. राजीव मल्होत्रा ज्या प्रमाणे म्हणतात कि "पूर्वपक्ष" म्हणजे आपल्या विरोधकांच्या बाजूचा त्यांच्या दृष्टीकोनातून अभ्यास करणे हे बहुतेक हिंदू समाज सेवकांत नाहीच. म्हणून आर्थिक किंवा राजकीय विषयावर संघ वाल्याची मते एक तर बाष्कळ असतात किंवा चुकीच्या माहितीवर आधारित असतात.

उदाहरणार्थ सांगायचे झाले तर "शिक्षणाचा अधिकार" कायदा. ह्यावर मी मिपावर मागे लिहिले आहे. संघाकडे जर वैचारिक ताकद असती तर ह्या कायद्याला त्यांनी वेळीच विरोध केला असता. पण ते त्यांनी केले नाही उलट नागपूर मध्ये भाजप सरकार ह्या कायद्याने शाळांना नोटीस पाठवत आहे.

काही वर्षां मागे भारतातील एक फार आणि थोर हिंदू विचारवन्ताची भेट झाली. मी त्यांना विचारले "आता हिंदू अनुकूल मोदी सरकार आल्याने तुम्हाला Policy Formulation मध्ये जास्त सहभाग भेटत असेल नाही ?" तर त्याने मला एक किस्सा सांगितला. "माझ्या सारख्या लोकांना संघ जवळ करत नाही, हे लोक फक्त idea वाले असतात, ह्यांना जवळ ठेवू नका असे म्हणे त्यांची पोलिसी आहे. Idea हवीच असेल तर एक दिवस चहाला बोलवून ऐकून घ्या असे त्यांचे म्हणणे आहे. ".

संघवाल्यांशी संघाबद्दल काही बोललं की ते नेहमी, 'संघ बोलण्याची नाही अनुभवण्याची गोष्ट आहे', 'संघ वृक्ष आहे' असं मोघम आणि संदिग्ध बोलतात. बाकी बोकाशेठच्या विरोधी पक्षाच्या मुद्द्यावर सहमत.... नागरी सहकारी बॅंका आणि शिक्षण क्षेत्रात संघाचे काम जाणवते... पण holier than thou, approach वाटतो.

नागरी सहकारी बॅंका आणि शिक्षण क्षेत्रात संघाचे काम जाणवते.

अर्धा सहमत. शिक्षणाच्या बाबतीत नाही म्हणू शकणार. मराठवाड्यात वैद्यकीय क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य आहे.

संघविचारी संचालक मंडळाच्या शिक्षणसंस्था जास्त काळ तग धरतात.... असे माझे मत आहे

गामा पैलवान's picture

13 Mar 2016 - 11:29 pm | गामा पैलवान

माहितगार,

श्री रमेश ओझा यांच्या टीकेतला पाचवा मुद्दा पटला नाही. बाबा आमटे यांच्यासारखी माणसे उत्पन्न करण्यात संघ कमी पडला, असं ते म्हणतात. पण संघाची भूमिका प्रसिद्धीपराङ्मुख राहून कार्य करण्याची आहे.

मात्र असं असलं तरी मला एक गंभीर त्रुटी जाणवते. गोळवलकरांच्या मते भारत हे अध्यात्मिक राष्ट्र आहे. अर्थात त्याबद्दल कुणाही सश्रद्ध हिंदूच्या मनात इवलीशीही शंका नाही. मात्र हे अध्यात्म संघाच्या कार्यकर्त्यांत दृष्टीस पडतं का? उत्तर नकारार्थी आहे. सामान्य माणसाला संघाची अध्यात्मिक मुळं पक्की वाटंत नाहीत.

श्री. ओझा ज्यास संघाचा वैचारिक गोंधळ म्हणतात तो गोंधळ सुस्पष्ट अध्यात्मिक भूमिका न घेतल्याने उत्पन्न झाला आहे. त्यासाठी अध्यात्मिक साधना अनिवार्य आहे. गोळवलकरांची जन्मजात साधना होती. मात्र त्यांच्या पश्चात संघाचे प्रमुख साधनेत असलेले वाटंत नाहीत. गोळवलकरांचे विचार जितके सुस्पष्ट होते तितकी स्पष्टता नंतरच्या नेतृत्वांत राहिली नाही. ही गंभीर त्रुटी आहे. ती ताबडतोब दूर व्हायला हवी.

आ.न.,
-गा.पै.

माहितगार's picture

14 Mar 2016 - 8:29 am | माहितगार

... पण संघाची भूमिका प्रसिद्धीपराङ्मुख राहून कार्य करण्याची आहे.

रचनात्मक कार्य करणारी बहुतांश मंडळी प्रसिद्धीपराङ्मुख पणे काम करतील यात नवल नाही पण म्हणजे बाकीचा समाज त्यांची आजीबात दखल घेत नसतो असेही नसावे, शंभरा मधला एकतरी स्वप्रसिद्धी न करताही माहिती होतच असावा.

मालोजीराव's picture

14 Mar 2016 - 2:36 pm | मालोजीराव

हे महत्वाचे नाही...संघवाल्यान्ना आता 'हाफचड्डिवाले'...'हाफचड्डिवाले' चिडवता येणार नाही यावर चर्चा व्हावी - एक
फुरोगामी

श्रीगुरुजी's picture

14 Mar 2016 - 2:46 pm | श्रीगुरुजी

हे वाचून ७ शेपटीवाल्या उंदराच्या गोष्टीची आठवण झाली.