लेखनप्रकार
जानेवारी २०१६ मध्ये 'ज्ञानयोद्धा' नावाची काही एक व्याख्यानमाला झाली असावी, रमेश ओझा नावाचे कुणि एक गांधीवादी आहेत त्यांचे या व्याख्यानमालेत रास्वसंघाची ९० वर्षे या विषयावर भाषण झाले असावे; ज्याचे महाराष्ट्र टाईम्स या वृत्तपत्राने वृत्तांकन केले होते. , रमेश ओझांनी रा.स्व. संघावर विरोधकांकडून होणार्या काही प्रचलीत टिकेतील उणिवा निदर्शनास आणल्या आहेत - आधार नसलेल्या टिका करु नयेत, निगेटीव्ह मार्केटींगने आधार नसलेल्या टिकाकारांचा जनाधार हरवू शकतो असे मलाही वाटते- त्याच वेळी रास्व संघावर नेहमीच्या टिकांपेक्षा रमेश ओझांनी काही वेगळी टिका केलेली दिसते.
१) संघाकडे 'हिडन अजेंडा' असल्याचा प्रचार केला जातो, ९० वर्षांपर्यंत एखादी संघटना एकच एक अजेंडा रचू शकते पुढील ९० वर्षांचा विचार करुन कट वगैरे रचू शकते असे रमेश ओझांना वाटत नाही.
माझ व्यक्तिगत मत संघ समर्थकांमध्ये परंपरावाद नक्कीच आहे, रास्व संघाच्या शाखा तशा खुल्या मैदानांवर भरतात, मीही दूरुनच मैदानांवर पाहतो, मोदी निवडून येई पर्यंत माझ्या जवळच्या मैदानावर सकाळी ८०+ वयाचे काही वयोवृद्ध पारंपारीक पोषाख घालून थोडीफार एक्सरसाईज करताना पाहीले आहेत पण तरुणवर्ग मोदी निवडून येईपर्यंत दिसला नव्हता, आता मोदी निवडून आल्यावर एखाद दुसरा तुरळक तरुण कोणत्याही पोषाखा शिवाय असलेली ५-१० कच्ची बच्ची गोळा करून एखाद्या दिवशी अधून मधून सराव करताना दिसतो. उर्वरीत १०० एक मुले स्वतंत्र प्लेग्रूप मधून त्याच मैदानावर खेळताना दिसतात, म्हणजे मिडीयात दाखवले जाते तेवढे रास्वसंघाच्या शाखांचे प्रस्थ नविन पिढीततरी शिल्लक आहे का या बद्दल साशंकता वाटते.
२) रमेश ओझांनी एक टिका संघाच्या वैचारीक गोधळावर केली आहे, - किमान मटा वार्ताहाराने केलेल्या वृत्तांकनात गोंधळ आहे का काय अशी शंका वाटते - संघ लोकशाहीचेही समर्थन करतो आहे आणि धर्म हा आधार ठेऊन काही विषीष्ट धर्मांशी संघर्ष करतो आहे असे रमेश ओझांना म्हणावयाचे असावे (चुभूदेघे) इथे रमेश ओझांचे म्हणणे अंशतः पटते की लोकशाहीत तुम्हाला तुमच्या सर्वच मतदारांशी जुळवून घ्यावे लागते -गोव्यातील राजकारणाच्या निमीत्ताने ह्या प्रक्रीयेस अंशतः सुरवात झाली असावी आणि इतर राज्यातही राजकारण जसे करावे लागेल तसे अधिक जमवून घ्यावे लागेल, जुनी पिढी जशी मागे पडेल तसे त्यातून विचारातील संकुचितता कमी होईल हा माझा व्यक्तिगत आशावाद
३) रमेश ओझांनी लोकशाही बरोबर रास्व संघ सनातन आणि उदात्त हिंदू धर्माचे समर्थन करतो यास वैचारीक गोंधळ म्हटले आहे. वस्तुतः माझ्या मते सनातनेचे-पारंपारीकतेचे आग्रह आणि उदात्ततेचे आग्रह ह्या दोन्ही स्वतंत्र गोष्टी आहेत सर्व पारंपारीकता उदात्त असतीलच अथवा नसतीलच असे सरसकट सांगणे कठीण असते प्रत्येक परंपरेचा स्वतंत्र विचार करावयास हवा आणि परंपरेत उदात्ततेची बाजू जिथे कमी पडते तिथे परंपरा चटकन नाकारली जावयास हवी, कोणत्याही लोकशाहीतील परंपरावादी संघटनाप्रमाणे संघ आणि भाजपातील परंपरावादी सुधारणावाद्याम्च्या दबावापुढे काळाच्या ओघात बदलत जातात पण लगेच बदलत नाहीत. आणि नेमके इथे संघ विरोधकांच्या टिकेचे लक्ष्य बनतो.
हिंदू धर्माची उदात्त बाजू कुणालाही कोणत्याही पद्धतीने इश्वर प्रार्थनेचे स्वातंत्र्य देते तेव्हा तुम्हाला काही विशीष्ट धर्म ग्रंथातील जेवढा भाग अत्यावश्यक म्हणून नाकारावयाचा आहे तेवढाच नाकारावा सरसकट नाकारण्याची गरज नसावी, 'भारतात जे राहतात त्यांना हिंदू म्हणतात' - 'भारतात जे कोणी राहतात त्यांना हिंदू म्हणू' आणि 'भारतात जे कोणी राहतात ते हिंदूच असावेत' या वाक्यांमध्ये सुक्ष्म पण महत्वाचे फरक आहेत.
* 'भारतात जे राहतात त्यांना हिंदू म्हणतात' या व्याख्येची मर्यादा बघा हे हिंदू परदेशात जाऊन राहतात तेव्हा त्यांना काय म्हणतात ?
* 'भारतात जे कोणी राहतात त्यांना हिंदू म्हणू' हि व्याख्या वस्तुतः अंशतः उदात्त असू शकते तुम्ही कोणत्याही धर्माचे आचरण करण्यास स्वातंत्र्य आहात एका मुस्लिम ख्रिश्चन अथवा ज्यु व्यक्तिस हिंदू असण्यासाठी काहीच करावयाचे नाही केवळ भारतीय असावयाचे आहे. त्याचा 'भारतात जे कोणी राहतात ते हिंदूच असावेत' आणि 'सनातन नाहीत ते हिंदू नाहीत' असे म्हटले की हि व्याख्या संकुचित होते, आणि संघाचे नेतृत्व नेमके या ठिकाणी उदात्ततेची तळी उचलून न घेता इस्वर प्रार्थना करणार्या लोकांनी कोणत्या दिशेस पाहून प्रार्थना करू नये हे सांगते -नव्या संघ नेतृत्वासोबत यात जरा बदल झाला असावा आणि संघ असे न कबुल करता बदलतही असतो- तुम्ही प्रार्थना कोणत्या दिशेने करावी हे जिथे सांगता तिथे तुमच्या उदात्त मुल्याची घसरणच होत नाहीए तुम्ही तुमच्या स्वतःच्या धर्मातील कोणत्याही पद्धतीने इश्वर प्रार्थनेच्या स्वातंत्र्याच्या मुलभूत तत्वाला नाकारता आहात हे लक्षातच घेतले जात नाही. संघाचे विरोधकही या नेमक्या मुद्द्यावर टिका करताना दिसत नाहीत तर रमेश ओझा म्हणतात तसे साप साप म्हणून तिसरीकडेच रिकाम्या जागेवर काठ्या मारताना दिसतात म्हणून संघाच्या टिकाकारांची टिकाही अभ्यासपूर्ण आणि तर्कसुसंगत होताना दिसत नाही. म्हणुन संघ आणि संघाचे टिकाकार दोन्हीही वैचारीक गोंधळात अडकले आहेत असे एक तटस्थ निरिक्षक म्हणून म्हणता येऊ शकते का ?
४) १९४० च्या दशकातील संघाची भूमिका प्रगतीशील नव्हती असे काहीसे रमेश ओझांना म्हणावयाचे असावे असे त्या वृत्तांकनातील एका मुद्यावरुन माझा समज झाला (चुभूदेघे) पण पुन्हा तेच की संघाचे टिकाकार संघ (तसे कोणतेही परंपरावादी पक्ष) काळाच्या ओघात -बदल स्विकारल्याचे जाहीरपणे न स्विकारता- बदलत जाताना दिसतात भारतीय घटना असो, भारतीय लोकशाही असो भारताचा तिरंगा असो हे संघ सावकाशपणे स्विकारत जाताना दिसतो, मागचे नेतृत्व लोकांनी कोणत्या दिशेने प्रार्थना करु नये ते सांगत होते आजचे संघाचे नेतृत्व कोणत्या दिशेने प्रार्थना करु नये यावर भाष्य करताना दिसत नाही
अर्थात पुरोगामी भूमिका जेवढ्या ठळकपणे संघाने घेऊन पुरोगामीत्व काय असते ते तुम्हीच आमच्याकडून शिका असे विरोधकांना छाती ठोकपणे सांगण्यासाठी लागणारी उदात्तता हिंदू धर्मात आहे पण ती हिंदू धर्माचे प्रतिनिधीत्वाचा दावा करणार्या संघात कमी पडते का ? - पुरोगामीत्वाच्या बाबतीत ज्युडायिक धर्मीय मागे पडले तर समजता येते हिंदू धर्मीय पुरोगामीतेत मागे पडण्याचे कारन नसावे जसे सनातन हिंदुत्ववाद असू शकेल त्या पेक्षा मोठी संधी पुरोगामी हिंदूत्ववादास हिंदू धर्मात इंट्रिसिकली आहेच त्याचा पुरोगामी लोक पुरेसा वापर करतात का या बद्दल साशंकता वाटते. खासकरुन संघ भाजपाचा जो फिल्डवरचा कार्यकर्ता आहे तो टोकाचा परंपरावाद जोपासतो आणि संघ-भाजपातला पुरोगामी फिल्डवर काम करतना तेवढा दिसत नाही त्यामुळे संघ भाजपा सारख्या संघटनांचे नेतृत्वातील मोठा भाग परंपरावादाच्या प्रभावाखाली असल्याचे चित्र निर्माण होते आणि विरोधकांना त्यांच्या परंपरावादातील टोकावर तोंडसूख घेण्याची आयती संधी मिळते असे काही होते का ?
इथे अजून एक मुद्दा विरोधकांना संघावर टिका करण्यासाठी उपलब्ध असतो तो म्हणजे संघ-हिंदुत्ववादी समर्थक स्वतःच्या पुरोगामित्वाचा जो काही टेंभा मिरवताना दिसतात त्याचे खरे क्रेडीट पुरोगाम्यांनी कधीतरी मागे प्रेशर दिले असते आणि परंपरावादी अपरिहार्यतेने बदलले असतात तुम्ही स्वत: होऊन पुरोगामीत्वात कोणता पुढाकार घेतला या प्रश्नास परंपरावाद्यांकडील उत्तरास मर्यादा येऊ शकते पण विरोधक या मुद्द्यावरुन टिका करताना दिसत नाहीत, म्हणजे पुरोगामी भूमिकेची मशागत पुरोगाम्यांनी करावयाची, दबावाच्या खाली न बोलता काळाच्या ओघात बदलायचे आणि पुन्हा पुरोगामी म्हणून पुरोगाम्यांएवजी परम्परावाद्यांनीच क्रेडीट घ्यायचे असे काही होताना दिसते का?
लोकशाहीतील राजकीय सहभागातून अपरिहार्यतेने संघ-भाजपा कोणत्यान कोणत्या वळणावर अतीटोकाच्या परंपरावाद्यांना बाजूला करुन बहुजनवादाची कास धरेलच अर्थात मतांच्या राजकारणात उघडपणे कबूल करुन खात्रीची मते देणारा परंपरावादी मतदारही जाहीरपणे दूर करता येत नाही आणि मते वाढवायची तर पुरोगामी आणि नवीन मतदारवर्ग मिळवणे आणि टिकवणे आले -मग परंपरावाद्यांच्या खांद्यावर बसताना चेहरा पुरोगामीतर असला पाहीजे पण परंपरावाद्यांना आपलाच आहे असे वाटले पाहीजे अशा दुविध स्थितीतून सातत्याने राईट ऑफ सेंटर परंपरावादी पक्षांना जावे लागते आणि तिच कसरत संघ-भाजपाच्या बाबतीतही होते का ?
५) या सर्वा पेक्षा विरोधकांच्या हातचे खरे कोलीत असावे अशी टिका रमेश ओझा करतात ती म्हणजे "संघाने आजवर एकही आंदोलन पूर्णत्वास नेले आणि त्यातून काही हाती लागले, असे आजवर कधीही झाले नाही. एकही मोठे सामाजीक काम, बाबा आमटेंसारखी मोठी व्यक्तिमत्वे, एखादी संकल्पना किंवा मान्यवर विचारक संघाने घडविल्याची उदाहरणे दिसत नाहीत. ज्यांना समाजातील सर्वोत्कृष्ट म्हणावे, अशी माणसे संघासोबत फारच कमी आहेत. संघातील या बुद्धीदारीद्र्याचे कारण काय आहे याचा विचार करावा" इति रमेश ओझा.
रमेश ओझांच्या या टिकेशी शंभर टक्के सहमत होता येईल का हे कदाचित विवाद्य असेल पण संघावर टिका करून त्यांना डिफेन्सीवला ठेवतानाच उत्तरादाखल संघ-भाजपाला सतत रचनात्मक काम आणि सकारात्मक व्यक्तिमत्वे उदाहरण म्हणून उत्तरा दाखल द्यावी लागतील, उत्तर व्यवस्थित द्यायचे असेल तर रचनात्मक आणि सकारात्मक घडण करणे आले, तसे संघानी न करताच संकुचित स्वरुपाची उदाहणे समर्थकांनी पुढे ठेवली कि टिकेची आयती संधी म्हणून अॅडव्ह्कसी पॉईंट ऑफ व्ह्यू विरोधकांनी संघ-भाजपावर टिका करावयाचीच असेल तर तेच ते त्यांच्या शाखा आणि नथुराम हे उगाळून कोळसा झालेले मुद्दे पुन्हा उगाळण्यापेक्षा रमेश ओझांचे वाक्य जसेच्या तसे शंभरवेळा पाठ करुन पुन्हा पुन्हा म्हटले तरी हरकत नाही. फक्त रिस्क एवढीच कि संघ समर्थ प्रत्युत्तर म्हणून तुमचे स्वतःचे रचनात्मक काम दाखवा म्हणतील तर ते दाखवण्यास टिकाकारांपाशीही उपलब्ध असावयास हवे किंवा कसे.
६) धागा लेख संपवताना संस्कृती आणि धर्म यांची गल्लत करण्यात ना संस्कृती संवर्धन निटसे होते न धर्म संवर्धन निटसे होते आणि हि गल्लत जगातील सर्वच परंपरावादी करतात, पण संस्कृती आणि धर्म वेगवेगळे प्रोमोट करण्याचा पर्याय / मार्ग हिंदुत्ववादी स्वतःहून बंद करत असतात का अशी साशंकता मला नमुद कराविशी वाटते.
उपरोक्त टिका जशिच्या तशी स्विकारावी असे नाही रमेश ओझा काय किंवा माझ्या टिकेत काय उणीवा असतील -किमान माझी टिका राजकीय अथवा धार्मीक द्वेषातून नक्कीच नाही- कदाचित मला माझी मते बदलावी लागतील तर बदलेनही. पण दुसर्या बाजूने शक्यतो टिकेस उत्तर द्यायचे म्हणून देण्या पेक्षा मनाचा खुलेपणा जोपासल्यास आत्मपरि़क्षणाची संधी म्हणून टिकेकडे पाहून मग टिके बद्दल चर्चा केल्यास संघ-भाजपा समर्थकांनाच या चर्चेचा अधिकाधीक लाभ घेता येऊ शकेल अशी आशा आहे. लास्ट बट नॉट लिस्ट मटाचे वृत्तांकन मुळापासून वाचावे मला ते जसे च्या तसे कॉपीपेस्ट करता आलेले नाही.
*** या विषयावरील माझे धागा लेख ***
* रा.स्व. संघावरील हि वेगळी टिका तुम्हाला पटते का ?
* संघ भाजपाने याचा विस्तार करावा
* दूध, 'वीरजण' ते तुप आणि परंपरावादाची सुयोग्य जोपासना
मिसळपाव
६) धागा लेख संपवताना संस्कृती
संघावर टीका करणाऱ्यांचं तर सोडूनच द्या
एकही मोठे सामाजीक काम, बाबा
In reply to एकही मोठे सामाजीक काम, बाबा by विवेकपटाईत
पटाईत सर आये और साथ में
सर मुदलातच नाही तर व्याजात कसे येणार????
In reply to एकही मोठे सामाजीक काम, बाबा by विवेकपटाईत
भारताच्या गायींचे दुग्ध
In reply to एकही मोठे सामाजीक काम, बाबा by विवेकपटाईत
देशाच्या मागासलेल्या भागात
In reply to देशाच्या मागासलेल्या भागात by आनन्दा
बाकीच्या गोष्टी चर्चा
In reply to एकही मोठे सामाजीक काम, बाबा by विवेकपटाईत
विषमता निर्मुलन, समान संधी आणि सकारात्मक कृती योगदान ?
संपूर्ण लेखात संघ म्हणजे केवळ
In reply to संपूर्ण लेखात संघ म्हणजे केवळ by श्रीगुरुजी
राजकीय क्षेत्रात भाजप,
In reply to राजकीय क्षेत्रात भाजप, by अनुप ढेरे
संघ परिवाराच्या मानल्या जातात
In reply to संपूर्ण लेखात संघ म्हणजे केवळ by श्रीगुरुजी
>>संघ हा वृक्ष समजला तर या
In reply to >>संघ हा वृक्ष समजला तर या by नितिन थत्ते
उगाच काय आपलं !!!>>> ताकाला
In reply to >>संघ हा वृक्ष समजला तर या by नितिन थत्ते
बजरंग दलाची कृत्ये संघाला
In reply to बजरंग दलाची कृत्ये संघाला by श्रीगुरुजी
भाजपचे उमेदवार संघ ठरवीत नसतो.
In reply to बजरंग दलाची कृत्ये संघाला by श्रीगुरुजी
बजरंग दल ही एक पूर्ण वेगळी
In reply to बजरंग दल ही एक पूर्ण वेगळी by तर्राट जोकर
*श्री गुर्जी मोड़ ऑन*
In reply to बजरंग दल ही एक पूर्ण वेगळी by तर्राट जोकर
स्वाभिमान संघटना ही
In reply to स्वाभिमान संघटना ही by तर्राट जोकर
स्वाभिमान संघटना ही
In reply to बजरंग दल ही एक पूर्ण वेगळी by तर्राट जोकर
आपसेना ही पूर्ण वेगळी संघटना
In reply to आपसेना ही पूर्ण वेगळी संघटना by श्रीगुरुजी
तुम्हाला सोयिस्करपणे विसरायचे
In reply to तुम्हाला सोयिस्करपणे विसरायचे by तर्राट जोकर
मी कोणतीच गोष्ट विसरलेलो नाही
In reply to मी कोणतीच गोष्ट विसरलेलो नाही by श्रीगुरुजी
स्वतःच्या प्रतिसादांची नोंद
In reply to स्वतःच्या प्रतिसादांची नोंद by तर्राट जोकर
जरा नीट वाचा. मला जे सांगायचे
In reply to जरा नीट वाचा. मला जे सांगायचे by श्रीगुरुजी
काय सांगायचे आहे आणि काय
RSS
जे आपल्या कामामुळे प्रसिद्ध
संघ सनातनी आहे हे खर आहे.
In reply to संघ सनातनी आहे हे खर आहे. by अनुप ढेरे
हिंदु धर्म कधीच ह्या सेमिटिक
In reply to हिंदु धर्म कधीच ह्या सेमिटिक by नाना स्कॉच
सहमत.
संघावर माझा एक आक्षेप.
In reply to संघावर माझा एक आक्षेप. by एस
माझं धर्मांतरावरचं वाचन
In reply to माझं धर्मांतरावरचं वाचन by कॅप्टन जॅक स्पॅरो
आदिवासी (ते वनवासी वगैरे मी
In reply to आदिवासी (ते वनवासी वगैरे मी by नाना स्कॉच
तुमच्या मताशी सहमत आहे.
In reply to तुमच्या मताशी सहमत आहे. by कॅप्टन जॅक स्पॅरो
ह्याच पर्टिक्युलर केसेस मधे
In reply to ह्याच पर्टिक्युलर केसेस मधे by तर्राट जोकर
स्वधर्माचं रक्षण म्हणजे हो
In reply to स्वधर्माचं रक्षण म्हणजे हो by अभ्या..
+111111 लैच वेळा
In reply to +111111 लैच वेळा by नाना स्कॉच
दोन्ही प्रतिसाद आवडले. अजून
In reply to स्वधर्माचं रक्षण म्हणजे हो by अभ्या..
+१^न
In reply to तुमच्या मताशी सहमत आहे. by कॅप्टन जॅक स्पॅरो
स्वधर्माचं रक्षण करणं हि
In reply to स्वधर्माचं रक्षण करणं हि by अभ्या..
हिटलरी तत्वज्ञान काय होतं/आहे ?
In reply to हिटलरी तत्वज्ञान काय होतं/आहे ? by अर्धवटराव
जस्ट परवा परवा आला होता हो
In reply to आदिवासी (ते वनवासी वगैरे मी by नाना स्कॉच
आदिवासी जनतेला कन्वर्शन पासून
In reply to आदिवासी जनतेला कन्वर्शन पासून by माहितगार
तेहतीस कोटी देव ही वेगळी
In reply to तेहतीस कोटी देव ही वेगळी by तर्राट जोकर
ठळकपणे बघायचे तर शिवलिंग हे
In reply to ठळकपणे बघायचे तर शिवलिंग हे by सतिश गावडे
ह्याबद्दल माझ्यापेक्षा जास्त
In reply to ठळकपणे बघायचे तर शिवलिंग हे by सतिश गावडे
आपले प्रचेतस आहेत की माहिती
In reply to आपले प्रचेतस आहेत की माहिती by माहितगार
आता प्रचेतस सरांना भेटणे आले.
In reply to आता प्रचेतस सरांना भेटणे आले. by सतिश गावडे
पाकीस्तानातील आदीवासीतील
In reply to माझं धर्मांतरावरचं वाचन by कॅप्टन जॅक स्पॅरो
बहुतांश आदिवासी माझ्या
In reply to बहुतांश आदिवासी माझ्या by बोका-ए-आझम
दुरुस्तीची गरज असावी
In reply to दुरुस्तीची गरज असावी by माहितगार
Heathen हा शब्द तुच्छतेने वापरला जातो हे मान्य.
In reply to Heathen हा शब्द तुच्छतेने वापरला जातो हे मान्य. by बोका-ए-आझम
हम्म. दा विंची कोड मध्ये आहेच
In reply to हम्म. दा विंची कोड मध्ये आहेच by अभ्या..
नाही अभ्याभौ!
In reply to हम्म. दा विंची कोड मध्ये आहेच by अभ्या..
नाही अभ्याभौ!
In reply to नाही अभ्याभौ! by बोका-ए-आझम
हम्म.
In reply to Heathen हा शब्द तुच्छतेने वापरला जातो हे मान्य. by बोका-ए-आझम
पण Pagan हा शब्द तुच्छतापूर्ण
In reply to संघावर माझा एक आक्षेप. by एस
मी exactly उलटं ऐकलंय.
संघाच्या चूक माझ्यामते एकच
संघाच्या वैचारिक गोंधळावर
संघवाल्यांशी संघाबद्दल काही
नागरी सहकारी बॅंका आणि शिक्षण
In reply to नागरी सहकारी बॅंका आणि शिक्षण by अभ्या..
संघविचारी संचालक मंडळाच्या
संघनेतृत्वातली एक गंभीर त्रुटी
In reply to संघनेतृत्वातली एक गंभीर त्रुटी by गामा पैलवान
... पण संघाची भूमिका
हे महत्वाचे नाही..
In reply to हे महत्वाचे नाही.. by मालोजीराव
हे वाचून ७ शेपटीवाल्या